Thursday, January 24, 2013

च्यायला... आभासच कि!


मला पुरातन काळातून, कोणत्या हे नाही आठवत... एक सामंगा म्हणवणारा वयोवृद्ध गृहस्थ भेटायला आला. (कि मीच त्या काळात त्याला भेटायला गेलो होतो? नाही नीट आठवत मला...पण त्याने काय फरक पडतो? आजकाल या काळातुन त्या काळात मीही जातो आणि कोणत्याही काळातील लोक मला कधीही भेटायला येत असतात. पुरता गोंधळ उडतो बघा...) त्याच्या चेह-यावर ओसंडून वाहणारा आनंद होता. डोळ्यांत ऐन जवानीत असावी तशीच तेजोमयता आणि आभाळागत अथांग जिज्ञासा होती. त्याच्या देहाचा कण अन कण जणू आनंदाचे गाणे गात होता. एवढा आनंदी माणूस मी कोणत्याही काळात कधीही पाहिलेला नव्हता. किंबहूना एवढा आनंद कोणात भरभरुन उसळत असेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती.
तर सामंगा माझ्याकडे आला असेल अथवा मी त्याच्या काळात गेलो असेल, पण त्याचे दर्शन अत्यंत सुखावह (आणि किंचित असूया वाटेल असेही) होते एवढे नक्की!
त्याने मला त्याच्या निकट बसवले. त्याच्या स्पर्शात अनिवार हळुवारपणा व कौमल्य होते. स्नेहाची अपरंपार पाखर होती. जणू तो मला युगानुयुगापासून जाणत असावा एवढा ओलावा त्याच्या स्वरात होता.
"मुला, तू कधी उडते हरीण पाहिले आहे काय?"
या त्याच्या पहिल्याच प्रश्नाने मी दचकलो. विचारात पडलो. या माणसाचा आनंद वेडेपणातून तर आलेला नाही ना?
मला प्रश्न पडला.
माझ्या प्रश्नांकित चेह-याकडे पहात त्याने दुसरा प्रश्न विचारला, "म्हणजे नाहीच ना? नसावाच! कसा पाहणार? उडते हरीण कोठे असते तरी काय?" आणि तो मनसोक्त हसला. त्याचे शुष्क शरीर त्या हास्याबरोबर गदगदून हसत राहिले. माझ्या पाठीवर एक हळुवार थाप मारत तो म्हणाला, "पण माझ्या राज्यात असते. आणि ते फक्त मलाच दिसते. माझ्या राज्यात काय पहावे आणि काय नाही हे मी ठरवतो. मी ठरवतो ते मला दिसू लागते. आहे कि नाही गंमत?" आणि पुन्हा तो हसू लागला.
आता माझी खात्रीच पटली कि हा सामंगा ठार वेडा आहे. मी आठवायचा प्रयत्न करू लागलो...मी याला भेटायला आलोय कि हा मला? आजकाल माझ्या स्मृती विविध काळांत वावरत राहिल्याने तशा चमत्कारीकच झालेल्या होत्या. मी जर त्याला भेटायला आलेलो असेल तर का बरे? आणि समजा तोच माझ्याकडे आला असेल तर कशासाठी बरे?
मी माझ्या स्मृतींवर ताण दिला. मग आठवले.
मीच त्याला भेटायला आलेलो होतो.
का?
तेही आठवले...
