Wednesday, February 24, 2016
Sunday, February 21, 2016
Origin of the Vedic's and their schemes!
Superficially, it may appear that the Aryan or
Indo-European language speaker’s migration theory, whether correct or
incorrect, is a serious attempt to understand our roots. We also can expect
from such attempts that they are not prejudiced and marred with hidden agenda
to prove some group of the people, speaking certain proto-languages, were
superior over others. However, if we look at the history of last 200 years on
this ever-boiling ‘homeland’ issue, we will eventually come to the conclusion
that the motives of all the sides of this debate are racially and hence,
politically motivated. The racial
aspects those were prominent during the 19th century and early 20th
century, now are changed to PIE language origins and the subsequent dispersals
of its speakers, but underlying meaning clearly seems to be unchanged.
The issue of Proto-Indo-European’s (PIE) homeland has been controversial since
beginning, with no consensus on any as it simply is based on the artificial
reconstruction of the so called IE languages.
It is not that all scholars agree with the
linguistic reconstruction theories. Shaffer et al observed, “Historical linguistic scholars still
assiduously attempting to reconstruct Proto-Indo-European language and
attempting to link that language to a specific homeland, in order to define
population migration away from the seminal geographical base.” 1
The problem with the scholars seems to be they have
preconceived the necessity of the “single location origin” and have been
building their theories eversince. To anyhow find the ‘original homeland’ of
the PIE language speakers thus became basis of their quest to solve the assumed
linguistic mysteries. Several original homelands have been proposed, migration
maps have been drawn, and yet there is no agreement because they have not taken
into the consideration that to cause ‘Net of the Languages’ original homeland
of any particular people and their dispersals were not required. I have focused
on this issue and after giving due consideration to the present homeland
theories, have challenged “Single Location Origin” theories, based on the
pre-history of the humanities and the languages.
Let us not forget that the history of languages
begins minimum of 70,000 years ago. It is not as young as PIE theorists tend to
believe. The history of human settlements, too, goes back many millenniums
prior to the assumed dates of so called migrations of PIE language speakers. For
history of the so called PIE languages, we cannot limit our search just as back
as 2,000 BC to 7,000 BC but we need to go beyond that to the era when the
faculty of the languages emerged in the remote ancestor of the modern human
being. For millenniums, the ancestors, while on constant move in search of the
food, with independent innovations and constant interactions, painfully, have
developed the basic structures of the languages. Languages, even proto, were
not independent, isolated innovations. Human being, with the invention of the
agriculture, started settling down about 15,000 BC to 10,000 BC. Then, onwards,
the people mostly have independently developed their languages and cultures,
based on the accumulated wealth from the past, in different regions, wherever they
had settled. The pastoral nomadic life, too, the scholars forget, was limited
to the known territories, unless, some drastic circumstances forced some
tribe/s to look for new habitats. Foragers
long since had limited their roaming in the known territories, interacting with
the almost same tribes, either as enemies or as friends. The roaming was
intelligent and not aimless. He communicated, exchanged and learnt the
innovations, whether linguistic or technologicsl. Rather, most of the
settlements occurred in the known regions thus creating a net of the languages
and cultures within the horizons of the earlier known regions. During this
course inter-breeding within the tribes coming across most frequently were
obvious. Thus using archeo-genetics to prove the “expansions” of some groups of
the people occurred about 10,000 to 14,000 years ago, also cannot become the
foundation of expansion/migration theories as well. The genetics, too, it would
appear, to have been used to prove expansionist theories, but not to any
avail.
If agreed to their suppositions, no matter which
data they use to prove their theories, the vital question remains unanswered
that why as yet they are unable to find the original homeland? Why so heated
debates, sometimes reaching to undignified levels? In fact, Biblically
motivated, supremacist European scholars, in an attempt to search their own
idenitity in the hypothetical ancestors, located at some imaginary place,
speaking the same language in its earliest form and their invasions/migrations
to cause cultural and language spread after subjugating the natives, have given birth to this
unending crazy quest of the original homeland!
Recently, taking a clue from the possible
repercussions of the theory, Indian Vedicists, too, came forward with a big
claim that India was the homeland of the Vedic Aryans. They do not stop here.
They claim that the IE languages (and culture) did spread to the West with
their outward movements! We can call this a kind of supremacist euphoric and
half-baked counter attack on the European theorists of the same genre!
With the same purpose, while trying to prove the
progenitors of the cultures across the regions wherever so called IE languages
are spoken; these so called indigenous Aryan theorists have staked the big
claim on IGC (Indus-Ghaggar Civilization) as well.2 Vedicists may
not be far advanced in their own remote culture, but, it clearly seems, they
are well advanced in their spurious attempts to steal heritages of the others!
The claims from both the sides, unbiased being a
few, no matter how scholarly they twist the facts, no matter how they
misinterpret the same evidence deriving opposite meanings sometimes, have only
a problem that they are heavily influenced by the misconception of the single
location origin. Linguistic science is often called as pseudo-science because
it does not work like a mathematical model. It has lots of parametres as to how
it would evolve and what many other unpredictable factors would affect its
course.
Also, the debate overwhelmingly is
centered on the horse-chariots, being a major basis of the debate, claimed to
be an invention of PIE people. The migration route maps are drawn on that
hypothesis based on early and late findings.
Using the same data, surprisingly, indigenous Aryan theorists are now
claiming that Vedic Aryans did not know spoke wheeled chariots, rather by ‘Ratha’, they could have been referring
to wagons with solid wheels!3 The sole objective behind this
somersault is to stretch back the timeline of the Rig Veda, pre-Harappan, to
prove migrations of indigenous Vedic Aryans to adjust timeframes of other rich civilization,
including IGC, and stake a claim on them as their authors.4 Otherwise,
there cannot be any explanation to why the Vedicist scholars, previously waging
a war to prove that IGC knew the spoke wheels and that horse too, was known to
them, should change dramatically their stance? Similarly, we find how the
geological explorations conducted at the Ghaggar channels and their findings
have grossly been either neglected or shrewdly misrepresented to claim Ghaggar
being lost river Saraswati of Rig Veda. This is the ridiculous way our modern Vedicist
scholars are overworking, but not scientifically and honestly!
I have seriously challenged single location origin
theories of languages, with new scientific proof in support, which clearly
indicates that they do not fit into the picture of the history of humanities. Though the invasionists or migrationists have
been claiming the Indo-European movement to India which, they assert, caused
substantial impact on the Indian civilisation and languages, there simply are
no archeological or literary proof to support such movements.
Kenoyer
remarks from the archeological evidence that the genetic data derived from the
burials of early and let Harappa indicates very limited biological
discontinuities and can be attributed to the movement of the traders travelling
from Iranian plateau and Indus Settlements. Such trade interactions are
recorded from the earliest Neolithic period (+7,000 BC) through Harappan
period. It does not at all indicate massive movement of the people. Scull
measurement data, too, indicates that the burials of the Harappan period, too,
have closest biological affinity with those of the late Harappan period. The
archaeologists confirm, from the beads found in a bead pot in 1996, the
technological innovations and change in trade networks and socioeconomic
hierarchies in the late Harappan period. The glass industry was becoming
prominent in this era (1,900 and 1,700 BC). There is conclusive proof that
during this era, there was no interaction of Indus-Ghaggar people with
Mesopotamia and Egypt, may be the trade with these civilisations had come to a
halt because of the political upheavals. But the agreement is the Indus glass
technology was an indigenous development. From the beads made of agate in late
Harappan period till the early historic sites of Gangetic plains, it is suggested
that this raw material (agate) could have been sourced from Central Deccan
plateau or the Vindhya Mountain, thus suggesting a wider trade network within
the subcontinent. In short, the continuity in the basic features of
architectural traditions as well as in many technologies has been proven. The
discontinuities reported by the archaeologists are the use of seals, weights
and writing which only
prove the changes in key technological and cultural features that were
associated with the early Harappan period. Also, the biological evidence from
Harappa does not indicate a significant change in population. 5
Senior archaeologist, B.B. Lal, who earlier was in
favour of the Migration Theory, later changed his stance and started
propagating the Indigenous Aryan Theory using the same proofs, though with some
misinterpretations, that there was never any massive movement in India.6
Jim G. Shaffer and Diane A Lichtenstein, too, are not in favor of migration and
call it a ‘myth’.7 Yes, we have to agree, in the absence of any
archeological evidence, that there was no migration to India of so-called PIE
speakers. But on the same grounds, with utmost certainty, we can state that
there was no migration to the west from India as well! The way AIT/AMT theory
is loaded with serious faults, Out of India theory too is not an exception,
rather is more idiocratic!
Then, naturally, few questions will be raised, such
as, where Rig Veda was composed? What relation they had with IGC or rather
whether the culture reflected in Rig Veda can be compared with the culture of
IGC? Can Rig Veda be pre-Harappan as some scholars tend to believe? Were the
composers of Rig Veda part of IGC or was it composed elsewhere? If Rig Veda was
composed elsewhere, how come that the Vedic religion found space in northern
India, in the absence of migrating hoards of Aryans or branch of Indo-Iranians?
Is the Ghaggar river Rig Vedic Saraswati? What relationship, geographical,
linguistic as well religious, we can notice between Rig Veda and Avesta? And
finally, were the Vedic Aryans indigenous? Well, I have tried to answer these
and related questions in this book, as diligently as possible, based on the
available proof and facts.
This book is not aimed at creating any controversy,
but to bring reality to the notice of the readers and how the debate of origin
has been fought ceaselessly to just prove a hypothesis which has no supportive
strong evidence. Out of India or from Eurasia to India…both the theories have
their vital shortcomings and sometimes loaded with deliberate
misinterpretations which have made the comparatively simple issue very
complicated. From central to south Asia, various civilisations have evolved,
prospered till the time was favorable and collapsed because of the
technological shifts, climate changes, political upheavals or cultural
revolutions. “It
is into the cultural area of Greater Iran that the mobile pastoralist speakers
of early Indo-Iranian and Indo-Aryan entered. The sudden decline of all
cultures of the area, from Mesopotamia to the Indus and from Bactria to Bahrain
and Oman, at the beginning of the second millennium is suggestive, but it
cannot simply be explained by an "invasion of Aryan hordes”. The situations in all areas concerned
are to disparate and they also are geographically too distant (e.g. in Oman) as
to allow such a simple, mono-causal explanation." 8 Thus states Michael Witzel. It
will indicate that the migrationist scholars, too, are hesitant to attribute
fall of the civilisations to the migrating nomadic, comparatively less
civilized people. Rather, I have shown with the archeological proofs that BMAC
culture was contemporary to the Zoroaster and composers of the Rig Veda. They
weren’t new foreign cultural elements encroaching on an established
civilisation but apparently were contemporary to it. They spoke the same
dialects with regional variances and by and large its descendent languages are
still spoken in these regions. There was no need of so called
Proto-Indo-European speaker’s migrations to linguistically and culturally
influence the already established civilisations. Rather, the development of the
languages becomes complex and yet polished in the settled societies for want of
their over grown socio commercial needs, rather than in nomadic society for
their limited needs of expressions.
