Tuesday, May 26, 2015

आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

आपली प्रगती साधन्यासाठी स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती क्षमता आमच्या समाजव्यवस्थेत व धुरिणांत मुळातच नसेल तर आपल्याला मुळात संस्कृतीच नाही असे म्हणावे लागते. आर्थिक सक्षम समाजच संस्कृती घडवू शकतात. यासाठी समाज-विजिगिशुता लागते. प्रगतीची भीक नव्हे तर प्रगतीत सर्जनात्मक सहभाग लागतो. मागचे गुणगौरव सोडा...आज भारतात कोणत्वी नेमकी संस्कृती आहे याचा शोध घेऊन पहा. आम्ही उभारणारे नव्हे तर उध्वस्त करणारे बनलो आहोत. खुनशी जातियवादाने आमचाच नाश आरंभला आहे तरी त्याचे भान नाही. उलट जोतो कोणत्या ना कोणत्या झुंडीत जाऊ पाहतो आहे. झुंडीशिवाय जगता येणे ज्या समाजात अशक्य बनून जाते त्या समाजाची काय संस्कृती असणार? जेथे साहित्यरचनाही जातीयच भावनेतून लिहिल्या अथवा वाचल्या जातात ते काय संस्कृतीचे निर्माण करणार? 

साधे पाण्याचे घ्या. आपल्याकडे दुष्काळ पडला तरी इस्त्राएलच्या शंभरपट पाऊस पडलेला असतोच. तरी पावसाने ओढ दिली कि पाण्याची बोंबाबोंब सुरुच. आमचा शेतकरी शक्य असुनही, हजारो वर्ष शेतीत असुनही पाण्याचे नियोजन त्याला करता येत नाही. परत वर स्वत:ला तो सिंधु संस्कृतीचा वारसदार म्हणवतो. पाच हजार वर्षांपुर्वी ज्या कौशल्याने त्यांनी पाण्याचे नियोजन केले त्यामुळे सिंधू लोक तत्कालीन ज्ञान जगाशी व्यापार करत सुबत्तेला पोचले. आम्ही आजचे? ते जुने जाऊद्या, ७२च्या दु:ष्काळात बनवलेली जवळपास ९५% गांवतळी आज गाळ भरुन क्रिकेटची मैदाने झाली आहेत. जलसंधारणाचा कार्यक्रम आपल्याच स्वार्थासाठी का होईना स्वत: राबवावा हे आजही आम्हाला समजत नसेल तर आम्ही दरिद्रीच राहणार. नेत्यांना तेच हवे. अब्जावधी रुपये कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवत आमचे जलसंधारनातील महनिये जर तालुकेच्या तालुके खरेदी करण्याच्याच मोहिमेवर असतील तर दुसरे काय होणार? जेथे पाणी मुबलक असते तेथे एवढी उधळपट्टी कि पाहुन वाटते...हे लोक दुष्काळातच सडायच्याच लायकीचे आहेत.

जर प्रजेलाच अक्कल नसेल तर नेत्यांकडुन कोणत्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करणार? शेतकरी दुर्बल झाला आहे तो यामुळे आणि दु:ष्काळ वा अतिवृष्टी झाली तर प्यकेजेस येणार-कर्जमाफ्या होणार-वीज्बिले माफ होनार....खात्रीच असतेना हो! मग कशाला कष्ट करा? पारावर चकाट्या पिटायला आणि नेत्यांच्या मागेपुढे हिंडण्यात ज्यांना कार्यशीलता वाटते असा कोणताही समाज कधीही प्रगती करुन स्वत:च्या पायावर उभा राहु शकत नाही.

आणि ही बेईमानी वृत्ती कोणत्या क्षेत्रात नाही? भारतातील बहुसंख्य कंपन्यांचे ताळेबंद हे लबाड्यांनी भरलेले असतात. ब्यंकांचे ताळेबंदही याला अपवाद नाहीत.

मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार?

एकीकडे आमच्या भागात प्रकल्प नाहीत म्हणून बोंब मारायची आणि एखादा प्रकल्प येवू घातला रे घातला कि आमच्याच स्वयंसेवी संस्था ते राजकारणी त्या विरोधात बोंब मारु लागतात. एन्रोन ग्यसवरचा प्रकल्प होता...तेंव्हाही तेच आणि जैतापूर प्रकल्प आण्विक आहे तेंव्हाही तेच. मुदे बदलतात...पण विरोध राहतातच...त्यासाठी खोट्यांचा आश्रय घ्यायला आम्ही कमी करत नाही.

अशा बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती कशी घडणार?
.
 आणि काही लोक चालले भ्रष्टाचार निर्मुलन म्हणजेच क्रांती असा नारा द्यायला.

 आपल्या प्रजेची मानसिक भ्रष्टता व त्यामुळेच आलेली नवनिर्मानातील पंगुता यावर आपण कधी चर्चा करनार आहोत?
 भारताने असा काय मौलिक शोध गेल्या हजार वर्षांत लावुन दाखवलाय कि ज्याचा जागतीक अर्थव्यवस्थेवर व जीवनव्यवस्थेवर प्रभाव पडलाय?

 आमच्या शिक्षणव्यवस्थेने आमची सृजनात्मकता मारुन टाकलीय. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. आम्हीही आमच्या पोरांना असेच गुलाम बनवणार यात शंका नाही.

 मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय?

आणी मग हेच स्वत:हुनच गुलाम बनलेले पुरातन संस्कृतीच्या गौरवगाथांत रमत आपल्या भ्रष्ट मानसिकतेचे उदात्तीकरण करु पाहतात. लोकांनाही त्यात रमायला आवडते. निर्माणाचे सोस संपतात. चीन हे शत्रुराष्ट्र म्हणायचे, सीमावाद खेळत बसायचे आणि चीनलाच भारतात अब्जावधी डालर्सच्या गुंतवणुकींचे साकडे घालायचे...हा अजब धंदा भारतीयच करु शकतात!

ही मानसिकता आम्ही कशी आणि का बनवून घेतली?

6 comments:

 1. आप्पा - या संजयला इतका त्रास का होतोय ?
  बाप्पा - माहित्ये ना सगळ्याचे मूळ ? एकदा का शैव वाद आला की सगळ्या गोष्टी चुटकी सारख्या सुटतील , आपला हरवलेला बाणा सापडेल , घरोघरी सोन्याचा धूर निघू लागेल माणसे सकाळी एकमेकांकडे जाउन विचारपूस करतील आणि कोणाला काय हवाय ते देतील , नसेल तर आपल्या कनवठीचे सोडून देतील , एकदा का शैव धर्माची पताका सर्वत्र फडफडू लागली की लोक नेसूचे सोडून गोर्गारीबाला देऊ लागतील
  आप्पा - अरे यडा का खुळा तू झंप्या ?अरे गरीब औषधाला सुद्धा उरणार नाही या शिवभारतात - तू आहेस कुठे ?मला एक कोडे पडले आहे , शैव धर्म म्हणे १०००० का १५००० वर्शापुर्वॆचा आहे , आणि संस्कृत त्या नंतरची आहे , मग शिव्स्तुतीचे भाषा काय होती ? संस्कृत समजा ३५०० वर्षे जुनी आहे , मग त्या आधी शैव लोक काय नुसतेच नाक मुठीत धरून तप करायचे ?
  बाप्पा - ते संजय सांगेलच संजय ! त्याच्या कडे सगळ्याचे उत्तर असतेच !पण मला एक शंका आहे , आपली उगीचच खवचट म्हणा फार तर !पण ब्राह्मण मराठा , माली , आणि आरक्षित सर्व जन खुशीत आहेत , त्यांच्या हातात सरकारच्या नाड्या आहेत , खोब्रागडे अमेरिकेतून सुखरूप परत आली आहे , अशा अनेक खोब्रागडे आणि त्यांचे भाईबंद आपल्या राष्ट्राची घोदौद आणि त्याची दिशा ठरवत आहेत
  आप्पा - हजारो टन शेतमाल दरवर्षी सडवून फेकला जात आहे , कारण ठेवायला जागा नाही !म्हणाल त्या वेळेस म्हाणाल त्या शेतमालाची आकाशाला भिडतील असे भाव मिळवण्याची ताकद आज भूतपूर्व आणि सद्य सरकार कडे आहे . - अडचण काय आहे तेच समजत नाही !
  बाप्पा - गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या आणि पेन्शन आज मिळत आहे एकेका कुटुंबाचे ३ - ३ फ्ल्याट आहेत , ब्यांकांचे लोकर सोन्या नान्याने ओसंडून वहात आहेत ,
  आप्पा - झोपडपट्टीत प्रत्येकाकडे केबल आहे दुचाकी आहे , रंगारी , घरकाम करणाऱ्या बाया , सुतार , चांभार , सगळे बिझी आहेत भाजीवाले , दुधवाले पंक्चर वाले मजेत आहेत , शेतकरी कर्जे काढून लग्नसोहळे गाजवत आहेत , पुण्याला मांस मटन आणि पळ्या पार्ट्या यामुळे हॉटेल दुथडी भरून वाहत आहेत - मग नेमकी व्यथा काय आहे ?
  बाप्पा - अहो रूपं अहो ध्वनीम हा नव्या जगाचा संदेश आहे
  आप्पा - इतिहासाचार्य राजवाडे यांनी एकदा लिहिले आहे की सर्व सामान्य प्रजेला , आदिलशाही , निजामशाही आणि मराठेशाही यात चांगले कोण हे जाणून घेण्यात स्वारस्य नसायचे ! ४ घोडे इकडून तिकडे भगवा नाचवत , धूळ उडवत गेले किंवा एखादी खाशा तुकडी अल्ला हो अकबर करत मिरवत गेली तरी त्यांना सुख दुःख काहीच वाटत नसे -
  बाप्पा - आपली पोरेबाळे आणि आपला जीव आणि रोतीदाना सुखरूप की मग कुणी का काहीही करेना - गंगा यमुनेच्या दुआबात तर जमीन तर इतकी सुपीक , कि काहीही नुसते फेकले तरी उगवायचे ,
  आप्पा - आजही तीच परिस्थिती आहे , सगळे तेच चालू आहे ,
  बाप्पा - मथुरेत अयोध्येत - मशिदी बांधल्या गेल्या जन्म स्थानावर , पण आपण दुर्लक्ष्य करत जगायला शिकलो ,
  आप्पा - मुसलमान म्हणून आज नोकरी मिळत नाही असा आरडा ओरडा होतो आहे , पण कुणी वन्दे मातरम म्हणायची सक्ती केली तर तो जातीय वाडी ठरतो , भगतसिंग आणि हजारो क्रांतिकारकांनी गीता कवटाळून फाशी स्वीकारली , पण तीच गीता शाळात शिकवायचा प्रस्ताव आला कि सरकार जातीयवादी ठरते , गायीचे मांस बंद केले तरी सरकार जातीयवादी ठरते ,
  बाप्पा - कोणाला हवे आहे गायीचे मांस , त्यांनी अवश्य पाकिस्तानात जावे ,
  आप्पा - पण संजय सोनावानी याना उमाळा येतो , त्याना अशा विचारात वैदिक दिसू लागतात ,
  बाप्पा - वन्दे मातरम चा आग्रह - यात वैदिक काय आहे ?
  आप्पा - मुसलमान हसतात पोट भरून - त्याना माहित आहे की संजय सारखे आहेत तो पर्यंत आपण सुखरूप आहोत !