मला युधिष्ठिरानेच त्याला भेटायला सुचवले होते. स्वर्गवाटेवर सारे हरपून जरा निराश बसलेल्या युधिष्ठिराला मी त्याला उमगलेला जीवनाचा अर्थ विचारला होता...तेंव्हा तो म्हणाला होता..."जीवनाचा अर्थ उमगलेला माणुस सारे काही हरपून बसत नसतो. बघ माझ्याकडे, मी एकाकी आहे. माझे प्राणप्रिय बंधू एकामागोमाग एक या वाटेवर निखळून पडले आहेत. ती महान सुंदरी द्रौपदीही! स्वर्गाचे द्वार माझ्यासमोर आहे...आणि आत प्रवेशायचीही इच्छा उरलेली नाही. मी काय उमगलो बरे?..." आणि एकाएकी तो रडायला लागला होता.
मी शांतपने त्याचे रडणे थांबायची वाट पाहिली होती. मग एकाएकी तो म्हणाला होता, "खरे तर कोणालाही काही उमगल्यासारखे वाटत असले तरी काहीही उमगलेले नसते आणि हाच जीवनाशी होणारा सर्वात क्रूर विनोद असतो! माझ्याशीही तसाच विनोद झालाय खरा. मला काहीही उमगलेले नाहीय!"
* * *
मी मौन राहिलो होतो. (अज्ञानाचे बावळट प्रदर्शन करण्यापेक्षा अनेकदा मौन सोयिस्कर आणि अर्थपूर्ण असते.)
काही वेळाने तोच म्हणाला, "आणि तू का प्रश्न विचारलास? समजा मला काही उमगले असेलही समजा, तर ते सांगून तुला तरी काय उपयोग? त्याने तुझ्या उमजेत काय भर पडनार आहे? अरे मुर्खा, मी खात असलेले अन्न तुझ्या पोटात कधी जावू शकते काय? काही लोक साक्षात्कारी होतात आणि लोकांनाही साक्षात्कारी करण्याचा दावा करतात...तशा काही बावळटांपैकी तू मला समजलास कि काय?"
मी तरीही मौन राहिलो होतो.
मग तो म्हणाला, "मला एक माणुस माहित आहे. त्याला सारे काही उमगलेले आहे आणि तरीही तो आनंदी असतो असे मी ऐकले आहे. उमगल्यानंतर मनूष्य कधी आनंदी झाल्याचे ऐकले आहेस काय? उलट ती उमगल्याचे ओझे बाळगत निरस आयुष्य गिळत असतात...ते जाऊदे, सामंगाला भेट. मला नाही माहित आता तो कोणत्या काळात आहे, पण त्याला भेट...."
"पण मला तुम्हाला जे उमगले ते ऐकायचे होते..." मी शेवटी मौन तोडले होते.
"मुर्ख माणसा, अंतिम उमगणे सर्वांचे सारखे असते असे म्हणतात...पण माझी समस्या ही आहे कि मला काहीच उमगलेले नाही तर काय सांगणार? मला एवढेच उमगलेय कि स्वर्गाच्या दारासमोर मी शेवटी एकटाच आहे...का? हे नाही उमगले...काय उपयोग आहे या छचोर उमगण्याचा? जा...तू सामंगाला भेट आणि मला माझ्या प्राक्तनावर सोड..."
* * *
तर युधिष्ठिराने मला सामंगाला भेटायला सांगितले होते आणि मी बरोबर तेथे पोहोचलो होतो.
पण हा तर वेडसर माणुस होता.
सारी भावंडे व पत्नी गमावल्यावर युधिष्ठिराला लागलेल्या वेडातून त्याने मला दुसरा वेडा तर सुचविला नव्हता ना?
सामंगा माझ्याकडे अपार कुतूहलाने पाहत होता. जणु तो मी काहीतरी बोलण्याची वाट पाहत होता.
