Wednesday, February 29, 2012

ओबीसींनो "शुद्र" शब्दाचा अर्थ माहित आहे काय? (लेख ७)

गेली काही हजार वर्ष ओबीसी (निर्माणकर्ते) "शुद्र" म्हणुन संबोधले जातात. हीणवले जातात. परंतू आजतागायत शुद्र शब्दाची व्युत्पत्ती मात्र शोधण्याचा आपण प्रयत्न केला काय? शुद्र म्हणजे नेमके काय? शुद्र शब्द संस्क्रुतात आला कोठुन आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु पाणिनी ते सर्वच सम्स्क्रुते व्याकरनकारांनी नेमक्या याच शब्दाची नेमकी व्युत्पत्ती आणि अर्थ दिलेला नाही. या शब्दाचे मुळ (Root) काय? हा शब्द कसा बनला आणि त्याचा नेमका अर्थ काय, याबाबत ते मौन पाळुन आहेत. का बरे?
आपण उच्चवर्णीयांबाबत मात्र त्यांच्या वर्णाची मुळे व अर्थ दिलेला आहे हे सरळ पाहु शकतो. उदा: ब्राह्मण: या शब्दाच्या कालौघात दोन व्युत्पत्त्या बनलेल्या आहेत वा दिलेल्या आहेत.
ऋग्वैदिक अर्थाप्रमाणे "जो मंत्र (ब्रह्म या शब्दाचा वैदिक अर्थ मंत्र असा होतो.) रचतो तो ब्राह्मण.
औपनिषदिक अर्थाने जो विश्वाचे मुळकारण (येथे ब्रह्म म्हणजे विश्वोत्पत्तीचा कारक) जाणतो तो ब्राह्मण.
क्षत्रियांबाबत खालील उपपत्त्या आहेत.
१. "क्षत्र" म्हणजे राज्यकर्ता वा लढवैय्या. जो ही कर्मे करतो तो क्षत्रीय.
२. "क्षत्र" हा शब्द "क्षत"...या मुळापासुन बनला असू शकतो. क्षत म्हणजे क्षती पोहोचवणारा, हत्या करनारा रक्षण करणारा यातुन क्षत्रीय हा शब्द विकसीत झालेला असु शकतो.
वैश्यांबाबत खालील उपपत्त्या देता येतात:
१. ऋग्वैदिक अर्थाने "विश" म्हणजे ग्राम. ग्रामांत राहणारे ते सारे वैश्य.
२. मनुस्म्रुतीनुसार शेती/पशुपालन करणारे, वस्तुंचे निर्माते व व्यापार करणारे ते वैश्य. येथे "विश" हा शब्द "व्रुद्धी करनारे ते विश" या अर्थाने येतो.
मेगास्थेनीसने लिहुन ठेवले आहे कि भारतात त्याकाळी वैश्य वर्णीयांची संख्या सर्वाधिक होती. वैश्यांना उपनयनाचीही अनुमती होती. हे मी येथे नोंदवुन अशासाठी ठेवतो आहे कि वस्तु उत्पादक, शेतकरी, पशुपालक, व्यापारी हे सारेच एकेकाळी वैश्य मानले जात होते. नंतर व्यापारी वगळता सारेच शुद्र मानले जावू लागले हेही एक ऐतिहासिक वास्तव आहे.
आता आपण शुद्रांकडे वळुयात. हा एकमेव शब्द असा आहे कि याचे मुळ/कुळ व मुलार्थ माहित होत नाही व ह शब्द मुळात सम्स्क्रुतातही नाही, असता तर त्याचे मुळ व अर्थ नक्कीच सांगता आला असता. याचाच दुसरा अर्थ असा कि शुद्र हा शब्द प्राक्रुतातुन आलेला आहे व तो तसाच्या तसा वापरला गेला आहे.
क्षुद्र या शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असे काही तद्न्यांचे मत आहे पण ते मत कधीच फेटाळुन लावले गेलेले आहे. मुळात संस्क्रुतात क्षुद्र हा शब्द होताच, तर मग तो तसाच्या तसा राहण्यात अडचण नव्हती.
तरीही आधुनिक भाषातद्न्यांनी शुद्र शब्दाचे मुळ शोधण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा आपण आधी आढावा घेवुयात.
१. "सुत्र" या शब्दापासुन शुद्र हा शब्द निर्माण झाला असे एक मत आहे. "सुत्र" म्हणजे धागा. "ज्यांना धाग्याने बांधुन ठेवले आहे (Bonded) ते शुद्र अशी एक व्युपपत्ती आहे.
२. "शुच" (म्हणजे पवित्र करणे) व मुळ "चा" (म्हणजे बदलवणे) "दा" झाला, म्हनजे या शुचिदा पासुन शुद्र हा शब्द बनला असावा असा छादोग्य उपनिषदाचा हवाला देत हे मत मांडले गेले आहे. :" पवित्र करुन घेत बदलवले गेले ते शुद्र" अशी ही एक व्युत्पत्ती आहे.
३. मुळ इराणी शब्द "सुद्रेह" या शब्दापासुन शुद्र शब्द आला असावा असेही एक मत आहे. पण या भाषेत सुद्रेह हा पुजारी/पुरोहितासाठी वापरला गेल्याचे दिसते.
४. शुभा...म्हणजे वेदना...वेदना देनारा तो शुद्र अशीही एक व्युत्पत्ती आहे.
५. ऋग्वेदातील "जुद्रा" या (ऋ. १०.९०) शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असेही एक मत आहे. जुद्रा या शब्दाचा अर्थ चवथा असा होतो. परंतु हा शब्द काही ठिकाणी राजांसाठीही वापरलेला आहे असे दिसते.
६. शुद्र हा शब्द द्राविडीयन वा मध्य अशियातील काही भाषांमधुनही आलेला असु शकतो, पण त्या भाषा आज म्रुत असल्याने निश्चित असे मत देता येत नाही अशी हारही भाषातद्न्यांनी मानलेली आहे.
आता वरील तशी एकही व्याख्या "शुद्र" या शब्दाची समर्पक अशी व्युत्पत्ती देत नाही हे लक्षात आले असेलच. संस्क्रुत भाषेत या शब्दाला काहीएक अर्थ नाही हेही आपण पाहिलेच आहे. मग ज्या शब्दाला काही अर्थच नाही तो शब्द एका विशाल समाजाला चिकटवत त्याची धार्मिक, आर्थिक व सामाजिक घोर फसवणुक कशी व का केली गेली असेल हेही पाहणे क्रमप्राप्त आहे.
त्याहुन महत्वाचे म्हनजे व्यापार वगळता क्रुषिकर्म, पशुपालन, उत्पादन, कलादि क्षेत्रातील लोकांना मुळात वैश्यच मानले जात होते. हिंदु धर्म हा मुळात त्रैवर्णिकच आहे अशीच पुराणांचीही बव्हंशी समजुत आहे. ऋग्वेदातील पुरुषसुक्त व त्यातील चातुर्वर्ण्य निर्मान झाल्याची माहिती देणा-या त्या दोन ऋचा कशा बनावट व नंतर कोणीतरी घुसवुन दिलेल्या आहेत याबाबत मी आधी माहिती दिलेलीच आहे. त्यामुळे व शुद्र शब्दाची व्युत्पत्तीच मुळात उपलब्ध नसल्याने येथे वेगळेच चिंतन करणे भाग आहे.
-------------२---------------
पहिली बाब येथे मी स्पष्ट करतो ती ही कि भारतात सर्वात बलाढ्य अशी असुर संस्क्रुती होती. या संस्क्रुतीने सिंधु समाज घडवला. असुर हे मुलता: शैव होते. वैदिक जनही मुळचे याच संस्क्रुतीचे म्हणुन ऋग्वेद रचनेच्या आरंभ कालात ते आपापल्या दैवतांना "असुर वरुण, असुर इंद्र, असुर अग्नि" असे सन्मानाने संबोधत असत. परंतु या मंडळीने शैव सिद्धांत नाकारत नवीन धर्म स्थापन केला. तो यद्न्याच्या माध्यमातुन अमुर्त देवतांना हवि देण्याचा धर्म होता. वर्णव्यवस्था ऋग्वेदाने मांडलेली नाही...पुरुषसुक्त मात्र अपवाद आहे व वर्णव्यवस्थेला पावित्र्य देण्यासाठी तो उद्योग मनुस्म्रुतीच्या काळानंतर केलेला आहे हे मी वारंवार स्पष्ट केलेले आहे. उर्वरीत ऋग्वेदात ब्राह्मण, क्षत्र, विश एवढेच शब्द येतात व ते वर्ण म्हणुन नव्हे हेही येथे लक्षात घ्यायला हवे. हा धर्म/संस्क्रुती फक्त सरस्वती नदीच्या काठावरच्या मर्यादित प्रदेशात निर्माण झाली. उर्वरीत भारत मात्र असुर संस्क्रुतीने व्यापलेला होता.
आजही आपण तीच संस्क्रुती जपत आहोत व म्हणुनच हा सर्वच शैव प्रदेश भाषा व प्रादेशिक संस्क्रुत्या वेगळ्या असुनही अभंग राहिला. यद्न्य संस्क्रुती विशिष्ट समाज वगळता कोणीही जपली नाही. ऋग्वेदाने जे केले नाही ते मात्र नंतर झाले. म्हनजे तीन वर्णीय वाटणारे...पण तसे नसनारे शब्द मात्र वर्णांना लागु केले गेले. परंतु मग तीनच वर्ण होते...
