Saturday, October 4, 2014

आर्यवंशाची मोहिनी


आर्यवंशाची मोहिनी

Oct 5, 2014, 12.43AM IST(MAHARASHTRA TIMES)

aarya
संजय सोनवणी

आर्य नेमके कोण? हा प्रश्न अजून चर्चेचा विषय आहे. मात्र आर्यांना भारतीय ठरवत, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या संस्कृत विभागाने आता हा प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या निमित्ताने आर्यसिद्धांताचा घेतलेला मागोवा.

एकोणिसाव्या शतकात जर्मन पंडीत म्यॅक्समुल्लर याने संस्कृत व युरोपिय भाषेतील काही साम्ये पाहून आर्यभाषा बोलणारा आर्यवंश हा सिद्धांत मांडला. भारतातील दरिद्री आणि अज्ञानी लोक एवढ्या सुंदर भाषेचे निर्माते असूच शकत नाहीत, या वांशिक अहंकारातून त्याने या भाषेची निर्मिती मूळ युरेशियात झाली असून तेथून या भाषा बोलणारे लोक गटागटाने जगभर (भारतातही) विखुरले असावेत असे प्रतिपादन केले. यात जर्मन वंशश्रेष्ठत्वाचा अर्थातच मोठा भाग होता. या सिद्धांतातील वांशिक भाग म्यॅक्समुल्लरने नंतर क्षमा मागत मागे घेतला असला, तरी आर्य वंशवादाच्या विस्फोटाची परिणती जर्मनीत काय झाली, हे सर्वांना माहीत आहे. भारतातील वैदिकही पूर्वी या सिद्धांताने शेफारुन जात, आपली मुळं पार आर्क्टिक प्रदेशातही हिरिरीने शोधू लागले होते. तेंव्हा सिंधुसंस्कृती सापडलेली नव्हती. ती सापडल्यानंतर वैदिक विद्वानांचं अस्वस्थ होणं स्वाभाविक होतं. सिंधुसंस्कृती उध्वस्त करणारे आक्रमक वैदिक आर्य ते सिंधुसंस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य अशा कोलांटउड्या कोणत्याही पुराव्याच्या अभावात ते हिरिरीने सांगू लागले. अलीकडे आर्य हे भारतातीलच व ते येथून संस्कृतीप्रसारासाठी जगभर गेले, असं सांगायची फॅशन आलेली आहे. श्रीकांत तलागेरी हे या गटाचे अध्वर्यू आहेत.

युरोपियन विद्वानांनी अलीकडे जरी वांशिक अर्थाने नाही, तरी युरो-भारतीय भाषागटाच्या नावाखाली या सिद्धांताची पाठराखण केलेली दिसते. या सिद्धांतानुसार युरो-भारतीय भाषा बोलणारे लोक पुरातन काळी दक्ष‌णि रशिया, मध्य आशिया किंवा काळ्या समुद्राच्या परिसरात राहत होते व तेथून ते इसपू २००० पासून स्थलांतर करत युरोप व दक्ष‌णि आशियात प्रवेशले. या सर्व युरो-भारतीय भाषांतील काही वरकरणी समान शब्द व व्याकरणाचे काही नियम हा मुख्यत: या सिद्धांताचा आधार. तर ऋग्वेदाचाच आधार घेत तलागेरी हे वैदिक आर्य हरियाणातून पश्चिमेकडे सरकत आधी इराण आणि पुढे युरोपात गेले, असं प्रत‌पिादन करत असतात. या दोन्ही सिद्धांतामागील राजकीय व सांस्कृत‌कि वर्चस्वतावादाच्या कारणांकडे वळण्याआधी मुळात या सिद्धांतात किती तथ्य आहे हे पाहिलं पाहिजे.

