Tuesday, December 11, 2012

जाती नष्टच करायच्या झाल्या तर...


१. हिंदू धर्मालाच जातीव्यवस्था मान्य नाही. जी गोष्ट धर्ममान्य नाही व जी अनैतीक आणि कालसुसंगत नाही तिचे पालन करणे हा अधर्म आहे. कोणताही धर्मग्रंथ जातिसंस्थेच्या निर्मितीबाबत विधान करत नाही अथवा समर्थन करत नाही. जाती पाळणे हे अधर्माचे लक्षण आहे. वैदिक धर्मियांची वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा काडीइतकाही संबंध नाही. वैदिक धर्म सर्वस्वी वेगळा आहे.

२. हिंदू धर्माला वर्णव्यवस्था मान्य नाही.  शैवप्रधान मुर्तीपुजक धर्माचा वैदिक धर्माशी काडीइतकाही संबंध नाही. ऋग्वेदातही वर्णव्यवस्था सांगणारे पुरुषसूक्त नंतर कोणीतरी घुसवले आहे हे सिद्ध झाले आहे. वेद अपौरुषेय आहेत ही एक भाकडकथा आहे. त्यात वारंवार बदल केले गेले आहेत. वेदमहात्म्य मानणारा मुळात हिंदू असूच शकत नाही हे समजावून घेणे आवश्यक आहे.

३. भारतातील बव्हंशी ब्राह्मण समाज वेदमान्यतेचे स्तोम गात असला तरी ते प्रत्यक्ष आचरणात वेदविरोधी...म्हणजे मूर्तीपूजकच असतात. आजच्या वैदिक ब्राह्मण समजणा-यांनी हे समजावून घेणे आवश्यक आहे. स्वत:च्या गैरसमजातून अकारण धर्म प्रदुषित करणा-यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.

४. कोणत्याही समाजात आधी निर्माणकर्ते येतात मग नंतर सेवा देणारे येतात. शेतकरी ते अन्य जीवनोपयोगी उत्पादने निर्माण करणारे आधी येतात तर सेवा देनारे----मग त्या प्रशासकीय, राजकीय, व्यापारी सेवा असोत वा धार्मिक, संरक्षणात्मक अथवा मनोरंजनात्मक सेवा देणारे असोत. हे सर्व एकाच मुळच्या समाजातून आलेले असतात. कोणीही आकाशातुन पडलेला नसतो. त्यामुळे सर्वांचे मूळ एकच आहे. कोणीही अधिकचा शुद्ध आणि कोणी अशुद्ध अशी मुळात वास्तविक परिस्थितीच नसल्याने जाती व त्यानुसारचे भेद हे अशास्त्रीय, असामाजिक आणि निंद्य आहेत.

५. भारतातील जाती म्हणजे आक्रमक आर्यांकडुन हरलेले समूह आहेत या भ्रमातुन प्रथम बाहेर या, कारण ते सत्य नाही. आर्य नांवाचा वंश जगात कधीही अस्तित्वात नव्हता व नाही. भारतीय समाजाला संपुर्ण पराजित करणे प्राचीन काळात एकाही आक्रमकाला कधीही शक्य झालेले नाही. त्यामुळे भारताला तथाकथित आक्रमक आर्यांनी गुलाम करुन जात व संस्कृती दिली असे जे म्हणतात ते प्रथम दर्जाचे देशद्रोही आणि समाजद्रोही खोटारडे आहेत असे पक्के समजून चाला आणि त्यांचा सतत निषेध करत रहा.

६. या देशातील प्रत्येक समाजघटकाचे संस्कृती रचण्यात, ती वाढवण्यात सारखेच मोलाचे योगदान आहे. कोणाहीशिवाय कोणाचेही चालु शकत नव्हते व पुढेही कधी चालणार नाही. त्यामुळे सर्वांचा समान आदर ठेवणे हेच नैसर्गिक वर्तन आहे. त्याविपरीतचे वर्तन हे असामाजिक व विकृत आहे.

७. जातीव्यवस्था टिकव्ण्यात स्वार्थ कोणाचे आहेत ते शोधत रहा व त्यांचा निषेध करत रहा. मग ते राजकारणी असतील वा माथेफिरुंच्या पोटभरु चळवळ्या संघटना. हे कंटक क्षमेच्या योग्यतेचे नाहीत हे पक्के ध्यानात ठेवा!

८. सर्वांनीच सर्वांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक उत्थान घडवण्यासाठी एक होत मुळची जातीविरहीत सहिष्णुतेची आणि विजिगिषू वृत्तीची पुन्हा उभारणी करुयात. आमच्या भांडणांत सत्तापिपासुंचा फायदा आहे...स्वार्थ आहे. तेही आपल्यातीलच आहेत...पण त्यांचेही प्रबोधन करत जातीय सत्ताचालनाला पुर्णविराम कसा देता येईल यासाठी प्रयत्न करुयात.

९. हा महान देश आणि हा धर्म एकाच किडीने पोखरला आहे व ती म्हणजे जात. जातीचा जन्म परिस्थितीने केला...आम्हीच केला...आता ती नष्ट करण्याचे ऐतिहासिक कार्यही आपल्यालाच करावे लागणार आहे. जाती अथवा खोटा वर्णाधारीत वर्चस्वतावाद बाळगणा-यांना या देशात ...या समाजात स्थान नाही. देता कामा नये.

१०. कोणतीही जात आम्हीच श्रेष्ठ असा दावा करायला कधीही लायक नव्हती व आजही नाही. आधी समाज आला..समाजाने धर्म निर्माण केला...दैवते-प्रतीके बनवली...गरज म्हणुन पुरोहित बनवावे लागले. समाजाला रक्षणाची व कायद्यांची गरज भासली म्हणुन समाजाने आपल्यातीलच कोणाला राजा बनवले तर कोणाला सैनिक. यातल्या एकालाही परमेश्वराने नव्हे तर समाजाने निर्माण केले आहे...तेही आपल्यातुनच. त्यामुळे आम्ही परमेश्वराच्या तोंडातुन टपकलो आणि कोणी पायातून असे जे मानतात व समजतात त्यांच्यासारखे महामुर्ख आणि अडानी कोणीही नसतील. या मुर्खांच्या गर्दीत सामील होवू नका!

आज आपण स्वत:ला जेही काही समजतो ते पुरेपूर आपल्याच अडाणीपणातून आलेले आहे. अडाण्यांनी सांगितले आणि ते ऐकले त्यातुन आलेले हे अडाणीपण आहे. स्वत:ची बुद्धी वापरुयात...जगातील अत्यंत अनैसर्गिक आणि आपलीच विभाजनी करणारी जातभावना नष्ट करुयात!

58 comments:

  1. अत्यंत वास्तववादी आणि परखड मते. या गोष्टी लोकांच्या लक्षात येतील तेंव्हाच जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दिशेने समाजाची वाटचाल होवू शकेल.

    ReplyDelete
  2. जातीव्यवस्था नष्ट करणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच आवश्यक आहे धर्मव्यवस्था नष्ट करणे...धर्माची स्तुती करून फक्त जातीव्यवस्था नष्ट करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे....

    ReplyDelete
  3. भ्रामक अभिमान अहंकारावर लोकांना अन्याय सहन करण्याची शक्ती मिळत असते, मग न्याय मिळवून देऊ न शकणारे अशा गोष्टी रुजवतात, जोपासतात आणि अन्यायातूनच अधिराज्य गाजवत रहातात. जय हो

    ReplyDelete
  4. आवं भाऊसाहेब,
    तुमी इतक्या जाड जाड शब्दात काय ते वारडून ऱ्हांयलाय ते नाय समजल .
    समद डोसक्या वरून गेलं बगा.आमच्या उपयोगाचच बोलून ऱ्हांयलानावं
    का त्या पांढऱ्या बगळ्यावाणी नुसताच कलकलाट .
    रागाऊ नका बर का भाऊसाहेब.
    आमी मनापासून बोलतोय .सगळच अवघड होत चाललाय ना वो !
    आवं थोड सोप करून सांगा की वो.-जरा आमालाबी सामजुद्या की ,
    आमीबी शाई लावतो अंगठ्याला वोट टाकताना तुमी सांगीतलकी -न्हाय का ?
    इस्वास असतो समोरच्यावर-पार सगळेच तसले कि वो !
    तुमच्या आदीचा तो कोण ? अननोन का काय तो .अरे बाबारे .सगळ तोडायला नि फोडायला का रे बाबा निगाला तुमी लोक ?
    आपला धरमबी तोडायचा म्हणतय हे लेकरू.
    का रे बाबा असं .तुकोबांनी आणि माउलीनी किती गोडवे गायले बर आपल्या देवाधर्माचे आनी तुमी का रे जीवावर उटला?
    माजा विटोबा तरी सोडा की रे माज्या लेकारानो !

