Sunday, August 23, 2015

सम्राट चंद्रगुप्त मौर्य


भारतीय संसदेच्या प्रांगणात भारताच्या पहिल्या सम्राटाचा एक प्रतिकात्मक पुतळा स्थानापन्न करण्यात आला आहे व त्याखाली गौरवाने लिहिलेय- "Shepherd boy-Chandragupta Maurya dreaming of India he was to create". विशेष म्हणजे हा पुतळा हिल्डा सेलेगम्यन या  आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महिला शिल्पकाराने तयार करुन संसद भवनाच्या परिसरात बसवण्यासाठी दान दिला होता. एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले. ग्रीकांविरुद्धचा पहिला स्वातंत्र्यलढा उभारला. त्यांना भारतातून अथक प्रयत्नांनी  हुसकले आणि नंतर मगध सम्राट धनानंदाचा पराभव करीत आपली एकछत्री सत्ता उभारली. भारतीय लोकशाहीने त्याला वाहिलेली ही मानवंदना आहे यात शंका नाही. हा गौरवशाली इतिहास आपण येथे थोडक्यात पाहुयात.

मोरिय कुळ

चंद्रगुप्ताचे "मौर्य" हे आडनाव कसे आले, त्याचे मूळ काय यावर इतकी परस्परविरोधी माहिती जातककथा, जैनसाहित्य, पुराणे व ग्रीक साधनांत आलेली आहे कि कोणीही गोंधळून जावे. कोणी नंद राजाला मुरा नांवाच्या दासीपासुन झाला म्हनून मौर्य तर कोणी मोरिय गणातील म्हणून मौर्य अशा व्युत्पत्त्या दिल्या आहेत. भारतात इतिहासलेखनाची पद्ध्गतच नसल्याने पुराणकारांनी जेथे माहिती नाही तेथे स्वरचित दंतकथा घुसवल्या. खुद्द नंद घराण्य़ाच्या उगमाबद्दल व या घराण्यात किती राजे झाले याबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे आपल्याला विविध साधनांतुन आलेल्या माहितीचे तर्कशुद्ध विश्लेशन करीत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो.

नंद घराणे अवैदिक, (शूद्र) राजघराणे होते याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. या घराण्याचा पहिला शासक महापद्म नंद याने शिशुनाग राजवंशानंतर आपली सत्ता मगधावर प्रस्थापित केली. (इसपू ३९५). काही साधनांनुसार पहापद्म नंद हा शिशुनाग वंशातील शेवटचा राजा नंदीवर्धिन अथवा महानंदिन (इसपू ३६७-३४५) या राजाचा अनौरस मुलगा होता असे दिसते आणी त्यात (औरस असो कि अनौरस) तथ्य असावे असे दिसते. हे खरे असले तर नंद घराणे शिशुनाग वंशीयांचाच पुढील विस्तार होता असे म्हणावे लागेल.  चंद्रगुप्त याच वंशातील धनानंदाच्या मुरा नावाच्या दासीपासून झालेला पुत्र म्हणून मौर्य हे मात्र अन्य साधनांशी तुलना करता टिकत नाही. कसे ते आपण पाहुच.

पुराणकारांनी नंद घराणे हे क्षत्रियांचे संहारकर्ते असल्याने भविष्यात भारतात पुढील सर्व राजे शूद्र (अवैदिक) असतील अशी घोषणा केली. याचे कारण म्हणजे नंद घराण्याने शिशुनाग वंशीय राज्याचा फार मोठा विस्तार केला. उत्तर भारतातील तत्कालीन अनेक जानपदे, महाजानपदे येथील राजवटी नंदांनी हटवत आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे नंदांना परशुरामानंतरचे सर्व-क्षत्रीय-संहारक ही पदवी वैदिक पुराणकारांनी दिली असल्यास नवल नाही. मौर्यही आपसूक शूद्रच ठरत असल्याने त्यांनाही नंदांसोबतच शूद्र ठरवण्याच्या नादात मुरादासीची दंतकथा निर्मण केली गेली असे स्पष्ट दिसते. प्रसिद्ध इतिहासकर राधाकुमूद ब्यनर्जीही या कथेला "पुराणकारांची भाकडकथा" असे म्हणतात. एकंदरीत नंद घराणे वैदिक धर्मविरोधी होते एवढेच तथ्य यातून दिसते.

बौद्ध साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मोरिय गणातील तरुण होता. (महावंस) हा गण पिप्पलीवन येथील होता असे दीर्घनिकायात म्हटले आहे व हा गण शाक्य गणाशी निगडित होता असेही सुचवलेले आहे. मोरियनगरातील म्हणुनही मौर्य असे बौद्ध सहित्य सांगते. अशाच एका कथेनुसार चंद्रगुप्ताचा गण कोसलनरेश विडुडभाच्या शाक्यांवरील हल्ल्यानंतर हिमालयात आश्रयाला गेला. हा विभाग मोरांसाठी प्रसिद्ध असल्याने  या लोकांना मोरीय म्हणू लागले. जैन साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मयुरपालन करणा-या खेड्याच्या प्रमुखाच्या मुलीचा पुत्र होत म्हणून त्याला मौर्य हे नांव पडले.

 वरील विविध कथा पाहिल्या तर त्या परस्परविरोधी व गोंधळाच्या आहेत हे उघड आहे. भारतात पुरातन काळी अनेक राजारहित गणराज्ये किंवा राजा निवडनुकीने निवडणारी गणराज्ये होती. ही राज्ये प्राय: लहाण असत. या गणांची नांवे अनेकदा त्यांच्या कुलचिन्ह/देवक यावरुन पडत. नागवंश, गरुडवंश, सुर्य-चंद्र वंश इत्यादि नांवे त्यांना प्रिय असलेल्या प्राणी/पक्षी/ग्रह-तारका अथवा वृक्षांवरुनही पडत. आजही भारतात ही देवकप्रथा पाळली जाते. चंद्रगुप्त मोरिय गणातील तरुण असावा याला अजुन एक पुरावा ग्रीक साहित्यात येतो. मोरिय नांवाचा गण  तेंव्हा खरेच अस्तित्वात होता. अजून एक कथा उत्तरविहारअट्ठ्कथेत येते. ती सत्याच्या ब-यापैकी जवळपास जाते.