युरोपियन विद्वानांचा मुख्य भर आर्य हे दक्ष‌णि रशियातील असून अंड्रोनोवो संस्कृतीचे संस्थापक होते, असं मानण्यावर आहे. याची कारणं म्हणजे तेथे सापडलेली रथ व अश्वांची इसपू २००० मधील दफनं. ऋग्वेद, अवेस्ता व मितान्नी लोकांच्या पुरातन (इसपू १४००) लेखनात अश्व आणि आ-यांच्या रथांचे उल्लेख असल्याने अंड्रोनोवो संस्कृतीचे निर्माते आर्यच असले पाहिजेत, एवढाच या निष्कर्षामागील आधार. दुसरा कोणताही लिखित पुरावा नाही. मितान्नी व हट्टी लोकांमधील इसपू १४५० मद्ध्ये झालेल्या एका तहनाम्यात इंद्र, वरुण, मित्र, नासत्य या देवतांची नांवे 'इंदारा, उरुवनास्सिल, मिथरास्सिल आणि नाशतानिया' या रुपात अवतरतात, म्हणजे आर्य हे मेसोपोटेमियापर्यंत तोवर पसरुन तत्कालीन हुर्रीयन संस्कृतीत मिसळून गेले होते असाही दावा केला जातो. प्रत्यक्षात हुर्रीयन भाषा ही सेमेटिकही नाही की युरोभारतीय गटातीलही नाही. ती उर्गातिक भाषा आहे, असे भाषाविदच म्हणत असतात. ही नावं खरं पाहिलं तर प्राकृत भाषारुपांशी जुळतात, संस्कृत नव्हे, हे सहज लक्षात येईल. येथे हे लक्षात घेतलं पाहिजे की इंद्र-वरुण-मित्र ही दैवतं वैदिक अथवा झत्रुष्ट्रीय धर्म निर्माण होण्यापुर्वीपासून आशियायी प्रदेशात अस्तित्वात होती व तीही असूर म्हणून! शिव हा अस्सीरियन साम्राज्यात सिब म्हणून ओळखला जात होता. या भागातील विविध मानवी समूहांनी या देवतांची नावं कायम ठेवत त्यांना वेगवेगळी चरित्रं दिली. उदा. पर्शियनांनी वरुणाला देव मानलं, तर इंद्राला असूर. वैदिकांनी आधी दोघांना असूर मानलं, तर नंतर देव. नंतर कालौघात शिव वगळता त्या देवतांचं अस्तित्वही लोप पावलं. तत्कालीन जगात असूर संस्कृती प्रबळ होती, हे डॉ. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दाखवून दिलं आहे.

अस्सीरियन भाषा ही सेमेटिक गटातील असून तिचा वैदिक-अवेस्तन भाषेशी संबंध नसतानाही केवळ भौगोलिक निकटतेमुळे या देवतांचा प्रसार झाला. त्यासाठी आर्य भाषागटांच्या विखुरण्याची गरज नाही. महत्वाचं असं की अंड्रोनोवो संस्कृतीतील ज्या चाकांच्या आ-यांच्या रथांचा व अश्वांच्या दफनाचा पुरावा दिला जातो आणि त्यांच्यामुळेच युद्धरथ व घोडे आशिया व युरोपात पसरले असं सांगितलं जातं, त्यांच्या मुळावरच घाव घालणारा पुरावा २००९ मद्धे चीनमधेच सामोरा आला आहे. तेथे लुयोंग प्रांतात आ-यांच्याच रथांची व अश्वांची तब्बल २० दफनं मिळाली असून तेथीत रथही आ-यांच्या चाकांचेच आहेत. च‌निी भाषा अथवा लोक कोणत्याही अंगाने युरो-भारतीय नाहीत वा तिकडे अंड्रोनोवो संस्कृतीचे लोक गेलेले नाहीत, हे येथे लक्षात घेतलं पाहिजे. 


