जागतिक
अर्थव्यवस्थेत पुन्हा महामंदीची लक्षणे असून एकमेकांशी स्पर्धा करणा-य
पतधोरणांपासून जगभरच्या मध्यवर्ती ब्यंकांनी फारकत घ्यावी असे रिझर्व
ब्यंकेचे गव्हर्नर डा. रघुराम राजन यांनी म्हटले आहे. गेला काही काळ आपल्या
अर्थव्यवस्थेतील धोके आणि शाश्वत अर्थव्यवस्थेची गरज दाखवून देतांना मीही
अनेकदा हीच भिती व्यक्त केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थांनी डा. राजन यांचे
म्हणने अत्यंत गांभिर्याने घेतले पाहिजे. डा. राजन हे स्पष्टोक्ति
केल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत.
खरे म्हणजे ब्यंकांनी आपल्या वित्तवितरण धोरणातील प्राथमिकताच बदलायला हव्यात. जेंव्हा आर्थिक, नैसर्गिक आणि मानवी संसाधनांच्या गुंतवणुकी या जीवनावश्यकतेच्या उत्पादनक्षेत्रांत होण्याऐवजी मानवास क्रुत्रीम सुखाचा भ्रम देणा-या तंत्रद्न्यानांत/त्या अनुषंगिक उत्पादनांत व त्यांच्या विपनण व्यवस्थेवर विशिष्ट मर्यादेबाहेर होवू लागतात तेंव्हा आर्थिक अराजकाच्या दिशेने वाटचाल सुरु होते, जी आता सुरु झालीच आहे. खरे तर प्रत्त्येक अर्थव्यवस्थेने एक संतुलन साधले पाहिजे. गुंतवणुकीच्या स्त्रोतांचे विभाजन हे जीवनावश्यक आणि मानसिक गरजावश्यक असे संतुलित प्रमाणात व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात गेल्या वीस वर्षांतील एकुणातीलच जागतीक अर्थव्यवस्थेची वाटचाल पाहिली तर गुंतवणुक ही अन्याय्य पद्धतीने तंत्रद्न्यानाधारित...आणि त्यातल्या त्यात मानवास कार्यक्षम न करणा-या पण आभासी प्रतिष्ठा देणा-या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आणि शेती/पशुपालन, शेतीआधारित व इतर लघुउद्योग यांसारख्या पायाभुत क्षेत्रांतुन क्रमशा: घटत चालली आहे असे चित्र आपल्याला दिसुन येईल.
तंत्रद्न्याने ही मानवी जीवन सुखकर होण्यासाठी विकसीत व्हायलाच हवीत. त्याआधारीत उत्पादने बाजारात यायलाच हवीत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त त्याचा वेग आणि पुरवठा आणि ते प्रत्येकाच्या गळी उतरवण्यासाठी वापरले जाणारे मानसिक आणि पर्यायाने आर्थिक गुलामी आणनारे तंत्र विघातक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. या तंत्रद्न्यानांनी मानवी उत्पादकता, सर्जनशीलता वाढवण्यात हातभार लावला असता तर वाईट वाटण्याचे कारण नव्हते. सध्याची व्हर्चुअल सुख देणारी तंत्रद्न्याने तर मानवी समुहाला एकत्र आनण्याऐवजी "एकाकी" करत चालली आहेत असेच दुर्दैवी चित्र दिसते आहे. सामाजिक मानसशास्त्राचा बळी जर ही तंत्रज्ञाने घेत असतील तर आपणही त्यांचा वापर किती व कसा करावा यावर गांभिर्याने चिंतन करायला हवे.
पण मुलभूत समस्या ही आहे कि लोकांनी स्वतंत्र बुद्धीने विचारच करु नये अशी एकजिनसी सामाजिक मानसिकता बनवायच्या अवाढव्य प्रयत्नांत जागतिक अर्थव्यवस्था आहेत. ही मानसिकता बनवली जातेय व आपण त्यानुसारच जीवनाचे निर्णय घेतोय याची किंचितही जाणीव ही नवी व्यवस्था हौ देत नाही. हुकुमशाहीए राष्ट्रे जनमानसिकता अशा प्रकारे बनवायचा प्रयत्न करत असत. भारतात हे प्रयोग आजचे नाहीत. पण किमान त्याला विरोध तरी होतो...पण अर्थव्यवस्थेच्या ब-या वाईटाचे सारेच समान भागीदार बनु लागल्याने हे संकट हवेहवेसे वाटू लागणे हेच या नवमानसिकतेचे मुख्य लक्षण आहे.
नीतिशास्त्रात सुख म्हणजे काय यावर नितांत चर्चा झालेली आहे. कोणत्याही नीतिविदाने अजून परिपुर्ण म्हणता येईल अशी व्याख्या केलेली नाही. सुख ही मनाची अवस्था आहे याबाबत मात्र एकमत आहे. म्हणजे सुख ही व्यक्तिसापेक्ष बाब आहे. सुखाचे नियम व्यक्तिपरत्वे बदलतात. पण आता सुखाच्या नवीन व्याख्या आपल्या अर्थव्यवस्थांनीच बनवल्या असून सर्व जनप्रवाह त्या लाटेवर स्वार झाल्याचे चित्र आपल्याला दिसेल. यातुनच जे यापासून वंचित आहेत त्यांच्यातील असंतोषही धधगत राहतोय.
पण येथे हा प्रश्न उद्भवतो कि या तंत्रद्न्यानांनी खरेच मानवी जीवन सुखकर होते आहे काय? ते खरेच आरामदायी होते आहे काय? कि नवे ताणतणाव हीच तंत्रद्न्याने व त्यांचा अनिर्बंध वापर करत मानवी जगाला नवीन संकटपरंपरेत नेत आहेत? या आधुनिक संसाधनांमुळे नैसर्गिक स्त्रोत कसे नष्ट होत प्रुथ्वीला एक नष्ट न होवु शकणा-या कच-याची कुंडी बनवतील, ही खरी असलेली भिती क्षणभर दुर जरी ठेवली तरी मानवाची एकुणातील सर्जनशील कार्यक्षमतेचा अंत घडवण्याच्या दिशेने आपण नेटाने वाटचाल करत आहोत. एकुणात बौद्धिकतेचे व मानवी स्वातंत्र्याचे हे स्वखुशीने होऊ दिलेले अपहरण आहे असे म्हटले तर ते वावगे कसे ठरेल?
आपण आपल्या स्वातंत्र्याबाबत कितपत जागरुक आहोत हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. आमच्या भविष्याच्या दो-या आमच्या हातून कधीच निसटल्या असून ही जगड्व्याळ, कृत्रिमतांच्या पायावर उभी असलेली अर्थव्यवस्थाच आमच्या बौद्धिक, आत्मिक विचारांच्या दिशा ठरवत आहे. थोडक्यात आम्ही मानवी ठराविक दिशेनेच विचार करणारे रोबो बनत चाललो आहोत. डा. राजन सारख्यांचा इशारा आम्ही कुचकामी व दुर्लक्षित ठेवण्याचीच शक्यता जास्त आहे.