या कथेनुसार चंद्रगुप्ताचा पिता मोरिय गणाचा प्रमुख होता. शत्रुच्या आक्रमणामुळे मोरिय गणाला स्थलांतर करावे लागले. सीमेवर झालेल्या चकमकीत त्याला मरण आले. ्त्याच्या दुर्दैवी आणि प्रसंगवशात दरिद्री झालेल्या विधवेला तिच्या भावांनी पुष्पपुर नावाच्या शहरात आणले. तेथे त्याचा मेंढपाळ (अथवा गोपालक) मामा होता त्याच्याकडे चंद्रगुप्ताला सुरक्षेस्तव ठेवले. मामाने पुढे चंद्रगुप्ताला एका शिका-याला विकले. शिका-याने किशोर चंद्रगुप्ताला आपल्या गायी व मेंढरे वळायच्या कामाला लावले. त्याच्यातील न्ययप्रियता व  राजपदाची कांक्षा तेंव्हापासून झळकत असे व सोबती मेंढपाळांशी तो राजाप्रमाणे वर्तन करे. अशाच एका प्रसंगी त्याला चाणक्याने पाहिले व या मुलात लोकविलक्षण प्रतिभा आहे हे ओळखून त्याला आपल्यासोबत नेले.

पुढील प्रश्नाकडे वळण्याआधी वरील दंतकथांवरुन काय स्पष्ट होते हे पाहुयात. मोर हे देवक असलेल्या कुळात/गणात चंफ़्द्रगुप्ताचा जन्म झाला होता. हे कुळ परंपरेने पशुपालनाशी संबंधीत होते. त्याचे वडील त्याच्या जमातीचे प्रमूख असतील किंवा नसतीलही, परंतू हे पश्चिमोत्तर भारतातील अनेक पशुपालक घराण्यांप्रमाणे एक होते. मोर हे मौर्य घराण्याचे देवक/कूलचिन्ह होते याचे पुरावे खुद्द सम्राट अशोकाने आपल्या काही शिलालेखांवर वसांची येथील स्तुपावर मयुरचिन्हे कोरून आपल्यासाठी सोडले आहेत. नंदनगढच्या अशोकस्तंभाच्या पायथ्याशे मयुरप्रतिमा दिमाखात चित्रीत केलेली आहे. हे पुरावे पाहुन पुरातत्वविद सर जोन मार्शल यांनीही मान्य केले कि मोर हे चंद्रघुप्ताच्या घराण्याचे प्रतीकचिन्ह आहे हे वास्तव  या प्रतिमा घडवणा-यांनी जीवंत ठेवले आहे.

असो.

सर्व दंतकथा चंद्रगुप्त या काळात मगध (आताचा बिहार) प्रांतात आश्रयाला आला होता असे सुचवितात. पुष्पपूर म्हणजे कुसूमपुर अर्थात पाटलीपुत्र असा अर्थ बव्हंशी विद्वानांनी लावला आहे. परंतू  चंद्रगुप्ताच्या आरंभेच्या काळातील घटना पाहिल्या व चाणक्याच्याही जीवनाशी तुलना केली तर सत्य वेगळेच असल्याचे लक्षात येते.

चाणक्य हा एक विद्वान होता. त्याला ब्राह्मण (वैदिक) मानले जाण्याचे प्रथा असली तरी त्यात तथ्य दिसत नाही. तो तक्षशिला येथील तत्कालीन जगप्रसिद्ध विद्यापीठात नुसता शिकला होता असे नाही तर तेथील अध्यापक होता असेही म्हटले जाते पण त्यालाही आधार नाही. चाणक्य मुळचा कोठला व  त्याचे खरे नांव काय याबद्दलही घोळ आहेतच. काही विद्वान त्याला दाक्षीणात्य मानतात तर काही तो मुळचा तक्षशिलेचाच होता असे मानतात. चाणक्याचा मगधाशीही घनिष्ठ संबंध असून तो पाटलीपुत्रास नेहमी जात असे असेही मानले जाते. धनानंदाने त्याचा अपमान केल्याने या घराण्याचा विनाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली होती अशी सुरस दंतकथा तर खुपच प्रसिद्ध आहे. पण तसे वास्तव नसावे व चंद्रगुप्ताचाही मगधाशी युवावस्थेत कधी संबंध आला असावा असे वाटत नाही. चाणक्य आणि अर्थशास्त्राचा लेखक कौटिल्य एकच मानण्याचाही प्रघात आहे पण तेही खरे नाही. या सर्वस्वी दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात किमान सहाशे वर्षांचे अंतर आहे. चाणक्य अस्तित्वात मात्र होता हे त्याचा उल्लेख बौद्ध आणि जैन साहित्यही करत असल्याने मान्य करावे लागते. पण तो वैदिक होता की अवैदिक याबाबत खत्रीशीर माहिती उपलब्ध नाही.

पुष्पपुर हे पश्चिमोत्तर भारतातील कोणते तरी वेगळेच शहर असावे किंवा चंद्रगुप्त मुळचा कोठला हेच माहित नसल्याने जीही काही ऐकीव माहिती कथाकारांना मिळाली त्यावरुन त्यंनी कुसुमपुराशी हा संबंध ओढून ताणून जोडला असावा.

आपल्याकडे पुराणिकांनी नंद घराण्याला खूप बदनाम करुन ठेवले आहे. ते हीण कुळातील होते म्हणून ते लोकांत अप्रिय होते असे म्हणावे तर तथकथित "उच्च-कूल" ही बाब तेंव्हा अस्तित्वात नव्हती. शिशुनाग राजघराणेही मग तथाकथित हीन-कुलीनच होते व त्यांनी साम्राज्य या शब्दाची प्रत्यक्ष व्याख्या सिद्द्ध केली. अवैदिक घराण्यांना हीन मानण्याची वैदिक साहित्तिकांची प्रथा आहे.