येथे लक्षात घ्यायला हवे ते हे कि वैदिक धर्म न पाळणारे, असुर संस्क्रुतीचे लोक हेच बहुसंख्य होते. त्यांचे विराट सम्राट होते, शासक होते. त्यामुळे वेदबाह्य, वैदिक संस्क्रुती न पाळणा-या लोकांना काहीतरी संबोधणे आवश्यकच होते आणि ते त्यांनी केले. ते स्वाभाविक असेच होते.
आता जी संस्क्रुती आपल्यापेक्षा वेगळी, वेगळ्या धर्मतत्वांवर चालते आणि अवाढव्य आहे अशा संस्क्रुतीतील लोकांकडे हीनत्वाने पाहणे व त्यांची यथास्थित निंदा करणे स्वाभाविक होते. हे आपण जागतीक धर्मेतिहासात स्पष्टपणे पाहु शकतो. मग या असुरांना (याच संस्क्रुतीतुन पुढे वैदिक धर्माचे मारेकरी असे जैन व बौद्ध धर्मही निर्माण झाले.) ते कसे व काय उल्लेखत असतील?
शुद्र या शब्दाची व्युत्पत्ती यातच सामावलेली आहे असे माझे स्पष्ट मत आहे....ते असे...
शुद्र हा शब्द मुळात कोणत्याही व्यवसायाशी निगडीत नाही. असता तर असंख्य शुद्र राजे झाले नसते.
शेतकरी, उत्पादक, पशुपालक, जो वैदिक व्यवस्थेत, त्यांच्या समधर्मी समाजात वैश्य होता त्याला शुद्र म्हटले गेले नसते. ही त्यांच्याच धर्मातील विसंगती ठरली असती.
असुर संस्क्रुतीतील राजे, व्यापारी, उत्पादक, शेतकरी ते चाकरदार वर्ग हे त्यांच्या द्रुष्टीने परकेच असल्याने त्यांच्याबाबत ते हीनतापुर्वक शब्द वापरणार हे उघड आहे. एका धर्माचा माणुस अन्य धर्मियांबद्दल शेवटी कितपत मानवतावादी द्रुष्टीकोन वापरतो?
असुर संस्क्रुतीची भाषा ही पुरातन काळापासुन प्राक्रुत आहे. ऋग्वेद या भाषिकांना "मुघ्रवाच" (अनुनासिक व विसंगत भाषा बोलनारे असे संबोधतो.) असुर हा शब्द सम्स्क्रुताने स्वीकारला तो जसाच्या तसा कि बदल करुन?
संस्क्रुतने ऋग्वेदातील "पवमान" सारखे शब्द प्राक्रुतातुन जसेच्या तसे उचलले आहेत, पण बव्हंशी शब्दांवर संस्क्रुत कलमे केलेली आहेत. पवमान म्हणजे आजच्या (पाणिनीच्या) संस्क्रुतात "प्रवाहमान." पवमान शब्द मात्र मुळचा प्राक्रुत आहे. सम्स्क्रुत हीच मुळात प्राक्रुताचे संस्कारित रुप असल्याने व ऋग्वेद हा पाणिनीपुर्व असल्याने त्यात प्राक्रुत शब्दांची रेलचेल आहे, एवढेच येथे लक्षात घ्या.
संस्क्रुताने असुर हा शब्द पुढे बदलुन घेतला. असुर हा शब्द त्यांनी असुरांना बदनाम करण्यासाठी अवाढव्य कथांची पौराणिक रेलचेल करत बदनाम केला, पण क्रुष्ण हा आईच्या बाजुने असुर तर होताच पण त्याचा नातवाने, अनिरुद्धाने बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, विवाह तर केलाच पण त्याचसोबत अनेक यादवांनी असुर कन्यांशी विवाह केले. अर्जुनाने नागकन्या उलुपीशी तर जरत्कारुने नागकन्या जरत्कारुशीच विवाह केला. भिमाने हिडिंबेशी कंत्राटी विवाह केला.
आता हे वर्णाभिमानी वैदिकांना सहन कसे होणार? त्यामुळेच कि काय वर्णसंकराची व्यथा वारंवार नुसत्या महाभारतात नव्हे तर खुद्द गीतेतही येते. वर्णसंकरामुळे कुलक्षय कसा होतो म्हणुन तो कसा टाळावा याबाबत विवेचने असुर क्रुष्णाच्याच तोंडी टाकुन या महाभागांनी आपला कार्यभाग साधला.
हे विषय बदलाचे साधन नाही. शुद्र शब्द कसा आणि कसा निर्माण केला गेला याबाबतचेच हे विवेचन आहे.
शुद्र शब्दाची कसलीही व्युत्पत्ती संस्क्रुत व्याकरणकार देत नाहीत हे आपण पाहिलेच आहे. मग हा शब्द आला तरी कोठुन?
व्याकरणाने पहायला जवे तर शुद्र शब्दाची फोड अशी होते...
"शुद,,," या शब्दाला लागलेली विभक्ती म्हणजे "द्र".
शुद या मुळापासुन शुद्ध हा शब्द बनला असु शकेल, पण ते संस्क्रुतात. सर्वच भाषा काही संस्क्रुताचे मुळ भषिक रुप पाळत नाहीत. त्यामुळे हेच मुळ प्राक्रुतातच पहावे लागते कारण तीच मुळची भाषा आहे. पण समजा ही व्युत्पत्ती ग्रुहित धरली तर त्याचा अर्थ असा होईल कि जे मुळचे शुद्धच होते ते म्हणजे शुद्र. पण वैदिकजन एवढे क्रुपाळु वा उदार नव्हते हेही येथे लक्षात घ्यायला हवे. असुर हे नेहमीच त्यांचे शत्रु होते.
त्यामुळे माझ्या मते, असुर...द्र (असुरद्र), म्हणजे जे असुर संस्क्रुतीचे ते. परकीय संस्क्रुतीचे ते. पुढे याच वैदिक संस्क्रुतीने "सुर" हा शब्द शोधुन काढला जो संस्क्रुतात मुळीच अर्थवाही नाही असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. याचाच एक अर्थ असा कि असुर शब्दाला विरोधी म्हणुन सुर हा शब्द निर्माण केला गेला. असे जर असेल तर आणि अशा भाषिक कोलांट-उड्या वैदिक धर्मियांनी मारल्या आहेतच तर...त्यांनी असुरातील अ काढुन टाकला आणि सुरद्रला शुद्र करुन टाकले असे म्हनणे क्रमप्राप्त आहे. कारण हा शब्द ऋग्वेदात नाही....तो अत्यंत उत्तरकालात, म्हणजे ऋग्वेदनिर्मितीनंतर दोन हजार वर्षानंतर आलेला शब्द आहे....वर्ण म्हणुन...
असुरद्र याच शब्दाचा कालौघातील संक्षेप म्हणजे शुद्र होय! (सुरद्र...सुद्र..शुद्र...)
एकार्थाने शुद्र असने हीच एक अभिमानास्पद बाब आहे. आपल्या पुरातन सांस्क्रुतीक ठेव्याची, विजयांची नि पराभवांची नित्य आठवण देणारी ही ठेव आहे...
वर्ण:
भारतात वर्णव्यवस्था आहे. होती. ते जावुद्या, पण "वर्ण" शब्दाचा सरळ संस्क्रुत अर्थ रंग असा आहे. त्यानुसार जेवढी याबाबत चर्चा झाली आहे तिचा मतितार्थ थोडक्यात असा:
ब्राह्मण हे गोरे, नीळ्या डोळ्यांचे, उंच आणि धिप्पाड आणि सत्वगुणी असतात.
क्षत्रीय हे रक्तवर्णाचे तामसी स्वभावाचे असे लढावू असतात.
वैश्य हे गहु वर्णाचे व्यापारी व्रुत्तीचे असतात.
शुद्र हे तमोगुणी, सेवाव्रुत्तीचे आणि काळ्या रंगाचे असतत.
आता जर तुमच्यासमोर माणसे उभे करुन त्यांचा धार्मिक वर्ण सांगा म्हटले तर तुमची पंचाईत होईल. खुद्द ऋग्वेदात काळ्याकुट्ट लोकांने ऋचा लिहिल्या आहेत. क्रुष्ण हा काळाच होता. आज बव्हंशी ब्राह्मण काळे वा गहुवर्णीय आहेत. त्याच वेळीस शुद्रातीशुद्र हे अत्यंत गोरे व उंच धिप्पाड आहेत. थोडक्यात रंग म्हनजे वैदिक वर्ण ही व्याख्या मुळात लाथाडुन टाकता येईल अशीच आहे.
मग वर्ण म्हणजे नेमके काय यांना अभिप्रेत होते बरे? व्यासही काळा, वाल्मिकीही काळा, रामही काळा अन क्रुष्नही काळा...विट्ठलही काळा...यादी अवाढव्य आहे.
म्हनजेच त्वचेचा रंग हे काही वैदिक/अवैदिक ठरवण्याचे साधन नाही. वंशविभेदाचे साधन नाही. मग चातुवर्ण्य हा मुढ शब्द यांनी कोठुन आणला, हेही शोधणे आवश्यक आहे.
पण ते पुढील लेखात.