    आमी अडाणी आहोत ! पण मला येक सांगा -आमच्या इठूला तुमी त्या बडव्यांपासून सोडवा आणि मग हवी ती बडबड करत बसा दिवसरात्र -
    आमच कायबी म्हणन नाही .कोण मोटा नि कोण ल्हान आमाला नाय समजत -
    आमाला बाकी तत्व नि ग्यान नका ऐकवू फुकटच - इटले कान ते ऐकून ऐकून !
    पण पोरानो आमची विठू माउली सोडवाल का या विळक्यातून -मग बाकीच गुमान सगळ सरळ होतंय बगा -कराल न वो तेवड ?
    पटतंय का.
    तुमच्या आईला नि बापाला इचारा - मनाव ," एक म्हातारी चिरचिर करत्ये.आमी बेंबीच्या देठा पासून वराडतोय तर इच तिसरच ! "

    ReplyDelete
    Replies
    1. आजी, झोप बरं आता...उगाच त्रास नको करून घेवू...तुझ्या लहानपणी आमच्यासारखा विचार करण्याचं धाडस तुझ्या अंगी आलं असतं तर आता आम्हाला हे बोलण्याची गरज भासली नसती...

      Delete
  5. सर्वाना नम्र विनंती -
    मला " भारतीय " संस्कृती म्हणजे काय ते कुणी थोडक्यात सांगेल काय ? आणि ती महान आहे म्हणजे नेमके काय ?
    याविषयी एकदम जातपात या विषयात घुसण्याचा मोह टाळत मला आधी संस्कृती हा विषय चर्चा करावा असे वाटते !

    कुठल्याही पुस्तकाचा रेफरन्स न घेता आपणच चर्चा करूया !
    संस्कृती मध्ये काय काय घटक येतात ते कुणी सांगेल काय ?

    मला जितका उलगडा होतो त्याप्रमाणे ( युरोपियन,चीनी,अमेरिकन,जपानी अशा वेगवेगळ्या संस्कृतीन्साठीसुद्धा )
    आचार,जीवनपद्धती,कपडे,खाणे,संगीत,जीवनाच्या निष्ठा ,भाषा,एकमेकांशी होणारा व्यवहार - असे अनेक विषय संस्कृतीच्या संदर्भात येतात.
    तरुण वर्ग आणि त्याचे वागणे यांच्या मुळे त्यात बदल होत जातो आणि मग हळू हळू सगळ्यावर परिणाम होत जाऊन
    नवीन संस्कृती तयार होते का ?-भारतीय अशी खास वेगळी संस्कृती काय आहे ?त्याचा नेमकेपणा काय आहे ?ती कालसापेक्ष आहे का ?
    आपण कोणत्या भारतीय संस्कृतीबद्दल बोलत असतो,
    तिचा वारसा सांगत असतो. आणि तोच योग्य असे बहुमताने ठरवायचे का कसे ?

    प्रादेशिक पंजाबी केरळी,तामिळ,अशी संस्कृती आहे का ?आणि ती मूळ भारतीय संस्कृतीशी संलग्न असते का -मग ती "स्वतंत्र " कशामुळे होते ? धर्मामुळे ? का प्रादेशिकतेमुळे ?
    हिंदू,भारतीय मुसलमान,भारतीय ख्रिस्चन अशा पण संस्कृतीच्या छटा आहेत का ?असू शकतात का ?
    शहरी संस्कृती असा काही वेगळा प्रकार असतो का ?
    धर्माचा संस्कृतीत किती प्रमाणात वाटा असतो ?
    आपल्यावर मुसलमानी आक्रमण झाले त्यानंतर मुस्लिम संस्कृतीचे आपल्या इथल्या त्या वेळच्या अस्तित्वातील संस्कृतीवर ( हिंदू म्हणा ,वैदिक म्हणा किंवा शैव म्हणा - नावे काहीही द्या )
    परिणाम झाला किंवा दोन संस्कृतींचे संघर्ष आणि मिलन असे दोन्ही प्रकार झाले.फ्युजन झाले !

    ReplyDelete
  6. संजयजी,
    आपल्या कलम १ प्रमाणे,वैदिक धर्म जातीव्यवस्था पाळतो आणि तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे हे जर हिंदुना माहित आहे , तर मग हिंदूंचा प्रोब्लेम काय आहे ?
    जर आपण बौद्ध ,इस्लाम प्रमाणे वैदिक धर्म वेगळा मानला तर त्यात नाक खुपसण्याचा वैदिकांशिवाय इतरांना अधिकार आहे का हे आपल्या मनाला विचारा !.
    हिंदुना जर वैदिक पौरोहित्य अमान्य असेल ( नव्हे असलेच पाहिजे कारण वैदिक हे उसने उपरे आहेत न ! ) तर हिंदुनी नव्या प्रशाला काढाव्यात , नवे श्लोक त्यांच्या भाषेत तयार करावेत.मृत्युवेळचा विधी आणि १० वा -१२ वा विधी मान्य नसतील तर नवे विधी शोधावेत.लिहावेत - संस्कृत नको असेल तर तुमची भाषा निवडा -पाली-अर्धमागधी -मराठी - मुले इंग्लिश मिडीयमची असतील तर इंग्लिश ! कावळा शिवणे या ऐवजी पोपट शिवणे असा विधी तयार करा - वैदिक त्यांना अजिबात अडवणार नाहीत.वैदिक हे - तुम्ही जर लक्षात घेतले तर परंपरावादी आहेत ! ते कसे बदलतील ?
    असे प्रत्येक धर्मात असते.बदल हवा असलेला गट नव्या विचाराप्रमाणे नवीन पंथ , धर्म काढतो.ख्रीश्चनात प्रोटेस्टंट , मुस्लिमांच्यात शिया सुन्नी असे विचारांच्या बदलामुळेच पंथ पडत गेले.
    मला एक समजते कि जे तुमच्यातले नाहीत असे तुम्ही जाहीर ओरडे करता त्यांच्या बद्दल तुम्ही कसे बोलणार ? ते वेगळे आहेत -मुस्लीमान्सारखे -असेच न ? त्यांना जगू द्या त्यांच्या मंत्र आणि वैदिक देव आणि चालीरीती व धर्मा प्रमाणे - तुम्ही एखाद्या मुस्लिमाला सांगायला जाता का कि तू मांडी घालून नमाज पढ -आमच्यात -आमच्या शैव धर्मात मांडी घालून नमः शिवाय जप करतात -तसेच हे नाही का ? वैदिकाला तुम्ही हिंदूंच्या काशेतून बाहेर फेकले कि तुमचा त्यांच्या वरचा अधिकार मिरवण्याचा अधिकार संपतो,आणि त्यांचापण !