नंद घराण्यात एकंदरीत नऊ राजे होऊन गेले. धनानंद हा अखेरचा. याचे मूळ नांव चंद्रमास (ग्रीक उच्चार क्झ्यंड्रमास) असावे व अलोट संपत्तीमुळे त्याला धनानंद हे टोपणनांव मिळाले असावे. याच्याकडॆ ८० कोटींची संपत्ती होती. महावंश त्याच्या संपत्तीच्या हावरेपणबद्दल त्याच्यावर टीका करतो. त्याच्या धनाढ्य़पणाची किर्ती तमिळनाडूपर्यंत पोहोचली होती. संगम साहित्यातील प्राचीन कवितेत धनानंदाचा उल्लेख "गंगा नदीच्या पुराप्रमाणे संपत्ती असलेला" असे वर्णन केले आहे. असे असले तरी धनानंद दानशाळांच्या मर्फत अलोट दान करत असे आणि दानशाळेचे प्रमुखपद एका ब्राह्मणाकडॆ असे अशाही नोंदी आहेत. चाणक्य स्वत: दानसंघाचा अध्यक्ष होता व याच काळात त्याचा व धनानंदाचा कलह झाला असेही काही कथा सुचवतात. तक्षशिलेचा विद्वान अध्यापक ते दानाध्यक्ष हा चाणक्याचा प्रवास असने शक्य नाही. पण धनानंद दानही करत असे असे दिसते.

धनानंदाबद्दलचा पुराणे-बौद्धसाहित्यातील  येणारे टीकात्मक उल्लेख जरा दूर ठेवले पाहिजेत. धनानंदाची सैनिकी शक्ती एवढी अपार होती कि खुद्द अलेक्झांडरचे सैन्य चीनाबच्या पुढे सरकायची हिम्मत करु शकले नव्हते हा प्रत्यक्ष इतिहास नजरेसमोर ठेवायला हवा. ग्रीक इतिहासकार प्लुटार्क नोंदवतो कि नंदांकडे दोन लाखांचे पायदळ, ८० हजारांचे घोडदळ, ८ हजार रथदळ आणि सहा हजारांचे हत्तीदळ होते.  यात काही आतिशयोक्ती जरी असली तरी लष्करीदृष्ट्या मगधाची शक्ती तत्कालीन जगात अचाट होती असे म्हणावे लागेल. केवळ या सैन्यशक्तीला घाबरुन अलेक्झांडरला अधिक पुर्वेकडॆ सरकण्याचा विचार सोडून द्यावा लागला. त्याच्या सैन्यातील बंडाळीमुळे अलेक्झांडरला परत जावे लागले अशी कारणे ग्रीक इतिहासकारांनी दिली असली तरी ती सारवासारव आहे हे उघड आहे. प्लुटार्कनेच पर्दाफाश केला आहे. आणि ग्रीकांचे संकट सामोरे ठाकले असता चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा होऊ  देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे.

आणि तसा विचार करायचेही काही कारण नाही हे घटनाक्रम नीट समजाऊन घेतला तर लक्षत येईल. मुळात चंद्रगुप्ताने आपला संघर्षाचा आरंभ नंदांपासून केला नाही. अलेक्झांडरचे आक्रमण इसपु ३२६ मद्धे सुरु झाले. तो तेंव्हा तक्षशिला विद्यापीठात शिकत तरी होता किंवा त्या परिसरात राहत होता. चाणक्य त्या भागात तेंव्हा होता की नाही याबाबत शंका आहे कारण ग्रीक साधने जरी चंद्रगुप्ताचा उल्लेख करीत असली तरी चाणक्याबाबत ती अवाक्षरही काढत नाहेत. त्यामुळे चणक्याने ग्रीकांशी केलेला संघर्ष चाणक्याच्या प्रेरणेने केला असे विधान करता येत नाही.

पोरसचा पराभव आणि त्याचे मांडलिकत्वाची घटना याच वर्षी (इसपु ३२६) घडली. ग्रीकांनी तक्षशिलेसह बराच पंजाब आपल्या ताब्यात घेतला. सिंधु नदीचा पश्चिम भाग त्यांच्या ताब्यात आलेला होता. स्थानिक सत्ता कोलमडून पडल्या होत्या. आणि येथेच चंद्रगुप्ताचे अलौकिक कार्य सुरु होते. एक झुंजार सेनानी वनेता म्हणून तर चाणक्याचे कार्य एक कुटील मुत्सद्दी म्हणून.

ग्रीकांशी संघर्ष

अलेक्झांडर महत्वाकांक्षी होता. तत्कालीन ज्ञात जग  आपल्या सत्तेखाली आणन्याचे त्याचे स्वप्न होते. भारत जिंकला कि हे स्वप्न पुर्ण होईल असे त्याला वाटत होते. भारत जेथे संपतो तेथेच जगही संपते ही तत्कालील ग्रीकांची कल्पना होती. येथेवर तो सर्वत्र यशस्वी झाला होता. पण येथे गाठ आता पडणर होती ती चंद्रगुप्त आणि चाणक्याशी. परकीयांचे लोंढे बघुन दोघे कामाला लागले. त्यांच्याकडॆ धन नव्हते पण प्रबळ स्वातंत्र्यप्रेम होते. त्यांने सैन्य जमा करायला सुरुवात केली.कोण होते त्यांचे सैनिक? महावंस सांगते पंजाबमधील स्वातंत्र्यप्रिय गणंना एकत्र करत हे सैन्य उभारले गेले. योधेय गणही यात सामील होता.ग्रीक इतिहासकार जस्टिन म्हणतो , चंद्रगुप्ताने "दरोडॆखोरांचे" सैन्य उभारले. म्यक्डोनेल म्हणतो हे दरोडेखोर म्हणजे गणराज्यांचे नागरिक होते. या सैन्यात किरात, बाहीक, शिबी, उदुंबर, शुद्रक  वगैरे गणराज्यांतील नागरिकांचा समावेश होता. एरियन हा ग्रीक इतिहासकार म्हणतो त्या काळी पंजाबची भुमी स्वतंत्रताप्रिय गणराज्यांच्या टोळ्यांनी भरली होती. या पराक्रमी विजिगिषू लोकांना चंद्रगुप्ताचे प्रभावी नेतृत्व लाभले व पहिला स्वातंत्र्य संग्राम सुरु झाला. स्त्रीयांनीही या युद्धात  भाग घेतला.