However, we can clearly see that the homeland quest
was emerged out of racial egotisms. Trautmann had rightly remarked, “This is the theory that Indian civilization
was formed by a big bang, caused by the light-skinned, Aryan, civilized
invaders over dark skinned savage aboriginal Indians, and the formation of the
caste system which bound two in a single society, at once mixed and segregated.
If this theory were true, there aught to
be evidence in the earliest Vedic texts.” 9 However, we shall
see further in the book that there was no migration of Indo-Europeans in India
or out of India, but what came to India was Vedic religion by way of the
missionary activities.
Vedicist
scholars have fallen to the supremacist notions of the European scholars this
is why they too have jumped into the band-wagon of the homeland issue, just to
prove their superiority over large Indian masses and even over the westerners!
The identity crisis of the Vedicists is thus has become a serious issue. While searching for their roots, Vedicists are
attempting to discredit non-Vedic masses from their glorious heritage on flimsy
and sometimes fabricated grounds. Such attempts demands serious condemnation!
However, we can see from the opinions of various
scholars that the migrations of the people from any direction are gradually
being doubted, but still due to the psychological rigidity they possess, they
do not want to abandon the outdated and unproven theory. This is why, though
their observations and findings are almost correct, their conclusions and
counter suggestions and unending arguments to find alternative explanations
have become the main hurdle in concluding Aryan or PIE language controversy!
The supremacist views of the scholars thus have
marred the spirit of honest cultural debate and search of the roots of
civilisations. With all due respect to the scholars of the present and past, I
have tried to throw light on the stark realities of the civilisations debated
over so far to present new insights about our roots.
References
and notes
1. “South Asian Archeology and the Myth of
Indo-Aryan Invasions” by Jim G. Shaffer
and Diane A. Lichtenstein in “The Indo-Aryan Controversy: Evidence and
Inference in Indian History”, edited by Edwin Bryant, Laurie Patton, Pub. Routledge, 2005, page
93.
2. For this see “Update on the Aryan Invasion Debate” by Koenraad Elst, Aditya Prakashan, New Delhi,
1999. Also see “Rigveda: A Historical Analysis” by Shrikant G. Talageri, Aditya
Prakashan, 2000 and “The Rigveda and the Avesta: The final Evidence” by same
author, Aditya Prakashan, 2008.
3. “A Reply
to Michael Witzel’s ‘Ein Fremdling im
Rgveda’”, by Vishal Agarwal,
published online on 11 August 2003. You will find many interesting
aspects of the Vedicist views those even deny Vedic Aryans during Satapatha
Brahmana era knew iron. The magical play with the term “syamaayasa”, (black metal, i.e. Iron.) has been made here to
discard Witzel’s assumption that the Satapatha
Brahmana being creation of the full-blown iron age. It is clear Agarwal
wants to stretch back the period of this text to bronze age.
4. For
example see, “Update
on the Aryan Invasion Debate”
by Koenraad Elst, Aditya Prakashan, New Delhi, 1999
5.
“Culture changes during the Late Harappan period at Harappa: new insights on
Vedic Aryan issue”, by Jonathan Mark Kenoyer in “The Indo-Aryan Controversy:
Evidence and Inference in Indian History”, edited by Edwin Bryant,
Laurie Patton, Pub. Routledge, 2005, page 31-40.
6. “Aryan Invasion of India- Perpetuation of a myth”
by B. B. Lal, in “The Indo-Aryan Controversy: Evidence and Inference in Indian
History”, edited
by Edwin Bryant, Laurie Patton, Pub. Routledge, 2005, page 50-72.
7. “South Asian Archeology and the Myth of
Indo-Aryan Invasions” by Jim G. Shaffer
and Diane A. Lichtenstein in “The Indo-Aryan Controversy: Evidence and
Inference in Indian History”, edited by Edwin Bryant, Laurie Patton, Pub. Routledge, 2005.
8.
“The home of the Aryans” by Michael Witzel, available on line on http://www.people.fas.harvard.edu/~witzel/AryanHome.pdf, page 8.
9. ‘The
Aryan Debate’ by Thomas R. Trautmann, pub.: Oxford University Press, 2005, p.
100.
Thursday, February 18, 2016
What really should worry us?
Kanhayya Kumar’s arrest under charges of sedition and conspiracy raise serious questions on Indian democracy and legal machinery which apparently have acted in haste. We will have to probe our thoughts those normally are influenced by media and the political side we prefer to support to reach bottom of the issue. The truth always get buried if we cannot think unbiased and prefer to talk what people of our preferred side think.
I have gone through Kumar’s 23 minute long speech. There is nothing in that speech which remotely can attract any criminal charge, forget sedition and conspiracy. In his entire speech he talks on our constitution, Babasaheb Ambedkar, Bhagatsingh etc. He has spoken of Pakistan and Bangla in one sentence to express communist ideology, labors of the world be united. He has named terrorists like Kasab, Afjal Guru, but in which context? He says we have to eliminate the reasons why one prefers violent actions? He has bashed BJP, RSS and ABVP for its sectarian and tyrant views and actions. He hasn’t praised any terrorist in his entire speech.
It is facts that at the venue anti-India slogans were shouted in retaliation with ABVP activists slogans blaming the organizers anti-national. The gathering was organized to commemorate hanging of Afjal Guru. Organizers were different students union than of Kanhayya. Kanhayya was invited there to speak on judicial killing. JNU authorities at eleventh hour had withdrawn the permission which was already issued to Umar Khalid’s union DSU. The proofs so far those have surfaced indicate that Umar Khalid and his supporters had raised anti-national slogans. Kanhaiyya did not participate in sloganeering. But Khalid and his about ten colleagues have so far escaped wrath of the police department and media.
The only student arrested is Kanhaiya Kumar, after three day custody and brutal physical manhandling by the lawyers, has been sent to the jail as charges of sedition are non-bailable. Anyway, now law will take its own course and let us hope that politics and public sentiment, whatever it might be does not influence any judgment.
Students participating politics or having political views is a global phenomena. Students have been instrumental in many revolutions including Indian freedom movement. They have every right to have political views and follow the ideology of their own choice and join any students organization of their choice. I am neither communism supporter nor RSS admirer. However I have right to have my views what is happening around me. This invites attention at the incidents taking place all around those are shaking very foundation of my nation.
I think Kumar shouldn’t have gone at commemoration of a hanged terrorist, no matter the lecture he was going to deliver on judicial killing.
But is it a crime? Are we aware that Marathi Vishvakosh (Encyclopedia), published by Maharashtra govt. terms Bhagatsingh- Rajguru etc. as terrorists? Hero of one side always is villain for other side. Rebellions or freedom fighters to us are terrorists or criminals to opposite side. To divisive, separatist Kashmiris Afjal is hero, a martyr. If Kashmiri’s (Khalid is Kashmiri) are thinking that way we have to go deep to the root cause and try to resolve it. Superficial and sentimental outcry or remedies just can’t take us anywhere, as a nation. There are efforts by other organizations as well to establish murderers as an icon. We have seen it in case of Nathuram. There could be many others. If people can still gather at commemoration ceremony of Nathuram and they are not treated as criminals then why there should be chaos on Afjal’s commemoration?
Here I am not trying to make any comparison. But law of the country treated both the criminals in same fashion and had hanged them. We just cannot look at every case in isolation. Gathering at both the commemoration ceremonies, and any for that matter, may be is ethically wrong, but certainly it is not a crime.
Should there be capital punishment in India? Should there be judicial killing permitted? Thinkers of the country are divided on this issue. To me judicial killing should be abolished. Pt. Javaharlal Nehru too was against verdict of hanging of Nathuram. It is against Gandhian principles. Death penalties are medieval brutalities. Any society that claims to have progressed cannot have in their law books capital punishment. Law is not to avenge the criminal/terrorist for his acts by taking his life but is for to value life. I too am not with capital punishment.
Most importantly, we have to understand students (youth) sentiments. They are to run nation in the future. They have their thoughts and ideas as too how they want to see affairs of the nation are conducted. They are normally attached to this or that ideology. Their views too keep changing with experience. Nothing is permanent here. To attain maturity we have to provide them free atmosphere. But we often fail in making our next generation more mature. Right from our education system to political system has been trying so often to keep students under stupor of their goals. Youth has been used. Youth is not evolving as they are short of real freedom.
However, why institutions/Universities be involved in advocating some particular ideologies? JNU is famous for being leftist camp. There are schools and colleges those propagate RSS ideologies. many Madrasa's educate kids in religious fundamentalism. The students are a raw material for many educational institutions, run by political or religious wings, where students are carefully molded to suit their own philosophies right from childhood to make them a pawn or instrument in achieving their own goals. Main culprits are the institutions. In fact, by law, no institution or university should be allowed to advocate any specific ideology. They should be open to all thoughts. Let student decide what suits them. Institutions have no right whatsoever to corrupt students mind by the specific thought of their own choice. It is students freedom to make their own minds from their own uninfluenced understandings to look at the world. They certainly deserve this freedom and we should grant them unconditionally.
In fact any government too should not force to introduce curriculum that upholds their thought or ideologies. But in our country it seldom has happened that students have got to study the things those were unbiased, close to the proven facts and not influenced with some ulterior motives.
Rather we have made, so far, an attempt to manufacture the students, our next generations, of our preferences and have tried ever to kill the future. This is why we have been facing such problems, shouting slogans pro-India or anti-India is not the main issue. It all is futile. Main issue is how we desire to build our nation in future and make next generations capable of shouldering the challenges. And only with wisdom this is possible.
In fact let students participate in politics, let them form their own opinions, let them have understanding of their history, but no attempt should be there to make them blockheads by manipulating their minds.
Let them be free thinkers.
But this is not happening. From Congress to opposition are trying to get political mileage and government is seen to have handled this issue very immaturely and childishly.
