Thursday, August 9, 2012

वैश्विकतेला कवेत घेणारा मराठी समीक्षक: शंकर सारडा



शंकर सारडा म्हणजे साहित्य क्षेत्रातील तरुणांनाही लाजवेल असे अत्यंत उत्साही व सळसळते चैतन्य. ते दोन सप्टेंबर रोजी पंचाहत्तर वर्षांचे होत आहेत यावर त्यांच्याकडे आणि त्यांच्या आजही अविरत सुरु असलेल्या साहित्यसेवेकडे पाहुन विश्वास बसत नाही. वैश्विक दृष्टीकोन बाळगत मराठी लेखकाला नोबेलची स्वप्ने दाखवत फक्त मराठीच्या प्रांगणात दंग राहु नका तर अन्य भाषांतही आपले साहित्य न्या असे गेली २०-२५ वर्ष सांगणारे एक द्रष्टे समीक्षक. फक्त पुस्तकांची समीक्षा करणे हेच समीक्षकाचे काम नव्हे तर साहित्यिक घडवण्यातही महत्वाचे योगदान देणारे एकमेव समीक्षक. स्वत: साहित्त्यिक. येथेच त्यांचे कर्तुत्व संपत नाही. समीक्षेच्या गंभीर प्रांगणात वावरत असतांनाही लहान मुलांसाठी तब्बल २० रंजन करणा-या अद्भुत-कथांची पुस्तके लिहिणारे सर्जक लेखक. सारडांच्या साहित्यकर्तुत्वाला सीमा नाहीत.

शंकर सारडांनी आजवर साडेपाच हजार पुस्तकांवर लिहिले आहे. हा एक जागतीक विक्रमच आहे. शक्यतो प्रसिद्ध लेखक वा गाजवलेल्या पुस्तकांवर लिहायची आपली खास मराठी समीक्षकी रीत. परंतु सारडांनी असा भेदभाव केला नाही. अगदी पहिले-वहिले पुस्तक लिहिणा-या पण गुणवंत लेखकालाही त्याच्या पुस्तकावर लिहुन नवीन...अधिक उत्तम लिहायला प्रेरणा देणारे एकमेव समीक्षक. त्यामुळे असंख्य लेखक प्रसिद्धीच्या झोतात आले. आज त्यातील अनेक प्रथितयश सहित्त्यिक बनले आहेत. आजचे प्रसिद्ध साहित्त्यिक आणि साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ह. मो. मराठे "नि:ष्पर्ण वृक्षवर भर दुपारी" या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. खरे तर ही कादंबरी त्या काळी अत्यंत स्फोटक.  तिच्या प्रकाशनासाठी कोणी पुढे येणे अशक्य. अशा काळात शंकर सारडांनी १९६८ साली ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले आणि मराठी साहित्याला नवे धुमारे फुटले. सारडांचा मुळात दृष्टीकोनच व्यापक. जवळपास अर्धे जग पालथे घातले असल्याने व जागतिक वाड्मयीन चळवळींशी संपर्क आल्याने माय मराठी कोठे खुरटते आहे याची जाण त्यांना न येती तरच नवल. पण या जाणीवेला त्यांनी प्रत्यक्ष कृतीत बदलवले आणि हे फक्त सारडाच करु शकले. याच रितीने विद्या सप्रे ते विश्वास पाटील अशा असंख्य लेखकांना सारडांनी प्रकाशाच्या झोतात आणण्याचे मोलाचे कार्य केले. नुसती समीक्षाच नव्हे तर प्रकाशनपुर्व संपादन संस्कारही सारडांनी अनेक लेखकांच्या हस्तलिखितांवर करुन, कधी संपुर्ण पुनर्लेखन करुन घेवून, त्या लेखनाचे साहित्यमूल्य वाढवले. लेखक-समीक्षकाचे सख्याचे नाते निर्माण करणारे सारडा हे एकमेव समीक्षक आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही. त्यामुळेच कि काय वसंत कानेटकर, रमेश मंत्री, ह. मो. मराठे, शं. ना. नवरेंसारख्या अनेक दिग्गज लेखकांनी सारडांना आपल्या कृती अर्पण केलेल्या आहेत. सारडा महाराष्ट्र टाईम्सच्या रविवार पुरवणीचे संपादक असतांना जी. एं. सारखे उत्तुंग लेखकही आपल्या पुस्तकावर सारडा काय लिहितात याची आवर्जुन वाट पहात असत...यात सारे काही आले.

