Friday, February 28, 2014

धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!





  1. धर्म-ईश्वर विहिन मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा लोकायतिक मार्ग!

    भारतात पुरातन काळी जसे धर्म निर्माण झाले तशीच धर्मनिरपेक्ष तत्वज्ञानेही निर्माण झाली. म्हणजे धार्मिक कर्मकांडे (मुर्तीपूजा अथवा यज्ञ) यांना डावलत मानवी जीवनाचा चैतन्यवादी आणि जडवादी पद्धतीने विचार करणारे जे तत्वज्ञान निर्माण झाले त्याला आपणे शुद्ध अथवा धर्मनिरपेक्ष तत्वज्ञान म्हणू शकतो. या तत्वज्ञानांत प्राचीन मानली गेलेली १२ उपनिषदे, सांख्य-वैशेषिकादि दर्शने आणि लोकायत/बार्हपस्त्य अथवा चार्वाक नावाने ओळखली जाणारी तत्वज्ञाने सामील होतात. अजित केशकंबल, मंस्खली गोशालादि स्वतंत्र विचारवंतही या परंपरेत होऊन गेले. चार्वाक तत्वज्ञान सांख्यांप्रमाणेच निरिश्वरवादी असले तरी पुढील काळात ते मात्र पुर्णतया अव्हेरले गेले...तर बाकीच्या तत्वज्ञानांवर सोयीप्रमाणे अन्य धर्मांनी डल्ला मारला. म्हणजे भारतात पुढे निर्माण झालेल्या धर्मांवर या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तर राहिलाच पण केवळ "आस्तिक" आहेत या समजातून वैदिक धर्मियांनी लोकायत वगळता औपनिषदिक व अन्य दर्शनांतील तत्वज्ञाने आपल्या धर्मग्रंथांचा एक भाग बनवली.

    खरे तर वेदांनी जे विचार सांगितले त्यापेक्षा वेगळेच नव्हे तर वेदविरोधी विचार प्राचीन उपनिषदांत आढळतात. सृष्टीच्या मुळाशी उपनिषदकारांनी एक तत्व कल्पिले व त्या तत्वाला "ब्रह्म" हे नांव दिले. याचा कोणत्याही देवतेशी, वर्णाशी अथवा धर्मसंकल्पनेशी संबंध नाही. ब्रह्म-आत्मा यांचा एकमेकांशी संबंध, पंचमहाभुते, शरीर-मन-ईंद्रिये, नैतिक संकल्पना, माणसाची मरणोत्तर गती, पुनर्जन्मादि संकल्पनांचा तत्वविचार ज्यात केला गेला आहे ती उपनिषदे होत. वेदांनी पुरस्कारिलेली यज्ञीय संस्कृती त्यांनी सर्वस्वी नाकारली असून यज्ञीय कर्मकांडाचा निषेध केला आहे. एवढेच नव्हे तर यज्ञादि कर्मे करणा-या पुरोहितांची रांग ही आंधळ्या माळेप्रमाणे असते असे मुंड्क व कठोपनिषदात म्हटले आहे. वेद हे फुटक्या नांवांप्रमाने आहेत असाही वेदनिषेध उपनिषदांनी केला आहे.

    असे असले तरी औपनिषदिक तत्वज्ञान उच्च दर्जाचे आहे अथवा सुसंगतीने मानवी जीवनविचार करणारे आहे असे नाही. सर्वच उपनिषदे परस्परविरोधांनी आणि आंतरविरोधांनी भरलेली आहेत. असे असले तरी भारतीय तत्वज्ञानाचा उदय उपनिषदांपासून सुरु झाला असे मानता येईल एवढेच पुरावे आपल्याहाती आहेत.
    दर्शनांपैकी सांख्य, वैशेषिक आणि मीमांसा ही तीन दर्शने निरिश्वरवादी आहेत. वैदिक सेश्वर तत्वज्ञानांना यांत तिलांजली दिली असल्याने ही अवैदिक तत्वज्ञाने होत यात शंका राहत नाही. त्यांचा वैदिकतेशी उत्तरकाळात आणलेला संबंध ओढून-ताणून आहे. तिन्ही दर्शने नास्तिक आहेत, ते ईश्वराला अथवा ब्रह्माला निर्मितीकारण मानत नाहीत हे येथे महत्वाचे आहे. सांख्य आणि वैशेषिक तत्वज्ञाने नुसती निरिश्वरवादी आहेत असे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोनाकडून मानव आणि विश्वाकडे पाहनारी ती तत्वज्ञाने आहेत.

    वरील सा-या तत्वपरंपरा भौगोलिक दृष्ट्या एकाच भागात निर्माण झालेल्या नाहीत. एकाच काळात अथवा एकाच कोणत्या समाजानेही त्यांना निर्माण केलेले नाही. उपनिषदांचेच घ्यायचे तर त्यांची रचना जवळपास सहा-सातशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात झाली असे बहुतेक विद्वानांचे मत आहे. भुगोलाचे म्हणाल तर गंगेच्या खो-यापासून ते दक्षीणेतील नर्मदेपर्यंत त्यांचा भौगोलिक विस्तार आहे. या प्रदिर्घ काळातील असंख्य ग्रंथ आज अप्राप्य आहेत अथवा कालौघात नष्ट झालेले आहेत. परंतू मानवी जीवन, सृष्टीनिर्मिती आणि त्या सा-याचे मुलकारण तपासत, जीवनाचे गूढ शोधत धर्मनिरपेक्ष वृत्तींनी ही तत्वज्ञाने निर्माण झाली आहेत यात शंका नाही.

    या सर्व तत्वज्ञानांत ख-या अर्थाने प्रखर बुद्धीवादी विचार मांडले असतील तर ते चार्वाक अथवा लोकायतिकांनी. या तत्वज्ञानाचा प्रभाव बुद्धपुर्व काळापासून असल्याचे संकेत बौद्ध वाड:मयात मिळतात. विनयपिटकात बुद्धाने भिक्षूंना लोकायतशास्त्र शिकण्याची बंदी घातली होती असे उल्लेख मिळतात. (भा. सं. कोश आणि "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)) म्हणजे बुद्धकाळापर्यंत लोकायतिक तत्वज्ञानाचा बराच प्रसार झाला होता असे लक्षात येते.

    सत्यशोधन श्रद्धेने होऊ शकनार नाही हा लोकायतिकांचा पहिला सिद्धांत...जो सर्वच विज्ञानांचा मुलाधार आहे. श्रद्धा हे आंधळ्या धार्मिकांचे काम. श्रद्धेने सत्य सापडत नसून ते फक्त बुद्धीवादी तर्कानेच सापडू शकते या मुलाधारावर उभा राहिलेला हा विचार. या विचाराच्या विविध शाखा/आचार्य यांनी मिळुन जे तत्वज्ञान रचले ते लोकायतीक अथवा चार्वाक दर्शन म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने या दर्शनाला सर्वच धर्मियांनी पराकोटीचा विरोध केल्याने ही शाखा पुढे लूप्त झाली आणि ग्रंथही. पण सातव्या शतकातील आदी शंकराचार्यांपर्यंत सूत्रकारांना चार्वाक मताचे खंडण करणे अपरिहार्य झाल्याचे दिसते. यावरून चार्वाकांचा प्रभाव किमान सातव्या शतकापर्यंत भारतात होता असे अंदाजिता येते. या खंडण प्रक्रियेसाठी पुर्वपक्ष म्हणून चार्वाकांची मते घेऊन उत्तरपक्षात त्यांचे खंडण केले जात असे. अशा खंडणप्रक्रियेसाठी म्हणून जेथे जेथे चार्वाकांची मते आली आहेत त्यावरून आज आपल्याला पुर्ण नसला तरी चार्वाक दर्शनाचा अंदाज येतो.

    काय आहे चार्वाक दर्शन?

    चार्वाक दर्शन नेमके काय आहे हे समजून घेण्यासाठी सुत्ररुपाने आपण हे तत्वज्ञान समजावून घेऊयात.

    १. या दर्शनात धर्माला, पाप-पुण्याच्या संकल्पनांना, परलोकाला स्थान नाही. येथेच जन्म आणि येथेच मृत्य़ु ही यांची धारणा असून "मूळ तोडले असता वृक्ष पुन्हा वाढत नाही, तद्वतच मनुष्य मेला कि त्याचा पुनर्जन्म होणे शक्य नाही." असे हे दर्शन सांगते. त्यामुळे मृत्योत्तर लोक अथवा जीवन साहजिकच नाकारले जाते. मृत्यू म्हणजेच मोक्ष अशी या तत्वज्ञानाची धारणा आहे. "जे काही आहे ते याच लोकात" म्हणून या तत्वज्ञानाला लोकायतिक हे नांव पडले. ईश्वर म्हणून कोणीही नसून परलोकाला जाणारा जीव दिसत नसल्याने परलोकही नाही असे सिद्धांतन आहे.

    २. हे दर्शन पुर्णतया निरिश्वरवादी असून भौतिक सुखवाद/ईहवाद हा या तत्वज्ञानाचा पाया आहे. "काम" आणि "अर्थ" (म्हणजे जीवनावश्यक आहार-विहार-मैथुनादि) हेच पुरुषार्थ असून अन्य सर्व, धर्म आणि मोक्ष, हे पुरुषार्थ त्याने नाकारले आहेत. लोकायतिकांच्या दृष्टीने मानवी स्वातंत्र्य हाच मोक्ष असून पारतंत्र्य हे बंधन मानले आहे. त्याच वेळीस जगात धर्मच नसल्याने अधर्मही नाही असे हे तत्वज्ञान मानते व "स्वभाव" हेच जगताचे कारण आहे असे ते सांगते.

    ३. हे तत्वज्ञान वैदिक धर्मविरोधी (वेदांचा उघड निषेध करते म्हणून) असल्याने चातुर्वर्ण्यादी कल्पना व श्राद्धादि सर्वच कर्मकांडे धुडकावते. अग्निहोत्र, भस्मचर्चन ही बुद्धी आणि पौरुष यांनी हीन असलेल्या लोकांच्या उपजिविकेची साधने होत असे हे दर्शन मानते.
    भंड, धूर्त व निशाचरांनी तीन वेद निर्माण केले असून जर्भरी-तुर्फरी असले निरर्थक शब्द उच्चारणे हेच पंडितांचे काम होय. वेद हे अप्रमाण आहेत, ते अपौरुषेय नसून ईश्वरच नसल्याने ईश्वरकृतही नाहीत आणि त्यांना स्व-प्रामाण्यही नाही असेही लोकायतिक म्हणतात.

    ४. प्रत्यक्ष हेच खरे प्रमाण असून अनुमान हे प्रमाण होऊ शकत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान (सर्वमान्य) मानायला मात्र लोकायतिकांची हरकत नाही.

    ५. शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी ई. उपायांनी पैसे कमवून शहाण्यांनी नेहमी जगात सुखोपभोग घ्यावा. असेही जमले नाही तर कर्ज करावे पण सुखाने जगावे असेही हे तत्वज्ञान सांगते. (शेवटच्या भागाला अतिरेकी प्रसिद्धी देऊन लोकायतिक मताला बदनाम करण्यासाठी वापरले हे उघड आहे.)

    ६. ज्याची उपयुक्तता उघड दिसते, तो राजा म्हणजेच परमेश्वर होय!

    ७. दंडनिती हीच खरी विद्या, अर्थ आणि गांधर्व (गानविद्या) हेच खरे वेद. प्रत्यक्षानुभवाला येत असल्याने अर्थ-काम शास्त्र असलेले लोकायतशास्त्र हेच खरे शास्त्र होय.

    ८. मुखादि अवयव हे सर्वांच्या शरीरात असतांना वर्णभेद मानणे योग्य नाही.

    ९. पातिव्रत्यादी संकेत बुद्धीहीन लोकांनी निर्माण केले आहेत. येथे लोकायतिक स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करतात.

    १०. दु:खाच्या भयाने सुखाचा त्याग करणे हा मुर्खपणा असून सुखार्थी माणसाने तांदळातून आपण तुस काढून तांदुळ वापरतो त्याप्रमाणे दुख्खद भाग वगळून सुख घ्यावे. आप्तजनांवरही अंधश्रद्धा ठेवू नये. श्रद्धेने सत्याचा शोध लागत नाही. अज्ञात गोष्टींचा पाठपुरावा करण्याऐवजी ऐहिक जीवन सुखकर कसे होईल ते पहावे. व्रत-तप-उपवास करून शरीराचे हाल करुन परलोकातील अज्ञात जीवनाची कामना त्याज्ज्य आहे.

    पृथ्वी, आप, वायू व तेज ही चार तत्वे लोकायतिक मान्य करतात व त्यांच्या समुदायाने देह बनतो (इंद्रिये व विषय) असे म्हणतात. या तत्वांच्या संयोगाने चैतन्य निर्माण होते व चैतन्य विशिष्ट देह म्हणजे शरीर होय असेही हे तत्वज्ञान मानते.

    आता आपण लोकायतिक मताचे नीट आलोकन केले तर लक्षात येईल हे मत अत्यंत तर्कनिष्ठ, बुद्धीवादी आणि इहवादी आहे. अन्य अवैदिक/निरिश्वरवादी तत्वज्ञानापेक्षा ते जास्त प्रत्यक्षवादी...जडवादी आहे. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्यामुळे एकार्थाने हा विचार विज्ञानवादीही आहे. सर्वदर्शन संग्रहात "चार्वाकवाद्यांचे विचार हे सर्वांना समजण्यासारखे असल्याने ते खोडुन काढणे कठीण आहे." असे म्हटले आहे. यातच "चार्वाक मताचा स्वीकार केल्याने बहुजनांचे कल्याण होईल. चार्वाक मत सुखवादी असले तरी ते उच्छृंखल भोगवादाला थारा देत नाही." असेही या ग्रंथात म्हटले आहे.

    चार्वाक मताची धास्ती वैदिक धर्माने तर घेतलीच पण शैव, बौद्ध व जैन या अवैदिक धर्मांनीही घेतली होती यावरून ते मत किती लोकप्रिय असेल हे अंदाजिता येते. याचे कारण म्हणजे चार्वाकांनी वैदिक मतांचे अथवा मुर्तीपुजकांचेच खंडण केले असे नव्हे तर जैन व बौद्ध आगमांवरही त्यांनी हल्ले चढवले. लोकायतिक मुळात धर्मच मानत नसल्याने त्यांनी कोणत्याही अस्तित्वातील धर्मांवर हल्ले चढवणे स्वाभाविकही होते. त्यांच्या तर्कवादापुढे अन्य धर्मियांची किती पंचाईत झाली असेल हे आपण त्यांच्या वरील तत्वज्ञानावरुनच पाहू शकतो. रामायणात भरताजवळ रामाने लोकायतिकांची भरपूर निंदा केलेली आहे तर महाभारतात एका चार्वाकाला राक्षस म्हणून ब्राह्मणांनी जाळून भस्म केल्याचे शांतीपर्वात नोंदले आहे तर शल्यपर्वात एक चार्वाक दुर्योधनाचा मित्र होता असा उल्लेख आहे. विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे तर जैन ग्रंथांत या दर्शनाला "मिथ्यादृष्टीचा एक आविष्कार" म्हटले आहे. वैदिक व शैवांतील जवळपास सर्वच पंडितांनी चार्वाक मताचे खंडण करण्यात हिरिरीने भाग घेतलेला दिसतो. त्यामुळे गेल्या हजार-बाराशे वर्षांत हे तत्वज्ञान जनमानसातुनही पुसले गेले.