    ReplyDelete
    Replies
    1. अनामिक मित्रा, न वाचताच आपण अनेक गैरसमज करुन घेतलेले दिसत आहेत. मुद्दे पुन्हा रिपीट करतो...
      १. वैदिक वर्णव्यवस्थेचा आणि जातीव्यवस्थेचा संबंध नाही...याचा अर्थ वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था या स्वतंत्र बाबी आहेत...दोहोंचा संबंध नाही.
      २. वैदिकांच्या धर्मात नाक खुपसण्याचा प्रश्नच येत नाही, पण वैदिक लोक जेंव्हा वेद हे हिंदू धर्माचा आधारस्तंभ आहे असे म्हनतात व हस्तक्षेप करतात तेंव्हा सत्याची जाणीव करुन देणे कर्तव्य ठरते.
      ३. वैदिक पौरोहित्य...जरा स्वत:लाच विचारा म्हणजे नेमके काय ते. वैदिक पौरोहित्य अन्य कोनासाठीही केले जातच नाही...तेंव्हा आपला हा मुद्दा बाद ठरतो.
      ३. संस्कृत भाषा वैदिकांचीच या भ्रमातून आधी बाहेर यावे. आद्य व्याकरणकार पाणिनी हा वैदिक ब्राह्मण नव्हता.
      ४. आम्ही आमचेच विधी पाळतो. आमचे पौरोहित्य करणारे अवैदिक ब्राह्मणच असतात. भारतात हजारेक जरी वैदिक ब्राह्मण सापदले तरी खूप झाले. बव्हंशी ब्राह्मण अवैदिक देवतांचीच अर्चना करत असतात...एव तेव ते वैदिकधर्मिय ब्राह्मण नाहीत, पण वैदिक समजतात असेच मी म्हटले आहे. याबद्दल फारतर प्रतिवाद करता येईल.

      प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

      Delete
  7. संजय सर म्हणतात तो शब्द समर्पक आहे,
    अनामिक मित्रा, वा !
    इतका छान विषय निवडूनही नाव लपवायची गरज का भासावी ? इथ तुम्हाला जातीवरून कोणी हिणवलं नसतं .
    या मंचावर कधी अपशब्द प्रसारित होत नाहीत .मग भीती कसली ?
    भारतीय संस्कृती म्हणजे आपण ' भारतीय " असण असा अर्थ आहे.
    आपण सभ्य असतो, आपण ज्या सभ्यतेच्या नावाने जगासमोर येतो,
    आपली ओळख सांगतो, ती ओळख म्हणजे ती संस्कृती ! आपली भारतीय संस्कृती !.इथे स्थळ काल हे बंधन नाही !
    संस्कृतीमध्ये " सभ्यपणा " हे मूलतत्व म्हणता येईल.आदिवासीनासुद्धा संस्कृती असतेच ,पण आपण ठग संस्कृती असे काही म्हणत नाही ठग हे चोर - चोरांना संस्कृती नसते . - नाही का ?
    आपण पुरातन भारतीय संस्कृती किंवा आधुनिक भारतीय संस्कृती असे शब्द प्रयोग वापरतो !

    आता दुसरा मुद्दा -भारतीय संस्कृती महान म्हणजे काय ?

    भारतीय संस्कृती हि सर्व समावेशक आहे म्हणून ती महान आहे. .
    तिच्यावर इतके हल्ले झाले - आरोप झाले -
    ती प्रतिगामी आहे , फसवी आहे, ती एक प्रचंड भेल-पुरचुंडी आहे,अडगळ आहे असेपण बोलले जाते.
    पण ती प्रवाही आहे याबद्दल कुणालाच शंका नाही. अनेक मतमतांतरे असणे ही तर तिच्या थोरपणाची पहिली खूण !

    आमची परंपरा अजिबात रिजिड नाही.ती काल सापेक्ष आहे आणि निश्चितच बदल पचवणारी आहेच.
    आमच्याकडे आक्रमकालासुद्धा राखी बांधण्याचे कर्तृत्व दाखवले जाते.
    आणि आक्रमकांना टाळण्यासाठी जोहार पण केला जातो.
    आक्रमक किती सुसंस्कृत आहे हे इथल्या स्त्रिया जाणू शकतात.त्यांना स्वतंत्र बुद्धी असते.त्या पुरुषांच्या सल्ल्याने चालत नाहीत.
    आमच्याकडे प्रत्येक नात्याला खास नाव आहे.- मावशी,आत्या, वहीनी,
    जावई ,नणंद -तिकडे सगळेच आण्टी किंवा अंकल किंवा इन लओव -म्हणजे कायद्याने जोडलेली नाती.
    आम्हीच वाईट प्रथा पाडल्या.आम्हाला कुणीतरी त्यातले भयाणपण , दाखवून दिल्यावर आम्ही , आमच्यातीलच अनेकजण त्या विरुद्ध उभे राहिलो .त्या प्रथा मग बंद पाडल्या .आम्ही मध्यंतरी इतर जगापासून तुटल्यासारखे झालो होतो.इंग्रजांच्या सत्तेमुळे आम्ही इतर जगाच्या पुन्हा संपर्कात आलो.आमच्या बाल विवाह सती यासारख्या प्रथा त्यांच्या पुढाकाराने बंद पडल्या.आमच्या अनेक नेत्यांच्या पुढाकाराने आमची मंदिरे सर्व लोकांना खुली झाली.सर्व जाती जमातींना.!

    आमच्या वेगवेगळ्या भाषा हे आमचे वैशिष्ठ्य आहे.आमचा एकेक प्रांत म्हणजे इतर खंडांमध्ये एकेक देश होतो - पण इथे आम्ही सुख समाधानाने राहतो. आम्हाला बांधणारा धागा म्हणजे भारतीय संस्कृती !तिची हि वेगवेगळी रूपे आहेत ! अठरापगड जाती असल्या तरी आम्ही एक आहोत यात शंका नाही.इथे जातपात असली तरी माणूस त्याच्या गुणाने ओळखला जातो.
    इथे डॉ .आंबेडकरांचे ,छ.शिवाजीचे पुतळे आदराने बसवले जातात .तिथे जात धर्म असा भेदाभेद केला जात नाही.

    आपण खूप मोठ्ठी मजल मारली आहे.जगात आज एक दुर्लक्ष न करता येण्यासारखी शक्ती म्हणून आपण ओळखले जातो.आपल्या म्हणण्याची दाखल घेतली जाते.
    पी.एल.४८० पासूनचे दिवस आठवले तर आज आपण विकसित देश धरले जातो.
    आपण अजून मोट्ठे होऊ शकतो.
    आम्ही थोडे नॉस्टालजीक आहोत , आम्हाला भूत काळात आमच्या खुणा शोधायचे वेड आहे. पण आम्ही तो आमचा दोष न मानता ती आमची जमेची बाजू मानतो !
    आमची संस्कृती - संजय सर म्हणाले तशी थोर असल्यामुळेच आमच्या इतिहासाचीही आम्ही आठवण ठेवतो.

    ReplyDelete
  8. संजयजी, तुमच्या टिप्पण्यांवरुन समजले की तुम्ही वेदिक धर्म आणि हिंदू धर्म हे कसे वेगळे आहेत हे दाखवत आहात.तुम्ही भलेही बहुजनांना हिंदू धर्मात परत आणत आहात आणि त्या शिव धर्मा पासु्न दूर ठेवत आहात.तुम्ही दिलेल्या स्पष्टीकरणातुन ब्राहमणांचा वेदिक अभिमान हा संपुन जाईल अशी अपेक्षा ठेवू शकतो.पण हिंदू धर्म हा ब्राहमण विरहित धर्म राहिल असे ही होण्याची शक्यता आहे कारण शैव ब्राहमण कोण आणि वैदिक ब्राहमण कोण हे ओळखणे कोणाला ही शक्य नाही.मग शिव धर्म आणि हिंदू धर्म ह्यात फ़रक काय तो उरला?

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, एक पुरातन धार्मिक वारसा म्हणुन वेदांचे महत्व नेहमीच राहील. रहावेही. परंतू आपला आचरणातला धर्म, मग तो ब्राह्मणांचा का असेना, वेदाधारीत नाही याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. शिवधर्मी, बौद्धधर्मी, इस्लामी अथवा ख्रिस्चन यांना सबळ तोंड द्यायचे असेल तर आपण आधी आपल्याच धर्माची मूलतत्वे समजावून घ्यायला नकोत का? हिंदू धर्म वेदाधारीत आहे असे मानत आल्याने आपण केवढा संस्कृतीक गोंधळ घालून ठेवला अहे व त्यामुळेच धर्मद्रोही त्याचा फायदा घेत आपल्यावर तुटुन पडतात हे सत्य आता तरी लक्षात घ्यावे लागेल. मूल ऋग्वेदातही समानताच होती...ती पुरुषसूक्त घुसवून कोणी बिघडवली? ती एक गंभीर व खुद्द वेदविरोधी बाब नव्हती काय? विचार करा...आणि वैदिक अकारणचा अभिमान कमी झाला कि अनेक सामाजिक गोष्टी साध्य होतील त्यावरही विचार करावा...

