Saturday, July 2, 2011

एक तुला सांगायचे होते....

एक तुला सांगायचे होते
सांगता सांगता राहुनच गेले
जेंव्हा तू होता रांगता बाळ
इवल्या निरागस डोळ्यांत
भरू पाहत अवघे आभाळ
मी संकोचलो...
मी बावरलो...
कसे सांगू तुला
ही निरागसता उरेल क्षणकाळ....?

जेंव्हा तू उतरलास
आशा-आकांक्षा घेउन
इवल्या ह्रुदयात
जीवनाच्या मैदानात
हिंस्त्र श्वापदांचा सामना करत
जेंव्हा होता तु संवेदनांच्या शोधात
ह्रुदय घेवून हातात...
तेंव्हाही नाही बोललो मी
म्हटले लढु द्या
माझ्या जिगरी रक्तास
जरूर हटवेल तो या
क्रुतघ्न दाटुन आल्या धुक्यास!

मी बोललो नाही...
घनतिमिराचे घेवून पांघरून
मुक राहिलो सुर्यास
पहात राहीलो तुझा झगडा
त्या हिंस्त्रतेत बरबटल्या
शोकग्रस्त आक्रोशांनी भरलेल्या
विश्वात
मी तुला सांगू इच्छित होतो...
पण मी काही बोललोच नाही...
मूक राहिलो....
जणु
तुझे अर्ध्य दिले होते मी
या रानटी समाजास!

माती ओघळते आहे आता
माझ्या धमण्यांतुन
आणि विझल्या श्वासांतून
मी पण तुला सांगायलाच हवे होते
जेंव्हा निरागसता
स्पंदत होती
तुझ्या इवल्या ह्रुदयातुन
सांगायचे पण राहुनच गेले....

आता
काय सांगु तुला
आणि कसे
जेंव्हा
मी बोलुही शकत नाही
आणि तु ऐकुही शकत नाहीस?

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...