Monday, July 30, 2012

जाती परिवर्तनीय होत्या व आहेत....


आपण सारे एकच समान इतिहासाचे भागीदार आहोत. इतिहास म्हणजे "असे घडले" हे जे सांगतो तो इतिहास. भारतात इतिहासाला पाचवा वेद मानण्याची प्रथा आहे. हा वेद लिहायचे/सांगण्याचे कार्य सूत, मागध व बंदी या वर्णव्यवस्थेने शूद्र मानलेल्या जाती करत असत. आज या जाती अस्तित्वात नाहीत याचाच अर्थ या जातींचे कार्य नंतर ब्राह्मण समाजाने हाती घेतले. "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या विषयाचा अत्यंत मुलगामी विचार केलेला आहे. सुत-मागधादी लोक पुरातन काळापासुन यज्ञ व उत्सवप्रसंगी आणि राजसभांतही उपस्थितांना इतिहास सांगत असत. या इतिहासाची भाषा आधी प्राकृत असली तरी सहाव्या शतकानंतर ती संस्कृतात अनुवादित होत गेली. हे अनुवाद करत असतांना त्यांत अवास्तव भर काही पोटार्थी ब्राह्मनांनी घातली व मुळ ऐतिहासिक ठेव्याला विकृत केले. अगदी अठराव्या शतकापर्यंत हे भर घालण्याचे काम चालु राहिले. त्यामुळे भारतीय पुराणांत येशू सुद्धा डोकावला. एवढेच नव्हे तर "सन्डे इति रविवारच" असेही घुसवले गेले.

भारतात अनेक नव्या जाती जन्माला आल्या असल्या तरी नष्ट झालेल्या जातीही खुप आहेत. याचा अर्थ त्या जातीयांचा उच्छेद झाला असा नसुन त्यांना पोटार्थी अन्य उद्योग शोधावे लागल्याने त्यांच्या जाती नष्ट झाल्या. तर नवे व्यवसाय/उद्योग वाढल्याने नव्या जाती निर्माण झाल्या.
मी जरी आजकाल विद्यमान जातींचा (म्हणजेच व्यवसायांचा.) इतिहास सागण्याचा प्रयत्न करत असलो तरी नष्ट झालेल्या जातींविषयकही विवेचन तेवढेच महत्वाचे आहे.
याचा अर्थ असा होतो कि जाती अपरिवर्तनीय आहेत, होत्या, हे विधान पुरेपुर खोटे ठरते. आणि त्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेतच. काही जाती नष्ट होणे, नव्या जाती निर्माण होणे, जातींतुन पोटजाती निर्मण होणे आणि काही पोटजातीही नष्ट होणे. उदा. रथकार ही सुतार समाजातील पोटजात आज अस्तित्वात नाही. आयोगव, धिग्वन आदि स्मृतींनी अस्पृष्य मानलेल्या जातीही आज अस्तित्वात नाहीत. उलट महार, मराठा, कायस्थ, शिंपी, रंगारी ई. जाती दहाव्या शतकापुर्वीपर्यंत अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळत नाहीत...
याचाच अर्थ असा होतो कि जातीव्यवस्था अपरिवर्तनीय आहे व होती हा सिद्धांत मुळातच बाद होतो.
मग जर जाती मुळात अपरिवर्तनीय होत्या हा सिद्धांतच पुराव्यअंवर टिकत नसेल तर मग आपण आज जाती अपरिवर्तनीय आहेत असे मानत आपली सामाजिक व्युहरचना का करतो? का आपण जातीअभिमानात गुरफटतो?
आज जी आपली जात आहे ती पुर्वी नव्हती. त्याआधी आपण अजुन कोणत्यातरी अन्य जातीचे असू. पुराणकाळात जे स्थितीस्थापकत्व नव्हते ते मात्र आम्ही आज निर्माण केले आहे. म्हणुनच जातीय संघर्ष पेटलेला आहे. आणि आजची कोणतीही जात अन्य पर्यायच उपलब्ध नसला तरच जातीचे परंपरागत व्यवसाय करते.
याचाच मतितार्थ असा कि जाती परिवर्तनीय होत्या व आहेत.
आणि जाती परिवर्तनीय असतील तर मग त्यांची गरजच काय?
आम्ही हजारो वर्षांपासुन अमुकच जातींचे होतो हा भ्रम कोणत्याही जातीला पाळता येत नाही. जाती मुळात अपरिवर्तनीय नव्हत्या. एका जातीचे (व्यवसायाचे) लोक स्वेच्छेने अन्य जातींत जात होते. कोणतीही जात आभाळातून पडलेली नाही. नष्ट झालेल्या जातींचे लोकही नष्ट झालेले नाहीत तर ते अन्य व्यवसायांत (जातींत) प्रवेशलेले आहेत. हे आतंर-सम्मिश्रण एवढे मोठ्या प्रमानावर झालेले आहे कि मानव आस्तित्वात आला तेंव्हापासूनच एका जातीचे पुर्वज एकाच जातीत होते असे मुळात मानणे अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक आहे.
येथे सांगायची बाब अशी कि जात्युभिमान निरर्थक आहे कारण तुम्ही आज कोणत्याही जातीचे असा...इतिहासात कायमस्वरुपी तुम्ही याच जातीचे होता असा दुराभिमान वा हीनगंडात्मक विचार मुळात करण्याचे काहीएक कारण नाही.जगात मानवजातीला प्रत्येक व्यवसायाची जगण्यासाठी गरज होती, ती सर्वांनीच आपापल्या परीने भागवलेली आहे, त्यामुळे जातींचा दुराभिमान अथवा न्य़ुनगंड बालगणे मुर्खपणाचे आहे.
जर इतिहासात असंख्य जाती नष्ट झालेल्याच आहेत तर त्या आता नष्ट होणार नाहीत असे समजणे हेही अज्ञानाचे लक्षण आहे.

Sunday, July 29, 2012

आर्यभट ते ज्ञानेश्वर आणि पृथ्वी परिवलन सिद्धांत

(हा लेख मी व डा. आनंद दाबक यांनी मिळुन लिहिला आहे.)

Image result for Aryabhata



सोळाव्या शतकात कोपर्निकसने पृथ्वी स्थिर नसून स्वत:भोवती फिरते हा सिद्धांत मांडॆपर्यंत जगभर टोलेमीचा (दुसरे शतक) स्थिर-पृथ्वी सिद्धांत प्रचलित होता. तत्पुर्वी स्यमोसचा अरिस्टार्कस (Aristarchus of samos) याने मात्र इसपु २३० मद्धे सर्वप्रथम सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडुन पृथ्वी सुर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडला होता असे दिसते. अर्थात अरिस्टार्कसचा मुळ ग्रंथ आज उपलब्ध नसुन आर्किमीडीजने त्याच्या सिद्धांताचा (Sand Reckner या ग्रंथात) उल्लेख केला असल्याने हा सिद्धांत आपल्याला माहित आहे. परंतु टोलेमी व अन्य खगोलतज्ञ्यांनी हा सिद्धांत दुर्लक्षित केला व पृथ्वीकेंद्रित विश्वाचाच प्राधान्याने विचार केला. अर्थात अरिस्टार्कसने पृथ्वीकेंद्रीत सिद्धांताला एक पर्याय एवढ्याच मर्यादित अर्थाने सूर्यकेंद्रित विश्वाचा सिद्धांत मांडला होता असे दिसते. शिवाय पृथ्वी स्वत:भोवतीही फिरते असे त्याने स्पष्टपणे म्हटल्याचे दिसत नाही.

उदय आणि अस्त आकाशातील ग्रहनक्षत्रांच्या भ्रमणाने होतो, पृथ्वीच्या नव्हे हाच टोलेमीचा (Ptolemy) विचार युरोपात सोळाव्या शतकापर्यंत प्रबळ राहिला. या पार्श्वभुमीवर भारतात काय घडत होते हेही येथे आपण तपासायला हवे. भारतातही प्राचीन काळापासुन स्थिरपृथ्वी सिद्धांतच प्रबळ होता. परंतु सन ४७६ मद्धे जन्माला आलेल्या आर्यभटाने मात्र आपल्या "आर्यभटीय" या ग्रंथातील गोलाध्यायातील ४.९ व ४.१० या श्लोकांतुन पृथ्वी स्वत:भोवती फिरते व त्यामुळेच वस्तुत: स्थिर असलेल्या नक्षत्रांचा उदय-अस्त झाल्याचा आभास होतो हे सर्वप्रथम स्पष्ट केले. मात्र युरोपात टोलेमीमुळे जे घडले तसेच आपल्याकडे ब्रह्मगुप्त, परमादीश्वर आणि वराहमिहिरांमुळे घडले. त्यांनीही स्थिर-पृथ्वी सिद्धांतच उचलुन धरला.

आर्यभटाचा सिद्धांत फेटाळला जाण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्थिर-पृथ्वी सिद्धांताचे समर्थक असणा-या या विद्वानांनी ४.१० या श्लोकातील "भ्रमति" या शब्दाचा घेतलेला सोयिस्कर अर्थ. हे कसे घडले हे समजावुन घेण्यासाठी आधी आपण आर्यभटाचे मुळ श्लोक पाहुयात:

४.९.१ अनुलोमगतिर्नौस्थ: पश्यत्यचलं विलोमगं यद्वत्।
४.९.२ अचलानि भानि तदवत्समपश्चिमगानि लङ्कायाम्॥
४.१०.१ उदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्त:।
४.१०.२ लङ्कासमपश्चिमगो भपञ्जर: सग्रहो भ्रमति॥

अर्थ: ज्याप्रमाणे अनुलोमगतीने (पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम (मागे) जातांना पाहतो त्याचप्रमाणे लंकेमध्ये (विषुववृत्तावर) अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात. (४.९)

उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा आभास (भ्रम) निर्माण होतो. (४.१०)

वरील श्लोकांच्या आम्ही प्रमाणित केलेल्या अर्थामुळे दोन्ही श्लोकांत एकवाक्यता दिसून येते आणि आर्यभटाला नि:संदिग्धपणे तारे/नक्षत्रे वस्तुता: स्थिर असून पृथ्वीच्या परिवलनामुळे ते पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण प्रवह वायुमुळे (एक काल्पनिक प्रेरणा) नक्षत्रे ग्रहांसहित उदय व अस्तासाठी पश्चिमेकडे वाहुन नेली जात आहेत असा भास निर्माण होतो असे म्हणायचे आहे हे स्पष्ट आहे.

परंतु ४.९ या श्लोकाचा अर्थ, जो सर्वच विद्वानांनी ( आणि डा. मोहन आपटे, डा. जयंत नारळीकर) वर दिला आहे त्याचप्रमाणे घेतला असला तरी ब्रह्मगुप्त, परमादीश्वर ते डा. मोहन आपटे आदि विद्वानांनी मात्र ४.१० श्लोकातील भ्रमतीचा अर्थ "भास" नव्हे तर "फिरतो" असा घेतला आहे. त्यामुळे श्लोकाचा अर्थ असा होतो: प्रवह वायूकडून सतत ढकलला जाणारा सग्रह (ग्रहांसहित असा) भपंजर (तार्‍यांचे जाळे अथवा पिंजरा) पश्चिमेला उदय-अस्तासाठी फिरतो.

"भ्रमति" शब्दाचा "फिरतो" असा अर्थ घेतला तर मात्र मग आर्यभटाला विसंगतीचा दोष लागतो. म्हणजेच तो आपले ४.९ मधील विधान खोडुन काढतो आहे असा अर्थ होतो. म्हनजेच आर्यभटाने नक्षत्रेच फिरत असून पृथ्वी मात्र स्थिर आहे असेच म्हटले आहे असा आपला लाडका तर्क प्रस्थापित करण्यासाठी "भ्रमति" चा सोयीस्कर अर्थ घेतला आहे असे दिसते. वस्तुता: हा अर्थ चुकीचा आहे कारण एकाच श्लोकात "क्षिप्त:" (ढकलला जातो) आणि "भ्रमति" (फिरतो) असे दोन शब्द वापरण्याचे काहीएक संयुक्तिक कारण दिसत नाही. कारण मग भपंजर बरोबर पश्चिमेला फिरतो असे असेल तर "उदयास्तासाठी" भपंजराला ढकलण्याचे प्रवहवायुला कारणच उरत नाही. त्यमुळे "भ्रमति"चा "फिरतो" हा अर्थ चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल.

अलीकडेच मात्र डा. सुभाष काक (संगणकशास्त्र विभागप्रमुख, ओक्लोहामा विद्यापीठ) यांनी "Birth and Early Development of Indian Astronomy " या आपल्या प्रबंधात आर्यभटाच्या ४.१० श्लोकातील " भ्रमति" या शब्दाचा अर्थ आभास (illussion)  असाच घेतला आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत.

म्हणजेच आर्यभटाने दोन श्लोकांत परस्परविरोधी अशी कसलीही विसंगती केलेली नसुन ४.९ व ४.१० या दोन्ही श्लोकांचा अर्थ एकमेकांशी सुसंगत असाच आहे. याच श्लोकांचा आधार घेवून डा. काक यांची विध्यार्थिनी रुपा एच. नारायण यांनी "Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? " यांनी आर्यभटाला सापेक्षतावाद माहित होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनीही "भ्रमति" या शब्दाचा अर्थ "आभास" असाच घेतला आहे, आणि तो संयुक्तिक असाच आहे. अभिषेक पारेख यांनीही आपल्या A Note on Aryabhata's Principle of Relativity या शोधनिबंधातही आर्यभटाच्या या दोन्ही श्लोकांचा आधार घेत ग्यलिलियन सापेक्षतेचा सिद्धांत आर्यभटाला माहित होता हे सिद्ध करण्यासाठी हेच दोन्ही श्लोक वापरले असून "भ्रमति" चा अर्थ त्यांनीही आभास असाच घेतला आहे.