    चार्वाक मताची निर्मिती ही उपनिषदांच्या समकालीनच झाली असावी कारण चार्वाकांनी उपस्थित केलेले काही प्रश्न बृहदारण्यकोपनिषदांसारख्या काही उपनिषदांत आले आहेत. उपनिषद्काल हा सनपूर्व सातवे-आठवे शतक गृहित धरला तर इ.स. च्या सातव्या शतकात झालेल्या आदी शंकराचार्यांच्या काळापर्यंत तरी निश्चितपणे या मताचे प्राबल्य होते असे म्हनता येते. या प्रदिर्घ, जवळपास एक हजार वर्षांच्या काळात अर्थातच या मताचे अनेक आचार्य/तत्वज्ञ झाले असतील. परंतू त्यांचे ग्रंथच "लोप" पावल्यामुळे त्यांची नांवे आपल्याला माहित नाही. जी मते आज उपलब्ध आहेत ती लोकायतिकांची जेवढी मते खंडनासाठी वापरली गेली तेवढ्यापुरती.

    या तत्वज्ञानाचा मुळ निर्माता कोण हे आपल्याला ठाऊक नाही. चार्वाक ही व्यक्ती नसून लोकायतिक मताचे पर्यायी नांव होते हे तर सिद्धच आहे. या मताला बार्हपस्त्य मत असेही क्वचित संबोधले गेले होते पण तेवढ्यामुळे बृहस्पती हा या मताचा जन्मदाता होता
    हेही सिद्ध होत नाही. फार तर एखादा बृहस्पती नांवाची व्यक्ती या प्रदिर्घ कालातील एखादी आचार्य होऊन गेली असावी.

    परंतु या तत्वज्ञानाच्या जन्मदात्याची एवढी चवकशी करण्याचे कारणही नाही. कोणत्याही मानवी समुदायात जेंव्हा धार्मिक स्तोमे माजू लागतात तेंव्हा त्यांतील वैय्यर्थता जाणवणारे व्यक्तिसमुदायही पुढे येतात व तर्कबुद्धीने त्या स्तोमांचा निषेध करत असतात. जीवनाकडे परलोकवादी दृष्टीने न बघता ईहवादी द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करत असतात. तर्काने, प्रत्यक्ष अनुमानाने जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. ख-या अर्थाने हे प्रबोधनपर्वाचे अग्रणी विचारक असतात. त्यांचे तत्वज्ञान रुढी-परंपरा व धर्मांची गारुडे असणा-यांना मानवणे शक्य नसते. त्यांची चौफेर निंदा होणे स्वाभाविकच असते. लोकायतिकांचेही तसेच झाले.

    "यावज्जीवेत सुखंजीवेत ऋणं कृत्वा-घृतं पिबेत" या चार्वाक वचनाचा सोयिस्करपणे "लोकायतिक हे अनीतिमान आहेत." हे जनमानसावर ठसवण्यासाठी वापरले गेलेले विधान. पण लोकायतीक आधी शेती, गोपालन, व्यापार, सरकारी नोकरी आदि मार्गाने धन मिळवावे व सुखाने जगावे असे सांगत जेंव्हा त्याचा अभाव असेल तर कर्जही काढायला हरकत नाही असे म्हणतात हे मात्र टाळले गेले हे येथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. फेडण्याची क्षमताच नसेल तर चैनीसाठी कोणी यावज्जीव कर्ज देणार नाही हा साधा विचार लोकायतिक मताच्या खंडणकर्त्यांना सुचला नाही. परंतू एखादे मत नष्टच करायचे ठरवले तर धर्मपंडित ज्या पद्धतीने आपली प्रतिभा (?) पणाला लावतात तसेच पुढे लोकायतिकांच्या बाबतीत झाले असे म्हणता येईल.

    लोकायतिक मत हे सुखवादी आहे, भोगवादी नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या गोष्टीचा (आत्मा, ईश्वर, परलोक ई) प्रत्यक्ष अनुभव येत नाही, येऊ शकत नाही त्यासाठी देह झिजवण्याला त्यांचा ठाम विरोध आहे. लोकायतिक भारतातील एकमेव इहवादी विचारधारा होती असे म्हणण्यास काहीएक प्रत्यवाय नाही.

    इहवादी विचारधारेतुनच विज्ञानाचा रस्ता मोकळा होतो हे एक सत्य. युरोपातील प्रबोधनकाळ इहवादातुनच निर्माण झाला व त्यातून औद्योगिक क्रांती घडली हे एक वास्तव आहे. खरे तर भारतात इहवाद-सुखवाद लोकायतिकांनी सर्वात आधी आणला. परंतू त्याची तार्किक परिणती जी ऐहिक संसाधनांचे नवनवे शोध लागण्यात अथवा वैज्ञानिक संकल्पनांचा तार्किक पातळीवर लागण्यात व्हायला हवी होती तशी ती झाली नाही हेही एक वास्तव आहे. खरे तर या तत्वज्ञानात प्रबोधनाला अत्यावश्यक असलेले सारे तत्वज्ञान ठासून भरलेले आहे.

    पण सुखवादी तत्वज्ञानाची भोगवादी, चंगळवादी अशी हेटाळणी सर्वच धर्मग्रंथांनी, पुराणांनी व शंकराचार्यांसारख्या प्रकांड विद्वानांनी केल्याने आधी अनेक शतके लोकप्रिय असणारे तत्वज्ञान मागे फेकले गेले. वैदिकांनी आपलेच म्हणून घोषित केल्यावर सांख्य-वैशेषिकांच्या वैज्ञानिक आणि मुळात अनिश्वरवादी-जडवादी असलेल्या तत्वज्ञानाचेही तेच झाले. हे आपल्या भारतियांचे दुर्दैव होय.

    लोकायतिक केवळ तर्ककर्कश बंडखोर होते असे नाही. ते बुद्धीवादी होते. त्यांचा मानवी जीवन व्यवहाराकडे पहायचा दृष्टीकोन विज्ञाननिष्ठ होता. त्यांनी वर्णभेद-जातीभेद या आजच्या समाजालाही ग्रासणा-या बाबींचा निषेध प्राचीन काळापासुनच केला. स्त्रीयांना बंधनात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. जीवनात दु:ख असले तरी ते बाजुला सारून केवळ सुखच निवडावे असा समतोल विचार त्यांनी मांडला. म्हणजे जीवन मुळात सुख-दु:खाचे संमिश्रण आहे हे त्यांना मान्य होते. एकांगी विचार लोकायतिकांनी केल्याचे आढळत नाही.

    राजसत्ता ही प्रत्यक्ष असल्याने तिच श्रेष्ठ आहे असे म्हणत त्यांनी ही सत्ता विवेक आणि न्यायाने परिपूर्ण असली पाहिजे असे वास्तवदर्शी व बुद्धीप्रामाण्यवादी विचार त्यांनी मांडले.

    आणि सर्वात धाडसी पण सार्वकालिक होऊ शकनारा सिद्धांत त्यांनी मांडला...तो म्हणजे त्यांनी धर्मांची आवश्यकताच नाकारली. खरे तर हा अत्यंत बंडखोर विचार होय. धर्मांनी समस्त मानवी जीवन जखडून टाकले असता मानवी स्वातंत्र्य हाच एकमेव मोक्ष होय असे उच्चरवाने सांगणारे चार्वाक/लोकायतिक आजही कालसुसंगत आहेत. अनुकरणीय आहेत. कारण आजही आपण धर्मांनी, भेदभावयुक्त धर्मतत्वांनी प्रचंड घेरलो गेलेलो आहोत. धर्ममय जग म्हटले तर आज कोणता धर्म समस्त जगाचे कल्याण करू शकेल यावर प्रचंड वितंडे आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या पुराणता आणि श्रेष्ठत्वाच्या घमेंडीत आहे आणि त्यातून अगदी हिंसकही संघर्ष जगभर उद्भवत आहेत हे आपण नित्य पाहतो. धर्मांतर्गतही विवाद आहेत.

    अशा परिस्थितीत लोकायतिक मत हे खरा मार्ग दाखवते. धर्म आणि ईश्वरी सत्ता नसलेले...फक्त मानवी स्वातंत्र्याचे मानवासाठीच असलेले जग ही आपली खरी गरज आहे. आणि लोकायतिक मत हे आपल्याला आजही मार्गदर्शक ठरू शकते

58 comments:

  1. "विनयपिटकात बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख आहे"

    please provide reference...

    ReplyDelete
  2. बौद्ध धम्म हा निरीश्वरवादी आणि चार्वाक देखील निरीश्वरवादी! मग बुद्धाने लोकायत मतावर बंदी घालण्याचे कारण काय?

    ReplyDelete
    Replies
    1. Sanjay Sir,

      Please provide exact reference from Pali "Vinaypitakaa" and not from "Bharatiy Sanskruti Kosh" which is written by Mahadevshastri Joshi. Only Pali reference authenticated in this case.

      Sanjay Pataskar

      Delete
    2. Sanjay Sir,

      Hurry up, we are awaiting for the same!

      Sanjay Pataskar

      Delete
  3. यांच्याकडे संदर्भ वगैरे काहीही नाही, फक्त एकच तत्व खोटे लिहा पण रेटून लिहा!
    जी तत्वज्ञानी व्यक्ती "माझे विचार सुद्धा तपासून, बुद्धीला पटले तरच स्वीकारा" असे म्हणत असेल तर त्यांच्यावर दुसऱ्या एखाद्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावयास प्रतिबंद करील अशी यतकिंचितही शक्यता वाटत नाही, पण असा आरोप करणाऱ्यांना काय म्हणावे, हे वाचकच ठरवतील.

    सुशिल साठे.

    ReplyDelete
    Replies
    1. टॉमस विल्यम रीस डेव्हिड्झ लिखित विनयपिटकातील ‘पातिमोक्ख’, ‘महावग्ग’ व ‘चुल्लवग्ग’ यांची इंग्रजीत भाषांतरेही तपासली (३ खंड, १८८१, ८२ व ८५) बुद्धाने भिक्षुंना लोकायतशास्त्र शिकवण्यास बंदी घातल्याचा उल्लेख कोठेही सापडला नाही.

      सुशिल साठे.

      Delete
    2. Once the Buddha, while passing through the land of the Kosalas accompanied by a large
      following of disciples, came to the town of Kesaputta which was inhabited by the Kalamas.

      1. When the Kalamas came to know of his arrival they betook themselves thither where the
      Buddha was and sat down on one side. So seated, the Kalamas of Kesaputta spoke thus to
      the Buddha :
      2. " There are. Sir, some ascetics and recluses who come to Kesaputta and who elucidate and
      exalt their own views, but they break up, crush down, revile and oppose the views of others.
      And there be other ascetics and recluses. Sir, who come to Kesaputta, and they too expound
      and magnify their own beliefs, but destroy, suppress, despise and set themselves against the
      beliefs of others.
      3. "And so. Sir, we are in uncertainty and doubt, knowing not which among these venerable
      ascetics speaks truth and which falsehood."
      4. " Good cause, indeed, have you Kalamas to be uncertain ; good cause have you to doubt," said
      the Buddha. "Truly, upon just occasion has uncertainty and doubt arisen in you."
      5. " Come, 0 you Kalamas," continued the Sir, " do not go merely by what you hear ; do not go
      merely by what has been handed down from one to another ; do not go by what is commonly
      reported ; do not go merely by what is found written in the scriptures ; do not go by subtleties
      of reasoning, do not go by subtleties of logic ; do not go merely by considerations based upon
      mere appearances ; do not go merely by agreeable beliefs and views ; do not go merely by what
      looks to be genuine ; do not go merely by word of some ascetic or superior."
      6. "What, then, should we do? What test should we apply?" asked the Kalamas.
      7. "The tests are these," replied the Buddha; " ask. yourselves, do we know whether : ' These
      things are insalutary ; these things are blameworthy ; these things are reprehended by the wise ;
      these things being done or attempted lead to ill-being and to suffering.' '
      8. " Kalamas, you should go further and ask whether the doctrine taught promotes craving, hatred,
      delusion, and violence.
      9. "This is not enough, Kalamas, you should go further and see whether the doctrine is not likely
      to make a man captive of his passions, and is not likely to lead him to kill living creatures ; take
      what has not been given to him ; go after another's wife ; utter falsehood, and cause others to
      practise like deeds ?
      10. " And finally you should ask : ' Whether all this does not tend to his ill-being and suffering.'
      11. " Now, Kalamas, what think you ?
      12. "Do these things tend to man's ill-being or well-being ? "
      14. -"To his ill-being, Sir," replied the Kalamas.
      15. " What think you, Kalamas,—are these things salutary or insalutary ? "

      Delete
    3. 16. "They are insalutary. Sir."
      17. "Are these things blameworthy?"
      18. " Blameworthy, Sir," replied the Kalamas.
      19. " Reprehended by the wise or approved by the wise?"
      20. " Reprehended by the wise," replied the Kalamas.
      21. " Being done or attempted, do they lead to ill-being and to suffering ? "
      22. " Done or attempted, Sir, they lead to ill-being and to suffering."
      23. "A scripture which teaches this cannot be accepted as final or infallible ? "
      24. " No, Sir," said the Kalamas.
      25. " But this, 0 Kalamas, is just what I have said. What I have said is " do not go merely by what
      you hear; do not go merely by what has been handed down from one to another; do not go
      merely by subtleties of reasoning; do not go by subtleties of logic ; do not go by considerations
      based upon mere appearances ; do not go merely by agreeable beliefs and views ; do not go
      merely by the word of some ascetic or superior.
      26. " Only when of yourselves you indeed know : These things are insalutary ; these things
      are blameworthy ; these things are reprehended by the wise ; these things being done or
      attempted lead to ill-being and to suffering '—then, Kalamas, you should put them
      away."
      27. " Wonderful, Sir, most wonderful! We go to Sir, the Buddha, for refuge, and to his
      Teachings. As followers. Sir, may the Buddha accept us, from this day henceforth long
      as life shall last, we take our refuge in you."
      28. The substance of the argument is plain. Before you accept anybody's teachings as authoritative,
      do not go by the fact that it is contained in the scriptures, do not go by the subtleties of logic ;
      do not go by considerations based upon mere appearances; do not go merely by the fact that
      beliefs and views preached are agreeable ; do not go merely because they look to be genuine;
      do not go merely by the fact that the beliefs and views are those of some ascetic or superior.
      29. But consider whether the beliefs and views sought to be inculcated are salutary or insalutary,
      blameworthy or blameless, lead to well-being or ill-being.
      30. It is only on these grounds that one can accept the teachings of anybody.
      -----------------------------------------------------------------------------------------------

      Delete
    4. बुद्धांचे कालाम सुत्त (असे सुत्त की ज्याची धास्ती सर्व धर्मांना तसेच सर्व संप्रदायांना सुद्धा आहे)

      ‘एथ तुम्हे, कालामा, मा अनुस्सवेन, मा परम्पराय, मा इतिकिराय, मा पिटक सम्पदानेन, मा तक्कहेतु, मा नयहेतु, मा आकार परिवितक्केन , मा दिट्ठिनिज्झानक्खन्तिया, मा भब्बरूपताय, मा समणो नो गरूति। यदा तुम्हे, कालामा, अत्तनाव जानेय्याथ – ‘इमे धम्मा अकुसला, इमे धम्मा सावज्जा, इमे धम्मा विञ्ञुगरहिता, इमे धम्मा समत्ता समादिन्ना अहिताय दुक्खाय संवत्तन्ती’’’ति, अथ तुम्हे, कालामा, पजहेय्याथ।

      १. एखादी गोष्ट वारंवार ऐकली आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      २. एखादी गोष्ट परंपरेने मानली जात आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      ३. एखादी गोष्ट आमच्या धर्मग्रंथाच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      ४. एखादी गोष्ट तर्कसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      ५. एखादी गोष्ट न्यायसंगत आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      ६. एखादी गोष्ट आमच्या मताच्या अनुकुल आहे म्हणुन ती स्वीकारु नका.
      ७. सांगणाऱ्याचे व्यक्तीत्व व त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका.
      ८. सांगणारा श्रमण किंवा ब्राह्मण हा पुज्यनीय आहे म्हणुन त्याची गोष्ट स्वीकारु नका....