  ReplyDelete
 2. थोर विचारवंत संजय सोनवणी , आणि सदासर्वदा खवचट लिहिणारे आप्पा बाप्पा यांनी तिरकसपणे आजच्या समाजाची वैचारिक आवस्था नेमकी मांडली आहे ,
  फरक इतकाच आहे , की अप्पा बाप्पा २ पावले अजून पुढे गेले आहेत ते योग्य की अयोग्य ते माहित नाही . संजय सरांचे टोचून लिहिलेले विचार अंतर्मुख करतात हे मात्र खरे . आज अशी अवस्था आहे की जसे बेडकाना एक राजा हवा होता तसे खोट्या वल्गना करत कुणीतरी पहिल्याला बाजूला ढकलून इथे दिल्लीत येउन बसला आहे . हे असेच चालणार - या विरुद्ध आवाज उठवणारा " देशद्रोही " ठरतो , म्हणूनच नक्षलवादी लोकाना बदनाम केले जात आहे .
  आप्पा बाप्पा जरी म्हणत असले की राम किंवा कृष्ण जन्मभूमीवर मशिदी बांधल्या , तरी भाजप ची ही खेळी हास्यास्पद ठरत गेली , हा इतिहास आहे .
  खरे म्हणजे गाईचे आणि डुकरांचे धंदेवाईक तत्वावर उत्पादन करून त्यांचे मांस खाण्यात काय चुकीचे आहे ? मेंढी चालते , कोंबडी चालते , मग गाय का नको ? डुक्कर का नको ?
  आज सर्व ठिकाणी सरकारी कारभार आरक्षित लोकांकडे आहे त्यामुळे त्यांच्या कडून भ्रष्टाचार होत नसेल का ? इकडे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि होयबा सारखे वागून सरकारी नोकरीत धुमाकूळ घालायचा -
  आज निगरगट्टपणे वाळू माफिये पाण्याचे बंधारे फोडत आहेत , पाणी वाहून जात आहे , शिवसेना जैतापूर बाबत घुमजाव करत आहे , , नारायण राणे पराभवाच्या धसक्यातुन सावरलेले नाहीत , भाजप चे टोल बंद चे आश्वासन पोकळ ठरले याचे सुख दुःख कोणालाच नाही , सरकार तर्फे सामान्य माणसाला आरोग्याची कोणतीही हमी नाही - अगदी हळू हळू संपूर्ण भारत हा नवनवीन साथी आणि रोग आणि त्यावरील औषधे यांची जागतिक प्रयोगशाळा बनत आहे.
  प्रत्येक ज्ञानाचा बाजार झाला आहे , योगा असो किंवा आयुर्वेद असो !
  आजकाल आक्रमण करून देश जिंकायचे दिवस संपले , पण भारतीय जनता , अजूनही भावनिक देशप्रेमाच्या कल्पनेत रमणारी आहे , आज युरोपातले देश आशियातील देशाना अपग्रेड करत असतात ते त्यांच्या मालाला मार्केट मिळावे म्हणून - पण आपल्याला वाटते की आपण प्रगत झालो आहोत .
  नवीन पिढीत जमिनी विकून मालामाल होण्याचा कल वाढत आहे , गुंठामंत्री आणि त्यांचा पैसा काढून घेणारे , असे दुष्टचक्र निर्माण झाले आहे . काळ खडतर आहे - परंतु संजय सरांनी सर्व गोष्टींची जाणीव करून दिली आहे - सोनावणी आणि आपा बाप्पांचे अभिनंदन केले पाहि