पत्रकार म्हणुन सारडांची ओळख मोठी अहे. महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीला प्रतिष्ठा मिळवुन देण्याचे कार्य त्यांनी १९६२ ते १९६९ या काळात केले...त्यावेळी सारडा अवघ्या तेविशीत होते हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर त्यांनी ऐक्य, लोकमत, (रविवार आवृत्ती) ललित, देशदूत ई. पत्रांचेही संपादन केले. पण केवळ लेखक, समीक्षक, पत्रकार एवढीच सारडांची ओळख नाही. मराठी साहित्यातील त्यांचे एक सृजनशील संयोजक-कार्यकर्ता म्हणुनही मोलाचे योगदान आहे. सातारा येथे १९९३ साली भरलेल्या साहित्य संमेलनाचे सारडा कार्याध्यक्ष होते. या संमेलनाइतकी आजवरच्या एकाही संमेलनाला एवढ्या साहित्यिक मुल्यांची व नीटस संयोजनाची उंची गाठता आली नाही. सारडा तसे आजवर अनेक  साहित्य सम्मेलनांचे स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष झाले आहेत. सावंतवाडी येथे भरलेल्या बाल-कुमार साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्षही होते. पण मराठीची अविश्रांत एवढी साहित्यसेवा करुनही त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळु शकले नाहीत. सारडांना त्याची खंत नाही हे मला माहित आहे, पण मला निश्चित खंत आहे. मराठी माणुस किती कृपण आणि कृतघ्न असतो हे मी या प्रकरणी पाहिले...अनुभवले. "एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवायचे काय?" याच मुद्द्यावर सारडांची योग्यता अन्य कोणाही साहित्य-समिक्षकापेक्षा मोठी असतांनाही पराभव करण्यात आला. हे मराठीचे व मराठी माणसाचे दुर्भाग्यच आहे.

वैश्विक दृष्टीकोन...

शंकर सारडा हे मराठी साहित्याचा परिघ विश्वव्यापी कसा होईल याचा व्यापक विचार करणारे, तशी सातत्याने मांडणी करणारे पुन्हा एकमेव समीक्षक. मराठी साहित्य इंग्रजीत अनुवाद होवून जगभर पसरावे हा त्यांचा प्रयत्न. मी १९९८ साली इंग्रजी प्रकाशन विभाग काढुन अनेक पुस्तके सातासमुद्रापार नेली त्याची प्रेरणा सारडाच होते. आता तर अनेक मराठी प्रकाशकांनी इंग्रजी प्रकाशन विभाग सुरु केले आहेत. मराठीत नोबेलच्या तोडीची कलाकृती निर्माण होईल तेंव्हा होईल परंतु मराठी साहित्याने पाश्चात्य जगात अनुवादित स्वरुपात चंचुप्रवेश केला आहे ही बाब दिलासादायक आहे.
 
