निवृत्ती हा प्रत्येकाच्याच जीवनात भेडसावणारा प्रश्न बनलेला आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे आपली पुर्वीची कुटुंबव्यवस्था शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत
झपाट्याने बदलत चालली आहे. आर्थिक आव्हानेही त्याच प्रमाणात वाढलेली आहेत. नोकरदार
व व्यावसायिकांच्या दृष्टीने तर निवृत्तीनंतरच्या सुखी-समाधानी जीवनासाठी योग्य आर्थिक
नियोजन करणे आजकाल अत्यंत आवश्यक झाले आहे. याचे कारण म्हणजे आता सरासरी आयुर्मान वाढलेले
आहे. वृद्धावस्थेच्या एका सीमेवर आरोग्यावर होणारा खर्च वाढत जातो. जीवनशैली आपल्याला वृद्धपणी जपावीशी वाटते त्यासाठी
किती पैसे आपल्याला लागू शकतील याचा अंदाज घेत व संभाव्य अतिरिक्त खर्चही लक्षात
घेत आपण आतापासून गुंतवणूक करायची सवय लावली पाहिजे. भविष्यात वाढत जाणा-या
महागाईच्या दराचाही त्यात समावेश असला पाहिजे. असे केले नाही तर मुले अथवा
नातेवाईकांवरचे परावलंबित्व वाढून त्यांच्यावरही अकारण
आर्थिक बोजा पडू शकतो. शिवाय निवृत्तीनंतर कोणाचे विदेश प्रवासाचे स्वप्न असते तर कोणाचे
एखादा छंद जोपासण्याचे. अगदी समाजसेवाही करायचे स्वप्न असले तरी प्रत्येक गोष्टीसाठी
पैसा हा आवश्यक ठरतो. मुला-मुलींचे विवाह, संभाव्य आकस्मिक गंभीर
आजारपणे असेही काही खर्च उद्भवू शकतात ते वेगळेच! या सर्वांचा विचार योग्य वेळी
केला तरच निवृत्तीनंतरचा सुखाचा काळ तुम्ही उपभोगू शकता.
सरकारी अथवा कायम झालेल्या ब-याच नोकरदारांसाठी इपीएफ
(Provident Fund) व अनेकदा परिवार पेंशन योजनाही (Family Pension
Plan) असते. ही गुंतवणूक सक्तीने होते त्यामुळे निवृत्तीसाठीचे नियोजन आपोआप होऊन
जाते. पण उरलेल्या बहुसंख्य समाजाला मात्र ही सुविधा नसल्याने ते कसलेही नियोजन
करत नाहीत व निवृत्तीनंतर आपसूक आर्थिक संकटात सापडतात. जे जीवन सर्वाधिक आनंदाचे,
साफल्याचे आणि समाधानाचे जायचे तेच चिंतांनी भरून जाते. तरुणावस्थेतला जोम आणि
उत्साहाच्या काळात आपण हा विचार का केला नव्हता हा प्रश्न भेडसावू लागतो. खूप
जणांना आपली बचत अधिक लाभदायक ठरणा-या पर्यायांत कशी गुंतवता येईल हे सहसा माहित
नसते त्यामुळेही वृद्धापकाळी पुरेशी रक्कम त्यांच्या हाती येत नाही. खर्चांचा मेळ
घालणे अवघड होऊन बसते. किंबहूना अर्थ-निरक्षरता व बदलत्या जगाच्या झपाट्याने
बदलत्या गरजंचे भान भारतियांत सहसा आढळत नाही. त्यामुळे अनेकांचा वृद्धापकाळ हा यातनामय
होऊन जातो. असे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आपले भविष्यातील आर्थिक नियोजन आताच केले
पाहिजे.
खरे म्हणजे प्रत्यकानेच, मग
स्त्री असो कि पुरुष, तरुण वयापासुनच उत्पन्नातील
किमान दहा टक्के तरी रक्कम बाजुला काढून गुंतवायला हवी. जसजसे
उत्पन्न वाढत जाईल तसतशी गुंतवणुकही वाढवायला हवी. जितक्या उशीरा तुम्ही
निवृत्तीसाठीची तरतूद सुरु कराल तेवढीच गुंतवणुकीसाठीची आवश्यक रक्कम वाढत जाईल हे
उघड आहे. म्हणजे समजा तुम्ही वयाच्या पंचविसाव्या वर्षी गुंतवणूक सुरु केली तर
उत्पन्नाचा दहा टक्के रक्कम जर पुरेशी गुंतवणूक ठरणार असेल तर वयाच्या चाळीसाव्या
वर्षापासून समजा तुम्ही गुंतवणूक सुरु केली तर उत्पन्नाच्या वीस ते पंचवीस टक्के
गुंतवणूक करावी लागेल. तेंव्हा युवावस्थेतच गुंतवणूक सुरु करणे तुम्हाला लाभदायक
ठरू शकते.
निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी
गुंतवणूकीच्या पर्यायांत म्युच्युअल फंड हा पर्याय आकर्षक मानला जातो. योजनाबद्ध
गुंतवणूक पद्धतीत (SIP म्हणजेच Systematic Investment Plan)) तुम्ही दरमहा ठरावीक
रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकता. निवृत्तीनंतर अथवा आधीही आवश्यकतेनुसार
विशिष्ट रक्कम तुम्ही काढूनही घेत राहु शकता. याला Systematic withdrawl plan
(SWP) असे म्हणतात. म्हणजे ज्या नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली त्याच
नियोजनबद्ध पद्धतीने, म्हणजे दरमहा, त्रैमासिक अथवा वार्षिक हप्त्याने आपली
गुंतवणूक लाभासहित काढून घेत उर्वरीत रकमेच्या गुंतवणूकीचे फायदे पुढेही मिळवत
राहू शकता. यासाठी रिलायंस म्युच्युअल फंडासहित अनेक म्युच्युअल फंडांनी खास रिटायरमेंट फंड प्रसारित केलेले आहेत. या
गुंतवणुकींतून करबचतही साधता येते. आपण या
योजनांची तुलना करून कोणत्या प्रकारच्या फंडात आपली दिर्घकालीन बचत करत आपले
निवृत्तीनंतरचे जीवन सुखावह बनवायचे याचा निर्णय घेऊ शकता. महत्वाचे हे आहे की
आपल्याला निवृत्तीनंतरच्या जीवनाची आर्थिक तरतूद वेळीच करायची सुरुवात केली
पाहिजे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या
(वैधानिक सूचना: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करतांना योजनेशी संबंधीत कागदपत्रे काळजीपुर्वक पहावीत व मगच गुंतवणुकीचा स्वजबाबदारीवर निर्णय घ्यावा.)
उत्रकृष्ट लेख. ह्या विषयाचे साधारण लोकांना ज्ञान नसते आणि एक बेफिकिरी असते. मध्ये केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले कि , बऱ्याच पालकांची स्वतःच्या रिटायरमेंट नंतरची आर्थिक सोय / जवाबदारी आपल्या मुले उचलतील ह्या आशेवर आहेत. पुन्हा जेय पैसे साठवतात तेय LIC किव्हा बँक ठेवी मध्ये ठेवतात. त्याचे व्याजदर कमी असल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देणे अवघड असते. पण हेय जरा हळूहळू बदलत आहे.
ReplyDelete