30 comments:

  1. एक फरक आहे:
    "चातुर्वर्ण्य" आणि "चातुर्वर्ण" ह्या दोन शब्दांतील फरक ज्याला कळेल, त्यालाच "वर्ण" कळेल.
    आणि इथेच खरी गोम आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद सोनवणी सर , OBC आता जागे झालेच पाहिजे आणि आपण कोण आहेत ? व आज कुठे ( समाजात स्थान / भागीदारी / सन्मान यात ) आहेत ? व कुठे जायाचे आहे, याचा विचार आता झाला पाहिजे .....

    OBC हा आजवर लपलेला वा लपवून ठेवलेला तसा सर्व गर्दित दिसणारा पण स्वत गोंधळात असणारा. असा OBC हा महत्वपूर्ण विषय घेवून आपण जे लिहत आहात , त्याबद्दल पुन्हा एकदा आपले धन्यवाद !

    OBC आता जागे झालेच पाहिजे !!!

    ReplyDelete
  3. Dear Sanjay Sir - I done little study about Dhangar Origin

    ReplyDelete
  4. धनगर आणि पशुपालक क्षत्रिय का आहेत ते नीट समजून घेवूया आपण -

    ऋग्वेदातील आर्य-ब्राह्मण हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते. त्यांचे कांस्य युगात भारतीय उपखंडात आगमन झाले. पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यतः गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे. त्यासंदर्भातले एक सूक्त ऋग्वेदात आहे - क्षेत्रस्य पतीना वयं व हितेन जयामसी गामाश्वं पोशयिन्ता स‌नो मुळातिदृशे. सर्व ग्रंथांची निर्मिती हि भारतीय उपखंडामध्ये झालेली नाही हे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे.

    खुद्द पशुपालक -ब्राह्मण समाज हा समाज कांस्य युगामध्ये भारतीय उपखंडामध्ये दाखल झाला असून तो शिक्षित पशुपालक समाज होता असे ऋग्वेद मध्ये म्हटले आहे. त्यामुळे पशुपालाला वर्ण लागू होत नाही हे त्याचे प्रमुख कारण आहे. आता काही लोक सर्व पशुपालांना धनगर म्हणतात हे चुकीचे आहे.

    १.अनुवांशी प्रवास आपणास हे सांगतो कि धनगर हे क्षत्रिय आहेत कारण आपण धनगर जीन Genetic studies
    The widespread Palaeolithic mtDNA haplogroups and analysis of Y-DNA haplogroup in Dhangar clans highlight their Proto-Asian genetic ancestries. Dhangar heterogeneity is ascribable to predominantly South-Asian males and West-Eurasian females. Dhangar have a significant Pleistocene gene pool, corroborating... their "Proto-Asian" origin. As per J. H. Hutton they are Proto-Australoid. Kashyap (2006) designates 23 out of 54 Indian populations studied as Australoid, of which one speaks an Indo-European language (Shepherds of Maharashtra).

    When the Eurasian cowherd & shepherds were migrated in Asia, that time so many Proto-Asian Shepherd and cowherd was Kings & Solders in Asian continent so Eurasian Shepherds & Cowherds mixed with Pro-Asian Shepherds & cowherds.So mixture of gene you find in Maharashtra’s Shepherds & Cowherds that is Proto-Asian Male and West Eurasian female .Dhangars are believed to be Indo-Aryans as the Aryans were shepherds. Dhangar follow many rituals which were followed by Aryans.