म्हणजे अत्यंत दुर्बल भाषिक सिद्धांतावर संपूर्ण 'आर्य' अथवा 'आर्यभाषा' सिद्धांताची मांडणी करणं किती चुकीचं होतं, हे लक्षात येईल. खरंतर ऋग्वेद अथवा अवेस्त्यात आर्य हा शब्द वंशवाचकही येत नाही किंवा ते मूळचे अन्य ठिकाणचे लोक होते, असे पुसटसेही उल्लेख नाहीत. जे भाषिक साम्य आहे, ते फक्त अवेस्ता आणि ऋग्वेदिक भाषेत आहे व तेही सर्वस्वी नाही. दोन्ही धर्मातील देवता व कर्मकांडंही वरकरणी समान आहेत. अवेस्त्यात असूर (अहूर) हा आदरार्थी आहे, तर ऋग्वेदात त्याचा प्रवास आदरार्थाकडून अवमानार्थाकडे झाला आहे. अवेस्त्यात इंद्र हा दुय्यम देव (अवेस्तन भाषेत देव म्हणजे दुष्ट) आहे, तर वरुण हा पूजनीय १०१ असुरांपैकी (असूर म्हणजे श्रेष्ठ) एक आहे. वैदिकांनी मात्र या दुय्यम देवता-असुरांना आपल्या साहित्यात श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे.

पण ही साम्य आहेत ती आर्यांच्या स्थलांतरामुळे नाहीत, हे भारतीय वैदिक विद्वान मान्य करायला कचरतात. ऋग्वेदाचा बव्हंशी भाग हा अफगाणिस्तानातील हेल्मंड (मूळ नांव अवेस्तन हरहवती...संस्कृत सरस्वती) नदीच्या काठावर लिहिला गेला. अवेस्त्याचा भूगोलही दक्ष‌णि अफगाणिस्तान हाच आहे. अनेक अवेस्तन राजे, खुद्द झरत्रुष्ट्राचेही उल्लेख ऋग्वेदात आहेत. याचं कारण म्हणजे दोघांतील भौगोलिक निकटता.

पण राजस्थानातील घग्गर नदी म्हणजेच ऋग्वेदातील सरस्वती असा दावा करत भारतीय वैदिक विद्वान घग्गर नदीच्या काठावरील हजारावर सापडलेली सिंधू संस्कृतीची स्थानं म्हणजे वैदिक आर्यांचीच निर्मिती, असे दावे करत असतात. मायकेल ड्यनिनोसारखे हिंदुत्ववादी विद्वान या सिद्धांताला समर्थन देतात. परंतु घग्गर नदीच्या खो-यात जपानी व ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या भूशास्त्रीय संशोधनात घग्गर ही वैदिक सरस्वती असूच शकत नसल्याचे विपुल पुरावे समोर आलेले आहेत. घग्गर नदी ही गेल्या दहा हजार वर्षांपासून मान्सुनवर अवलंबून असलेली सामान्य नदी होती, हिमालयातून तिला कधीही जलपुरवठा होत नव्हता, हे आता सिद्ध झालेलं आहे. इतकंच नव्हे तर घग्गरला यमुना व सतलज नद्या मिळायच्या, पण त्या पन्नास हजार वर्षांपूर्वी...तदनंतर नव्हेत. त्यामुळे ऋग्वेदातील सामर्थ्यसंपन्न देवतेसारखी 'अंबितमे' मानली गेलेली, हिमालयापासून उगम पावलेली सरस्वती घग्गर नव्हे. शिवाय वैदिक विद्वान 'उपग्रहीय चित्रांमुळे हरवलेली सरस्वती सापडली...' असा दावा करत असतात. प्रत्यक्षात घग्गर कधीही हरवलेली नव्हती. ती आजही मान्सुनमध्ये वाहती नदी आहे...तिला १९८८ ते २०१३ पर्यंत आठ मोठे पूरही आल्याची नोंद आहे. मग जे हरवलंच नव्हतं ते कसं सापडेल? उलट अवेस्त्यातील हरहवतीची वर्णनं आणि ऋग्वेदातील सरस्वतीची वर्णनं एकसारखी आहेत, हा योगायोग नाही. वैदिक विद्वानांनी हिडेकू मेमेकू, गिसन, तोशिकी ओसाडा, पिटर क्लिफ्ट, संजीव गुप्ता यांसारख्या भूशास्त्रसंशोधकांनी केलेली घग्गरच्या पात्रावरील संशोधनं वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत.

