Tuesday, October 9, 2012

ज्यांना गुलामच व्हायचे आहे त्यांचे काय करनार?


भारतीय समाजाची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे पराभूत मानसिकता. भारतीय माणसाकडुन अपेक्षा तर खूप ठेवायच्या पण प्रत्यक्षात कोणी काही करत असेल तर त्याला नाके मुरडायची. भारतियाचे कोणतेही सिद्धांतन अथवा संशोधन उडवुनच लावायचे. अर्थात पाश्चात्यांनी त्यावर आपली मोहर उठवली तरच मग त्याला डोक्यावर घ्यायचे. लो. टिळकांचे गीतारहस्य हा मराठीतील आजवरचा जगाला आदर्शभुत होईल असा नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे याला आपलीच मान्यता नसते. गुलामगिरी हा म. फुलेंचा वैश्विक जाणीवा/वेदना प्रकट करनारा ग्रंथ विश्ववंद्य होण्याच्या योग्यतेचा आहे यावर आपलाच विश्वास नसतो. पहिली बाब म्हनजे आपल्या जानीवाच जातीय आहेत...आणि त्यातही पराभुत! आपणही वैश्विक ज्ञानात भर घालु शकतो याचे भान आपण हरपुन बसलोत. मग भारतीय वंशांचे विदेशी लोक काही करतात त्याबद्दल मात्र येथे भान हरपुन नाचत बसतो. ही आपली आत्मवंचना आहे याचे भान कधी येणार? साहित्य-संस्क्रुती, संशोधने, तत्वज्ञान अशा सृजनशील बाबींकडे तरी मोकळ्या दृष्टीकोनातुन पहावे कि नाही? पण जातीय दृष्टीकोनातुनच मूल्यमापन करायची, शक्यतो हेटाळायची आपली सवय या देशाचा एक दिवस विनाशच घडवणार याबाबत माझ्य मनात शंका नाही.

गुलाम केले म्हणुन लोक गुलाम होतात हा एक दुर्दैवी भाग झाला. पण ज्यांना गुलामच व्हायचे आहे त्यांचे काय करनार?  प्रस्थापित सिद्धांतांना आव्हाने दिल्याखेरीज नवनिर्मिती कालत्रयी होवू शकत नाही. व्यक्तिपुजक नेहमी गुलामच राहतात. पुढे जायचा प्रवास हा अडथळ्यांचाच असतो. पण एक वाट तरी बनते...नवीन ताज्या दमाचे सिद्धांतक महामार्ग बनवतात. शास्त्र-विचार-तत्वज्ञानाचा भवितव्याचा प्रवास हा असाच होत असतो. पढतमूर्ख गुलाम मात्र त्यांतील सर्वात मोठे अडथळे असतात. स्वत:च्याच कोशात अहंसिद्ध भावनांच्या जंजाळात सापडलेले मानवी प्रगतीला सर्वात मोठे अभिशाप असतात!

मला वाईट याचे वाटते कि माझ्या इंग्रजी पुस्तकांवर पाश्चात्यांनी चांगले म्हटले तेंव्हा कोठे येथील काही लोकांना त्या पुस्तकांना किमान बरे म्हनावेसे वाटले. येथील समाजाची विवेकबुद्धी आधी कोठे गेली होती?  माझ्या विश्वनिर्मितीच्या सिद्धांतावर कार्ल सागान सारख्या महान शास्त्रज्ञानेही टिप्पन्नी केली होती. पण येथे जयंत नारळीकरांना मात्र वाचुन पहायलाही वेळ नसतो...ते तसे लिहुन कळवतातही...येथे नोबेल विनर का होत नाहीत याचे उत्तर या दळभद्री मानसिकतेत आहे.

बदलता आले तर बघा. सिद्धांतांकडे निखळ सिद्धांत म्हणुन बघा आणि त्याचे निरपेक्ष मूल्यमापन करा. त्यातुनच् ज्ञान पुढे जावू शकते. आईन्स्टाईन यांना स्वत:चे अनेक सिद्धांत बाद ठरवावे लागले होते म्हणुन त्यांची योग्यता कोणीही कमी करु शकत नाही. शोधलेच नाही तर सापडेल कसे...किमान एवढा तरे विचार करायला हवा!

