Wednesday, October 3, 2012

जातिसंस्थेचा उगम कसा झाला? (2)


वर्ण आणि जातिव्यवस्था या सर्वस्वी वेगळ्या बाबी असून त्यांचा परस्परसंबंध नाही हे आपण मागील प्रकरणात पाहिले. प्रत्यक्षात मात्र समाजशास्त्रज्ञांनी वर्ण व जातिव्यवस्थेला एकत्रीत गृहित धरल्याचे दिसते. त्यामुळे जातिसंस्थेच्या उदयामागील कारणांचा नीटसा बोध होवू शकलेला नाही. येथे आपण सर्वप्रथम समाजशास्त्रज्ञांनी जातीची काय लक्षणे सांगितली आहेत हे पाहुयात.

१. अमरकोशात दिलेले जातीचे लक्षण आहे ते असे:
जातिर्जातं च सामान्यं व्यक्तिस्तु पृथुगात्मता I

याचा अर्थ असा कि जाती हा वर्गवाचक शब्द असून या वर्गातील प्रत्येक घटकाला व्यक्ति म्हनतात. आचारांच्या पृथुगात्मतेमुळे जे गट पडले आहेत त्यांना जाती ही संज्ञा दिलेली आहे.

२. सेनार्टच्या मते जात ही स्वयंपुर्ण संस्था असून तिचा एक पुढारी व एक सभा असते. जातित्व हे स्वेच्छेने प्राप्त होत नसून ते पुर्णपणे आनुवंशिक असते. एका जातीतील लोक साधारणपणे एकच धंदा करत असतात. रोटीबेटी व्यवहार, खाद्यपेयादी बाबी व शुद्धाशुद्धता याबाबतचे रुढ नियम पाळतात. जातीतील सामाजिक अपराध्यांना बहिष्कृत करणे इ. शिक्षा जातीलाच असतो.

ही वर्णनात्मक व्याख्या आहे हे उघड आहे.

३. डा. इरावती कर्वे यांच्या व्याख्येनुसार जातीची वैशिष्ट्ये म्हणजे विवाह फक्त जातेच्या आतच होतो. तिचा विस्तार बहुदा एका मर्यादित भागात व बहुदा एकभाषिक प्रदेशात असतो. जातीला पारंपारिक एक अथवा अधिक धंदे असतात.तिचे इतर जातींच्या अनुषंगाने उच्च अथवा नीच असे कमीअधिक स्थान असते.  ज्या कुटुंबांत विवाहसंबंध होवू शकतो अशा कुटुंबसमुहालाच जात ही संज्ञा प्राप्त होत असल्याने, विस्तारलेला नातेवाईकांचा गट म्हणजे जात होय! जाती आणि जमातींत आश्चर्यकारक साम्य असून पंचायत व्यवस्था, मर्यादित भुभाग ई. साम्ये दोहोंत आहेत. त्यामुळे जाती या प्राचीन जमातींपासुन बनलेल्या आहेत.

जाती वर्णव्यवस्थेप्रमाने ईश्वरनिर्मित नाहीत हे मी आधीच्या भागात स्पष्ट केले आहेच. पुराव्यार्थ वसिष्ठसंहितेत (३.१) म्हटले आहे कि, "देशधर्म, जातिधर्म व कुलधर्म यांना श्रुतींचा आधार नसल्याने मनूने ते स्वत:च्या चिंतनातुन सांगितले आहेत.  थोडक्यात जातीव्यवस्थेला मुळात धर्मसत्तेचा आधार नाही. एवतेव जातीव्यवस्था धर्माच्या पायावर टिकत नाही.

आता मी तत्पुर्वी दिलेल्या जातींच्या व्याख्यांकडे वळुयात.