पण माझ्याकडुन कसलाही प्रश्न येत नाही हे पाहून त्यानेच बोलायला सुरुवात केली. आता त्याचा चेहरा गंभीर झाला असला तरी त्याच्या डोळ्यांत तसेच हास्य होते.
"युधिष्ठिराला काहीच उमगले नसले म्हणून काय झाले. आपल्याला काहीच उमगले नाही हे उमगणे हेही अंतिम ज्ञानाचे लक्षण नव्हे काय?
"आणि आपल्याला दुस-याचे उमगणे, दुस-याचे ज्ञान काय कामाचे असते बरे? युधिष्ठिर तुला तेच म्हणत होता, तेंव्हाच तू समजून जायला हवे होते.
"तुला मी आनंदी का असतो याचे नवल वाटतेय ना?
"मी कोणत्याही काळात आनंदीच असतो, कारण मी काळासाठी जगत नसून माझ्यासाठी काळ जगत असतो.
"मी विश्वाचा घटक नसून मी आहे म्हणुन विश्व आहे हे मी जाणतो. मी अथवा तू नसशील तर तुझ्यासाठी-माझ्यासाठी विश्व मृतवत नाही काय?
"मी ठरवतो आणि माझ्यासाठी उडणारी हरणे येतात. मी ठरवतो आणि मी सळसळत्या तारुण्यात प्रवेश करतो आणि जीवनमदाचा यथेच्छ उपभोग घेतो.
"हे जग वास्तव आहे आणि अस्तित्वहीणही आहे. जगाचे वास्तव आपल्या आभासांत असते. पण ते आभास खरे नसतात...म्हणून वास्तव जीवन...जग मनुष्याला कधीच समजत नाही. मग त्याला काय उमगणार?
"आणि स्वत:च आपण स्वत:कडे जर आभासी कल्पनांतुन पाहत असू तर आपणही कोठे सत्य असतो?
"मी आनंदी दिसतो हाही भ्रम नाही काय? थोड्याच वेळापुर्वी मी तुला वेडा वाटलोच होतो ना?
"म्हणजे माझ्या आनंदाला वेडाचे लिंपण लागत असेल तर माझा आनंद खरा कसा?
"तुझा कालप्रवास खरा कसा आणि तो युधिष्ठिरही खरा कसा?
"मी कोठुनही कोठे जात नाही आणि कोठुनही कोठे येत नाही.
"खरे तर मी अस्तित्वात असुनही अस्तित्वातच नसेल तर माझा आनंद अस्तित्वात आहे असे मानणेही भ्रमच नव्हे काय?
"पण मी तरीही आनंदात आहे कारण आनंद हा मी निर्माण केलेला आभास आहे.
"मी जशी उडती हरणे निर्माण करु शकतो..तसाच आनंदही.
"दु:खाच्या आभासापेक्षा मला आनंदाभास प्रेय वाटतो म्हणुन मी आनंदी आहे.
"खरे तर दोन्हींचे अस्तित्वच नाही हे उमगणेही जर मला आनंदी करत असेल तर मी आनंदी राहणेच यथोचित आहे.
"आभास कोणतेही असोत...प्रिय वाटतात ते आभास निवडायचे स्वातंत्र्य तरी आपल्याला आहे कि नाही?
"होय, असते!
"आणि काय असते उमगणे बरे?
"उमगण्यासारखे यच्चयावत विश्वात काहीएक नाही कारण मुळात विश्व हाच एक आभास आहे, वास्तव नाही, एवढेच आभासी जीवनात
समजत असेल तर ते उमगणेही आभासच असनार ना?
"ते जाऊदे...काहीएक उमगून घेण्याचा प्रयत्न करू नकोस कारण काहीएक उमगण्यासारखे नसते...
"तुला लाव्हारसाचा शिरा खायचाय का?"
* * *