माझे आवाहन आहे...मूक्त मनाने आपल्या कल्पनांना मूक्त द्वार द्या...सिद्धांत बनवा...त्याला बळ देनारे होता होईल तेवढे पुरावे गोळा करा...मिळाले नाहीत पुरावे तर सिद्धांत बाद करा...पुढे जा....तुम्ही सोडुन दिलेल्या सिद्धांताचे पुरावे कोणालाही नंतर तरी मिळनार नाहीत असेही नाही.  सिद्धांत अगदीच वाया जातो असे नाही. एखादी सिद्धता होतच नाही हे समजणेही ज्ञानाचेच लक्षण आहे. काही बिघडत नाही. ज्ञानाचा आनंद यच्चयावत विश्वातील सर्वोच्च आनंद आहे!

26 comments:

  1. संजयजी मी तुमच्याशी एकदम सहमत आहे. अगदी मनातलं लिहिलंत. 'अतिपरिचयात अवज्ञा' हे तत्त्व आपल्या भारतीय मानसिकतेला अगदी तंतोतंत लागू होते. आपल्याला आपल्याच चांगल्या गोष्टीवरही ती चांगली आहे असा पश्चिमेचा शिक्का हवा असतो. ही मानसिकता उच्च शिक्षित लोकांमध्येही दिसून येते.

    ReplyDelete
  2. Replies
    1. Sure. There are copuple of articles on this blog also under the lable "Creation of the universe" Thanks. Will share more in near future.

      Delete
  3. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी कृष्णविवरांचा सिद्धांत १९३५ मध्ये मांडला तेव्हा त्या काळचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडींगटन यांनी त्यांची हुर्यो उडवली होती. पण दोन तीन दशकांत जेव्हा प्रत्यक्ष पुरावे हाती आले तेव्हा कोणालाच त्याबद्दल संशय उरला नाही.

    वैज्ञानिक सिद्धांताचे निरपेक्ष मूल्यमापन करण्यासाठी पुरावे उपलब्ध असावे लागतात. जोपर्यंत पुराव्यांचा भक्कम आधार सिद्धांताला मिळत नाही तोवर त्या सिद्धांतावर कोणी काय टिप्पणी केली याला फारसा अर्थ उरत नाही. खुद्द नारळीकर यांचा स्थिर स्थिती विश्वाचा सिद्धांत देखील पुरेसे पुरावे नसल्याने आजही वैज्ञानिक जगतात मान्य केला जात नाही. नोबेल पुरस्कार हा पश्चिमी जगात मिळतो. त्यामुळे नारळीकरांच्या दळभद्री मानसिकतेची चिंता करण्याची गरज नाही.

    त्याचप्रमाणे वैज्ञानिक सिद्धांताला सबळ गणितीय सूत्रांचा आधार असावा लागतो. नाहीतर तो सिद्धांत निव्वळ तत्वज्ञानाच्या पातळीवर मर्यादित राहतो. जोवर या दोन कसोट्या पूर्ण होत नाहीत तोवर कोणताही सिद्धांत वैज्ञानिक जगात स्वीकारला जाऊ शकत नाही.

    'It is a capital mistake to theorize before you have all the evidence. It biases the judgment.'

    Sherlock Holmes

    ReplyDelete
    Replies
    1. My friend, my objection is...at least one should check new thoughts or no thought can ever arise...I dont claim I was right...my allegation is it never was checked whether it was right or wrong. Thanks.

      Delete
  4. माझ्या विश्वनिर्मितीच्या सिद्धांतावर कार्ल सागान सारख्या महान शास्त्रज्ञानेही टिप्पन्नी केली होती. पण येथे जयंत नारळीकरांना मात्र वाचुन पहायलाही वेळ नसतो...ते तसे लिहुन कळवतातही...