डा. जयंत नारळीकर यांनी आपल्या "आकाशाशी जडले नाते" या प्रसिद्ध ग्रंथात पृष्ठ क्रमांक दोनवर आर्यभटाच्या श्लोक क्र. ४.९ चा आधार देवून असे विधान केले आहे कि "आर्यभटाचे द्रष्टेपण त्या काळी लोकांना कळले नाही. पृथ्वी स्थिर असुन तारकाच्छदित आकाशच आपल्याभोवती फिरते असाच समज टिकुन राहिला. पुढे दहा शतकानंतर कोपर्निकसने हाच मुद्दा युरोपात मांडला. सूर्य आणि ग्रह पृथ्वीप्रदक्षिणा करतात, इत्यादि विश्वास त्या काळी युरोपात इतके दृढमुल झाले होते कि लोकांना खरी वस्तुस्थिती लक्षात यायला त्यानंतर एक ते दीड शतकाचा कालखंड गेला."

पुढे पृष्टः क्र. ३९ वर डा. नारळीकर म्हणतात, "परंतु त्याने (आर्यभटाने) मांडलेली आगळीवेगळी कल्पना कि पृथ्वी स्वता:च्या आसाभोवती फिरते, त्यावेळच्या समाजाला पटली नाही..... स्थिर पृथ्वी सिद्धांत ग्रीस आणि युरोपापलीकडे भारतातही रुजला होता हे आपण जाणतो."

येथे हेही लक्षात घ्यायला हवे कि डा. नारळीकर आर्यभटीयातील ४.१० श्लोकाचा निर्देश करत नाहीत. कदाचित त्यांच्याही मनात परमादीश्वरादींनी घेतलेला "भ्रमति" चा अर्थ "फिरतो" असाच घेतला असावा.

थोडक्यात आर्यभटाचा पृथ्वीच्या स्वांगपरिभ्रमणाचा सिद्धांत त्याच्याच बरोबर अस्तंगत झाला असा एकुणातील मतितार्थ डा.नारळीकरांनी काढला आहे असे दिसते. भारतातील खगोलशास्त्र कोपर्निकसचा उदय (सोळावे शतक) होईपर्यंत स्थिर-पृथ्वी सिद्धांतालाच चिकटुन बसले होते असे आपल्याला पाठ्यपुस्तकांतुनही शिकवण्यात येते आहे. पण ते वास्तव नाही याचा फार मोठा पुरावा आपल्याला तेराव्या शतकातील खुद्द ज्ञानेश्वरच देतात.

ज्ञानेश्वर व त्यांची ज्ञानेश्वरी

ज्ञानेश्वरांना आर्यभटाचा सिद्धांत माहित होता एवढेच नव्हे तर त्यांनी त्या सिद्धांताचा दृष्टांत म्हणुन कसा उपयोग केला  यावर या विद्वानांनी लक्ष पुरवलेले दिसत नाही. त्यासाठी आधी आपण ज्ञानेश्वरांच्या चवथ्या अध्यायातील खालील ओव्या पाहुयात.

"अथवा नावे हन जो रिगे || तो थडियेचे रूख जाता देखे वेगे ||
तेचि साचोकारे जो पाहो लागे || तव रूख म्हण अचळ || (४.९७)

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे || जैसे न चलता सूर्याचे चालणे ||
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे || कर्मेची असता || (४.९९-ज्ञानेश्वरी)"

या ओव्यांचा अर्थ सहज समजु शकेल असाच आहे. ज्ञानेश्वर म्हणतात: नावेतुन जात असता तीरावरीत वृक्ष मागे जातांना दिसतात, परंतु सत्यदृष्टीने नीट पाहिले तर वृक्ष हे अचल आहेत हे समजुन येईल.

आणि उदय-अस्तासाठी ज्याप्रमाणे सूर्य चालत नसतांनाही चालल्यासारखा वाटतो त्याचप्रमाणे कर्मात असूनही नैष्कर्म्य असते.

आर्यभटाच्या श्लोकांचा अनुवाद ज्ञानेश्वरांशी आपण पुन्हा पडताळुन पाहुयात. आर्यभट म्हणतो:  ज्याप्रमाणे अनुलोमगतीने (पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य अचल असा किनारा विलोम (मागे) जातांना पाहतो त्याचप्रमाणे लंकेमध्ये (विषुववृत्तावर) अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जातांना दिसतात. उदय-अस्तासाठी ग्रहांसहीत सर्व नक्षत्रे लंकेच्या बरोबर पश्चिमेला प्रहव वायुमुळे वाहुन नेली जातात असा आभास (भ्रम) निर्माण होतो.

आर्यभट झाला तो पाचव्या शतकात. ज्ञानेश्वरांचा उदय तेराव्या शतकातील. म्हनजे जवळपास आठशे वर्षांनतरही आर्यभटाने "पृथ्वी स्थिर नसुन स्वता:भोवती फिरते" हे विषद करण्यासाठी जी उदाहरणे दिली जवळपास तशीच्या तशी उदाहरणे ज्ञानेश्वरांनी दिली आहेत असे आपल्या लक्षात येईल. याला आपण नक्कीच योगायोग म्हणु शकत नाही. आर्यभट "नक्षत्रे" केंद्रस्थानी घेतो तर ज्ञानेश्वर सूर्य केंद्रस्थानी घेतात असेही आपल्या लक्षात येईल. सूर्य आणि नक्षत्रे स्थिर आहेत पण पृथ्वी स्थिर नाही असाच एकुणातील मतितार्थ यावरुन लक्षात येतो. आणि तो एकमेकांशी सुसंगत आहे. म्हणजेच आर्यभटाच्या ४.१० मधील "भ्रमति" या शब्दाचा अर्थ पुर्वसुरींनी आपल्या लाडक्या "स्थिर-पृथ्वी" सिद्धांताला बळकटी आणण्यासाठी चुकीचा घेतला असे निश्चयाने म्हणता येते.

म्हणजेच आर्यभटाची विचारधारा त्याच्याबरोबरच संपली होती असा तर्क करता येत नाही. आठशे वर्षांनी झालेल्या ज्ञानेश्वरांपर्यंत ती पोहोचली  दुर्लक्षीत राहिली असली तरी, टिकुन राहिली ती आदी शंकराचार्यांनी दिलेल्या एका दृष्टांतातून.  . मुळात ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहित होते  गीता सर्वसामान्यांना सहज समजावी म्हणुन. जी विचारधाराच अस्तित्वात नाही, लुप्त झाली आहे, लोकांना समजुच शकणार नाही अशी स्थिती असती तर ज्ञानेश्वरांनी हा दृष्टांत दिलाच नसता हेही उघड आहे. म्हणजेच आर्यभटीय विचारधारा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात प्रचलित राहिली होती असे म्हणता येते.

यातील दुर्दैवी भाग असा कि पुढील विद्वानांनी आर्यभटाच्या संशोधनाचा आध्यात्मिक दृष्टांतासाठी उपयोग केला, विज्ञान पुढे नेण्यासाठी नाही हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे आणि अध्यात्माच्या अनावर मोहापायी भारतीय विद्वानांनी विज्ञानाची एक प्रकारे हत्याच केली असे म्हणायला पाहिजे.

आर्यभटाने सूर्यकेंद्रित विश्व-सिद्धांत माडला होता काय?

पृथ्वी परिवलन करते पण ती सूर्याभोवती फिरते काय याबाब्त आर्यभटीयात स्पष्ट विधान मिळत नाही हे खरे आहे. परंतु आर्यभटाने तोही विचार केला असावा असे दिसते. ते कसे हे आपण पाहू. मोहन आपटे आपल्या "भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय या ग्रंथात म्हणतात, (पृष्ठ-१२) "...मात्र सर्व ग्रह सुर्याभोवती फिरतात याची आर्यभटाला बहुदा कल्पना आली नसावी. तसा स्पष्ट उल्लेख आर्यभटीयात मिळत नाही. परंतू शीघ्रफल ही आर्यभटाची गणिती क्रिया ग्रहांच्या सूर्यकेंद्री स्थितीचे भूकेंद्री स्थितीत रुपांतर करत, तसेच ग्रहांच्या शीघ्रोच्च परिघावरुन काढलेली त्यांची अंतरे, सूर्यापासुन असलेल्या त्यांच्या अंतराशी बरोबर जुळतात. (कालक्रियापाद, श्लोक:२१.)"

यावरुन आर्यभटाला जर सूर्यकेंद्रित सिद्धांत मांडायचाच नव्हता तर भूकेंद्री आणि सूर्यकेंद्री गृहितके धरत त्यांनी गणित मांडले असते काय, हा प्रश्न उपस्थित होतो. असो. या क्षणी तरी जरी आपल्याला निर्विवादपणे सूर्यकेंद्रीत सिद्धांताचे श्रेय आर्यभटाला देता येत नसले तरी पृथ्वीचे परिवलन आणि नक्षत्रांचे सापेक्ष स्थिर असणे हा सिद्धांत मांडण्याचे श्रेय मात्र निर्विवादपणे आर्यभटाला द्यावे लागते. येथे नमूद करायलाचे हवी ती बाब अशी कि आर्यभटाचा "आर्यभट संहिता" हा दुसरा ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध नाही ज्यात आर्यभटाने आपल्या आर्यभटीयातील निरिक्षणे नोंदवण्यासाठीची गणिते दिलेली असू शकतील.

अरिस्टार्कसने जरी आर्यभटापुर्वीच सूर्यकेंद्रीत विश्व सिद्धांत मांडला असला तरी तो आर्यभटापर्यंत ग्रीकांमुळे पोहोचला काय यावरही येथे विचार करायला हवा. भारतावर ग्रीकांची (अलेक्झांडर) आक्रमणे झाली ती इसपु चवथ्या शतकात. तेंव्हा अरिस्टार्कसचा सिद्धांत अस्तित्वातच नव्हता. मिन्यंडरचे आक्रमण भारतात उत्तर-पश्चिम भागापर्यंत मर्यादित राहिले असले तरी तो स्वत:च बौद्ध धर्मीय बनला. (इसपु १८०) इसपु १०० पर्यंत ग्रीकांची अल्पांश सत्ता भारतातुन नष्ट झाली. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात टोलेमीचा जन्म झाला व दुस-या शतकापर्यंत त्याने भुकेंद्रीत विश्वरचनेचा पुरस्कार केला. तो अधिक तर्कशुद्ध पद्धतीने मांडला गेल्याने अरिस्टार्कस तेंव्हाच मागे पडला. तसेही अरिस्टार्कस निखळ सूर्यकेंद्रीत सिद्धांताचा पाठपुरावा करत नव्हता तर एक पर्यायी व्यवस्था म्हणुन तो सिद्धांत मांडत होता असे दिसते. त्यामुळे जरी भारतीयांचा ग्रीकांशी इसपु चवथे शतक ते इसपु पहिले शतक या काळात जरी संपर्क आला असला तरी अरिस्टार्कसच्या सूर्यकेंद्रीत विश्वरचनेच्या सिद्धांताचा प्रसार भारतात होण्याचे कारण दिसत नाही. आर्यभट हा बिहारमद्धे जन्माला आला तो चवथ्या शतकाच्या उत्तरार्धात. बिहारमद्धे त्याचा पृथ्वी परिवलन सिद्धांत मान्य न झाल्याने तो प्रथम गुजराथेत व तेथेही उपहासच झाल्याने तो केरळकडे निघुन गेला ही आख्याईका डा. नारळीकरांनी त्यांच्या उपरोल्लेखित ग्रंथात मांडलेली आहे. थोडक्यात ग्रीकांचे भारतातील अस्तित्व संपल्यानंतर जवळपास पाचशे वर्षांनी आर्यभटाने ग्रीकांपासुन, जो सिद्धांत तोवर मृतप्राय झाला होता, त्यापासुन उसनवारी केली असेल असे मानायचे संयुक्तिक कारण दिसत नाही.

एवढेच नव्हे तर, अरिस्टार्कसचा सिद्धांत खुद्द ग्रीस आणि युरोपातुन सोळाव्या शतकापर्यंत, कोपर्निकसच्या उदयापर्यंत गायब झाला
तसे काही भारतात घडल्याचे दिसत नाही हे ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतुन सिद्ध केले आहे. म्हणजे आर्यभट ते ज्ञानेश्वर अशी किमान आठशे वर्ष विखंडित असेल वा काळमान्य असेल, आर्यभटीय पृथ्वी-परिवलन व कदाचीत सूर्यकेंद्रीत सिद्धांतही टिकुन राहिला. भारत युरोपाप्रमाणे सोळाव्या शतकापर्यंत अंधारयुगातच राहीला हे मत त्यामुळेच मान्य करता येत नाही.

येथे आर्यभटाची प्रज्ञा आणि ज्ञानेश्वरांचे खगोलशास्त्रावरचे प्रभुत्व याबाबत अचंबा वाटतो आणि आदराने मन नतमस्तक होते. भारताचे खगोलशास्त्रात असलेले हे योगदान कसलीही कृपणता न दाखवता मान्य करायला हवे.