Monday, February 15, 2016
भारतीय असहिष्णुता
भारतात आजच्या आधुनिक परिभाषेतील लिबरल (स्वतंत्रतावादी) सहिष्णुता अस्तितवात होती असे धाडसी विधान करता येत नाही. भारतातही धर्म, पंथ यांत रक्तरंजित संघर्ष झालेले आहेत. हा इतिहास सनपुर्व सहाव्या शतकापासुनचा ज्ञात इतिहास आहे. गौतम बुद्धाचे धर्मस्थापना ते आरंभीचा प्रचार या काळात त्यांनाही वैदिकांच्या हिंसक विरोधाला सामोरे जावे लागल्याचे आपल्याला दिसते. गुप्तकाळापासून वैदिकि धर्माने उचल घ्यायला सुरुवात केली ते दहशतवादाचे सर्व नियम पाळत. शैव-वैष्णव यांच्यातील संघर्षही रक्तरंजितच होता. अन्य जातीयांवर, विशेष्त: अस्पृष्यांवर जी अमानवी बंधने टाकली गेली ती असहिष्णुतेच्याच अनुदार प्रवृत्तीतून हेही आपण पाहू शकतो. इतिहासातील कोणत्याही राजाने सहिष्णुतेचे धोरण राबवले नसल्याने या कर्मात त्यांचाही सक्रिय सहभाग होता असेही म्हणावे लागते...मग राजे कोणीही असोत. म्हणजेच भारतात धर्मसत्ता व राजसत्ता परस्परांवर कुरघोड्या करण्याचेही प्रयत्न करत जनतेवर मात्र आपली वर्चस्वाची, सत्तेची मिठी बळकट करत राहिले, त्यात यशस्वीही झाले असे म्हणावे लागते. भारतीय सहिष्णुता ही हिंसक असहिष्णुतेसोबतच वैचारिक व सामाजिक जीवनातही असहिष्णुता राहिलेली आहे. भारताचा स्वर्णकाळ वगैरे गौरवगाथा ठीक वाटल्या तरी प्रत्यक्षात भारतात सहिष्णुतेचे स्वर्णयुग होते असे म्हणता येत नाही. इस्लामकाळ या असहिष्णुतेत भर घालणाराच होता. सहिष्णुतेची जी उदाहरणे दिसतात त्यात खरोखर सर्वधर्म समभावाच्या जाणीवा किती आणि राजकीय तडजोडी किती हे अभ्यासले तर उत्तरे सहिष्णुतेच्या विरोधात जातात. असो. जागतिक इतिहासच बव्हंशी असहिष्नू जाणीवांचा इतिहास असल्याले तो कोळसा फार उगालण्यात अर्थ नाही.
लोकशाहीची मुल्ये, स्वातंत्र्य-समता-बंधुता ही उदात्त मुल्ये आपल्याला युरोपाने, विशेषकरून फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. अनिर्बंध राजसत्ता, आर्थिक मक्तेदा-या आणि धार्मिक दास्याच्या विरोधातील एकुणातील उद्रेकातून महान प्रबोधनकारी विचारवंत-तत्वज्ञांनी नव्या स्वतंत्रतावादी समाजजीवनाचे तत्वज्ञान जन्माला घातले. ते प्रत्यक्षात सर्वस्वी आजही अंमलात आणता आले नसले तरी किमान त्या दिशेने जागतिक मानवी समुदायांची वाटचाल सुरु झाली. हे त्यांचे मानवजातीवरील कधी न फिटणारे ऋण होय. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा पायाही त्यातुनच घातला गेला.
भारतात गांधीजींच्या नेतृत्वाखाली सर्व भारतियांचा "अहिंसा" व "सत्याग्रह" या उदात्त तत्वज्ञानावर स्वातंत्र्य लढा सुरु असता या तत्वज्ञानाला छेद देणा-या मुस्लिम लीग, हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना-पक्षांचा उदय झाला. रा.स्व. संघ भारतातील आजही जीवितच नव्हे तर सतत वाढत असलेली संघटना आहे.
या संघटनेने पुरस्कृत केलेला भाजप हा आज एकहाती बहुमत घेऊन सत्तेत आलेला पक्ष आहे. गुजरात नरसंहाराचा कलंक आजही पुर्णतया पुसला गेलेला नाही. हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर लगोलग चर्च टार्गेट केल्या गेल्या. शिक्षण पद्धतीत वैदिक विज्ञान आणण्यापासून ते भग्वद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ बनवण्याचे कार्यक्रम घोषित करण्यात आले. गोमांस बंदीवर भर देवून हे थांबले नाही तर केवळ घरात गोमांस आहे या संशयाने अखलाख या मुस्लिमाला झुंडीने निर्दयपणे ठार मारले. नंतर इतर अनेकांवर तसे प्रयोग झाले. मोदीविरोध हा राष्ट्रविरोध असेच वातावरण अंध भक्तांकरवी बनवत मोदींवरील सभ्य चिकित्सा, टीका करणा-यांवर झुंडीने शाब्दिक हल्ले सुरु झाले. हे येथेच थांबले नाही तर हा पक्ष सत्तेवर आल्यानंतर दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या. तत्पुर्वी एक घडली होती पण ती कोणी केली असावी याबाबतचे जनमत घेतले तर जनमताच्या संशयाची सुई हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) गोटांकडे वळते.
असहिष्णुतेचे पहिले कारस्थान हे विरोधी विचार दडपण्याकडे झुकते. त्यासाठी ते हवे ते मार्ग चोखाळु शकतात. या असहिष्णुतेमुळे अनेक साहित्यिक-कलावंतांनी आपापले पुरस्कार परत केले. हा निषेधाचा सौम्य मार्ग होता. पण त्यांनाही प्रचंड बदनाम करण्याची मोहिम आखली गेली. हे येथेच थांबले नाही. पुरोगामीत्वाची खिल्ली उडवत पुरोगामी व सेक्युलर या शब्दांची खालच्या पातळीवर खिल्ली उडवण्याची टुम निघाली जी आजही जोरात आहे.
हे सर्व काय आहे?
मुळात संघ तत्वज्ञानाचा पाया "असहिष्णुता" हा आहे. यासाठी संघाने मुस्लिम द्वेष करत तथाकथित हिंदू संघटन उभे करायला सुरुवात केली. १९५६ मद्धे प्रसिद्ध पत्रकार डी. एफ. कारक यांनी गोळवलकारांबाबत (व संघाच्या बाबत) जे विधान केले होते ते असे: "Golwalkar was a guru of hate, whose life's malevolent work was — as Jawaharlal Nehru so memorably put it — to make India into a "Hindu Pakistan". That project has not succeeded yet, and may it never succeed either." यत संघाचा उद्देश विषद होतो. मुस्लिम द्वेष करत हिंदू संघटन उभे केले कि मुस्लिमांचे शिर्कान करता येईल हा होरा. बाबरी मशिदीचे पतन हा योगायोग वा खरे रामप्रेम होते असे नाही. रामाला केंद्रबिंदू बनवत गतकाळातील नसलेल्या अस्मिता जपण्याचा तो प्रयत्न होता. परिणामी मुस्लिमांचाही संघटित दहशतवाद सुरु झाला. मुस्लिमांची ही प्रति-असहिष्णुता होती हे खरे. त्यामुळे संघवाद्यांना "आम्हीच बरोबर होतो" हा प्रचार करायला संधी मिळाली हे विसरता येत नाही.
याची मुळे गोळवलकर गुरुजींच्या मुलभूत तत्वज्ञानात आहेत. हिटलरच्या फ्यसिस्ट विचारांचे ते अनुयायी होते. "To keep up the purity of the Race and its culture, Germany shocked the world by her purging the country of the Semitic Races - the Jews. Race pride at its highest has been manifested here. Germany has also shown how well nigh impossible it is for Races and cultures, having differences going to the root, to be assimilated into one united whole, a good lesson for us in Hindusthan to learn and profit by. Ever since that evil day, when Moslems first landed in Hindustan, right up to the present moment, the Hindu Nation has been gallantly fighting on to take on these despoilers. The Race Spirit has been awakening." हे त्यांचेच विधान आहे. यात हिटलर प्रेम, वांशिक अहंकार जसा डोकावतो तसाच वंश (मुस्लिम) विद्वेशही. हे विचार सहिष्णू आहेत असे कोण म्हणेल?
बरे संघाला असहिष्णू म्हणावे तर त्यांना प्रतिक्रिया म्हणून उभ्या राहिलेल्या पुरोगामी म्हणवणा-या संघटनांचे काय हाही प्रश्न येथे महत्वाचा आहे. संभाजी ब्रिगेड व बामसेफसारख्या संघटना शाहु-फुले-आंबेडकरवादी म्हणवतात. पण या संघटनांचे तत्वज्ञान काय तर ब्राह्मण द्वेष. ब्राह्मणांचे कत्तल केली पाहिजे, ते विदेशी असल्याने त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी लेखने, वक्तव्ये सातत्याने ही मंडळी करत आली आहे. ब्राह्मण हटवले कि जणूकाही रातोरात त्यांची मुक्ती व ऐहिक कल्याण होणार आहे कि काय? या लोकांना फुले-आंबेडकर समजले तरी आहेत काय? संघ इतिहासाची जेवढी मोडतोड करतो त्याहीपेक्षा अधिक तोडफोड ही मंडळी करतात. खरे म्हणजे संघ आणि या तथाकथित पुरोगामी संघटनांच्या तत्वज्ञानात काहीएक मुलभूत फरक नाही हे सहजच कोणाच्याही लक्षात येईल. असहिष्णूतेचे उत्तर प्रति-असहिष्णुता नसते हे भारतातील काही कट्टरवादी मुस्लिम आणि काही बहुजनीय संघटनांच्या लक्षात येत नसेल तर "सहिष्णू भारत" कसा बनणार हा यक्षप्रश्न सुज्ञ आणि ताततम्याने सामाजिक विचार करणा-या लोकांसमोर उभा राहिला असल्यास नवल नाही.
असहिष्णूंची असहिष्णुंच्या विरोधात चाललेली ही साठमारी आहे, आणि यात शांतपणे जीवन जगू इच्छिणा-यांची ससेहोलपट होते हे या मंडळीला कळणे शक्य नाही. थोडक्यात मानवी स्वातंत्र्य संकुचित केले जात आहे.
आणि याला काही केल्या आपण सहिष्णू देश म्हणू शकत नाही.
तो आपल्याला बनवावा लागेल.
सर्वप्रथम अशा सर्व द्वेषमुलक संघटना, पक्ष व व्यक्ती या विरुद्ध सुबुद्ध लोकांना ठामपणे उभे रहावे लागेल. आम्हाला आमची मुले ते पतवंडे व त्याहीपुढील पिढ्या मुक्त वातावरणात वाढवायच्या आहेत कि द्वेषाने, हिंसेने भरलेल्या जहरी, जगण्याची कसलीही शाश्वती नसलेल्या वातावरणात सडू द्यायच्या आहेत याचा निर्णय आताच घ्यावा लागणार आहे. असहिष्णुतेच्या तत्वज्ञानाचा पाया मिथ्या वर्चस्ववादात आहे. कोण कोणावर कशी सत्ता (आणि कसल्याही प्रकारे) गाजवू शकतो हे सिद्ध करण्यासाठी आहे. नव-याची बायकोवर व आईबापाची मुलांवर प्रेमविरहित वर्चस्व गाजवण्याची इच्छा जेथे जन्माला येते तेथेच माणसाच्या असहिष्णुतेचा प्रवास सुरु होतो. अनिर्बंध आकांक्षांतुन खोटेपणा, हिंस्त्रता, द्वेष इत्यादिचा आधार घेत असहिष्णूता टोक गाठत जाते व अंतता: अमानवी बनते. आम्हाला जर आमचे भवितव्य असे अमानवी बनवायचे नसेल तर आताच सावध होणे आवश्यक आहे.
