Tuesday, July 5, 2011

हेही हवे...तेही नको

हेही हवे...तेही नको
जात हवी...जात नको...
याला झोडु... त्याला तोडू
पण स्वजातीचा?... अरे नको नको...

त्या जातीचा...त्या धर्माचा
त्या वस्तीतील...त्या वेशाचा
त्या गटातील...त्या पक्षाचा
शत्रू बरा तो...ठोक ठोक तो...

विचार जेवढे जुळती तोवर
माथा असतो झुकला त्यांवर
क्षणी विपरीत होता पळभर
लाथा घालत त्या मुर्खावर...(?)
उठती गर्जना...उठती शस्त्रे
मारा काटा....आवाज गगनभर...

याला मारा...त्याला काटा...
विकत घ्या कोणी विकत द्या...
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या
रावण घ्या कोणी रामही घ्या...
नाहीतर जरा उचल मुंडके
शेवटचे "...हे राम!" म्हणुन घ्या!

"जात जात जात" हा मंत्र असा जो
श्रेष्ठ असे सर्व मंत्रांहुन
एक अनाहत ध्वनी निघतो ...जो
जळत्या ज्वालांच्या चितेंतून...
"म्रुत्यु हा बरवा...जातही बरवी
प्रजा ही भडवी...ना जानें तू..."

2 comments:

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...