Thursday, September 1, 2011

मी वेडा आहे ही मीच बनवली रीत

तु होतीस कोठे तेंव्हा
तुज उजेड शोधत होता?
रात्रीच्या घनगर्भात जेंव्हा
आक्रोश उसळत होता?

त्या वादळरात्री मी एकाकी
अडखळलो तव रुदनाला
तुही होती तेंव्हा एकाकी
कवटाळीत एकांताला...

मी स्तब्ध तुला पाहुन...
शब्द गेले नि:शब्दी वाहुन...
अन...अश्रु तुज-मज नेत्रांतुन...

----------------
अश्रुंमधुनी मी वाहुन आलो
ओंजळीत तुझ्या गे सखये
त्या अश्रुंत निरख तव रूप प्रिये
हसतांना दिसेल मम रूप नवे...!

तु आणि मी हा अजब सोहळा
ते नयन नवे ते गगन नवे
ते अश्रु नवे ते हास्य नवे
तव रुप नवे मम रुप नवे...

अद्वैताचे प्रतिक्षण नवे!
-------------------------------

स्वप्नात नाचते न्रुत्य
न्रुत्याला बहर फुलांचा
आकाश फुलांनी भरले
घेवुन गंध मत्त धरतीचा!

ती रात्र कोवळी ऐशी
घालुन झगा प्रकाशाचा
नाचते बघा ती अविरत
डंका पिटत त्या ईशाचा!



-------------------------

मला न पाहिजे असले जगुणी मरणे
श्वास संपता उगा जीव सोडुनी जाणे
मी धरुन ठेवील श्वास माझ्या ह्रुदयात
थांबवील त्याचे येणे आणिक जाणे...!

राहील चिरंतन श्वासात जसा कि योगी
जो जीवनाचा अन म्रुत्युचाही चिरंतन भोगी!
----------------------


मी होतो कोठे जेंव्हा आकाश उजळले होते
कालांधारी जेंव्हा माझे आस्तित्व वितळले होते?
जगण्यामधला म्रुत्यु मी पीत नशेला अनावर
म्रुत्यु तर उपभोगिला मी...तेंव्हा जीवन कोठे होते?

--------------------

मी वेडा आहे ही मीच बनवली रीत
वादळांना देत निमंत्रण दिनरात
येवुन कोसळली किती वादळे येथे
वादळांना समजले व्यर्थ तयांचा क्रोध....

वादळे वागवी मी माझ्या ह्रुदयाशी...
जसा बाप लेका देतो आपुली प्रीत....!

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...