आधुनिक तंत्रज्ञानांनी माणूस शहाणा होईल असा जो विद्वानांचा होरा होता तो आम्हीच धुळीला मिळवला आहे. ही साधने ज्ञानप्राप्तीसाठी, आपली वैचारिक क्षमता वाढवण्यासाठे न वापरता आम्ही बव्हंशी त्यांचा उपयोग उथळपणासाठी व अधिक विद्वेषाचे फुत्कार सोडण्यासाठी वापरत आहोत. आणि हे आमच्या एकुणातील असल्या-नसलेल्या बौद्धिकतेचे, विचारशीलतेचे, सृजनशीलतेचे अध:पतन आहे. एवढे अध:पतीत झाल्यावर तरी जरा उर्ध्वरेषेकडॆ प्रवास व्हावा अशी प्रार्थना करणे तरी आपल्या हातात आहे.
द्वेषमुलक, असहिष्णू विचारक संघटनांची कमी नाही. या निराशाजनक स्थितीत मला एकच अढळ धृवतारा दिसतो. महात्मा गांधी. मानवतेचे, सहिष्णूतेचे, सौहार्दमय सहजीवनाचे तत्वज्ञानच सांगितले असे नव्हे तर ते प्रत्यक्ष जगण्याचे उदाहरण घालून दिलेला हा या धरतीतलावरील एकमेव महामानव. त्याच्या तत्वज्ञानात भर घालत ते पुढे नेणे हीच आजची सहिष्णुता आहे. तुम्ही त्यासाठी गांधीजींना मानायलाच हवे ही अट नाही.
Friday, February 12, 2016
ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक
जाऊद्या...
ही स्वप्नेच अशी टुक्कार आणि निरर्थक
साकार व्हायला लाजतात लेकाची
अन
मनावर स्वार राहत गुलाम करतात आपल्याला
आज ...उद्या करत
ही स्वप्नेच का असतात?
खड्ड्यात गेली ती स्वप्ने
खड्ड्य़ात गेली ती स्वप्नांची गुलामी
माणसं मरतात...
मरुद्यात
जगतात
जगुद्यात
स्वप्नांची काय गरज?
माणसांना दिशाहीन करायला?
स्वप्नांनो....
पाठलाग करु नका
या बेड्याच ब-या आहेत
मनुष्य नसण्यातलेच अहोभाग्य
आम्हाला उपभोगू द्या...
स्वप्नांनो....
आमच्या नादी लागू नका
तुम्हाला साकार करण्यातले धैर्य
आम्ही कधीच गमावले आहे!
हृदय आभाळ होते...!
एक कविता
हृदयाच्या गर्भातून
हृदय फाडून
सावकाश बाहेर येते
मस्त अंकुरते
फुलतेहृदयाला आधार बनवत
आभाळव्यापी होते
मग हृदय रहातच नाही....
हृदय आभाळ होते...!
(माझ्याकडे अनंत हृदये
नि म्हणुनच
अनंत आभाळे आहेत!)
मला समाजाच्या इतिहासात रस आहे.
Niranjan C. Pradhan, my friend has asked me a question, "खर आहे संजयसाहेब. आपलीच प्रत्येक जातीवर लिहिलेली पुस्तकं आहेत. त्यात लिहिलेला इतिहास खरा आहे, त्याबाबत वादच नाही. पण त्यामुळे स्वतःच्या जातीबाबत अभिमान / दुराभिमान वाढतच जातो. मग आपल्यात व ब्राम्हणांमधे फरक तो काय ?"
My reply is...
निरंजनजी, हा एक विचित्र तीढा आहे. मुळात अगणित समाजांना आपला कसलाही इतिहास माहितच नाही. ठरावीक समाजांचा माहित आहे. तो किती खरा किती खोटा या वादात न जाताही, अनेकांना आपल्याला इतिहासच नसावा असे वाटावे अशी आपल्या एकंदरित इतिहासाची पद्धत आहे. त्यामुळे आपण या व्यवस्थेत नगण्य होतो असा समज फार जाती-जमातींत आहे. आम्ही हजारो वर्ष असेच पिचलेलो, हरलेलो आणि शोषलो गेलेलो होतो असाही समज भारतात अनेक घटकांत व्यापक आहे. न्य़ुनगंडाने हे समाज शिकार होतात. खरे तर प्रत्येक समुहघटकाचे भारतीय संस्कृतीत महत्वाचे योगदान आहे. पण ते कोणी सांगितलेले नाही. ते कष्टही घेतलेले नाहीत. त्यंचा इतिहास शोधल्याने, तो सांगण्याने दुराभिमान तर दुरच, किमान न्यूनगंड राहणार नाही असा प्रयत्न कोणी करायचा? आपण इतर समाजांना तुच्छ समजत हेटाळणीनेच वागवत असू तर तो दोष कोणाचा? आणि प्रत्येकाला इतिहास असतोच. प्रत्येक समाजाचा इतिहास हा अपरिहार्यपणे सर्वच समाजाचा इतिहास असतो हे आपण लक्षात घ्यायला हवे कारण कोणताही समाज सर्वस्वी एकाकी (Isolated) नसतो.
आपापली पाळेमुळे शोधायची आस सर्वांतच असते. आर्यांच्या मुलस्थानाचा (किंवा आर्यभाषा बोलणा-यांच्या मुलस्थानाचा) शोध वैदिक आणि युरोपियन आजही तेवढ्याच उमेदीने, आपापले सिद्धांत अनेकदा बदलत घेतच आहेत हे वास्तव नाही काय? मग अन्य समुहांनी आपापला इतिहास, आपापली पाळेमुळे शोधली तर कोठे बिघडले? खरे तर अजून त्यांनी सुरुवातही फारशी केली नाही. आर्यवाद्यांच्या प्रभावात त्यांनी फक्त आपली विरोधी भुमिका नोंदवली आहे. जातीचा इतिहास म्हणजे त्या-त्या व्यवसायाचा इतिहास असे मानत मी अनेक जातींचा इतिहास लिहिला आहे आणि लिहित राहील आणि त्याचा हेतू जातीचा दुराभिमान वाढवणे नव्हे तर त्या-त्या जातींना त्यांचे ऐतिहासिक सांस्कृतिक योगदान सांगत न्य़ुनगंडाच्घ्या भावनेतून बाहेर काढणे हे आहे. दुराभिमान कोणाला वाटावा अशी माझी यत्किंचितही इच्छा नाही किंवा तशी माझी मांडणीही नाही. त्यामुळेच कदाचित माझी मांडणी अनेक जाती समुहांना मान्यही नाही. मान्य असणे किंवा अमान्य असणे ही वेगळी बाब असून त्यातून प्रत्येक समुहाला आपापला गतकाळ धुसर का होईना, पण खरा दिसावा अशी माझी तळमळ आहे. त्यातून भारतीय संपुर्ण जाती-जमात समुदाय हा ताठ मानेने जगेन असे मला तरी वाटते.
हे काम अनावश्यक वाटु शकते. पण इतिहासात तुटलेले दुवे शोधायचे काम कोणा-ना-कोणाला तरी करावेच लागते. मी हे अनावश्यक कार्य करत आहे असे समजायला हरकत नाही. पण ९०% लोकांच्या इतिहासाखेरीज भारताचा इतिहास पुर्ण कसा होणार? कोठे आहे तो इतिहास? आपल्याकडे आहेतो राजकीय आणि धार्मिक इतिहास. समाजांचा इतिहास शोधणे हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते कारण तेच सामाजिक घटक आज जिवित आहे...त्या काळचे राजकारण आणि तेंव्हाचे जेही असेल ते धर्मकारण आज कुचकामी आहे.
मला समाजाच्या इतिहासात रस आहे.
Thursday, February 11, 2016
मग गांधीजींनाच नेमके ठार का मारले
हिंदू गांधीजींची वैदिक नथुरामाने का हत्या केली?
निरंजन टकले यांच्या वीकमधील "Lamb Lionised" हा लेख प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाने सावरकर भक्त संतापले. टकले यांच्या लेखातील उणीवा शोधण्याची स्पर्धाच लागली. असेच एक खंडण करण्यासाठी माझे मित्र अभिराम दीक्षित यांनी दोन लेख लिहिले. "लाला लजपत राय - फाळणीचे कट्टर समर्थक" हा लेख त्यात महत्वाचा आहे. त्यांचे अभिनंदन. तो लेख सर्वांनी मुळातुनच वाचावा. http://drabhiram.blogspot.in/2016/02/blog-post_11.html
हा लेख एका सावरकरप्रेमीने लिहिला असल्याने त्याचे महत्व जास्त आहे. या लेखात त्यांनी दिलेले काही मह्त्वाचे मुद्दे आणि त्यालाच जोडून अधिकची माझी माहिती खालीलप्रमाणे मी देत आहे.
१) लाला लजपत राय यांनी १९२४ साली सर्वप्रथम फाळणीची योजना मांडली. त्यांच्याच मुळ योजनेप्रमाणेच फाळणी झाल्याचे दिसते.) १९२५ साली ते हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. तत्पुर्वी ते पंजाब हिंदू सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. ही सभा मुस्लिमविरोधी होती.
२) डा. बाबासाहेब आंबेडकर १९४५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथातही फाळणीचीच भुमिका मांडतात.
३) सर सय्यद यांनी १८८७ सालीच द्विराष्ट्रवाद मांडला होता. द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम उघडपणे मांडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
४) नंतरचे हिंदू महासभेचे अध्यक्ष सावरकर हेही द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थक होते. हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रे असल्याचे ते जाहीरपणे म्हणत असत...लिहित असत. जिनांनीही लाला लजपतराय यांचाच सिद्धांत उचलून धरला किंवा त्यांच्या स्वत:च्या सिद्धांताला तो सहायक वाटला.
५) हिंदु महासभेने मुस्लिम लीगशी युती करुन सिंध, नोर्थ-वेस्ट फ्रंटियर व बंगाल प्रांतात सरकारे स्थापन केली. (१९३७). मार्च १९४३ मध्ये सिंध प्रांत सरकारने पाकिस्तान स्थापनेचा ठराव केला. या ठरावाला वरकरंणी विरोध केला तरी हिंदू महासभेच्या एकाही मंत्र्याने राजीनामा दिला नाही. (हे तिनही भाग आजच्या पाकिस्तान व बांगला देशात आहेत.)
६) टिळकांनी लखनौ करार करून फाळणीची बीजे रोवली (अथवा तिची अपरिहार्यता मान्य केली)
७) अखेरपर्यंत गांधीजी फाळणीच्या विरोधात होते.
थोडक्यात फाळणी होणार याची कल्पना हिंदू महासभेलाही होती. किंबहुना फाळणीला मान्यताच होती. सावरकरांचा द्विराष्ट्रवाद आणि अखंड हिंदू राष्ट्र संकल्पना हातात हात घालून जाऊ शकतच नव्हत्या.
वरील मुद्दे पाहता आता प्रश्न असा पडतो कि-
नथुराम गोडसेने फाळणीला जबाबदार गांधीजींनाच ठरवत त्यांनाच नेमके ठार का मारले?