    ReplyDelete
  5. या वरून असे समजते हा क्षत्रिय वर्ण धनगर आणि पशुपालाकाकडे हिंदू धर्म च्या सुरुवाती पासून असावा,

    एका कुटुंबाची १२ कुटुंबे आणि नंतर १२ पोट-जाती तयार होण्यासहजारो वर्षाचा कालखंड गेला असेल, हे लक्षात घ्यावे लागेल.श्रीभालचंद्र नेमाडे यांचे "हिंदू" या पुस्तकातून आपल्या समजते किवेदिक धर्मा मध्ये जाती मध्ये लग्न करणे बंदनकारकनव्हते,तसेच बरीच समृद्ध कुटुंब हा नियम पाळत नह्वती.

    २.-रीग्वेद हा कर्म नुसार वर्ण स्यीकारायची परवानगी देतो, आणिमनुस्म्र्ती हि रीग्वेदाच्या खूप नंतर च्या कालखंडानंतर लिहिलीआहे, कारण त्याचा लेखक अज्ञात असून त्यांना हे माहित नव्हतेपूर्व इतिहासा मध्ये पशुपालक, आणि मेश्पालक राजे राहिलेले आहेत.

    ३.राजपूत, ठाकूर , क्षत्रिय कोश या मध्ये हि उल्लेख सापडतो कि- काही क्षत्रियांनी न्यराश्यापोती आणि परकीयआक्रमामुळे पशुपालक आणि मेश्पालक झाले.

    या निकषावर हिंदू महासभेने १९१३ , १९३३ साली अजमेर बर्याच पशुपालक आणि मेश्पालक समाजांना क्षत्रिय वर्ण घोषितकेला होता. त्यांना विखुरलेल्या क्षत्रिय समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता.

    ४.प्राचीन धनगर कूळ गोत्र १९९२ , गणपतराव कोळेकर पहिले तर धनगर समाजातील ३६ कुळ गोत्रे हि राजपुतामध्ये हिआहेत, कुळ गोत्र नुसार तर राजपूत आणि धनगर एक आहेत अशी विलक्षण माहिती मिळते, पुढे जावून जर आपण बैस-राजपूत कागदपत्र पहिली तर बैस-राजपूत पण हाच विचार मांडतात.

    ५.धर्म शास्त्रा नुसार शुद्र कधी हि राजा बनू शकत नाही. १३ साम्राज्य आली कुठून सर्व राजांचे विधिवत राज्याअभिषेच्ककसे झाले.

    वेदिक वर्ण धर्मानुसार पशुपालक हे क्षत्रिय आहेत, छत्रपती शिवाजी राजांना पण क्षत्रिय कुलवंश गो ब्राह्मण प्रतिपालकम्हंटले आहे, म्हणजे गायी आणि ब्राह्मणाचे प्रतिपालन करणारे त्यांच्या उपाधी मध्ये आहे.

    म्हणजे गवळी आणि पशुपालक हे क्षत्रिय असल्याचे सिद्ध होते, जर आपण श्री कृष्णाचे हे उदाहरण घेतल्यास यदुवंश पणक्षत्रिय असल्याचे सिद्ध होते,


    ७.तसेच maharashtra -land and its peoples या पुस्तकामध्ये धनगराचा जन्म भगवान शंकराने केला असा उल्लेखसापडतो, तसेच बर्याच धनगरी ओवी या शंकरावर आधारित आहेत,आणि बर्याच जाणकार वृद्ध व्यक्ती पण असेच सांगतातकि धनगराला जन्म हा शंकराने दिला आहे ,त्याकारणे आपण ब्रह्म उत्पती सिद्धांत धनगर आणि पशुपालकाला लागूहोणार नाही.

    ६. यात तीळ मात्र शंका नाही कि धनगर,पशुपालक समाज हा प्रामुख्याने मागास आहे, पण त्याबरोबर हे विसरूनचालणार नाही कि या समाजाची १३ साम्राज्य होती, त्यांच्या राजांचे विधिवत राज्याभिषेच्क झाले असणार.

    विठ्ठल खोत

    ReplyDelete
    Replies
    1. MAHAMANAV VITTHALRAO .....aapli JAAT konti..? kadhipasun kartay he asle buddhibhedache napusak dhande..?

      Delete
  6. @ मित्र विट्ठल खोत यांस ,


    धनगर आणि पशुपालक क्षत्रिय का आहेत ते नीट समजून घेवूया आपण -
    >>>>
    येथे धनगर आणि पशुपालक क्षत्रिय यात ( पशुपालक म्हणजे नक्की कोण ? आणि आपण पशुपालक (सर्व) हा ‘क्षत्रिय’ आहेत, हे कसे काय सांगू शकता ?

    ऋग्वेदातील आर्य-ब्राह्मण हे पशुपालन करणारे टोळी-संघ होते.
    >>>>
    टोळी एक होती वा अनेक टोळी होती ? व या अशा एकास वा सर्वांना आपण सांगितले प्रमाणे ‘आर्य – ब्राह्मण’ या एकाच नावाने ओलखावे का ? समजावे का ?

    पशुपालन करणा-या या आर्यांचे मुख्य पशुधन गोधन होते. भारतीय उपखंडात आल्यानंतर या आर्यांनी शेती करण्यासही सुरुवात केली. पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यत गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे.
    >>>>
    आर्यांचे मुख्य पशुधन केवळ गो ( गाय ) धन होते का ? मेंढ़या- बकर्या – याक – खेचर - म्हशी का नाही ? कारण आर्यां’चे आगमन जो भाग आपण बोलत आहे किंवा आपणास जे सांगावायाचे आहे तेथे धनगर समाज हा हिंदू व मुस्लिम दोनिही मोठया प्रमाणात व प्रामुख्याने मेंढ़या – बकर्या पाळणारे प्रमाणात आहेत.

    पशुपालन जीवनपद्धतीमुळे शेती ही मुख्यत गायी व अश्व यांना चारा देण्याच्या हेतूने करण्यात येत असे
    >>>
    ‘फक्त’ चारा साठी शेती ? प्रथमच ऐकले ..... ( मेंढ़या- बकर्या –– याक – खेचर - म्हशी येथे हि का दिसत नाही ? )

    खुद्द पशुपालक - ब्राह्मण समाज हा समाज कांस्य युगामध्ये भारतीय उपखंडामध्ये दाखल झाला असून तो शिक्षित पशुपालक समाज होता असे ऋग्वेद मध्ये म्हटले आहे.
    >>>>
    पशुपालक - ब्राह्मण समाज हा समाज.... पशुपालक हे ब्राह्मण कसे ?
    ‘शिक्षित’ म्हणजे काय व कोणत्या अर्थाने ‘शिक्षित’?

    सर्व ग्रंथांची निर्मिती हि भारतीय उपखंडामध्ये झालेली नाही हे आपण आधी लक्षात घेतले पाहिजे.
    >>>>>
    कोणते ग्रंथ, व जर सर्व ग्रंथांची निर्मिती हि भारतीय उपखंडामध्ये झालेली नाही...तर अशा ग्रंथास आपण मानावे का ?

