Sunday, September 18, 2011

महाभारत आधीचे कि रामायण?

महाभारत आधीचे कि रामायण?

रामायण आधीचे असुन महाभारत नंतरचे आहे असे मानले जाते. याचे प्रमुख कारण असे कि खुद्द महाभारतात रामायणकथा सविस्तरपणे येते, तशी भारतकथा रामायणात येत नाही. पण महाभारतात ४थ्या शतकापर्यंत एवढी भर पडली आहे कि चक्क भगवान बुद्धसुद्धा महाभारतात डोकावतात. मग म्हणुन महाभारत बुद्धोत्तरकाळानंतरचे आहे असे समजायचे का?

तर ते तसेही नाही. महाभारत मुळातील जय नावाचे वीरकाव्य होते. ते मुळात फक्त १२,००० श्लोकांचे होते. तेही मुळ संस्क्रुतमद्धे होते काय या प्रश्नाचा निकाल अद्याप लागलेला नाही. रामायण या काव्याचे मुळ नावही "पौलत्स्यवध" असे असुन ते एक गीतिकाव्य वा वीरकाव्य या स्वरुपाचे होते आणि त्यातही ३-४ थ्या शतकापर्यंत भर पडत राहीली. अशी मान्यता आहे कि रामायण आणि महाभारतकाळात किमान ५०० ते १००० वर्षांचे अंतर आहे. "वैदिक संस्क्रुतीचा इतिहास" लिहितांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही, महाभारतकाळात रामायणकाळापेक्षा अधिक गुंतागुंतीचे समाजकारण झाले असल्यामुळे रामायण आधी झाले असावे असे मानतांना दिसतात. काही विद्वान तर दोन्हीही काल्पनीक कथा असल्याने दोहोंनाही ऐतिहासिक महत्व देता येत नाही असेही प्रतिपादित करतांना दिसतात.
दोन्ही काव्ये ऐतिहासिक कि काल्पनिक या वादात न पडता मी कोणते काव्य आधीचे असु शकेल यावर येथे विचार मांडत आहे.
माझ्या मते महाभारतकाळ हा आधीचा असुन रामायणकाळ नंतरचा आहे. त्यासाठीचे पुरावे खालीलप्रमाणे:

महाभारतात बहुपतिकत्व, बहुपत्नीत्व आणि नियोगप्रथा सर्रास आहे. किंबहुना पांडवांची जी बाजु येते त्यात तर ती अधिकच स्पष्ट दिसते. उदा:. कुंतीने नियोगानेच विवाहपुर्व आणि विवाहोत्तर काळात पतीशिवाय मुले प्रसवली. माद्रीने सुद्धा. त्यांचे पित्रुत्व सुर्य-इंद्रादी देवतांना दिले गेले असले तरी ती उत्तरकालात केली गेलेली सारवासारव आहे हे स्पष्ट आहे. द्रौपदीने बहुपतीकत्वाची चाल पाळलेली आहे. त्याची अनैतिकता उत्तरकाळात जानवल्याने या बहुपतिकत्वाची पाच वेगवेगळी समर्थने महाभारतात आदिपर्वात येतात. म्हनजे बहुपतीकत्व/नियोगविधी हे ज्या काळात समाजमान्य उरलेले नव्हते त्या काळात या स्पष्टीकरणकथा घुसवण्यात आल्या आहेत.
समाजशास्त्रीय अंगाने पाहिले तर समाजाचा विकास हा स्त्रीसत्ताकाकडुन पुरुषसत्ताकाकडे झालेला दिसतो. स्त्रीसत्ताकात स्त्रीयांचे स्वातंत्र्य अमर्यादित होते. कोनाशी संबंध ठेवावेत, कोणाकडुन संतती उत्पन्न करावी वा किती पती ठेवावेत याचे स्वातंत्र्य स्त्रीयांना होते. द्रौपदी पाच पती असतांनाही कर्णालाही सहावा पती मानण्यास तयार होतीच. म्हनजे कुंती, माद्री व द्रौपदी या स्त्रीसत्ताक संस्थेचे प्रतिनिधित्व करना-या व स्त्रीसत्ताकतेकडुन पुरुषसत्ताकतेकेडे होत असणा-या संक्रमनकाळातील स्त्रीया होत. पांडवांनी त्याच वेळीस अनेक स्त्रीयाही केल्या होत्या यावरुन हे सिद्ध होते.
याउलट आपण कौरवांकडे पाहिले तर लक्षात येते कि ते मात्र पुरेपुर पुरुषसत्ताक पद्धतीचे प्रतिनिधित्व करतात. कौरवांच्या बाजुने कोणेही नियोगप्रथा, बहुपतीकत्वप्रथा पाळलेली नाही. कौरव व पांडव हे एकाच वंशातील होते हे ग्रुहित धरले व त्यांच्या पुर्वजांनी जरी नियोगप्रथा पाळली असली (पंडु, ध्रुतराष्ट्र व विदुर हे नियोगातुनच जन्माला आले अशी आजची महाभारतकथा सांगते. हा नियोग व्यासांशीच झाला ही भारतकथा विश्वसनीय वाटत नाही.) तरी तत्पुर्वी कुरु वंशात बहुपतीकत्व प्रथा असल्याचे महाभारतात दिसत नाही.
परंतु या प्रथेचे स्पष्ट पुनरुज्जीवन झाल्याचे कुंती-माद्री व द्रौपदीच्या रुपात दिसते.
पांडव व कौरवांतील संघर्ष भाउबंदांतील होता कि पुरुषसत्ताक पद्धती आणि स्त्रीसत्ताक पद्धतीच्या समर्थकांमधील होता हाही प्रश्न विचारणीय आहे. कौरवांचा एक पुर्वज भरताचा जन्म हा दुष्यंत-शकुंतलेच्या एकमेव मिलनानंतर तीन वर्षांनी झाला असे आजचे महाभारत सांगते. या विसंगतीकडे लक्ष वेधायचे कारण म्हनजे पुर्वीच्या बहुपतीकत्व प्रथेची उदाहरणे महाभारतकारांना द्यायची नव्हती असे मला वाटते. प्रस्तुत काव्याचा हेतु कौरव-पाडवांतील कलह हा असल्याने त्यांना मात्र पांडवाच्या बाजुने असलेली प्रचलीत बहुपतीकत्व आणि त्याच वेळीस बहुपत्नीकत्व लपवता येणे शक्य नसल्याने त्याभोवती मित्थके रचत त्या प्रथेचे अपवाद म्हणुन समर्थन केले गेलेले दिसते.
कौरव मात्र एकपत्नीकत्वाचे (काही अंशी बहुपत्नीत्वाचे) समर्थक घटक दिसतात. ध्रुतराष्ट्राला एकच पत्नी आहे व ती म्हनजे गांधारी. दुर्योधनालाही महाभारतातुन दिसनारी एकच पत्नी आहे...अन्य कौरवांच्या पत्न्यांची नावे सहसा आढळतही नाहीत. परंतु कौरव हे पुरुषसत्ताक पद्धतीकडील वाटचाल करणारे-पाळणारे होत एवढे मात्र नि:श्चयाने म्हणता येते.
पांडुच्या वनवासामुळे त्याचा संपर्क स्त्रीसत्ताक पधतींशी येवुन पांडव हे नकळत त्या व्यवस्थेशी परिचित झाले व ती प्रथा त्यांनी कायम केली असेही विधान करता येणे सहज शक्य आहे. कुंतीने विवाहापुर्वीच संतती प्रसवली होती या घटनेकडेही दुर्लक्ष करता येत नाही, परंतु त्याकडे आपण तारुण्यातील प्रमाद या द्रुष्टीने पाहु शकतो.
येथे चर्चेचा मुद्दा हा आहे कि बहुपतीकत्व/नियोग ही प्रथा पांडवांनी कायम ठेवलेली दिसते.
तर त्याउलट कौरव मात्र पुरुषप्रधान संस्क्रुतीचे प्रतिनिधी दिसतात.
हा सांस्क्रुतीक बदल घडण्याच्या काळात भारत घडले असावे.