मराठीत विषय-वैविध्याची नेहमीच वानवा होती. वैज्ञानिक घ्या कि समाजशास्त्रीय...अशा विषयांवर सहसा कादंब-या लिहायला कोणी सहसा तयार नसे. पण सारडांनी चंद्रकांत मराठेंकडुन  "केलाटाची हाक" सारखी भव्य विज्ञान कादंबरी लिहुन घेतली. मला आनंद वाटतो कि मराठीतील ही पहिली स्वतंत्र विज्ञान कादंबरी मी प्रकाशित केली. पुढे रेखा बैजल या नवलेखिकेलाही त्यांनीच विज्ञान कथा-कादंब-या लिहायला प्रोत्साहन दिले. त्याचे एक पुस्तक मीही प्रकाशित केले. याचे कारण म्हणजे सारडांच्या वैश्विक दृष्टीकोनाशी मी पुर्ण सहमत होतो. मराठीतील साहित्य बाहेर जावे असा त्यांचा आग्रह होता तसाच जगात गाजलेल्या वैशिष्ट्यपुर्ण लेखनाचा/लेखकांचा परिचय मराठी वाचकांना व्हावा म्हणुन त्यांनी असंख्य लेख लिहिले. मराठीत स्त्रीवाद ही संकल्पना नुकतीच कोठे चर्चेत आली तेंव्हा त्यांनी जगात गाजलेल्या स्त्रीवादी कादंब-यांवर लेखन केले. पुढे ते सर्व लेख "स्त्रीवादी कादंब-या" या शिर्षकाखाली मीच प्रकाशित केले. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला व मराठीतील महिला लेखिकांनाही नवी दिशा मिळाली. दुरदेशचे प्रतिभावंत, काही लेखक:काही पुस्तके, पुस्तकांचे जग अशी त्यांची पुस्तके आपल्याला जागतीक साहित्याच्या प्रांगणात अलगद नेवून ठेवतात. आपली मराठी नेमकी कोठे कमी पडते याची जाणही होते आणि तशाच भव्य पण या मातीच्या कृती निर्माण करण्याचे बळ देते.

वर्तमानाशी नाळ जुळवत भविष्याचा वेध घेणे हे त्यांची खासियत. आता ते ई-पुस्तके, ई-मार्केटिंग या आधुनिक संज्ञा मराठी प्रकाशक-लेखकांसमोर ठेवत  बदलत्या कालाशी जुळवून घ्यायला शिकवत आहेत...मार्गदर्शन करत आहेत. कोण म्हणेल सारडा पंचाहत्त्रीचे झाले?

सारडा चिरतरुण आहेत. त्यांच्या कामाच्या झपाट्याला खंड नाही. पुस्तकांतच जगणारा हा थोर माणुस. मला त्यांच्या मैत्रीचा ( हो...मित्रच...त्यांच्याशी मैत्रीत वयाची अडचण कोणालाच येत नाही...) अभिमान आहे. त्यांची सर्वाधिक पुस्तके मला प्रकाशित करता आली याचा मला नितांत अभिमान आहे.

सारडा सर...आपणास उदंड आयुष्य लाभो...अजुन तुम्हाला पुढील पिढीतील साहित्त्यिक घडवायचे आहेत. शिवशंकराचे आशिर्वाद आपल्याला आहेतच...माझ्या आपणास पंचाहत्तरीनिमित्त अनंत शुभेच्छा!

11 comments:

  1. "पण मराठीची अविश्रांत एवढी साहित्यसेवा करुनही त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळु शकले नाहीत. सारडांना त्याची खंत नाही हे मला माहित आहे, पण मला निश्चित खंत आहे. मराठी माणुस किती कृपण आणि कृतघ्न असतो हे मी या प्रकरणी पाहिले...अनुभवले. "एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवायचे काय?" याच मुद्द्यावर सारडांची योग्यता अन्य कोणाही साहित्य-समिक्षकापेक्षा मोठी असतांनाही पराभव करण्यात आला. हे मराठीचे व मराठी माणसाचे दुर्भाग्यच आहे."

    एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवायचे काय? हि मराठी माणसांची साजीश नाही रे गाढवा. सध्या तू ज्यांच्या सोबत उठ्तोस-बसतोस त्या भट बामणांची साजीश आहे. उगाच बामनांना वाचविण्याच्या नादात मराठी माणसांना बदनाम करू नकोस.शंकर सारडा यांना अध्यक्ष करण्यासाठी कधी तू उपोषणाला बसल्याचे आठवत नाही रे? हीच साजीश तुझ्या बामन बापांनी आंबेडकरी विचारवंत गंगाधर पानतावणे यांच्या सोबतही केली होती आणि एका भटाने तर त्यांना दलितांना साहित्य क्षेत्रात आणखी प्रवेश नाही म्हणून २ रु. ची मनी ओर्डर पाठविली होती. म्हणजे आंबेडकरी समाजातील विचार वन्तांची किंमत बामणांच्या najaret फक्त २ रुपये? हा या समाजाचा अपमान नाही रे? गाढवा? तेव्हा तू कुठे लपून बसला होतास? साहित्य क्षेत्रात फक्त बमानांचे वर्चस्व आहे.तेव्हा सर्व मराठी माणसांवर असला घाणेरडा आरोप करू नकोस.......

    ReplyDelete
  2. अरे मुर्खा शिवालिका, त्या शिवाजीला कांही लोक खालच्या थराला जाऊन बदनाम करत आहेत, पण त्यांच्या विरोधात तू कांहीच बोलत नाहीस. एवढा कसा गांडू तू? तुम्ही लोक भित्रट असता हे यावरून सिद्ध होते. बामनानी शिवाजी म्हंटले तर त्यांच्या मागे लागणार तू, आणि तुमच्या त्या नवबापांनी शिवाजीला शिवी दिली तरी तोंडात goooooooooooo धरून बसणार ही तुमची औकात.

    ReplyDelete
    Replies
    1. "एवढा कसा गांडू तू? तुम्ही लोक भित्रट असता हे यावरून सिद्ध होते. "
      अरे बिनबापाच्या औलादीच्या मी माझ्या नावानिशी कमेंट पोस्ट करत असतो. तू जर खरच तुझ्या बापाचा असशील तर तुझे नाव लिही न गाढवा. स्वताचे नाव लपवतोस आणि मला गांडू म्हणतोस? आणि हो तुझ्या आईला जर तुझ्या बापाचे नाव माहित नसेल तर खुशाल त्या वाघ्याचे नाव लाव बाप म्हणून. गांडू कुठला....

      Delete
    2. अरे फोकलीच्या, मी किमान स्पष्टपणे नाव तरी सांगत नाहीये. माझी भूमिका स्पष्ट तरी आहे. तू मात्र शिखंडीसारखा शिवालिक वर्मा या नावाचा उपयोग करतो आहेस. बोगस नावाने खोटेपणा तर तू करतोच आहेस. पण तुझ्या बाष्कळ बडबडीला गटारातलं डुक्कर पण भीक घालणार नाही. शिवालिक वर्मा या नावाचा एक तरी मनुष्य या पूर्थ्वीतलावर तू दाखव. जाहीरपणे ये की समोर. का तुझे खरे नाव जाहीर होण्याची वाट बघतो आहेस? तुझे खरे नाव जाहीर केले ना तर पळता भुई थोडी होईल बरे. तेव्हा शब्द वापरताना जपून वापर. बौद्धीक वाद केलास तर सहर्ष स्वागत आहे.बिनबुडाचे व अर्थहीन वैयक्तीक पातळीवरचे आरोप करत बसलास नाहितर तुला समजेल अशा भाषेत बोलायला आम्ही हजारो आहोत एवढे मात्र समजून घे. तुझ्यासारख्या खोट्या आयडीने कापालिक वर्मा असा मी पण प्रतिसाद देऊ शकतो. याचा अर्थ तुझ्या लगेच लक्षात यावा. :)