    त्यामुळे पशुपालाला वर्ण लागू होत नाही हे त्याचे प्रमुख कारण आहे. आता काही लोक सर्व पशुपालांना धनगर म्हणतात हे चुकीचे आहे.
    >>>>
    पशुपालाला वर्ण लागू होत नाही , मग आपण जे क्षत्रिय जे बोलत आहे ते कोणाच्या व कशाच्या आधारावर बोलत आहे ?

    आता काही लोक सर्व पशुपालांना धनगर म्हणतात हे चुकीचे आहे.
    >>>>
    आता काही लोक सर्व पशुपालांना धनगर म्हणतात हे चुकीचे आहे ? म्हणजे नक्की काय सांगावायाचे आहे ? ( सर्व पशुपालक धनगर नाही आहेत... अगदी बरोबर, कारण गवळी, हत्ती पाळणारे , अस्वल पाळणारे, मासे पाळणारे असे अनेक विविध पशुपाल समाज आहेत )

    ReplyDelete
  7. १.अनुवांशी प्रवास आपणास हे सांगतो कि धनगर हे क्षत्रिय आहेत कारण आपण धनगर जीन Genetic studies
    The widespread Palaeolithic mtDNA haplogroups and analysis of Y-DNA haplogroup in Dhangar clans highlight their Proto-Asian genetic ancestries. Dhangar heterogeneity is ascribable to predominantly South-Asian males and West-Eurasian females. Dhangar have a significant Pleistocene gene pool, corroborating... their "Proto-Asian" origin. As per J. H. Hutton they are Proto-Australoid. Kashyap (2006) designates 23 out of 54 Indian populations studied as Australoid, of which one speaks an Indo-European language (Shepherds of Maharashtra).

    When the Eurasian cowherd & shepherds were migrated in Asia, that time so many Proto-Asian Shepherd and cowherd was Kings & Solders in Asian continent so Eurasian Shepherds & Cowherds mixed with Pro-Asian Shepherds & cowherds.So mixture of gene you find in Maharashtra’s Shepherds & Cowherds that is Proto-Asian Male and West Eurasian female .Dhangars are believed to be Indo-Aryans as the Aryans were shepherds. Dhangar follow many rituals which were followed by Aryans.

    >>>>>
    धनगर समाज तसेच गवळी समाज हा सर्व जगभर व सर्व धर्मात आढळणारा आहे, धनगर समाज हा भटका समाज आहे ( आता काही प्रमाणात स्थिर हि झाला आहे , याची अनेक कारने आहेत, पण अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात आज हि भटकताना दिसतो )..... मनुष्याचे नक्की कुळ व मुळ सांगने कठिन वा अशक्य आहे...


    या वरून असे समजते हा क्षत्रिय वर्ण धनगर आणि पशुपालाकाकडे हिंदू यधर्म च्या सुरुवाती पासून असावा,
    >>>>>
    या वरून असे समजते हा क्षत्रिय वर्ण ? क्षत्रिय वर्ण ? नक्की काय समजते व समजले ?

    एका कुटुंबाची १२ कुटुंबे आणि नंतर १२ पोट-जाती तयार होण्यासहजारो वर्षाचा कालखंड गेला असेल, हे लक्षात घ्यावे लागेल.श्रीभालचंद्र नेमाडे यांचे "हिंदू" या पुस्तकातून आपल्या समजते किवेदिक धर्मा मध्ये जाती मध्ये लग्न करणे बंदनकारकनव्हते,तसेच बरीच समृद्ध कुटुंब हा नियम पाळत नह्वती.
    >>>>
    एका कुटुंबाची १२ कुटुंबे, १२ पोट-जाती, श्रीभालचंद्र नेमाडे यांचे हिंदू पुस्तक, किवेदिक धर्मा मध्ये जाती मध्ये लग्न करणे बंदनकारकनव्हते , बरीच समृद्ध कुटुंब हा नियम पाळत नह्वती...? हे सर्व काय आहे ? व आपणास काय सांगावायाचे आहे ? कहिहि .....

    २.-रीग्वेद हा कर्म नुसार वर्ण स्यीकारायची परवानगी देतो, आणिमनुस्म्र्ती हि रीग्वेदाच्या खूप नंतर च्या कालखंडानंतर लिहिलीआहे, कारण त्याचा लेखक अज्ञात असून त्यांना हे माहित नव्हतेपूर्व इतिहासा मध्ये पशुपालक, आणि मेश्पालक राजे राहिलेले आहेत.
    >>>> पशुपालक, आणि मेश्पालक समाजामध्ये राजे झाले आहेत, यातून नक्की काय सांगावायाचे आहे ? कहिहि .....


    ३.राजपूत, ठाकूर , क्षत्रिय कोश या मध्ये हि उल्लेख सापडतो कि- काही क्षत्रियांनी न्यराश्यापोती आणि परकीयआक्रमामुळे पशुपालक आणि मेश्पालक झाले.
    >>>>
    हा धनगर व पशुपालक समाजाचा तसेच राजपूत, ठाकूर यांचा सुद्धा अपमान आहे ? हा शोध आपण कोठूंन लावला ? पुरावा काय आहे ? आधी राजपूत , ठाकुर व नंतर धनगर व पशुपालक...उलटा इतिहास / खोटी ओळख सांगत आहात आपण.... आपण 2हि समाजाचा एका प्रकारे अपमान करीत आहात ,असे वाटत नाही का ?

    ReplyDelete
  8. या निकषावर हिंदू महासभेने १९१३ , १९३३ साली अजमेर बर्याच पशुपालक आणि मेश्पालक समाजांना क्षत्रिय वर्ण घोषितकेला होता. त्यांना विखुरलेल्या क्षत्रिय समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता.
    >>>>>
    या निकषावर ? कोणते निकष ? आणि ती हि हिंदू महासभा ? हि माहिती आपण कुठे मिळवली ? आणि हे हिंदू महासभा आम्हांस क्षत्रिय दर्जा देणारे कोण ? हि हिंदू महासभा आहे की क्षत्रिय महासभा ? ( मला वाटते हे की उचा बनो अभियान आहे , एक षडयंत्र आहे)


    ४.प्राचीन धनगर कूळ गोत्र १९९२ , गणपतराव कोळेकर पहिले तर धनगर समाजातील ३६ कुळ गोत्रे हि राजपुतामध्ये हिआहेत, कुळ गोत्र नुसार तर राजपूत आणि धनगर एक आहेत अशी विलक्षण माहिती मिळते, पुढे जावून जर आपण बैस-राजपूत कागदपत्र पहिली तर बैस-राजपूत पण हाच विचार मांडतात.
    >>>>
    हे सर्व काय आहे .... राजस्थान मधील राजपूत व रबारी नावाने ओलखले जाणारे तेथील धनगर यांचे सबंध तसे चांगले नाही आहे , हे आपणास माहित आहे का ? तेथील धनगर व राजपूत समाजाचा जरा अभ्यास करावा ? व संबंध पहावा...चित्र वेगळे दिसेल ?