      तुम्ही सत्याला आपल्या अनुभवाने जाणा, कोणत्या गोष्टी कुशल आहेत, निर्दोष आहेत, त्यानुसार चालण्यामुळे आमचे हित होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल, त्याचाच स्वीकार करा. जे सत्य आपल्या अनुभवांनी जाणले गेले, आणि बघितले कि हे कुशल आहे, तेव्हा ते केवळ जाणुनच राहु नका, तर त्यानुसार आचरण करा तरच तुमचे कल्याण होईल.

      Delete
  4. I have taken this reference from "Bharatiy Sanskruti Kosh" towards Budha's opposition to Lokayat thought.

    ReplyDelete
    Replies
    1. "I have taken this reference from "Bharatiy Sanskruti Kosh" towards Budha's opposition to Lokayat thought."

      It would be great if your put more light on what exactly mention in Bharatiy Sanskruti Kosh...please mention edition, chapter etc..for both vinay pitak and BS kosh
      Also if your have any other reference it would be great..as one reference is not enough always.
      I wonder you make your fixed view and tried to established it... on the basis of one reference..

      Delete
    2. Have you read Vinaypitaka? Do you know Buddha's views about Sankhya and other philosophies existing in his times? Do you know how much Buddha borrowed and how much he rejected? Do you think Buddha was a perfect in philosophy? If yes, then you come forward to oppose my views with proofs and tell me Buddha didnt say what I have mentioned.

      Delete
    3. "भारतीय संस्कृती कोश" असा मोघम संदर्भ नको, खंड कोणता? कोणत्या मथळ्याखाली ते आले आहे?पं. महादेवशास्त्री जोशी यांनी असे लिहिण्यामागे संदर्भ काय होता? विनयपिटकाची नाळ खरेच त्याच्याशी जोडली गेली आहे काय? कि उगीचच भले मोठे संदर्भ देवून लोकांना झुलवत ठेवायचे आहे काय? ह्या गोष्टींबद्दल माहिती मिळाल्यास बरे होईल.

      अविनाश, ठाणे

      Delete
    4. खा, प्या, मजा करा!
      कारण जन्म पुन्हा-पुन्हा मिळत नाही!

      कर्ज घेतलेले असले तरी तूप-रोटी खाणे बंद करू नका!

      अशी चंगळवादी वृत्ती माणसाला कोठे घेवून जाईल, याचा विचार करायला नको काय?

      अविनाश, ठाणे

      Delete
    5. "एक म्हणतो, खा, प्या, मजा करा. कारण उद्या आपण मरणारच आहोत.” (चार्वाक विचार) दुसरा म्हणतो, “सर्व वासना मारुन टाका. कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहेत.” (जैन तत्वज्ञान) हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून बुद्धाने ते नाकारले.

      मात्र कोणत्याही तत्वज्ञानाच्या अभ्यासाला बुद्धाने विरोध केला असे म्हणणे खूपच धाडसाचे ठरेल, कारण ते बुद्धाच्या विचार पध्दतीचा याच्याशी अजिबात मेळ बसत नाही.

      Delete
    6. 1. The Buddha did not accept the teachings of the new philosophers.
      2. His rejection of their teaching was not without reasons. He said that :
      3. If the doctrines of Purana Kassyappa or Pakudha Kacchyana were true then one can do
      any evil or any harm ; one may even go to the length of killing another without involving
      any social responsibility or social consequences.
      4. If the doctrine of Makhali Ghosal is true then man becomes the slave of destiny. He cannot liberate himself.
      5. If the doctrine of Ajit Kesakambal is true then all that man has to do is to eat, drink and make merry.
      6. If the doctrine of Sanjaya Betaputta was true then man must float about and live without a positive philosophy of life.
      7. If the doctrine of Nigantha Nathaputta was true then man's life must be subjected to Asceticism and Tapascharya, a complete subjugation and uprooting of man's instincts and desires.
      8. Thus, none of the paths of life suggested by the philosophers appealed to the Buddha. He thought they were the thoughts of men who had become hopeless, helpless and reckless.
      He therefore decided to seek light elsewhere.

      Delete
    7. What HE Rejected

      1. This survey of the philosophical and religious thought shows that at the time when the Buddha formulated his Sasana, certain ideas had a firm grip on the mind of the people.
      They were : (i) Belief in the infallibility of the Vedas ; (ii) Belief in Moksha or Salvation of the soul, i.e., its ceasing to be born again ; (iii) Belief in the efficacy of rites, ceremonies and sacrifices as means of obtaining moksha; (iv) Belief in Chaturvarna as the ideal for social organization; (v) Belief in Iswara as the creator of and in Brahmana as the principle underlying the universe. (vi) Belief in Atmana, or the soul. (vii) Belief in
      Sansara, (wandering together), i.e., transmigration of the soul. (viii) Belief in Karma, i.e., the determination of man's position in present life by deeds done by him in his past life.
      2. In formulating the principles of his Sasana the Buddha dealt with this old stock of ideas in his own way.
      3. The following are the ideas which he rejected : (i) He condemned indulging in speculation as to the whence, whither and what am I ? (ii) He discarded heresies about the soul and refrained from identifying it with either the body, sensations, volitions and consciousness.
      • (iii) He discarded all the Nihilistic views which were promulgated by certain religious teachers. (iv) He condemned such views as were held by heretics. (v) He discarded the theory that the cosmic progress had a known beginning. (vi) He repudiated the theory that a God created man or that he came out of the body of some Bramha. (vii) The existence
      of the soul he either ignored or denied.

      Delete
    8. What HE Modified
      (i) He accepted the great grand law of cause and effect with its corollaries. (ii) He repudiated the fatalistic view of life and other equally foolish view that a God predestined as to what should happen for man and the world. (iii) He discarded the theory that all deeds committed in some former birth have the potency to produce suffering, making
      present activity impotent. He denied the fatalistic view of Karma. He replaced the view of Karma by a much more scientific view of Karma. He put new wine in old bottle. (iv) Transmigration (sansara) was replaced by the doctrine of re-birth. (v) He replaced the doctrine of moksha or salvation of the soul by the doctrine of Nibbana.
      5. The Buddha Sasana is thus an original piece. The little in it which is old is either modified or restated.

      Delete
    9. What HE Accepted
      1. The first distinguishing feature of his teachings lay in the recognition of the mind as the centre of everything.
      2. Mind precedes things, dominates them, creates them. If mind is comprehended all things are comprehended.
      3. Mind is the leader of all its faculties. Mind is the chief of all its faculties. The very mind is made up of those faculties.
      4. The first thing to attend to is the culture of the mind.
      5. The second distinguishing feature of his teachings is that mind is the fount of all the good and evil that arises within and befalls us from without.
      6. Whatsoever there is of evil, connected with evil, belonging to evil—that issues from the mind. Whatsoever there is of good, connected with good, belonging to good—all issues from mind.
      7. If one speaks or acts with a pounded mind then affliction follows him as the wheels of the cart follow the feet of the bullocks who pull the cart. The cleaning of the mind is, therefore, the essence of religion.
      8. The third distinguishing feature of his teachings is the avoidance of all sinful acts.
      9. The fourth distinguishing feature of his teaching is that real religion lies not in the books of religion but in the observance of the tenets of the religion.
      10. Can anyone say that the Buddha's religion was not his own creation?
      ...........................................................................................

      Delete
  5. लोकायतदर्शन

    एक प्राचीन भारतीय दर्शन. म्हणजे विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान. हे दर्शन हा भौतिकवाद आहे. देहाहून वेगळा आत्मा नाही ; ईश्वर वा देव, भूत, पिशाच, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इ. सर्व काल्पनिक व असत्य आहे; पृथ्वी, जल, तेज व वायू ही चार भूतद्रव्येच आहेत व त्यांचेच शरीर बनते व त्यात चैतन्य वा जाणीव हा गुण उत्पन्न होतो. मन वा आत्मा देहाहून वेगळा नाही; अर्थ व काम हीच मानवी उद्दिष्टे होत; राजकीय सत्ता आवश्यक आहे; ‘प्रत्यक्ष’ हेच ज्ञानाचे मुख्य साधन आहे, असे या तत्त्वज्ञानाचे थोडक्यात तात्पर्य आहे. हे दर्शन प्रथम बृहस्पतीने व चार्वाक या आचार्याने मांडले असे म्हणतात. जयराशीभट्टाचा तत्त्वोपप्लवसिंह हा ग्रंथ सोडला, तर ही विचारप्रणाली विशद करमारा, स्वतः एखाद्या लोकायतपंथीयानेच लिहिलेला, एकही सूत्रग्रंथ किंवा टीकाभाष्यग्रंथ वगैरे उपलब्ध नाही. लोकायतिकांवर टीका करण्यासाठी व त्यांची विधाने खोडून काढण्यासाठी इतर भारतीय दर्शनकार पूर्वपक्ष म्हणून त्या दर्शनासंबंधी जे सांगतात ते, आणि सर्वदर्शनसंग्रह ह्यांसारख्या संकलनात्मक ग्रंथांतून ह्या दर्शनावर जी प्रकरणे येतात ती, एवढ्यावरूनच लोकायत किंवा चार्वाकदर्शनाची विचारसरणी काय होती, हे समजून घ्यावे लागते.

    इ.स.पू.सातव्या-सहाव्या शतकांपासून तर इ.स.च्या चौदाव्या-पंधराव्या शतकापर्यंतच्या संस्कृत, पाली आणि अर्धमागधी भाषांतील साहित्यातून जे मिळते, त्यावरून लोकायतिकांची ज्ञानमीमांसेची स्वतंत्र अशी एक पद्धती होती; त्यांचे स्वतःचे एक प्रमाणशास्त्र होते आणि त्यास अनुसरूनच ते विश्वव्यापारासंबंधी व मानवी जीवनासंबंधी इतर सर्व दार्शनिकांहून वेगळे असे काही सांगत होते असे दिसून येते. अन्य दार्शनिकांनी मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द ह्या चार प्रमाणांपैकी लोकयतिकांना फक्त प्रत्यक्ष हेच प्रमाण पूर्णतया मान्य असे. ह्याखेरीज प्रत्यक्षनिष्ठ आणि अनुभवजन्य अशा तऱ्हेची अनुमाने मानायला लोकायतिकांची हरकत नव्हती शब्द किंवा आप्तवाक्य हे ज्ञानसाधन नव्हे. वेद, पुराणे, जैनांचे आगाम किंवा बौद्धांचे त्रिपिटक ग्रंथ अशा कोणत्याही ग्रंथाच्या प्रामाण्याला ते प्रखर विरोध करीत.

    ReplyDelete
  6. प्रत्यक्षपणे आणि अनुभवजन्य अनुमानाने जे समजते. तेवढ्यावरून विश्वव्यापारासंबंधी ते असे म्हणत, की ईश्वर नावाचा विश्वाचा कोणी निर्माता आणि नियंता मानण्याचे कारण नाही. बौद्ध आणि जैनही निरीश्वरवादी असले, तरी ते सर्वव्यापी आणि त्रिकालाबाधित असा कर्मसिद्धान्त व जन्ममरणपरंपरा मानतात. लोकायतिकांना ईश्वराप्रमाणे कर्मसिद्धान्त व जन्ममरणपरंपरा ह्याही गोष्टी मंजूर नव्हत्या. कर्म आणि त्यांचे फल मानल्यामुळे पुनर्जन्म, स्वर्ग, नरक वगैरे अनेक गोष्टी ब्राह्मणांप्रमाणेच बौद्ध आणि जैन ह्यांच्याही विचारसृष्टीत शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे वैदिक दर्शनांतून येणारा देहाव्यतिरिक्त असलेला असा काही आत्मा जैन आणि बौद्धांनाही मानावा लागतो. वैदिक दर्शनांप्रमाणेच जैन आणि बौद्ध ह्या अवैदिक दर्शनांतही मोक्षावस्थेवर आणि मोक्ष ह्या परमपुरुषार्थावर विश्वास आहे. लोकायतिकांच्या तत्त्वज्ञानात ईश्वर नाही, कर्मफल नाही, आत्मा नाही, मोक्ष नाही आणि परलोक किंवा पुनर्जन्मही येत नाही. त्यांच्या मते हे विश्व भूतात्मक आहे. पृथ्वी जल, तेज आणि वायू ही चार भूते होत. जीवचैतन्यसुद्धा भूतांपासूनच होते. ते कसे होत असेल, ह्याविषयी तर्क करताना ती एक मद्यार्कनिर्मितीसारखी रासायनिक प्रक्रिया असली पाहिजे आणि विशिष्ट भूसंयोगाने जीवचैतन्य निर्माण होत असले पाहिजे, असे ते म्हणतात. त्यांच्या मते उत्पत्ती, स्थिती,लय हे सगळे स्वभावात्मक आहे. विश्वव्यवहाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी ईश्वर गृहीत धरण्याचे काहीच कारण नाही.

    लोकायतिकांच्या मते ईश्वर, कर्मफल आणि देहाव्यतिरिक्त आत्मा ह्यांपैकी काहीच अस्तित्वात नसल्यामुळे कर्मकांडात्मक धर्म पूर्णपणे अनावशअयक ठरतो. त्यांच्या मते असला सगळा धर्म म्हणजे धूर्तांचे कारस्थान असून त्याला मूर्ख लोक बळी पडत असतात. सर्वदर्शनसंग्रहात म्हटल्याप्रमाणे चार्वाकांच्या मते, बहुजनांच्या हितासाठी, त्यांच्या मताचा आश्रय घेऊन लोकांना कर्मकांडांत्मक धर्मातून सोडविणे आवश्यक आहे. जगात दु:खे आहेत, हे लोकायतिकांनाद्दी दिसते; पण म्हणून जीवनाकडे पाठ फिरवावी, जपतपाच्या मार्गाला लागावे किंवा संन्यास घ्यावा हे त्यांना मान्य नाही. काटे बाजूला करून मासा खावा लागतो; त्याप्रमाणे दुःखे टाकून व त्यांवर मात करून सुखोपभोग घ्यावा असे ते प्रतिपादित. सुखी जीवन जगण्यासाठी शेती, व्यापार, सरकारी नोकरी वगैरे उपायांनी धनार्जन करावे. मात्र अग्निहोत्र, भस्मधारण ही बुद्धी आणि पराक्रम नसलेल्यांच्या जीवनाची साधने आहेत, हे ध्यानी घ्यावे.

    ReplyDelete
  7. लोकायतिकांनी विश्वव्यापारासंबंधीचे व वैयक्तिक जीवनसंबंधीचे आपले तत्त्वज्ञान प्रतिपादन करीत असतानाच काही महत्त्वाचे सामाजिक विचारही सांगितलेले आहेत. ईश्वर आणि धर्म न मानणारे चार्वाकपंथीय राजसत्ता मानायला तयार होते. कारण त्यांच्या मते शासन ही समाजधारणेसाठी आवश्यक अशी गोष्टी होती. लोकायतिक वर्मभेद आणि जातिभेद अशास्त्रीय आणि कृत्रिम आहेत असे मानीत. लोकायतिक स्त्रीस्वतंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. इतस्ततः विखुरलेल्या काही उल्लेखांवरून जे दिसते, त्यावरून चार्वाक किंवा लोकायत हे सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी झगडण्यास सिद्ध होते.