आर्यसिद्धांत मुळात जर्मन वंशश्रेष्ठत्वतावादातून निर्माण झाला. वैदिक विद्वानांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी तो उचलला. अवेस्ता व वेदांचे निर्मातेही आर्य नव्हते. ऋग्वेद व वैदिक धर्म दक्ष‌णि अफगाणिस्तानातून उत्तर भारतात धर्मांतरांच्या प्रक्रियेतून पसरला याचे अगणित पुरावे उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणताही आर्यभाषिक अथवा वांशिक गट समूहाने भारतात आला किंवा भारतातून बाहेर गेला असं मानणं, म्हणजे जागतिक सांस्कृतिक इतिहासाची हत्या आहे. उलट सेमेटिक संस्कृती पुरातन असल्याचे इसपू २६०० पासूनचे लिखित पुरावे आहेत. तसे आर्यसिद्धांताला बळ देऊ शकतील असे तुटपुंजेही पुरावे नाहीत. आहेत ते अंदाज आणि अंदाजांवर सांस्कृत‌कि इतिहास रचणे आणि इसपू ७००० (मेहेरगढ) पासून सुरू झालेल्या सिंधुसंस्कृतीवर निर्माते म्हणून दावा करणे, हा निखळ वेडेपणा आहे. भारतीय समाजाची फसवणूक आहे.

14 comments:

  1. आप्पा -अति सुंदर -
    बाप्पा -आपण वेदांचे निर्माते हे आर्य नव्हते असे सांगितल्यामुळे आनंद झाला
    म्हणजेच आर्य कोण होते हा प्रश्न - आर्य शैव होते अशा उत्तराने संपतो का ?
    आप्पा - का आर्य आणि भारताचा काहीच दुरान्वयानेही संबंध नाही ?
    बाप्पा - आपण म्हणता -ऋग्वेद आणि वैदिक हे धर्मांतराच्या प्रक्रियेतून भारतात पसरले - हे काही तितकेसे समजले नाही !
    आप्पा - धर्मांतर कोणी कोणाचे केले ? त्यात जबरदस्तीचा भाग होता की स्वेच्छेने ते झाले ?
    धर्मांतर स्वेच्छेने झाले असेल आणि त्यापूर्वी त्यांचा धर्म शैव होता का ?
    बाप्पा - आपण याचे शंका समाधान कराल का ?
    आप्पा - आपले लेखन अतिशय उत्सुकता निर्माण करणारे आहे !
    बाप्पा - सर आपण असेच अभ्यासपूर्ण लेखन करत आम्हाला सांगाल का आमच्या शंकांविषयी ?

    ReplyDelete
    Replies
    1. असे आहे, एवढा मोठा विषय वृत्तपत्रीय ८०० शब्दांच्या मर्यादेत बसणे अशक्य आहे. काही मुद्दे सविस्तर लिहायचे असुनही ते झाले नाही. ऋग्वेद आणि वैदिक धर्म (वैदिक) नव्हेत धर्मांतराच्या प्रक्रियेतुन पसरला. पहिले धर्मांतरीत वैदिक हे भृगू, काण्व आणि अगस्त्य होते. त्यांनी ऋग्वेदाचा काही भागही लिहिला. या तिघांनीच (भृगू उत्तर भारत, काण्व मध्य भारत तर अगस्त्य दक्षीण भारत...ही नांवे व्यक्तीनामे नसून कुलनामे अथवा आडनांवे आहेत...म्हणजे त्याच वंशातील लोकांनी) पहिला धर्मप्रचार केला. अर्थात हा स्वेच्छेने झालेला प्रकार असला तरी त्याला भृगू व काण्वांतलेच कट्टर विरोधकही होते. परशुरामाचा संघर्ष या अशाच एका भार्गवाचा होता. त्यांचा आधीचा धर्म शैव होता हे भृगू, अगस्त्याच्या पुराणकथांवरुन दिसते. काण्वांचा मात्र वेगळाच पंथ असावा. मंत्र-तंत्र-जारण यात ते प्रवीण होते असे ऋग्वेदावरुन दिसते. ऋग्वेदात हा प्रकार काण्वांमुळेच आला.