डा. आनंद दाबक
संजय सोनवणी

संदर्भ: १. आर्यभटीय- गोलपाद ४.९ व ४.१०
२. आकाशाशी जडले नाते. डा. जयंत नारळीकर. (पृष्ठ २ व ३९)
३. "Birth and Early Development of Indian Astronomy - Dr. Subhash Kak
4.  Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? - Roopa H. Narayan
5. A Note on Aryabhata's Principle of Relativity- Abhishek Parekh
6. भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय- डा. मोहन आपटे
७. श्री ज्ञानेश्वरी- ४.९७-९९


Saturday, July 28, 2012

महाराणी अहल्याबाई व धनगरांची बदनामी...



फ़ेसबुकवरील "मानव भोसले" आणि "मराठा रियासत" या अकाउंटसवर मानव भोसलेने महाराणी अहल्याबाई होळकर , धनगर समाज आणि महादेव जानकर यांची अश्लाघ्य, अश्लील अशा भाषेत बदनामी केली आहे. या विकृतांविरुद्ध सुजाण समाज जी कारवाई करायची ती करेलच. ती केली जायलाच हवी, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

रायगडावरील वाघ्या प्रकरणात सलग दोन वर्ष नाकावर आदळलेले, मस्ती आणि गुर्मीची सवय असलेले, आम्ही सांगतो तोच इतिहास अशा भ्रमात राहणारे या पराभवाने आपले मन:स्वास्थ्य बिघडवून बसलेले आहेत. वाघ्याच्या घटनेतुन योग्य बोध न घेता, आत्मचिंतन करत न्याय्य वाटेने न चालता या ब्रिगेडी मंडळीने पुन्हा आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवण्याचा व समाजात संतापाचा उद्रेक उठवण्याच चंग बांधला आहे, हे उघड दिसते. या मंडळीला धनगरच नव्हे तर अप्रत्यक्षरित्या सुजाण मराठा बांधवांनाही बदनाम करायचे आहे. महाराणी अहल्याबाईंची महत्ता जगभर मान्य केली गेली आहे. त्यांच्याएवढ्या महन्मंगल, शूर, दानशूर आणि त्याच वेळीस प्रजाहितदक्ष अशी उत्कृष्ठ महिला प्रशासक जगात झाली नाही असा होळ्करांचा शतृ असलेल्या सर जोन माल्कमचाही निर्वाळा आहे. अशा पूज्य महाराणीवर जे अश्लाघ्य भाषेत राळ उठवू शकतात त्यांची जागा कोठे आहे हे मी सांगण्याची गरज नाही.

एकीकडे सर्व समाजात ऐक्य प्रस्थापित व्हावे असे प्रयत्न सुजाण लोक करत असतांना, त्यात थोडेफार का होईना यश मिळत आहे याची चाहुल लागत असतांना त्यात अदथळा आणत समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा चंग या मंडळीने बांधलेला आहे. धनगर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा व सोशीक समाजघटक आहे. मराठा वर्चस्ववादाने विकृत झालेले मराठा पोरे आणि मुली याबद्दल अत्यंत घाणेरडे लिहित धनगर हेच "कुत्रे" आहेत असे "मराठा रियासत" या अकांउंटवर मानव भोसले लिहितो. त्याला धडाधड लाइक्स पडतात ही अजुन एक विकृती. यांचे बोलवते धनी त्यांच्या पाठीशी असल्याखेरीज अशी हिम्मत यांची होणार नाही हेही तेवढेच खरे. पण यामुळे एकामागुन एक समाज ते तोडत चालले आहेत, दुखवत चालले आहेत आणि या पापाची फळे कोण भोगणार?

फ़ेसबुकवर ख-या-खोट्या नांवाने कोनालाही बदनाम केले जाते. पण याचा अर्थ पोलीस त्यांना शोधु शकणार नाही असा त्यांचा भ्रम असतो. आम्ही महापुरुषांच्या बदनामेविरुद्ध कायम स्वरुपी  एक विधेयक पारित करुन घेण्याच्या प्रयत्नांत आहोत. ते पारित होईल तेंव्हा होईल, पण समाजात जोवर असे विकृत आहेत तोवर ख-या अर्थाने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. ब्रिगेडने आपली उरली सुरली लाज वेशीवर टांगण्याचा चंग बांधुन छ. संभाजी महाराजांनाही बदनाम केले आहेच. वाघ्याला हटवता येणे यांना कालत्रयी शक्य नाही या नैराश्यातुन अशा विकृत्या उसळुन येणार असतील तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

माझी सर्व सुजाण बांधवांना नम्र विनंती कि कोणत्याही समाजातील महापुरुष असोत, त्यांची बदनामी करु पाहणा-यांना धडा शिकवा. त्यांचा जमेल त्या मार्गाने निषेध करा. नाहीतर आपला समाज सर्वैक्याची स्वप्ने कधीच साकार करु शकनार नाही.

हा साराच प्रकार उद्विग्न, खिन्न आणि हताश करणारा आहे. मी या मनोविकृतांचा निषेध करतो.

Friday, July 27, 2012

सत्त्याबद्दल...



१. मानवी जगात निरपेक्ष असे सत्त्य अस्तित्वात असू शकत नाही.

२. मनुष्य हा भावनीक प्राणि असल्याने त्याचे सत्त्य हे भावनीक...एव-तेव सापेक्ष सत्त्य असते.

३. त्यामुळेच मानवी जीवनात अंतिम सत्त्य असे कोणतेही तत्व नसते.

४. एकाला जे सत्त्य वाटते ते दुस-याला वाटु शकत नाही, वा एकालाच आज जे सत्त्य वाटते ते नंतर सत्त्य वाटेलच असे नाही, कारण मानवी सत्त्याच्या कल्पना या काळाने बद्ध असतात.

५. म्हणुनच असत्त्यालाही काही अर्थ नसतो. कालची सत्त्ये आज असत्त्य वाटु शकतात तर आजची असत्त्ये उद्याची सत्त्ये बनु शकतात.

६. शाश्वत सत्त्याचा शोध हा मृगजळाचा शोध ठरतो तो यामुळेच.

७. शोध सत्त्याचा नसून तथ्यांचा असू शकतो. तथ्ये सत्त्य असतातच असे नाही. सापडलेली तथ्ये माहितीचा विस्तार असतात. ज्ञानाचा नव्हे.

८. जी सत्ये आजवर गवसल्याचा दावा केला गेला आहे ती भावनिक व म्हणुन संस्कारीत सत्ये आहेत. निरपेक्ष सत्ये नाहीत.

९. संस्कारीत होऊ शकते असे सत्त्य असु शकत नाही.

९. शाश्वत म्हणता येईल असे एकही सत्त्य मानवाला गवसलेले नाही वा कधी गवसणारही नाही. भावनिक असणे ही निरपेक्ष सत्याकडे जाणा-या मार्गातील अलांघ्य व अभेद्य अशी भिंत आहे.

१०. भावनिक असण्यातच मनुष्याचे मनुष्यपण आहे.

Wednesday, July 25, 2012

जो घाणीत आहे त्याला ...


मला असा प्रश्न अनेकदा विचारला जातो कि पोटा-पाण्यासाठीच्या धडपडी सोडुन जेथे अंगावर चिखलच उडणार अशा क्षेत्रात कशाला पडताय? आपल्या कादंब-या लिहित लोकांचे मनोरंजन करत होता ते तरी बरे होते. हे विचारांचे काही खरे नाही. एक तर त्याची कोणालाही गरज नाही. त्यासाठी कोणाला वेळही नाही. हा...भजन-किर्तन करणार असाल तर गोष्ट वेगळी...बहुजनांकडे त्यासाठी वेळच वेळ आहे. इहलोकीची आणि परलोकीची चिंता काही क्षण तरी मिटते कि नाही? मग कशाला पाहिजेत या डोकेदुख्या आणि लष्कराच्या भाक-या भाजण्याचा उद्योग?

वरकरणी या युक्तिवादात काही वावगे वाटणार नाही. तसेही हजारो-लाखो वर्ष आम्ही विचारबुद्धी बासणात गुंडाळुन ठेवुन जगलोच आहोत कि! कोणी माड्या उभारल्या तर कोणी वैभवशाली सत्ता. कोणी "ठेविले अनंते तैसेची रहावे" म्हणत आजीवन गुलाम राहिले तर कोणी सरळ संन्यास घेत राना-वनात निघुनही गेले. वैचारिकतेच्या अभावात कोणाचे अडले? तुम्ही जागेत चाला कि झोपेत... असे काय आणि तसे काय....चालणे काय कोणाच्या नशीबीचे चुकले आहे थोडेच?

हरकत नाही. पण हा लष्करच्या भाक-या भाजण्यापुरता विषय मर्यादित नाही कि "ठेवीले अनंते" टाईप जगायचाही उद्योग नाही. साधी गोष्ट आहे, समजा ज्या घरात आपण रहातो त्या घरात समजा सर्वत्र विखारी पालींच्या झुंडी आहेत. सर्वत्र अविचारांचा कचरा पसरलेला आहे. जहरी सर्पांनी द्वेषाचे फुत्कार सोडण्याचा अहोरात्र चंग बांधला आहे. सर्वांनी सर्वांना खाण्याचा चंग बांधलेला आहे. एक तुमुळ जहरी युद्ध तुम्ही राहता त्या जागेत अविरत सुरु आहे. आता असे म्हणता येईल का कि या सर्व गोष्टींकडे सरळ दुर्लक्ष करत राहता येत नाही का?

येता येईल कि. दुर्लक्ष केले कि झाले. तसेही आपण करतोच कि! सापांच्या डसण्याचीही सवय होतेच कि...कधी कधी एवढी कि आपण डसले जात आहोत हेच मुळात समजुन येत नाही. त्यांचे जहर आपल्याला हळु हळु ठार मारतेय हेही समजुन येत नाही. आपण आपल्या आजारांची कारणे कोठेतरी अन्यत्र शोधुन मनाचे समाधान करुन घेतोच कि!

पण याला जगणे म्हणत नसतात. ज्या घरात आपण रहातो ते किमान स्वच्छ असावे असे आपल्याला वाटत नसते असे नाही. फक्त आपण ते स्वच्छ करु इच्छितो कि नाही एवढाच प्रश्न असतो. त्यात घाण म्हणजे काय घाण आहे आणि कशाला दूर रेटायला हवे हेच समजले नाही तर? अनेकांच्या बाबतीत असेही होते हे खरेच आहे. सरडे-पाली-सापांनाच आपली दैवते मानत तसेच जहरी फुत्कार सोडणारे महन्मंगल मानवतावादी किरणांना घरात प्रवेशण्यापासुन रोखु पाहणारे काय कमी "स्वच्छतावादी" असतात काय? म्हणजे एकार्थाने स्वच्छतेच्या कल्पनाही व्यक्तिपरत्वे बदलु शकतात. हेही घर स्वच्छ करु शकत नाहीत. उलट मुळच्या अस्वच्छतेला अधिक कोंदट, कुबट आणि म्हणुणच अधिकच घाणेरडे बनवत असतात.

आज आपले जग असेच बनले आहे. ज्याला आम्ही संस्कृती म्हनतो आणि जिचा अभिमान बाळगतो ती अशी घाणीची कचराकुंडी झालेली आहे. पाणीसुद्धा प्रदिर्घकाळ साठले कि तेही वास मारु लागते. आमची संस्कृती अशीच वास मारते आहे. आणि तरीही तिचा नको असा दुराभिमान आहे. आम्हाला सफाई नको आहे कारंण आम्ही या घाणीला सरावलेलो आहोत...एवढे कि ही सारी काही घाण आहे याची जाणीवच उरलेली नाही. ज्यांना होते ते या घाणीतीलच काही घाणीला आराध्य बनवत दुस-या घाणीवर तुटुन पडताहेत. कारण स्वच्छता म्हणजे नेमके काय हे घाणीत राहण्याच्या चिरकाळ सवयीमुळे विसरुन गेलेले आहेत.

स्वच्छतेचा अर्थ कळतच नाही असे लोक नसतातच असे नाही. पण मग या घाणीचा आवाका लक्षात येताच तेही हबकुन जातात. स्वाभाविक आहे, आत घाण...बाहेर घाण...आभाळ घाण...भुमी गलिच्छ...असे दिसले कि दुसरे काय होणार? एक घाण दुर करायला गेले रे गेले कि दुस-या घाणी अंगावर येणारच. ज्याला स्वच्छ करायचे आहे त्यालाच गलिच्छ करणारच.

हा लढा तसा सोपा नाही. जो घाणीत आहे त्याला घाणीची जाणीव करुन दिली तरच काही तरी शक्य आहे. घाणीत लोळण्याची सुक्कर-आनंदी सवय त्याशिवाय कशी बदलु शकु आपण?

होय...आज आम्ही अत्यंत घाणीने भरलेल्या जगात जगतो आहोत. आत घाण बाहेर घाण. त्यातुनच जन्माला येणरे विखार...राग-लोभ...काहीही निरामय नाही. पवित्र नाही. महन्मंगल नाही.

पोटपाणी तर आहेच. असतेच आणि राहणार आहे. पण मग या घाणीतल्या किड्यांप्रमाणे पोट भरत अंधाराला चघलत उजेदाची वांझ स्वप्ने पहायची कि एकदाचे हे सारे काही सर्वांनी मिळुन साफ करत उद्याचा सुर्य आपल्या ओंजळीत घ्यायची आस बाळगायची हा आपला प्रश्न आहे.

आणि माझ्यापुरता तरी तो सुटलेला आहे...

Monday, July 23, 2012

"ऐसी अक्षरे" या जातीयवादी संस्थळावर बंदीची मागणी...