    ५.धर्म शास्त्रा नुसार शुद्र कधी हि राजा बनू शकत नाही. १३ साम्राज्य आली कुठून सर्व राजांचे विधिवत राज्याअभिषेच्ककसे झाले.
    >>>>
    कोणते धर्मशास्त्र ? मग सम्राट चंद्रगुप्त मौर्य ( धनगर , जैन ) सम्राट अशोक ( धनगर , बौद्ध ) छत्रपति शिवाजी महाराज , महाराज यशवंतराव होळकर , राजर्षि शाहू ( सर्व हिंदू समाजातुन ) हे कसे राजे बनले ? तरी मला कळले नाही की , आपणास काय सांगावायाचे आहे ? धनगर / बहूजन / राष्ट्रीय समाजाचे महान संत कनकदास (श्री. कृष्ण भक्त ) यांना शुद्र म्हटले गेले आहे , व नुकतेच काही वर्षापूर्वी त्यांचे कनकगोपुर काही सनातनी हिंदू लोकांनी तोडले, आपले काय मत आहे या बद्दल ? 13 साम्रज्ये नावे सांगा ? आली कुठून सर्व म्हणजे नक्की काय ? राजांचे विधिवत राज्याअभिषेच्क म्हणजे नक्की काय व कुठे झाले ते जरा सांगता का ?

    वेदिक वर्ण धर्मानुसार पशुपालक हे क्षत्रिय आहेत, छत्रपती शिवाजी राजांना पण क्षत्रिय कुलवंश गो ब्राह्मण प्रतिपालकम्हंटले आहे, म्हणजे गायी आणि ब्राह्मणाचे प्रतिपालन करणारे त्यांच्या उपाधी मध्ये आहे.
    >>>>
    वेदिक वर्ण धर्मानुसार म्हणजे नक्की काय ? व पशुपालक हे क्षत्रिय कसे ? क्षत्रिय कुलवंश गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असे ऐकले आहे,पण हे नक्की सर्व प्रथम कोणी व का बोलले ? याचे कारण काय आहे ? फक्त ’गो' 'ब्राह्मण’ प्रतिपालकच का ? जसे हिंदू म्हणून OBCच वापर केले गेले तसेच क्षत्रिय व गो पुढे ढाल म्हणून तर वापर केला नाही ना असे शंका वाटते.....



    म्हणजे गवळी आणि पशुपालक हे क्षत्रिय असल्याचे सिद्ध होते, जर आपण श्री कृष्णाचे हे उदाहरण घेतल्यास यदुवंश पणक्षत्रिय असल्याचे सिद्ध होते,
    >>>>
    कसे काय सिद्ध झाले क्षत्रिय ? श्री.कृष्णा’चे कोणते उदाहरण ?


    ७.तसेच maharashtra -land and its peoples या पुस्तकामध्ये धनगराचा जन्म भगवान शंकरा ने केला असा उल्लेखसापडतो, तसेच बर्याच धनगरी ओवी या शंकरावर आधारित आहेत,आणि बर्याच जाणकार वृद्ध व्यक्ती पण असेच सांगतातकि धनगराला जन्म हा शंकराने दिला आहे ,त्याकारणे आपण ब्रह्म उत्पती सिद्धांत धनगर आणि पशुपालकाला लागूहोणार नाही.
    >>>>
    भगवान शंकर यांना धनगर समाज खुप मानतो , पण यातून काय सांगावायाचे आहे ?

    भगवान शंकर व श्री .कृष्ण यांना आम्ही मानतो ,पण आपणास यातून नेमके काय सांगावायाचे आहे.

    ६. यात तीळ मात्र शंका नाही कि धनगर,पशुपालक समाज हा प्रामुख्याने मागास आहे, पण त्याबरोबर हे विसरून चालणार नाही कि या समाजाची १३ साम्राज्य होती, त्यांच्या राजांचे विधिवत राज्याभिषेच्क झाले असणार.

    >>>>


    >>>>
    ७ नंतर ६ ?

    पण होय आपण आज मात्र मागास आहोत , हे एकच मला योग्य वाटले .

    ReplyDelete
  9. मित्रा,

    एक शंका उपस्थित होत आहे , आपला क्षत्रिय मोठा दिसतो , आता ब्राह्मण व आर्य हि आपण आणले आहेत. आपला हिंदू मोठा असतो / दिसतो व गवळी हि मध्ये मध्ये आणून ‘धनगर’ आपण लपवीताना सतत दिसतात . आपन धनगर नेहमी लहान ठेवता , व बाकी सर्व मोठे सांगता हे असे का ? धनगर व गवळी समाजाचा संबंध तसा जवळ’चा आहे , पण आज धनगर व गवळी समाज वेगळा आहे ( अपवाद काही ठिकाणी ). एक तर फक्त आपण धनगर बोला वा फक्त गवळी बोला , पण असे गोंधळ करू नका / वाढवु नका.....( आपण जर धनगर जातितिल पोट जात म्हणून गवळी बोलत असाल तर असे विभाजन करुन काय उपयोग आहे ? किती विस्कलितपना आपण करणार / आनणार...व त्याचा काय उपयोग? )
    क्षत्रिय भाषा आपण करता पण आपण ‘धनगर’ मात्र का लपविता ? धर्म’ची भाषा करता मग सत्य का लपविता ?
    उत्तेरेत पहाड़ी प्रदेशातील धनगर आपणास गड्ड आर्य ( गद्दी समाज) समजतात. ( विचाराने आर्य येथे विद्वान अर्थाने.... जातिने नव्हे...) पण तेथील ब्राह्मण समाज येथील गद्दीस / धनगारास आपला समजत नाही ( तसाच राजपूत सुद्धा ) , हे हि खरे आहे ..... मग आपण कशाला आपले खरे नाव व ओळख लपवायाचे......धनगर हा पूर्वी विद्वान होता , अनेक शोध त्याने लावले.... धनगर या शब्दाचा खरा अर्थ दिशा देणारा समाज ( म्हणूनच येशुस The Good Shepherd असे म्हणतात ) विविध धर्मात धनगर समाजाचे अनेक महापुरुष झाले आहेत . पण आज काय आहोत आपण ? ना विद्वान ना लड्वय्या ?
    उचा बनो अभियाणा’मध्ये काल फसलों ... मग हिंदू म्हणून , भाषा म्हणून ...व पुरोगामी म्हणून सुद्धा फसलों ..... या सर्व गर्दित असणारा / दिसनारा व आपल्या मुळेच वरील सर्व काही आहे अशा या सर्व गर्दित ( आपण खरे वारसदार या अर्थाने ... ) प्रामुख्याने धनगर असो वा OBC असो आता तरी जागे व्हा ? आज आपले समाजात काय स्थान आहे ? का केवळ मोठया गप्पा आणि तेहि कोणी तरी शत्रु पक्षाने सांगितले म्हणून..... याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही?

    ReplyDelete
  10. @ मित्र खोत, वरील सर्व काही एक सांगितले आहे ते एक मित्र म्हणून .... एक OBC साथी म्हणून... आणि अगदी प्रामाणिक हेतुतुन. समजून घ्यावे ...( तरी हि कुठे चुकले असेल तर माफ़ी.)

    -------------------------------

    सोनवणी सर, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद ! OBC , धनगर विषय पुढे आणल्याबद्दल...

    ReplyDelete
  11. धन्यवाद माझा संदेश वाचल्या बद्दल, धनगर समाज हा जसा हिंदू / वेदिक धर्मा मध्ये आहे तसा हा इतर धर्मा मध्ये पण आहे, माझ्या परिचयाचे बरेच खाटिक मित्र आहेत कि ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे.
    इस्लाम , क्रिश्चन आणि जैन धर्माचे धर्म संस्थापक हे सुद्धा पशुपालाकच होते.
    मला थोड्या दिवसापूर्वी मी वाचले होते कि महावीर जैन प्राचीन गो-पालक समाजातील होते. असो पशुपालक समाज हा आद्य -निर्माण करते आणि आद्य वसाहत कार होते हे आपण सत्य मानून चालूया. याचा समाजातून इतर समाज नंतर विकसित झाले असावे. कारण सर्व मानव - जातीचा आद्य व्यवसाय हा पशुपालन हाच होता.