      Delete
  2. आप्पा - धन्य धन्य झालो
    बाप्पा - वादच नाही ! आज मटा मधील लेख पण वाचला - ते जास्त सोपे वाटते - वयाचा परिणाम !
    अप्पा - काहीही म्हणा - धन्य धन्य - धन्यवाद ! वादच नाही !
    बाप्पा - सर आपण जर असेच अत्यंत महत्वाच्या विषयावर - याच विषयावर लिहित गेलात तर ? फार समाज चिंतन होऊ शकेल - विचार मंथन होईल - अगदी अमृत मंथन म्हणा फार तर !
    - खरे सांगायचे तर हे फार नोठे समाजकार्य आहे - कारण अशी कितीतरी भ्रमिष्ट्पणाची पुटेच्या पुटे आपल्या समाज मनावर टिकून आहेत - कधी कधी जाणून बुजून !
    आप्पा - मी असे पण वाचले होते की अरबस्तानात मक्का येथेसुद्धा शिव मंदिर होते आणि त्यात ३६५ देवता होत्या - कोणताही दुराग्रह न बाळगता आपण असेच शोधत गेलो तर पार मध्य पुर्वेपासुन
    भारता पर्यंत आपणास शैव संस्कार दिसतील असे वाटते
    बाप्पा - आपण हे सूत्र मनात ठेवून जर अजून एक लेखाची मालिका गुंफली आणि विचार मांडलेत तर छान होईल - कारण शिव पूजन हा केंद्र बिंदू असलेली एक महासंस्कृती अनेक खंडांमध्ये मूळ धरून होती याची अनेक वेळा खात्री वाटते -
    आप्पा - फक्त त्या त्या पुजारी वर्गाकडून आणि पुरोहितांकडून अति पिळवणूक झाली आणि त्यामुळे एक वैचारिक उद्रेक झाला आणि धर्मांतर किंवा नव धर्माचा पाया घातला गेला असावा -भारतात आपण म्हणता त्या प्रमाणे भृगु आणि कण्व यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित करताना वेदांचा आधार घेत आपल्या कुलाचे , वंशाचे - वर्चस्व ठामपणे अधोरेखित करत समाजाचे धुरीणत्व समाजाकडूनच मान्य करून घेतले - त्याला कर्म प्रमाणाचा दाखला देत आपल्या टोळीचे वर्चस्व इतरेजनांकडून मान्य करवून घेतले -यालाच धर्मांतर म्हणता येईल - बरोबर ना सर ?

    ReplyDelete
  3. मुस्लिम धर्माचा उदय हा सुमारे ३ ते ३.५ हजार वर्षानंतरचा विषय आहे - तरीही आप्पा बाप्पा म्हणतात त्यात काहीतरी सच्चेपणा वाटू लागतो - पु ना ओक हे सच्चे प्रमाणित इतिहास संशोधक नव्हते तरीही त्यांची अनेक मते आपल्या संजय सरांप्रमाणे अगदी ताजी वाटत असत -असो !
    शैव विचारधारा हि माणसाच्या सत्य शोधनाच्या मार्गातील एक विचारधारा आहे असे म्हणता येईल लिंग योनी यांचे अद्भुत नाते अनेक पंथात मान्य झालेले दिसते - माणसाच्या विचार धनाचा हा एक भाग काही हजार वर्षे राहिला - त्यानंतर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मानवाने आपापल्या प्रदेशातील भौगोलिक आणि इतर यम नियमांच्या मदतीने सोडवत अनेक धर्म विचाराना जन्म दिला , अनेक मूलभूत शक्तींना त्यात स्थान मिळाले - अग्नी आणि होम - पशुबळी नरबळी हे प्रकारही त्या धर्माचे अविभाज्य अंग बनत गेले - हा सारा प्रवास मांडण्याचा आवाका आमच्या संजय सरांकडे नक्कीच आहे - त्यांना मांडायला मटा सारख्या वर्तमान पत्राने जागा दिली याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत -
    आज आसाराम सारख्या आचरत विचारांमागे धावणारे हजारो लोक आहेत - पण आज अशा खऱ्या मूलभूत विचारणा जागा देण्याची बांधिलकी मटाने दाखवत पुरोगामित्वाचे धोरण राबवले याबद्दल त्यांचे आणि संजय सरांचे मनः पूर्वक अभिनंदन ! यात आपण जातीयतेचा कानही आणला नाहीत हे फार फार महत्वाचे आहे !

