Monday, June 27, 2011

धनगरांचा गौरवशाली इतिहास

निर्मिती ही बहुपेडी असते. संपत्ती, सत्ता, संस्क्रुती, कला, वास्तु अणि साहित्यातुन ती परिस्फुट होत असते. महाराष्ट्रातील आद्य वसाहतकार हे पशुपालक होते हे मे आधीच्या लेखांत स्पष्ट केले आहे. सावळदा संस्क्रुतीचे सर्वात पुरातन अवशेष आता तापी नदीच्या खो-यात सापडले आहेत आणि त्यांचा काळ हा इसपु ३००० इतका मागे जातो. या प्रदेशात सापडलेल्या अवशेशांवरुन या संस्क्रुतीचे निर्माते अहिर पशुपालक होते असे स्पष्ट होते. या प्रदेशातील भाषेला अहिराणी म्हणतात यावरुन यांची प्राचीनता लक्षात यावी. पशुपालन, मासेमारी, व काही प्रमानात शेती हा त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता हे आता स्पष्ट झाले आहे.

थोडक्यात हे लोक आजच्या धनगर समाजाचे पुरातन पुर्वज होत असे म्हणायला प्रत्यवाय नाही. यामागोमाग पुंड्र, औंड्र हे पशुपालक समाज अन्य प्रदेशांप्रमाणे महाराष्ट्रातही पसरले. अहिर धनगरांनी खानदेश व्यापला तसा पौंड्र धनगरांनी दक्षीण महाराष्ट्र व्यापला. पुंड्रपुर (आजचे पंढरपुर) ही त्यांची राजधानी होती. विट्ठल हा त्यांच्यापैकीच आद्य राजा आज श्री विट्ठलाच्या रुपात पुजला जातो. (पहा-विट्ठलाचा नवा शोध -संजय सोनवणी.)

सुरुवातीला निम-भटके जीवन जगणारा हा समाज स्थिर होत गेला. नगरे वसवली जावू लागली. इस्पु २३० च्या दरम्यान औन्ड्र धनगरांतील सादवाहन घराण्याने महाराष्ट्रात स्वतंत्र सत्ता स्थापन केली.

सादवाहन (सातवाहन) हे मुळचे औंड्र वंशीय अहिरांपैकीच आहेत हे आता नवीन संशोधनानुसार स्पश्ट झाले आहे. सातपुडा पर्वताच्या परिसरात त्यांचा उगम झाला हे त्यांच्या मुलनामावरुन सिद्ध होते. उदा. प्राक्रुतात सातपुडा हा छात-छवत या नावाने ओळखला जात होता. सातवाहनांची मुल प्राक्रुत नावे छातवाहन...छातकरनी अशी आहेत. आद्य सम्राट सिमुखाचे खरे प्राक्रुत नाव छिमुक असे आहे. प्राक्रुत शब्दांचे संस्क्रुतीकरण करण्याच्या नादात मुळ अर्थ हरवण्याचा प्रकार घडला आहे. (पहा: महाराष्ट्र ग्याझेटीयर...प्राचीन काळ-१) थोदक्यात आजच्या सातपुड्याच्या, म्हणजेच खानदेशच्या भुमीतुन हा राजवंश पुढे आला. सातपुडा परिसरातुन आले म्हणुन सातवाहन...याचा संस्क्रुत अर्थ नाही कारण तो प्राक्रुत भाशेतील आहे, पण अनेक विद्वान हा शब्द संस्क्रुतातुन आला असावा असे समजुन अर्थ काढत बसले म्हणुन मोठी फसगत झाली आहे. सादवाहन हे नेहमीच महाराष्ट्री प्राक्रुताचे समर्थक होते...इतके कि त्यांच्या जवळपास ४५० वर्षांच्या कारकिर्दीतील एकही लेख संस्क्रुतात नाही. स्वतंत्र राज्यस्थापनेपुर्वी हे चंद्रगुप्त मौर्याचे सामंत होते. चंद्रगुप्त मौर्य हा मोरीय या पशुपालक समाजातुनच पुढे येत सम्राट बनला होता हा इतिहास आता स्पष्ट झाला आहे. यावरुन दोन्ही समाजांचे पुरातन नाते स्पष्ट होते.
एवढेच नव्हे तर हाल सादवाहनाने गाथा सप्तसही च्या रुपात एक अलौकिक वाड्मयीन ठेवा आपल्यासाठी निर्माण केला होता हे कसे विसरता येईल? सादवाहनांनी विदेशी व्यापार वाढवला होता. त्यांचे नौकाशास्त्र एवढे प्रगत होते कि मेगास्थानिसनेही त्याचा आदरपुर्वक उल्लेख केला आहे.