    नवीन कामामुळे मी नेट फार कमी वापरतो. उत्तर विलंबास क्षमा असावी

    विठ्ठल खोत

    ReplyDelete
  12. शुचिदा,शुद्धी देणारा तो शूद्र ही व्युत्पत्ती सुंदर आहे.

    ReplyDelete
  13. @sunny A
    या आधी पण १०० मुद्धे इंग्रझी मधून माडले आहेत.
    मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर प्रत्यक्ष भेटल्या शिवाय देता येणार नाही. परंतु तुह्माला ब्रह्म आणि शिव उत्पती सिद्धांत आपल्याला माहित नाहीत. हे वाचून आश्चर्य वाटले?

    असो आपला मुंबई चा पत्ता सांगितल्यास आपण प्रत्यक्ष भेटू

    Vitthal Khot

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Vitthal, read following two articles. Hopefully it will erase some misunderstanding. Thanks.

      http://sanjaysonawani.blogspot.in/2010/11/blog-post_28.html

      http://sanjaysonawani.blogspot.in/2011/02/blog-post_5564.html

      Delete
    2. Dear sanjay sir - Why the Eurasian theory is not Applies for Vedik / Hindu Religion ?

      Delete
    3. My dear, it is outdated theory and has been refuted by all anthropologists. There is no trace of truth in it. British used it for political reasons to which most of the Brahmins and rest of the people those always wanted to prove superior accepted it blindly. Even Maxmuller, who originally had proposed this theory publically askaed pardon and took it back. You need to study this more.

      Delete
    4. @ मित्र खोत , जय मल्हार !

      या आधी पण १०० मुद्धे इंग्रझी मधून माडले आहेत.
      मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर प्रत्यक्ष भेटल्या शिवाय देता येणार नाही. असो आपला मुंबई चा पत्ता सांगितल्यास आपण प्रत्यक्ष भेटू
      >>>>
      आता मध्येच नविन 100 मुद्दे, हा काय प्रकार आहे ? कोणते 100 मुद्दे ? या 100 मुद्दे'चा विषय काय आहे ? हे 100 मुद्धे इंग्रझी'च का ? आणि आपण कधी हे 100 मुद्धे मांडले मला तर आठवत नाही ? कळू दे सर्वांना ते 100 मुद्दे.... जर आपण एकीकडे क्षत्रिय भाषा करीत असेल तर ( त्या क्षत्रिय वृत्तिला मान देत ) ते 100 मुद्दे आपण मांडावे, अशी माझी नम्र व कळकळी'ची विनंती आहे !
      यातून धनगर / OBC'ला जर खरच फायदा होत असेल तर ते 100 मुद्दे मला आवडेल व सर्व धनगर / OBC'नां आवडेल ....कारण सध्या आमचा अजेंडा तसा कुठेच दिसत नाही, अशा वेळी आपले 100 मुद्दे आणने हि कदाचित एक क्रांति ठरेल.

      आणि हो मागे आपण भेटू या, चर्चा करू या असे अनेक वेळा मि स्वता: हुन आपणास सांगितले होते, पण आपणच त्यावेळी तयार नवते...( जर आपणास खरेच मला भेटायाचे असते तर आपण मला कधीच भेटले असते, असे मला वाटते. तेहि जवळ ( मुंबई ) असताना , जावू दे... )


      परंतु तुह्माला ब्रह्म आणि शिव उत्पती सिद्धांत आपल्याला माहित नाहीत. हे वाचून आश्चर्य वाटले?
      >>>>
      मि आपल्या सारखा विद्वान नाही आहे, प्रथम.
      एक टॉपिक चालू करतांना दूसरा व सतत नविन विषय मध्येच आणने / विषय सोडून बोलने ( भरकटवने.. मोठे पण पोकळ बोलने / चमकिश बोलने ...) मला तसे जमत नाही....

      समाज जोड़ने आणि तेहि थोड़े फार, मला जमते .... जोड़न्याच्या नावाखाली तोड़ने मला जमत नाही आणि पहावत हि नाही... ( माफ करा जे मला वाटले म्हणून ते मि बोललो , जर काही चुकीचे बोललो तर मला माफ करावे व पुन्हा एकदा जाहिर माफ़ी ! )

      धन्यवाद !

      Delete
  14. @Sunny A
    आपण ज्या मुद्यावर चर्चा करतो आहोत. जरी माझ्या कडे पुरावे असले, आणि न्याय प्रक्रियात जरी याचा फायदा झाला तरी.यातून समाजाचा काहीच फायदा होणार नाही. आणि शहरी वस्ती तील लोक जाती पाती विषयी बोलायला लागलो तर हे प्रकरण निरर्थक होयील.

    विचार मांडणे हि काही चुकीची गोष्ट असे मला तरी वाटत नाही
    मी कोणी लेखक नाही पण जे काही पहिले त्याबद्दल लिहिले यात काही हि कायदे बहाय्य आणि कोणाला दुकाविण्याचा हेतू नाह्वता.

    ReplyDelete
  15. sunny A.
    प्रत्येक शब्दावर प्रश्न उपस्थित मला हि करायला खूप आवडते. आपण सर्व स- वर्ण हे वायीट अथवा बरोबर नाहीत हे बोलले खूप धाडसाचे आणि बेकायदेशीर होयील. हे या आधी पण स्पष्ट केले आहे.

    आपण वर्ण- धर्म व्यवस्था आता लागू करता येणार नाही. आपण एवडे समजून घ्या कि वर्ण हा धनगर समाजाला लागू करत नाही.

    तरी वरील संदेश आपण नीट वाचवा मला काय म्हण्याचे आहे समजेल. आणि गवळी-धनगर समाज अहिर -धनगर समाज पण महाराष्ट्र मध्ये धनगर समाजाची पोट - जात आहे. हे सर्वांना माहित आहे.

    आपण धर्माविषयी जाती विरुद्ध बोलण्यास कायदा तर परवानगी देत नाहीच शिवाय कायदा धर्म परिवर्तनाची मुभा आहे. हे आपणस माहित आहे च...

    "परंतु आपण वेदिक / हिंदू आहोत म्हणून आपण आपल्या धर्माविषयी आणि जाती विषयी आपतीजनक बोलू शकतो, हि परिस्तिथी इतर धर्मियात नाही"

    विठ्ठल खोत

    ReplyDelete
  16. @sunny A
    माझा पहिला संदेश कोणाला उदेशून नाह्वता नाही अतिशय "क्रोधाने चवताल्यासारखी" कोणतीच गोष्ट नव्हती.
    माझा संदेश आपण नीट वाचायला हवा होता. का मत प्रदर्शित करण्याचा अधिकार सर्वांना आहे.

    ReplyDelete
  17. @sunny A
    धनगर हे आपल्या माहित प्रमाणे "शुद्र" आहेत. आपण बिनधास्त पणे आपले मुद्धे मांडावेत कारण माझ्या आणि धनगर समाज बांधवांच्या मते हि माहित विशेष ठरेल ?