रामायण मात्र जेंव्हा बहुपत्नीकत्व रुढ झाले होते, म्हनजेच पुरुषसत्ताकत्व प्रचलित झाले होते त्या काळात घडलेले दिसते.
रामायनातील (सध्याच्या उपलब्ध असलेल्या) प्रतींतील बालकांड व उत्तरकांड प्रक्षिप्त आहेत हे आता असंख्य पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. मुळातील हे एक वीरकाव्य फक्त राम-रावण युद्धाचे वर्णन करणारे होते. नंतर त्यातही भर पडत आजचे रामायण बनलेले आहे. असे असले तरी त्यातील सामाजिक अवस्था काय होती याकडे मी आपले लक्ष वेधु इच्छितो. ती अशी:
१. रामायणात पुरुषसत्ताक पद्धती स्थिर झालेली दिसते, तरीही स्त्रीसत्ताकतेचे अत्यंत अवशिष्ट असे रुपही आपण कैकयी प्रकरणात पाहु शकतो.
२. स्त्रीयांना दुय्यम स्वरुप मिळाल्याचे रामायनात दिसते. उदा. रामाला वनवासात जातांना सीतेला सोबत नेण्याची इच्छआ नव्हती. उलट तिने भरताच्या आद्न्येखाली रहात अन्य धाकट्या भावांशी तिने भ्रात्रुभाव ठेवावा अशीच रामाची इच्छा दिसते. एवढेच नव्हे तर रावणावर विजय मिळवल्यानंतर "मी रावणाला जिंकले ते मआझ्यावरील कलंक मिटविण्यासाठी...तु वर्षभर रावणासोबत राहिली आहेस...आता तु कोनाचीही संगिनी...शत्रुघ्न-ते भरताची, अगदी बिभिषणाचीही... स्वेच्छेने होवु शकतेस..." अशा अर्थाचे उद्गार रामाने काढलेले आहेत. पहिली अग्निपरिक्षा सीतेला तेथेच द्यावी लागली हे सर्वविदित तर आहेच...पण पुन्हा तिला तशीच अग्निपरिक्षा अयोध्येला गेल्यानंतर द्यावी लागलेली आहे.
३. यातील प्रक्षेप लक्षात घेवुनही एक बाब महत्वाची आहे ती ही कि येथे सर्वस्वी पुरुषप्रधान संस्क्रुतीचे वर्चस्व दिसते. स्त्रीमहत्ता ही धार्मिक द्रुष्ट्या "पती-परायण स्त्री" एवढ्यापुरती सीमित झालेली दिसते. एवढेच नव्हे तर शुर्पनखेचे जे उपहासात्मक रुप रामायणात येते...तेही पुरुषवर्चस्ववादी भुमिकेचे एक रुपक आहे. स्त्रीयांना हवा तो जोडीदार निवडन्याचा एक स्त्रीसत्तअक पद्धतीचा हक्क होता तो शुर्पनखा प्रकरणात नाकारला गेलेला स्पष्ट दिसतो. तिचे नाक कापने, उपहास करने हे स्त्री-शक्ती अवमानाचे उदाहरण रामायणात दिसते... याच उलट महाभारतात हिडिंबेने करार पद्धतीने का होईना, भीमासंदर्भात आपल्या स्त्रीसत्ताकतेची महत्ता जाग्रुत ठेवलेली दिसते आणि पांडवांचा त्याला आक्षेप नव्हता हे आपण मुळ महाभारतात पाहु शकतो.
यात अजुन उदाहरनांची भर घालता येईल. महाभारत हे स्त्रीसत्ताक (पांडव) विरुद्ध पुरुषसत्ताक (कौरव) पद्धतींतील द्वंद्व असेल तर रामायण हे केवळ पुरुषसत्त्ताक पद्धतीचे समर्थन आहे असे म्हणावे लागते. रामायनातील उत्तरकांड प्रक्षिप्त आहे तसेच बालकांडही...या विद्वत्मताशी मी सहमत आहेच. परंतु रामायण हे पुरुषसत्ताक पद्दह्तीचे समर्थन करते हे मत नाकारता येत नाही. याउलट महाभारतात स्त्रीसत्ताक विरुद्ध पुरुषसत्ताक या सामाजिक संघर्षाची स्पष्ट उदाहरणे अधिक असल्याने आधी महाभारत (मग ते काल्पनिक काव्य का असेना..) मग रामायण (काल्पनिक का असेना..) घडले आहे, वा लिहिले गेलेले आहे असे मला वाटते.