    ReplyDelete
  4. संघ परिवार आणि भारताचे होऊ घातलेले इतिहासाचे पुनर्लेखन या संदर्भात आपण काही दिवस आपणा स्वतःस अशा प्रकारच्या मूलभूत विचारांना वाहून घेतले तर इतिहासात आपले नाव अतिशय आदराने घेतले जाइल -
    आपण एक फार थोर काम करत आहात - रस्ता कठीण आहे - अनेक विरोधास आपणास सामोरे जावे लागेल - भंपक पणाचा आपणावर आरोपही होईल - पण आपण चिकाटी दाखवणे नितांत आवश्यक आहे -
    इतिहास हा समाजावर नकळत अनेक संस्कार करत असतो - प्रेरणा देत असतो - आणि संघा सारख्या संघटना इतिहासाचा अत्यंत कल्पक वापर बुद्धीची आणि विचारांची गुलामी असलेले अनेक हजारो स्वयंसेवक निर्माण करण्यासाठी नित्यनेमाने आणि जागृतपणे करत असतात - त्यांचे स्वयंसिद्ध संशोधक त्यांना पोषक असे इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात गुंतलेले असतात - अगदी भारावलेल्या मनाने - अशा समाजात आपण करत असलेले कार्य लाख मोलाचे आहे -
    आपण जाती आणि इतर वाद याना वळसा देत आपले विचार जास्तीतजास्त उच्च वर्गा पर्यंत पोचण्यासाठी मटा आणि लोकसत्ता यांचा वापर करावा - त्यांचा वाचक वर्ग हा अफाट आहे -
    नवमत वादी आहे ! संघ हा अतिशय धोकादायक आहे आणि त्यांच्या विस्तारीत विचारात
    आर्य वंश उच्चतेचा विचार हा प्रमुख आहे -( ब्राह्मण उच्चता हा त्यातलाच एक पदर आहे ) त्यासाठी ते काहीही आणि कितीही इतिहासाची अफरा तफर करतील - आपण जागृत राहणे अतिमहत्वाचे ठरेल

    आपण मांडत असलेले विचार अगदी मुलभूत आहेत - फक्त एक विनंती - आपण सर्व समावेशकपणे सर्व मध्य पूर्व आणि युरोपचा विचारही मांडत हा विषय सांगावा - म्हणजे आपली भूमिका अज्य्न स्पष्ट होत जाइल - अभिनंदन !

    ReplyDelete
  5. आपला लेख आला महाराष्ट्र टाईम्स मध्ये - आणि त्याच वेळी सकाळ सप्तरंग मध्ये पान १८ वर
    डॉ मालती शेंडगे यांचे एक आर्टिकल आले आहे तेही वाचले - आपण जर त्यावर भाष्य केले तर ?
    त्यांच्या मते सापडलेल जे अवशेष आहेत ते एक प्रकारच्या याद्या आहेत , आणि त्यामुळे इतिहासावर कोणताही प्रकाश पडणार नाही - हे मत जरा नकारात्मक वाटते - खऱ्या संशोधकाला अगदी कागदाचे चिठोरेही पुरेसे होते - त्यातून अन्वयार्थ लावत अनेक नवे मुद्दे खरा इतिहासकार मांडू शकतो आणि शक्याशक्यतेच्या नवीन दालनात आपल्याला तो दाखल करत असतो - त्यावर चर्चा होत रहातात - पण मुळातच स्वतः एका महत्वाच्या विषयावर संशोधन करून त्यावर असा शेरा मारणे हे क्लेशकारक आहे
    आपण यावर काही भाष्य कराल का ? - आपला आणि हा लेख एकाच दिवशी आला आहे हापण एक योगायोगच आहे !