"आपण यांचं मीठ खाल्लय" हा माझा आगरी समाजाचा इतिहास सांगणारा लेख दै. नवशक्तीत प्रकाशीत झाला होता. हा व अन्य विणकर, शिंपी, डहर उर्फ ढोर या जातींचाही इतिहास सांगनारे लेख मी नुकतेच ऐसी अक्षरे ( aisiakshare.com )  या एका सुबुद्ध व्यक्तींनी चालवलेल्या विचारी म्हणवणा-या संस्थळावर प्रकाशित केले होते. लेख जेंव्हा प्रसिद्ध केला जातो तेंव्हा त्यावर वाचकांची टीका-टिप्पण्णी अपरिहार्य अशीच असते. किंबहुना तीच अपेक्षीत असते. त्यातुन विषय पुढे जायला मदत होत असते. परंतु या संस्थळावर जो जातीयवादाचा भयंकर पगडा आहे तो पाहता अशी संस्थळे ही समाजविघातक आहेत हे लक्षात येईल.

माझ्यावर व्यक्तिगत टिका मी समजु शकतो. जातीय झुंडशाहीची ती एक अपरिहार्य अवस्था असते. कंपु करून संस्थळावरील आपलाच हक्क अबाधीत ठेवायचा असे लोक प्रयत्न करनारच. कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या (स्व-कंपुतील नसलेल्या) लेखकाच्या प्रतिपादनाकडे लक्ष न देता त्याची शैली कशी आहे व कशी असायला हवी याचेच चर्वितचर्वण करण्यात अशांना रस असतो. हेतु साधा असतो तो हा कि इतरांना नाउमेद करणे. माझा मुद्दा समजावुन घेण्यासाठी मी आधी त्यांच्या समग्र प्रतिक्रिया येथे प्रकाशित करत आहे. कृपया त्या शांतपणे वाचाव्यात.


Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
Sun, 22/07/2012 - 19:27 |  लेख.... (Score: 4 रोचक )
मन
पुण्य: 2
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे. असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
· प्रतिसाद

--मनोबा

· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 20:20 |  सहमत/असहमत (Score: 4 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
>>>>>>>>>>>>>>>
लेख कसा वाटला ह्याबद्दल अधिक सांगू इच्छित नाही.वरती चर्चा, आक्षेप चाललेलेच आहेत.
विक्रम देशपांडे ह्यांचे प्रतिसाद हिडिस,गलिच्छ वाटले. विशेषतः पुढील वाक्ये:-
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
वाटाघाटी करणारे हे कोण आहेत, आणि कशाच्या वाटाघाटी करणार आहेत हे कळले तर बरे.
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
प्रचंड सहमत.
>>>>>>>>>>>>>>>>>
असे प्रतिसाद इथे(ही)राहतात हे पाहून आश्चर्य वाटले.कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात.
<<<<<<<<<<<<<<<<<<
१. ऐसी अक्षरेच्या धोरणांनुसार कुणालाही आपली राजकीय/सामाजिक संदर्भाततली मते मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्याशी सहमत/असहमत होणे, त्याला विरोध करणे , कडकडीत निषेध नोंदवणे याचीही मोकळीक आहे.
२. "ब्राह्मणांच्या हत्याकांडा"ची कॉन्स्पिरसी थिअरी विनोदी वाटली. त्याच्याशी असहमती नोंदवतो.
देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो.
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Sun, 22/07/2012 - 16:00 |  धागालेखकाच्या हास्यास्पद (Score: 1 )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
धागालेखकाच्या हास्यास्पद प्रतिसादांना काहीही उत्तर देणे नाही!
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 09:24 |  मिठाचा 'शोध' कोणी लावला? (Score: 5 मार्मिक )
अरविंद कोल्हटकर
पुण्य: 2
ह्या लेखातील अतिव्याप्त विधानांबद्दल फार काही लिहीत नाही. बहुजनसमाजाला योग्य ते श्रेय दिले जात नाही अशा रुखरुखीतून हे लेखन निर्माण होत आहे. वाचणारे वाचतात आणि टाळ्या वाजवतात. बहुप्रसव लेखकाच्या नावावर आणखी एक 'वैचारिक' पुस्तक जमा होते. 'Preaching to the converted' अशा प्रकारचे हे लिखाण वाटते.
'आगरी समाजाचे भारतीय संस्कृतीवर फार मोठे उपकार आहेत. कारण त्यांनी मीठाचा शोध लावला' ह्या एका विधानावर थोडे सविस्तर लिहितो. मीठ कोणी 'शोधले', चाक कोणी 'शोधले', विस्तव कोणी 'शोधला', आडोसा निर्माण केला किंवा प्राण्यांची कातडी पांघरली तर ऊन्ह-वारा-पाऊस-थंडीपासून बचाव होतो हे कोणी 'शोधले' अशा प्रश्नांना उत्तरे असतात असे मला वाटत नाही. 'शोधले' कोणीच काहीच नाही, जे निसर्गाने उपलब्ध होते ते 'ओळखले' इतकेच म्हणता येईल. तेहि अमुक एका काळी किंवा अमुक एका जागीच घडले असेहि म्हणता येत नाही. हे होतेच आणि अनेक जागी आणि अनेक वेळा हे स्वतन्तपणे लक्षात आले इतकेच म्हणता येईल. हे हजारो वर्षांपूर्वीच घडले असावे, त्याचा इतिहास फक्त सात हजार वर्षांचाच आहे असे मानायचीहि गरज नाही. हिंदुस्तानाच्या पश्चिम किनार्यावर घडले असेल तसेच बंगालच्या पूर्व किनार्यावरहि स्वतन्त्रपणे सापडले असेल, मध्यपूर्वेतील उष्ण समुद्रकिनार्यांवरहि सापडले असेल. सोनवणींच्या स्कीममध्ये आगरी - का कोळी? - जमातीला ह्याचा copyright द्यायचा असला तर ते त्यांचे स्वातन्त्र्य आहे पण सर्वांनी ती स्तुतिस्तवने गाण्यात मागे सूर लावावा इतके काही आगरी - का कोळी - समाजाचे विशेष योगदान मीठक्षेत्रात मला दिसत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 00:09 |  ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची (Score: 2 मार्मिक )
ऐसीअक्षरे
पुण्य: 1
ऐसी अक्षरे या संकेतस्थळाची अधिकृत भूमिका सर्व पानांच्या तळाशी ऐसीअक्षरेची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे दिसते. त्यातल्या मार्गदर्श तत्त्वांत उल्लेखल्याप्रमाणे "जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल." सर्व विचारसरणींच्या, सर्व प्रकारच्या सदस्यांचे ऐसी अक्षरेवर स्वागतच आहे.
सदस्यांनी लेखन करताना व्यक्तिगत आरोप आणि अशिष्ट भाषा टाळावी ही विनंती.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 01:41 |  मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
श्री. सोनवणी : <<<<< मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही>>>>> माझे नाव व टोपणनाव एकच आहे. व मुख्य म्हंजे मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण इतर जातींपेक्षा महान आहेत हे मान्य करताना मला कसलाही अपराधीपणा वाटत नाही. टोपणनावांबद्दल तुमचा राग हा टोपणनाव घेणार्याची जात ओळखता येत नाही म्हणून आहे. व तुमचा दावा की -- मी सर्व जातींचा मी सन्मान करतो -- हा तर सोंगीपणाचा कळस आहे. तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. ब्राह्मण हे कोणत्याही क्षमतेविना "वरचे" झाले व बाकीचे सर्व क्षमता असूनही "खालचे" राहिले असे सिद्ध करण्याचा उद्योग करणे याचा अर्थ विद्वत्ता नव्हे व इतिहास संशोधन त्याहून नव्हे.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 13:52 |  सर्वांचे आभार. मी ही (Score: 2 रोचक )
Sun, 22/07/2012 - 11:25 |  जनरलायझेशन (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
ठाणे व रायगड्(उत्तर) परिसरातच आगरी समाज हा (उत्तर भारतातील) जाटांप्रमाणे (जट जट जट .... दो दुने अठ) आडमुठा, हेकट, अशिक्षित, दांडगाई करण्यास उत्सुक म्हणून कुप्रसिद्ध आहे. जसे शिख लढवय्ये आहेत तसे जाट ही. पण आगर्यांची दादागिरी ही स्थानिकांवरच चालते. पण एखाद्या समाजाचे गुण मान्य करताना जनरलायझेशन चा दोष लागत नाही पण त्याच समाजास दोष देताना मात्र 'जनरलायझेशन होते' म्हणून गळे काढताना हे सोनवणींसारखे पुरोगामी लोक पुढे असतात. आगरी समाजाचा विकास झालेला नाही. हा समाज मागासच आहे. पण आपल्या मागासपणाचे खापर मात्र बामणांवर फोडायला हे अतिमागास आगरी/कोळी एकदम एका पायावर तय्यार असतात. माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 12:06 |  विक्रमजी, आगरी/कोळी आज (Score: 3 रोचक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
विक्रमजी, आगरी/कोळी आज प्रबोधनाच्या वाटेवर आहेत. गेल्या चार महिन्यात या समाजाने १८ सामाजिक चचासत्रे घेतली. एका सत्राला मीही उपस्थित होतो. ब्राह्मणांना दोष देनारे एकही भाषण कोणी केले नाही. शिवाय तुम्ही त्या समाजाला सरसकट निम्नस्तरीय म्हनता हे तुम्हाला जरा अतीच वाटत नाही काय? प्रबोधनाच्या वाटेवर जे निघाले आहेत त्यांना अडवू पाहणारे तुमचे विधान नाही काय? मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 13:11 |  हे योग्यच आहे. (Score: -1 भडकाऊ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
<<<<<<<<मागासांना विकसीत होण्यासाठी शुभेच्छा देण्याऐवजी तुम्ही त्यांना सरळ अतिमागासांत ढकलत आहात हे योग्य आहे काय?>>>>>>>>
हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.
आणि तुम्ही ब्राह्मणांचा उल्लेख लेखामधे केला नाही पण खाली केला आहे. (आ.रा. ना उत्तर देताना.). मुख्य मुद्दा म्हंजे तुम्हास फरक पडला किंवा नाही याने ब्राह्मणांना अजिबात फरक पडत नाही. तुम्ही सर्वजातसमभाव बाळगता. पण ब्राह्मण तो भाव न बाळगताही पुढारलेले व श्रेष्ठ आहेत. व याचे पुरावे ढीग भर आहेत. सगळ्या जातीच्या लोकांना उच्च आंतरजातिय व विशेषतः ब्राह्मण जोडीदार हवा असतो यातच सगळे आले. तेव्हा तुमचा उद्योग ब्राह्मणांपेक्षा इतरांचे योगदान उच्च आहे हे दाखवण्याचा असला तरी त्याने फरक अत्यंत नॉमिनल पडणार आहे.
शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 15:16 |  जनसामान्य (Score: 5 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
कुणासाठीही लिहा. विद्वानांसाठी लिहा, जनसामान्यांसाठी लिहा. पण अवास्तव विधानांच्या आधारे कुणाला अस्मिता मिळवून देऊ असे तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे.
इतिहास व संस्कृती घडवण्यात जनसामान्यांचे योगदान राजेमहाराजांपेक्षा खूप अधिक आहे हे दाखवण्यासाठी असत्याचा आधार घेण्याची काहीच गरज नाही. उपलब्ध आणि अधिकृत इतिहासात याचे बरेच दाखले मिळतात. शिवाजीचं आख्खं चरित्र जनसामान्यांची ताकत अधोरेखीत करणारं आहे. भारताचा स्वातंत्र्यलढा तशीच कहाणी सांगतो. मध्ययुगातील भक्ती-सूफी परंपरा या जनसामान्यांच्या महान सांस्कृतिक योगदानाचा भला मोठा पुरावा आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर दामोदर कोसंबींनी आणि त्यांच्या समविचारी इतिहासकारांनी जो प्रकाश टाकला आहे त्यातून जनसामान्यांचे इतिहासातील स्थान आणि महत्व याचे लख्ख दर्शन घडते.
हे जे लिहिलेले आहे, ते साधारण सामान्य ज्ञान असलेला कोणीही "सामान्य माणूस" (माझ्यासारखा. मी विद्वान नाही. इतिहासकारही नाही. आणि सांगायला हरकत नाही, "ब्राह्मण" ही नाही.) मान्य करणार नाही. जनसामान्य जनसामान्य करत सत्याशी तडजोड ठीक नव्हे. जनसामान्यांचा अपमान करु नका.
या लेखात आक्षेपार्ह वाटते ते हे, की कोळी-आगरी समाजाच्या सध्याच्या व्यवसायासंदर्भात जे जे काही इतिहासात घडले आहे, त्याचे त्याचे सर्व श्रेय एक्स्लिझिव्हली याच समाजाला दिलेले आहे. जसे काही मानवी संस्कृतीच्या आरंभापासून कोळी-आगरी आणि इतर अशी विभागणी होती, आणि नॉन कोळी-नॉन आगरी मंडळींचा मीठ, नौकानयन, व्यापार, विणकाम याच्याशी संबंधच नव्हता. इतिहास सर्वांचाच आहे. हे असे अस्मिता जागे करण्याच्या नादात आपण जातींचे ध्रुवीकरण करीत आहात हे ध्यानात घ्यावे.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 14:05 |  कोणतीही मते खोडुन काढतांना (Score: 0 निरर्थक )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कोणतीही मते खोडुन काढतांना अरविंद कोल्हटकर देतात तसे पुरावे द्यावे लागतात. याच लेखमालिकेतील बाकीचे लेखही वाचले असते तर काही व्यवसाय हे एक्सक्ल्युजिव आहेत तर काही नाहीत हे लक्षात आले असते. पण सरधोपट विधाने करणा-यांना हे कोण शिकवणार?
दुसरे, तुम्ही ब्राह्मण आहात कि ढोर समाजाचे, मला काही फरक पडत नाही कारण मी सर्व जातींचा सन्मान करतो. शेवटी जाती कशाही निर्माण झालेल्या असोत...त्या होत्या आणि आहेत आणि राहणार आहेत. जातींचे ध्रुवीकरण नव्हे तर प्रत्येक जातीसमुहाचे संस्कृती घडवण्यातील योगदान मला अभिप्रेत आहे कि ज्यामुळे जाती एकमेकांकडे अधिक सन्मानाने पाहतील.
राहिले मी जनसामान्यांचा अवमान करतोय कि नाही...त्याचे उत्तर जनसामान्यांवरच सोडलेले बरे. त्याचे उत्तर मी तुमच्यासारख्या असामान्यांकडुन मागितलेले नाही. किंवा जनसामान्यही तुमच्याकडे तक्रार घेवुन आलेले नाहीत. मुळात टोपननावे घेत बेहोश-बेधुंद उधळना-यांना मी किंमत देत नाही. वाकड्यात घुसण्यातच ज्यांना विकृत मौज वाटते त्यांच्यासाठी माझ्याकडे काही मनोरुग्णालयांची/मानसोपचार तज्ञांची यादी आहे..गरज भासलयास ती मी पुरवू शकेल.
तुम्ही म्हनता तुम्ही "सामान्य" आहात. नव्हे तुमच्याएवढ्या सामान्य प्रतीचा माणुस मी क्वचितच पाहिला असेल. त्यामुळेच तर तुम्ही "असामान्य" ठरता.
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
धन्यवाद.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· प्रतिसाद
Sun, 22/07/2012 - 16:11 |  माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्यान(Score: -1 खोडसाळ )
विक्रमदेशपांडे
पुण्य: 1
<<<<<<<<<<<<<माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.>>>>>>>>
सोनवणी, तुम्हास ही म्हण ठाऊक आहे का - अगं अगं म्हशी मला कुठे नेशी.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 20:51 |  संजय सोनवणी, श्री आळशांचा (Score: 5 मार्मिक )
अर्धवट
पुण्य: 2
संजय सोनवणी,
श्री आळशांचा राजा हे बहुतेक सर्वच संकेतस्थळांवर संयत व सामंजस्याची भूमिका मांडताना दिसतात, त्यांच्या वरील प्रतिसादातही मला काहिच आक्षेपार्ह आढळले नाही. आपला आक्रस्ताळेपणाचा प्रतिसाद व असभ्य भाषा यांचे या सदस्यांच्याबाबत या प्रतिसादात तरी वापरण्याचे काहीच प्रयोजन नव्हते.
संस्थळावर लेखन करायचे असेल तर त्यावर जे काही प्रतिसाद येणार ते वाचण्याची, समजुन घेण्याची, व त्याचा सभ्यपणाने प्रतिवाद करण्याची तयारी असणे हे आवश्यक ठरतेच.
तुमच्या लेखनाचा उदोउदो करणार्या लोकांसाठीच तुमचे लेखन असेल तर तसा फोरम निवडायला हवा.
केवळ कोणी विरोधी मत मांडले म्हणून असा आकांडतांडव कराल, तर काही दिवसांनी केवळ एकांगी विचार करणार्यांची फौज भोवताली जमा होउन, आपली मते तपासून बघण्याची क्षमताच नव्हे शक्यताही नाहीशी होईल.
असो...
श्री आळश्यांचा राजा यांच्या संदर्भात वापरलेल्या अनुचित आणि असभ्य भाषेचा तीव्र निषेध.
· प्रतिसाद
Sat, 21/07/2012 - 16:22 |  खिक्... (Score: 5 मार्मिक )
श्रावण मोडक
पुण्य: 2
माझी या संस्थळाच्या मालकांना विनंती आहे कि माझी येथे गरज नसल्याने माझे सदस्यत्व रद्द करण्यात यावे.
खिक्... गरज? खुल्या संकेतस्थळांवर ती कधीच नसते. तसे तुम्हाला कोणी भासवून दिले असेल तर तो त्याचा मूर्खपणा आहे इतकेच.
· प्रतिसाद
Wed, 18/07/2012 - 14:33 |  मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी (Score: 4 मार्मिक )
बिपिन कार्यकर्ते
पुण्य: 1
मी ही लेखमाकिका विद्वानांसाठी लिहित नाहीहे. अस्मितेच्या शोधात असलेल्या जनसामान्यांसाठी लिहित आहे.
असं असेल तर मग, मला वाटतं की स्वीपिंग स्टेटमेंट्स अथवा गुणी लेखनाबद्दल वर जे काही म्हणले गेले आहे ते अधिकच महत्वाचे ठरते.
काय म्हणता?
· प्रतिसाद
बिपिन कार्यकर्ते
Sat, 21/07/2012 - 14:06 |  कार्यकर्ते...गुणी लेखनाचा (Score: 1 )
संजय सोनवणी
पुण्य: 1
कार्यकर्ते...गुणी लेखनाचा क्लास काढा कि राव...पहिला विद्यार्थी मी होतो. पक्कं.
तुम्ही स्वतःच्या प्रतिक्रियेस श्रेणी देऊ शकत नाही.
· संपादन

· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 08:53 |  मीठाच्या व्यापारासंदर्भात (Score: 1 )
३_१४ विक्षिप्त अदिती
पुण्य: 2
मीठाच्या व्यापारासंदर्भात 'बखर अंत़काळाची' (का 'अंताजीची बखर') मधे रोचक माहिती आहे. तपशील फारसा आठवत नाही, पण कादंबरीतल्या मुख्य पात्राचे वडील कोकणातून मीठ विकत घेऊन त्यात माती मिसळून मीठ बरंच महाग विकत असत. त्या काळात मातकट, काळपट मीठ फार महाग असे.
ठाणे शहराच्या आसपास रहाणार्या आगरी लोकांची भाषा ऐकत रहावी अशी गोड वाटते, अगदी शिव्यापण. या बायका प्रेमाने बोलताना, कौतुक करतानाही अस्सल शिव्या देतात त्याचे संस्कार अगदी लहान वयापासून झाल्यामुळेही असेल.
(लेखाबद्दल अधिक लिहीत नाही. आ.रा आणि मुक्तसुनीत यांच्या प्रतिक्रियेत अधिक भर घालण्याएवढं काही सुचलं नाही.)
· प्रतिसाद
Mon, 16/07/2012 - 06:13 |  बैठक (Score: 5 मार्मिक )
मुक्तसुनीत
पुण्य: 2
हा लेख वाचला. या लेखमालिकेतील इतर लेख वाचण्याचा प्रयत्न केला.
लेखनामागचा हेतू जरी प्रशंसनीय असला तरी लिखाणामधे एकंदर शिस्तीचा अभाव जाणवला. अनेक विधाने अशी एकामागोमाग एक येत जातात ज्यांची संगती लावणे अशक्य बनते. एका विशिष्ट समाजाचे एका विशिष्ट संस्कृतीमधे काय आणि कसे योगदान होते हे समजून घेण्याकरता आणि समजावून सांगण्याकरता लिखाणाची बैठक, विषयाची शिस्तशीर मांडणी , संदर्भांची यादी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या त्या संदर्भांची योजना हे मूलभूत नियम पाळले गेले असं दिसलं नाही.
कदाचित लिखाणामागची भूमिका आणि त्याचं स्वरूप हे एखादा ससंदर्भ निबंध लिहिणे असे नसून, विषयाची रंजक तोंडओळख करून देणे असा असू शकतो. हे करतानाही विषयाची रंजक मांडणी , शैलीबद्धता हे गुण अभावानेच जाणवले. मुख्य म्हणजे रंजन करणे याचा अर्थ तर्कागत संगतीला रामराम ठोकणे नव्हेच.
असो. लेखकाने या आधीच्या लिखाणात आपल्या वाचनाची चुणूक दाखवलेली आहे. या सखोल वाचनाचं, संदर्भ शोधण्याचं रूपांतर यथायोग्य रीतीने गुणी लिखाणात व्हावे या सदिच्छेपोटी प्रस्तुत अभिप्राय दिला आहे. कलोअहेवि,
· प्रतिसाद
"हिंदुस्थान जर इंग्रजांनी घेतले नसते तर ते फ्रेंचांनी घेतलेच असते. प्रवाहात पडलेली भांडी एकमेकांवर आदळली असता कोणते फुटावयाचे - मातीचे की लोखंडाचे - हे ठरलेले आहे" - वासुदेवशास्त्री खरे
Mon, 16/07/2012 - 05:35 |  हा हा (Score: 3 रोचक )
सन्जोप राव
पुण्य: 2
फार मनोरंजक लेख. 'राघूनानांची कन्येस पत्रे' आठवली
· प्रतिसाद
बक रहा हूं जुनूं में क्या क्या कुछ
कुछ न समझे खुदा करे कोई
Sun, 15/07/2012 - 23:41 |  स्वीपिंग स्टेटमेंट्स (Score: 4 मार्मिक )
आळश्यांचा राजा
पुण्य: 2
एखाद्या समाजाचा इतिहास लिहिताना त्यातील गौरवस्थाने अधोरेखीत करणे इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणून एवढी स्वीपिंग स्टेट्मेंट्स करणे योग्य नाही. ज्या पद्धतीने हा लेख लिहिला आहे, त्याच पद्धतीने अजून एक (अशीच सांगोवांगीची) भर घालतो - सध्याच्या ओरीसामध्ये पूर्वीची काही राज्ये येत - ओड्र, कोशल, उत्कळ, कलिंग ही महत्त्वाची. त्यातील उत्कळ आणि कलिंग ही नावे "कोल" या सध्या अस्तित्वात असलेल्या आदिवासींवरुन पडलेली आहेत.
तर असे आहे, की जिथे जिथे कोल, कोलीय सापडते तिथे तिथे आपण कोळी आगरी मंडळींना जोडू शकतो. मला वाटते कोळशाचा शोधही कोलीय मानववंशानेच लावला असावा.
· प्रतिसाद

मी माझ्या सर्वच प्रतिक्रिया येथे घेतलेल्या नाहीत. मुळ संस्थळावर त्या आहेतच. येथे चर्चेसाठी अन्यांच्या सर्वच प्रतिक्रिया जशा आहेत तशा घेतल्या आहेत.
काय दिसते यातुन?

१. बहुजनांबद्दलचा पराकोटीचा उपहास. बहुजन करतात ती स्वीपींग स्टेटमेंटस आणि या संस्थळावरील महाभाग करतात ती असते विद्वत्तेची झेप!

२. यांना इतरांकडुन पुरावे/संदर्भ/ तळटीपा वगैरे हव्या असतात. हेही देतात...काय तर नेटवरील (बव्हंशी विकीपीडिया) चे संदर्भ. त्यात त्यांना आपली विद्वत्ता दिसते.

३. प्रत्येक लेखात काय असावे आणि काय नसावे या अपेक्षा झाल्या. अपेक्षा म्हणजे समीक्षण नव्हे. जे आहे त्याचे विवेचन करत मग त्रुटींबद्दल लिहिले तर त्याला समीक्षा म्हनतात.

४. एका महाभागाने कारण नसतांना, तसा विषयही नसतांना "मी ब्राह्मनही नाही" हे सांगायचा उद्य्योग का केला असेल हे मी समजु शकतो. "मी ब्राह्मण आहे पण ब्राह्मण्यवादी नाही" असे वावदुकपणे काही लोक बोलतात त्यातलाच हा प्रकार.

असो. वाचक सुज्ञ आहेत. हे लोक, काही उघड तर काही छुपे" जातीयवादी कसे आहेत याकडे वळतो.

विक्रम देशपांडे म्हणतात: "माझे रोखठोक मत - आगरी/कोळी लोक "निम्नस्तरीय" आहेत."
पुढे ते म्हणतात: "हेच योग्य आहे कारण त्यांना हे दाखवून देणे गरजेचे आहे की ते मागास आहेत. प्रबोधनाच्या वाटेवर असणे म्हंजे सुधारलेले नसणे म्हंजेच मागासलेले असणे. मागास लोकांनी जास्त बडबड न करता प्रथम स्वतःचा विकास घडवून आणावा व नंतर त्यांनी भारतीय संस्कृतीवर केलेल्या उपकाराचे बघू. उगीचच क्षुल्लक योगदानाच्या जोरावर संपूर्ण देशाच्या संस्कृतीवर उपकार केल्याची भाषा "अंगुष्ठोदक मात्रेण शफरी फर्फरायते" प्रमाणे वाटते. (अर्थ समजला नसेल तर विचारताना न्यून बाळगू नका.). तसेही त्यांनी केलेले मिठाचा शोध हे योगदान हे सेरेंडिपिटी जास्त वाटते.