21 comments:

 1. सरजी मस्त माहिती आहे.

  ReplyDelete
 2. तुम्ही कुन्तीसाठी जो शब्द वापरला प्रमाद हा योग्य नाही अजिबात योग्य नाही. तुमच्याच लेखाप्रमाणे समाजाच्या चालीरीती बदलत असतात. त्या काळी लग्न आधी मुलगा असणे किवा होणे हि गोष्ट विशेष नवती. सामान्य जनतेत तर हि चालच होती. आणि लग्नाच्या वेळी विवाह आधीचा मुलगा नवरी सोबत मंडपात उभा राही आणि नवरदेव त्याचा स्वीकार करी. कारणाचा जन्म हा दुर्वास रुशीपासून झाला. पण ते मुल लपवले गेले त्याला कारण कुंतीच्या वडिलांना आपली मुलगी कुरुकुलात द्यायची होती आणि त्यांना हे पसंद पडेल कि नाही याची शंका होती. जेवा पडू राजा हा शान्धात्वावर इलाज करण्यासाठी हिमालयात गेला त्यावेल कुंतीने हि गोष्ट पांडुराजाला सांगितली होती आणि आपण त्याचा स्वीकार करावा अशी विनंती पण केली होती. पण लग्न वेळी त्याचा स्वीकार न केल्यामुळे आता ते आर्य धर्माला धरून होणार नाही याकरण पांडूने नाकारली होती. तेवाचा देवलोक म्हणजे हिमालयाच्या वरच्या भागात राहणारे लोक ज्यांचा राजा इंद्र होता. हे एक पद होते. एक इंद्रापासून अर्जुन झाला, मारुतापासून भीम, आणि असेच नकुल सहदेव हे पंदुवर इलाज करणाऱ्या देव्वैद्यापासून. आपण ज्याला व्यभिचार म्हणतोतो त्यावेळी सामान्य होता....राजे लोकांना दासीपासून किती तरी उत्पत्य होत होत्या. राम हा एकपत्नी होता हे तुम्हाला मान्य आहे. का? रामाला अनेक बायका आणि दासी होत्या तो दारू पीत होता म्हणजे स्त्री आणि दारू हेच त्याचे आयुष्य झाले होते रावण वाढ नंतर असे मी बाबासाहेबांच्या साहित्यात वाचलेले स्मरते.

  ReplyDelete
 3. विकासजी, लेखाचा विषय आधी कोनते काव्य लिहिले गेले असावे हा आहे, त्यातील कथानकांची चिकित्सा करने हा नाही. उत्तरकांड हे मुळात प्रक्षिप्त आहे असे विधान मी केल्यानंतर रामाला किती बायका होत्या याचे उल्लेख करण्याची गरज नाही. महाभारतात स्त्रीसत्ताकतेला महत्व अधिक आहे कि नाही याची चर्चा मह्तवाची असल्याने तेवढेच संदर्भ घेतले आहेत. कुंतीने केले तो नियोग होता कि त्याला तारुण्यातील प्रमाद म्हना असे मी विधान केले आहे, कुंतीवअर्चा तो आरोप नाही...आणि स्त्रीसत्ताक पद्धतीत मुळात स्त्री स्वातंत्र्य हे अधिक असल्याने त्याला व्यभिचार म्हणायचा प्रश्नच कोठे आला?

  ReplyDelete
  Replies
  1. सर नुसते स्त्रीसात्तक आणि पुरुश्सत्ताक या दोन गोष्टींच्या आधारे आपण रामायण आधी कि महाभारत आधी याचे प्रमाण मांडले पण रामायणातील आननी महाभारतातील वस्तुनिष्ट पुरावे कोणते किती जुने आहे ते त्या सापडलेल्या शिलांवरून जास्त योग्य रित्या सांगता येयील असे मला वाटते .

   Delete
 4. सर मला वाटते रामायण अगोदरचे कि महाभारत अगोदरचे या चार्चेपेक्ष्य आम्हाला तुमच्याकडून खरेच महाभारत आणि रामायण घडले का? घडले तर ते कसे असावे. चमत्कार वगैरे गोष्टी सोडून ते आपल्या पुर्वाज्यांचा इतिहास म्हणून आपण पाहायचा म्हटले तर कसे असेल...त्यात किती आणि काय बदल झाले असतील.....हे वाचायला आवडेल. जर ते खारेश घडले असेल तर कसे असावे याचे चित्रण करण्याचा प्रयत्न एस एल भैरप्पा यांनी खूप चं केला आहे. त्यांच्या पर्व मध्ये माणसाचे महाभारत आहे असे वाटते देवांचे नाही.