अभिराम दीक्षितांनी याचे उत्तर दिलेले नाही. फाळणी ही खुद्द हिंदू महासभेलाच मान्य होती. तपशिलात फरक असतील पण लाला लजपतराय, जीना आणि सावरकर वेगळे काय सांगत होते? त्यांनी तर मुस्लिम लीगशी युत्याही केल्या. एकत्र सरकारे चालवली. पाकिस्तानचा ठराव होऊनही त्याला राजीनामा न देता अप्रत्यक्ष स्विकृतीच दर्शवली. एकीकडे मुस्लिमद्वेष आणि दुसरीकडे युत्या करुन सत्ता मिळवणे यात कोणती नैतिकता होती?
नथुराम हा सावरकर अनुयायी होता. हिंदू महासभेचाच कार्यकर्ता होता. फाळणीचेच कारण देत त्याने गांधीजींची हत्या केली. पण जेंव्हा या बाबी अस्तित्वात आल्याही नव्हत्या तेंव्हा महाबळेश्वरला या नथुरामनेच गांधीजींची हत्या करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न का केला?
वरील मुद्दे व वास्तव पाहता गांधीजींना फाळणीसाठी जबाबदार धरणे हा खोटारडेपणा झाला. जबाबदार असेल तर खरे तर वैदिक वर्चस्वतावादी हिंदू महासभा. कारण त्यांचे तत्वज्ञान फाळणीलाच नुसते अनुकूल नव्हे तर तीचे कृतीशील समर्थक होते. अन्यथा सिंध प्रांतिक सरकारने स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव मांडल्यावर महासभेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले असते. पण तसे झाले नाही.
म्हणजेच फाळणी हे गांधीहत्येचे कारण ठरु शकत नाही. ५५ कोटी ही तर शुद्ध भुलथाप आहे. मुस्लिम अनुनय म्हणाल तर तो खुद्द हिंदू महासभा व टिळकांनीही केला आहे. गांधीजी तर फाळनीच्या अखेरपर्यंत विरोधात होते. म्हणजे गांधी हत्येची खरी कारणे अन्यत्रच शोधावी लागतात.
गांधीजी हे हिंदुंचे खरे लोकनायक विरुद्ध स्वत:ला हिंदू राष्ट्रनायक ठरवु पाहणा-या वैदिकवादी अल्पसंख्यंक सावरकरवादी संघी प्रवृत्ती यातील हा संघर्ष होता असे स्पष्ट दिसते.
हिंसावादी तात्पुरते जिंकले. गांधीजींची हत्या झाली. कोणा फाळणीसमर्थकाची नाही. भारत स्वतंत्र झाल्यावर फाळणीमुळे आता भारतात हिंदु बहुसंख्य असल्याने आपले वैदिकवादी राजकारण राबवणे सोपे जाणार नाही हे जाणवल्याने आणि एक हिंदू स्वातंत्य्र्याचा उद्गाता ठरतो हे सहन न झाल्याने ही हत्या अपरिहार्य झाली होती. फाळणी होण्याची जेंव्हा शक्यताही दृष्टीपथात नव्हती तेंव्हापासून गांधीजींची हत्या करण्याचे प्रयत्न झाले आणि यातील पहिला प्रयत्न पुण्यातच व्हावा हा योगायोग नाही. याचे कारण वैदिक वर्चस्वाला शह देणारे हिंदू गांधीजी वैदिकांच्या वर्चस्ववादी मार्गातील सर्वात मोठी धोंड होते. किंबहुना त्याने वैदिकांच्याही वर्चस्वाला शह देणे त्यांना सहन होणे शक्यच नव्हते.
त्यामुळे त्यांना संपवणे ही त्यांची प्राथमिकता बनली असणे स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे त्यांनी गांधीजींना मारलेही. नथुराम हा एक प्रकारचा आत्मघातकी प्यादे होता. खोटी कारणे देत नंतरही गांधीजींची बदनामी मोहिम संपली नाही. आजही ती सुरु आहे. पण फाळणीचे तत्वज्ञान ज्यांनी प्रसृत केले ते मात्र टीकेचे धनी होत नाहीत, झालेले नाहीत. हा असला बाष्कळ पण हिंसक वैदिकवाद आहे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते ते यामुळेच.
मगर गांधी मरते नहीं...!
सावरकरांना कशा प्रकारचा अखंड हिंदूस्तान पाहिजे होता हे या लिंकवर वाचा.
सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?

Tuesday, February 9, 2016
व्यास कोण होते?
महाभारत हे संपुर्ण महाकाव्य व्यासांनी लिहिले असा समज असला तरी ते खरे नाही. व्यासांनी "जय" नामक काव्य रचले होते व ते ८८०० श्लोकांचे होते. या मुळ काव्यात नेमके काय होते हे आज आपणास माहित नसले तरी त्यात कौरव-पांडवांच्या युद्धाचे वर्णन असावे असा तर्क अनेक विद्वान करत असतात. पुढे त्यात सौती-जनमेजय आणि इतर अनेक अज्ञात कवींनी भर घातली. त्यामुळे त्याचा विस्तार "भारत" ते लक्ष श्लोकांचे "महाभारत" असा झाला. या महाभारतात अनेक प्राचीन आख्याने-उपाख्याने यांची भर पडली असल्याने अनेक प्राचीन समजुती, श्रद्धा व भारतातील विविध गणांतील लोकांमधील संघर्षावर प्रकाश पडतो.
महाभारत खरेच घडले कि ती एक काल्पनिक कथा आहे यावरही विद्वानांत अनेक वाद होत असतात. अ. ज. करंदीकरांसारखे विद्वान तर महाभारत मध्य आशियात घडले असाही तर्क देत असत. सर्वसाधारणपणे महाभारत कथा आजच्या दिल्ली परिसरात कुरु-पांचाल भागात घडली असावी असे मानले जाते. शिवाय रामायणकथा आधीची कि महाभारत कथा हाही एक वाद आहेच.
या लेखात आपल्याला महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे व ती म्हणजे भारतकर्ते व्यास. व्यासांच्या नांवावर अठरा पुराणे तर आहेतच पण वेदांचे चार विभाग केले म्हणूण त्यांना "व्यास" अशी संज्ञा मिळाली असे सांगितले जाते. वैदिक परंपरेत अनेक नवीन लेखकांनी आपापल्या (स्वरचित अथवा रुपांतरित) कृतींना स्वत:चे नांव न देता एखाद्या इतिहासप्रसिद्ध व्यक्तीचे नांव कर्ता म्हणून द्यायची एक प्रथा होती. असे केले म्हणजे आपल्या कृतीला जनमान्यता व पावित्र्य लाभेल अशी काहीतरी भावना त्यांच्या मनात असावी. खरे म्हणजे व्यासांची अशी एकही संपुर्ण कृती आज उपलब्ध नाही. जय काव्य हे महाभारतात हरवलेले आहे. सौती-जनमेजयाचेही नेमके काय होते, त्यांनी नेमकी कोणती भर घातली याचाही अंदाज लागत नाही. दुसरे म्हणजे भारत कथा कोणत्याही काळात घडली असेल, सध्याचे आपल्याला उपलब्ध असणारे महाभारत हे तिस-या-चवथ्या शतकात अंतिम संस्करणाच्या अवस्थेत पोहोचले आहे. भारतकथेच्या अलोट लोकप्रियतेमुळे भारतातील अनेक धर्मांनी महाभारतावर आपापले संस्कारही केले आहेत. वेदांचे व्यासांनी चार भाग केले ही तर सर्वस्वी भाकडकथा आहे.
व्यास हे मुळ कवी. त्यांची कृती म्हणजे जय हे आपण पाहिलेच. कोण होते हे व्यास? त्यांच्या जन्माभोवती महाभारतातच अनेक भाकडकथा गोवल्या गेलेल्या आहेत. महाभारताचे एक वैशिष्ट्य असे कि ज्याही थोर माणसाचे जन्मकुळ अथवा जन्मदाता माहित नाही अथवा अवैदिक आहे अशा व्यक्तींच्या जन्माभोवती चमत्कारकथा रचल्या गेलेल्या आहेत. द्रोण, भिष्म, कर्ण, दृष्टधुम्न इत्यादि उदाहरणे या संदर्भात पाहता येतील. चमत्कार वगळत कथांचे परिशिलन केले तर मात्र सत्याच्या थोडेफार का होईना जवळ पोहोचता येते. व्यासांची जन्मकथा आदिपर्व अध्याय ६३ मद्ध्ये येते. त्यावर धावती नजर फिरवून व्यास नेमके कोण होते याचा शोध घेऊयात.
पुरु वंशात एक वसू नांवाचा चेदी प्रांतावर राज्य करणारा राजा होता. शस्त्रांचा त्याग करून त्याने आश्रमात तपाचरण सुरु केल्याने आपले पद जाईल या भितीने इंद्र ग्रस्त झाला. त्याने वसुला पटवले, एक विमान भेट दिले तसेच इंद्रमालाही अर्पण केली आणि तपापासून परावृत्त केले. पुढे हा राजा वसू इंद्राने दिलेल्या स्फटिकमय विमानातच (म्हणजे अवकाशातच) राहु लागला म्हणून त्याला "उपरिचर" हे नांव पडले. एकदा असा चमत्कार झाला कि त्याच्या नगरीजवळुनच वहाणा-या शुक्तिमती नामक नदीला कोलाहल नांवाच्या पर्वताने कामवासनापुर्वक अडवल्याचे त्याच्या लक्षात आले. राजाने पर्वताला लाथ मारुन विवर निर्माण केले व नदीचा मार्ग मोकळा केला. पर्वतसंगामुळे नदीला एक मुलगा व एक मुलगी असे जुळे झाले होते. नदीने प्रसन्न होऊन राजाला दिले. राजाने मुलाला सेनापती बनवले तर मुलीशी लग्न केले. तिचे नांव गिरिका.
ती वयात आल्यावर ऋतूदान द्यायचे त्याच दिवशी पितरांनी त्याला मृगयेस जा अशी आज्ञा केली. तो नाईलाजाने मृगयेस गेला खरा पण सुगंधी पुष्पांनी नटलेल्या अरण्यात त्याचा कामाग्नी भडकला. अशाच कामविव्हळ स्थितीत अशोक वृक्षाखाली तो बसला असता कामोन्मत्त राजाचे वीर्यस्खलन झाले. आपले अमोघ रेत वाया जावू नये म्हणून त्याने ते द्रोणात धरले व श्येनपक्षा मार्फत आपल्या पत्नीकडे पाठवायची व्यवस्था केली. श्येन पक्षी तो द्रोण नेत असता वाटेत दुस-या श्येनपक्षाशी त्याची झडप झाली. द्रोण यमुनानदीत पडला. नदीत अद्रिका नावाची शापित मत्सी होती. तिने त्या द्रोणातील वीर्य भक्षण केले. पुढे दहा मासांनी त्या मत्सीला धीवरांनी पकडले. तिचे पोट फाडले तर तिच्या उदरातून एक मुलगा व एक मुलगी असे जुळे निघाले. धीवरांनी हा चमत्कार उपरिचर राजाला सांगितला. राजाने मुलाचे नांव मत्स्य असे ठेवले व मुलगी एका नावाड्याला अर्पण केली. अद्रिका मत्सी शापमुक्त होऊन स्वर्गधामी रवाना झाली. मुलीचे नांव सत्यवती असे त्या धीवराने ठेवले, पण मासे धरणा-या कोळ्यांच्या संगतीत रहात असल्याने तिच्या अंगाला मासळीचा वास येत असे.
