Monday, June 27, 2011

विभक्तीकरणातले एकाकारत्व

सर्वच समाजघटक एकाच वेळीस निर्माण झालेले नाहीत. जसजसा मानवी समाज वाढत गेला तसतशा समाजाच्या गरजा वाढत गेल्या. रक्षनासाठी जशी उच्च प्रतीची हत्त्यारे आवश्यक बनुन गेली तसेच उदरभरणासाठी शेती ते पशुपालन व्रुद्धी करनेही आवश्यक बनुन गेले. निवासांची गरज वाढली तसेच वस्तीरक्षणासाठी काही बहाद्दर लोकांची गरज भासु लागली. दळनवळणासाठी/वाहतुकीसाठी गाड्यांची गरज वाढली तसेच युद्धांसाठी रथादि वेगवान साधनांचीही गरज वाढली. मत्स्योद्योगांसाठी/व्यापारासाठी जशा उत्तम नौकांचा शोध लावत बांधणी करावी लागली तसेच शेतीसाठी नांगर ते अन्य उपकरणे शोधावी लागली...बनवावी लागली. त्याचवेळीस धार्मिक कार्यासाठी आवश्यक मंदिरे, कलात्मक शिल्पे याचीही गरज वाढत गेली तसतशे वास्तुरचनाकार आणि शिल्पकार निर्माण झाले. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

मनुष्याची प्रगती ही अन्न-संकलक मानव, शिकारी मानव, पशुपालक मानव आणि क्रुषि मानव अशी झाली आहे. महारष्ट्रातील पाषणयुग, ताम्रयुग ते महापाषाण्युगातील अनेक वसतीस्थाने सापडली आहेत. शिकारी मानव ते पशुपालक मानव या प्रगतीचा आलेख स्पष्टपणे पहायला मिळतो. हा काल सनपुर्व २००० पासुन सुरु होतो. गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या यांचे मोठे कळप पाळले जात होते याचे पुरावे सापडतात. त्या कालातील मानव हा स्थिर नसुन चरावु कुरणांच्या शोधत भटकत असे. तो शेती शिकला असला तरी ती बव्हंशी फिरत्या स्वरुपाची होती. अद्यपहि पशुपालन हाच महत्वाचा व्यवसाय होता. हळुहळु शेती विकसीत झाली, अगदी नद्यांवर बांध घालुन शेतीला पाणी पुरवण्यासाठी कालवे काढण्यात आले. या काळात धर्मश्रद्धा विकसीत झाल्या असल्या तरी पुरोहित जातीचा उदय झाल्याचे दिसत नाही. टोळीप्रमुख पुरुष वा स्त्री यांच्याच हातात तत्कालीन धर्म होता. या समाजाचा म्रुत्योत्तर जीवनावर विश्वास होता. त्या काळातील अनेक दफने सापडली आहेत. म्रुतासोबत जीवनोपयोगी वस्तु, अलंकार व अश्वही पुरले गेल्याचे दिसते. मात्रुपुजा ही प्रधान होती. त्यामुळे हा समाज मात्रुसत्ताक पद्धती पाळणारा असु शकेल. जीवन सुखकर, रक्षित आणि आपत्तीहीन असावे यासाठी भौतिक साधनांचा शोध निरंतर सुरु होता. याच वेळीस जीवनातील, निसर्गातील गुढे सोडवण्याचा अविरत प्रयत्नही सुरु होता. त्यातुनच प्रथम शामान (पुरोहित) घटक उदयाला आला आणि जसा समाज अधिकाधिक स्थीर होवू लागला तशी त्यातुनच ब्राह्मण या घटकाचा उदय झाला. पण राज्यकर्ते, लोहार, सुवर्णकार (अलंकार निर्माते), सुतार, वीणकर, गवंडी (वास्तुकार) हे आद्य पशुपालक समाजातलेच व्यवसायनिष्ठ घटक निर्माण झाले होते हे येथे लक्षात घ्यायला हवे. पुराकथा वा धार्मिक वाद्मय जरी ब्राह्मण हा प्रथम आणि अन्य समाजघटक नंतर अशी मांडणी करत असले तरी ते समाजेतिहासाचे वास्तव नाही हे कोणीही पुरातन समाजशास्त्राचा अभ्यास केला तर लक्षात येइल.