    ReplyDelete
  6. संत तुकाराम यांचा खुनाच झाला असेल नाही का ?

    ReplyDelete
  7. नाही - संत तुकाराम हे शेवटी वेडे झाले होते आणि त्यांनी देहुची जी गंगा आहे त्यात उडी मारून त्यात आत्मार्पण केले असे म्हणतात त्याचे काय ?
    संत तुकाराम सिनेमात तर त्याना सदेह गरुडावर बसवून भगवान विष्णू घेवून जातात असे दाखवले आहे - पण ते खरे असेल का ?से विमान असते तर त्यांनी औरंगजेब बादशहावर हल्ला करत त्याचा पराभव केला असता - म्हणजे विमान नव्हते - हा सिनेमा पुरता केलेला भाग आहे -
    संत तुकाराम यांच्या देहूच्या वंशाजांकडे आजही त्यांचे अभंग सुरक्षित आहेत ते कोणते ? संत तुकाराम यांनी झेरोक्स काढल्या होत्या का ?

    ReplyDelete
    Replies
    1. 1/2 ticket tyzua chotya mendula kashala kashta deto. ja aani election cha prachar kar tuzya nilya gatacga.

      Delete
  8. १/२ तिकीट म्हणणारी हाफ चड्डी घाबरली !
    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो
    संघवाले घाबरले

    ReplyDelete
  9. या एलेक्शनला मोदीची चड्डी सुटणार
    संघवाले रडणार
    संजय सुकुमार सोनवणी तुमचे ते भृगु काण्व आणि अगस्ती बंद करा
    अगस्तीने समुद्र प्यायला होता म्हणून समुद्राचे पाणी खारट असते हे माहित्ये का ? आता यालाही अंधश्रद्धा म्हणाल =- मग संत तुकाराम विमानाने वैकुंठाला गेलेच नाहीत असेही सुरु कराल - थोडक्यात
    तुम्ही म्हणाल ते परफेक्ट आणि योग्य आणि आम्ही म्हणू ते सगळे भंगार असे किती चालणार ?

    ReplyDelete
  10. पोलिटिक्स और संजय सरका विचार इसका कुछभी रिलेशन नही है
    मैने भी डेली सकाल का छपा हुवा लेख पढा है डॉ शेंडगे मादाम को यह कहना है - ' साधारणपणे अशा चित्र नोंदीवरून आपण संपूर्ण बाराखडीचा शोध आणि बोध घेणे गलत ठरेल हे बहुधा हिशोब आणि नोंदी यांचे चपट्या मिट्टीच्या ट्याबलेट नोटिंगसे बहुत कुछ हाथ लगना संभाव नही है
    ऐसी बातोमे जल्द बाजी नही करनी चाहिये
    संजय सरका लेख जो म. टा. मे छपा है इसका क्या कहना ?उनका लिखनेका अन्दाजाकी अलग है !

    बकरी ईद मुबारक !

    ReplyDelete
  11. संजय १५ च्या इलेक्शन पर्यंत असेच काहीतरी लिहित बसेल आणि नंतर लगेच जसा वारा वहात असेल तसे लेख बदलेल हे त्याचे वैशिष्ट्य आहे
    आता कोजागिरी आली ती कधी पासून सुरु झाली ?
    ती प्रथा सिसोदिया घराण्याने इकडे आणली का ?

    ReplyDelete
  12. आपण या विषयावर सहज समृद्ध असे लागोपाठ लेख लिहित जावे - कारण पब्लिक मेमरी फार कमी असते आणि अशा विषयात खंड पडणे हे हानिकारक असते
    तसेच इतरांची अवास्तव टीका मनावर घेऊ नये!

    ReplyDelete

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...