      Delete
    3. "अरे फोकलीच्या" ही तुझा तारणहार सोनवनीने तुला शिकवलेली भाषा. तुझा दुसरा तारनहार तिकडे मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून झगडत असताना तू मात्र माय मराठीचे असे धिंडवडे काढत आहेस.गाढव लेकाचा.
      "...पण तुझ्या बाष्कळ बडबडीला गटारातलं डुक्कर पण भीक घालणार नाही." असे म्हणतोस आणि माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेला तुझ्या बापाच्या अगोदर उत्तर देतोस मग तू तर गटारीतील डुक्करापेक्षाही गेलेला दिसतोस आणि तुझा जन्म गटारीतलाच आहे हे तू पूर्वीच्या कमेंट मध्ये तुझ्या आवडत्या खाऊचे नाव घेऊन सिद्धच केले आहे. आणि हो तुमच्या सारख्या गटार डूकरांशी बौद्धिक वाद कसला रे घालायचा? g ********** खाऊन तुझी अक्कल गेलीय त्या वाघ्याकडे. नालायक बापाचा कुठला बोलायची आक्कल नाही म्हणे बौद्धीक वाद घाल. बौद्धीक वाद घालने म्हणजे काय गटारात लोळणे वाटले होय रे डुकरा?

      Delete
    4. @शिवालिक वर्मा - [हि मराठी माणसांची साजीश नाही रे गाढवा. सध्या तू ज्यांच्या सोबत उठ्तोस-बसतोस त्या भट बामणांची साजीश आहे.]
      आणि ह्या गोष्टीला पुरावा लागत नाही की संदर्भ लागत नाही, शिवालिक, पुर्ष्या, वामन्या, आणि इतर अनेक बी-ग्रेडी म्हणाले, की ते खरे.आणि त्यांनी चार चारदा बोंबलून सांगितले की नक्कीच खरे. आणि मग शिक्षा म्हणून ब्राम्हण समाजाच्या हत्या करणे हे पण योग्य असे तुला वाटते ना, शिवालिक? अरे जर ब्राम्हण ३% असून आणि तुम्ही ४०% मराठे गेली ७० वर्षे सत्तेत असून अजून सुद्धा जर तुम्हाला बामानांच्या नावाने बोम्बलावे लागत असेल, अजूनही तुम्हाला माळी, साळी आणि शिम्प्यांना (ओबीसी) मिळालेल्या आरक्षणामुळे तुमच्या समाजाच्या भविष्याची काळजी वाटत असेल, तर मराठा समाज का रचनेनुसार कमकुवत आणि दुबळा ठरतो. उगाच शिवराळ भाषा आणि कमरेखालचे डायलॉग मारून स्वतःचे बी-ग्रेड्यांमध्ये वजन वाढवू नकोस. तिथे खेडेकर, सैय्या पाटील, मेश्राम, गायकवाड, जोकर कोकाटे असले नग आधीच जागा अडवून बसले आहेत. तुझा चान्स यायला तुला ह्या हराम्यान्पेक्षा वरच्या दर्जाची धमकी द्यावी लागेल. बघ तुला जमतेय का ते?

      कोहम

      Delete
  3. Forever the gutters will shriek
    To obtain guttural drink
    They will fight and fight to prove
    Their brutal instinct....


    They will throw mud on the mountains
    To get it back as a great swallow
    None knows how they have become shallow...
    And how shall they when heinous marsh they follow...

    ReplyDelete
    Replies
    1. Listen Mr.Sonawani, we are not fighting to prove our brutal instinct but we are fighting in the respect of our true leaders.

      And anyone from us at any time do not thrown the mud on anybody but see at your followers.They are using the abusive language about us. For example-

      ....तरी तोंडात goooooooooooo धरून बसणार ही तुमची औकात.

      So Please Mr.Sonawani write such nonsense poems for your nonsense followers. really they need it.

      and at last but not the least YUO SHOULD REMEMBER THAT

      I HATE FOOLISH PEOPLES LIKE YOU....BECAUSE YOU ARE A QUACK.

      Delete
    2. वर्मा नावाच्या या माणसाला मराठी छान कळते बुवा.