    ReplyDelete
  18. (पुराणात तर महाराष्ट्रातील सर्व समाजाला "शुद्र" म्हटले आहे आणि मनुस्मृती या ग्रंथ मध्ये हि दोन उदाहरणे सोडून बोलावे. कारण मनुस्मृती विषयी मी या आधीच शंका उपस्थित केल्या आहेत..)

    ReplyDelete
  19. @ संजय सोनवणी सर ,
    विषयांतर होत असल्याबद्दल क्षमस्व. असेच लिहत जावे, पुन्हा एकदा धन्यवाद !

    - सनी.ए

    ReplyDelete
  20. @Sunny .A
    जसे मी धनगर हे क्षत्रिय असल्याचे मुद्धे मांडले, ते तुह्माला पटणे अथवा न पटणे याने मला फरक पडणार नाही..
    परंतु मला आपणाला एक प्रश्न विचारायचा आहे -

    धनगर हे कोणत्या निकषावर आपण "शुद्र" म्हणत आहात ते मला आणि सर्व धनगर आणि पशुपालांना कळलेच पाहिजे?(आणि मला प्रती प्रश्न विचारायची परवानगी सर्वांनी द्यावी)

    ReplyDelete
  21. @ मित्र खोत,

    आता माझे शेवटचे उत्तर .....

    सर्वप्रथम मी कोणत्या निकषावर मी जे काही बोललो आहे ( ? ), असा जो प्रश्न मला आपण उपस्थित केला आहे, पण मी कुठे काय बोललो आहे ? ( पहावे माझे कमेंट्स.. )

    आणि

    2 री गोष्ट अशी की वर तुम्हीच सांगितल्याप्रमाणे ''मला फरक पडत नाही '' यात सर्व काही आले / समजले आहे. त्यामुळे येथे थांबनेच योग्य आहे... असे मला वाटते.


    खरया क्षत्रिया’ला मी क्षत्रिय, मी क्षत्रिय असे स्वताहुन लेबल लावण्याची गरज नाही / वा सतत सांगन्याची गरज नसते, मित्रा !

    माफ करा , पण खरेच आपण धनगर / Shepherds आहात का ? वा कोणी पशुपालक तरी आहात का ? कारण धनगर समाजाची आपण खरी ओळख आपण पुसून ब्राह्मण , राजुपुत , ठाकुर , काही क्षत्रियांनी न्यराश्यापोती आणि परकीय आक्रमना मुळे आपण पशुपालक आणि धनगर (मेषपालक) झालो आहेत, हे जे आपण कमालिचे बोलत आहेत त्यामुळे....आणि तसेच भगवान शंकर ,श्री.कृष्णा , हिंदू , छत्रपती शिवाजी महाराज तसेच पशुपालक , गो पालक , धनगर , मेषपालक , गवळी धनगर , अहीर धनगर , असे जे काही सतत गोंधळ , वा बदनाम , वा फाटाफुट आपण जी लावली आहे . अनेक शंका उपस्थित होते ( आणि त्यामुळेच थोडा मी अस्वस्थ झालो... ).


    असो आपला विजय झाला आहे , आणि मी आपल्यापुढे हार पत्करली आहे. ( माझी सहनशीलता संपली आहे. )

    ( आपण माझा ई-मेल आय डी शोधुन जो आज मेल केला, त्याबद्दल धन्यवाद ! मी आपल्यापुढे हार पत्करल्याने किमान आता तरी आपण येथे ब्रेक लावावे / समजून घ्यावे, अशी नम्र विनंती ! तसा माझा ई-मेल आय डी आपल्या कडे आहेच . )

    ReplyDelete
  22. @sunny A .
    आपण आधी शांत व्हा आपण भांडत नसून एक चर्चेचा प्रयत्न करत आहोत- मला कोणाला दुखविण्याचा हेतू नाही.

    धनगर समाजामध्ये मी फुट पाडत नाही आहे. आपण धनगर समाजाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.

    धनगर समाजामध्ये गवळी-धनगर आणि मेश्पालक-धनगर पण आहेत अर्थात मेश्पाल -धनगर समाजाची संख्या हि खूप जास्त आहे. त्यामुळे तुमचा गैर-समाज झाला आहे कि "धनगर म्हणजे मेष पालन करणारा" हि संकल्पना चूक आहे "धनगर म्हणजे मेश्पालक आणि त्याच प्रमाणे अहिर-धनगर समाज पण धनगर आहे"
    महाराष्ट्र सरकार इ स २००८ साली अहिर -धनगर समाज हि धनगर आरक्षण N T - C आहे..त्याचे आपण दर्स्तावेज पाहावे.
    (*त्यामुळे अहिर-धनगर समाजाला धनगर न बोलणे हे बे-कायदेशीर असून सामाजिक बांधिलकी ला पण घातक आहे...)
    आपण सर्व बांधव आहोत जरी आपणाला पटो अथवा न पटो -आह्मी गर्वाने सांगतो जातीचे धनगर आहोत. आता पोट जात सांगणे अथवा न सांगणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे..हे आपण लक्षात घेतले पाहिजे.आपल्या सर्वांच्या विचारांच्या कक्षा रुंदावायची गरज खूप मोठी आहे..

    विशेष म्हणजे धनगर समाजामध्ये आपण पाहिलेच तर तो बारा पोट जाती आहेत. मी बराच गवळी -धनगर समाज पश्चीम महाराष्ट्र आणि गोव्यातील, कोकणातील काही प्रांतात दिसून येतो. हाच समाज विदर्भात अहिर-धनगर या नावाने पण ओळखला जातो..

    आपण धनगर समाजातील महाराष्ट्रातील १२ पोटजाती आणि पूर्ण भारत भर ६० जातीन मध्ये आपला समाज विखुरलेला आहे..

    मी आशा करतो या संदेशाने आपल्या ला वायीट वाटणार नाही...आणि वाटल्यास क्षमस्व ...

    ReplyDelete
  23. @sunny A
    "आपण मला इतर समाज बांधव समजत असाल तर हे खूप चूक आहे"...आणि मी जात प्रमाणपत्र आणि इतर कायदेशीर दस्तावेज दाखविण्यास तयार आहे"

    मित्र एक विनंती आहे मी परत संदेश पाठवू इच्छित नाही... आपण सर्वांनी धनगर इतिहासावर लिखाण करणे हे सर्वात महत्वाचे आहे...मेश्पालक -धनगर असो वा अहिर -धनगर आपली १४ ते १५ साम्राज्यांच्या इतिहास अंधारात आहे. तो आपण समोर आणला पाहिजे पण वाद -विवादात वेळ वाया घालवतो आहोत.
    आपला इतिहास किती लपविला आणि पळविला आहे हे आपणास मी प्रत्यक्ष भेटल्यावर पुराव्यानिशी दाखवून देयीन
    मी आपणाला एक संदेश इमेल करतो तो आपण कृपया पाहावा -

    विठ्ठल खोत

    ReplyDelete
  24. या सगळ्यात <<"जुद्रा" या (ऋ. १०.९०) शब्दापासुन शुद्र हा शब्द आला असावा असेही एक मत आहे. जुद्रा या शब्दाचा अर्थ चवथा असा होतो. >>हा जुद्रा शब्द कुठं येतो ओ?

    ReplyDelete
  25. जुद्रा म्हणजे चौथा हे कुठं येतं?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...