  ReplyDelete
 5. प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ सांगितला तर बरे होईल

  ReplyDelete
 6. @ Vikas jee, "प्रक्षिप्त" म्हणजे जो भाग मुळ ग्रंथाचा नाही, नंतर कोणीतरी दुस-यानेच लिहुन घुसवला तो भाग. रामायणातील बालकांड व उत्तरकांड पुरेपुर प्रक्षिप्त आहे त्यामुळे ते भाग रामाचे व्यक्तिमत्व ठरवण्यासाठे कसलीही मदत करत नाही. महाभारतातील (रामायणातीलही) चमत्कार वगळुन मुळ कथा शोधता येते. त्यासाठी विसंगत कथा, अप्रस्तुत वा कोणाचे तरी माहात्म्य वाढवण्यासाठीचे श्लोक वगळुन मुळ गाभा शोधावा लागतो. पर्व या कादंबरीत देवतांचे मानवीकरण करत चमत्कारविरहित कादंबरी लिहितांना नवीन स्पष्टीकरणे दिली गेली आहेत, त्यांची खरे तर आवश्यकता नाही...ते संदर्भ सरळ वगळणे हेच श्रेयस्कर आहे.

  ReplyDelete
 7. रामायणाच्या भारतीय युद्धामध्ये बृह्दबल नावाचा प्रभू रामचंद्रांचा ३५ वा वंशज हा मृत्यू पावला असा उल्लेख आहे .
  यावर संशोधन झाले आहे व त्या संशोधनानुसारच रामायणाचा कालखंड ठरवला जातो .
  यानुसार रामायण हे आधी घडले हे सत्य होते ..

  ReplyDelete
 8. सर मग बाबासाहेब आंबेडकरांनी जी रामाची चिकित्सा केली आहे ती उत्तर कंद आणि बाल कांड यातील श्लोकावरच आधारित आहे. (म्हणजे संपूर्ण नसली तरी बर्यापैकी ) मग ती चुकीच्या (नंतर घुसविलेल्या श्लोकावर) गृहितकावर केलेली चिकित्सा समाजासमोर निर्माण केलेले रामाचे रूप हे चुकीचे का? माफ करा म्हणजे बर्याच जनाचे बरेच साहित्य वाचून खरे काय आहे हे समजण्यायेवढा ज्ञानी झालो नाही म्हणून तुम्हाला विचारात आहे. म्हणजे डोक्यात सगळा घोळ झाला आहे म्हणा हवे तर

  ReplyDelete
 9. उदयजी, आपल्याला सध्या जे रामायण व महाभारत उपलब्ध आहे त्याची शेवटची संस्करने इस च्या दुस-या ते चवथ्या शतकात झाली आहेत. सध्याच्या महाभारतात बौधांचाही उल्लेख आहे म्हणुन आपण बुद्धानंतर महाभारत घडले असे मानत नाही. महाभारतात रामकथाही व-यापैकी सविस्तर येते हे मी लेखात नोंदले आहेच. अनेक शतके या कथा परस्पर सान्निद्ध्यात वाढलेल्या आहेत. महाभारत मात्र सर्वसमावेशक होण्याच्या द्रुष्टीने विकसीत केले गेल्याने त्यात शेकडो आख्याने-उपाख्याने घालण्यात आली आहेत कारण त्याला "इतिहास वेद" बनवणे हा हेतु होता. रामायण मात्र हे निखळ काव्य असल्याने त्यात जी भर पडली (विशेशता: बालकांड व उत्तरकांड) ही काव्यविकास, नैतीक व धार्मिक संकल्पना, ज्या नंतर कधीतरी विकसीत झाल्या त्याला रामचरित्राचा आधार द्यावा म्हणुन...(उदा. शंबुकाची हत्या). त्यासाठी मी सामाजिक स्थितीचा आधार हे पौर्वापौर्य ठरवण्यासाठी घेतला आहे. दुसरे असे कि रामायण खरोखर घडले असल्याचा एकही पुरावा नाही. ते एक नीतिकाव्य व वीरकाव्य आहे आणि त्यातील सजीवस्रुष्टीलाही कल्पनेचे फुलोरे जोडलेले आहेत. हे काव्य लिहिणा-याला भारताचा भुगोल माहित नव्हता हे स्पष्ट आहे त्यामुळे रामायणातील लंका म्हणजे सध्याची श्रीलंका हे मत आता मान्य होत नाही. हे काव्य इतिहासस्वरुप असते तर मात्र असे घडले नसते. उलट महाभारतातील नुसता भुगोलच नव्हे तर हस्तिनापुरादि शहरांचे अवशेष प्रप्त झालेले आहेत. यावर मी नंतर वेगळे लिहिलच, परंतु, महाभारत काळ हा आधीचा आहे असे म्हनता येण्याच्या पक्षात अधिक पुरावे आहेत.