    Mazya eka mitrane ganitatil kahi samikarnan baddal shanka upasthit keli hoti aani tyane ti Jayanta Naralikaranna E-Mail keli hoti. tywar detail spashtikaran aani tyach samikarnawar publish zalele kahi papers, Jayanta Naralikaranni pathawle.

    maza to mittra sadha tumchya....., sorry aamchya sarkha(tumhi asamanya aahat, nahi kaa?) samanya maanus aahe, konihi celebrity naahi aani Naralikaranchya parichyacha dekhil naahi. Uchchawarniya mhanal tar tasa dekhil naahi.

    aani tumchya sarkhya tejaswi wyaktimatwahca (ardhya halkunda kadun piwl tejswa gheun zalel wyaktimattwa tar naahi?)siddhnta wachayla tyanna wel naahi milala?

    tumch good (ka bad) will ne tar yat ghol ghatla nasel? Naralikaran sarkhya wyakti war bota ugarnya aadhi jara aatma parikshan kara. uchalli jibh aani laawli talyala asla prakar naka karu.

    aapla shubhchintak

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous...this is one example. I couriered him a docket and was returned to me by courier on very third day. On the cover letter in his own handwriting was written he has no time. I dont mind, anyway what differnce his opinion would make? MInd well, I have full respect about him and that is why I sent the paper to him. Even if he would have taken 2-3 years to respond, I would have wait...

      Again to tell you, I dont claim I am right in my proposed model of the Universe. No model so far is proven perfect, hence it would be always quest of the human being to reach to the conclusive model...and all models help each other in some or other way. Here there is no question of casteist view...the problem of the Indian mentality....to which I object!

      Delete
    2. Agreed, Sonavanijee. if you are true then you have right to criticize. I think I am your critic and I have criticized your artilces, some time called it biased. But the person send it back in three days saying no time...means....looks bad....but for him it may be one of the hundred mail...you never know....when you will be recognized in the world...everybody will recognize your work too.....all the best.

      Why dont you publish your discoveries in international journals so that you do not have to go to somebody.

      Delete
    3. As written above, Vikas ji, I had sent him the docket out of respect. Even if he couldnt respond for lack of time it was okay. Any way it was xerox and even if he wouldnt return it it wouldn't make any difference. Frankly, the thesis has been read widely by scientist community abroad and is discussed, book is already published. My point is entirely different. Dont go just on my personal experience/example, I have seen may budding thinkers/scientists of our country are demoralized by such behaviours...which I dislike. This is a great hurdle in our own scientific development. I have no complaint against anyone as I am self sufficient enough to make my way...it is not possible for others...always...Isn't it?

      Delete
  5. सोनवणी साहेब,
    तुम्ही जे पार्सल डॉ. जयंत नारळीकर यांना पाठविले होते, ते पुन्हा एकदा पाठवा. मात्र पाठविताना एक काळजी घ्या, पार्सलवर तुमचे नाव संजय सोनवणी असे न लिहिता संजय जोशी अथवा संजय कुलकर्णी असे लिहा. अथवा ‘जोशी-कुलकर्णी' प्रकारातील इतर कोणते तरी लिहा. पाहा काय परीणाम होतो ते. पार्सलची नुसती दखलच घेतली जाणार नाही, तर तुमचा शोध महान असल्याचा अभिप्रायदेखील तुम्हाला मिळेल. यापुढे कोणत्याही ‘नारळीकर' कॅटेगरीतील सदृश व्यक्तींशी संपर्क करताना एवढी एक काळजी आपण घ्यावी, अशी एक सूचना मी आपणास करू इच्छितो.

    ReplyDelete
    Replies
    1. त्यापेक्षा त्याच पार्सलमधून एक जानवे आणि थोडा शिधा पाठवून द्या व दक्षिणा मनीऑर्डर करा. मग तुम्ही महाराष्ट्रभूषण झालातच.

      Delete
    2. Plzzzzz, for God's sake. Have some oxygen.