    वरील सर्व तत्त्वज्ञान कोणा एका विचारवंताने एकाच वेळी सांगितले असे नव्हे. अगदी वेदकालापासून अशा प्रकारची विचारसरणी कमीअधिक प्रमाणात सांगितली जात होती. देवतांच्या अस्तित्वाविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या. यज्ञाचे फळ निश्चित मिळते काय, ह्याविषयीही काही ऋषी साशंक असत; तथापि वेदोपनिषदादी प्राचीन ग्रंथांतून असे बंडखोर विचार क्वचित डोकावत असले, तरी जीवजगताचे पूर्णतया भौतिक असे स्पष्टीकरण आणि प्रत्यक्षनिष्ठ तर्कशास्त्रावर आधारलेले लोकायतशास्त्र असे इ. स. पू. सहाव्या शतकातच सांगितले गेले. ते सांगणारा अजित केशकंबली नावाचा तत्त्वज्ञ आणि त्याचे विचार ह्यांची दखल बौद्ध ग्रंथांतून घेतलेली आहे. बुद्धकाली सुस्थापित झालेल्या ह्या दर्शनाचे प्रथम नामाकरण ‘लोकायत’ असेच दिसते. कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायतदर्शन ही आन्वीक्षिकी आहे, असे म्हटले आहे. ‘बार्हस्पत्य’ आणि ‘लोकायत’ हे शब्द अगदी समानार्थक असे वापरलेले दिसतात, ते इ.स.पू. च्या आठव्या-सातव्या शतकांपासूनच. ह्याच काळात चार्वाक शब्दही वापरलेला दिसतो. महाभारतातील चार्वाक राक्षस सोडला, तर नास्तिक दर्शककार ह्या अर्थाने चार्वाक अशी शब्दयोजना इ. स. च्या सातव्या शतकापूर्वी अजिबात झालेली नाही. उपर्युक्त सामाजिक स्वरुपाचे विचार इ.स. च्या सहाव्या शतकापासून चोदाव्या शतकापर्यंतच्या साहित्यातून अनेक ठिकाणी उल्लेखिलेले आहेत. मूळ वैचारिक बैठक एक असली, तरी तपशीलांतील मतभेदांमुळे चार्वाकांतही उपपंथ पडले असावेत, असे आठव्या शतकातील जयंताच्या न्यायमंजरीतील सुशिक्षित चार्वाकांच्या वेगळ्या स्पष्ट निर्देशावरून वाटते.

    ReplyDelete
  8. प्राचीन साहित्यात लोकायतिक किंवा चार्वाक पंथीय म्हणून अनेक व्यक्तिनामांचे निरदेश होतात. ही सर्वच नावे खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक व्यक्तींची असतील असे नाही. उपनिषदांतील विरोचन किंवा बोद्ध आणि जैन वाङ्‌मयातील प्रदेशी किंवा कुरुचंद्र वगैरे अनेक नावे ही वाङ्‌मयीन पात्रे असावीत असे वाटते. तथापि पाली साहित्यात उल्लेखिलेला अजित केशकंवली, पतंजलीला माहीत असलेला भागुरी आणि कमलशीलाने उल्लेखिलेला पुरंदर तसेच तत्त्वोपप्लवसिंहाचा कर्ता जयराशीभट्ट ही माणसे काल्पनिक मानण्याचे काहीच कारण नाही. ज्याच्या नावाने हे दर्शन पुढील काळात फार प्रसिद्ध झाले तो चार्वाक हाही एक ऐतिहासिक पुरुष असला पाहिजे, असे समजण्यास सबळ पुरावा आहे. ह्या दर्शनाचे मूळ लोकायत हे नाव जवळजवळ नाहीसे होऊन चार्वाकदर्शक म्हणूनच ते विख्यात झाले, ह्यावरून ⇨ चार्वाकाने ह्या दर्शनाची अत्यंत व्यव्स्थित अशी फेरमांडणी करून, त्याचा हीरीरीने प्रचार केला असला पाहिजे हे स्पष्ट होते.

    एका कोरीव लेखात आलेले लोकायतनगर हे स्थलनांही विचारात घेण्यासारखे आहे. ह्या ठिकाणी लोकायतिकांची एखादी संघटना किंवा शिक्षणसंस्था असावी. काही शिलालेखांतूनही लोकायतिकांचे उल्लेख आहेत.

    प्राचीन काळी भारतात जी निरनिराळी तत्त्वज्ञाने सांगितली गेली, त्यांत चार्वाकदर्शनाचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. बुद्धिवादासाठी, विचारस्वातंत्र्यासाठी उभारलेले ते एक बंड होते. परमेश्वर, स्वर्ग, नरक वगैरे कल्पनांनी बुद्धी विचलित होऊ न देता जीवनाचे सौंदर्य भोगण्याचे ते आवाहनच होते. अंधश्रद्धा आणि दांभिकता ह्यांविरुद्धचा तो एक लढा होता. संघटित प्रयत्नांच्या अभावी, लोकायतवादी हे जीवनाला योग्य वळण देण्यात व्हावेत तेवढे यशस्वी झाले नाहीत. तरीही भारताच्या वैचारिक इतिहासातील लोकायतदर्शनाचे वेगळे स्थान आणि त्याची वैशिष्टयपूर्ण कामगिरी नाकरता येणार नाही. लोकायतिक हे स्वत: आग्रहाने बुद्धिप्रमाण्यवाद सांगत राहिले; आणि लोकायतिकांच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी वैदिक, बौद्ध, जैन ह्या पंथांतील इतर सर्वच दार्शिनिकांना कमीअधिक प्रमाणात बुद्धिवादी होण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. म्हणूनच भारताच्या सामाजिक जीवनावर ह्या दर्शनाचा प्रभाव पडला असो वा नसो, परंतु ज्ञानमीमांसेच्या विकासाच्या दृष्टीने त्याने केलेली कामगिरी बहुमोल मानवीच लागेल.

    संदर्भ : 1. Chattopadhyaya, Debiprasad, Lokayata, A Study in Ancient Indian Materiallism, Delhi, 1959.
    2. Radhakrishnan, S. History of Philosophy-Eastern and Western, London, 1952.
    ३. आठवले, सदाशिव, चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, वाई, १९८०.
    ४. गाडगीळ, स. रा. लोकायत, मुंबई, १९७४.
    ५. पाठक, सर्वानंद, चार्वाकदर्शन की शास्त्रीय समीक्षा, वाराणसी, १९६५.
    ६. साळुंखे, आ. ह. चार्वाकदर्शन, मुंबई १९८७.

    ReplyDelete
  9. चार्वाक

    भारतीय दर्शनांपैकी ⇨ लोकायतदर्शन ह्या भौतिक आणि नास्तिकवादी दर्शनाशी निगडित असलेले एक विशेष नाम, तसेच सामान्य नाम. चार्वाक हा लोकायतदर्शनाचा आचार्य होता, असे काही मानतात; तथापि ह्या नावाचा आचार्य खरोखरीच होऊन गेला किंवा काय ह्याविषयी मतभेद आहेत. रघुनाथ भास्कर गोडबोले ह्यांच्या भरतखंडाचा अर्वाचीन कोश (१८८१) ह्या ग्रंथात चार्वाकासंबंधी काही माहिती दिली आहे, ती अशी : चार्वाकाचा जन्म अवंती देशात क्षिप्रा आणि चामला ह्या नद्यांच्या संगमावर असलेल्या शंखोद्वार क्षेत्री झाला (युधिष्ठिर शक ६६१ - इ. स. पू. २४४१) व पुष्करतीर्थी यज्ञगिरीवर त्याचा अंत झाला (युधिष्ठिर शक ७२७ - इ.स.पू. २३७५). त्याच्या पित्याचे नाव इंदुकांत आणि आईचे सृग्विणी होते. एका जैन ग्रंथाच्या आधारे ही माहिती देण्यात आलेली असली, तरी ह्या जैन ग्रंथाचे नाव कोशकारांनी दिलेले नाही व ते उपलब्ध झालेले नाही.

    कृष्णमिश्राच्या (अकराव्या शतकाच्या उत्तरार्ध) प्रबोधचंद्रोदय ह्या नाटकात बृहस्पती हा लोकायतदर्शनाचा संस्थापक व चार्वाक हा त्याचा पट्टशिष्य प्रमुख प्रचारक म्हणून येतो. सर्वदर्शनसंग्रहात चार्वाकाला ‘नास्तिकशिरोमणि’ म्हटले आहे. महाभारतात चार्वाक हा दुर्योधनाचा मित्र म्हणून येतो. महाभारताच्या शल्यपर्वात पराभवाने व्यथित झालेल्या दुर्योधनाला आपला संन्यासी मित्र चार्वाक ह्याची आठवण होते आणि आपला मृत्यू झाल्यास आपला वीरोचित अंत्यविधी चार्वाकच करील, असे वाटते. महाभारताच्या शांतिपर्वात तो एक राक्षस म्हणून येतो. भारतीय युद्धाच्या समाप्तीनतर अश्वमेघ यज्ञाच्या तयारीत असलेल्या युधिष्ठिराला एका परिव्राजकाच्या रुपात भेटून तो प्रश्न करतो, की ‘स्वतःच्या बांधवांना मारुन मिळविलेला विजय खरा आहे काय ?’ हा दुर्योधनाचा मित्र, चार्वाकनामक राक्षस आहे, असे ब्राह्मण सांगतात. श्रीकृष्णही तेथे येतो. चार्वाक हा तपस्वी असला, तरी ब्राह्मणांचा अवमान केल्यामुळे त्याचा ब्राह्मणांकडून वध होईल असे तो सांगतो. चार्वाकाला त्यानंतर मारुन टाकण्यात येते. काहींच्या मते हा राक्षस चार्वाक व लोकायतदर्शनाशी निगडित असलेला चार्वाक एकच होत.

    प्रा. सदाशिव आठवले ह्यांच्या मते चार्वाक हा लोकायतदर्शनाचा संस्थापक नव्हे; परंतु एक प्रभावी आचार्य असावा व इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत केव्हातरी तो होऊन गेला असावा.
    ****************************************************************************

    ReplyDelete
  10. संग्रामसिंह घाटगे हे आमचे काका ,त्यांना जाउन १ वर्ष होईल आता होळीत !
    पण हे नवे संग्रामसिंह कोण ते माहित नाही
    आपण कोल्हापुरात असता हे समजले पण नेमके शाहूपुरीत कुठे ते समजेल का ,
    शाहू टाकिजच्या बाहेर एक नऊवारी नेसलेली नटरंगी दिसते तिच्या बरोबर कानातला मळ काढणारा असतो तेच आपण का ?
    आमच्या घरीही काकी किंवा कुणालाच आपणा विषयी माहित नाही याचे आश्चर्य वाटते एकजण घरातून घालवून दिलेला संग्रामसिंह नावाचा भटार खान्यातला वाढपी होता पूर्वी पण ते आपण नक्कीच नसणार कारण त्यांनी वेषांतर करून देशांतर करत कोल्हापुरातून सातारला पलायन केले आणि आम्ही त्यांना शासनही केले होते हल्ली ते कोल्हापुरात कागद गोळा करत हिंडत असतात , ते तर आपण नाही न ?

    आम्ही ब्राह्मण नाही हे तर आपण भेटल्यावर मान्य कराल परंतु दरम्यान असे अविचारी उद्गार आमच्या घराण्याविषयी आपण बोलू नये असे सांगावेसे वाटते
    शेवटी आपण असलात तर अनौरसच असणार , कारण आमच्या घराण्यात आतातरी संग्रामसिंह कुणी नाही
    नमस्कार

    ReplyDelete
    Replies
    1. @ AnonymousMarch 1, 2014 at 11:52 PM

      "संग्रामसिंह घाटगे हे आमचे काका ,त्यांना जाउन १ वर्ष होईल आता होळीत !"

      होय, ते तुझेच काका आहेत. होळीच्या वेळी जातात आणि धुलीवंदनला येतात. तांबडा आणि पांढरा रस्सा हादडायला. पाच दिवसांनी रंगपंचमीही खेळतात.शेण आणि चिखल उडवितात, काळे वंगण तोंडाला लावून हिंडत असतात, हे सुद्धा माहित नाही काय तुला.

      Delete
  11. बृहस्पति

    भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वैदिक देवता, सूक्तद्रष्टा वैदिक ऋषी, देवांचा गुरु व पुरोहित, अर्थशास्त्रकार, वास्तुशास्त्रज्ञ, स्मृतिकार, लोकायत दर्शनाचा प्रवर्तक इ. नात्यांनी बृहस्पतीचा निर्देश येतो. वैदिक देवता, देवांचा गुरु व पुरोहित हा एकच बृहस्पती; परंतु सूक्तकार, अर्थशास्त्रकार, वास्तुशास्त्रकार, स्मृतिकार आणि लोकायत दर्शनकार हे सर्व बृहस्पतिगोत्रातील निरनिराळे पुरुष होत, असे काही विद्वान मानतात. म्हणून हे सर्व बृहस्पती एकच म्हणणे अनैतिहासिक होय, असा त्यांचा अभिप्राय आहे.

    ‘बृहस्पति’ हा शब्द ‘बृहत्’ (वाणी) आणि ‘पति’ या शब्दांचा एक अनियमित समास आहे (पाणिनीची अष्टाध्यायी६.१.१५७). त्याला ब्रह्मणस्पती (मंत्राचा वा प्रार्थनेचा अधिपती), वाचस्पती, धिषण (बुद्धिमान), जीव, सदसस्पती (सभेचा वा यज्ञभूमीचा प्रमुख), ज्येष्ठराज (सम्राट), गणपती, वज्रिन्, अनिमिषाचार्य, चक्षस् (शिक्षक) इ. नावेही देण्यात आली आहेत.

    प्राचीन वाङ्‌मयातील निर्देश आणि निबंधग्रंथांतील बृहस्पतिवचने ह्यांवरुन त्याचे धर्मशास्त्र होते असे दिसून येते. व्यवहार, संस्कार, आचार, श्राद्ध, आशौच, आपद्धर्म, प्रायश्चित ह्या विषयांच्या सु. २,४०० श्लोकांचे सु. १९० ग्रंथांतून संकलन करून ते बुहस्पतिस्मृति ह्या नावाने बडोद्याच्या ‘गायकवाड ओरिएंटल सीरिज’ ने प्रकाशित केले आहे.
    राजनीतीविषयक सहा अध्याय व ४३० सूत्रे असलेले बाईस्पत्य अर्थशास्त्र लाहोरच्या ‘पंजाब संस्कृत बुक डेपो’ ने प्रकाशित केले आहे (१९२१). परंतु ते मूळ बृहस्पतीचे नसून इ. स. पाचव्या शतकातले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

    तो ‘अंगिरस्’ ऋषींचा पुत्र होता. अग्नीचा पुत्र, त्वष्ट्याचा पुत्र, उच्च आकाशातील प्रकाशाचा पुत्र असेही त्याचे निर्देश आढळतात. त्याच्या आईचे नाव सुरुपा, वसुदा वा श्रद्धा असे होते. त्याचा तारा व शुभा अशा दोन भार्या असून जुहू, वाच्, धेना (वाणी), चंद्रमसी अशीही नावे त्याच्या भार्येची नावे म्हणून निर्दिष्ट आहेत. रोमशा, सुलेखा इ. नावे त्याच्या मुलींची म्हणून, तर कुशध्वज, कच, भरद्वाज, तार अशी नावे त्याच्या मुलांची म्हणून आढळतात. देवांचा पिता म्हणूनही त्याचा निर्देश आढळतो. आंगिरसी हे त्याच्या बहिणीचे, तर उच (त) थ्य, संवर्त इ. त्याच्या बंधूंची नावे आहेत.