      Delete
  4. आदरणीय संजय सर... आपण शंकर सारडांचे जे अभिष्टचिंतन केले आहे ते अगदी कौतुकास्पद आहे.
    हिर्‍यात मूळचे तेज असतेच व ते लोकांच्या दृष्टीसही येते. पण येथेच त्या हिर्‍याला अगदी काटेकोर पैलू पाडणार्‍या कारागिराचे महत्त्व लक्षात येते. सर्वच हिर्‍यांच्या भाग्यात कोहीनूर होणे येत नाही. तद्वतच, शंकर सारडांचे संपूर्ण आयुष्य झगमगलेले दिसते आहे. तुमच्या लेखामुळे आज जे कळाले याआधी मला अजिबात माहिती नव्हते. पडद्याआडचा सूत्रधार - त्यापेक्षा लेखकरुपी हिर्‍यांना योग्य ते पैलू पाडणारा उच्च दर्जाचा एक कारागीरच मराठी साहित्य विश्वाला लाभला आहे, असेच म्हणावे लागेल. शंकर सारडांची ही अत्भुत ओळख करुन दिल्याबद्द आपला अत्यंत आभारी आहे. त्यांनी केलेली 'निष्पर्ण वृक्षावर भरदुपारी' ची समीक्षा मी वाचलेली आहे. त्यातून त्यांच्यातील विद्वत्तेचे यथायोग्य दर्शन घडते

    मराठी साहित्याची एका निष्ठेने , व्यावसायिकतेने आणि दर्जेदार पद्धतीने सेवा करणार्‍या श्री. शंकर सारडा यांना अधिकाधिक उदंड आयुष्य लाभो व अजून मोलाचे साहित्यिक मराठी साहित्य विश्वाला मिळोत ही परमेश्वरा चरणी प्रार्थना. शंकर सारडांना पंच्याहत्तरीच्या माझ्याकडूनही हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
    Replies
    1. मराठी साहित्याची एका निष्ठेने,व्यावसायिकतेने आणि दर्जेदार पद्धतीने सेवा करणारे श्री. शंकर सारडा" असूनही " तुमच्या लेखामुळे आज जे कळाले याआधी मला अजिबात माहिती नव्हते." असे का बरे?
      श्री. शंकर सारडा हे मराठी साहित्याची एका निष्ठेने ,व्यावसायिकतेने आणि दर्जेदार पद्धतीने सेवा करणारे असूनही " "एका मारवाड्याला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनवायचे काय?" याच मुद्द्यावर सारडांची योग्यता अन्य कोणाही साहित्य-समिक्षकापेक्षा मोठी असतांनाही पराभव करण्यात आला.श्री.शंकर सारडा यांचा असा पराभव करणारे कोण? " की अन्य जाती मधील लोकांची योग्यता असूनही ते केवळ ब्राह्मण नसल्यामुळे त्यांची योग्यता नाकारल्या जाते?
      "लेखकरुपी हिर्‍यांना योग्य ते पैलू पाडणारा उच्च दर्जाचा एक कारागीरच मराठी साहित्य विश्वाला लाभला आहे" असे असूनही शंकर सरडा कायम पडद्यामगे का राहिले? की त्यांना तसे ठेवल्या गेले?
      सर्वच हिर्‍यांच्या भाग्यात कोहीनूर होणे येत नाही कारण कोहिनूर होण्याचे भाग्य फक्त ब्राह्मणांनाच लाभते काय?
      शंकर सारडा यांना केवळ त्यांच्या जातीवरून पराभूत करणाऱ्या क्षुद्र लोकांचा शोध घेऊन त्यांना मराठीच्या साहित्य प्रांतातून हद्दपार केले पाहिजे तरच शंकर सारडा यांचे खरे कार्य झगमगून निघेल आणि तिचा त्यांच्या पंच्याहत्तरीची भेट ही ठरेल.
      पण हे महत्कार्य सोनवणी करेल काय?

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...