      Delete
  6. Sanjayji tumache Waghyasathiche uposhan jatiy janivetun navhate kay?

    ReplyDelete
    Replies
    1. Abhijit...jateecha kay sambandh? Mi dhangar nahi. Mi jat manat nahi. Majhi jat konala mahit nahi ani mi sangatahi nahi.

      Majhe uposhan he dahashatavadala virodh karnyasathi hote. Itihaas japanyasathi hote.

      Delete
    2. Abhijit....satyachi janiv ani jatichi janiv yat antar thevun arop kar....True thing is true with of course enough proofs that all given by sonavani sir regarding "Waghya".

      Abhijit jat-dharma konta hi aso jya kharya goshthi ahet tya sathi pudhe ale pahije.Udya tumhala koni tumcha itihas badlayla lavel tar to badlaycha kaa?

      Kiti lokanni waghya ha shivaji maharajancha vishvasu kutra navata he siddha karun dakhavala?No one.





      Delete
    3. उपेक्षित बंडूOctober 10, 2012 at 9:50 AM

      बहुतेक नारळीकर सुद्धा ब्रिगेडला सामील झाले असावेत!
      बाकी सोनावणींना वाघ्याविषयीच्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळायला हरकत नाही! एकदा त्या संशोधनावर पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी टिप्पणी केली की मग इथेसुद्धा ते सर्वांनाच मान्य होईल.

      Delete
  7. लोकमान्य टिळकOctober 11, 2012 at 6:46 AM

    दोन पैशाची भांग खाल्ली की हव्या तितक्या कल्पना सुचतात.

    ReplyDelete
    Replies
    1. ANUBHAVACHE BOL AAHET TUZE...ASACH GARAL OKAT JAA...

      Delete
    2. @SHEEEVA
      कृपया आपले नाव SHIVYA असे ठेवल्यास ते समर्पक दिसेल.

      Delete
    3. शिवराळ भाषा वापरणे ही बहुजनांची संस्कृती नाही. सभ्यतेच्या मर्यादांचे पालन करणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे हे भान राखणे आवश्यक आहे. विषयाला सोडून प्रतिक्रिया देणाऱ्यांचे तर हसे होतेच पण त्यावर अजूनच मूर्खपणे आगपाखड करणाऱ्यांचेही हसेच होते. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम.

      Delete
  8. संजय,
    तुमच्या ब्लोग वर लिहिण्यात येणाऱ्या भावनांच्या आविष्काराबद्दल
    आपण खूप नजर ठेऊन एडिटिंग करावे असे सुचवावेसे वाटते.
    तुमचे लिखाण आमच्याकडे स्त्री भागिनीवर्ग सुद्धा वाचतो,
    पण असे शिव्या आणि भडक उल्लेख असलेले उत्तर वजा लिखाण आपण ताबडतोब रद्द करावे,
    कारण एका नासक्या आंब्याने सगळी अढी बिघडते.
    आणि सगळ्या विषयाचा विचका होतो.

    ReplyDelete
  9. संजयजी एक विनंती आहे की, प्रथम तुम्ही नवीन पिढी तसेच जागतिक स्तरावरच आपला प्रबंध,संशोधन मांडावेत.जुन्या प्रस्थापित संशोधकांना त्याचे महत्व वाटेलच असे नाही.जुन्यातले बरेचदा आपोआप आऊटडेटेड होते. तुम्हीपण प्रस्थापित पध्दतीनेच जुन्या लोकांकडे मान्यतेचा टॅग लावयाचा प्रयत्न करायचा नव्हताव योग्यही नाही. परंतू आम्हा सर्व वाचकांचा विद्यार्थ्यांचा आपणाकडून नवनवीन सिध्दांत विचार, विचारप्रक्रियेचे मार्गदर्शन अपेक्षित आहे. कालचक्र प्रवाही गतिमानच राहणार.प्रत्येक दिवस नवा,विचारांची नव्याने मांडणी आवश्यकच. आपला, अभय, वांद्रे,मुंबई

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...