राधाकुमुद बानर्जी म्हणतात, चंद्रगुप्ताने दिलेला लढा हा अलेक्झांडरच्या विजयांपेक्षाही नेत्रदिपक आहे. या लढ्यात सुरुवातीला विजय मिळाले नाही. हजारोचे सैन्य मारले गेले वा बंदी झाले. याचे कारण म्हणजे सारेच सैन्य हे प्रशिक्षित,अनुभवी नव्हते. पण चंद्रगुप्ताने हळू हळू या विखुरलेपणाला शिस्त आणली. गनीमी काव्याचा अवलंब सुरु केला. पोरस (पर्वतक) हा चंद्रगुप्ताला सामील झाला. बहुदा याच काळात कधीतरी चंद्रगुप्ताची भेट खुद्द अलेक्झांडरशी झाली. या भेटीत काय घडले याचा वृत्तांत उपलब्ध नाही. शिवाय ही भेट युद्धाच्या आधी कि मध्यकाली झाली हे नक्की नाही. त्यामुळे भेट झाली हे खरे असले तरी त्यावर अभिप्राय देता येत नाही.

पण या अनपेक्षित उठावामुळे अलेक्झांडर त्रस्त झाला. त्याला भारतात ग्रीकांच्या, अन्यत्र केल्या तशा वसाहती स्थापन करायच्या होत्या. त्यासाठी त्याने सहा छत्रप नेमले होते. सिंधू नदीच्या पश्चिमेला तीन तर पुर्वेला तीन. आहे तोच भाग तरी सुस्थिर आपल्या अंमलाखाली ठेवावा असे त्याला वाटने स्वाभाविक होते. पण चंद्रगुप्ताने आपल्या हस्तकांकरवी छत्रप निकानोर व फिलिप यांची हत्याही घडवून आणून अलेक्झांडरच्या मनसुब्यांना हादरा दिला. यामुळे ग्रीकांचे मनोधैर्य अजुनच ढासळले.

दरम्यान अलेक्झांडर परतीच्या वाटेला लागला होता. त्याचे परत फिरणे हा योगायोग नव्हता. आधी सतत जिंकण-या ग्रीकांन हताश व्हावे असे वाटावे हे घडणे दैवयोगही नव्हता. त्यामागे भारतीय गणांची एक सुसुत्र चाल होती ज्याचे नेतृत्व चंद्रगुप्ताने केले. ग्रीक छत्रपांचे पडणारे खुनही अपघात नव्हते तर त्यामागे एक सुसुत्र कट होता. इसपु ३२५ ते इसपु ३२३ या अवघ्या दोन वर्षाच्या काळात जगज्जेद्त्या सिकंदराला माघारी फिरावे लागले. छत्रपांच्या खुनांमुळे त्याने मागे सोडलेले साम्राज्याचे अंशही कोसळले.

ग्रीकंचा इतिहासकार जस्टिन म्हणतो,"या स्वातंत्र्यलढ्याचा नायक "सेंड्रोकोटस"(चंद्रगुप्त) होता. एका सामान्य कुळातला माणूस सम्राट होण्याच्या खरोखर योग्यतेचा होता. हा एक अलौकिक शक्तींनी भरलेला तरुण. याने अलेक्झांडरचाही प्रत्यक्ष भेटीत अपमान केला. त्याला मारायची आज्ञा दिली तर हा पावलांच्या चपळाईने निसटला.....याने दरोडॆखोरांची फौज प्रेरित करुन जमवली अणि ग्रीकांची सत्ता उलथुन टाकले."

जस्टिन हे नि:संदिग्धपणे सांगतो कि ग्रीकांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाचा नायक चंद्रगुप्त होता. जस्टिन हा इसवी सनाच्यादुस-या शतकात झालेला रोमन (ल्यटिन) इतिहासकार. आपला पुराणकार नव्हे. ग्रीक साधनांतुन अभ्यास करुन त्याने हा निष्कर्श काढला आहे. आमचे पुराणकार शेंडीच्या दंतकथा रंगवत चंद्रगुप्त व चाणक्याने दिलेल्या, सामान्य लोकांच्या मदतीने दिलेला माहान लढा यावर अवाक्षरही काढत नाहीत हे विशेष!

एका अर्थाने चंद्रगुप्ताचा पहिला स्वातंत्र्यलढा इसपू २२३ मद्ध्ये संपला. नंदांशी त्याने केलेला संघर्ष यानंतरचा आहे.  त्या संघर्षाचा संबंध चाणक्याने केलेल्या प्रतिज्ञेशी नाही हे मी वरच सांगितले आहे. त्यामागील कारणे नंद शूद्र होते, अन्यायी होते यात नसून नंदांच्या नऊ पिढ्यानंतर लोपलेल्या साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षांच्या झालेल्या अंतात आहेत. जेंव्हा चंद्रगुप्त व त्याचे साथी गणराज्ये ग्रीकांशी लढत होती खरे तर नंदांनीही आपले अपार सैन्यबळ घेऊन साथीस यायला हवे होते. मग लढा सोपा झाला असता. पण धनानंद गप्प बसला. त्याचे अचाट सैन्यबळ कामाचे ठरले नाही. ग्रीकांच्या आक्रमणामुळे  व त्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे पश्चिमोत्तर सीमा नुसत्या सुरक्षित नव्हेत तर विस्तारायला हव्यात हे चंद्रगुप्ताच्या लक्षात आले नसले तरच नवल!

 मगध त्या काळात भारताची सांस्कृतिक राजधानी होती. शैव, वैदिक, जैन, बौद्ध, आजीवक, श्रमण, चार्वाकादि तत्वज्ञानांची केंद्रे मगधात होती. पाटलीपुत्र ही राजकीय सत्तेचे राजधानी. आजच्या दिल्लीला जिंकले म्हणजे जसा भारत जिंकला तसे पाटलीपुत्र जिंकले म्हणजे भारताची प्रभुता असा समज त्या काळी होता. नंद अल्पसंतुष्ट व अदूरदृष्टीचे बनले होते. त्यामुळे त्यांना मागे सारून आता नव्या नवोन्मेषी सत्तेची गरज होती.

चंद्रगुप्त आता या कार्यासाठी सिद्ध झाला.

नंद साम्राज्याशी संघर्ष

जसा ग्रीकांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याची नोंद भारतातील धर्माश्रयी पुराणकारांनी ठेवली नाही तशीच नंदांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याचीही नीटशी नोंद नाही. दंतकथांतुन हाही इतिहास शोधावा लागतो. चंद्रगुप्ताने मगधाच्या सीमेवर  हल्ले करत पाटलीपुत्रापर्यंत फोचायची आधी चाल खेळली. पण त्यत सुरुवातीला त्याला अपयशे आली.