पुढे पराशर ऋषी तीर्थाटनाच्या निमित्ताने त्या नदीवर आले असता सत्यवतीच्या नावेत पैलतीरावर जाण्यासाठी बसले. सत्यवतीचे लावण्य पाहून ते कामातूर झाले आणि तिला रतिदान मागू लागले. तिचे कौमार्य अभंग ठेवण्याचे, तिच्या शरीराला सुगंध येईल आणि संभोगकाळात अंधार उत्पन्न करण्याच्या अटी पराशरांनी पाळल्या. सत्यवती गर्भवती झाली. तिला जे अपत्य झाले ते म्हणजे व्यास. त्यांचे आधीचे नांव यमुनाद्वीपात जन्म झाल्याने द्वैपायन असे ठेवले गेले. रंगाने ते काळे-पिंगट असल्याने त्यांना कृष्ण असेही म्हणत. "माझे स्मरण करशील तेंव्हा मी प्रकट होईल" असे वचन मातेला देवून ते तपश्चर्येला निघून गेले. हीच सत्यवती पुढे कुरु वंशातील शंतनु राजाची राणी बनली.
वरील कथा वाचली तर एखाद्या परीकथेची आठवण येणे स्वाभाविक आहे. पण आपण परिकथेतील कल्पना दूर ठेवू. या कथेत उपरिचर राजाला अकारण गोवण्यात आले आहे हे उघड आहे. सत्यवतीचा पिता राजवंशातील होता हे दाखवण्यासाठी हा खटाटोप केला गेला आहे. तसेच व्यासांचा पिताही कोणी ऋषी-मुनी होता असेही दाखवायचा प्रयत्न यातून झालेला आहे. एक बाब लक्षात घ्यायला हवी कि मुक्त लैंगिक संबंधाच्या अनेक घटना महाभारतातच पहायला मिळतात. जेंव्हा कुळ-शीळ आणि स्त्रीयांच्या योनीशुचितेच्या कल्पना बदलल्या त्या काळात अशा प्रत्येक व्यक्तीच्या जन्माभोवती मिथके तयार केली गेली. हे करणेही आवश्यक अशासाठी होते कि खुद्द कुरु वंशात सत्यवतीचा जसा प्रवेश झाला तसाच व्यासांपार्फतच नियोगाद्वारे कुरू वंश विस्तारला. कुरु वंशाची महाराणी धीवर (कोळी) होती व वंशविस्तार करणारा कोळणीचा विवाहबाह्य संबंधांतुन झालेला मुलगा होता हे नंतरच्या नीतिविदांना मान्य होणे अवघड होते. त्यासाठी वरील संपुर्ण कथा रचली गेली हे उघड आहे. किंबहुना महाभारताचे वैदिकीकरण करण्याच्या नादात नंतरच्या वैदिक प्रचारकांनी अनेक बाबींचे भान ठेवले नाही.
मुळ भारतकथा घडली तो काळ अनेकार्थांनी प्रागतिक होता. लैंगिक संबंधंबाबत समाजबंधने एवढी तीव्र नव्हती. कुंतीही विवाहपुर्व (आणि विवाहानंतरही) पतीशिवाय पुत्र प्रसवू शकली ती त्यामुळेच. अशी असंख्य उदाहरणे (चमत्कार कथा वगळल्या तर) महाभारतातच दिसतात. सत्यवती मत्सीच्या पोटी जन्मू शकत नाही. एवतेव ती कोळ्याचीच मुलगी होती आणि व्यासांचा जन्म (पिता अनाम असला तरी) कोळणीच्या पोटी झाला जी नंतर कुरु राज्याची राणी बनली हे वास्तव आहे. जाती तेंव्हा आजच्यासारख्या नव्हत्या. प्रतिभा कोणाही व्यक्तीत असते हे मान्य करायचा तो काळ होता. वैदिक वर्ण-माहात्म्य तेंव्हा प्रस्थापित नव्हते. स्मृतीकाळ तर यायचाच होता. नंतरच्या काळात महाभारतावर वैदिक संस्करने झाली असली तरी ते करतांना मुळ सर्वस्वी बदलता येणे शक्य नव्हते. यातुन सुटका करुन घेण्यासाठी लढवली गेलेली युक्ती म्हणजे चमत्कारकथा निर्माण करत व्यास-द्रोणादिकांचे पितृत्व तथाकथित उच्चकुलीन व्यक्ती/देवता/अप्सरादिंना देण्यात आले व त्यांचे मुळ वास्तव धुसर करुन टाकले. त्याचा भारतीय समाजजीवनावर केवढा दुष्परिणाम झाला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.
मुळात मूळ भारतकथा घडली तेंव्हा वैदिक भारतात प्रवेशलेही असण्याचे शक्यता नाही. कारण महाभारताच्या बीजकथेत जी सामाजिक स्थिती आहे तशी स्थिती वैदिकांत असल्याचे कसलेही सूचन नाही.
उदा.: १. पाच भावांनी एका स्त्रीशी लग्न करणे या प्रर्थेचा दुरान्वयानेही वैदिक साहित्यात निर्देश नाही.
२. वैदिकांत वर्णसंकर हा गहन चिंतेचा विषय होता. वर्णसंकर होऊ नये म्हणून प्रचंड बंधने घालण्यात आली. पण भारतकथेतील बव्हंशी मुख्य पात्रे ही तथाकथित वर्णसंकरीत आहेत. त्यांना राज्य करताच येत नाही. मुळात केवळ त्याच आधारावर ते वैदिकही ठरू शकत नाहीत.
३. भिमाने हिडिंबेशी केलेला एक वर्षीय करार विवाह हा वैदिक विवाहप्रकारांत कोठेही बसत नाही.
४. वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषी ऋग्वेदरचनेत सामाविष्ट होते. ही रचना मुळात अफगाणिस्तानात झाली. त्यामुळे कुरु-पांचाल प्रदेशात घडणा-या कथेत ते कसे असू शकतात? प्रदिर्घ आयुष्याच्या भाकडकथा दुर ठेवल्या तर ही घालघुसड लक्षात येते.
५. वैदिक साहित्यातील राज्यव्यवस्था, ग्रामव्यवस्था कोठेही महाभारतातील चित्रणाशी यत्किंचितही जुळत नाही. वैदिक भारतात आल्यावर महाभारत घडले असते तर धार्मिक साहित्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले असते, पण तसे वास्तव नाही.
६. महाभारतातील नगरे हे सिंधूकालीन नगररचनांशी साधर्म्य दर्शवतात. शिवाय ती असुरांनी निर्माण केली ता मुळ सत्याचे अवशेष नंतरच्या भाकडकथा घुसवणा-यांना पुसता आलेली नाहीत. वैदिक साहित्य हे नगररचनाशास्त्राशी दुरान्वयानेही संबंध दर्शवत नाही. किंबहुना त्यांचे अज्ञानच त्यातून प्रतीत होते.
७. "पुरू" या नांवाची वैदिकांची एक टोळी होती. पुरु नांव अवेस्त्यातही विपूल प्रमाणात आढळते. ऋग्वेदातील पुरु हे टोळीनाम आहे, व्यक्तीनाम नाही. इसवीसनपुर्वी तिस-या शतकातही गांधारी प्राकृत जीवंत होती याचे लिखित पुरावे अस्तित्वात आहेत. तिच्याच निकटची दारी (अवेस्त्याची पर्शियन भाषेची एक बोली) भाषा त्याच वेळीस अस्तित्वात होती. हे भाषिक जाळे आजही जीवंत आहे. त्यामुळे समान शब्द आले म्हणून वैदिकांना कशाचेही श्रेय देणे गैर आहे. संस्कृत भाषा मुळात दुस-या शतकापर्यंत अस्तित्वात आलीच नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागते. पुरु हा शब्द प्राचीन काळी वेगवेगळ्या अर्थाने विविध संस्कृत्यांत वापरला जात होता हे स्पष्टपणे दिसते. नामसाधर्म्यावरून अथवा त्यातून अनुकूल अर्थ काढत झरथुस्ट्राचा जन्म हस्तिनापूरला झाला, गया येथे त्याला ज्ञान प्राप्त झाले असा अर्थ काढणारे आजही कमी नाहीत! तसाच उद्योग महाभारताबाबत केला तर मग अ.ज. करंदीकरांच्या म्हणण्याप्रमाणे महाभारतकथा मुळात पश्चिम आशियात घडली हेही मान्य करावे लागेल. पण ते वास्तव नाही.
८. विवाहप्रकारांत पाहिले तर असूर विवाह हा प्रकार आहे व तो नेमका क्षत्रियांस लागू आहे असे स्मृती सांगतात. कृष्णाने केलेला विवाह त्याच प्रकारचा होता. पण कृष्ण कथेनुसारच मुळात क्षत्रिय नाही. तो स्वत: असूर कुळातला आहे, त्याची आईही असूर कुळातील आहे. असूर वैदिक असू शकत नाहीत. म्हणजेच तथाकथित क्षत्रियही असू शकत नाहित. किंबहुना असते व वैदिक धर्म तेंव्हा भारतात असता तर यावर मोठा धार्मिक गहजब माजवला गेला असता.
येथे मी अत्यंत अल्प उदाहरणे दिली आहेत. महाभारतातील समाज व्यवस्था वैदिक समाजव्यवस्थेशी दुरान्वयानेही जुळत नाही. प्राचीन असुरांच्याच कथांना एनकेन प्रकारेन वैदिक प्रचारासाठी वापरण्यासाठी त्यावर वैदिक कलमे करण्यात आली आहेत. भारतकथा वैदिक धर्म भारतात येण्याच्या बराच काळ आधी घडून गेली आहे. महाभारतातील वैदिक कलमे बाजुला केली की वास्तव दिसू लागते.

Sunday, February 7, 2016
वैदिक आणि हिंदू : दोन धर्म!