जात ही आचारांच्या पृथुगात्मतेमुळे बनते असे अमरकोश म्हणतो. येथे त्याला आचार म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट नाही. आचारभेद ही मुळात कालसापेक्ष संकल्पना आहे. कालौघात समाजाचे आचारव्यूह बदलत असतात. काही नवीन निषिद्ध्ये निर्माण होत असतात तर कालची निषिद्ध्ये आज षिद्धांमद्धे मोडु लागतात. एका समाजाचे आचार निकट सन्निध्यामुळे, राजकीय/आर्थिक प्रभावांमुळे नकळत अन्य समाजघटकही स्वीकारत जात असतात. हे परस्पराभिसरण पिढ्यानुपिढ्या सुरु असते. वन्य आदिवासी जमाती व भटक्या जमाती फारतर आपले आचार दिर्घकाळ टिकवू शकतात असे म्हनता येईल...पण त्यांतही कधीतरी, सावकाश का होईना, बदल होतच असतो. त्यामुळे आचारांतील विभेदामुळे जाती बनल्या या मताला अर्थ रहात नाही.

सेनार्टची व्याख्या ही वर्णनात्मक व्याख्या आहे. जात ही स्वयंपुर्ण संस्था असते हे खरे आहे, पण ती मुळात निर्माण का झाली याचे उत्तर सेनार्टने शोधण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. जातीची स्वतंत्र पंचायत नेमकी का असते, राजसंस्थाही जातीअंतर्गत मामल्यांत जातपंचायत अथवा गोतसभेने दिलेल्या निर्णयांत ढवळाढवळ का करत नसे याचेही उत्तर सेनार्ट देत नाही. ही त्याने त्याच्या वर्तमानातील निरिक्षणावर आधारित बनवलेली ती व्याख्या आहे, पण ती प्रस्तूत चर्चेसाठी आपल्या कामी येत नाही.

डा. इरावती कर्वेंनीही तशे वर्णनात्मकच व्याख्या केली आहे. विवाह फक्त जातीअंतर्गत होणे हे एक जातीचे वैशिष्ट्य आहे हे खरेच आहे. जातीला पारंपारिक धंदे असतात हेही खरे आहे. पण त्यातुन जात-वास्तव आपल्याला समजते. पण ड. कर्वेंनी शेवटी केलेले विधान व ते म्हणजे कुटुंबसमुहांची, नात्यांची एकुण गोळाबेरीज म्हणजे जात...हे त्यांचे निरिक्षण अत्यंत महत्वाचे आहे. पण त्याच वेळीस प्राचीनतम जमातींपासुनच जाती बनल्या हे त्यांचे विधान खोडुन काढणे भाग आहे.

खरे तर हे विधानच भोंगळ आहे. प्राचीन काळी सर्वच मानवी समाज हा विविध टोळ्यांत विखुरलेला होता. त्यांना आपण आज जमात म्हनतो. प्रत्येक जमातीची एक स्वतंत्र जात बनली असे या विधानावरुन गृहित धरले तर मग प्रत्येक जातीत एकच जमातीचा समावेश अपरिहार्य असल्याने एकच जातीत श्रेष्ठ-कनिष्ठत्वाच्या उतरंडी कशा निर्माण झाल्या याचे उत्तर मिळत नाही. एकच जमात एकच व्यवसाय घेवून देशभर विखुरली असेही मत मान्य करता येत नाही. अहिर जमातीचे उदाहरण मी आधीच्या भागात दिले आहेच. एकाच जमातीचे विविध जातींत विभाजन झाले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एकाच जातीत अनेक मानववंश गट असल्याचे आपण पाहु शकतो. उदाहरनार्थ धनगर, वंजारी, ब्राह्मण, गवळी, सोनार, कोष्टी इइइइइ. त्यामुळे जमातींची जात बनलेली नाही असे स्पष्ट म्हनता येते.

जमातींपासुन जाती बनल्या असेही डा. कर्वेंचे म्हणने आहे असे गृहित धरले तर त्यांच्या विधानातील फोलपणा लगेच लक्षात येतो. मुळात भारतीय मानवी समाज हा पुरातन काली अगणित जमातींतच विखुरला होता हे म्हटल्यानंतर जाती बनायला विविध जमातींतीलच लोक येणार हे उघड आहे. जाती बनवायला माणसे कोठुन आणनार...आणि आणली तर मग जमातींचे काय होणार?

आपण येथेवर जातीव्यवस्थेबद्दलची महत्वपुर्ण विद्वानांची मते पाहिली.