मी आता कोणत्या काळात आहे हे नाही माहित...
नाहीतरी माहित असणे म्हणजे तरी काय असते शेवटी?
च्यायला...
आभासच कि...
माहित असल्याचा...!
* * *

7 comments:

  1. आप्पा - काय बाप्पा , लगबगीने कुठे एव्हढे थंडीचे निघालात ?
    बाप्पा - चला हो ,अहो संजय महाराज म्हणून एक नवीन महाराज आले आहेत , त्यांचा आज प्रयोग आहे .
    आप्पा - महाराज म्हणताय आणि प्रयोग ? ते काय जादुगार आहेत का ?
    बाप्पा - म्हणजे तुम्हाला लक्षात नाही आल तर ! अहो आपले सोनवणी सर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून शिरा करणार आहेत.
    आप्पा - अहो , त्यांना भेळ खाताना म्हणे एक कागद सापडला , त्यावर एक लेख सापडला -त्यात गीतेतले श्लोक छापलेले होते , ते वाचल्यापासून
    आपले संजय सर कोड्यात बोलायला लागले आहेत.श्रीकृष्ण संस्कृतात सांगतो - नैनं छिन्दंती शस्त्राणि ,नैनं दहति पावकः - सर मराठीत् नि कोड्यात बोलतात इतकेच !
    बाप्पा - काय म्हणतात तरी काय ते ? म्हणजे पक्के भटजी झाले की हो !
    आप्पा - अहो ते गीता सार म्हणून हल्ली मिळते न त्यात नसत का लिहिलेले - मी तुझ्यात आहे आणि नाहीही !मला सूर्य जाळू शकत नाही ,वारा हलवू शकत नाही ,
    बाप्पा - अच्छा अच्छा , म्हणजे सर पुराणिक बुवा झाले तर !
    आप्पा - नाही हो बाप्पा - ४ पेग नंतर आपल्याला जे सुचेल तेच लिहिलंय यांनी -कुठे बसून लिहिलंय तो ग्लास जाणे नि तो वेटर जाणे !
    बाप्पा - आपल्याला सांगितले असते तर आपणही सुचवले असते कि काहीतरी मस्त ! टेबलावर बसून - तेव्हढेच २-४ !
    आप्पा - पेग ?
    बाप्पा - पेग नाहीहो - मी हल्ली बाहेर घेत नाही - २-४ श्लोक सांगितले असते - गमतीदार - उर्ध्व मूल अधः शाखं -सुधारतंय का काही ?वर मूळ आणि खाली फांद्या !
    आप्पा - तुमचा फक्त पंधरावा अध्याय पाठ -जरा छान -" ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात्पूर्णमुदच्यते - पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते "- अस पातंजली सारखे बोला जरा -
    बाप्पा - अहो , संजय सरांचा गाढा अभ्यास आहे संस्कृत चा .त्यांना आपण कोण शिकवणारे ?
    आप्पा - मग हे असे कसे बोलतात - लिहितात हल्ली ते ?
    बाप्पा - काहीतरी वेगळच वाटतंय मला !
    आप्पा - अहो , आधीच एकेक करून यांचे लिखाण कुणी वाचे नाहीसे झाल्येत - त्यात असे बरळायला लागले तर ?
    बाप्पा - हो ! आणि त्याना म्हणावे - भेळेचा कागद वाचायचा नाही - फेकून द्यायचा ! नाहीतर हे असं लिहायची हुक्की येते !
    आप्पा - चला - आज रात्री पण थंडी जोरात असणार ! येताय का बाप्पा रात्री - जरा मजा - २-२ गरम गरम ?
    बाप्पा - आजचा दिवस तरी मजेत जाइल - सर म्हणतात तसं -आनंदाच्या आभासात -
    पण या १२ तासात ऑफिसात साहेबाने झापडले की सगळा आनंद खल्लास !किंवा घरी परत येताना ,
    केळीच्या सालावरून पाय घसरला किंवा आर.टी.ओ.ने अडवले कि सगळे तत्वज्ञान खल्लास !.
    आप्पा - तुम्ही बघा फार निगेटिव्ह विचार करता - आभासात जीवन जागा ! do live on illussions !