पुढे वाकाटक, कदंब, यादव, भोज हे महाराष्ट्रातील राज्यकर्तेही याच विस्त्रुत समाजातुन उदयाला आले. याचे कारण म्हणजे, हा पशुपालक समाज तत्कालीन अर्थव्यवस्थेत सर्वात महत्वाचा आणि मोठा घटक होता. हा समाज पराक्रमी तर होताच पण निर्मितीक्षमही होता. महाराष्ट्रातील आद्य संस्क्रुतीची पाळेमुळे रोवुन हा समाज थांबला नाही तर त्यात तो व्रुद्धी करत राहीला. सादवाहनकालीन लेणी आजही त्या निर्मितीक्षमतेची उदाहरने आहेत...जी धनगर समाजाला आजही आपल्या पुर्वजांबद्दल अभिमान देत राहतील. याच समाजातुन व्यवसायाधिष्ठीत कौशल्य असनारे घटक विकसीत झाले. त्याबद्दल पुढे लिहिणारच असल्याने येथे फक्त पुरातन व्यवसायाशी नाळ जुळवुन आजही राहिले त्यांच्या इतिहासाबद्दल बोलायचे आहे.

सादवाहनांचे सांगत असतांना जेजुरीच्या खंडेरायाबद्दल लिहिणे अत्त्यवश्यक आहे. खंडोबा हे लोकदैवत असुन नंतर त्याचे मर्तंड-भैरव वा शिवाशी नाते जुळवले गेले असे सोंथायमर ते डा. रा, चिं. ढेरे सांगतात. पण हे वास्तव नाही. धनगर (औंड्र/पुंड्र/अहिर इ.) हे सारेच मुलचे शिवपुजक आहेत. सादवाहन घराण्यात स्कंद (हे संस्क्रुतीकरण आहे...मुळ नाव खंड...त्याच्या काही नाण्यांवर फक्त खद असेही लिहिलेले आहे...कदाचित अनुस्वार कालौघात अस्पष्ट झाला असेल.) हा सम्राट इ.स. १५६ मद्धे होवुन गेला. त्याच्या अलौकिक पराक्रमामुळे हाच राजा जेजुरीचा खंडेराय म्हणुन पुज्य बनला असावा एवढे पुरावे आता समोर येत आहेत. आजही धनगरांना खंडेराय हा किती पुज्य आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. खरे तर ते त्याच्या रुपात आपल्या अलौकिक सामर्थ्याच्या पुर्वजाचीच पुजा करत आहेत. म्हणजेच श्री विट्ठल आणि खंडेराय, जी आजच्याही महाराष्ट्राची आराध्ये आहेत ती मुळच्या धनगर समाजातील महापुरुषांची दैवतीकरणे आहेत हे उघड आहे.

याबद्दल विस्ताराने एक ग्रंथच लिहावा लागेल. येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे आज सामाजिक द्रुष्ट्या अवनतीला पोहोचलेला, नव्या युगात जीवनसंघर्षात व्यस्त झालेल्या या समाजाला आपले मुळ स्वरुप कळायला हवे यासाठी हा प्रपंच. जवळपास ८व्या शतकापर्यंत या समाजाने राजकीय व आर्थिक द्रुष्ट्या महाराष्ट्राला वैभव प्राप्त करुन दिले. महाराष्ट्रातील लोककला/नाट्य/संगीताचे मुळ जनक हेच. यांचे मौखिक साहित्य/दंतकथा आजही अंधारात आहेत. आपले पुर्ववैभव आणि निर्मितीची क्षमता विसरत गेली आहे कि काय?

प्रत्येक समाजाला उन्नती आणि अवनतीचे चक्र उपभोगावे लागते हे खरेच आहे. एक झापड येते आणि नाविण्याची हौस संपते. आहे तेच कसे सांभाळायचे, बदलांशी कसे जुळवून घ्यायचे हे प्रश्नचिन्ह उभे रहाते. एखादे मल्हारराव, यशवंतराव वा लोकमाता अहिल्याबाई येतात...निर्मितीला चालना देतात...पण त्यातुन बोध मिळतोच असे होत नाही. काही लोक शिवरायांपारही काही इतिहास होता याकडे का वळत नाहीत याचे उत्तर खुप साधे आहे कारण त्यापलीकडे त्या समाजघटकाचा विशेष असा मुळात इतिहासच नाही. ते धनगरी सत्तांचे सरंजामदारीपद उपभोगत गेले आणि नंतर मुस्लिमांचे सरदार बनले हे एक वास्तव आहे. आणि ज्यांचा इतिहास आहे ते मात्र आजच्या सत्तेच्या राजकारणात प्यादे बनवले जात आहेत. जीवनाच्या अस्तित्वाचा जीवघेणा संघर्ष त्यांना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर आपल्याच उप-घटकांत...मग ते अहिर असोत कि अन्य कोणी...ऐक्य साधले जात नाहीय.