      Delete
    2. खरं आहे संजयजी.......पण अशा गोष्टी जनमा्नसास पटवुन देण्यास धार्मिक लोकांचा आधार लागतो.आपले बहुजन बांधव धार्मिक केंद्रसत्तांवर अधिक विश्वास ठेवतात.माझं असं मत आहे की हाच वाद जर आपण शंकराचार्यां मार्फ़त चर्चा करुन जर जनात सत्य काय ते पसरवले तर अधिक लोक ह्यावर विश्वास ठेवतिल व हिंदू धर्म सुरक्षित राहिल.द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज हे माजी स्वातंत्र्यसैनिक आहेत.ते कदाचित चर्चेस तयार होतिल.त्यांची वेब्साईट ही आहे.
      http://jagadgurushankaracharya.org/

      Delete
    3. मा. विचारवंत, अभ्यासक, श्री संजय सोनावाजीनी यांसी. तुम्ही शेवटी हे मान्यच केले कि तुम्ही "हिंदू" धर्मासाठी बौद्ध , क्खीर्स्चन इस्लाम आणि शिव धर्म विरुद्ध लढत आहात....

      Delete
    4. यात अमान्य करण्यासारखे काय आहे? प्रत्येकजण आपापल्या धर्माची उस्तवार करत असेल तर मला माझ्या धर्माचीही केलीच पाहिजे.

      Delete
    5. तुम्हाला तुमचा धर्म जसा टिकवा वाटतो तुन्हाला त्याचा प्रचार आणि प्रसार कराव वाटतो.....तसेच मला माझी जात टिकावी आणि साम्र्दुद्ध व्हावी असे वाटले तर काय चुकले....तुम्हाला धर्म प्रिय आहे मला जात.....आपण दोघे सारखेच आहोत....फक्त आपला स्वार्थ वेगळ्या वेगळा ठिकाणी आहे किवा आपल्या जातीचा स्वार्थ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असेल... आता हे सोडून खरेच काही समाजासाठी करायचे म्हटले तर तुमिः जाती अंतासाठी लढत आहात त्यापेक्ष्य धर्म अंतासाठी लढला असता तर त्याला अर्थ प्राप्त झाला असता...त्यात खरी समाजसेवा पण दिसली असती.....असो सुज्ञास लगेच समजते

      Delete
    6. जातीच्या नावावर राजकारण करणारे म्हणजे ब्रिगेडीच आहेत.जा स्वीकारा तुमचा तो नवीन धर्म ’शिव धर्म’अनिता पाटिल उर्फ़ कोण तो बाप्या ,बाईचे रूप घेऊन बरळत असतो.हिचे/ह्याचे पुस्तक आलेच आहे म्हणा. चांगलय आमचा हिंदू धर्म तरी ह्या घाणीतुन मुक्त झाला म्हणावे......

      Delete
  9. संजय सर,
    जाती नष्ट करायच्या झाल्या तर हा आपला विषय आहे.
    त्यावर चर्चा चालूच आहे.सर्व बाजूने लोक आपापली मते मांडत आहेत.चर्चा चांगल्या वळणावर पोहोचली आहे.
    मला आता एक मत मांडायची मी मुभा घेत आहे.
    भारतीय संस्कृतीत जातींचे स्थान असा जर विचार केला आणि प्रादेशिक अस्मिता या विशायाचापण विचार केला
    तर मला जाणवणारी एक भीती अशी आहे.
    पूर्वापार पासून हिंदू धर्माचा भारतीय उपखंडावरचा - भूभागावर चा पगडा दखल घेण्य इतपत राहिला आहे.
    भाषावार प्रांत रचनेपासून प्रादेशिक अस्मिता जास्त प्रभावी होत गेलेल्या दिसतात.
    नजीकच्या काळात त्या जास्त प्रभावी होत जाऊन फुटीरतेची बीजे रोवली जाण्याची शक्यता दिसते का ?त्याला आपली संस्कृती कसे उत्तर देणार आहे ?
    सोविएट युनियन ची जी छकले झाली त्याचा या पार्श्व भूमीवर चिचार केल्यास काय दिसते.
    त्यांची राजकीय सभ्यता एक होती अशी ते हाकाटी पिटत होते पण त्यांच्या कडे सुद्धा प्रादेशिक अस्मितेने डोके वर काढले,उझबेकिस्तान,कझाकिस्तान आणि इतर मुस्लीम टापूत धार्मिक अंगाने फुटीरता दिसून येऊ लागली. त्यामुळे साम्यवाद आणि रशियन क्रांतीचा पराभव झाला आणि प्रादेशिक अस्मिता जिंकली.
    सत्ताधारी लोकांच्या चमत्कारिक जातीच्या अघोरी राजकारणाला समर्पक उत्तर म्हणून आज आपल्याला भारतभर प्रादेशिक अस्मिता वर येताना दिसत आहे.
    विरोधी पक्ष अनेक वर्षे सत्तेपासून केंद्रात दूर राहिल्यामुळे ,प्रादेशिक पातळीवर त्यांनापण हा सत्तेचा प्रयोग प्रादेशिक अस्मिता कुरवाळून यशस्वी करता येण्याचे आवाक्यात असल्याचे दिसू लागले आहे.
    अशामुळे सत्तेच्या राजकारणात जातीपातीच्या राजकारणाला ,प्रादेशिकता हे जर उत्तर सापडले तर ,
    अजून ४-५ निवडणुकांनंतर भाषिक तत्वावर स्वतंत्र राष्तांची मागणी पुढे येण्याची शक्यता आपणास वाटते का ?
    त्यात जातीय बलाबलांचा वाटा असू शकतो का ?

    ReplyDelete
  10. आंतरजातीय विवाह हा जातीसंस्था नष्ट करण्यावर एकमेव उपाय आहे. नेमका तोच विषय टाळून जाती नष्ट करण्याची स्वप्ने जे बघत असतील ते बघोत बापडे. पण ती स्वप्नेच राहणार आणि जाती ही वस्तुस्थितीच राहणार.

    ReplyDelete
  11. ब्राह्मण कोण होते ?
    त्यांच्या बद्दल इतके घाणेरडे ऐकलेले आहे.
    एक म्हण पण आहे
    ऋषीचे कुळ आणि दुर्वांचे मूळ शोधू नये.
    त्यांना मुली कोण देणार ?अगदी त्यांना अंतर जातीय विवाह करायचा आहे असे समजा,पण त्यांच्या घरात मुली द्यायला इतर वर्ग तयार कसा होणार ?
    ऋषी हा हमखास अनैतिक प्रकरणातून जन्माला आलेला असतोच ! अशा गोत्रात आपली मुलगी मी तरी नाही देणार.
    ब्राह्मण तर सगळ्यात खालची जात आहे.!

    ReplyDelete
    Replies
    1. अबे तू नक्कीच ब्राहमण आहेस..........आणि काय बडबड करतोयस? विषय काय आहे?तुला जाती नष्ट करायच्या नसतिल तर बस घरी........उगाच काहिही बोंबलू नकोस......

      Delete
    2. अहो बरोबरच आहे त्यांचे. बाबासाहेबांसारख्या महामानवाचे जरासे चुकलेच म्हणायचे! त्यांनी उगीचच "वरच्या" जातींना आरक्षण मिळवून दिले. खरे म्हणजे त्यांनी सर्वात खालच्या जातीलाच, ब्राह्मणांनाच आरक्षण द्यायला हवे होते. म्हणजे मग त्यांच्या मुलांना इतरांनी मुली दिल्या असत्या. आणि पोट भरण्यासाठी "वरच्या" जातींच्या घरी जाऊन शिधा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. म्हणजे मग "वरच्या" जातींना ह्या "खालच्या" जातीमुळे विटाळ सुद्धा झाला नसता.