  ReplyDelete
 3. आपली प्रगती साधण्या साठी , स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती कशी रुजते ? संस्कारातून रुजते ! संस्कार म्हणजे काय हो ? ते कुठे सुरु होतात ? घरातून , घर म्हणजे काय ? कुटुंब ! मग त्यात कुटुंब प्रमुख आला , त्याचे विचार आले , त्याचा आग्रह आला , त्याची स्वप्ने आली , त्यात जे हाती लागेल ते रुजवले जाते - मग ती जातीयता असेल किंवा धार्मिकता असेल - मुसलमान असेल तर मदरसा अपरिहार्य आहे असे सांगणारे असतात , हिंदू असेल तर ? देव आले , विधी आले - स्तोत्रे आली ,आईचा एक महाराज वडिलांचा एक स्वामी , तो प्रसन्न होतो , कशाने ? तर त्याचे गुणगान गायले तर , भक्ती केली तर , त्याला शरण गेले तर !
  मी तर म्हणतो , परिस्थितीला शरण जाण्याची सुरवात जर घरापासून होऊ लागली तर ? काय होणार त्या मुलाचे ? गंडे दोरे आणि उभे आडवे गंध यांनी त्याचे विचार गुदमरून जाणार .
  गेल्या कित्येक शतकात आपल्याला भौतिक शोध लावल्याचा आनंद , संजय सोनवणी म्हणतात त्याप्रमाणे नाही .
  वीर सावरकर यांनी तरुणांना आधुनिक विचार शिकवण्याचा प्रयत्न केला , पण राजकारणापोटी त्यांचे बद्नामिकरण झाले महात्मा गांधी याना नको असलेल्याला अनुल्लेखाने मारण्याचे तंत्र जमले होते . त्यामुळे स्व . सावरकर यांचे समाजकारण मागे पडले ,

  शहीद भगतसिंग याना फाशी माफ करण्यासाठी म गांधीनी काय केले ?
  स्व. सावरकर यांनी शिवाजीचे किती गोडवे गायले आहेत ते मुळातच वाचण्या सारखे आहे .
  पण
  आजचे संभाजी ब्रिगेड आणि छावा हे जातीय गट हीन प्रकारचे राजकारण समाजकारण करत अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण करत आहेत .
  पं . नरेंद्र मोदी हेपण नुसतेच बोलघेवडे ठरत आहेत - ५ वर्षांनी तेपण खुर्चीसाठी भाजपचे तुकडे करणार हे उघड आहे आणि मवाळ जहाल असे भाजप चे तुकडे होणार .ही काळ्या दगडावरची रेघ आहे . कारण सत्ता माणसाला हैवान बनवते !

  आपल्या देशाला वन्दे मातरम म्हणायची लाज वाटते , आपल्याला हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते .
  कालच्याच बातमीत वाचले की आता काही कंपन्यांवर मुस्लिमाना नोकऱ्या नाकारण्याच्या आरोपामध्ये अडकवले गेले आहे . हा नवा दहशतवाद सुरु होतो आहे .
  काल घोरपडे यांनी अगदी योग्य मत मांडले आहे की वन्दे मातरम म्हणण्याची ज्या मुस्लिमाना लाज वाटते त्याना या देशात नोकरी मागण्याचा काय हक्क आहे ? खरेतर सर्व मुस्लिमाना लेखी वन्दे मातरम बाबत धोरण किंवा त्यांचे मत देण्याचे बंधन नोकरी देणाऱ्यां ने घातले पाहिजे - वन्दे मातरम आणि भारत माता की जय असे प्रत्येक देशवासियाने म्हटलेच पाहिजे

  आपल्याला मुस्लिम अनुनयाची सवय लागली आहे . त्यातूनच आरक्षणाचे भयानक भूत उभे रहात देशाला कीड लागली आहे .
  नशीब !
  खाजगी नोकरीत आरक्षण मान्य नाही झाले . हे सर्वांचे महाभाग्य आहे !

  ReplyDelete
 4. http://m.lokmat.com/storypage.php?catid=297&newsid=6518937

  होम >> संपादकीय >> स्टोरी
  गांधींची हत्त्या आणि नथुराम भक्तांचा कुप्रचार
  First Published: 27-May-2015 : 00:39:50

  सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्त्या करून फासावर गेलेल्या एका गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण केले जाते आहे.