    देवता या नात्याने ऋग्वेदात संपूर्ण अकरा सूक्ते त्याला वाहिलेली आहेत. दोन सूक्तांत इंद्राबरोबर त्याचीही स्तुती आहे. बृहस्पती म्हणजे अग्नीचे एक स्वरुप, पुरोहितांच्या कृत्यांचे मूर्त स्वरूप, वनस्पतीची देवता, चंद्राचे मनुष्यस्वरूप इ. मते आढळतात. एका मतानुसार बृहस्पती ही शुद्ध भारतीय देवता आहे, तर दुसऱ्या एका मतानुसार तो हिटाइट संस्कृतीमधील मेघनाद-देवाशी समान असल्यामुळे मूळचा त्या संस्कृतीमधील असण्याची शक्यता आहे. उत्तरकालामध्ये तो विद्वत्तेचा व बुद्धिमत्तेचा देव तसेच आदर्शही मानला गेला. गुरु या ग्रहाला त्याचे नाव देण्यात आले, ६० संवत्सरांच्या चक्राला ‘बृहस्पतिचक्र’ असे नाव देण्यात आले. पुरोहित होऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती त्याच्या नावाने ‘बृहस्पतिसव’ नावाचे कर्मकांड करु लागल्या.

    ऋग्वेदातील काही सूक्तांचा ऋषी म्हणून ‘आंगिरस बृहस्पति’ व ‘लौक्य बृहस्पति’ असे निर्देश येतात. त्याच्याविषयी बऱ्याच कथा सांगितल्या जातात. त्यांपैकी काही महत्त्वाच्या पुढीलप्रमाणे : इंद्र रागावल्यामुळे तो एकदा देवांचा त्याग करुन गेला. त्याने भरद्वाजाला आग्नेयास्त्र व उपरिचर वसूला चित्रशिखंडिशास्त्र दिले. देवांनी पृथ्वीचे दोहन केले, तेव्हा तो वत्स वा दोग्धा बनला होता. त्याने रावणाला शाप दिला. त्याने आपल्या भावजयीशी समागम केला. त्याने शुक्राचार्याचे रुप घेतले व असुरांना नास्तिक मताचा उपदेश करुन फसविले. सोमाने त्याच्या पत्नीचे हरण केल्यावर त्याने सोमाशी युद्ध केले. हनुमंताची आई अंजना ही पूर्वजन्मात त्याची दासी होती.
    ...........................................................................................

    ReplyDelete
  12. अरे रे कुणीच प्रतिसाद देत नाही

    ReplyDelete
  13. सर्वाना संस्कृती म्हणजे काय असा प्रश्न पडतो ,
    पण अनेकांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ,
    त्यापैकी काही आठवल्या आमच्या बाप्पाना ,
    त्या पाठवत आहे !
    आप्पा

    एकदा पहिल्या पन्नासातच
    पन्नास हजार विद्यार्थी आले
    मग तपासाणारे म्हणाले
    आता १०१ टक्के, १०२ टक्के, १०३ टक्के
    असे मार्क देउ या!
    नंतर नंतर व्हावचरं बनवणारे,
    कॉरस्पॉन्डन्स करणारे लोक
    शहरात राहू लागले
    आणि कुळीथ, तूर, उडीद, बाजरी
    पिकविणारे येडे खेड्यातच राहिले
    खेड्यात गहू पिकतो
    शहरात व्हावचरे पिकतात
    कागदाचे भाव मात्र वाढतच राहीले
    एके दिवशी मोट्ठा पाऊस आला
    सगळे कागद ओले झाले
    पण कागदांना मोड आले नाहीत

    शेवटी गणोबाने परवा
    रस्त्यात थांबवून दोन प्रश्न विचारले
    १) परवा तुम्ही इतिहासात त्यांचे नाव
    अजरामर होईल म्हणालात, त्यांचे नाव काय होते?
    २) भारताला पारतंत्र्य किती साली मिळाले?

    - वाटेवरच्या कविता, अशोक नायगावकर

    ……………………
    निवृत्त चाकरांचे बघ काय हाल झाले,
    काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले

    - अशोक नायगावकर

    ………………

    शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी … वांग्याचे भरीत …गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी.
    केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ…
    मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी…दुस-याचा पाय चुकून
    लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार…दिव्या दिव्या दिपत्कार…
    आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी… मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी…
    दस-याला वाटायची आपट्याची पाने… पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे…सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श…
    कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य
    पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
    कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा……

    - पु.ल.

    ReplyDelete
  14. श्री अविनाश , ठाणे
    श्री साठे ,
    श्री चैतन्य
    श्री झेन
    अहो तुमच्या लक्षात येत नाही की शिवा भोसले हा आत्ताच्या नेत्यांसारखा होता - काडीचाही फरक नाही
    शरद पवार , केजरीवाल , मोदी यांच्या सारखाच तो होता - कल्पकता असली की आपली स्वप्ने भोळ्या लोकाना सहज खपवता येतात - आत्ता जे भाजप करतो आहे तेच तो करत होता आणि केजरीवाल सांगतोय तसेच तो बोलत होता कायद्याचे राज्य वगैरे -आणि कोन्ग्रेस ची विचारसरणी हि जणू त्याचीच विचारसरणी होती असा भास होतो - विशेषतः आत्ताचे मराठा राजकारण जे आहे ते आणि शिवाचे राजकारण एकच आहे -त्याला आणि आत्ताच्या कोन्ग्रेस ला बरोब्बर माहित आहे की खालचा वर्ग आणि ब्राह्मण वर्ग यांच्या कह्यात न जाता त्यांच्या कडून कशी कामे करून घेत राहायचं -त्याच वेळी आत्ताचे लोक जसे स्विस अकौंट ठेवतात तसा पैसा त्याने तंजावूर ला ठेवला होता -
    शिवा भोसले हा अतिसामान्य लायकीच्या वडिलांची जहागिरी सांभाळत आपली इस्टेट आईच्या मदतीने वाढवत नेणारा संधिसाधू होता -
    तानाजी बाजीप्रभू बाजी पासलकर यांच्या वंशजांचे पुढे काय झाले ?
    त्याच्या त्याला समजा अजून ५० वर्षे लाभली असती तर त्याने या देशाचा इतिहास बदलला असता हे अतिशय खोटे विधान आहे कारण काहीही झाले तरी इंग्रज इथे येणारच होते आणि आपला पूर्ण पराभव करणारच होते -तो आंतर राष्ट्रीय य्द्ध्सज्जतेचा सज्जतेचा अपरिहार्य भाग होता - शिवा भोसलेने सुद्धा सडकून मार खाल्लाच असता -आधुनिक शस्त्रे आपल्या तलवारी आणि धालिना भारीच ठरली असती - आपले राजे आधुनिक औषधांसाठी इंग्रज लोकांवर अवलंबून होते - शस्त्रांसाठी इंग्रज आणि फ्रांस वर अवलंबून होते - ब्राह्मण मूर्ख असोत एकवेळ पण राज्य रक्षणाचे क्षत्रियांचे काम पण शेवटी ब्राह्मणांनाच करावे लागले ना ? त्यांनापण आणि महादजी शिंदे यानापण इंग्रजांच्या कवायती सैन्याचाच आधार हवा हवासा वाटला ना ?इथे जातीपातीचा काहीही संबंध नाहीये - आपण अजून वेगळ्या नजरेने याकडे पाहिले पाहिजे -
    मुघल आले त्यांची शस्त्रे आणि जिंकायची इर्षा आपल्यापेक्षा उच्च होती म्हणून आपला पराभव झाला तीच कथा इंग्रजांच्या बाबतीत - आणि त्यांचे दास झाल्यावर सुद्धा प्रजेसमोर राजे म्हणून मिरवून घ्यायची या नामधारी राजांची हौस काही फिटली नाही -हि एक शोकांतिकाच आहे -
    केशवसुत त्याकाळात न्म्हनाले - जुने जाउद्या मरणालागुन जाळून किंवा पुरुनी टाका - पण आपण ९६ कुळी लोक चारशे वर्षे अजूनही शिवाजीच्या पुण्याई वर आणि परंपरे वरच आपले पोट भरू बघत आहोत - आणि ते सोवळे ब्राह्मण त्याही पूर्वीच्या देवदेवतांच्या कथावर आपला चरितार्थ भागवत असतात !
    आर्य आले आणि इथेच स्थिरावले - का ? मुसलमान आले - इथेच मिसळले - का ?
    इंग्रज आले आणि गेले - का ? कारण इथली सुपीकता - इथली हवा - पाणी - पण आता त्यावरचा ताण इतका इतका प्रचंड वाढत चालला आहे की आता आपला स्वार्थ साधण्यासाठी पाणी आणि मातीचे राजकारण होणारच - ते करताना पूर्वी ज्यांनी राज्य केले त्या मराठा आणि ब्राह्मण वर्गाला वाटणारच - आपण श्रेष्ठ आहोत - पण इतर वर्गाचे काय ?त्यांनी धावतच राहायचे का या सवर्ण लोकांच्या मागे - शिवाजी म्हणाला कि पुढे जय म्हणायचे - पेशवे पानिपतावर धावले की यांनी आपला जीव त्या मुघल सिंहासनासाठी ओवाळून ताकायचाच का ?सगळा महाराष्ट्र पानिपतावर कापून निघाला - अनेक खेडी ओसाड झाली - का ? त्या मुघल सम्राटाला सातारच्या गाडीने वाचन दिले होते म्हणा किंवा पेशव्याना वाटले की ते आपले कर्तव्य आहे ?उद्या एखादा ब्राह्मण द्वेष्टा असे पण सांगेल की मुघल राजाकडून पेशव्यांनी पैसे खाउन ते त्याच्या मदतीला गेले होते पण त्यांची फजिती झाली - या चर्चाना अंतच नाही - इतिहास असा कप्प्या कप्प्यात लिहिता येत नाही - हे समाजात नाही म्हणून आपण एकमेकांचा द्वेष करतो -आणि उगीचच एखाद्याला अनेक विशेषणे चिकटवत बसतो - शहाजी शिवाजी किंवा पेशवे यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती - त्याना बाहेरील
    जगातील राजकारणाचा आवाका नव्हता असेच म्हटले पाहिजे - जर असेल तर तो जुजबी होता

    ReplyDelete
    Replies
    1. dash (- -) करून लिहीनाराचे लिखाण पुन्हा सुरु झाले आहे, स्वागतम!
      चार्वाक दर्शन संदर्भात याला काहीही माहिती नसल्याने (वाचनच कमी) याला काहीही सुचेनासे झाले आहे आणि जुनाट, रटाळ, अर्वाच्य लिखाण याने पुन्हा सुरु केले आहे.
      मध्यंतरी हाच - - न करताही लिहित होता, मात्र आता कंट्रोल होईना म्हणून भेदरलेल्या अवस्थेत हा काहीही बरळत सुटला आहे, याचे लिखाण वाचावे कि वाचू नयेत हे सुज्ञांना सांगण्याचीही गरज भासणार नाही, हि अपेक्षा!

      Delete
  15. सुजाण वाचकांच्या लक्षात आले आहे का ?
    असे का घडत आहे ?
    हल्ली कुणीच यांच्या ब्लोगवर लिहित नाही उत्तर नाही -प्रत्युत्तर तर अजिबातच नाही
    वाद नाही प्रतिवाद नाही चैतन्य नाही आगाशे नाहीत पद्मजा नाही समीर घाटगे नाहीत
    सगळे शांत
    आप्पा बाप्पा नाहीत
    संजय सर तर त्यांचे - आप्पा बाप्पा यांचे कौतुक करत असत
    चैतन्य यांचे विचार अत्यंत प्रगल्भ असत
    समीर घाटगे आणि ओंकार यांचे विचार तिखट असत आगाशे हे तर वयस्कर त्यांचे विचार काह्से आगंतुक आणि अप्रगल्भ असतात पण सागर भांडारे आणि सांगलीकर हे तर अतिशय सुंदर !संजय देशपांडे हे तर स्पष्ट लिहिणारे
    पण हल्ली कुणीच लिहित नाही आणि फक्त कुणाला तरी शिव्या आणि लाखोली - हाच प्रकार चालू असतो प्रज्ञा आणि अमृता या मात्र नियमित असतात लिहित चिंतन हाच एक मुद्दा सर्वाना दिशा दाखवतो - अभद्र टीका काय कुणीही करू शकते पण त्याची गरजच काय ?
    का असे घडते ?
    हे थांबले पाहिजे!
    सर्वाना अशी विनंती की हे एक सभ्य दालन आहे - एक अभ्यासिका आहे - हिचा विचका करू नका !

    ReplyDelete
  16. फारेनची व्हिस्की नाही मिळाली कि हात भट्टी वर भागवायचे हि आपल्या महाराजांपासुनची
    परंपरा आहे - त्यातूनच वाघ्याला फेकून देण्याच्या चुका होतात
    तसेच दुधाची तहान ताकावर भागवायची म्हणून
    आपले संजय सर शेकोटी चे अध्यक्ष झाले
    चार्वाक आणि लोकायत हे दोन पदर नसून चार्वाकाचे तत्वज्ञान जगणारा वर्ग हाच लोकायताचा खराखुरा अनुयायी आहे आपले संजय सर किंवा मोहरीर सर हेपण त्या पैकीच आहेत हे फारच थोड्यांना माहित आहेत आता बघत रहा काही दिवसांनी सगळीकडे मराठा आरक्षणाचा उन्माद आणि पुढे मग ?

    मजा आली ! गड्यांनो काय सांगू -अहाहा !
    काठोकाठ कल्पनांचा प्याला भरून विचारांचा फेस उसळत होता
    रात्र कशी संपली कळलच नाही - शेकोटी विझली तरी उन्माद सरत नव्हता
    छान रंग भरला होता - जर तसे घडले नसते तर - अजून मजा आली असती
    मोहरीर सरांची खूप आठवण आली
    चार्वाकाचे आणि संजय सरांचे मस्त जमले असते

    ReplyDelete
  17. dash (- -) करून लिहीनाराचे लिखाण पुन्हा सुरु झाले आहे, स्वागतम!
    चार्वाक दर्शन संदर्भात याला काहीही माहिती नसल्याने (वाचनच कमी) याला काहीही सुचेनासे झाले आहे आणि जुनाट, रटाळ, अर्वाच्य लिखाण याने पुन्हा सुरु केले आहे.
    मध्यंतरी हाच - - न करताही लिहित होता, मात्र आता कंट्रोल होईना म्हणून भेदरलेल्या अवस्थेत हा काहीही बरळत सुटला आहे, याचे लिखाण वाचावे कि वाचू नयेत हे सुज्ञांना सांगण्याचीही गरज भासणार नाही, हि अपेक्षा!