या सर्वांनी गृहित धरलेय कि जणु काही या सर्व हजारो जाती मुळापासुनच होत्या! जात म्हणजे पारंपारिक आचारविशेषांचे उल्लंघन न करनारे सामाजिक गट म्हणजे जात! हे अत्यंत गंभीर असे चुकीचे गृहितक घेतल्याने मुळ प्रश्नाचे उत्तर मिळणे अशक्यप्राय असेच होते आणि तसे ते झालेही. आज ज्या जाती आहेत त्या सर्वच अवघ्या एक हजार वर्षांपुर्वीही अस्तित्वात नव्हत्या. दोन हजार वर्षांपुर्वी त्या अजुन सीमित होत्या. त्याच्याही मागे गेलो आपण तर लक्षात येईल कि जातींची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल एवढीच होती. फारतर प्रादेशिक भाषाभेदामुळे नांवे वेगळी पडली असतील.

दुसरे असे कि जातपंचायत ही संस्था अत्यंत उत्तर-काळातील आहे. पुरातन काळी समाजपंचायत भरत असे. जातीनिहाय पंचायती अस्तित्वातच नव्हत्या. याचे कारण म्हणजे भारत हा पुरातन काळी गणराज्यव्यवस्था पाळत होता. नंतर समांतर काळी राजसम्स्था आली तरी तिचा परिघ मर्यादित प्रदेशापुरताच असे. मुळात ही गणराज्ये असोत कि राज्ये, ही विशिष्ट टोळ्यांचीच बनलेली असत. आणि त्या टोळीराज्यांतही जाती होत्याच हे आपण बौद्ध साहित्यातुन व्यापकपणे पाहु शकतो. या सर्वांचे निवाडे जातीपंचायती नव्हेत तर गणसभा वा राजसभा करत असे. ते तेंव्हा सहज शक्यही असे कारण राज्याचा मर्यादित भुगोल व जनसंख्या.

त्यामुळे आपल्याला जातिसंस्थेच्या उदयाची कारणे, काळ आणि त्यांत नंतर आलेली स्थितीस्थापकता यावर स्वतंत्रपणे विचार करायला हवा. पुढील प्रकरनात आपण मी आधीच्या भागात उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चा करुयात!


(To read previous part pls click here- http://sanjaysonawani.blogspot.in/2012/10/blog-post.html

10 comments:

  1. पुरातन काल असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हां आपण चार-पाच हजार वर्षांपेक्षा मागे जाऊ शकत नाही. मुख्यत: ख्रिस्ती / इस्लाम यांनी त्यांच्या स्थापनेपर्यंतच्या इतिहासाला नाहीसे करून टाकल्यामुळे ख्रिस्तपूर्वीची चार हजार वर्षे (तेही Constantine ने ख्रिश्चनिटीची जुळणी करताना Base population ला पूज्य असलेले Torah हे Old Testament म्हणून बायबलमध्ये घेतले म्हणून, नाहीतर तो चार हजार वर्षांचा काळही नाहीसा झाला असता) युरोपियन विद्वान मोझेस, डेव्हिडच्या आधीचा काळ गृहीतच धरत नाहीत. (मोझेसचा काळही नीटसा माहिती नाही. पण त्याच्या आयुष्यकाळात पिरामिडचे बांधकाम चालू असल्याचे उल्लेख आहेत - त्यामुळे त्याकाळी मानवी प्रगतीचा एक मोठा टप्पा गाठलेला होता या कडे दुर्लक्ष करून Civilisation ची सुरुवात त्यानंतर झाली असे हे गृहीत किती शहाणपणाचे आहे हे उघड आहे) बहुतेक भारतीय विद्वान युरोपियन वाटेवरून चालणारे असल्यामुळे तीच Time Frame धरून चालतात - आणि परस्परविरोधी आणि गोंधळाचे निष्कर्ष काढतात. त्यातून स्वत:च्या सामाजिक / राजकीय सोयी - पूर्वग्रह, आवडीनिवडी, बालपणापासून झालेले Psychological conditioning (पुरोगामित्व - भारतीय संस्कृतीबद्दल एकांगी Contempt) - यामुळे संशोधन किती आणि आपल्या आवडीचे मत मांडणे किती हा गोंधळ निर्माण होतो. बऱ्याच वेळा सुतावरून स्वर्ग गाठला जातो. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे मानवी संस्कृती निर्मितीनंतर आताच प्रथम प्रगतीपर्यंत आली आहे असे धरून बरेच निष्कर्ष काढले जातात. जगात अनेक गोष्टी अशा आहेत, की civilisation चा हा गेल्या पाच हजार वर्षांतील एकरेषीय विकास गृहीत धरणे अशक्य व्हावे. बाकी काहीही नाही - केवळ एवढी गोष्ट लक्षात घ्या की भारतात दृष्टीला न दिसणाऱ्या ग्रहांच्या - कक्षांच्या प्रत्येक सेकंदाचे बिनचूक गणित हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पृथ्वी गोल असणे - अवकाशाचे अनंतत्व या गोष्टी कधी माहिती झाल्या हे आपल्याला माहिती नाही. आणि इथे आपण आपल्या समोर असलेले इतिहासाचे hopelessly scattered तुकडे पाहून आपल्या आवडीचे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत आहोत. पुरुषसूक्त हे पूर्णत: आध्यात्मिक philosophy सांगणारे सूत्र आहे, in all probability त्याचा आजच्या - गेल्या दोन-चार हजार वर्षांच्या सामाजिक परिस्थितीशी कसलाही संबंध नसणे शक्य आहे. त्याचा आपण आपल्या preference प्रमाणे अर्थ लावत आहोत. मला वाटते - की या शोधाचे पायाभूत गृहीतक बदलण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. मिळाले तर Richard Mooney चे Colony Earth वाचा, जगात प्रस्थापित विद्वानांनी त्याला अनुल्लेखाने मारले आहे, त्याला बिचाऱ्यालाही माहिती नसेल की आपण ज्या शक्यतेबद्दल दीर्घ hypothesis मांडतो आहोत, अगदी तशाच प्रकारची memory-based codified body of knowledge भारतात अस्तित्वात आहे, पाठांतराने अनेक पिढ्या त्याला काहीतरी अध्यात्मिक कर्तव्य समजून पुढे देत आल्या आहेत - पूर्ण अर्थ समजण्यापूर्वीच ते आता लुप्त होत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. very good reply, you could elaborate it. Even, I guess It will lead us to conclude that Vedas are infinite...everything is there in HInduism...but we did not recognize that or study that.

      Delete
  2. श्री.जोशी यांचे अभिमंदन .त्यांचे उत्तर अतिशय वाचनीय आहे समर्पक आहे
    आणि सभ्य -अभ्यासपूर्ण आहे.