महावंसातील एक दंतकथा सांगते कि, चंद्रगुप्ताच्या हेराने एका खेड्यातील महिलेच्या चंद्रगुप्ताबाबतच्या वक्तव्याची माहिती त्याला दिली.ती अशी होती...तिचा मुलगा रोटीच्या कडा तशाच ठेऊन फक्त मधलाच भाग खायचा. त्यामुळे रोटी लगेच संपायची. यावर ती महिला मुलाला म्हणाली,

"तू चंद्रगुप्तासारखाच वागतो आहेस!"
"का असे म्हणलीस?" मुलाने विचारले.
"तोही वेड्यासारखा आघाडीची शहरे ताब्यात न घेता सरळ राजधानीत घुसून सम्राट बनु पाहतोय!"

चंद्रगुप्ताने सुरुवातीला मगधावर आक्रमण करतांना जिंकलेल्या भागावर आपले प्रशासन व सैनीकी बळ ठेवण्यावर लक्ष दिले नव्हते असे या दंतकथेवरुन दिसते. चंद्रगुप्ताला सिकंदराशी लढायला मदत करणारी पराक्रमी सेना होती. नंदांचे सैन्य प्रबळ होतेच. पण तो संख्येचा दबदबा होता हे चंद्रगुप्ताने सिद्ध करुन दाखवले. तरीही त्याला नंदांना पराजित करायला तब्बल दोन वर्ष अथवा त्याहून अधिक काळ लागला.

चंद्रगुप्ताने पाटलीपुत्राचा परिसरही ताब्यात घेतला. पाटलीपुत्राला वेढा  घातला. धनानंदाने पराजय मान्य केला. आता त्याच्याकडे ना सैन्यही उरले होते कि बळ अथवा धनही.

हरलेल्या शत्रुला मारण्याची तशीही भारतीय परंपरा नाही. धनानंद ठार मारावा असा दुष्टही नव्हता. माहिती मिळते ती अशी- धनानंदाला पाटलीपुत्रातुन निष्कासित करण्यात आले. त्याला सोबत त्याच्या दोन्ही पत्न्या आणी त्याच्या रथात बसेल एवढे धन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली.

इसपू ३२१ मद्ध्ये चंद्रगुप्ताचा अभिषेक खुद्द चाणक्याने केला असे दंतकथा सांगतात. धनानंदाचे अथव नंद घराण्याच्या वंशजांचे नांव इतिहासात नंतर पुसलेच गेले.

चंद्रगुप्ताने उर्वरीत भारत व पश्चिमोत्तर भारत तर ताब्यात घेतलाच पण पर्शियापर्यंत मोहिमा करुन तेथील ग्रीक शासक सेल्युकस निकेटरलाही नमवले. नंतर मैत्र साधले.त्याला ५०० हत्ती भेट दिले तर त्याच्या कन्येला पत्नी म्हणून स्वीकारत वैश्विक मैत्रीचा आदर्शही घालून दिला.

चंद्रगुप्त मौर्य, भारताचा अद्वितीय सम्राट, स्वातंत्र्याचा आद्य उद्गाता एका मेंढपाळ/पशुपालक समाजात जन्माला आला. वैदिक सत्तेला जसे नंदांनी उलथुन लावले तसेच चंद्रगुप्तानेही. चंद्रगुप्ताने उत्तरकाळात जैन धर्म स्विकारला असे जैन सुत्रे सांगतात. ते अशक्य नाही. मुद्राराक्षस नाटकात चाणक्यही त्याची सतत "वृषल"(शूद्र) म्हणून हेटाळणी करतांना दिसतो. हे नाटक चवथ्या शतकानंतर, जेंव्हा वर्णाहंकार वाढू लागले होते, तेंव्हा कधीतरी लिहिले गेले आहे. पण आज हेच नाटक ऐतिहसिक मानले जावे हे दुर्दैव आहे.ते एक नाटक आहे. चंद्रगुप्त होऊन गेल्यानंतर सात-आठशे वर्षांनंतर लिहिले गेलेले आहे याचे भान आम्हाला नाही. आम्हाला अजून माणसाला माणूस समजायची दानत नाही. त्याच्या भव्यता या जाती-वर्णांच्य फुटपट्ट्यांनी मोजता येत नाहीत हे समजत नाही.

-संजय सोनवणी 

24 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मौर्य कालखंडाच्या इतिहासाची साधने अत्यल्प असल्याने मिळणारी संक्षिप्त माहिती समाधानकारक नसली तरी उत्सुकता चाळवणारी मात्र आहे. प्रस्तुत लेखात अनेक नव्या गोष्टी प्रथमचं वाचनात आल्या तर काही ठिकाणी शंका मनात निर्माण झाल्या.

    (१) धनानंदाचे मूळ नाव चंद्रमास असल्याचा तर्क केला असून त्यासाठी त्याचा ग्रीक उच्चार ‘ क्झ्यंड्रमास ‘ येथे जोडला आहे. परंतु चंद्रगुप्ताचा ग्रीक उच्चार ‘ सेंड्रोकोटस ‘ असा दिला आहे. ग्रीक भाषेत चंद्र हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो का ?

    (२) चंद्रगुप्ताचा पूर्वेतिहास पुरता स्पष्ट नाही तसाच चाणक्याचा देखील. परंतु हे जरी दुर्लक्षित केले तरी ग्रीक आक्रमणाच्या वेळी या दोघांनी असे नेमके काय केले किंवा यांच्याकडे असे कोणते गुण / कर्तृत्व होते ज्यामुळे पंजाबातील स्थानिक सत्ताधीशांनी त्यांची मदत घेत वा करत ग्रीकांशी लढा पुकारला ?

    (३) ग्रीकांसोबतचे युद्ध आटोपल्यावर चंद्रगुप्त नंद साम्राज्याकडे वळला. ग्रीकांपाठोपाठ नंद साम्राज्याशी झुंज खेळण्याची धमक ज्याअर्थी चंद्रगुप्त दाखवतो त्याअर्थी ग्रीकांविरोधी लढा पुकारण्याआधीच तो एका राज्याचा वा टोळीचा नायक तर नव्हता ना असा प्रश्न मनात येतो. कारण, हाताशी सुसज्ज व स्वतःच्या भरवशाचे लष्कर असल्याखेरीज कोणीही व्यक्ती अशा मोठ्या मोहिमा लागोपाठ करू शकत नाही असे माझे मत आहे.