    ReplyDelete
  18. चार्वाक दर्शन : कर्मकांड आणि धार्मिक शोषणावर करडा प्रहार

    साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय धर्म परंपरा अतिशय उदार राहिलेली आहे. अनेक धार्मिक विचारधारा अतिशय प्राचीन काळापासून इथे उदयास आल्या, विकसित झाल्या . काही काही कालखंडात तर एकाच वेळी भिन्न भिन्न परंपरा आणि धर्म इथे एकाच वेळी नांदत असलेले दिसून येतात. या वैचारिक परंपरा एकमेकांच्या विचारांचे खंडणमंडन करीत असलेल्या दिसतात. यातील बहुधा सर्व वैचारिक आणि धार्मिक परंपरांचे अनेक ग्रंथ आणि वाङमय उपलब्ध आहे. वेदांहून वेगळा विचार करणारी अनेक दर्शन शास्त्रे आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट करणारे देखील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. सामान्यत: आपली धार्मिक परंपरा उदार राहिलेली आहे. एका धर्माने दुस-या धर्माचे किंवा एका विचारपरंपरेने दुस-या विचारपरंपरेचे ग्रंथ वाङमय जाळून नष्ट केल्याचा रानटी प्रकार आपल्याकडे किमान इ स ६ व्या शतकापर्यंत तरी दिसून येत नाही.
    याला अपवाद एकमात्र विचारधारेचा, लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शन.
    चार्वाक दर्शन जे लोकायत दर्शन म्हणूनही ओळखले जाते त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. अभ्यासूंना चार्वाक दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदादी ग्रंथात त्याच्यावर केलेल्या टीकेवर विसंबून त्याचा अभ्यास करावा लागतो. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ उपलब्ध नसण्याचे गौडबंगाल काय असावे बुवा? सर्वसमावेशक अश्या उदार भारतीय धार्मिक परंपरेला चार्वाक दर्शनाचे ग्रंथ नष्ट करण्याची काय गरज भासली असावी? हे कोणाचे कारस्थान असावे ? या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा आणि चार्वाक दर्शनाच्या विचारधारेचा वेध घेऊ या नव्या लेखमालेतून.
    चार्वाक मुनी हे सामान्यत: नास्तिक आणि भोगवादी विचारधारेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही ओळख विकृत आहे आणि वैदिक धर्ममार्तंड महाब्राह्मणांनी हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे. त्यांचे तत्वज्ञान त्याहून कितीतरी व्यापक आणि बहुधा वेदांहूनही प्राचीन आणि पुरातन आहे. तसे पाहू जाता इतर सर्व दर्शनशास्त्रांमध्ये जन्म-बंधन-मोक्ष यांचे महत्व तर आहे पण ईश्वर किंवा देव या संकल्पनेचे निर्णायक महत्व नाही. जसे आपणास मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मात दिसते. सांख्य दर्शन तर देवाचे अस्तित्वच अमान्य करते तथापि त्यांना नास्तिक म्हटले गेलेले नाही. सांख्य ,न्याय ,वैशेषिक ,मीमांसा ,वेदांत ,शीख ,नाथपंथी ,या आणि भारतीय परंपरेतील एकूण एक विचारधारा या आस्तिक सदरात मोडतात. मग स्वत:ला भारतीय परंपरेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणा-यांनी चार्वाक दर्शन शास्त्राला नास्तिक का म्हटले असावे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांनी केलेली वेदांची निंदा. इतर कोणत्याही विचारधारेने वेदांची निंदा केलेली नाही.

    ‘नास्तिको वेदनिन्दक:’

    अर्थात जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. आणि चार्वकांनी तर वेदांना धूर्त आणि लबाड लोकांचे षडयंत्र म्हटले, राक्षसांची व्यर्थ बडबड देखील म्हटले. अब्राह्मण अब्राह्मण !! हे तर मोठेच महापाप झाले कि राव मग ! यामुळेच चार्वाकांना नास्तिक ठरवले गेले. वस्तुत: भारतीय तत्वज्ञानाचा कोणताच ग्रंथ निर्भेळ राहिला आहे यावर माझा विश्वास नाही.

    ReplyDelete
  19. चार्वाक दर्शन : कर्मकांड आणि धार्मिक शोषणावर करडा प्रहार
    साधारणत: इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत भारतीय धर्म परंपरा अतिशय उदार राहिलेली आहे. अनेक धार्मिक विचारधारा अतिशय प्राचीन काळापासून इथे उदयास आल्या, विकसित झाल्या . काही काही कालखंडात तर एकाच वेळी भिन्न भिन्न परंपरा आणि धर्म इथे एकाच वेळी नांदत असलेले दिसून येतात. या वैचारिक परंपरा एकमेकांच्या विचारांचे खंडणमंडन करीत असलेल्या दिसतात. यातील बहुधा सर्व वैचारिक आणि धार्मिक परंपरांचे अनेक ग्रंथ आणि वाङमय उपलब्ध आहे. वेदांहून वेगळा विचार करणारी अनेक दर्शन शास्त्रे आहेत. त्यांची विचारधारा स्पष्ट करणारे देखील अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. सामान्यत: आपली धार्मिक परंपरा उदार राहिलेली आहे. एका धर्माने दुस-या धर्माचे किंवा एका विचारपरंपरेने दुस-या विचारपरंपरेचे ग्रंथ वाङमय जाळून नष्ट केल्याचा रानटी प्रकार आपल्याकडे किमान इ स ६ व्या शतकापर्यंत तरी दिसून येत नाही.


    याला अपवाद एकमात्र विचारधारेचा, लोकायत दर्शन किंवा चार्वाक दर्शन.

    चार्वाक दर्शन जे लोकायत दर्शन म्हणूनही ओळखले जाते त्याचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नाही. अभ्यासूंना चार्वाक दर्शन शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपनिषदादी ग्रंथात त्याच्यावर केलेल्या टीकेवर विसंबून त्याचा अभ्यास करावा लागतो. चार्वाक दर्शनाचा एकही ग्रंथ उपलब्ध नसण्याचे गौडबंगाल काय असावे बुवा? सर्वसमावेशक अश्या उदार भारतीय धार्मिक परंपरेला चार्वाक दर्शनाचे ग्रंथ नष्ट करण्याची काय गरज भासली असावी? हे कोणाचे कारस्थान असावे ? या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांचा आणि चार्वाक दर्शनाच्या विचारधारेचा वेध घेऊ या नव्या लेखमालेतून.

    ReplyDelete
  20. चार्वाक मुनी हे सामान्यत: नास्तिक आणि भोगवादी विचारधारेचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची ही ओळख विकृत आहे आणि वैदिक धर्ममार्तंड महाब्राह्मणांनी हेतुपुरस्पर निर्माण केलेली आहे. त्यांचे तत्वज्ञान त्याहून कितीतरी व्यापक आणि बहुधा वेदांहूनही प्राचीन आणि पुरातन आहे. तसे पाहू जाता इतर सर्व दर्शनशास्त्रांमध्ये जन्म-बंधन-मोक्ष यांचे महत्व तर आहे पण ईश्वर किंवा देव या संकल्पनेचे निर्णायक महत्व नाही. जसे आपणास मुस्लीम किंवा ख्रिश्चन धर्मात दिसते. सांख्य दर्शन तर देवाचे अस्तित्वच अमान्य करते तथापि त्यांना नास्तिक म्हटले गेलेले नाही. सांख्य ,न्याय ,वैशेषिक ,मीमांसा ,वेदांत ,शीख ,नाथपंथी ,या आणि भारतीय परंपरेतील एकूण एक विचारधारा या आस्तिक सदरात मोडतात. मग स्वत:ला भारतीय परंपरेचे उत्तराधिकारी म्हणवून घेणा-यांनी चार्वाक दर्शन शास्त्राला नास्तिक का म्हटले असावे? याचे एक प्रमुख कारण म्हणजे चार्वाकांनी केलेली वेदांची निंदा. इतर कोणत्याही विचारधारेने वेदांची निंदा केलेली नाही.

    ‘नास्तिको वेदनिन्दक:’

    अर्थात जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक. आणि चार्वकांनी तर वेदांना धूर्त आणि लबाड लोकांचे षडयंत्र म्हटले, राक्षसांची व्यर्थ बडबड देखील म्हटले. अब्राह्मण अब्राह्मण !! हे तर मोठेच महापाप झाले कि राव मग ! यामुळेच चार्वाकांना नास्तिक ठरवले गेले. वस्तुत: भारतीय तत्वज्ञानाचा कोणताच ग्रंथ निर्भेळ राहिला आहे यावर माझा विश्वास नाही. वेद म्हणजे ज्ञानाचा धबधबता प्रवाह. निसर्गातील विविध चमत्कारांना देवतास्वरूप मानून त्यांच्यावर रचलेल्या पवित्र ,उत्फुल्ल ऋचांचे संकलन आहे. वेद म्हणजे त्याकाळच्या वैदिक समाजाचा आरसा आहेत. तथापि वेदांचे निर्भेळ आणि शुद्ध स्वरूप कालौघात तसेच टिकून राहिले असेल याची अजिबात शाश्वती नाही. अनेक स्वार्थी आणि लबाड लोकांनी देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करण्यासाठी त्यात भेसळ केली आहे. आणि चार्वाक तर समाजातील धर्माच्या नावावर आपली पोळी भाजून घेणा-यांचे कट्टर दुश्मन. त्यांच्या तोंडी हे श्लोक धर्माच्या ठेकेदारांनी घुसडले असण्याची दाट शक्यता आहे. हे धर्म मार्तंड स्वत:च्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि समाजातील आपले उच्च स्थान अबाधित राहावे यासाठी नीच पातळीवर जाऊन इतिहास-पुराणांची मोडतोड कशी करत असत याचे अनेक दाखले आणि पुरावे आता हाती लागत आहेत. चार्वाकांच्या एका श्लोकाचे उदाहरण धर्माच्या दलालांच्या हरामखोरीचे उदाहरण म्हणून पुढे देत आहे.


    चार्वाकांचा हा श्लोक अतिशय सुप्रसिद्ध आहे. किंवा कुप्रसिद्ध आहे म्हटले तरी चालेल. याच श्लोकाचा आधार घेऊन त्यांना भोगवादी ठरवण्यात आले. खर तर इतके तर्कशुद्ध आणि जीवनाचे यथार्थ नीतीमान तत्वज्ञान रचणारा विद्वान असे बेजबाबदार विधान करेल हेच मुळात शंकास्पद आणि हास्यास्पद आहे. पण कुटील ब्राह्मणांनी त्या श्लोकाची मोडतोड करून चार्वाकांना कसे बदनाम केले आहे पहा.

    ReplyDelete
  21. तो श्लोक ज्या रुपात प्रसिद्ध आहे तो असा-

    यावज्जीवेत् सुखंजीवेत् ऋणंकृत्वा घृतंपिवेत्।
    भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुत:।

    याचा अर्थ असा कि जोवर जीवन आहे तोवर सुखात जगा. खा ,प्या ,ऐश करा. ऋण काढून तूप प्या. ऋण परत फेडण्याची चिंता करू नका. मानवी शरीर नश्वर आहे. एकदा मेल्यानंतर पुन्हा इथे येणे कोठले?

    याच श्लोकाच्या आधारे चार्वाकांचे जडवादी तत्वज्ञान भोगवादी आणि चंगळवादी ठरवण्यात आले. चार्वकांनी वस्तुत: नीतीमान समाजव्यवस्था कशी असावी याविषयी आपल्या तत्वज्ञानात खूप उहापोह केला आहे. असले समाजात अनीती पसरवणारे विधान असला महान तार्किक विचारवंत करू शकेल का? नवव्या शतकात होऊन गेलेल्या जयंत भट्ट या चार्वाक परंपरेतील महान चार्वाकाच्या ग्रंथात हा मूळ श्लोक पुढील प्रमाणे येतो.


    यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
    भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः


    यातील ‘नास्ति मृत्यू: अगोचर’ हा चरण गाळून तिथे ‘ऋणकुत्वा घृतपिवेत’ या ओळी घुसडून हा श्लोक आणि त्यामागचा विचार विकृत स्वरुपात लोकांपुढे आणण्यात आला. आणि याचा परिणाम म्हणजे आता चार्वाक म्हटल कि त्यांचा हा भेसळयुक्त श्लोक लोकांना लगेच आठवतो. अशी किती पौराणिक गोष्टींची मोडतोड करून हिंदू धर्माचे किती अपरिमित नुकसान हिंदू धर्माला स्वत:ची जहागीर समजणा-यांनी केले असेल याची आपणास उपरोक्त उदाहरणावरून कल्पना येऊ शकेल.


    हे वैदिक लोक चार्वाकांना इतके का घाबरत होते? अस काय तत्वज्ञान होत चार्वाकांच?

    चार्वाक हे प्रत्यक्षाला प्रमाण मानणारे विचारवंत होते. प्रत्याक्षावरून काढले जाणारे अनुमान देखील त्यांनी प्रमाण मानले होते. त्यांनी महत्वाची मानलेली ही दोन प्रमाणे तर आजच्या प्रगत विज्ञानाची दोन महत्वाची प्रमाणे आहेत. “ प्रत्यक्ष आणि प्रमाण” या दृष्टीने चार्वाक हे पहिले वैज्ञानिक विचारांचे तत्वज्ञ ठरतात. (तथापि नेहमी महापुरुषांची कुत्सित चेष्टा करण्याची पुरातन सवय असणा-यांनी चार्वाक समोर असेल तर त्याची बायको सधवा आणि तो डोळ्याआड झाला कि विधवा ,अशी बोचरी टीका त्याच्यावर केली.)

    ReplyDelete
  22. चार्वाकांची विचारसरणी संक्षेपात पुढील प्रमाणे –

    १) जे प्रत्यक्ष आहे तेच प्रमाण.
    २) आत्मा आणि देह वेगळे नाहीत अर्थात देह संपला कि आत्मा संपला. देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा. ( A body with soul is consciousness)
    ३) मृत्यू म्हणजेच मोक्ष. ( Death is a salvation )
    ४) न स्वर्ग आहे, न नरक आहे ,न अंतिम मोक्ष ,न शरीपासून वेगळा आत्मा, न चार आश्रमी व्यवस्थेचे कोणते कर्म फळ मिळते.

    त्यांच्या विज्ञाननिष्ठ विचारसरणी विषयी अधिक विस्तृत पणे जाणून घेऊया पुढील लेखात.

    -सुहास भुसे
    ..............................................................................................

    ReplyDelete
  23. प्रखर बुद्धीप्रामाण्यवादी तत्वज्ञ -चार्वाक


    चार्वाक हे कोणी एक व्यक्ती होते कि ती एक उपाधी होती कि जडवादी परंपरेतील सर्वच अनुयायांना चार्वाक म्हणत असत याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. पण हे चार्वाक दर्शन हिंदू परंपरेत सर्वात जास्त महत्वाचे गणले गेले आहे आणि इतर कोणत्याही तत्वज्ञानाची झाली नाही इतकी चार्वाक तत्वज्ञानाची चर्चा हिंदू धर्मशास्त्रात झाली आहे. चार्वाकांचे तत्वज्ञान हे देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांचे शोषण करणा-यांसाठी इतके धोकादायक होते कि नंतरच्या काळातील जवळ जवळ सर्व विचारधारांना चार्वाक मताचे खंडण करणे महत्वाचे वाटले आहे. उपनिषदे ,बादरायणाची ब्रह्मसूत्रे आदी अनेक ग्रंथात चार्वाक मताचे खंडन केले गेले आहे. साधारणत: इ.स. ६ व्या शतकापर्यंत चार्वाक मतावर खंडण-मंडनाची ही परंपरा सभ्य आणि सुसंस्कृत चाकोरीतून गेलेली दिसते. त्याचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारांनी देखील चार्वाक विचारांचा सन्मानच केलेला दिसतो.