मला एकच सांगायचे आहे...बाबांनो तुमचे पुर्वज येथील आद्य वसाहतकार आहेत. त्यांनीच येथील संस्क्रुतीची सुरुवात केली. त्यांनीच अवाढव्य राजसत्ता स्थापन केल्या. ज्यांचे जीवंत पुरावे आजही विश्वाला चकित करत आहेत अशा वास्तु निर्माण केल्या. तुमच्या पुरातन वारशांचे अपहरण झाले आहे...होत आहे...आणि तरीही तुम्ही गप्प आहात. असे होतेय याचे एकमेव कारण म्हनजे तुम्ही तुमची अस्मिता विसरला आहात. इतिहास ध्यानी ठेवलाच नाही. त्याची पुनराव्रुत्ती वेगवेगळ्या अंगाने करायची असते याची जाण विसरलात...

आता तरी जागे व्हाल?

12 comments:

  1. विठ्ठल मंदिर हे मुळचे बौद्ध मंदिर आहे असे बौद्ध बांधवांचे म्हणणे आहे. तुमच्या मते ते धनगरांचे दैवत आहे. म्हणजे मुळचे बौद्ध मंदिर धनगर लोकांनी बळकावले असा अर्थ काढता येऊ शकतो. कृपया अधिक स्पष्टीकरण करावे.

    ReplyDelete
    Replies
    1. Vittal mandir ani baudh kay sambandh lagtoka kaypan sandharb jodtay rao.

      Delete
    2. बौद्ध मंदीरे ही सम्राट कनिष्क आणि त्यानंतर त्यांचा मुलगा हुविष्क या राजांनी बांधली. कनिष्क हा मुळचा कपासी गुज्जर कुळातला होता. त्याचे गोत्र कपासी हे गुज्जर लोक मध्य आशियातील बाल्कन भागातून भारतात आले. जे लोक ज्या गावातून आले त्या गावाचे नाव हे त्या गुज्जराचे गोत्र बनले आहे. कौडिण्य वैगेर सर्व गोत्रे ही बाल्कनमधील काही गावांची नावे आहेत. कनिष्क हा गुज्जरातला अत्यंत बुद्धभक्त होता . त्याचा मुलगा हुविष्क यानेही मंदीरे बांधली पण त्यात एकही हिंदू देवता नव्हती , ती होती देवमंदीरे बौद्ध धर्मातली, आणि बरीचशी मंदीरे ही त्याच्या पुर्वजांची होती. त्यात ओशिव (सध्याचा हिंदू शिव), ओमा (सध्याची हिंदू उमा पार्वंती), नाना नावाची बाल्कन देवी अशी अनेक मंदीरे बांधली. कालौघात बुद्धाचे महत्व कमी होत जाऊन शिव-उमा ही बाल्कन दैवते भारतात स्थिर झाली. हा झाला शिवाचा भारतातील प्रवास. यानंतरच्या काळात राजांनी जे की बुद्धाच्या शाक्य कुळातील होते त्यांनी अनेक बुद्धिस्ट विद्यापीठे उभारली . बौद्धांना वयाच्या सातव्या वर्षापासून शब्द विद्या (संस्कृत भाषा), शिल्पकला , धर्म यांचे ज्ञान दिले जायचे. बौद्ध धर्माच्या अवनतीनंतर अनेक शिल्पे , विहारे जी अशीच पडून राहिली ती कालौघाने काही लोकांनी अज्ञानास्तव अथवा स्वार्थास्तव काबिज केली. शैव पंथाने आधी ही विहारे, वैगेरे आमचाच वारसा म्हणून ताब्यात घेतली. शैव पंथाचा उगमही बौद्ध धर्मातून झाला आहे. सम्राट हर्षाच्या काही काळ आधीच महेश्वरदेव हे महान भिख्खू होऊन गेले , त्यांचे अनुयायी हे अतिवैरागी होते , त्यांचे वर्णन आजच्या नागा साधुंशी तंतोतंत जुळते आहे. महेश्वरदेवाचेच पुढे अनेक देवांमध्ये रुपांतर झाले आहे. होळकरांचा महेश्वर हा देवही याच महेश्वरदेवाचे रुप असावे असा नवीन संशोधकांचा कयास आहे. बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करताना मुद्दाम शब्दच्छल करून भाषांतर केले जाते आणि बौद्धांचा इतिहास हा आपलाच इतिहास अशा प्रकारे भारतीयांना चुना लावला जातो. सम्राट अशोक , सम्राट चंद्रगुप्त हे जर धनगरांचे पुर्वज असतील तर भगवान गौतम बुद्धासह सर्व शाक्यकुळच धनगरांचे पुर्वज मानावे लागतील. पाल , गडरिया हे तर मुळ शाक्य कुळातीलच होते. चंद्रगुप्त मौर्य हे तर पिप्पलीवन (पिप्पलीवाहन) या भागाचे राजे होते. त्यांचे पुर्वज हे बुद्धकालीन कपिलवस्तूचे शाक्य होते. प्रसेनजीताचा मुलगा विदुडंभ याने कपिलवस्तूत कत्तल केल्यामुळे तेथील उरलेल्या शाक्यांनी ती जागा सोडली. त्यातीलच काही शाक्य पिप्पलीवन येथे राहिले. तेथे त्यांनी मोर पाळण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय केला , म्हणून त्यांना मौर्य हे पडनाव पडले. त्यातूनच पुढे चंदगुपत (चंद्रगुप्त) हा महत्वाकांक्षी आणि अत्यंत चाणाक्ष सम्राट झाला. मुळात चंद्रगुप्त, अशोक हे बुद्धाच्याच शाक्य कुळाचे वंशज होते. बुद्ध आणि महावीर हेही एकाच लिच्छवी कुळातील होते. महावीर यांनी जैन, बुद्धांनी बौद्ध, तर महावीरांच्या मित्राने आजीवक या पंथाची स्थापना केली. भारतातील अनेक मंदीरे बौद्ध वारशांवर उभारलेली आहेत. मुळ इतिहास कोणीच सांगत नाही. पूर्वग्रहदूषित भावनेने इतिहास लिहिल्यामुळे 85000 विहारे आणि त्यांचा इतिहास लपवला गेला आहे. भितीने बुद्ध मूर्ती संग्रहालयात हलवल्या जाऊ लागल्या आहेत. हजारो वर्षे ज्यांना देव म्हणून पूजले ते तर बुद्ध निघू लागल्याने कलमकसायांना स्पष्टीकरणे देताना घाम फुटत आहे, काही विकाऊ लेखक या इतिहासाची सुपारी घेऊन वितीहास लिहीत आहेत.