    (४) धनानंदाने चाणक्याच केलेला अपमान व चाणक्याच्या शेंडीची कथा यात तर काहीच दम नाही. बहुतेक दुःशासन – द्रौपदीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून हे शेंडीपुराण रचण्यात आले असावे. यांमुळे चाणक्याचे महत्त्व अधोरेखित न होता उलट त्याचे व ब्राम्हण समाजाचे ( जर चाणक्य ब्राम्हण असेल तर. कारण शिशुनाग शुद्र व नंद क्षत्रियसंहारक असल्याचे पुराणे सांगतात तर हे देखील अशक्य आहे असे वाटत नाही. ) विकृत उदात्तीकरण मात्र अधिक झाले आहे. ब्राम्हणाच्या मान – अपमानाने राज्यांचा उदय – अस्त झाला हि संकल्पना मान्य करायची झाल्यास हिंदुस्थानातील प्रत्येक विजयी शासकाने ( यात मुस्लिमही अंतर्भूत आहेत ) ब्राम्हणांचा मानसन्मान केल्याने त्यांस यश प्राप्त झाले व त्यांचा उच्छेद केल्याने ते नाशास पावले असेच म्हणावे लागेल.

    असो, लेख वाचल्यावर मनात उद्भवणाऱ्या शंका व तर्क येथे नमूद केले आहेत. याविषयी अधिकाधिक नव्याने संशोधित केलेली माहिती आपण वाचकांसमोर मांडावी हि विनंती !

    ReplyDelete
  3. Hi, good read...thanks.
    Two questions...1) Is chankya was historic person or just myth? Is any greek scholar or Emperior Ashoka ever mention anything about him?

    2) Please put some light on Pendharies...who are they?

    ReplyDelete
  4. Chanakya is a myth and it is spread by Brahmins to indicate their dominance. In the contemporary Greek literature and history there is no mention of Chanakya even indirectly.

    ReplyDelete
  5. चंद्रगुप्ताचे वंशज हे क्षत्रिय असून ख्रि. पू. सहाव्या शतकात ते नेपाळ तराईमध्ये पिप्पलीवन नामक प्रदेशाचे सत्ताधीश होते. नंतर हा प्रदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आल्या मुळे मौर्य वंशाची वाताहात झाली असावी. डॉ. रायचौधरी वगैरे विद्वान हा पुरावा अत्यंत सत्य मानतात. ग्रीक ग्रंथांवरूनही चंद्रगुप्त क्षत्रिय होता हे सिद्ध होते. वरील विवेचनावरून चंद्रगुप्त मौर्य क्षत्रिय कुलोत्पन्न होता हे निर्विवाद सत्य मानता येईल. चंद्रगुप्ताचे पूर्वज क्षत्रिय असले तरी त्यांच्या राज्याचे अपहरण झाल्यामुळे त्यांना दैन्यावस्था प्राप्त झाली.

    ReplyDelete
  6. चाणक्य नावाचा ब्राह्मण नंद सम्राटाच्या दानधर्म खात्यातील दानशाळा नामक लहानशा विभागाचा व्यवस्थापक होता. पण त्याच्या कुटील व कारस्थानी स्वभावामुळे तो सम्राटाला अप्रिय झाला. म्हणून नंद सम्राटाने चाणक्याला बडतर्फ करून हाकलून दिले. त्यामुळे चाणक्य नंद सम्राटाचा भयंकर द्वेष करू लागला. पुढे चाणक्याची चंद्रगुप्ताशी भेट झाली. चंद्रगुप्तालाही नंद सम्राट धनानंद याचा नाश करावयाचा होता. या कामी चाणक्याने चंद्रगुप्ताशी सहकार्य केले.

    ReplyDelete
  7. एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले?????????????????

    Shepherd boy-Chandragupta Maurya ????????????????????

    ReplyDelete
  8. चंद्रगुप्त हा एक पराक्रमी, मुत्सद्दी व परोपकारी राजा होता. त्याने अखिल भारत आपल्या अंमलाखाली आणला व मौर्य वंशाची स्थापना केली. ते राज्य पुढे जवळजवळ शंभर वर्षे टिकून होते.