    ReplyDelete
  2. आप्पा - काय बाप्पा , लगबगीने कुठे एव्हढे थंडीचे निघालात ?
    बाप्पा - चला हो ,अहो संजय महाराज म्हणून एक नवीन महाराज आले आहेत , त्यांचा आज प्रयोग आहे .
    आप्पा - महाराज म्हणताय आणि प्रयोग ? ते काय जादुगार आहेत का ?
    बाप्पा - म्हणजे तुम्हाला लक्षात नाही आल तर ! अहो आपले सोनवणी सर ज्वालामुखीच्या तोंडावर बसून शिरा करणार आहेत.
    आप्पा - अहो , त्यांना भेळ खाताना म्हणे एक कागद सापडला , त्यावर एक लेख सापडला -त्यात गीतेतले श्लोक छापलेले होते , ते वाचल्यापासून
    आपले संजय सर कोड्यात बोलायला लागले आहेत.श्रीकृष्ण संस्कृतात सांगतो - नैनं छिन्दंती शस्त्राणि ,नैनं दहति पावकः - सर मराठीत् नि कोड्यात बोलतात इतकेच !
    बाप्पा - काय म्हणतात तरी काय ते ? म्हणजे पक्के भटजी झाले की हो !
    आप्पा - अहो ते गीता सार म्हणून हल्ली मिळते न त्यात नसत का लिहिलेले - मी तुझ्यात आहे आणि नाहीही !मला सूर्य जाळू शकत नाही ,वारा हलवू शकत नाही ,
    बाप्पा - अच्छा अच्छा , म्हणजे सर पुराणिक बुवा झाले तर !
    आप्पा - नाही हो बाप्पा - ४ पेग नंतर आपल्याला जे सुचेल तेच लिहिलंय यांनी -कुठे बसून लिहिलंय तो ग्लास जाणे नि तो वेटर जाणे !
    बाप्पा - आपल्याला सांगितले असते तर आपणही सुचवले असते कि काहीतरी मस्त ! टेबलावर बसून - तेव्हढेच २-४ !
    आप्पा - पेग ?
    बाप्पा - पेग नाहीहो - मी हल्ली बाहेर घेत नाही - २-४ श्लोक सांगितले असते - गमतीदार - उर्ध्व मूल अधः शाखं -सुधारतंय का काही ?वर मूळ आणि खाली फांद्या !
    आप्पा - तुमचा फक्त पंधरावा अध्याय पाठ -जरा छान -" ओम पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात्पूर्णमुदच्यते - पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते "- अस पातंजली सारखे बोला जरा -
    बाप्पा - अहो , संजय सरांचा गाढा अभ्यास आहे संस्कृत चा .त्यांना आपण कोण शिकवणारे ?
    आप्पा - मग हे असे कसे बोलतात - लिहितात हल्ली ते ?
    बाप्पा - काहीतरी वेगळच वाटतंय मला !
    आप्पा - अहो , आधीच एकेक करून यांचे लिखाण कुणी वाचे नाहीसे झाल्येत - त्यात असे बरळायला लागले तर ?
    बाप्पा - हो ! आणि त्याना म्हणावे - भेळेचा कागद वाचायचा नाही - फेकून द्यायचा ! नाहीतर हे असं लिहायची हुक्की येते !
    आप्पा - चला - आज रात्री पण थंडी जोरात असणार ! येताय का बाप्पा रात्री - जरा मजा - २-२ गरम गरम ?
    बाप्पा - आजचा दिवस तरी मजेत जाइल - सर म्हणतात तसं -आनंदाच्या आभासात -
    पण या १२ तासात ऑफिसात साहेबाने झापडले की सगळा आनंद खल्लास !किंवा घरी परत येताना ,
    केळीच्या सालावरून पाय घसरला किंवा आर.टी.ओ.ने अडवले कि सगळे तत्वज्ञान खल्लास !.
    आप्पा - तुम्ही बघा फार निगेटिव्ह विचार करता - आभासात जीवन जागा ! do live on illussions !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा आणि बाप्पा...तुम्ही खरे कोणीही असा, पण तुम्हाला जबरदस्त sense of humor आहे. अभिनंदन.

      Delete
  3. सर,
    आपले लिखाण सुंदर ,ओघवते आणि उत्सुकता वाढवणारे आहे असे भासते.
    मी आपल्या ब्लोग ची नियमित वाचक आहे .
    आपल्या पूर्वीच्या सर्व लेखांमधून काहीना काहीतरी शिकायला मिळते.
    मग ते पाण्याविषयी असेल किंवा डॉ .बाबासाहेब किंवा शिव छत्रपती ,
    परशुराम किंवा पानिपत - आपण नेहमीच अभ्यासूपणे लेख लिहिले आहेत.
    आम्ही आपले लेख लवकर लवकर वाचायला मिळणार म्हणून अतिशय उत्सुकतेने वाट बघत असतो.

    हा लेख मात्र आमच्या डोक्यावरून गेला त्यामुळे त्याचा आनंद घेता आला नाही.
    थोडी पूर्वपीठिका सांगितली असती तर आनंद झाला असता .

