Saturday, May 11, 2013

क्षमा करा!


क्षमा करा,

पण आमच्या हृदयात रुतलेला काटा

आम्हीच हळुवारपणे काढायला हवा

त्या रक्तबंबाळ करणा-या

काट्यालाही चुंबत

वेदनांचे हुंकार गिळत

त्या बाभळीलाही

क्षमा करत

पुन्हा चालायची सुरुवात करत

आम्हालाच

अवकाशाच्या विराट प्रेरणा घ्यायला हव्यात!



खुरडत...रखडत

उपेक्षांचा विराणवारा सोसत

परकेपणाला उराशी सांभाळत

चाललेच पाहिजे आम्ही...

अशा प्राणप्रिय धरतीवरुन

असे कि

जणु जी नव्हतीच

कधीच आमची!



आम्हाला कधी आमची हृदयेच नव्हती...

नाही काय?

बघत होतोच कि ती टांगलेली

तिरड्यांवर लपलपत्या

अग्नीजिव्हांवर

जळती आणि पहात होतोच कि

कसे आम्ही हृदये हरवुनही

ह्रुदयशील झालो...

आणि

केला कि हो सन्मान....

हृदयहीनांचा...!

No comments:

Post a Comment

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...