  ReplyDelete
  Replies
  1. सर मग रामसेतू ,पंचवटीतील पुरावे अयोध्येतील रामाचे अव्शेस असे सगळे ठिकाणे जेथून रामाने प्रवास केला आहे त्यांची आणि इतिहासाची सांगड लिहिणार्यांनी कशी घातली असेल

   Delete
 10. विकासजी, बाबासाहेब प्रकांड विद्वान होते आणि त्यांच्या द्न्यानाची सर कोणाला येणार नाही. परंतु प्रत्येक विद्वान हा आपल्या काळाच्या परिप्रेक्षात उपलब्ध असणा-या पुराव्यांच्या संदर्भात आपले विचार/संशोधन मांडत असतो. उदा. जोवर सिंधु संस्क्रुतीचे अवशेषच सापडले नव्हते तोवर आर्य श्रेष्ठता सिद्धांत सर्वांनीच ग्राह्य धरला होता...पण या संस्क्रुतीचे अवशेष सापडल्यावर मात्र सर्व्च जुन्या समजुती सोडुन इतिहासाची पुनर्रचना करावी लागली हे येथे विसरता येत नाही. बालकांड आणि उत्तरकांडाबद्दल नेमके असेच झाले आहे.

  ReplyDelete
 11. एक प्रश्न आला माझ्या मनामध्ये - कि सध्याच्या संशोधनानुसार भारतापासून श्रीलंकेपर्यंत रामायणकाळात बांधलेल्या पुलाचे अवशेष सापडले आहेत. आणि अजूनही त्यावर बरेच संशोधन होत आहे. तसेच बुडालेल्या द्वारकेचेही अवशेष सापडले आहेत. मग हि काव्ये कल्पनेवर आधारित आहेत असे आपण म्हणून शकतो का?
  (मी अगदीच नवीन आहे, माझे द्यानही खूप तोकडे आहे असे म्हणाले तरीही चालेल. पण जिथे जिथे कृष्णाशी संबंधित काही आढळते तिथे मला राहवत नाही माझ्या शंका विचारल्याशिवाय. म्हणून आपला प्रश्न. )
  बाकी तुम्ही कृष्णावर वाचकाची इच्छा म्हणून काहीतरी लिहा, खूपच सखोल लिहिता तुम्ही आणि संदर्भ दिल्यामुळे वाचताना खरच आनंद मिळतो.

  ReplyDelete
 12. मी रामायण हे काल्पनिक असुन महाभारत मात्र काल्पनिक नाही असेच म्हटले आहे. द्वारकेचे अवशेष तसेच हस्तिनापुरचे अवशेषही हेच सिद्ध करतात. एव्ढेच नव्हे तर जी तीर्थक्षेत्रे महाभारतात वर्णीली आहेत ती बव्हंशी वर्णीली आहेत तेथेच आजही आहेत. रामायणाचे मात्र तसे नाही. आज उपग्रह चित्रांतुन जो रामसेतु म्हणुन खडकांची माळ समुद्रतळी दिसते ती नैसर्गिक असल्याचे सिद्ध झाले आहे. रामायणातील रामाचा प्रवास जो दाखवला गेला आहे त्यानुसार लंका अयोध्येपासुन जास्तीत जास्त ४१९ किमि. एवधीच दुर असु शकते. सरदार किबे यांनी याबाब्त सखोल संशोधन करुन रामायणातील लंका ही छोटा नागपुर वा अमरकंटकच्या आसपास असली पाहिजे असे निष्कर्ष काढले आहेत आणि ते पटण्यासारखे आहेत. श्रीक्रुष्णावर मी नंतर अवश्य सविस्तर लिहिल.