      Delete
  12. अरे वा वा वा! आतापर्यंत मराठेच ओबिसी म्हणवून घ्यायला तयार होत होते. आता आंतरजातीय विवाहांचे नाव घेतल्यावर लगेच ब्राह्मण देखील स्वत:ला खालच्या जातीतले म्हणवून घेऊ लागले? धन्य 'तो' समाज आणि धन्य 'तो' देश!

    ReplyDelete
  13. हजारो वर्षे सवर्णांच्या पायाखाली तुडवले जाऊनही जिथे दलित समाजातीलच जाती व्यवस्था अजूनही नष्ट होत नाही तिथे सवर्ण समाजातील जाती काय झाट नष्ट होणार आहेत?

    ReplyDelete
  14. प्लीज जरा संजयजी,
    आपण कणखरपणे सर्वाना सभ्यपणे लिहिण्यास सांगाल का ?
    डिसेंबर १३ - ३.४४ ए.एम.ची प्रतिक्रिया खटकणारे शब्द वापरून केलेली आहे.
    मी विचारपूर्वक १२ डिसेंबर ला रात्री १०.३० ला कळकळीने काही मते मांडली होती.,पण त्याची कुणी दखलच घेत नाहीये.
    एकमेकांवर चिखलफेक करून चर्चा सकस होत नाही .
    प्लीज !
    आपण मोकळेपणे खोलवर विचार मंथन करू या.
    आणि या मंचाचे उद्गाते श्री संजय सोनवणी यांच्या श्रमाचे आणि पुढाकाराचे चीज करू या.
    प्रत्येकाच्या मतात फरक असणारच ! पण तो मांडताना थोडे सभ्यपणाने मांडू या - प्रयत्न केला तर ही शिस्त पाळणे अश्यक नाही.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  15. Itar Dharma'che Mahit Naahi, Pan Shivdharmi'kade Bahujan Lok Jaanar Naahi,Kaaran....

    http://www.loksatta.com/daily/20090308/sun01.htm

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही दिलेल्या लिंक पैकी काही मुद्दे:
      (१) ‘राज्यात ७० टक्के मराठा समाज दारिद्रय़रेषेखालील जीवन जगत आहे.’ (पा. २५), (२) ‘खेडय़ात एकाही मराठय़ाचे घर पक्के बांधलेले नाही.’ (पा. २०), (३) ‘९९ टक्के ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात इतर कुणाहीपेक्षा जास्त मागासलेला आहे.’ (पा. २०), (४) ‘मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अवस्था दलितांपेक्षाही दयनीय आहे.’ (पा. २७), (५) ‘बीड, लातूर, नांदेड या तीन जिल्ह्य़ांतील मराठा समाज तेली, वंजारी, धनगर, सोनार, भोपे यांच्यापेक्षा शैक्षणिक, आर्थिक, समाजिक क्षेत्रात अत्यंत मागासलेला आहे.’ (पा. ३२), (६) ‘स्वराज्यनिर्माते मावळे आज भिकारी झाले आहेत. त्यांचा त्यागही समाज विसरला आहे. आज मराठा समाजाला आधाराची गरज आहे. तो एकमेव आधार म्हणजे ओबीसी आरक्षण हाच होय.’ (पा. ३२), (७) ‘मराठा समाजातील ९९ टक्के लोक हे सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेले आहेत.’ (पा. ४४), (८) ‘मराठा समाजातील ९० टक्के कुटुंबांची घरे कच्ची आहेत.’ (९) ‘कोकणातील समाजबांधव आदिवासींपेक्षाही मागे आहेत?’ (पा. ३१).

      असेच जर असेल तर मग मराठा समाजाला अनुसुचित जातीं मध्ये समावेश करा म्हणावं न? इतर मागासवर्गीय लोकां पेक्षा त्यांची स्थिती दयनीय आहे.....

      Delete
  16. संजय सर /हरी नरके सर ,

    आपल्याला सर्वाना जरी सुप्रीम कोर्टाने जखडून ठेवले असले तरी
    फक्त चर्चा करण्यापुरतेच स्वातंत्र्य घेऊन या मंचावरून असे म्हणावेसे वाटते,की
    पुन्हा एकदा सर्व संमतीने समजा सर्व परिस्थितीचा नव्याने उहापोह करत परामर्श घेतला आणि आरक्षणाची पुन्हा फेर आखणी करण्याचे कल्पनेने योजले तर ,
    ३०% प्रत्येकी असे आरक्षण केले आणि उरलेले अपंग लोकांसाठी ठेवले तर प्रश्न संपतील !
    ३०% बी.सी.एस.टी.३०%ओ.बी.सी.आणि ३०% मराठा समाज - असे जर फेर आरक्षण वाटप केले तर संपूर्ण महाराष्ट्र सुखी होईल.आणि मग कशाचीच ददात राहणार नाही.कुणी कुणावर चिडचिड करणार नाही.पक्षीय राजकारणाला कायमचा पूर्णविराम मिळेल.सत्ताधारी आणि विपक्ष सर्वच एकमताने निर्णय घेतील आणि सर्व निर्णय फटाफट होऊन गडचिरोली आणि मुंबई-पुणे एक होतील.
    आर्थिक निकषांबद्दल शंका व्यक्त केली आहे ती खरी आहे -इथे पैसे टाकले की हवे तसे जातीचे - उत्पन्नाचे सर्टिफिकीट मिळते असे पेपरात वाचायला मिळते .त्यामुळे असल्या निकषांबद्दल मनात शंका येते.
    धर्मावर आधारीत आरक्षण देण्याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय म्हणते ? कारण जातींवर आधारीत आरक्षणाने जातीय धारणा बळकट होणारच तसे धर्माधिष्ठित आरक्षणामुळे धर्म श्रद्धा बळकट होतील.
    जो तो आपापली जात पाळतो.तर त्यांनी धर्म पाळला तर अधिक चांगले नाही का ? माणूस जास्त धार्मिक होणार असेल तर चांगलेच आहे नव्हे का ?
    प्रत्येकजण धर्म पाळील हा एक मोठ्ठा विकास होईल.
    आत्तासुद्धा भारतात हिंदू सोडूनही इतर धर्मात सुद्धा जातपात आहेच - त्यामुळे एकदमच (धर्माधीष्टीत + जातीनिहाय ) -प्रा.नरके सर म्हणतात तसे प्याकेज -आरक्षण झाले तर कुणावरच अन्याय होणार नाही.
    ते कसे करायचे - सोपे आहे - कारण ख्रिश्चन आणि मुसलमान व इतर धर्मात आणि हिंदूंमध्ये समान जाती आहेत -तांबोळी-तेली-कासार-शिंपी - चांभार - अशा एकेक जाती घेऊन तो निर्णय घेता येईल.
    फक्त एखादी ब्राह्मण वगैरे जात सगळीकडे समान नसेल - त्यांना मात्र आरक्षणच द्यायचे नाही. संपला प्रश्न ! इतक्या सोप्या गोष्टी इतक्या अवघड का करून ठेवतात हे नेते लोक ?
    बुद्ध मराठा किंवा मुसलमान मराठा असा प्रकारच नसल्यामुळे आखणी अशी होईल
    -३०% बी.सी.एस.टी -सर्व धर्म + ३०% ओ.बी.सी.सर्व धर्म + ३०% मराठा फक्त हिंदू +१०% अपंग सर्वधर्म = १००%.
    एक गोष्ट मात्र सांभाळली पाहिजे की बाहेरून येणाऱ्या कंपन्या कदाचित असले नियम मान्य करणार नाहीत कारण त्यांना घेणे असते मेरीटशी - तसे असते तर भारतातील सगळ्या ख्रिश्चन लोकांना युरोपात नोकऱ्या अग्रक्रमाने मिळाल्या असत्या.
    एम.एन.सी.तुमचा धर्म विचारत नाहीत - तुमची प्रज्ञा प्रतिभा - हुशारी बघतात.जात बघत नाहीत -ब्राह्मणांना म्हणावे -जा तिकडे -दाखवा तुमची हुशारी -आणि मग काय मागयाचेय ते -दिले त्यांनी तर घ्या नाहीतर बसा डोकी धरून !आपल्या भूतकाळाला दोष देत.
    सांगायचा मुद्दा - सरकारी कारभारात हे आरक्षण होऊ शकेल , पण बिगर सरकारी - प्रायव्हेट कंपन्यात असे आरक्षण घडवायचा हट्ट धरणे म्हणजे संकटाना आमंत्रण देण्यासारखे होईल.
    माझा एक हिंदू कट्टर अर्धी चद्डीवाला मित्र आहे.तो म्हणतो कि जे जे इतर लोकांचे इतर धर्मियांचे आहे ते आपण वापरायचे नाही.फक्त भारतीय वापरायचे .
    मी त्याला म्हटले कि बाबा रे - लाईट चा शोध १८७५ ला एडिसन ने लावला म्हणा किंवा १८०९ ला हम्फ्री डावी ने लावला असो,
    पण तो भारतीय नाही-टेलेफोन शोधला ए.ग्र.बेलने ! तो पण भारतीय नाही.
    चला कंदील पण आपला नाही मग बसा शेकोटी-मशाली पेटवून !.रेल्वे पण आपली नाही-मोटार पण आपली नाही. मग आहे काय आपले ?
    पुष्पक विमान ?ते तर भगवंतासाठी " आरक्षित "असते.त्याचा पण कोटा कुठेतरी ठेवायलाच पाहिजे नाही का !

