Friday, December 23, 2011

हुकुमशाही प्रव्रुत्तींना या देशाने कधीही थारा दिलेला नाही!

भ्रष्ट माणसेच भ्रष्टाचाराविरोधात बोंब मारण्यात अग्रेसर असतात. सारे जग भ्रष्ट असुन आपणच काय ते एकमेव भ्रष्ट प्रव्रुत्तींचे बळी आहोत असा त्यांचा ठाम समज असतो. म्हनजे देणारा आणि घेणारा यांत नकळत एक फरक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. अण्णा हजारे हे नेमके याच मनोव्रुत्तीचे बळी आहेत.

तेच नव्हे तर त्यांचे सहकारीसुद्धा!

दिल्लीची हवा मानवत नाही. मुंबईची हवा लय बेस. भाडे भरायचे नाही म्हणुन कोर्टात जातात. कोर्टाने फटकारले हे फार बरे झाले. उपोशनच करायचे तर राळेगण सिद्धीतील ते मंदिर काय वाईट होते? उपोशनाशी मतलब! पण प्रसिद्धीचा हव्यास फार. याला नैतीक भ्रष्टाचार हा शब्द योग्य नाही काय?

आमरण उपोषनाच्या बाता आम्ही ऐकुन कंटाळलो आहोत एवढेच काय ते खरे.

संसद, घटना यांच्यापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजनारे हे कोण? मेणबत्त्या घेवुन काही लाख लोक रस्त्यावर आले म्हणुन आपला अहंकार फुगवुन घेनारी ही बेडके, यांची स्वत:ची नैतीकता काय? आणि मेणबत्त्या पेटवुन रस्त्यावर जे मागे कधीतरी आले होते...ते आज कोठे आहेत? कोठे गायब झाले एकाएकी?

ते देणा-यांच्या बाजुचे होते कि घेणा-यांच्या? कि दोघांच्याही?

आणि म्हणे सक्षम लोकपाल आणा. सक्षम या शब्दाचा अर्थ तरी या लोकांना माहित आहे काय?

पोलिस, सी.बी.आय. ते संरक्षण खात्यातील लोक कोठुन येतात? ते येतात ते आपल्याच समाजातुन. राजकीय नेते येतात कोठुन? ते येतात ते आपल्याच समाजातुन. याचा जय त्याचा जय हे घोष लावणारे कोठुन येतात? आपल्याच समाजातुन. या भ्रष्ट एन.जी.ओ. आणि त्यांच्यातील देशद्रोही, जे येथील विकासाला खीळ घालतात...ते हरामखोर येतात कोठुन? याच समाजातुन. अण्णा हजारे सअरखे लोक जन्मतात कोठुन याच समाजातुन. ते काही समाजाचे बाप नाहीत. समाज त्यांनी घडवला नाही. समाजच समाजाला घदवत असतो आणि त्यासाठी कधी कधी अशी बुजगावनी लागतात. बुजगावन्यांनी स्वता:ला जनतेचा मसीहा समजणे हा त्यांच्या मानसिक विक्रुतीचा भाग असतो...ते वास्तव नसते.

या मानसाला असा भ्रम झालाय कि हा एकमेव शुद्ध चारित्र्याचा माणुस आहे आणि सारा देश भ्रष्ट आहे. हरकत नाही. योग्यच आहे असे समजुयात. पण मग हे लोकपाल आणि त्याचे अनुयायी काय आभाळातुन पडनार आहेत कि काय? ते भ्रष्ट निघाले तर काय अण्णा त्यांना फासावर लटकावणार आहेत? त्यांना माहित आहे असे ते करु शकत नाहीत. ती योग्यता आणि लायकीही नाही.

मानवी मनात मुळात भ्रष्टपना हा आदिम आहे. तो फक्त आर्तिकच नव्हे तर बव्हंशी नैतीक जाणीवा आणि नेणिवांत घुसलेला असतो. अहंकारी नैतीकता हा नैतीकतेच्या भ्रष्टाचाराचे भिषण उदाहरण असते आणि ते आर्थिक भ्रष्टाचारापेक्षाही नीचतम पातळीवर वावरत असते.

अण्णा हजारे महाभ्रष्ट ठरतात ते नैतीकतेच्या पातळीवर. त्यांना मुळात भ्रष्टाचाराची व्याख्याच समजलेली नाही. जी न समजलेली व्याख्या आहे ती मात्र उगा सक्षम लोकपालाच्या नांवाखाली लादायचा प्रयत्न करत आहेत. हा सर्वात मोठा भिषण नैतीक भ्रष्टाचार आहे.

हुकुमशाही प्रव्रुत्तींना या देशाने कधीही थारा दिलेला नाही. मग त्या इंदिरा गांधी का असेनात! किमान त्या लोकनियुक्त पंतप्रधान तरी होत्या. जो माणुस खुद्द रालेगण सिद्धीतुनही निवडुन येण्याची खात्री ज्यांना नाही, ते मारे अखंड लोकशाहीला आव्हान द्यायला उभे ठाकतात हा महाभयंकर विनोद हा देश मुकपणे पहात आहे. खरे तर अशा मानसाला सर्वप्रथम सर्व जनतेने विरोध केला पाहिजे. पण तसे होत नाही. लोकशाहीविरोधक गोट जे भारतात स्वातंत्र्यपुर्व काळापासुन नांदत आले आहेत त्यांचा हस्तक असलेल्या माणसापासुन वेगळी अपेक्षा काय बाळगणार?

जगात एक नियम आहे. जेवढे कायदे वाढतात तेवढा भ्रष्टाचार वाढतो. कायद्यांची संख्या, नियंत्रकांची संख्या जेवढी कमी तेवढे समाजाचे मन:स्वास्थ्य वाढत असते. पण हे महाभाग मात्र कायदे आणि नियंत्रक वाढवण्याच्या भानगडीत देशाचे अक्षम्य नुकसान करण्याचा देशद्रोही प्रयत्न करत आहेत हे निषेधार्ह आहे. भ्रष्टाचा नको हे खरेच आहे. आधी देनारे आहेत त्यांना कोणी थांबवायचे? त्यांना कोनती सजा देनार? कि फक्त घेणा-यांच्या विरोधात बोलनार? देनारेही तेवढेच दोषी असतात. देना-यांबद्दल जनजाग्रुती करा...त्यांचे स्वार्थ थांबवण्यासाठी आधे प्रयत्न करा आनी आहे त्या कायदा यंत्रणेचा पुरेपुर वापर करायचा प्रयत्न करा...

पण हे न सांगता...अण्ण्णा स्वत: देना-यांचीच बाजु घेत असल्याने घेणा-यांच्या विरोधात कायदा बनवणे वा विरोध करणे हा निखळ दांभिकपणा आहे...एवढेच.

आणि हा दांभिकपणा ओळखत लोकशाही मुल्यांबाबत जाग्रुत होत त्याला विरोध जर होणार नसेल तर मी म्हनतो हा देश एका नव्या असंसदीय हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे!



4 comments:

  1. I was very fan of you till the moment but now I think you are another politician who want to loot this nation. I was reading your each and every blog because i liked them but now I know you are a thug, dongi baba.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय राजगुरू,फार लवकर ओळखलत इतरांच्या मानाने.असेच लिहित राहू दे.यांचा ढोंगीपणा जगाला कळूदे.

      Delete
    2. I feel now you would have known why I wrote the article...Thanks.

      Delete
    3. Rajguru please think vice versa. Why r u making one article one negative mind. R u crazy? or have u use only primary mind?

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...