"तुम्हास एकदोन क्षुल्लक पुरावे मिळाले तर तुम्ही ढोर हेच ब्राह्मण होते व ब्राह्मण च अस्पृश्य होते हे दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. जसं ती बरखा दत्त - हिंदू हेच देशद्रोही आहेत व मुसलमान हेच सर्वात जास्त देशभक्त आहेत हे दाखवायचा उद्योग करत असते तसा. अत्यंत क्षुल्लक योगदान असलेल्या जातींचे डोंगरा-यवढे योगदान आहे असे दाखवायचा उद्योग तुम्ही चालवलेला आहे. कोळी/आगरी यांनी मीठ शोधून काढले म्हंजे अमृत शोधून काढले या आवेशात तुम्ही लेख लिहिलेला दिसतो. "

विक्रम देशपांडे पुढे म्हणतात: "शेवटी - सोनवणी, तुम्ही प्रथम मान्य करा की - ब्राह्मणांचे योगदान सर्वोच्च आहे. मग बाकीच्यांच्या क्षुल्लक योगदानाबद्दल वाटाघाटी करू."


आपण मुळातील त्यांची व अन्यांची विधाने वाचलेली आहेतच दोन जणांनी निषेधाचे कसे ढोग केले आहे हेही तपासुन पाहु.

"देशपांडे यांना सुचवतो की त्यांचं लिखाण हे जातिवाचक लिखाणाचा एक अत्यंत वाईट नमुना आहे. आपल्या मतांचा त्यांनी पुनर्विचार करावा. जन्माधिष्ठित वर्चस्व, विशिष्ट जातींचं de facto वरचढ असणं वगैरे वगैरे मतं ही असमर्थनीय आणि बुरसटलेली आहेत. "ब्राह्मणांवर अन्याय होतो, त्यांना अकारण झोडपले जाते" या अर्थाचे प्रतिपादन हमो मराठे आणि इतरांनी केलेलं आहे त्या अंगाने त्यांना मांडायचे तर मांडावे. अन्यथा त्यांच्या मतांचा तीव्र निषेध मी नोंदवतो."


हा झाला मुक्त सुनीत यांचा निषेध...(?)

तर आधी देशपांडेंच्या प्रतिसादाला गलीच्छ-हिडीस वगैरे म्हणुन "मन" म्हणतात-  "कदाचित अशाप्रकारे मुद्दाम सुपारी देउन ब्राह्मणांचे जिनोसाइड(वांशिक हत्याकांड) करवण्यासाठी, त्यास समर्थन मिळवण्यासाठी काही व्यक्तींना ब्राह्मण दाखवून त्यांच्याकडून दर्पोक्ती करुन घ्यायची व त्याद्वारे इतरांना त्यांचा निर्वंश करण्यासाठी उचक्वायचे अशा मोठ्या गेम प्लॅनचा हा भाग असू शकतो. असे आयडी त्या नृशंस संघटनांची हस्तक वाटतात."


लक्षात आला का यांचाच गेम प्ल्यन? हमोंच्या भाषेत लिहिलेले यांना चालणार आहे. त्यांचा निषेध हा सशर्त आहे. मन म्हणतात ही आयडीच बोगस आहे. आयडी खरी असो कि खोटी, ते हस्तक असोत कि अन्य कोणी, निषेध करायलाच हवा होता. या दोघांनीच नव्हे तर या दुव्यावर ज्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी व अन्य वाचकांनीही. पण तसे झालेले दिसत नाही याचाच अर्थ या जातीयवादी विधानांन यांचा पाठिंबा आहे.
आणि असा निषेध झालेला नाही, वा या संस्थळाच्या व्यवस्थापनाने, जसे माझ्या संतप्त प्रतिसादाला लगोलग नियम/अटी दाखवते...तेच देशपांडेंबाबत दाखवलेले नाही याचाच अर्थ व्यवस्थापनच मुळत जातीय रोगाने ग्रस्त आहे.




सर्वात महत्वाच्या बाबी येथे लक्षात घ्यायला हव्यात त्या ह्या:-

१. विक्रम देशपांडे नामक माणसाने (त्याचे खरे-खोटे नांव/जात काहीही असो) आगरी समाजाचा (आणि तदनुषंगिक सर्वच ओबीसी/बीसी/भटक्या विमुक्तांचा)ढोर समाजाची घोर बदनामीही देशपांडेंनी केलेली आहे.  अवमान केलेला आहे. 
२. आगरी लोकांनी मीठाचा शोध वा पुरातन कालापासुन व्यवसाय केलेला नसुन ते श्रेय आगरी लोकांचे नाही असा एकुणातील आविर्भाव आहे. थोडक्यात यांच्या मते मीठ काय आणि कातडे कमवायचा काय, शोध यांच्याच पुर्वजांनी लावला...
३. आगरी लोक हे मातृसत्ताक पद्धतीचे असुन वेदांपेक्षा पुरातन आहेत हे सत्य नाकारत ते श्रेय स्वत:कडेच ठेवायचे आहे. किंबहुना आगरी लोक वैदिकांपेक्षा पुरातन ठरतात हे सत्य त्यांना पुरेपुर अमान्य आहे.
४. त्यांनी अन्य जातीयांच्या इतिहासाबाबत मी लिहिलेल्या अन्य एकाही लेखाला एकही, कसल्याही दर्जाचा, प्रतिसाद दिलेला नाही. आगरी लोकांच्या बाबतीत मात्र त्यांना "निम्नस्तरीय", अतिमागासादि विशेषणे बहाल करत "ब्राह्मण हेच श्रेष्ठ आहेत" व बहुदा जगातील सारे काही त्यांनीच शोधले आहे असा या संस्थळावरील लोकांचा अप्रत्यक्ष अभिप्राय दिसतो. किंबहुना हा उपक्रम मी हातातच कशाला घेतला येथुनच यांचे आक्षेप आहेत. मी करतोय ते काम माझ्यापेक्षा अधिक सामर्थ्याने व प्रामाणिकपणे करायला यांना कोणी अडवले नव्हते. ते केले नाही म्हणुन यथाशक्ती मला करावे लागत आहे. 
अन्य लेखांवर कसलाही अभिप्राय नाही कारण तेथे मी वैदिक ऋचांचे वा तत्कालीन सम्स्कृतीचे उल्लेख केलेले आहेत. आग-यांचा लेखात नाही. यामुळे यांचा कसा पोटशुळ उठला असेल हे मी समजु शकतो...पण सत्य हे शेवटी सत्य असते.
५. अरविंद कोल्हटकर म्हनतात कि आगरी स्माजाचे मीठ उद्योगात मला त्यांचे फारसे योगदान दिसत नाही. त्यांच्यासाठी मी सांगतो कि आधी सिद्दी व नंतर ब्रिटिशांनी मीठागरे कशी ताब्यात घेत आग-यंची वाट लावली ते व नंतर तटरक्षक दलांनी समुद्राकाठचे बांध फोडुन मीठागरेच नष्ट केलीत, त्यामुळे हा धंदा कसा कोसळला हेही तपासायला हवे. एवढेच नाही तर बांध फोडल्याने किनारच्या जमीनी नापीकही बनवल्या. त्याबाबत आपला समाज कधी तोंड उघडत नाही. त्यांच्या या शोषनाबाबत आपण गप्प बसतो आणि त्यांच्यातील अडानीपणा...दारिद्र्य आणि त्यामुळे आलेला उद्दामपना यालाच लक्ष करतो आणि निम्नच आणि अतीमागासवर्गात ढकलत त्यांचा उपहास करतो...हा कोणता न्याय झाला? स्पष्टच विचारायचे तर ही कोनती विकृत ब्राह्मणी सम्स्कृती दाखवत ब्राह्मण समाजाचाही अवमान करत आहात?
६.  सर्वच ब्राह्मणेतर समाजांना तुच्छ समजण्याची ही ऐसी अक्षरेची झुंडशाहीची प्रवृत्ती समाजविघातक आहे. समाजात दरी निर्माण करनारी आहे. वर्णव्यवस्थावादाचे भुत या संस्थळाचे मालक ते अनुयायी ब्राह्मणवादीच आहेत. हे सिद्ध  करायला माझ्याकडे या संस्थलाबाबत इतरही अनेक पुरावे आहेत, पण ते मी सध्या न्यायालयासाठी राखुन ठेवतो. 
ज्यावेळीस सर्व समाज निरलसपणे एकत्र यावा, जाती-जातींतील संघर्ष संपावा यासाठी काही प्रयत्न करत असतात तेंव्हा जाणीवपुर्वक असे लोक त्यात अडथळा निर्माण करतात आणि भरल्या खंडीत मुतत्तात. स्वत:ला काही जमत नसेल तर आपापल्या शैल्या/विचार यातच क्लोज ग्रुपमद्धेच गुंगावे, संस्थळे ही पब्लिक फोरम बनवु नयेत.  


थोडक्यात:

मी ऐसी अक्षरे, देशपांडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करने, जातीयवादाचे समर्थन करणे, प्रोत्साहन देणे, जातीनिदर्शक हीणकस विधाने करणे आदि गुन्हेगारी कलमांखाली माझ्या वकीलाच्या सल्ल्याने गुन्हा दाखल करत आहे याची नोंद घ्यावी. (Including atrosity) मग दोषी ख-या नांवाचे असोत कि खोट्या, भारतात रहात असोत कि विदेशात, त्यांना जेरबंद केले जाईल.

तसेच या "ऐशी अक्षरे" संस्थळावर कायमस्वरुपी बंदी आणण्यासाठीची मागणी केली जात आहे.

समाजात ऐक्य हवेय. हे असले उद्योग करना-यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. सुसंस्कृतततेच्या नांवाखाली असंस्कृत वागणारे लोक समाजाला एकुणात परवडणारे नाहीत.


Thursday, July 19, 2012

वाटा...अंधारलेल्या?


Image result for globalisation

जेंव्हा आपण आपली समाजरचना आणि जागतिकीकरणाचा विचार करतो तेंव्हा खालील प्रश्न उपस्थित होतात.

जागतिकीकरणाला अनुकुल अशी आमची मानसिकता आहे काय? जागतिकीकरणातुन जी नवी संस्कृती बनत आहे तिचा स्वीकार करत स्वत:त अनुकुल बदल घडवण्याचे मानसिक सामर्थ्य आमच्यात आहे काय?
जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर जी नवी संस्कृती बनू पहात आहे तीवर आमचा काही प्रभाव असणार आहे काय? कि आम्ही परावलंबी पराभुत मानसिकतेतुन अपररिहार्य म्हणुन ती संस्कृती स्वीकारत जाणार आहोत?

जागतीक संस्कृती स्वीकारणे अपरिहार्य ठरणारच असेल तर मग आमच्या संस्कृतीचे काय होणार? आमची संस्कृती जागतिकीकरणाला अनुकुल आहे कि प्रतिकूल?

आम्ही नव्या जगाची आव्हाने पेलण्यास समर्थ आहोत काय?

आमची समाज व्यवस्था अशा समर्थ पिढीला घडवण्यासाठी अनुकूल आहे काय?

या निमित्ताने अजुनही अनेक प्रश्न उपस्थित करता येतील, पण येथे आपल्याला या प्रमुख प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पहिल्या प्रश्नाला अनुसरुन एक उपप्रश्न असा आहे कि मुळात जागतिकीकरण ईष्ट आहे कि अनिष्ट. याचे उत्तर सोपे आहे खरे तर. जागतिकीकरण ही मुळात नवीन संकल्पना नाही. पुरातन काळापासुन ही प्रक्रिया सुरु झालेली आहे. जागतिकीकरणाचा अर्थ म्हणजे अशी अर्थव्यवस्था ती राष्ट्रीय किमान नियंत्रणांखाली रहात राष्ट्रांचा सीमा ओलांडत पसरत जाते व त्यासाठी तशी अनुकुल धोरणे बनवली जातात. कोणत्याही देशात कोणीही कोणताही उद्योग उभारण्यास अटकाव होऊ नये ही मुक्त अर्थव्यवस्थेची आदर्श कल्पना झाली. अजुन तरी जागतिकीकरणात हा टप्पा गाठला नाही. तरीही एकुणातील वाटचाल त्या दिशेने अत्यंत वेगाने होतेय हे नाकारता येत नाही.

पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार सागरी व खुष्कीच्या मार्गाने सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन रेशमी/सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, चीन अशा वेगवेगळ्या राज्यांत (तेंव्हा मुळात राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती.) जात व तिकडुन सोणे, मद्यादि अगणित वस्तु भारतात येत असत. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. किंबहुना परस्पर संपर्कामुळे तसे होणे अपरिहार्यच होते. यात धार्मिक संकल्पनांचीही उधार-उसनवारी होती. उदा. सूर्य पुजा ही भारतियांनी मध्य आशियातुन आलेल्या मगी लोकांकडुन घेतली. परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. जगभर अनेक संस्कृत्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी झाल्या. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला.
हे काय होते? जागतिकीकरणच होते.

म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि जौद्योगिकरणपुर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर तो वाढला. संगणक व माहितीजालाच्या क्रांतीनंतर तर तो वेग एवढा वाढला आहे कि एखाद्याला भोवळच यावी. आता एवढा वेग योग्य कि अयोग्य याची चर्चा येथे न करता आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे वळतो.

ज्यामुळे फायदा होईल असे वाटते ती व्यवस्था कोणतीही असो, ती स्वीकारण्याकडे माणसाचा कल असतो. अत्यंत कृर अशा हुकुमशाह्याही मानवाने तात्कालिक भावनिक वा आर्थिक फायदे उकळण्यासाठीच स्वीकारलेल्या आहेत. लोकशाही ही त्यातल्या त्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात यशस्वी ठरते म्हणुन ती प्रेय वाटते, एवढेच.

भारतीय मानसिकता जागतिकीकरणाचे फायदे घेत असल्याने ती जागतिकीकरणाला अनुकुल आहे असेच म्हणावे लागेल.

परंतु ही अनुकुलता गोंधळयुक्त आहे.