    ReplyDelete
    Replies
    1. "माझा एक हिंदू कट्टर अर्धी चद्डीवाला मित्र आहे.तो म्हणतो कि जे जे इतर लोकांचे इतर धर्मियांचे आहे ते आपण वापरायचे नाही.फक्त भारतीय वापरायचे."

      तुमच्या कट्टर हिंदू मित्राला म्हणावे आधी अर्धी चड्डी वापरणे सोडून द्या. कारण ती चड्डी म्हणजे भारतीय संस्कृतीवर झालेले पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण आहे. त्याऐवजी धोतर नेसून कवायती करायला सांगा. तसेच 'गाय हा उपयुक्त पशू आहे' हे कट्टर हिंदुत्ववादी सावरकरांचं विधान त्या कट्टर हिंदू मित्राला मान्य आहे का?

      Delete
    2. B.C' laach Aapan O.B.C Mahnto....Matra Hech Anekaana Mahit Naahi.

      Bahusankhyank B.C Arthat O.B.C Hey Tar Sarvaat Mothe Baliche Bakre Tharle Aahet.

      B.C Arthat O.B.C Vishay Aajvar Lapvile Gele Aahe... Lapvile Jaat Aahe. Aani Hach Samaj Khara Target Aahe.

      Delete
  17. अनानिमास -
    १३ दिसेम्बारच्या लिखाण बाबत.
    ओ.बी.सी. आणि बी.सी.बाबतचे
    ते काहीच समजले नाही -तुम्हाला काय म्हणायचं ते.
    प्लीज सविस्तर खुलासा कराल का ?
    तुमच्या कडे मराठी लिपीची सोय नसेल किंवा जमत नसेल तर
    इंग्रजी रोमन लिपी वापरून लिहिले तरी चालेल धन्यवाद !
    आपण मांडत असलेला विषय नेमकेपणाने समजावून घेणे आवडेल.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  18. Jatipati nashta karaychya astil tar jatyadharit sagli reservations banda karayla hawit. joparyant aaplya deshat jatyadharit aarakshana aahet towar jatipati nashta hone nahi.

    ReplyDelete
    Replies
    1. Reservation Mhanje 'Rashtriya Bhagidaari' Hoy.

      Tyamule Reservation Arthat 'Rashtriya Bhagidaari' Milalich Pahije !!!


      Delete
  19. Jati pati tar shekado varsha pasoon ahet. Reservation navhat tevha sudha jatipati prakhar hota and ghatt hota. Tymule reservation mule jatipati ahet mhanane mhanje choryachy ulthya bomba aahe.
    Reservation mule inter-caste marriages honyas madat hot ahe. Magas lokanchi paristhiti sudharat ahe.
    Asich inter-caste marriages hot rahilit tar jati kashya rahanar. Mag reservation kuni konala dyacha.
    Sarvat mhatwache reservation mule Hindu dharmala jivandan milale ahe. Karan he je magas lok ahet te aplech dharm-bhandhav ahet. Te ashech upekshit rahale aste tar tuani vegala vichar kela asta. Lets continue Reservation to save Hindu Religion. Apan aplya dharm-bandhav sathi reservation rahu dyave.

    ReplyDelete
  20. Reservation mule magas jatinna saglach ekdam easyli milta. prayatna na kartach. tyamule reservation mule magas jati adhik magas tar khulya wargatil jati adhik pragat hot challya aahet. pan magas wargatil lokanchi thinking power pan magasach rahilyane tyanna hey kalne kathin aahe. "history repates" ase mhantat.

    ReplyDelete
  21. jo paryant reservation he jaatiwar aadhaarit aahe to paryant jaati kadhi nasta honaar naahit he triwaar satya aahe........

    ReplyDelete
    Replies
    1. Reservation kuthe 100 % aahe.
      Magas lok 90 % ahet(OBC/SC/ST/NT/VJNT/Adivasi) ani reservation 49%. Open category 10 % lok ani reservation 51%.
      Tyamule kalji karnyachi garaj kuthay.
      Open category mhananje vasrat langdi gay shahani. We prove our merit easily within socially disadvantaged class people. Vice-versa is in-justice to people. That is not our real merit.

      Delete
    2. No one is talking about ur merit. The fact remains that unless and until reservations are given on caste basis there is absolutely no chance of having a caste free india........

      Delete
  22. जाती जर मनातून नष्ट करायच्या असतील जुने जीर्ण विचार झुगारून देवू शकतील असे नवे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील त्यासाठी सामाजिक सुधारणा चालवली एका विशिष्ठ वर्गाने न चालवता त्यात सर्व घटन्कांचा समावेश असायला हवा अगदी ब्राम्हण देखील कारण एका विशिष्ट प्रवर्गाला बाजूला बसवून समता प्रस्थापित करणे म्हणजे लहान मुलांनी लपाछपीचा खेळ खेळण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  23. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  24. संजय सर,
    आपण मराठी लिहिणाऱ्या लोकांसाठी काहीतरी मार्गदर्शन करावे ही विनंती.
    मला असे वाटते की सर्वांनी मराठीत मराठी लिपी वापरून लिहिण्याचा प्रयत्न करू या.
    त्यासाठी मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न करतो.
    gmail उघडले की compose वर क्लिक करून उजव्या कोपऱ्यात जिथे आपले नाव येते त्याच्या खाली "म" अशी मराठीची खूण येते.
    त्यावर क्लिक करून आपले लेखन चालू केल्यास सर्व मजकूर मराठी मध्ये लिहिता येतो.असा माझा अनुभव आहे.
    आणि सर्वाना समजणे , वाचणे - एकमेकांचे विचार कळवणे सोपे होते.

    चर्चा रंगली आहे.
    काहीजण म्हणतात आरक्षण हवे
    काहीजण नको म्हणतात.
    चर्चा झाली पाहिजे हे मात्र नक्की.

    धार्मिक आरक्षण हवे का ? याबद्दल कुणीच मत नोंदवत नाही.जात आणि धर्म यांचे नाते आहे कि नाही ?

    एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे कि उच्च शिक्षित वर्ग चर्चेमध्ये सामील होणार नाही.त्यांना त्यात काहीच चर्चा करण्यासारखे वाटत नाही.
    कारण चांगले मार्क पडूनही त्यांना त्यांच्या शिक्षणात आरक्षणामुळे अडथळा जाणवलेला आहे.आणि भरपूर पैसे देऊन शिक्षण पूर्ण करणे अपरिहार्य आहे हे त्यांनी गृहीत धरले आहे.
    ही एक प्रकारची खंडणी आहे.असे त्यांच्या मनावर परिस्थितीमुळे कोरले गेले आहे.मी जातीचा उल्लेख करत नाहीये.