हिंदू धर्म हा वैदिक धर्मातुनच विकसित झाला व नंतरच्या काळात पौराणिक धर्म व वैदिक धर्म यांचे मिश्रण होत आजचा हिंदू धर्म बनला असे साधारणपणे मानले जाते. आजच्या हिंदू धर्मावरील वैदिक वर्चस्व ठळकपणे नजरेत भरण्यासारखे आहे कारण सर्वसामान्य (त्रैवर्णिक वगळता) लोक जो धर्म पाळतत तो कोठल्याही बाबतीत वैदिक नाही. एवढेच नव्हे तर त्यांना वेदांचा/वेदोक्त संस्कारांचा अधिकार नाही. एकच धर्म असता तर अशी अवस्था आली नसती हे उघड आहे. त्यमुळे पौराणिक व वैदिक धर्माचे" संम्मिश्रण झाले या म्हणण्यातही काही अर्थ राहत नाही.
वैदिक धर्म म्हणजे काय हे आपण आधी पाहू. वेदांनाच एकमेव अंतिम मुलस्त्रोत मानत, यज्ञादि कर्मकांडांद्वारे धर्मकृत्ये करत, वेदधरित स्मृती आणि ब्राह्मण ग्रंथांना धर्मग्रंथ मानत त्यातील तरतुदींप्रमाणे जगणे म्हणजे वैदिक धर्म. या धर्मातील लोकांना सोळा वैदिक संस्कारांचा धार्मिक आधार असून आता पुरुषांनाच उपनयनाचा अधिकार आहे. वैदिक धर्म भारतात सनपुर्व १२०० ते १००० या काळात दक्षीण अफगाणिस्तानातून धर्मप्रचारकांच्या माध्यमतून आला. कुरु-पंचाल प्रदेशात त्यांन राजाश्रयही मिळाला. तेथुन पुढे अत्यंत सावकाश हा धर्म देशभर काही लोकांत प्रवेशला. पण सर्वव्यापी रुप या धर्माला कधी आले नाही.
तरीही अनेक विद्वान हा च्धर्म मुळचा भारतातीलच असे सिद्ध करूह्न लोकांचा ब्युद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आपल्याला या बाबींचा तथ्यपुर्वक विचार केला पाहिजे. भारतीय संस्कृतीचा, त्यात जन्माला आलेल्या धर्मांचा संगतवार अभ्यास करतांना प्रादेशिकता, कालानुक्रमता आणि तत्कालीन परिस्थित्या यांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ वैदिक धर्माची स्थापना मुळात कोठे झाली? ते वैदिक धर्म स्थापन करण्याआधी ते लोक कोणत्या धर्माचे होते? या धर्माच्या स्थापनेत भाग घेणारे कोनकोणत्या टोळ्यांचे होते?
आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे वेदपुर्व काळात भारतीय लोक कोणता धर्म पाळत होते? भारतातील आजही कोणता धर्म दैनंदिन जीवनात पाळतात? वैदिक धर्मीयांनी एतद्देशियांना पराजित करून आपली सम्स्कृती व भाषा लादली हा दावा खरा आहे काय?
या प्रश्नांना न भिडता, त्यांची समाधानकारक उत्तरे न शोधता कधीही कोठलाही ग्रंथ उचलून व त्यातील उद्घृते फेकून पाळामुळांबद्दल संभ्रम निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून कोणालाही कसलेही तथ्यप्रधान उत्तर मिळणार नाही हे उघड आहे. उदा. वैदिक आर्य भारतात बाहेरुन आले असा एक मतप्रवाह अहे. ते आक्रमक म्हणून आले कि स्थलांतरीत म्हणून आले याबद्दल मतभेद आहेत. असे असले तरी आजचा विचारप्रवाह स्थलांतरीत म्हणून आले याकडे झुकतो. याविरुद्धचा प्रवाह आहे तो म्हणतो कि वैदिक आर्य हे भारतातीलच असून ते स्थलांतरे/आक्रमणे याद्वारे भारताबाहेर इराणमार्गे युरोपात पसरले. तिसरा मतप्रवाह माझा असून वैदिक धर्म अवेस्त्याचा समकालीन असून दक्षीण अफगाणिस्तानात निर्माण झाला व धर्मप्रसाराच्या मार्गे भारतात आला.
हा धर्म भारतातील नाही याची प्रमाणे थोडक्यात अशी:
१) सिंधू किंवा उत्तरसिंधुकालीन नगरे तसेच समाजजीवनाचे कसलेही चित्रण ऋग्वेदात नाही.
२) ऋग्वैदिक संस्कृती ही पशुपालकांची संस्कृती असून स्थिर, नागरी व कृषीप्रधान नाही.
३) ऋग्वेदात येणारा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान हा आहे तर अवेस्त्याचा भुगोल उत्तर अफगाणिस्तान आहे.
४) दोन्ही धर्मांत व भाषेतही विलक्षण साम्य आहे.
५) दोन्ही धर्मग्रंथात एकमेकांच्या धर्मात असलेल्या व्य्क्ती व संघर्ष हुबेहुब आले आहेत, अर्थात शत्रुत्वाच्या भावनेने. उदा. ऋग्वैदिक नोढस गौतम अवेस्त्यात येतो तर अवेस्त्याचे झरथुस्ट्र, विश्तास्प, अरिजास्प आदि ऋग्वेदात येतात. पुरु-पौरु हे दोन्ही ग्रंथांत येतात.
६) त्या भुभागातील दास-दस्यु हे अवैदिक समाज अवेस्त्यातही येतात. जर वैदिक धर्म भारतात स्थापन झाला असा आग्रहच धरायचा असेल तर अवेस्त्याचा पारशी धर्मही भारतातच स्थापन झाला असे मान्य करावे लागेल, आणि ते वास्तव नाही.
७)ऋग्वेदात उल्लेखिलेल्या बहुतेक जमाती पश्चिमोत्तर भारत व अफगाणिस्तानासहित इराण व तुर्कमेनिस्तानातील आहेत व त्या आजही अस्तित्वात आहेत. उदा. तुर्वश (तुर प्रांतातील तुराणी/तुर्क ), पख्त (पख्तुन), भलानस (बोलन खिंडीतील लोक), दास-दस्यु (अफगाणिस्तानातील लोक), पर्शू (पर्शियन लोक), गांधारी (गांधार प्रांतातील लोक), पार्थव (पार्थियन लोक), अलिन (काफिरीस्तानातील लोक.) ही अशी अनेक उदाहरणे देता येतील. ही जमातनामे अवेस्त्यातही येतात!
थोडक्यात अवेस्त्याचा काळ तोच ऋग्वेदाचा काळ. त्यामुळे ऋग्वेदाचा काळ जितका मागे नेला जाईल तितकाच अवेस्त्याचाही काळ मागे न्यावा लागेल हे उघड आहे. परंतू अन्य समकालीन संस्कृत्या, उदा. ग्रीक, इजिप्शियन, मितान्नी, अस्सिरियन वगैरे या दोहोंचा काळ सनपुर्व १५०० पलीकडे जावू देत नाहीत हेही वास्तव लक्षात घ्यावे लागते.
वैदिक धर्म भारतात येण्याआधी सिंधू खोरे ते दक्षीण या विस्तीर्ण भागात शैव धर्म मोठ्या प्रमाणावर पसरला होता. याचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध असून शिवलिंगे, मातृदेवता, सप्तमातृका यांच्या प्रतिमा तर मिळतातच पण भारतियांना आजही पूज्य असलेल्या वृषभाच्या मुद्राही मोठ्या प्रमाणात मिळतात. शिवलिंगासमोर आताही नंदी असतो. बैलपोळा भारतभर वेगवेगळ्या नांवांनी साजरा तर होतोच पण ५२ शक्तीपीठे आणि गांवोगांवी असलेल्या देवीपंदिरांतुन वेदपुर्व धर्म आजही पाळला जातो हे आपल्या लक्षात सहज येईल.
असे समजा, वैदिक आक्रमक असते आणि येथील लोकांना पराजित केले असते तर सर्वप्रथम त्यांनी येथील देवतांना (धर्माला) नष्ट केले असते. स्वत:ची इंद्र, वरुण, नासत्य, मित्र इ. वैदिक देवता येथील लोकांवर लादल्या असत्या. त्यांची मंदिरे बनवली असती. पण तसे झालेले नाही. याचाच अर्थ वैदिक जिंकले नव्हते. त्यांने त्यांचा धर्मप्रचार केला. येथीलच अनेक लोक धर्मांतरित होऊन त्यांच्या धर्मात गेले. घुर्ये म्हणतात कि भारतातील साडेपाचशे ब्राह्मण जातींपैकी किमान साडेतिनशे या मुळच्या वैदिक नाहीत, त्यांची गोत्रेही वैदिक नाहीत. याचा अर्थ समजावून घ्यायला हवा.
बरे, डा. रा. ना. दांडेकर म्हणतात, "शैवप्रधान धर्मधारा हीच मुळची असून वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही."
वरील विधानावरून दोन बाबी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे वैदिक व शैवप्रधान धर्म हे दोन वेगळे स्वतंत्र धर्म आहेत हे वैदिक विद्वानांनाही मान्य आहे. दुसरे म्हणजे, आजही आमचा धर्म वेदपुर्व काळापासुनचा शैवप्रधान धर्म आहे व तो आम्ही पाळतो. असो. आपल्याला अजून थोडे खोलात जायला हवे.
हिंदू शब्दाची आजतागायत व्याख्या झालेली नाही हे आपणास माहितच आहे. काय कारणे असावित? अव्याख्यित असा हा जगाततील एकमेव धर्म आहे याचे खरे कारण वैदिक आणि शैवप्रधान जनसामान्यांचा धर्म एकच मानला गेल्याने ही स्थिती आली. याचा अर्थ व्याख्या करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत असा नाही.
खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.
१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.
२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.
३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.
४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे. शिवाय हिंदू कोड बिल हे बौद्ध व जैन धर्मियांनाही लागु असल्याने तेही हिंदू ठरतील, पण ते वास्तव नाही.
५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.
ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.
६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम
अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.
श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)
याचाच अर्थ असा कि वेद व स्मृती या केवळ त्रैवर्णिकांसाठी असल्याने ते वैदिक होते. हिंदू (अथवा शैव) असुच शकत नव्हते. शूद्र हे नांव वैदिक धर्मबाह्य असे घ्यायचे आहे. मुस्लिमांद्साठी इतर धर्मीय जसे काफिर तसेच अवैदिक (वेदपुर्व) लोक हे त्यांच्या दृष्टीने शूद्र. वेगळ्या धर्माचे लोक. या दोहोंना एकत्र केले तर हिंदू शब्दाची व्याख्या कशी होनार? समजा ज्यू आणि इस्लाम एकाच धर्माचे कोणी गृहित धरून व्याख्या करायला गेला तर तोही फसणारच कि नाही?
केवळ याच मुळे हिंदू शब्दाची सर्वमान्य व्याख्या झालेली नाही. जोवर वैदिक धर्म वेगळा आहे, त्यचे आचार-विचार व कर्मकांड वेगळे आहे हे आपण समजावून घेत नाही तोवर हा गोंधळ संपणार नाही.