  गांधींनी जालियनवाला बाग हत्त्याकांडाचा व मोपल्यांच्या हिंसाचाराचा निषेध केला नाही, खिलाफत व फाळणीला पाठिंबा दिला, पटेलांना बहुमताचा पाठिंबा असताना पं. नेहरूंना पंतप्रधान केले, भगतसिंगांची फाशी रोखली नाही, नथुराम देशभक्त होता आणि देशभक्ती पाप असेल तर ते त्याने केले आहे, असे हे काही मुद्दे होत. यातील काही मुद्यांबाबतचे वास्तव येणेप्रमाणे-

  १) गांधींनी सुरू केलेल्या रौलट कायद्याविरुद्धच्या सत्याग्रहामध्ये जालियनवाला बाग हत्त्याकांड घडले ज्याचा त्यांनी निषेध केला होता. म्हणूनच त्यांनी १९१९ च्या माँटेग्यू-चेम्सफर्ट यांनी केलेल्या सुधारणा राबवण्यास नकार दिला व असहकाराची चळवळ सुरु केली. प्रतियोगी सहकारिता या नावाने लोकमान्य टिळक या सुधारणा राबवू इच्छित होते.

  २) गांधींनी खिलाफतच्या चळवळीला पाठिंबा दिला कारण तो निर्णय त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर काँगे्रस पक्षाचा होता.

  ३) १९२२ साली केरळमध्ये अत्यंत हिंसक असे मोपल्यांचे बंड झाले, पण त्यात झालेली गुंडगिरी आणि हिंसा समर्थनीय नव्हती. महात्मा गांधींनी मोपल्यांच्या हिंसाचाराची निंदाच केली, समर्थन कधीही केले नाही.

  ४) भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन क्रांतिकारकांना इंग्रज साम्राज्यवाद्यांनी १९३१ साली फासावर चढवले. या तिन्ही क्रांतिकारकांचे प्राण वाचावे यासाठी गांधी गव्हर्नर जनरल आयर्विन यास भेटले व फाशीची शिक्षा अमलात न आणण्याची विनंती केली. शिक्षेच्या एक दिवस आधी त्यांनी आपले सर्व भाषिक कौशल्य पणाला लावून एक पत्र लिहून शिक्षा माफ करण्याची विनंती केली, पण त्यास न जुमानता फाशी अंमलात आणली गेली. इंग्रजांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गांधींना दोषी धरण्याचे अजब तर्कशास्त्र गांधी विरोधकांनी विकसीत केले आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. ५) छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि गुरू गोविंदसिंग या थोर पुरुषांबद्दल गांधींच्या मनामध्ये आदरच होता. त्यांचा विरोध या थोर पुरुषांची नावे घेऊन हिंसेचा प्रचार करणाऱ्या लोकांना होता.

   ६) भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचा होता. पण शेवटपर्यंत तिला विरोध करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची अनुकूल भूमिका, मुस्लिम लीगने घडवून आणलेला हिंसाचार, देशात वाढत चाललेली जातीय हिंसा व त्यातून निर्माण होऊ शकणारे अराजक याचा विचार करून नेहरू व वल्लभभाई पटेल यांनी फाळणीचा निर्णय स्वीकारला. कॉँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीमध्ये गांधींनी त्यास विरोध केला आणि शेवटी बैठक सोडून ते निघून गेले.