    ही महाविद्यालये कोणाची आहेत.?
    पतंगराव कदम,नवले किंवा डी वाय पाटील ,कराड अशांच्या नावाने हा कारभार चालतो.
    शिक्षण महाग करायची ही युक्ती आहे.
    शिक्षण हा लुटण्याचा धंदा झाला आहे.असा काही लोकांचा समज असण्याची शक्यता आहे.
    न्न वस्त्र निवारा शिक्षण या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत असे समाजाने मानणे म्हणजे गुन्हा आहे का ? पण ही मंडळी शिक्षणाची दुकाने खोलून राहिली आहेत .

    हुशार लोकांना आरक्षणाचा काहीच त्रास होत नाही .कारण त्यांचा मार्ग ठरलेला आहे.नुसते डिग्री मिळवून ते थांबत नाहीत.अजून अजून शिकत जातात.
    त्यांच्या लेव्हलला जाणे हे इतराना हजार जन्मात जमणार नाही - त्यामुळे जात कोणतीही असली तरी ते "खास " आहेत ह्याची त्यांना खात्री आहे.ते टेन्शन त्यांना नाही -
    मी फक्त हुशार लोकांविषयी बोलत आहे.आचरट कारकुनी जीवन जगणाऱ्या पोटभरू लोकांविषयी नाही.जे हुशार नाहीत त्यांचा मला तिटकारा आहे.
    अतिहुशार च्च विचारांचा महार चांभार पण मला ब्राह्मण जाती इतकाच मानाचा मानतो
    आज सर्व आय टी कंपन्या आणि भारताबाहेर चे उच्च शिक्षण घेणारे कोण आहेत - तर बहुसंख्येने करीयर करणारे आहेत.
    ते अधिकाधिक उच्च्चतम शिकून उच्च पद मिळवतात.त्यांना बाहेरील देशातून चांगली मागणी आहे.ते भारताला परकीय चलन मिळवून देतात.त्यांना सरकार कडून आयकरात सवलती आहेत.
    त्यांना उच्च परदेशी कंपन्यात मान मिळतो.उच्च शिक्षण घेताना घराचे वातावरणसुद्धा सुशिक्षित असल्यामुळे उच्चार आणि वागणे राहणीमान यात
    एकप्रकारची आंतरराष्ट्रीय अपेक्षित असलेली शिस्त आणि सभ्यता सुसंस्कृतपणा त्यांच्यात जाणवतो.शिक्षणाच्या जोडीला घराचे सभ्य सुसंस्कृत वातावरणही बरेच काही देऊन जाते त्यांना.
    त्यांची जात जर ब्राह्मणेतर असेल तर ती कौतुकाची गोष्ट आहे.त्यांनी आरक्षणाचा कधीच फायदा घेतला नसेल तर ते अभिनंदनास पात्र आहेत.
    पण असाही वर्ग आहे कि ज्यांच्या घरातले अनेक सरकारी नोकऱ्यात आरक्षणामुळे आले आहेत.
    आता असे वर्ग भेद होऊ लागले आहेत.
    पूर्वी जेंव्हा घाटावर वा राजदरबारी न्याय आणि वेद जाणणाऱ्या पुरोहितांना जास्त मान होता ,तसेच आता बी सी ओ बी सी चे झाले आहे.सरकारी नोकरीत जम बसलेला बी सी आपल्याच नात्यातल्याच इतरांची वर्णी लावत जातो.त्यामुळे एकेकाळी जसा ब्राह्मणांचा सरकारी दफ्तरी दबदबा होता , तसेच आता काही घराण्यांचा दबदबा झाला आहे.आणि इतर बी.सी.या वर्गापासून लांब आहेत.
    म्हणून इतर लोकांना हा फायदा मिळण्यासाठी काहीतरी कायदा केला पाहिजे.- ज्याच्या २ पिढ्या सरकारी नोकरीत आरक्षणाने घालविल्या आहेत त्यांच्या बाबतीत आरक्षणाचा हेतू सफल झाला आहे असे मानून त्यांना परत परत हा फायदा मिळण्या ऐवजी तीच जागा एखाद्या नवीन बीसी ओबिसिला मिळाली तर मी वर्णन केलेला वर्गभेद कमी होईल असे वाटते.एका नवीन कुटुंबाची आर्थिक अवस्था बदलली जाईल.नाहीतर एकाच बीसी कुटुंब परत परत फायदा घेत राहिले तर हवा तो जातीय उन्नतीचा उद्देश सफल होणार नाही.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  25. Dear Sanjayji,
    People on this forum deviating from main issue. There is no need to discuss on reservation and dilute main issue. Let's come together and find the solution to this in-human practice in society. I feel inter-caste marriages is the only solution. Indian marriage system kept this ghost of caste alive. All of sudden parents become so serious and cautious about the caste. They do not even think beyond their caste. This has been common to all castes. We do not have faith in human and human values. We should give opportunities & freedom to our children. We should show courage and openness. Think beyond. Let's mingle in this world of humanity without color,religion,caste, creed and geo-location. Let's us follow law of natural justice. Let's not mix issues and get confused. Let's go to root cause of it, address it properly.

    ReplyDelete
  26. Dear Anonymous,

    How can u say that there is no need to discuss reservations? Since reservations are based upon the caste. even if one tries to leave aside the caste issue the documents and records will not allow him to do so. if u really want to vanish cast system in India then any thing based upon cast system should be removed let it be vensu or reservation. marriage issue will start from our own house.

    If there are poeple who want to talk about removing cast system from our society without discussing reservation issue, either they are fools or they are hypocrite.

    ReplyDelete
    Replies
    1. Dear friend,
      Caste is basis of reservation. Lets eradicate its root cause. No caste no reservation.

      Delete
  27. मित्रहो, मी या ग्रुपवरील चर्चा बारकाईने वाचली. मी सर्वांचा आभारी आहे. आरक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्याबाबत आरक्षित आणि अनारक्षित समाजघटकांच्या भावना तीव्र आहेत याची मला जाणीव आहे. आरक्षणाने हित झाले आहे हे एक अल्पांश सत्य आहे याची मात्र आपल्या भाबडेपणाला जाणीव नसते. राजकारण्यांना ते सोयीचे जाते एवढेच. आर्थिक आधारावरील आरक्षणाची मागणी ही अत्यंत अशास्त्रीय आणि असंभाव्य आहे हे मी लेखात स्पष्ट केलेले आहेच. भावनिक न होता, खरोखर वंचितांचे हित साधत त्यांना समर्थ आणि सक्षम बनवायचे असेल तर सध्याचे आरक्षण धोरण समूळ बाद करावे लागेल याबाबत माझ्या मनात शंका नाही. केवळ भावनिक समाधानासाठी आरक्षण शंभर पिढ्या ठेवले तरी सामाजिक उत्थान होणार नाही कारण जसा काळ जातो तशा विकासाच्या कल्पनाही बदलत असतात, अर्थव्यवस्था व तिचे नियमही बदलत जात असतात हे आपण अद्याप लक्षात घेत नाही. राजकीय प्रतिनिधित्व, शिक्षण, नोकरी (आणि व्यवसायही) याचे वितरण समाजात न्याय्य पद्धतीने होत नाही तोवर भारतीय समाजाचे कसलेही हित साधले जाणार नाही. आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही असे असले तरी सध्या तरी तो गरीबी हटावचाच कार्यक्रम म्हणुन पाहिला जातो, वापरला जातो हे वास्तव आपण लक्षात घेत नाही. दुसरीकडे फुले-शाहू, आंबेडकरांचे नांव घेत आम्हीच जात्युच्छेदनाच्याही वार्ता करत असतो. मला वाटते आपली सर्वांची काहीतरी गफलत होते आहे. जाती समजा ठेवायच्यातच तर ठेवुयात...पण तरीही आरक्षणाने प्रश्न सुटलेला नाही, सुटत नाही हे वास्तव डोळे उघडुन पाहण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वंचित समाजाचे जे उत्थान दिसते ते केवळ आरक्षणाने झाले असे समजतात तेही भ्रमात वावरत असतात. आरक्षणाचा त्यातील वाटा किरकोळ आहे. असो. येथे अधिक लिहित नाही. माझा मुद्दा एवढाच आहे कि सर्व वंचितांचे व्यापक हित व्हायला तर हवेच...पण त्यासाठी अजून काही पर्याय असू शकतात कि नाही? जातीआधारीत आरक्षण आज आपली एक मानसिक सुरक्षाकवचाची बाब बनली आहे...जी खरीच कामाला फारशी येत नाही. यापेक्षा अधिक हित साधु शकणा-या प्रक्रियेच्या शोधात मी आहे. एक-दोन दिवसांत यावर मी अजुन लेख लिहित आहे. सर्व प्रतिक्रियादात्यांचे आभार.