जागतिकीकरण हवे आहे पण संस्कृतीवर आक्रमण नको अशी काहीशी विचित्र मानसिकता आहे. पण आक्रमण रोखणे सोडा....त्या आक्रमनाच्या लाटेवर आपण स्वार झालेलोच असतो याचे भान मात्र नसते.
मोबाईल...इंटरनेट आता खेडोपाडी झपाट्याने पसरत आहे. येत्या पाच वर्षांत देशभरात घरोघरी...संगणक-इंटरनेट पोहोचलेले असतील. मोठ्यांच्या तर सोडाच, दहा-बारा वर्षाच्या प्रत्येक पोरांच्या हाती अत्याधुनिक मोबाईलचे व्हर्जन असेल.

जागतिकीकरण म्हनजे एवढेच नाही. याही पल्याड जावून बियाणी-पाणी-पुरवठा, आरोग्य सेवा, शाळा-कोलेजेस, किराणा ते कपड्याची दुकाने विदेशी संस्था चालवतील...जवळपास प्रत्येक उत्पादन व सेवा विदेशी कंपन्या देवु लागतील. तसे अनुकुल कायदे बनतील. तसेही बराक ओबामाने अप्रत्यक्षपणे भारताला तसे सुनावलेही आहे...बदला...जागतिकिकरणाचा वेग वाढवा.

पुरातन जागतिकीकरण हे उभयपक्षी स्वातंत्र्य मानत घडत होते.

आता तशी स्थिती राहिली नाही.

म्हणजे जागतिकीकरण अनिष्ट आहे असे आज म्हनता येत नाही.

आपला जागतिकीकरणाकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा लागणार आहे.

जागतिकीकरणात आज आपले स्थान पाहिले तर बौद्धीक कामगार स्वस्तात पुरवणारा देश म्हणुन आपली ख्याती आहे. आता त्यातही चीन ते दक्षीण अमेरिकेतील अनेक देश आपल्या स्पर्धेत उतरले आहेत. त्याचा भविष्यातील परिणाम काय असेल हे आज सांगता येणार नाही.

साखर ते वस्त्रे आज निर्यात होतात पण ती सरकारी अनुदानांशिवाय जागतीक बाजारात विकलीच जावु शकत नाही एवढी किंमतीत तफावत आहे.

चीन मात्र निर्यातीत भारतावर कधीच मात करुन बसलाय.

भारताचा आयात-निर्यात व्यापार हा आतबट्ट्याचा आहे.

काही अवाढव्य भारतीय कंपन्या सोडल्या तर भारतीय कंपन्या देशांतर्गतच उच्च विकासदर गाठु शकलेल्या नाहीत. परदेशात विस्तार करणे तर दुरच राहिले.

याचा अर्थ असा होतो कि ग्राहक म्हणुन व बौद्धीक/शरीरश्रमी कामगार म्हणुन आम्ही जागतिकीकरणात आहोत हे खरे आहे पण जागतिक बाजारपेठेत मुल्यवर्धीत सेवा व उत्पादने विकण्यात आम्ही अत्यंत मागे पडलेलो आहोत.

याचाच अर्थ असा होतो कि जागतिकीकरनाला अनुकुल अशी आमची एकतर्फी भुमिका आहे...पण दुस-या बाजुसाठी आवश्यक अशी नव-सृजनात्मक मानसिकता घडवण्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत.
आमची समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, मुल्य व्यवस्था आणि राजकीय व्यवस्था आमची मानसिकता बदलण्यातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते दुर कसे करायचे हाच आमच्या समोरचा आजचा गंभीर प्रश्न आहे.
यावर जोवर आम्ही व्यापक विचारमंथन व कठोर आत्मपरिक्षण करत नाही तोवर आमची मानसिकता ख-या अर्थाने जागतिकीकरनाला लाय्क नसून अर्थ-गुलामीलाच लायक अशी आहे हे पक्के समजुन चालावे लागणार आहे.

आमच्या संस्कृती रक्षकांना नेहमीच पुरातन संस्कृतीच्या भवितव्याची काळजी लागुन राहिलेली असते. कोनतीही संस्कृती यच्चयावत जगात जशी होती तशीच्या तशी चीरकाळ टिकत नसते याचे भान त्यांना नसते. भारतीय संस्कृतीचेच म्हणावे तर  शैव संस्कृती, समन संस्कृती, ( बौद्ध-जैन कालीन संस्कृती) ते इस्लामकालीन संस्कृती...यात किती परिवर्तने झाली हे इतिहासाकडे निर्लेप मनाने एक दृष्टीक्षेप टाकला तरी थक्क व्हायला होते. समाजप्रवाह आपापल्या कालाच्या परिप्रेक्षात जुन्यातील योग्य तेवढे स्वीकारत नवीन नीति-धर्मनियम बनवत पुढे जात असतो. अनेक सांस्कृतीक अंधारयुगेही अधुनमधुन डोकावत असतात. जगभर असे घडलेले आहे. आज जागतिकीकरणामुळे संस्कृती बदलते आहेच. हा बदल थांबवणे ही अशक्यप्राय बाब आहे.

येथेही पुन्हा प्रश्न हाच कि आम्ही फक्त सांस्क्रुतीक "घेवाणी"च्या बाजुने असनार आहोत कि "देवाणी"च्याही बाजुने? आणि देवाण-घेवाण ही फक्त तुल्यबळांतच होत असते. दुर्बलांत नाही. अर्थसत्ता आणि राजसत्ता जेंव्हा प्रबळ असते तेंव्हाच देवाण-घेवाण होवू शकते. ज्या देशात अजुनही ५५% लोक भुकेकंगाल आहेत, ४०-४५% लोक फक्त धडपणे जगु शकतात...

तो देश कोणती संस्कृती जगाला देउ शकणार आहे? कागदोपत्री श्रेष्ठ संस्कृत्या कामाच्या नसतात. गतकालीन माहात्म्यांना कोणी महत्व देत नाही.

संस्कृत्या घडवाव्या लागत असतात...जगाव्या लागत असतात.

  पण त्यासाठी मुळात सर्वांचे आर्थिक उत्थान व्हावे यासाठी आमच्याकडे काय कार्यक्रम आहे?

आपली प्रगती साधन्यासाठी स्वाभिमानाने स्वबलावर उभे राहण्यासाठी जी मानसिकता बनवावी लागते ती क्षमता आमच्या समाजव्यवस्थेत मुळातच नसेर्ल तर आपल्याला मुळात संस्कृतीच नाही असे म्हणावे लागते.
साधे पाण्याचे घ्या. आपल्याकडे दुष्काळ पडला तरी इस्त्राएलच्या शंभरपट पाऊस पडलेला असतोच. तरी पावसाने ओढ दिली कि पाण्याची बोंबाबोंब सुरुच.  जुने जाऊद्या, ७२च्या दु:ष्काळात बनवलेली जवळपास ९५% गांवतळी आज गाळ भरुन क्रिकेटची मैदाने झाली आहेत. जलसंधारणाचा कार्यक्रम आपल्याच स्वार्थासाठी का होईना स्वत: राबवावा हे आजही समजत नसेल तर हे दरिद्रीच राहणार. नेत्यांना तेच हवे. अब्जावधी रुपये कागदोपत्री खर्च झाल्याचे दाखवत आमचे जलसंधारनातील महनिये जर तालुकेच्या तालुके खरेदी करण्याच्याच मोहिमेवर असतील तर दुसरे काय होनार?

आणि ही बेईमानी वृत्ती कोणत्या क्षेत्रात नाही?

  मग जर आमची संस्कृतीच अशी बेईमानीची असेल तर आमच्या संस्कृतीला कोण घेणार?

आणि बेईमानीच्या पायावर सामाजिक व सर्वसमावेशक अर्थ-क्रांती घडु शकत नाही...

आणि काही लोक चालले भ्रष्टाचार निर्मुलन म्हणजेच क्रांती असा नारा द्यायला.

आपल्या प्रजेची मानसिक भ्रष्टता व त्यामुळेच आलेली नवनिर्मानातील पंगुता यावर आपण कधी चर्चा करनार आहोत?

भारताने असा काय मौलिक शोध गेल्या हजार वर्षांत लावुन दाखवलाय कि ज्याचा जागतीक अर्थव्यवस्थेवर व जीवनव्यवस्थेवर प्रभाव पडलाय?

आमच्या शिक्षणव्यवस्थेने आमची सृजनात्मकता मारुन टाकलीय. आमचे आईबाप आम्हाला धाडसी बनण्याचे स्वातंत्र्य नाकारतात...जेथे कल आहे तेच शिकण्याचा व तेच करीअर म्हणुन करु देण्याचा मुलभुत अधिकार नाकारतात. आम्हीही आमच्या पोरांना असेच गुलाम बनवणार यात शंका नाही.

मग गुलाम कधी मानसिक तुरुंगाच्या भिंती तोडुन पळतोय होय?

आणि गुलामांना कधी संस्कृती असते होय?

आपल्याला सर्वप्रथम आमच्या कमतरता वेळीच हुडकल्या पाहिजेत. मंथन केले पाहिजे. आणि जोवर लोक बदलत नाहीत तोवर अर्थक्रांती होणार नाही. अर्थक्रांती होत नाही तोवर आम्ही संस्कृतीचे निर्मातेही होवू शकत नाही. जागतीक परिप्रेक्षात आम्ही नेहमी ग्राहकच राहणार...खंदे विक्रेते होवू शकणार नाही. ज्ञानाचेही ग्राहकच राहणार, ज्ञानदाते बनू शकनार नाही.

थोडक्यात जागतिकीकरणात आम्ही जगु हे खरे पण आत्मगौरव नसेल त्या जगण्यात.

बघुयात आपण खरोखर काय सकारात्मक करु शकतो ते....

वाटा अंधारलेल्या आहेत... त्या आमच्या मनावर झाकोळलेल्या नि:ष्क्रीयतेमुळे...

फक्त ती राख झटकत...वाटांना महामार्ग बनवत आत्मसन्मानाचे युद्ध सुरु करावे लागणार आहे...
तरच आम्ही जागतिकीकरणात एक महत्वाचे प्रभावशाली एकक बनु शकतो...नाहीतर आहेच आपले...ये रे माझ्या मागल्या...


Wednesday, July 18, 2012

राजेश खन्नांचे आज निधन झाले.




एका विलक्षण प्रभावशाली अभिनय युगाचा अस्त झाला. राजेश खन्ना माझा लाडका अभिनेता. अमिताभ युग अवतरले व राजेश खन्ना मागे पडला पण मला अमिताभ मला कधीच भावला नाही. राजेश युगातील उत्कृश्ठ कथा...तसेच जबरदस्त संगीत व त्यातील वैविध्ये...अमिताभ युगाबरोबरच अस्तंगत पावली. राजेश खन्नामद्धे कोणी आपला आदर्श, भाऊ, मुलगा तर कोणी प्रियकर-पती पाहिला. त्याचे चित्रपट म्हणजे अभिनयाची, जबरदस्त श्रवणीय गीतांची व वैविध्यपुर्ण कथांची रेलचेल असायचे. आराधना, बावर्ची, आनंद, अवतार, सौतन, कटी पतंग, नमक हराम, अजनबी, थोडीसी बेवफाई अशा काही चित्रपटांकडे नजर टाकली तरी वैविध्यपुर्ण कथांत वैविध्यपुर्ण असे जे नायक राजेश खन्नाने जीवंत केले ते पाहुन नवल वाटते. असे नशीब अन्य कोणत्याही अभिनेत्याला लाभलेच नाही. त्यामुळे माझ्यावर राजेश खन्नाचा जेवढा प्रभाव आजतागायत राहिला तेवढा अन्य कोणत्याही अभिनेत्याचा नाही.

कधी नव्हे तो आज बाहेर पाऊस पडतो आहे. माझ्या डोळ्यांतुनही अश्रु झरत आहेत.
राजेशने साकारलेले प्रसंग आणि त्याची आनंददायी ती अत्यंत हळवी गीते चहुकडुन उमदळुन येत आहेत.
अधिक लिहु शकत नाही.
राजेश खन्नांना विनम्र श्रद्धांजली.


Monday, July 16, 2012

पुन्हा "सत्यशोधक"!