   ७) गांधींनी हैदराबादच्या निजामाला पाठिंबा दिला नाही. जम्मू-काश्मीरचे महाराज राजा हरीसिंग यांनी आपले संस्थान भारतात विलीन करून सत्ता लोकप्रतिनिधींच्या हाती द्यावी असेच गांधींचे सांगणे होते. पण हरीसिंगांनी निर्णय लवकर न घेतल्यानेच आज काश्मीरचा प्रश्न तयार झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यामध्ये फाळणी झाली तेव्हां मालमत्तेचे वाटप करण्यात आले. भारतात २४ शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने होते. त्यातील काही कारखाने पाकिस्तानला देण्याऐवजी त्यांची किंमत म्हणून ७० कोटी रुपये द्यावे असे ठरले. त्यातील २५ कोटी रुपये सरकारने दिले व ५५ कोटी रुपये द्यावयाचे होते. काश्मीरचे युद्ध सुरू झाल्यानंतर सरकारने रक्कम देण्याचे पुढे ढकलले. कराराप्रमाणे भारताने ही रक्कम पाकिस्तानला द्यावी, असे गांधींचे म्हणणे होते. जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी केलेले उपोषण हे जातीय सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी होते, पाकिस्तानला ५५ कोटी रुपये मिळावेत यासाठी नव्हते, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

   ९) दिल्लीतील मशिदी मुसलमानांची धर्मस्थळे होती व ती त्यांना परत करणे न्यायाचे होते. दिल्लीतील निर्वासितांना सर्व प्रकारची सहाय्यता दिली पाहिजे. त्यात धार्मिक भेदभाव नको, असे गांधींचे सांगणे होते.

   १०) सोमनाथ येथील मंदीर बांधण्यास गांधींचा वा नेहरूंचा विरोध नव्हता. त्यांचे असे मत होते की, शासनाने आपल्या खर्चाने ते बांधू नये. कारण शेकडो वर्षांपूर्वी ते पाडण्यात आले होते. त्याची तुलना मशिदीच्या डागडुजीशी केली जाऊ नये. मशिदी या दंगेखोरांनी पाडल्या होत्या.

   ११) पं. नेहरू हे कॉँग्रेसचे तरुण आणि सर्वांत लोकप्रिय नेते होते. १९३० च्या निवडणुकीत हे सिद्ध झाले होते. नेहरूंनी पंतप्रधान व्हावे हे पटेलांनीही मान्य केले होते व कॉँग्रेस संसदीय पक्षाने त्यांची एकमताने निवड केली होती.

   नथुराम गोडसे याचे मातृभूमीवर प्रेम होते असे ते म्हणतात. हे प्रेम भूमीपेक्षा भूमीवर राहणाऱ्या लोकांवर असावे लागते. भारतातील बहुसंख्य लोक गरीब आणि शोषित होते. मागास जाती, दलित स्त्रिया या बहुजनांच्या उद्धारासाठी महात्मा गांधींनी आपले जीवन समर्पित केले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून भयग्रस्त भारतीयांना इंग्रजांविरुद्ध लढण्यास उद्युक्त केले, आयुष्यातील १० वर्षे कारावासात घालवली आणि जगाला अहिंसा व शांततेचा संदेश दिला अशा महापुरुषाची हत्या करून नथुरामने देशभक्तीचा कोणता आदर्श निर्माण केला? ही हत्त्या त्याने वैयक्तिक स्वार्थासाठी केली नाही, पण ती त्याने पक्षीय स्वार्थासाठी केली ही गोष्ट नाकारता येणार नाही. मातृभूमीवर प्रेम करणे हे पाप नाही, पण त्यास गांधी हत्त्येशी जोडणे हे पाप आहे. कारण देशभक्ती आणि गांधीहत्त्या या गोष्टी परस्पर विरोधी आहेत आणि असा गुन्हा करणाऱ्यांना कोणतेही पुण्य मिळणार नाही.

   प्रा.डॉ. अशोक चौसाळकर
   राजकीय विश्लेषक)
   

   Delete
 5. Sanjay please prove that Mr. M K Gandhi was in jail for 10 years. Else take back your false propaganda. But you are known to make false claims. Remember Guwahati blasts?

  ReplyDelete