    महाभारतातील वनपर्वात द्रौपदी एक जुनी आठवण सांगताना म्हणते कि “ माझ्या पित्याने मला चार्वाक दर्शनाचे शिक्षण देण्यासाठी ह्या तत्वज्ञानातील अधिकारी व्यक्तीची नियुक्ती केली होती.” आता राजा द्रुपदासारखा एक तात्कालिक मान्यवर राजा आपल्या कन्येला शिक्षण देण्यासाठी चार्वाक संप्रदायाच्या गुरुची निवड करतो म्हणजे त्या काळात चार्वाक परंपरा निश्चितच प्रतिष्ठित आणि लोकमान्य राहिलेली असणार. पाणिनीने चार्वाक दर्शनाला अन्विक्षकी शास्त्रात स्थान दिले आहे. कृषी ,उत्पादन ,ऐहिक जीवन ,अर्थ अशी जीवनस्पर्शी शास्त्रे अन्विक्षकी शास्त्रात येतात. यावरूनही आपल्याला चार्वाक दर्शनाचे तात्कालिक महत्व लक्षात येते. आद्य शंकराचार्यांनीदेखील चार्वाक दर्शनाचा सन्मानच केला आहे. शंकराचार्य म्हणतात की चार्वाकमत हे सर्वसामान्य जनतेचे मत आहे. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो, ‘ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत.’ कौटिल्याने त्याला आपल्या तर्कशास्त्रात स्थान दिले आहे. या सर्व संदर्भांवरून असे लक्षात येते साधारण यापूर्वीच्या सर्व विचारवंतांना चार्वाकांचे विचार मान्य होते. मात्र इ.स ६ व्या शतकानंतर मात्र या विचारांची टवाळी सुरु होऊन हे विचार दाबण्याचा प्रयत्न झाला.

    ReplyDelete
  24. चार्वाकांचे तत्वज्ञान


    चार्वाक प्रत्यक्ष हेच प्रमाण मानतात. जी गोष्ट दिसत नाही वा जिचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशी कोणतीही गोष्ट मान्य करण्यास त्यांचा कडवा विरोध आहे. तात्कालिक धर्म परंपरा ही मोक्ष ,मुक्ती ,स्वर्ग अश्या कल्पनांच्या मागे धावत होती. उपवास ,व्रतवैकल्ये ,जपजाप आणि कडक कर्मकांड ... आणि एकूणच शरीराला कष्टवणारी धर्मसाधना म्हणजेच धर्माचरण असा लोकांचा समज करून देण्यात आला होता. अशी कडकडीत साधना करणे वा इंद्रियनिग्रह म्हणजे स्वर्गात आपली जागा राखून ठेवण्याचा राजमार्ग. चार्वाकांना मृत्यनंतरच्या तथाकथित सुखांसाठी जीवनाकडे पाठ फिरवणारी ही फोल विचारसरणी अमान्य होती. त्यांनी आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले. स्वर्ग-नरक असल्या कल्पनांना केराची टोपली दाखवली. मृत्यू म्हणजेच मुक्ती हे तत्वज्ञान त्यांनी मांडले.

    चैतन्य हा आत्म्याचा गुण आहे. तथापि आत्मा नावाची कोणती गोष्ट अस्तित्वात असल्याचे प्रमाणासहित सिद्ध करता येत नाही . त्यामुळे अंतत: हा शरीराच गुण होतो. शरीर संपले कि चैतन्य संपले. सारे काही संपले. याची सिद्धता त्यांनी तीन प्रकारे मांडली.

    १) तर्क
    २) अनुभव
    ३) आयुर्वेद शास्त्र


    तर्क – चार्वाक मानतात कि शरीर जोवर असते तोवरच त्यात चैतन्य खेळत असते. जेव्हा शरीर नष्ट होते तेव्हा हे चैतन्य कोठे दिसत नाही वा त्याचे मृत्यूपश्चातचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. या अनुषंगाने पाहीले असता शरीर हाच आत्म्याचा एकमेव आधार आहे अर्थात आत्मा म्हणजेच शरीर.


    अनुभव- मी स्थूल आहे, मी दुर्बल आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी निष्क्रीय आहे, मी ताकदवान आहे, असे अनुभव आपल्याला पावला-पावलाला येत असतात. स्थूलता-दुर्बलता इत्यादी शरीराचे धर्म आहेत आणि ‘मी’ देखील शरीराचाच धर्म आहे. पर्यायाने आत्मा म्हणजेच शरीर.


    आयुर्वेद शास्त्र- ज्या प्रकारे गुळ आणि मोहरी यांच्या मिश्रणात कालांतराने विशिष्ट परीस्थितीमुळे मादक गुणधर्म तयार होतात, ज्याप्रमाणे दही, पिवळी माती आणि शेण यांच्या मिश्रणात कालांतराने विंचू उत्पन्न होतात, ज्याप्रमाणे कात, चुना, सुपारी, पान यांचे सुयोग्य मिश्रण मुखात लालीमा उत्पन्न करते त्याचप्रमाणे चार महाभूतांचे विशिष्ट मिश्रण विशिष्ट परिस्थितीमध्ये चैतन्याच्या निर्मितीस कारणीभूत होते. चार्वाक हे फक्त पृथ्वी, तेज, जल, वायू ही चार महाभूते मानतात. आकाश हे महाभूत आहे हे त्यांना मान्य नाही. इथे निर्दिष्ट करण्याची बाब म्हणजे चार्ल्स डार्विन ने सजीवांच्या उत्पत्तीचे हेच कारण आपल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतांत मांडले आहे. विशिष्ट पोषक परिस्थितीत सजीवांची उत्पत्ती झाली हा त्याचा सिद्धांत चार्वकांनी फक्त काही हजार वर्षापूर्वी या भारतभूमीत मांडला होता. इथेच त्यांचे श्रेष्ठत्व आणि वैज्ञानिक दृष्टीकोन अधोरेखित होतो.

    ReplyDelete
  25. हे अंतर्गत घटकांचे प्रमाण बिघडले कि शरीरात निर्माण झालेले हे चैतन्य नाश पावते, देह-आकार नष्ट होतात हाच मृत्यू. आत्मा हा शरीराहून वेगळा आहे, तो या देहात येतो जातो असे मानणे वेडगळपणाचे आहे असे चार्वाकांचे स्पष्ट मत आहे.

    आकारामुळे निराकाराचा भास होतो. वस्तुत: निराकार असे काही नाही. फक्त आकारच आहे. उदा अचानक उमटलेल्या ध्वनिमुळे आधी शांतता होती असा भास होतो. शांतता असे काही नसते.

    चारी पुरुषार्थात मोक्ष हा पुरुषार्थ सर्व श्रेष्ठ मानला जातो. चार्वाकांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ मान्य नाहीत. ते फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ मानतात. धर्म आणि मोक्ष यांना चार्वकांनी बाद ठरवले आहे. पण धर्माला नाकारताना ते पारलौकिकाचे फळ देणारे साधन आहे म्हणून तो नाकारला आहे . चार्वाकी विचारसरणीला पारलौकिकाचे वावडे आहे.

    यज्ञ म्हणजे वेळ आणि द्रव्य यांचा अपव्यय, एक व्यर्थ कर्मकांड असे चार्वाक मानतात. चातुर्वण्य व्यवस्थेला देखील चार्वकांनी कडवा विरोध केला. कथित ऐतिहासिक रित्या येणारी वंशशुद्धी आणि तिच्यामुळे येणारा अहंकार यावर चार्वकांनी कठोर टीका केली. वंश शुद्धी ही वस्तुस्थिती नसून एक आभास आहे. समाजातले आपले उच्च स्थान टिकवण्यासाठी केलेला अपप्रचार आहे असे चार्वाक मानतात.

    चार्वाकांविषयी केल्या गेलेल्या अपप्रचारामुळे चार्वाक हे अयोग्य आणि अनीती पसरवणारे तत्वज्ञान सांगतात अशी अनेकांची समजूत झालेली दिसते. तथापि चार्वाक कोणतीही अयोग्य गोष्ट सुचवत नाहीत. उलट चोरी, मद्यप्राशन, पशुहत्या, हिंसा इत्यादी गोष्टींचा त्यांनी धिक्कार केला आहे. धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणारे पुरोहित हे चार्वाकांचे खरे टीकाविषय आहेत. लोकांचे रक्त पिवून जगणा-या असल्या लोकांचा त्यांना प्रचंड तिटकारा आहे. माणसाने लबाडी करू नये, कोणाचे शोषण करू नये, आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नयेत. कष्ट करावे, शेती करावी, प्रामाणिक पणे श्रम करून अर्थार्जन करावे आणि काव्य संगीत कला नृत्य यांचा आस्वाद घेत सुखनैव जीवन कंठावे असा रोकडा सल्ला ते सामान्यांना देतात. दंडनिती, राजकीय स्थैर्य यातून लोक नियंत्रण करीत शासकांनी स्वार्थ बुद्धी त्यजून लोकांचे आणि एकूणच समाजाचे हित साधावे असे ते सुचवतात.

    कृषीगोरक्ष वाणिज्यदंडनित्या दिभी: बुधै :
    एतेरैव सदोपायैतुर्भोगाननुभवेदृवि

    -सुहास भुसे
    .......................................................................................................

    ReplyDelete
  26. चार्वाक दर्शन: शोषणाधारित धर्म व्यवस्थेविरुद्धचा आदिम लढा

    चार्वाक दर्शनावरून मागील काही दिवसांत रोखठोक ब्लॉगवर भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील अनेकांसाठी चार्वाकांचे विचार धक्कादायक ठरल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरून दिसत आहे. तर अनेकांचे कुतूहल चार्वाकांविषयी चाळवले गेले आहे. अनेकांना चार्वाक विचार आवडल्याचेही दिसत आहे. चार्वाकांचे विचार हे श्रद्धाळू लोकांना पचवायला तसे जडच आहेत. हरकत नाही. यानिमित्ताने चार्वाक दर्शनावर जितके वाद विवाद झडतील तेवढे स्वागतार्ह्यच आहेत. कारण यातूनच आपल्या धर्म विषयक आणि एकूणच जीवनविषयक पायाभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल.
    मुळात जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील हा वाद सनातन आहे तितकाच तो विश्वव्यापक ही आहे. जे जडातून चैतन्य निर्माण झाल अस मानतात ते जडवादी आणि जे चैतन्यातून जड निर्माण झाल अस मानतात ते चैतन्यवादी किंवा ईश्वरवादी. मोक्ष, आत्मा आणि देव यांना मानणारे श्रद्धाळू ईश्वरवादी आणि यांचे अस्तित्व नाकारणारे जडवादी असे दोन स्पष्ट तट जगभरातील धार्मिक परंपरांमध्ये दिसतात. तुलनेने जडवादी परंपरा अधिक जुनी आहे. प्राथमिक अवस्थेतील मानव हा या विश्वाकडे जडवादी दृष्टीनेच पाहत होता. पुढे निसर्गातील देवतांना त्याने देव मानायला सुरवात केली असली तरी तिथे प्रार्थना करण्याशिवाय कर्मकांडाचे प्राबल्य अजून नव्हते. या परंपरांमध्ये कर्मकांडाचा शिरकाव पुढील काळात हळूहळू होत गेला. या दृष्टीने विचार केला तर जडवादाचे तुलनेने असलेले प्राचीनत्व प्रत्ययास येते.

    ReplyDelete
  27. चार्वाक आणि देवाचे अस्तित्व

    चार्वाक तत्वज्ञान हे सार्वकालिक आहे. कोणत्याही काळातील विचारवंतांना आकृष्ट करून घेण्याचे सामर्थ्य त्यात आहे. चार्वाकांच्या पायाभूत संकल्पना या अतिशय स्पष्ट आहेत. त्यात कोणतीही चलाखी व भ्रामकता नाही. चार्वाक दर्शना इतके सुस्पष्ट प्रामाणिक आणि परखड तत्वज्ञान धर्माच्या इतिहासात अन्य कोणतेही नाही. विश्व ज्या त्या वस्तूच्या ( वस्तू – द्रव्य, material ) स्वभावधर्मानुसार विकसित झाले. इथे देवाने विश्व वगैरे निर्माण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

    " ईश्वर अभावात् , स्वभावेन इव "

    देवाचे अस्तित्व, आत्म्याचे अस्तित्व, मृत्यूनंतरचे पारलौकिक जीवन, पुनर्जन्म, कर्मकांड या सर्व कल्पनांना चार्वकांनी एकाच वेळी नाकारले आहे. असे करण्याचे कारण त्यांचे काही मुलभूत प्रश्न. ज्यांची तर्कशुद्ध व विज्ञाननिष्ठ उत्तरे देणे आजही ईश्वरवादी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे. जमल्यास वाचकांनी कमेंट मध्ये प्रयत्न करून पाहावा.

    १. ईश्वरानं विश्व निर्माण केलं तर त्याला कोणी निर्माण केलं ?
    २. जर ईश्वर स्वयंभू असेल तर विश्व का स्वयंभू नसावं ?
    ३. ईश्वर जर निर्गुण-निर्विकार तर त्याला विश्व निर्माण करण्याची इच्छा मुळात का झाली ?
    ४. इच्छा आली की आसक्ती आली, आसक्ती आली की बंधन येतं, मग ईश्वर अमर्याद स्वतंत्र कसा असेल ?
    ५. आणि जर तो अमर्याद स्वतंत्र नसेल तर तो ईश्वर कसला ?

    या तीक्ष्ण आणि भेदक प्रश्नांपुढे चैतन्यवाद्यांची मती कुंठीत होणे साहजिक आहे. मुळात जगातील सर्वच धर्म कल्पितांवर आधारलेले असतात. सामान्यांच्या गळी मोठ्या प्रमाणावर धर्मकल्पना उतरवण्यासाठी ते आवश्यकही असाव कदाचित. तुमचा येशू कुमारी मातेच्या पोटी जन्मला हे कसे शक्य आहे ? मेडिकल सायन्स च्या नियमाविरुद्ध आहे हे, किंवा मृत्यूनंतर देखील तो परत आला हे असंभव आहे, तो पाण्यावरून चालला हे भौतिकशास्त्राच्या विरुद्ध आहे असा वाद आपण ख्रिश्चन धर्मीयांशी घातला तर ते चिडणे आणि अश्या प्रश्नांची तर्क दृष्ट्या समाधानकारक उत्तरे त्यांच्यापाशी नसणे हेही स्वाभाविक आहे . न्युटन, ग्यालिलिओ, लिओनार्दो अश्या ख्रिश्चन धर्मपरंपरांना धक्का देणा-या पाश्चात्य जडवादी शास्त्रज्ञांना चर्चने दिलेला त्रास सर्वश्रुत आहे. किंवा इस्लाम धर्मियांना महंमद हा मोरासारख्या दिसणा-या स्त्रीचेहरा असणा-या प्राण्यावर बसून अल्लाह च्या भेटीला जाणे अशक्य आहे. ही एक भ्रामक कथा आहे असे सांगितल्यास त्यांच्या धार्मिक उन्मादाचा सामना करावा लागेल.

    तथापि चार्वकांनी अश्या कोणत्याही विरोधाची तमा बाळगलेली दिसत नाही. ईश्वरवादावर त्यांनी चढवलेला हल्ला हा कोणत्याही एका धर्माच्या विरोधात नाही. चार्वाकांना वैदिक धर्म विरोधी समजण्याचे कारण नाही. त्याकाळात हिंदुस्थानात एकमेव असणारा धर्म म्हणून त्यांचे विचार वैदिक धर्म परंपरांच्या अनुषंगाने आहेत इतकच. तात्कालिक दृष्टीने विचार न करता एक विशुद्ध जडवादी तत्वज्ञान म्हणून चार्वाक दर्शनाकडे पाहीले असता हा सर्वच धर्मातील ईश्वर वाद्यांवर सार्वत्रिक आणि सार्वकालिक स्वरूपाचा प्रखर हल्ला आहे हे ध्यानात येत.