      Delete
  2. Good Question Jidnyasu...............Curious about answer from Mr. Sonavani......

    ReplyDelete
  3. Sorry Jidnyasu and Revolutions as I was unable to post my reply because of some technical problem. I highly aapreciate question of Jidnyasu. The answer is, Dhanagar could never grab Vitthal temple. Vitthal was seen in the form of Buddha during the period of at least 10th century AD, influence of the Buddhism in Maharashtra. Saint Janai has already stated that ....krishna turned Buddha..

    But the fact remains that Vitthal was originally Lord of shepherd community and his all attributes confirm to the my statement. I have written a book on this already and even Dr. R. C. Dhere to some extent admits to the points.

    ReplyDelete
  4. Too many contradictions Mr. Sonavani - Janai said Krishna Turned Buddha....but some intellectula said..Buddha turned in Vitthal like Buddha turned in Tirupati. If it was Buddha Vihara and and Shepherd could not grab the control of Buddha vihara then its has a simple meaning. Sheppherd tried to capture Budha vihahra....and then claimed that it is thier GOD. Because Shepherds did not have Pre Buddha Hisotry as far as this temple is concerned....

    ReplyDelete
  5. गवळी-धनगर समाजात विठ्ठलाची पूजा करतात आणि मेष पालक धनगर समाजामध्ये बिरोबा ची पूजा करतात, धनगर समाज खूप पूर्वी पासून मानतो कि विठोबा हा बिरोबा चा सख्खा भाऊ आहे, पण साहेब आपला लेख खूप अप्रतिम आहे ....

    ReplyDelete
  6. आपण ३५०० वर्ष पूर्वी ची गोष्ट सांगत आहोत, बुद्ध धर्म संस्थापक परमपूज्य गौतम बुद्ध यांचा जन्म खूप नंतर चा आहे.

    ReplyDelete
  7. lord vitthal ,lord biroba was not avtar of shiva they are dhangar worriers..... that what we realized since so many literature

    ReplyDelete
  8. But it can not be avoided that Lord Vitthal ,Lord Khandoba and Lord Biroba are avtar of lord Kishna and Lord Shiva. Because lord Rama was Avtar of Lord Vishnu but he was born as human and was great warrior.

    ReplyDelete
  9. विठ्ठल धनगरांचे दैवत यावर अधीक माहिती द्यावी
    बाकी लेख चांगला आहे

    ReplyDelete
  10. आपले सर्व पूर्व जे धनगर होते तर माऊस खाने पाप आहे मटण खाणे पाप आहे याची सुरुवात कधी आणि केव्हा झाली

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...