आता वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत अथवा धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्याचीही तपासणी केली पाहिजे. ती खालीलप्रमाणे-
१) वैदिक धर्मग्रंथांत (हिंदू नव्हे) इंद्र, वरुण, नासत्य, मित्र, इत्यादि जवळपास ६४५ देवता आहेत. यात एकही अन्य हिंदू पुजतात ती देवता नाही. यजुर्वेदात तर "न तस्य प्रतिमा अस्ति" म्हणत मुर्ती/प्रतिमापुजेचा निषेध तर केलाच आहे. (यजु. ३२.३) पण ऋग्वेद ७.२१.५ आणि १०.९९.३ मद्ध्ये शिवाची "शिस्नदेव" म्हणून निर्भत्सना केली असून लिंगपुजकांचा केवढा द्वेष वेदरचैते करत असत याचे स्पष्ट दिग्दर्शन होते. विनायक गणपतीला वैदिक लोक तर विघ्नकर्ता मानत असत, विघ्नहर्ता नव्हे हे तर सर्वविदित आहे. म्हणजे ज्या देवता हिंदू भजतात, त्यांचा निर्देशच मुळात वेदांमद्ध्ये अवमानात्मक येतो ते ग्रंथ अर्थातच हिंदुंचे धर्मग्रंथ असू शकत नाहीत.
२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.
३) वेद अथवा वैदिक समाजरचना ही पुरुषसत्ता प्रधान असून वेदांत फक्त अदिती, रात्री, पृथ्वी, सरस्वती व उषस याच स्त्रीदेवता आहेत. अदिती (देवतांची माता) सोडली तर बाकी नदी व निसर्गातील घटनांच्या स्त्रैण प्रतिनिधी आहेत. हिंदू शैवप्रधान धर्मात मात्र शिव व शक्ती हे नेहमीच युग्म स्वरुपात समतेने पुजले जातात.
४) शिवपुजा सिंधू पुर्व काळापासून प्रचलित असून वेदरचना ही अत्यंत उत्तरकालीन आहे. त्यात शिवप्रधानता नसल्याने ते हिंदू धर्माचे अंग होऊ शकत नाहीत. वेदरचना भारतात झालेली नाही. एतद्देशियांचा धर्म हा वैदिक धर्मापेक्षा सर्वस्वी वेगळा असल्याचे हेच कारण आहे. त्यामुळे वैदिक साहित्य हे हिम्दू धर्माचा स्त्रोत नाहीत.
५) वैदिक लोकांत जानवे घालण्याची प्रथा नव्हती. पुर्वी फक्त यज्ञप्रसंगी यज्ञोपवित (जानवे) घालण्याची प्रथा होती. परंतू हा धर्म भारतात आल्यानंतर या धर्माच्या लोकांनी अन्य धर्मियांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी जानवे नित्य घालण्यास सुरुवात केली. (The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor)
६) वैदिक आचार व तत्वज्ञान सर्वस्वी वेगळे असून त्या धर्माबाहेर जे लोक होते त्यांना ते शूद्र म्हणत. त्यांना वेदाधिकार असण्याचे कारण नव्हते व नाही कारण त्यांचा धर्म सर्वस्वी स्वतंत्र होता. त्यांचे स्वत:चे पुरोहित होते व आहेत, जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. कारण पोटर्थी वैदिकांनी बव्हंशी देवतांचे अपहरण केले अथवा स्वसमाधानासाठी त्यांना वैदिक देवतांशी जुळवायचा अयशस्वी प्रयत्न केला. शक्तीला अदितीशी तर शिवाला रुद्राशी, विठ्ठल-बालाजीला (जे शैव होते) त्यांना वैदिक विष्णुशी जुळवायचे प्रयत्न केवळ पोटार्थी कारणासाठी होते, एकधर्मीय होते म्हणून नाही.
७) वेदांशी हिंदुंचा कधी संबंधच आला नसल्याने वैदिक धर्म म्हणजे हिंदू हे कोनालाही मान्य होण्याचे कारण नाही.
८) वैदिक स्मृत्या या वैदिक धर्मापुरत्या मर्यादित होत्या. अन्यांनी त्या पाळल्याचे एकही उदाहरण नाही. शिशुनाग, नंद, मौर्य, सातवाहन ते हरीहर-बुक्क हे सारे सम्राट शूद्र होते. वैदिक धर्मनियमांनुसार शुद्रांना राजेपण तर सोडाच...संपत्तीसंचय करण्याचाही अधिकार नाही. (पहा - मनुस्मृती)
९) वेदांतील एकही देवता हिंदू (शैव) व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.
१०) वैदिक मंत्र त्रैवर्णिकांसाठी तर पुराणोक्त शुद्रांसाठी अशी वाटणी पुरातन काळापासुन होतीच. पुराणकाळ नंतरचा नसून "पुराण" या शब्दातच पुरातनता निहित आहे. पौराणिक मंत्र हे सर्वस्वी आजही ज्या देवता हिंदू पुजतात त्यांबाबत असून वैदिक मंत्र हे वैदिक देवतांचे असतात. ही विभाजनी सरळ सरळ दर्शवते कि शुद्रांचा धर्म वेगळा होता व आहे तर वैदिकांचा वेगळा आहे.
११) पुराणे ही वेदपुर्व काळातील सूतांनी व मागधांनी (शूद्रांनी) केलेली साहित्यरचना होती ज्यात इतिहास व शैवप्रधान देवतांचे माहात्म्य सांगितलेले असे. नंतरच्या काळात (गुप्तकाळात) पुराणांत वैदिकांनी अनेक प्रक्षेप करत वेदमाहात्म्य व ब्राह्मण माहात्म्य घुसवले. असे असले तरी देवतांचे मुळचे शिवस्वरुप बदलता आले नाही. पण काही वैदिक देवतांनाही प्रतिष्ठा देण्यासाठी वायुपुराण, विष्णूपुराण इत्यादि लिहिले. असे असले तरी शैव धर्माचा पगडा काढता येत नाहे असे पाहून राक, कृष्णादी या वेदपुर्व धर्म पाळणा-या महनीय व्यक्तींना विष्णुचे अवतार बनवले. एवढेच नाही तर विठ्ठल-तिरुपती आदि मुळच्या शैव दैवतांचेही अपहरण करत त्यांना वैष्णव चरित्र बहाल केले. भारतात मुळच्या विष्णुची विष्णुस्वरुपातील सार्वजनिक मंदिरे खुपच कमी आहेत. खुद्द पुण्यात एकही नाही. यावरून सत्य काय हे समजून येईल.
वरील अल्प विवेचन पाहता वेद हे हिंदु धर्मियांचे ना मुलस्त्रोत आहेत ना धर्मग्रंथ आहेत. ते वैदिकांचे धर्मग्रंथ असून त्यांच्याशी व ते प्रमाण मानणा-यांशी हिंदुंचा संबंध नाही. वेदांमद्ध्ये हिंदुंना उपयुक्त असे काहीएक नसून उलट हा जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत हे पुरुषसुक्तावरुनच स्पष्ट दिसते. विषमतेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात हिंदुही ती उच्चनीचता व जातीभेद पाळु लागले हा त्यांचा दोष असून वैदिक आपला प्रभाव राजाश्रय व धनाश्रय या जोरावर निर्माण करण्यात त्यामुळेच यशस्वी झाले असे म्हणने क्रमप्राप्त आहे.
असे असले तरी दोन धर्म स्वतंत्र आहेत याचे भान वैदिकांना असते. नसते ते हिंदुंना. हिंदू अधिक सहिष्णू असल्याने वैदिकांचे फावले व त्यांनी स्थितीचा गैरफायदा घेतला असे आपल्याला इतिहासकाळापासून दिसते. आजही हिंदुत्ववादी संघटना छुपेपणे वैदिकत्वाचाच प्रसार करत असतात. हिंदुत्वाचा नाही.
उदाहरणार्थ सिंधू संस्कृती ही भारतीय व शैवधर्मप्रधान आहे हे उत्खननांत सापडलेल्या अगणित पुराव्यांवरून सिद्ध झालेले आहे. दुसरे असे कि घग्गर नदी ही कोणत्याहे स्थितीत वैदिक सरस्वती असू शकत नाही याचा निर्वाला भुगर्भशास्त्रज्ञ ते पुरातत्वविदांनी अनेक परिक्षणे करत दिली आहे. असे असले तरी घग्गर म्हणजेच सरस्वती नदी असा प्रचार गेली तिसेक वर्ष चालू आहे. याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीही "वैदिक" होती, वैदिकांनीच ती निर्माण केली असे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आहे. जागतिक पातळीवरचे तज्ञ हे मान्य करत नाहीत हेही महत्वाचे आहे. समजा हे खरे हिंदुत्ववादी असते, हिंदु धर्माची पुरातनता त्यांना सिद्ध करायची असती तर त्यांनी सिंधू संस्कृतीला "हिंदू" संस्कृती म्हटले असते, किंवा गेलाबाजार "भारतीय" संस्कृती म्हटले असते.
पण प्रत्यक्षात संघवादी लोक तिला "वैदिक" संस्कृती म्हणतात. इतरांनीही तसेच म्हणावे असा आग्रह धरतात. याचे कारण म्हणजे मुलत हे लोक हिंदू नाहीत. त्यांचा धर्म वेगळा आहे. श्रीकांत तलगेरींसारखे संघाचे विद्वान तर "वैदिक आर्य" हे सिंधू संस्कृतीचे नुसते निर्मातेच नव्हेत तर त्यांनी पार युरोपपर्यंत जात वैदिक संस्कृती व भाषा पसरवली असे सांगतात. प्रत्यक्षात वेदांत शिव, पार्वती (शक्ती), गणेश, वगैरे हिंदू देवतांचे (जी सिंधू संस्कृतीत प्रत्यक्ष सापडली आहेत) नांव तर सोडा, वर्णनही येत नाही. मग ती संस्कृती वैदिक कशी? हा सारा प्रयत्न हिंदुंपेक्षा आम्ही वरचढ आहोत, संस्कृतीचे मुळ निर्माते आहोत असे सिद्ध करण्यासाठी. याला मिथ्या वर्चस्वतावाद म्हणतात. वैदिक हे हिंदू नव्हेत हे ते वारंवार स्वत:च सिद्ध करत असतांना आम्ही खरे मुळचे वेदपुर्व हिंदू मात्र तो कावा समजावून घेत नाही हे आमचे दुर्दैव.
खरे तर वैदिक धर्मीय हिंदू धर्मातून बाहेर काढले जात नाही, (म्हणजे त्यांना हिंदू मानणे थांबवत नाही) तोवर हिंदुंचे मानसिक व धार्मिक कल्याण होणार नाही. हे लोक वैदिक वर्चस्व निर्माण करत हिंदुंचा न्य़ुनगंड वाढवत राहतील आणि आम्हाला वर्चस्वतावादी जसे बनायचे नाहे तसेच कोणाच्या वर्चस्वतावादाखाली दबत न्युनगंडही जोपासायचा नाही.
हेच हिंदुंचे खरे स्वातंत्र्य आहे!
Subscribe to:
Posts (Atom)
शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक
शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...