    भूतात्मकं जगत्। स्वभावं जगतः कारणं आहुः।
    न परमेश्वरः अपि कश्चित्।
    न पुनर्जन्मः न मोक्षः। मरणं एव मोक्षः।
    न स्वर्गो नापवर्गो वा नैवात्मा पारलौकीक:।
    नैव वर्णाश्रमादीनां क्रीयाश्च फलदायिका :।।

    चार्वाकांनी एकूणच सर्व धर्मकल्पनांच्या मुळावरच घाव घातला आहे. ईश्वरच नसेल तर धर्माचे अस्तित्व ते काय उरले ? देवाचे अस्तित्व अमान्य करण्याचे कारण धर्म आणि देव यांच्या नावावर समाजात धर्ममार्तडांनी चालवलेले सामान्यांचे शोषण आणि समाजात वर्ण व्यवस्थेच्या नावावर माजवलेली असहिष्णू अवव्यवस्था हेच आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. शिवाय पारलौकीकाच्या मागे लागून लौकिक जीवनाकडे धर्माने फिरवलेली पाठ हे देखील महत्वाचे कारण आहे.

    चार्वाक आणि ज्ञान संपादनाची प्रमाणे

    ReplyDelete
  28. चार्वाकांना फक्त दोनच ज्ञान साधने मान्य आहेत. प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षनिष्ठ अनुमान. जे इंद्रियांना प्रत्ययास येते तेच प्रमाण बाकी सर्व खोटे आहे यावर चार्वाक ठाम आहेत. अनुमान प्रामाण्याच्या बाबतीत चार्वाक जास्त कठोर आहेत. कारण त्याला मर्यादा आहेत. प्रत्यक्षानिष्ठ अनुमान म्हणजे एखादी गोष्ट आता जरी प्रत्यक्ष दिसत नसली तरी नंतर का होईना तिचा पडताळा घेता आला पाहिजे. अनुमान हे अंतिम प्रमाण मानण्यास चार्वाकांचा नकार आहे कारण अनुमान आले कि काही प्रमाणात संदेह आला. कशाच्या तरी अनुभवाच्या शिदोरीवर कोणीतरी काही अनुमान करतो. उदा. जिथे अग्नी असते तिथे धूर असतो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. यावरून जिथे धूर आहे तिथे अग्नी आहे असा अंदाज बांधण्याकडे कल होतो. डोंगरावर धूर आहे म्हणजे तेथे अग्नी आहे असे अनुमान काढता येईल. आणि असे अनुमान फसन्याचीही शक्यता असते. किंवा लोखंड तप्त असते तेव्हा त्यात अग्नी विद्यमान असतो परंतु त्यातून धूर निघत नाही. अनुमान प्रामाण्य अश्या प्रकारे चार्वकांनी अंशत: बाद ठरवले आहे .

    खेरीज चार्वाक संभवनीयतेचा देखील विचार करतात. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जे प्रत्यक्ष प्रमाण मागणे कदाचित व्यवहार्य ठरणार नाही. काही ठिकाणी आपणास अनुभवावर आधारित गृहीतके विचारात घ्यावी लागतात. अनुमान म्हणजे जास्तीत जास्त संभवनीय असलेले सत्याच्या जवळ असलेले प्रमाण आहे. इथे आपल्याला चार्वाकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्ययास येतो. विज्ञानामध्ये आज प्रस्थापित झालेला सिद्धांत उद्या नवीन संशोधनाच्या आधारे कोणीतरी खोटा पाडू शकत. आज जी गोष्ट विज्ञानाधारे सत्य म्हणवते ती उद्या बदलू शकते. शेवटी सत्य म्हणजे तरी काय असते ?

    ReplyDelete
  29. सत्य म्हणजे एका अर्थाने टोकाची संभवनीयताच असते.

    शब्द प्रामाण्य तर चार्वाक सपशेल नाकारतात. शब्द हे मुळात निरर्थक असतात. त्याचे रूढ अर्थ हे परंपरेने त्यांना चिकटलेले असतात. उदा. एका कालखंडात विशिष्ट अर्थाने वापरला जाणारा शब्द नंतरच्या काळात वेगळ्याच अर्थाने वापरला जातो अशी हजारो शब्दांची उदाहरणे आपणास भाषाशास्त्रज्ञ देऊ शकतील. शिवाय दुसरे कारण म्हणजे शब्द हे कोणीतरी उच्चारलेले असतात. नंतर कोणीतरी त्यांचे संकलन करते. (कोणीतरी त्यात भेसळ देखील करते.) इथ शब्द उच्चारणा-याची पात्रता काय ? संकलन करणा-याची पात्रता आणि हेतू काय ? हे वादग्रस्त प्रश्न आहेत. अपौरुषेय वेदांतील शब्द प्रमाण मानायचे झाले तर वेदात जर्भरी, तुर्भरी असे शब्द येतात. त्यांचा अर्थ कसा लावायचा व असे निरर्थक शब्द कसे प्रमाण मानावयाचे ? शिवाय यम आणि यमीच्या कथेचा (अभ्यासू वाचकांना ही कथा माहित असावी ) उल्लेख करून चार्वाक म्हणतात हे असले शब्दप्रामाण्य काय कामाचे ?

    ।। प्रत्यक्षं एव प्रमाणः न कश्चित् आगमः ।।

    चार्वाक आणि कर्मकांड

    चार्वाकांच्या नास्तिक भासणा-या विचारधारेचे मूळ तात्कालिक समाजात देव आणि धर्म यांच्या नावाखाली लोकांची चाललेली पिळवणूक आणि शोषण हे आहे. त्यामुळे प्रत्यक्ष देवाचे अस्तित्व नाकारणारे चार्वाक कर्मकांडावर किती कठोर टीका करत असतील याची कल्पना करता येते. चार्वकांचे उपलब्ध साहित्य कर्मकांडावर इतका करडा प्रहार करते तर त्यांचे जे साहित्य उपलब्ध नाही किंवा हेतुपुरस्पर अनुपलब्ध करण्यात आलेले आहे त्यात त्यांनी कर्मकांडाची कशी भंभेरी उडवली असेल याची देखील कल्पना येऊ शकते. चार्वाकांचा विशेष राग तत्कालिक यज्ञ पद्धतीवर व त्यात देण्यात येणा-या पशुबळीच्या प्रथेवर आहे. इथे त्यांचा एक प्रातिनिधिक श्लोक देतो जो संपूर्ण यज्ञविधीच्या फलव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे करतो.

    पशुश्वेन्नीहत: स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति ।
    स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते ।।

    अर्थात जोतिष्टोम यज्ञात मारलेले पशु जर स्वर्गात जातात तर यजमान स्वत:च्या पित्याला का यज्ञ वेदीवर बळी देत नाहीत.

    मृतानामपि जन्तुनां श्राद्धं चेतृप्तीकारणम्
    निर्वाणस्य प्रदिपस्य स्नेह: प्रज्वलयेच्छीखाम्

    अर्थात जर मेलेल्या जीवांची तृप्ती श्राद्धाद्वारे होऊ शकत असेल तर तुपाने विझलेल्या दिव्याची ज्योतही मोठी होईल.

    स्वर्गस्थिता यदा तुप्तीम् गच्छेयुस्तत्र दानत:
    प्रासादस्योपरीस्थानामत्र कस्मान्न दीयते

    अर्थात भूलोकात केल्या दानामुळे जर स्वर्गात असलेल्या पितरांची तिथल्या तिथे तुप्ती होत असेल तर इमारतीत वरच्या मजल्यावर राहणा-या लोकांना अन्न येथे खालच्या मजल्यावर का देत नाहीत ?

    ततश्च जीवनोपायो ब्राह्म ब्राह्मनैविहीस्त्विह
    मृतांनां प्रेतकार्याणि न त्वन्यद्विद्यते क्वचित्

    अर्थात ब्राह्मणांनी स्वत:च्या उपजीविकेसाठी योजलेले हे सर्व उपाय आहेत अन्यथा इथे मेलेल्यांसाठी प्रेतकार्ये कदापी अस्तित्वात नसती.

    उपरोक्त श्लोकांवरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की चार्वाक म्हटले की धर्ममार्तंड का इतके हादरतात , चार्वाक दर्शन खोटे , दांभिक आणि भोगवादी आहे असे ठरवण्याची त्यांची का इतकी धडपड असते , का बहुतांश पुराणे आणि धर्मग्रंथात चार्वाकांची इतकी निंदा केली गेली आहे ? चार्वाकानी ज्या कल्पितांवर धर्माचा पाया रचला गेला आहे त्या सगळ्या कल्पितांनाच समूळ हादरा दिला आहे. धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार आणि धर्म आणि धर्म कल्पना यात हितसंबंध गुंतलेले प्रस्थापित शोषणकर्ते यांच्या मुळावरच चार्वकांनी आपल्या तत्त्वज्ञानातून घाव घातला आहे.

    चार्वाक मत जनसामान्यांमध्ये का रुजू शकल नाही ? चार्वाक मत दडपून टाकण्याचे देश काळ आणि समाज यांच्यावर कोणते दुष्परिणाम झाले याचा वेध घेऊ पुढील लेखात ...

    - सुहास भुसे.
    .................................................................................................

    ReplyDelete
  30. In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया पाली "विनयपिटकाचा" संदर्भ द्या !

      Delete
    2. दुसऱ्यांच्या संदर्भावर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला.

      Delete
  31. "In the Vinay Pitaka the Buddhist Monks were forbidden to occupy with this (Lokayat) doctrine. (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158)"---------------------------->

    It means, Buddha did not restricted the learning of Lokayat thoughts to Buddhist Monks as well as Buddhist Upasaka's also. He was a greatest founder of freedom, unity and compassion thoughts. Actually there was no any need of Lokayat doctrine to occupy in "Vinaypitaka".

    Sanjay Pataskar

    ReplyDelete
  32. Actual wording in this (India's Past:A survey of Her Literatures, languages and Antiquities By Arthur Anthony Macdonell, page 158) book is :

    "Outside the orthodox systems was the doctrine of materialism called Lokayat, ‘directed to the world’, the founder of which was held to be Charvaka . That it was an old school is indicated by the fact that in the vinaypitaka the Buddhist monks were forbidden to occupy themselves with this doctrine. Of the literature of the adherents of Charvaka nothing has survived, and their doctrines are known to us only from the accounts of opponents".

    This is not sufficient to prove that Buddha not allowed to teach or learn the thoughts of Lokayat (Charvaka).

    Sushil Sathe.

    ReplyDelete
  33. श्री संजय सर ,
    चार्वाक आणि लोकायत यांच्या बद्दल चर्चा घडवून आणल्या बद्दल आपले अभिनंदन
    आणि तितक्याच तयारीने इतरांनी त्यात मनापासून भाग घेत आपली मते खोडण्याचा प्रयत्न केला आणि चर्चा रंगत गेली
    आजवर मी श्री नरहर कुरुन्दकर यांच्याकडून झालेले लोकायत आणि चार्वाक यांच्या बद्दल लेखन वाचले होते ,पुस्तकाचे नाव बहुतेक मागोवा असे होते
    आज त्यानंतर प्रथमच एकदा या शाखेतील विचारांची झाली
    सर्वांनी अतिशय अभ्यास पूर्वक मतांचे खंडण मंडण केले आहे ,परंतु मधे मधे आपल्या मतांना खोडताना कुणीतरी विनाकारण खोडसाळ भाषा वापरली आहे ती टाळता आली असती तर जास्त बरे झाले असते
    असाच आपण राधा कृष्ण आणि मधुरा भक्ती आणि त्याचे समाजावरील परिणाम असा विषय घेणार आहात असे कधीतरी ऐकल्याचे आठवते

    ReplyDelete
  34. No reference from Pali Vinaypitak...hmmm... interesting...says a lot in itself... :-(

    ReplyDelete
  35. संजय सर,

    सरांनी संदर्भ शोधणे थांबविले असेल अशी आशा करू या! अजूनही चालू असले तरी काही हरकत नाही, कारण त्यासाठी विनयपिटका मद्धे उपरोक्त संदर्भच अस्तित्वात नाही, हे स्पष्ट आहे. जोशीबुवाच्या तसेच Arthur Anthony Macdonell च्या नादाला लागून संजय सरांनी स्वतःचे हसे करून घेतले आहे, हे मात्र नक्की. गौतम बुद्धाने पाखंडी मतांचा जरी धिक्कार केलेला असला तरी, कोणतेही विचार आंधळेपणाने स्वीकारू नये, असा त्यांचा दंडक होता. विचार न ऐकताच, न वाचताच, न समजावून घेता तो विचार योग्य आहे की अयोग्य हे कसे समजणार? म्हणूनच लोकायतशास्त्र शिकविण्यास किंवा शिकण्यास बुद्धाचा विरोध असण्याचे कारणच नव्हते. म्हणूनच सरांनी "कोशावर" तसेच "भारताचा भूतकाळ" अशा पुस्तकांवर अवलंबून न राहता मूळ ग्रंथांचा आधार घेतला असता तर त्यांच्यावर हि नामुष्कीची वेळ आली नसती. यापुढे संजय सर संदर्भांबाबतीत अधिक चाणाक्ष होतील अशी अपेक्षा करू या !

    -आनंद साळुंखे

    ReplyDelete
  36. तथागत बुद्धांबद्दल असे धडधडीत खोटे वाक्य लिहिताना सोनावणी यांनी जरा जनाची नाही पण मनाची लाज बाळगायला हवी होती!

    संतोष

    ReplyDelete
  37. भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी काहीही लिहिताना थोडे तारतम्य असायला हवे , बरोबर ना संजयजी...................... नाहीतर 'उचलली जीभ आणि लावली टाळ्याला' अशी बदमाशी काय कामाची?

    आशिष मेहता

    ReplyDelete
  38. मला एकच आश्चर्य वाटतेय...अजून शंकराचार्यांचे अनुयायी मला विरोध करायला कसे नाही आले? लोकायतिक मताला बौद्ध "भुतवादी" म्हनत असत या नवविचाराच्या बौद्धांना माहित नाही हे ठीक आहे....मी समजु शकतो. हजार वर्ष टिकणारा बौद्ध धर्म स्त्रीयांना धर्मात प्रवेश दिला तर पाचेशेच वर्ष टिकेल असे म्हननारा बुद्धही मी समजु शकतो. शेवटी बौद्ध धर्म हा वैदिक धर्माचेच एक्स्टेंशन होता हे माझे मत आपल्याला माहित आहेच. पुरुषवादी धर्म प्रथम वैदिकांनी जन्माला घातला आणि बुद्धाने त्यालाच पुढे नेले.

    ReplyDelete
  39. अजून शंकराचार्यांचे अनुयायी मला विरोध करायला कसे नाही आले? ---------------------> कोण आहेत शंकराचार्याचे अनुयायी ?????????

    लोकायतिक मताला बौद्ध "भुतवादी" म्हनत असत या नवविचाराच्या बौद्धांना माहित नाही हे ठीक आहे....मी समजु शकतो. ---------------------------> संजयचे धडधडीत खोटे लिखाण !

    हजार वर्ष टिकणारा बौद्ध धर्म स्त्रीयांना धर्मात प्रवेश दिला तर पाचेशेच वर्ष टिकेल असे म्हननारा बुद्धही मी समजु शकतो. ------------------------------> संजयने काळाचे भान न ठेवता लिहिलेले खुळचट विचार !

    शेवटी बौद्ध धर्म हा वैदिक धर्माचेच एक्स्टेंशन होता हे माझे मत आपल्याला माहित आहेच.------------> संजयचे भंकस मत !

    पुरुषवादी धर्म प्रथम वैदिकांनी जन्माला घातला आणि बुद्धाने त्यालाच पुढे नेले. ------------------> संजयचे तथाकथित असत्यवादी संशोधन !

    संभाजी पाटील.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...