धर्म ही समाजाची निकड असते आणि समाजच धर्म निर्माण करत असतो. (येथे धर्म हा शब्द religion या अर्थाने घ्यायचा नाही.) धर्मकार्यासाठी तशी आवड व विशिष्ट मनोरचना असनारे निवडले जात होते...कारण जन्माधारीत जातीव्यवस्था अद्याप निर्माण झालेली नव्हती. म्हणजेच वंशपरंपरागत व्यवसाय यापेक्षा ज्याचे कौशल्य ज्यात आहे तो व्यवसाय निवडण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळेच आहे त्याच समाजात जसजसे जीवनावश्यक शोध गरजेपोटी लागत गेले तसतसे नव-नवे व्यवसायाधिष्ठीत कुशल लोकांचे गट निर्माण झाले. उदाहरणार्थ शिंपी हा घटक इस. पहिल्या शतकाच्या आसपास निर्माण झाला. तत्पुर्वी अधोवस्त्र आणि उरोवस्त्र अशीच वेशभुशा असे...शिवलेली वस्त्रे वापरण्याची पद्धत नव्हती.

यातील एकही गट अवकाशातुन पडलेला नव्हता हे येथे लक्षात घ्यायला हवे. आहे त्याच समाजातील कुशल/नवनिर्माते लोकांनी समाजोपयोगी संसाधने निर्माण केली आणि समाजाची एकुणातील प्रगती साधली असेच येथे म्हणावे लागते.

राजाचे कार्य त्या काळात सिमित होते. आहे त्या प्रजेचे रक्षण करणे, सोयी पुरवने, विस्तार करणे व त्या बदल्यात अल्प कर घेणे एवढेच त्याचे कार्य असे. आपण पशुपालक समुदायातील सातवाहन (औन्ड्र) या राजांची ३५० वर्षांची कारकिर्द बघीतली तर एक महत्वाची बाब लक्षात येते ती ही कि त्या काळातील कररचना अत्यंत सौम्य होती. त्यांनी स्वत:साठी कसलेही भव्य प्रासाद बांधलेले नाहीत. ते अत्यंत साधे जीवन जगत. पण त्यांनी महाराष्ट्रातील पहिले गिरी-किल्ले बांधले, नगरे उभारली आणि व्यापार सुकर केला.

सातवाहन कालात सर्वच निर्मानकर्त्यांच्या शहरो-शहरी श्रेण्या असत. त्या आजच्या पेढ्यांप्रमाणे कार्य करत. वस्त्रोत्पादक ते लोहारांचा कुशल माल नुसता स्थानिक बाजारपेठेपुरता नव्हता तर सुदुर प्रदेशात जावुन त्यांचा व्यापार/विनिमय होत असे. त्यासाठी रस्ते, विश्रामग्रुहे/धर्मशाला/पानपोया यांची व्यवस्था राज्यकर्ते करत त्याचवेळीस सर्व-धर्म-समभाव पाळत सर्व धर्मियांसाठीच्या धर्मस्थानांच्या निर्मितीतही सक्रीय सहभाग देत. सातवाहन काळात, सातवाहन बौद्ध नसले तरी ३५० च्या आसपास लेणी निर्माण केली गेली.

यासाठी अर्थपुरवठा राजांनी व समाजाने केला असला तरी त्यामागील संकल्पना, अमुकच ठिकाणी लेणीसमुह होवु शकतो अशा डोंगररांगांचा पुर्वाभ्यास-सर्वेक्षण करुन मग त्याचे वैद्न्यानिक अभिरेखन आणि अंमलबजावणी करुन हे कलात्मक वास्तु-चमत्कार घडवणारे कोण होते? ( आजचे साधे हाय-वे वरील बोगदे बनवण्याआधी आजचे तंत्रद्न्य एवढा आटापिटा करतात...आणि ते किती वेळा बंद होतात याचा विचार करा...तुलना करा...) आज इतिहासाला त्यांची नावे माहित नाहीत. खडक आत किती एकसंघ आहे याचे द्न्यान नसता लेणी खोदली जावू शकत नाहीत. आत नेमके काय आणि कसे खोदायचे आहे...कोठे काय आणि कसे कोरायचे आहे त्याचा पुर्व आराखडा असल्याखेरीज मुळात काम सुरु होवू शकत नाही. ही प्रतिभा व द्न्यान असनारे लोक कोण होते? ते याच मानवी समुदायातील वास्तुकार, पाथरवट, शिल्पकार आदि खरे निर्माणकर्ते समाजघटक होते यात शंका नाही. आजही आधुनिक विद्न्यान पणाला लावले तरी अशी लेणी पुन्हा उभारता येणार नाहीत. हीच बाब किल्ल्यांबाबत म्हणता येते. असे अभेद्य किल्ले (मग ते गडमाथ्यांवरील असोत कि सागरी...कि भुईकोट) कोणाच्या कल्पनाशक्ती/वास्तव द्न्यान/आणि निर्मितीच्या भावनेतुन झाले? याच किल्ल्यांमुळे काही शतके महाराष्ट्र सुरक्षित राहिला हे येथे विसरता येत नाही.