    ReplyDelete
  28. Dear Sanjayji,
    जाती समजा ठेवायच्यातच तर ठेवुयात... kay ahe he. Ya dhusht chaktratun baher padhache ase mhatale ani tumhi pan ...........
    Shevati jata jat nahi. apan sagale sampoon janar. Pan jat kay janar nahi. Let's stop this subject. No more discussion. Thanks & regards.

    ReplyDelete
    Replies
    1. You have misunderstood here...those all are hell bent to keep castes alive despite repetitive various arguments, it is addressed to those and yet they cannot make any progress with caste based reservation...you need to understand the argument.

      Delete
    2. Sanjay Sir, the anonymous person above has stated the bitter truth. Indians cant live without castes. Now the ruling castes are also asking for reservations . One of my brigade friends stated that there was a rift in the Bahujan movement just because OBC's are reluctant to give reservations to the Marathas in the OBC category. Initially Brahmins were easy targets,saying that castes are necessarily created by them.But now reservations are asked on the basis of caste only.What the heck has this Bahujan movement achieved? The castes in SC/ST are supporting this agenda as there is no harm to their caste quota.I had read in your earlier article of people asking for quota based on economic conditions. But everyone knows how easy it is in India anyone to get a fake certificate even if he is a multi millionaire. The only way to eradicate caste is I feel to wipe out caste based reservations and only provide scholarships to the needy ones in case of education.In this manner only the real education hungry students will get what they really deserve.As far as politics is concerned the political reservation has to be confined for a stipulated time and shouldn't be extended further.If this condition ever arrives then and only then will you observe a totally caste free India and the word 'caste' will definitely go down the annals of history forever.....

      Delete
    3. One more thing I forgot to say, government jobs should only be given according to the merit.One of the major reasons for brain drain to the west is of course the very fact that in India quality and talent is not respected but only the category or caste is given preference whereas its just the reverse in the west.If we stop this ,it will allow the real Indian talent to shine and develop India into a superpower......

      Delete
    4. Dear friend, what is merit? How to prove it? If we prove a merit within underprivileged class. Is it going to be real merit? Vasrat langadi gay shahani hech na. Where was reservation before independence? How much progress we did in the past? We had been ruled by British for more 150+ years. So called educated class was in service for British. Today India is fastest growing economy in the world. India is progressing after reservation. Our talent has put on litmus test. Real talent come when there is scarcity of opportunities. Reservation is not permanent system. It must be reviewed no doubt in that. At least we people are position to raise our voice. Let us understand how painful our past system was. They did not even complaint about it. (You will find all Muncipal safai workers are 100% reserved category. Even we people did not show any concern with them. We were insulting them on name of caste. Even today we are insulting them on name of reservation. This is arrogance of upper-caste class & inferiority complex of lower-caste people.
      Read about great scientist life story of Newton, Edison, Marconi. Educational merit can not be last resort. It is social justice.
      There are a lot of misconception about reservation. We have to educate both open as well as reserved categories.
      Reservation is not permanent system. It is an opportunity to come main stream. You have to prove yourself. You should understand "unnaticha mahamantra". No mahatma is going to come and help you. Ultimate aim is human excellence.

      Delete
  29. फारच छान. पण ते बहुसंख्य लोकांना पटणे कठीण आहे. जाती व्यवस्थेची मुळे इतकी घट्ट रुजली आहेत की ती उपटून काढली पाहिजेत. ते एखाद्या जबरदस्त असे प्रबोधन किंवा क्रांतीनेच शक्य होईल. पण त्या करिता बहुसंख्य खावून-पिवून असणारया लोकांची तयारी नाही. त्यामुळे ती जात व्यवस्था अशीच चालू राहणार. जी जात नाही ती जात असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. अर्थात प्रत्येकाने आपण स्वतः जात न पाळली तर हळूहळू सुरवात होईल

    ReplyDelete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. Aatachya codition madhe arkshank kadun takle pahije Haramlhor 1947 pasun arkshan khat ahet..I am not brahman no shatriya aata mala aivdha rag arakshan ch ki bhartiy manyachi laj vatate.......arkshanacha jo koni kid laval asel tyane matra aik ghost changali keli ti swatachya samajal Sukhat theval ani saglyana bhokat neun takal...Non brahmin t nral obc kya kasur tha jo kamine logone vihirit dhaklun del.....Kahich samanta nahi aikta nahi faltu aur chutya indian.....______? jalado aur naya banao.arakshan dekar aur jatiwad faila rahe hai kya

    ReplyDelete
  32. coollage dhakhile me arakshan ,,fir noukari me aarashan ,,fir padonatti me aarakshan ,,arakshan pe aarkshan arkshan pe arkshan


    kab tak arkshan ka anya hota rahega
    jatigat aarkshna hatao desh bachao.

    open cateogory walo se aik hi bat kabhi tax mat bharna kabhi sarkar ko madat nahi karna
    sab chupake rakhan wahi apke liye arkshan hai aur wahi shishywrutti..

    ai desh kisike bap ka nahi open walo ka bhi hai iss desh ne open walo bhikari bana diya...sala garib sabhi samaj me rahate fir bhi anyay kya...

    aur rahi bat dalito nki ha kheto me se aa gaye hamre prarishtit area me hamne bhi accept kiya ab arkshan ko fekdo..

    Arkshan khana jitna saral aik din dekho india me jo arkshana kha rahe wo kaise langde lule bante..

    ReplyDelete
  33. Hum brahman nahi hai na mai shatriya fir bhi iss desh ko brahmano ne swatantra kiya...apke shivaji sambhaji ko swami samrth ne sambhala..Brahmno jitna atyachar kiya kab ki parat ped ho chuki hai 1947_2015 arkahan dekar....Mai nahi manta bharat desh ko kabhi nahianunga...bharat ne open walonko kuch nahi diya to fir hum kyu mane bharat ko........


    matalab samnya manus lag sakta hai nokari par us open caste garib ka kya


    ye haramkhor bharat ke dalle hai sale ine mpsc upsc attempts unlimited aur hume 4 bar sirf.

    dekho aik maja ...Bharat me sabko saman adhikar hai .....ghante ka saman adhikar

    Hindu likhta to accha hota ...

    ReplyDelete
  34. garibi jati dekhkar nahi ati
    fir aarkshan jati ke adhar par kyu..

    jago air jagao arakhsna hatao...


    ReplyDelete
  35. एक तरफ तो सरकारेजाति भेदभाव को मिटानाचाहिती है दुसरी ओरजातिगत आरक्षण देकर भेदभाव ओर बढाती हैगरीब तो सभी वर्गो मेहै आरक्षण गरीबोँ को मिलनाचाहिए जातियोँ को नहीइससे योग्यता बढेगी


    arakshan nhi dena sc st ko sirf free education do..

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. babasab ne likha arkahan 25 baras ke liye hai fir dalit samaj babasaheb ka apman kyu kar raha hai aaj babasaheb ki puja nhi karte dusre samj ke log
    jimmedar kon hai agar arkshan hatata hai dr ki puja hum open wale karenge tab tak nahi...

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...