    ReplyDelete
  9. आप्पा - बर का बाप्पा - हा चंद्रगुप्त अवघे ४२ वर्षे जाऊन ४२ व्या वर्षी आपणहून राजपदावरून निवृत्त झाला हे काही संजयाने आपल्याला सांगितले नाही . आणि चंद्रगुप्त बिहारचा का पंजाबचा ? नंद साम्राज्य असताना वयाच्या १४व्या वर्षी तक्षशिला विद्यापीठात कसा गेला ?
    बाप्पा - आणि रिटायर झाला ते सुद्धा श्रावण बेळगोळला ! त्याचे राज्य होते बलुचिस्तान पासून बंगाल पर्यंत , आणि काश्मीर पासून दख्खन पर्यंत ! ४२ वर्षात इतके मोठ्ठे साम्राज्य ?मला प्रश्न पडलाय की हा पहिला सम्राट कसा काय ? कारण धृतराष्ट्र , दशरथ रावण भारताला भारत नाव मिळाले तो भरत हे सर्व इतिहासातले नाहीत का ? मग आपण कशामुळे चंद्रगुप्ताला इतिहासातील पहिला सम्राट म्हणतो, त्याच्या आधी सम्राट धनानंद होताच ना ? एक वाईट वाटते , शिवाजी महाराज बाजीराव पेशवा आणि चंद्रगुप्त अगदीच कमी जगले .
    आप्पा - गम्मत म्हणजे त्याने शेवटी जैन धर्म स्वीकारला आणि श्रावण बेळगोळ येथे व्रतस्थ राहून उपवासाने देह ठेवला . -त्याचा मुलगा बिम्बिसार , यानेही राज्य करत मगध साम्राज्य वाढवले , त्याचा मुलगा अजातशत्रू याने मात्र वडिलाना कैदेत टाकून राज्य बळकावले , आणि त्याचा मुलगा सम्राट अशोक -त्याने बौद्ध धर्म स्वीकारला अशी ही कथा आहे .
    बाप्पा - जैन म्हणतात की बिम्बिसार ने आत्महत्या केली तर बौद्ध म्हणतात की त्याचा खून करण्यात आला - थोडक्यात काय , हे सर्व शिवाजी महाराज , बाजीराव आणि आजच्या काळातही शोभणारे आहे . लिहा वाचा यांनी खूपच समतोल माहिती दिली आहे .
    आप्पा - संजय सोनावणी यांनी जे वर्णन केले आहे त्यावरून मगधाचे लोकेशन , आणि चंद्रगुप्त नंद आणि तक्षशिला यांचे लोकेशन आणि त्यानंतरचे मगध साम्राज्य हे बघता , चंद्रगुप्त आणि आलेक्झेन्दार समोरासमोर आले असतील का असा संभ्रम निर्माण होतो , पण लिहा वाचा यांनी सांगितलेले नेपाळ आणि चंद्रगुप्त हे समीकरण जास्त पटते .
    बाप्पा - संजय चे म्हणणे की चंद्रगुप्त इसपू ३२६ मध्ये तक्षशिला विद्यापीठात शिकत होता . इसपू ३४० चा जन्म आणि मृत्यू इसपू २९८ म्हणजे उणेपुरे फक्त आयुष्य ४२ वर्षे त्यात तो १४ व्या वर्षी तक्षशील येथे शिकत असेल का ? मग त्याचा आणि चाणक्यचा संवाद कधी झाला ?त्याचे लग्न आणि साम्राज्य स्थापना - बिम्बिसराचा जन्म - हा काल काही मान्य होत नाही .
    आप्पा - अरे बाबा इतका वैतागू नकोस . अरे २ ज्ञानेश्वर असू शकतील असे इतिहासकार म्हणतात , तर २ चंद्रगुप्त का नसतील ? एक पूर्वेचा आणि एक पश्चिमेचा ! चाणक्य आणि कौटिल्य हे वेगवेगळे होते असे म्हटले की एक ब्राह्मण आणि एक बहुजन करता येतो . एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला , आजकाल अशी वाटणी हि काळाची गरज आहे . थोडा इतिहास बदलला म्हणून काय झाले . सगळ्यांनी सरकून सरकून घेतले की सगळ्याना जागा होईल , अगदी संजय सोनावणी याना पण !
    बाप्पा - सर्वात आनंदाचा भाग म्हणजे त्याकाळी , धार्मिक स्वातंत्र्य किती होते याचा अचंबा वाटतो . वडील जन्माने हिंदू , पण नंतर जैन , मुलगा बौद्ध नातू तरीही वडिलाना तुरुंगात टाकतो , पणतू सर्व सैन्य राखूनही सम्राट ( अशोक )म्हणवत कालीनाग्चे युद्ध करतो , अहिंसेचे पालन करतो - आणि आपल्या तिरंगी झेंड्यात जाउन बसतो . किती थोर हा आपला भारत ?

    ReplyDelete
  10. अत्यंत फसलेला लेख आहे . विकीपेडिया वरून माहिती जुळवली असती तरी चुका लक्षात आल्या असत्या , पण लेखात फोटो पण विकीपेडिया वरून घेतला आणि नंतर तो बदलला - अरेरे किती केविलवाणा लेख झाला आहे .
    जागतिक प्रसिद्धीची तक्षशिला विद्यापीठाची महती किती महान , तेथे चंद्रगुप्त हे गुराख्याचे पोर कसे शिकायला जाइल ? फारच फिल्मी वाटते बर का संजय सर !
    चंद्रगुप्त बिहारचा , तो पंजाबात कसा काय जातो , पोरासाला भेटतो , त्याचा जन्म ३४० इसपूचा आणि मृत्यू इसपु २९८ चा - तो म्हणे इसपु ३२६ ला सिकंदराला भेटतो , राजा पोरसाला भेटतो , त्याचे आयुष्य किती हिशोब केला , तर तो पटत नाही . त्याचे साम्राज्य बलुचिस्तान पासून मगध पर्यंत ?
    काहीतरी गडबड आहे - कोणी सांगेल का ?
    संजय सोनावणी सगळे लेख असेच लिहितात का ?
    या सगळ्या रेफ़रन्स ने यशवंतराव होळकर यांची आठवण का होते ?
    नेपाळात त्याच्या वडिलांचे छोटेसे राज्य होते आणि ते गेल्याने त्याची लढायची , नंद साम्राज्याला आव्हान देण्याची मनोवृत्ती झाली हे लिहा वाचा यांचे म्हणणे अगदी १०० % पटते , पण तो राजा पोरसाला भेटला असेल असे काही वाटत नाही !

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  14. आप्पा आणि बाप्पा यांनी कमालच केली , त्यांचा या लेखावरचा वाटा म्हणजे कमालच आहे . किती धडपड करून वेगळे अभ्यासपूर्ण मत मांडत असतात . त्यांनी कमी वयात अनेक युग पुरुषाना अल्पायुषी कार्य संपवावे लागते हा विचार मांडून शिवाजी आणि पहिला बाजीराव यांचे समर्पक उदाहरण दिले आहे - सलाम आप्पा बाप्पा - हे खरेच सत्य आहे -

    काहीजण उगाचच पेपर लेनमध्ये इतरांचे आणि स्वतःचे आयुष्य कुरतडत बसतात .
    कशाला जन्माला येतात असली माणसे काही काळात नाही , अनेकांनी त्यांच्या थोबाडात दिली आहे शाब्दिक रित्या , पण या गाढवाला अक्कल नाही . काय करणार ? मी भारतीय आणि अनेकांनी त्याना सांगूनही ते गप्प बसत नाहीत , आपले दुर्दैव !असे शेजारी म्हणजे देहांत प्रायश्चित्त असे यांचे शेजारी म्हणतात ते काय खोटे नाही , पेपर गल्ली उगाच यांची खिल्ली उडवत नाही -
    आम्हीही चंद्रगुप्त मौर्य आणि सलग बिम्बिसार आणि अजातशत्रू असे वाचत गेलो . संजयाने सुरवातीला तोच फोटो वापरत सर्व माहिती आयती घेतली आहे . इतिहास संशोधक असे काम करतात हे माहित नव्हते . पी एच डी करणारे असे उद्योग करत स्वतःला हुषार म्हणवून घेतात .