    ReplyDelete
  3. संजय,
    विषय चांगला निवडला आहे.
    सोनवणी हे नेहमी पुरोहित वर्ग आणि ब्राह्मण जात याचा घोटाळा करतात तसेच पुरुष सूक्ताचा आणि सद्य सामाजिक रचनेचा काहीही संबंध नाही
    अमरकोश आचाराच्या बाबत जे भाष्य करतो ते ठीकच आहे .जात ही कालसापेक्ष कल्पना आहे असे मान्य केले तरी त्यामुळे हातातले पाळी पंचपात्र बाजूला ठेऊन
    तलवार हातात घेणाऱ्या पहिल्या बाजीरावास जनतेने वा छ.शाहू महाराजांनी क्षत्रीय म्हटले नाही .
    आजचा ब्राह्मण मांस भक्षण करतो.पण त्याचा धर्म वा जात बुडत नाही .ब्राह्मणाचे आचार बदलले आहेत.अस्पृश्यांचे विचार बदलले आहेत.
    आज त्यांनी देशाची घटना लिहिली.
    जेजे कुणी मते मांडतात , ते ते त्या त्या काळाबद्दल एक संशोधन म्हणून लिहित असतात.
    मग तो अमरकोश असो वा डॉ.इरावती कर्वे असोत.
    २ पिढ्यान्मागे विधवा स्त्रीला केशवपन अत्यावश्यक व अनिवार्य धरले जात असे.
    आज तशीच परिस्थिती आपल्या शेजारच्या घरी वा मित्राकडे उद्भवली आणि आपण धर्माचा आधार घेऊन आज केश वपना चा सल्ला देऊ लागलो तर
    आपल्यावर मार खायची पाळी येईल - नाही का ? धार्मिक नियम वा सामाजिक रूढी या कालसापेक्ष बदलतात .राज्यकर्ता बदलला की नियम बदल वेगाने होतो.
    खोजे ही जात मुसलमान सत्ताधीशांची गरज होती.त्यांच्या स्त्रियांच्या तथाकथित अस्सलपणाशी त्याचा संबंध आहे.रामायणात व महाभारतात
    खोजे सापडणार नाहीत - बृहन्नडा नक्की सापडेल.
    एकाच जातीत उपजाती या श्रम विभागणी मुळे झाल्या असाव्यात एखादे उत्पादन,त्यातली ठराविक प्रक्रियेतील जटिलता आणि कुशलता यामुळे -उपजाती झाल्या असाव्यात .
    जाती संस्थेला आव्हान देणारा प्रकार घडला -जातीबाह्य विवाह झाला किंवा एखाद्या स्त्रीवर दुसऱ्या बलाढ्य जातीतील पुरुषाकडून अत्याचार झाला , तर नवीन उपजात निर्माण होत असेल.आणि त्यात त्या वंशाची सोय लावली जात असेल.
    त्यांना जगू दिले जात असेल , पण त्यांना मारून टाकले जात नसे हे पण लक्षात घेतले पाहिजे.
    डॉ.इरावती कर्वे यांनी केलेली व्याख्या जास्त समर्पक आहे .एखादा विचार सामान्य माणसाला समजायला सोपा व्हावा म्हणून तशी केलेली आहे.
    एखाद्या ची लिहिण्याची पद्धत क्लिष्ट असते.अवघड , जड वा क्लिष्ट लिहिणे सोपे आहे.पण बाळबोध पणे लिहून अवघड विषय सोपा करून लिहिणे
    फार कठीण ,म,गांधी तसे लिहित.तोच आदर्श डॉ.इरावती कर्वे यांनी ठेवला असेल.

    ReplyDelete
  4. सगळ्याच जाती एकप्रकारे बनल्या नसाव्यात. सोनवणी यांनी महारांबद्दल लिहिलेला एक लेख वाचला होता. मग ते अस्पृश्य कधी झाले ? मुस्लीम आक्रमण हे संपत्ती, स्त्रिया मिळवण्यासाठी आणि धर्म प्रसार करून "गाझी" बनण्यासाठी झाले. त्या काळात "धर्म बदला किंवा संडास सफाई / भंगीकाम पत्करा" अशा जबरदस्तीमुळे आपल्या पूर्वजांनी हे काम पत्करले आणि जात अस्पृश्य झाली असे काही जातींचे लोक सांगतात.