जेंव्हा किल्ल्यांचे निर्माण थांबले...जेंव्हा लेण्यांचे निर्माण थांबले...नवीन नगरे वसवण्याचे थांबले...तेंव्हा या कलेतील द्न्यानवंतांचे काय झाले बरे? हा प्रश्न आपला इतिहास कधीच विचारत नाही. औद्योगिक क्रांतीनंतर स्थानिक पारंपारीक काही व्यवसायांची जी ससेहोलपट झाली तशीच त्यांची झाली असनार व दुय्यम व्यवसाय पोटापाण्यासाठी स्वीकारावे लागले असणार...नाही का?

पण हा झाला नंतरचा काळ. आपण अशा कालाबद्दल चर्चा करत होतो जेंव्हा नवनिर्माण ही सर्वच समाजाची गरज होती आणि त्यासाठी आहे त्याच जनसमुदायातील काही लोक आपापल्या कल्पना व निर्मानक्षमता घेवुन त्या गरजा पुर्ण करायला पुढे येत होते. विदेशांशी व्यापार सुरु होता. त्यासाठी अवाढव्य नौका बांधणारेही याच लोकांतुन पुढे आलेले होतेच. एक-शीडाच्या नावेपासुन १५०-२०० शिडांची जहाजे बनवायला हेच लोक शिकले.

हे सर्वच पशुपालक (धनगर/गवळी), शेतकरी (आजचे कुणबी), माळी, कोष्टी, सुवर्णकार, वीणकर, सुतार, लोहार, चांभार, मातंग, महार, बुरुड, पाथरवट, गवंडी अशा असंख्य समाजघटकांनी ख-या अर्थाने नवनिर्मिती केली. राजे आले राजे गेले...जे याच समुदायातुन आले होते...कधी येथील आपली सत्ता तर कधी परकियांची....यातील जीवनसंघर्ष भोगत त्यांनी आपापल्या कुवतीनुसार निर्मिती केली. आज जगातील आस्चर्ये आहेत त्यामागे यांची प्रतिभा होती...त्यांचे विद्न्यान होते. त्यामुळेच समाज जगला. संस्क्रुती निर्माण करु शकला. पोट भरु शकला. तो वाकवला गेला पण तोडता आला नाही. धार्मिक स्म्रुत्या आल्या नि गेल्या, पण त्यांची पत्रास किमान मध्ययुगापर्यंत कोणत्याही समाजघटकाने ठेवलेली दिसत नाही. ब्राह्मणांचे नियत कार्य म्हणजे फक्त धर्मकार्य...पण तेही शेतीत पडले...तेही तलवार हाती घेते झाले. तेही व्यापारत पदले...सातवाहन काळातच...

धर्म समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी असतो...विभक्तिकरणासाठी नाही. पण हे तत्व मध्ययुगात कसे विसरले गेले हा एक चर्चेचा विषय आहेच. नेमकी मध्ययुगातच नवनिर्मिती जवळपास कशी थांबत गेली यावरही चिंतन आवश्यक आहेच. त्याला जबाबदार राज्यकर्ते होते, अस्थिर स्थिती होती, पारतंत्र्य होते कि धर्मानेच या नव-निर्मितीला चुड लावली यावर आपण पुढील लेखात चर्चा करुयात.

पण जी काही येथील संस्क्रुती आहे...भले ती आज अवनतीला का पोहोचली असेना....तिचे निर्माते आणि तिला आजही अल्परुपात का होइना पोसनारे कोण होते एवढे लक्षात आले तरी सध्या पुरेसे आहे. एकाच मानवी समुदायातुन व्यवसायाधिष्ठीत वेगळे झालेले हे समाजघटक आहेत...मग धर्मशास्त्रे कितीही खोटे का बोलेनात!

2 comments:

  1. मूळ मानवी समाज एकाच होता. जाती ह्या नंतर मानवानेच तयार केलेल्या आहेत. हे अगदी बरोबर. धर्म काही सांगो जे सत्य आहे ते सत्यच.

    ReplyDelete
  2. BHAU,AHO VACHATANA DAMCHHAK HOTE. TARANBAL UDATE.AMHALA VACHAYALA VEL LAGATO, TUMHI EVHADE SAGALE KASE ANI KADHI LIHITA?TUMACHYAKADE PADARI 15/20 LEKHAKANCHI TEAM AAHE KAY?EKATYANE HE SAGALE ASHAKYA AHE.SIMPLY GREAT....

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...