    खरेतर आपण साहित्य संमेलनाचा वृत्तांत आपल्या ब्लोग वरून आपल्या जिवंत लेखणीतून करायला हवा होता.
    आम्हा सर्वांची तशी रास्त अपेक्षा होती.मी आणि माझ्या मैत्रिणी असे बोलात्पण होतो की आता आपल्याला
    संमेलनाचे संपूर्ण रसग्रहण मिळणार !.पण दुर्दैव आमचे -
    आपण श्रीकृष्णावर लिहिणार होतात न ?
    आम्ही वाट बघत आहोत.

    ReplyDelete
  4. Sanjay Sir,
    This is great .Fantastic -
    An abstract work with thousands of shades ,
    Please write something like this about Love !
    Here you have touched
    the essence of life.
    Meditation is a very innovative thing ,
    It opens each time new perspectives for you
    You should have painted " negation of negation " more profoundly.
    One thing is sure - You have opened new vistas for your readers !
    Thank You !

    ReplyDelete
  5. संजय,
    विचार करणे ही सहजप्रवृत्ती आहे.! आपण कुठेही असलो तरी विचार करण्याची प्रक्रिया थांबवू शकत नाही.
    बहिरा असो,मुका असो,आंधळा असो,अपंग असो,
    अस्पृश्य असो,उच्च वर्णीय असो,आस्तिक असो,नास्तिक असो,
    आपण साधारणपणे सभोवतालीच्या घडणाऱ्या घटनांच्या अनुषंगाने विचार करतो !.
    नुसता विचार म्हणजे चिंतन !त्याला एक शिस्त असते का ? असते असेच उत्तर द्यावे लागते.आपण रोज भरकटल्यासारखे
    नव्याने पहिल्यापासून विचार करत नाही.मेंदूचे काम आहे केलेले विचार साचवणे !चिंतनातून काय घडते ?
    चिंतनातून विचारधारा तयार होते.आज उद्या परवा असे रोज एकाच विषयाचे चिंतन केले तर ते एकसंध झालेले असते.त्यात सातत्य असते.
    बरेचसे विचार हे रिआक्शन स्वरूपात असतात.उदा : पावसाळ्यात छत्री हवी,
    कधी चिंतन प्रक्रियेतून विचार फुलत उमलत जातात .हे चिंतन एखाद्या बातमीतून सुरु होते.तिथेपण विचार रिआक्शन स्वरूपात असतात
    अगदी लहान मुल विचार करते का ? हो , करते- त्याच्याकडे अनुभव नसतो आणि दिसणाऱ्या - ऐकू येणाऱ्या ,जाणवणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याची पद्धती नसते.
    ती कशामुळे तयार होते ? अंशतः नैसर्गिक स्व संरक्षणाच्या जाणीवेतून आणि अंशतः संस्कारातून !आणि अंशतः अनुभवातून !
    घाबरणे , माघार घेणे हे पण स्व संरक्षणाच्या जाणीवेतून होते. चटका बसणे - भाजणे ,यावर उपाय म्हणून बालक त्यापासून दूर राहू लागते.
    रांग लावणे ही वृत्ती कळप संस्कृतीतून आलेली आहे.
    जीवनात असंबद्ध काहीही नसते.कितीही असंबद्धता म्हटली तरी एक एकसूत्रता तरी नक्कीच दिसते.तो निसर्गनियमच आहे !
    निसर्गाची सगळी मांडणीच सुसूत्र असते.
    आपण असंबद्ध लिहून कसे चालेल ?ते निर्जीव वाटते- खोटे वाटते -अशी वृत्ती म्हणजे स्व प्रतारणा वाटते !

    ReplyDelete
  6. संजय सर,
    विचारशून्य मन - thoughtless mind - ही अवस्था सुद्धा विचार प्रक्रियेचा एक भाग आहे.
    खरेतर हा वेगळा विषय आहे.
    जे .कृष्णमुर्ती सांगत असत की रोज कोरी पाटी करा .!
    यावर आपण चर्चा घडवून आणाल का ?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...