  ReplyDelete
 13. रावणाची लंका हि सध्याची श्रीलंका नसून दक्षिण भारतातील एखादे ठिकाण असावे हेच मत वस्तुनिष्ठ वाटते. दंडकारण्याचा भाग हा रावणाच्या अधिपत्याखाली येत होता.

  ReplyDelete
 14. प्रकाश : रावणाची लंका खरेच होती का? रामायण भारतातच घडले का? किंवा हि जी कथा आहे (समजू कि फक्त साहित्य कृती आहे) ती साहित्य कृती तरी मुळची भारतीय आहे का या विषयवार वाद आहेत. लेखकाचे नाव आठवत नाही पण त्यांच्या मतानुसार रामायण हे कुठे तरी इराण किवा तत्सम प्रदेश्यात घडले. रामायणातील दाखले आणि प्रदेश्यातील अंतरे तिथे चपखल बसतात. भारतात नाही. मग त्या लहान गोष्टीवर आधारित वाल्मिकींनी महान साहित्यकृती निर्माण केली ज्याला आपण रामायण म्हणतो. जसे शेक्स्पेआर्च्या सगळ्या साहित्य कृती ह्या ग्रीक किवा तिथल्या स्थानिक लोक कथावर आधारित आहेत तसे. एखादे पुस्तक वाचले कि ते खरेच मानतो असे नाही पण ते पूरब=व्यानिशी मांडलेली गोष्ट पण विचार कार्याला लावणारी होती.

  ReplyDelete
 15. डॉ .भावे यांनी मेघदूताचा अभ्यास करून त्यात वर्णन केलेला मेघाचा प्रवास आणि त्या मेघाच्या वाटेवरच्या शहरांची वर्णने याचा अभ्यास केला आणि त्यांना फार आश्चर्य वाटले की कालिदासाने मेघदूतात या शहरांचे जे विहंगम वर्णन केले आहे ते कशा प्रकारच्या अनुभूतीवरून केले असेल ? कारण त्या काळात विमाने नव्हती !
  पण यावरून त्या काळात विमाने होती असा दावा करणे जसे अव्यवहार्य ठरेल तसेच केवळ महाभारतात किंवा रामायणात शरयू नदी किंवा नाशिकचा उल्लेख , गांधार देश किंवा इंद्रप्रस्थाचे वर्णन आले आहे म्हणून त्या रचना ऐतिहासिक ठरवणे चुकीचे आहे.
  मी समजा एक फिक्शन लिहिले आणि त्यात शिकागो,मुंबई - इस्तंबूल ची वर्णने दिली तरी माझ्या कथेतील पात्रे ही कल्पितच राहतात.
  नद्या ,पर्वत किंवा समुद्र यांची कादंबरीतील वर्णने त्या कादंबरीला इतिहासाचा दर्जा देऊ शकत नाहीत याचे भान असावे.
  श्रद्धा हा विषय इतिहासापासून वेगळा ठेवलेला बरा.

  ReplyDelete
 16. रामायण हे काल्पनिक मग परशुराम तेवढा वास्तविक कसा? त्याचे तरी पुरावे कुठे आहेत? त्याचा वंश शोधण्यापर्यंत तुमची मजल जाते. मग रामायणानेच काय पाप केले आहे? रामाचा रघुवंश देखील तितकाच सत्य आहे.

  ReplyDelete
 17. रामायण इतिहास आहे काय? किंवा ते काल्पनिक आहे काय? हे समजून घ्यायचे असेल तर......

  रामायणावर नवा प्रकाश - भास्करराव जाधव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, या

  ग्रंथात लिहिलेली माहिती सर्वानीच मुळातून वाचायला हवी.

  -अनघा.

  ReplyDelete
 18. chan mahiti ahe sonavni saheb!

  ReplyDelete