    ReplyDelete
  5. संजय,
    वेळात वेळ काढून दो.इरावती कर्वे यांचे " संस्कृती "( देशमुख आणि कंपनी ) .
    हे पुस्तक आणि त्यातील आठवा लेख धर्म हा अवश्य वाचावा.( साधना प्रकाशन ) येथे ते विकत मिळेल असे वाटते.
    तसेच श्री.नरहर कुरुंदकरांनी लिहिलेले त्यातील अंतिम प्रकरण " प्रस्ताव " पण वाचावे.
    "ज्या कुळात आपले लग्न होऊ शकत नाही (कारण त्या कुळात आपला जन्म झाला आहे,)ती भावकी ,आणि ज्या कुळाशी आपले लग्न होऊ शकते
    ते सोयरे,इतका मिळूनच सर्व जाती व्यवस्थेचा परीघ मर्यादित झाला आहे.. . . पान १५४ -कुंभार जात -१५५.१५६- १५७ पाने तर अप्रतिम आहेत..
    आपण हे वाचले असणारच .कारण त्याचेच प्रतिबिंब आपल्या लेखात दिसते.जर या पुस्तकाचा आपण संदर्भ ग्रंथ म्हणून खरोखर वापर केला असेल तर तसा उल्लेख करत गेलात तर जास्त चांगले होईल. मला तसे वाटते आहे म्हणून लिहिले इतकेच.
    आपले लिखाण हे मूलगामी आणि उत्स्फूर्त आहे असा जर कुणाचा गैर समज होत असेल तर तो आपणच दूर करणे तुमचे कर्तव्य आहे.
    तसेच आपल्या बद्दल जे कुणी असे गैर- वैयक्तिक गरळ ओकतात कि सोनवणी जे लिहितात ते करमणूक करणारे असते , ते तेव्हढे सिरीयस घेऊ नये - त्यांची तोंडेपण बंद होतील.कारण आपण असा संदर्भ ग्रंथांचा उल्लेख करत गेलात आणि आपले मत -दुजोरा देणारे वा विरोधी-कसेही असले तरी, त्या लेखाला जास्त वजन येईल असे नम्रपणे म्हणावेसे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. दत्ताजी, मी अवश्य तुम्ही उल्लेख केलेले ग्रंथ वाचलेले आहेत...किंबहुना त्याहीपेक्षा अधिक. माझे त्यांच्याशी, अगदी बाबासाहेब आंबेडकरांशीही एकमत होवू शकलेले नाही. मला असे वाटते कि जाती संस्था निर्मितीबाबतचे रहस्य मलही उलगदता येईल असा माझा दावा नाही. किंबहुना मी हे नवे विधान मांडतो आहे एवढेच माझे म्हनने आहे. आता माझा ब्लोग हास्यास्पद कि अहास्यास्पद हे मी कसे ठरवणार आणि तसा आग्रह कोणाजवळ धरणार? मुळात तो धरलेलाच नाही, त्यामुळे माझे लेखन मुलगामी आहे कि नाही हे मी तरी सांगु शकत नाही. उत्स्फुर्ततेबद्दल म्हणाल, तर होय, उत्स्फुर्ततेशिवाय आपण आपल्या मुळांना हात घालायचे सहसा धैर्य करत नाही. पुर्वसुरींनी शोधलेली उत्तरे अंतिम मानण्याची चुक मी तरी करत नाही...भले माझेही उत्र्तर चुकीचे असेल...पण यातुनच कधी ना कधी...कोणी ना कोणी अंतिम उत्तर शोधेल यावर माझा गाढ विश्वास आहे!

      Delete
  6. I have some questions
    As per your interpretation, caste system is result of combining of two ancient religions/sects in India i.e. Shaiva and Vedic. Resulting in new religion that is called as Hindu. This process completed in second century.
    Interestingly spread of Hindu civilization in various countries like Indonesia, Malaysia, Thailand and Cambodia etc. started at the same time.
    What is the reason that these countries does not have any history of caste based society.
    There are many such countries in this (like the countries I have written above)who were Hindu by religion for more than 1400 years. People of these countries converted to different religions after 15 th century for various reasons. But none of these conversions were anything to do with social injustice. There are more than 18 million Hindus in Indonesia. They do not have occupation based castes, neither do they have any such history.
    Some countries like Thailand did not changed their law enforcement system after changing the religion. Dharmashatras (this includes various Smruti Grantha of Ancient India) remain the law enforcement books for them.
    Any explanation that is given for roots cause of caste system of Indian society does not fit in this case, What is the reason for that?
    Why historians does not consider these countries while explain social history and roots of caste system in India?

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. You have raised interesting points those need proper attention. I will certainly cover this discussion in next part.

      Delete
  7. Another interesting points
    Occupation based castes exists among Sinhalese people of Shrilanka. These people are Buddhist by religion for last 2200 years. But the history of castes in Shrilanka does not go beyond last 1000 years. It is just similar to India, where most of the castes existing now did not exist 1000 years back.
    As per social history of Bali (Indonesia) there were many social changes happened during Dutch rule (1908 to 1942). Before that Hindus of this island had Varna System. The social structure was said to be 'Fluid' or flexible. During the Dutch rule the system became rigid and 4 Varna became 4 castes. Social mobility, that was easy earlier, became difficult. The policies of new government that were responsible for it, and how social reformist of the land worked in order to deal with it, after they got independence is very interesting to read.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...