    ReplyDelete
  15. अविनाश पाटसकर हा विकृत माणूस असावा असे दिसते , कारण एकतर उगाचच काहीही असंबद्ध कोमेंट्स करत राहणे हे त्याचे ब्रीद दिसते . विचारांची सामान्य पातळीही नाही आणि अभ्यासाची तयारीही नाही अशा परिस्थितीत निदान तोंड गप्प ठेवून लोक काय म्हणतात ते बघावे , हेही समजत नसेल तर व्यर्थ आहे . , बरे आपले विचार लोकाना आवडतात की नाही ते तरी बघावे , पण नाही - ही ब्याद कधी या ब्लोग च्या मागे लागली देव जाणे . सिंदबादच्या म्हाताऱ्या प्रमाणे हा असाच संजय सोनावणी याना असाच छळणार असे दिसते , त्यामुळे इतर लोक ब्लोग सोडतील हे निश्चित ! वर्गणी काढून याला मत प्रदर्शन न करण्याबद्दल दर महिना तत्वावर काही पैसे दिलेले परवडेल .
    अहो पाटसकर बाबा , जनाची नाही तरी मनाची काहीतरी लाज बाळगा ! आणि व्हा चालते इथून . फुकटचा वनवास !

    ReplyDelete
  16. श्री पाटसकर हे अतिशय हलक्या प्रकारचे विचार मांडत असतात आणि त्यात काहीही औचित्य किंवा नाविन्य , तसेच प्रतिभेचा उज्वल आविष्कार किंवा चिंतनाचे प्रतिबिंब नसते हे सूर्य प्रकशाइतके स्वच्छ आहे . त्याना समजुतीने सांगितले तर ते चूक सुधारतील असे समजायला वाव आहे .
    त्यांच्या आईने नक्कीच त्याना हे संस्कार केले असणार , आणि वडिलांचे माहित नाही , कारण त्यांच्या वागण्यात तसे काही दिसत नाही . भविष्य हा विषय घेऊन जर यांच्या विचारांची बांधणी होत असेल तर , त्यांनी इथे न लिहिलेलेच बरे .
    जरा आपल्या घरच्या थोरांचा सल्ला घ्या ! मुर्खासारखे अकलेचे तारे तोडू नका . अहो किती फालतू लिहिता तुम्ही , तुमच्या घरचेही हसतात तुम्हाला , पेपर लेन मध्ये तुम्ही यड छाप म्हणून नक्कीच प्रसिद्ध असणार .- आहातच !
    आम्ही संजय सोनवणी यांच्या ब्लोग चे निस्सीम भक्त , इथे तुम्ही येउन का उकिरडा करता आमच्या ब्लोग चा . तुमच्या ब्लोगवर काहीही करा , आम्ही तिथे येणार नाही .
    नको असलेल्या मुलाला " फटे निरोधके बच्चे " - असे म्हणायची पेपर गल्लीमध्ये पद्धत आहे , ती तुमच्या मुळेच सुरु झाली असावी . - त्याचा सखोल अर्थ काय ते तुम्ही जाणत असणारच . आई वदिलनाहि त्याचा जन्म नको होता पण निरोधाच फाटला आणि हा जन्माला आला , आता काय करणार ?अशी आमची तुमच्या बद्दल भावना आहे सर्व पेपर गल्ली वासीयांची , तेंव्हा जरा ब्रेक घ्या !

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. आप्पा - पाटसकर सरकार , अहो आम्ही तुम्हाला काहीही बोललो नाही या लेखाच्या प्रतिक्रियेत . दुसरे लोक बोलले तेही काही कारणाने त्यांचा संयम संपला असेल म्हणूनच ना ?
    बाप्पा - आम्ही आपणास अद्वातद्वा बोलूच शकत नाही . आपले विचार अतिशय गहन असतात आणि ते कलायला या लोकाना कदाचित अशक्य असेल , म्हणून ते आपणास हिणवत असतील , तुम्ही त्यांचे पाय धरायची काहीच गरज नाही .
    आप्पा - आपण मुलाचे पाटसचे आहात , म्हणजे आपण थोर असणारच .
    बाप्पा - आपले भविष्य आपण पाहिले असणारच , नाही का ? आपण सर्वाद्न्य आहात १ आपण भूत भविष्य आणि वर्तमान जाणता - त्यात वर्तमान जाणता हे सर्वात महत्वाचे !
    आप्पा - संजय सरांनी जसे फेसबुकवर तात्पुरती राजा घेतली आहे तशी आपण १ वर्षाची इथून राजा घेतली - किंवा १ महिन्याची - तर आपणास अनेक गोष्टी समजतील - तुम्ही या ब्लोक चे व्यसन लागलेले एकजण आहात - इथे कोणालाही काहीही लिहायची मुभा असते हेच इथले वैशिष्ठ्य , ते ज्याना इतर ठिकाणी मिळत नाही ते या ब्लोक्वर आपली भूक भागवतात . आपण आत्म परीक्षण करावे हि विनंती .

    ReplyDelete
  20. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. नंद घराणे अवैदिक, (शूद्र) राजघराणे होते याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही...... पुराणकारांनी नंद घराणे हे क्षत्रियांचे संहारकर्ते असल्याने भविष्यात भारतात पुढील सर्व राजे शूद्र (अवैदिक) असतील अशी घोषणा केली. याचे कारण म्हणजे नंद घराण्याने शिशुनाग वंशीय राज्याचा फार मोठा विस्तार केला. उत्तर भारतातील तत्कालीन अनेक जानपदे, महाजानपदे येथील राजवटी नंदांनी हटवत आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे नंदांना परशुरामानंतरचे सर्व-क्षत्रीय-संहारक ही पदवी वैदिक पुराणकारांनी दिली असल्यास नवल नाही. >>>>>>>>पुराणांच्या म्हणण्याचा अर्थ (नंदान्त क्षत्रिय कुलम) शरद पाटील वेगळा लावतात ते म्हणतात - " पौराणिक परंपरा सांगते की नंदाबरोबर अस्सल क्षत्रिय कुल शासनाचा अंत झाला ( दास- शुद्रांची गुलाम गिरी खंड1 भाग 1 p.350)

    त्याmमुळे नंद वंश शुद्र होताkकी क्षत्रिय हाच गोंधळ निर्माण झाला आहे तो ब्राह्मणाना दान धर्म करत होता व ब्राहमण ही ते स्विकारत होते यावरुन तो क्षत्रिय असावा असे वाटते.

    ReplyDelete
  23. Bharat Samrat Chandra Gupta Maurya Shepherd Boy, Yani Shepherd Kshatriya the , Yani Pashupalak Kshatriya the,
    Pashupalak , Mahipalak, Prajapalak,va Satyapalak ye charo Kshatriya hote hai.
    Jay Hind , Jay Bharat

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...