"परिवर्तनाचा वाटसरु" या नियतकालिकातील "गोपुविरचित "सत्यशोधक": ऐसा जोती होणे नाही!" ही विजय कुंजीर लिखित प्रदिर्घ मुखपृष्ठ कथा वाचली. हा "लेख" नसून एक पुर्वग्रहदुषित मनाने लिहिलेली "दीर्घकथा"च आहे हेही लक्षात आले. असे असले तरी या कथेतून चुकीचा संदेश जात असल्याने तिचे परिक्षण करणेही तेवढेच गरजेचे आहे. कुंजीरांचे एकुणातच संपुर्ण "सत्यशोधक" हे नाटक (छापिल आणि रंगसंहिता) आणि या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे व त्यांची सावित्रीबाईंची प्रमुख भुमिका साकारणारी कन्या पर्ण पेठे यांच्यावर मुख्य आक्षेप असून अन्य कलावंत (जवळपास ५०) सफाई कर्मचारी असून त्यांना मुख्य भुमिका का दिल्या नाहीत यावरही आक्षेप आहे. खरे तर अतुल पेठे यांनी स्वत: दिग्दर्शन न करता ते एखाद्या बहुजनीय दिग्दर्शकाला का दिले नाही असाही आरोप त्यांना करता आला असता, तो बहुदा त्यांच्याकडुन सुटलेला दिसतो.
सत्यशोधक हे नाटक मी पाहिले आहे. कुंजीर दावे करतात त्याप्रमाणे हे नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांची महत्ता त्यांच्या तोंडुन वदवण्यासाठीचा खटाटोप म्हणजे हे नाटक आहे हे धादांत असत्य आहे. पण हे नातक म्हणजे ब्राह्मणी कावा आहे, हे  नाटक फुलेंचे नसुन टिळक-आगरकरांचे असून व पर्यायाने ब्राह्मणी वर्चस्ववाद निर्माण करण्याची ही चाल आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेवर हल्ला झाल्यानंतर मराठा जातीवादाचा निषेध करण्यासाठी हे नाटक आले असाही कुंजीरांचा तर्क आहे. गोपुंच्या फुलेंना फुलेवाड्यासमोरील चार पेठा दिसल्या परंतु मिशनरी शाळेत त्यांच्यावर झालेले ख्रिस्ती संस्कार कसे दिसले नाहीत? फुले अकराव्या वर्षी स्वत:ला हिंदु कसे म्हणवुन घेवू शकतात असे प्रश्नही कुंजीर उपस्थित करतात व "हिंदु" हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक आहे असेही सुचवतात. कथा प्रदिर्घ असली तरी कुंजीर याच्या एकुणातील मतांचा सारांश त्यांच्याच शब्दांत द्यायचा तर "कोणत्याही अन्वयार्थांनी, चिकित्सेने नाटक न पाहता, नाटक म्हणुन नाटक पाहिले तर काय दिसते, तर फुल्यांनी लोकहितवादी ते टिळकांपर्यंतच्या सर्व पुणेरी बामणांची केलेली प्रशंसा." सत्यशोधक नाटक फुले हे ब्राह्मणांना किती जवळचे होते...नव्हे ते बामनांमुळेच घडले असे ठसवण्यासाठी आहे असाही कुंजीरांचा तर्क आहे. अशा प्रकारे कुंजीरांनी मार्क्सवाद ते गो.पु. देशपांडेंच्या जवाहरलाल नेहरु युनिवर्सिटीतील अध्ययन-अध्यापनाला वेठीला धरत हे नाटक म्हणजे खरे फुले मांडणारे नाही तर ते फुलेंचे बामणीकरण करण्याचे षड्यंत्र आहे असा कुंजीरांचा तर्क दिसतो. फुले-सावित्रीबाईच्या तोंडी दिलेल्या बामणी भाषेबाबतही कुंजीर यांना आक्षेप असून त्याबाबतही प्रदिर्घ खल त्यांनी केला आहे. गोपुंचे नाटक म्हणजे ब्राह्मणांध वासनेचा नग्न आविष्कार आहे असा शेराही ते मारायला विसरत नाहीत. असो. कुंजीरांनी अजुनही बरेच तारे तोडलेले आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे नाटक कशाशी खातात हे कुंजीरांना माहित आहे काय? हा प्रश्न मी विचारतो कारण माझी स्वत:ची मराठी ७ व इंग्रजी दोन नाटके प्रसिद्ध आहेत. मी स्वत: तीन चित्रपटांचेही दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे मला या विषयाचे बेसिक तरी ज्ञान आहे. एकोणिसाव्या शतकातील बोली काय अथवा लिखित काय, भाषा आजच्या एकातरी प्रेक्षकाला समजली असती काय? खुद्द शेक्सपियरची मुळ नाटके आताच्या भाषेत सादर केली जातात. लिखित संहिता आणि रंगसंहिता यात नेहमीच फरक असतो. "सत्यशोधक" हे नाटक आहे, फुलेंचे चरित्र नव्हे याचे भान कुंजीरांना दिसत नाही. नाट्य सादरीकरणावर अपरिहार्यपणे येणारी वेळेची व रंगमंचीय अवकाशाची मर्यादाही कुंजीरांना समजत नाही. हे नाटक एका बामणाने लिहिले व बामणाने दिग्दर्शित केले...त्यांची कन्या सावित्रीबाईंच्या भुमिकेत असावी याचाच जर पोटशुळ उठला तर नाटकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा असा विषांध होणारच. एक नाटक म्हणुन सर्वांगाने ते उत्कृष्ठ आहे याबाबत सर्वच रंगकर्मी सहमत आहेत...पण त्याबाबत एक अवाक्षरही कुंजीरांनी काढु नये याचे नवल वाटते.
प्रत्येक नाटककार आपला नायक व नायिका आणि कथावस्तु निवडतो तेंव्हा तो त्याच्या व्यक्तिगत प्रतिभेचा व तिच्या आविष्काराचा प्रश्न असतो. दिग्दर्शकही रंग-संहिता बनवतो तेंव्हा तोही मुळ संहितेत सादरीकरणाच्या दृष्टीने त्यात बदल करत असतो. एक सलग आशय पोहोचवण्याचे कार्य अभिनेत्यांमार्फत तो करत असतो. नाटक म्हनजे रुक्ष परिसंवाद नव्हे. शेवटी ती कला आहे. आजवर म. गांधींवरील वगळता सर्वच चरित्र चित्रपट साफ कोसळले कारण दोन-तिन तासाच्या चित्रपटांत सारे काही आलेच पाहिजे हा बाष्कळ खटाटोप. कुंजीरांनी या नाटकातील एकही प्रसंग खोटा आहे असे पुराव्यासह विधान केलेले नाही, मात्र त्या प्रसंगांतुन अकारण बामण माहात्म्य फुलेंच्या तोंडुन वदवले आहे हा त्यांचा खरा आक्षेप दिसतो. फुलेंचे पात्र अत्यंत पांचट..पोकळ आहे असे त्यांचे निरिक्षण आहे. असे असेल तर कुंजीरांनी स्वत:च नाटक लिहावे व त्यांना हवेत तसे फुले सादर करावेत. व्यक्तिगत मत म्हणजे सत्य नसते हे या "सत्यशोधका"ला समजलेले दिसत नाही.
एकीकडे गोपुंनी या नाटकात बामणांवर यथेच्छ टीका केली आहे असेही ते म्हणतात, पण त्यांना ती गोपुंची बचावात्मक चाल वाटते हा तर एक मोठा विनोदच आहे. म्हणजे टीका केली तर तो लेखकाचा नाईलाज...पण एकुणात बामणमाहात्म्य म्हणजे "सत्यशोधक" नाटक. हिंदु हे धर्मासाठी सरसकट नांव अस्तित्वात आले त्याला आता हजार बाराशे वर्ष होवून गेलीत हे कुंजीरांना माहित नसावे. वयाच्या अकराव्या वर्षी फुले लग्नाच्या वरातीतुन बाहेर काढल्यावर "ते हिंदु आपणही हिंदु..." असे विधान फुले करतीलच कसे हा कुंजीरांचा प्रश्नच मुळात अज्ञानमुलक आहे. हिंदु हे इंग्रजांनी निर्माण केलेले मित्थक नाही. फुलेंनी सत्यशोधक समाज स्थापन केला...सत्यशोधक धर्म नाही हेही कुंजीर विसरलेले दिसतात. महात्मा फुलेंची बंडखोरीची झेप कुंजीरांच्या आवाक्यात आलेली दिसत नाही.
महात्मा फुलेंनी ब्राह्मणी व्यवस्थेवर कडाडुन हल्ले चढवले. परंतु ब्राह्मणांचा द्वेष केल्याचे उदाहरण वा तसे विद्वेषमुलक लेखन तरी कुंजीरांनी उद्गृत करायला हवे होते, पण ते तसे त्यांनी केलेले नाही कारण त्यांना "कुंजीरांचे फुले" रंगवायचे आहेत. आपल्या मृत्युपत्रावर साक्षीदार म्हनवुन भांडारकरांची स्वाक्षरी घेनारे, छ. शिवाजी महाराजांवरील पवाड्यात सुधारणा सुचवल्या म्हणुन त्यांचे आभार मानणारे फुले हे ब्राह्मणद्वेष्टे होते हा जावईशोध लावत त्यांचा उग्र अवतार या नाटकात दिसत नाही...म्हणजे बामनांना पुरेशा शिव्या दिल्या नाहीत याबाबत कुंजीरांना संताप आलेला दिसतो.
म. फुले हे शेवटी हाडामांसाचे माणुस होते. त्यांनाही व्यथा-वेदना होत्या. नाटकात प्रसंग कसे लिहावे लागतात व कसे सादर करावे लागतात हे कुंजीरांना माहितच नसल्याने सावित्रीबाईंवर सनातन्यांनी शेणगोळे फेकल्यानंतर फुलेंचे बामण मित्र त्यांच्या घरात येवून निषेध करतो असे सांगतात...कुंजीरांच्या मते हा प्रसंग अन्यत्र घडवायला हवा होता...त्याला जाहीर निषेधसभेचे रुप द्यायला हवे होते असे सुचवत आपले नाट्यविषयकचे अज्ञान दर्शवतात.
एवढेच नव्हे दक्षीणा प्राइझ कमिटीने मराठी भाषेला पारितोषिक द्यायला हवे असे फुले सुचवतात, याबाबत तर कुंजीरांनी अकारण गदारोळ केला आहे. म्हणजे फुलेंनी असे सुचवलेच नव्हते असे कुंजीरांना म्हणायचे आहे काय... तर तसेही नाही. पुढे फुलेंच्या तोंडी कालीदास ते शुद्रक या नाटककारांची नांवे यतात...म्हणजे फुले मिशन शाळेत न शिकता महामहोपध्यायांच्या अबक पाठशालेत शिकले कि काय असा प्रेक्षकांचा समज होवू शकतो...असे एक वावदुक विधानही ते करतात. याचा अर्थ कुंजीरांचा फुलेंच्या ज्ञानावरच आक्षेप आहे. फुलेंना हे कवी माहितच नव्हते व एका इंग्रजी लेखकाने सांगेपर्यंत संस्कृत ही कधीच बोलीभाषा नव्हती हे फुलेंना माहित असण्याचे कारणच नाही असा कुंजीरांचा तर्क खरे तर फुलेंचा अवमान करणारा आहे. अजुन म्हणजे फुलेंच्या तोंडी फक्त संस्कृत नाटककारच का? फारसी हीही एके काळी राजभाषा होती...मग त्या भाषेतील एखाद्या लेखकाचा उल्लेख का नको...असे लिहितांना कुंजीरांनी कोणते फारसी महान लेखक तोवर झाले होते व लोकप्रिय होते हे सांगण्याचेही कष्ट घेतले असते तर बरे झाले असते.
हीच बाब बळी-वामनाची. म. फुलेंनी बळीची संकल्पना आपल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात बंड करतांना वापरली. भारताचा इतिहास हा वर्ण-जाती संघर्षाचा इतिहास आहे असे फुले नाटकात म्हणतात. "भारताला इतिहासच नाही" अशी हेगेलची साक्ष काढत कुंजीर म्हणतात कि एकोणिसाव्या शतकातील फुल्यांच्या तोंडी दिलेले संवाद विसाव्या शतकातील सिद्धांतांनी जर माखलेले असतील तर ते खरे फुले नाहीत. येथे कुंजीरांचा भयंकर गोंधळ उडालेला आहे. कुंजीरांना एवढे तरी समजायला हवे कि वर्तमानात नाटक आणत असता...लेखक वर्तमानात जगत असतां चरित्र नायकाचे काही विचार आधुनिकतेशी नाळ जोडनारे वाटले तर त्याचे प्रतिबिंब लेखनात उमटत असते. असे छ. शिवाजी महाराज ते अन्यही ऐतिहासिक पुरुषांवरील कलाकृतींमद्धे आपण पाहतो. आपण नाटकाचे समिक्षण करत आहोत कि नाटकात ऐतिहसिक चरित्रांत असते तशी वस्तुनिष्ठता शोधत आहोत याचे भान कुंजीरांनी बामण्द्वेषाच्या विखारात गमावले आहे. त्यांनी बामणी साहित्य व नाटकांवर ज्या भाषेत टीका केली आहे ती कोणत्याही विचारवंताला शोभणारी नाही.
प्रस्तूत लेख (त्याचे पुस्तकही होणार आहे ही माहिती शेवटी टिपेत दिली आहेच.) म्हणजे जड भाषेत लिहिलेला उथळ लेख होय.  मार्क्स, हेगेल, फृइडची नांवे टाकली म्हणजे विद्वान होता येत नसते. त्यापेक्षा "या नाटकात असत्य घटनांची रेलचेल आहे" असे विधान पुराव्यांनिशी पटवले असते तर ते अधिक संयुक्तिक झाले असते. पण तसे केले तर उघडे नाही पडणार?

Sunday, July 15, 2012

कोष्टी-साळी...विणकरांचा इतिहास!




पुरातन काळापासून मानवी समाजाने प्रतिकुल निसर्गाशी झुंज देण्यासाठी कल्पकता व प्रतिभा वापरत एकामागुन एक जी साधने शोधली त्याला तोड नाही. आजच्या वैज्ञानिक प्रगतीने आपण जेवढे थक्क होतो त्याहीपेक्षा अधिक, पराकोटीच्या प्रतिकुलतेत, अत्यंत वन्य अवस्थेत पुरातन मानवाने जे शोध लावले त्यामुळे चकित व्हायला होते. किंबहुना आजचे विज्ञान आपल्या पुरातन पुर्वजांच्याच अथक प्रयत्नांच्या पायावर उभे राहत आकाशाला गवसणी घालायला सज्ज आहे.
.त्या आदिम काळी, जेंव्हा मनुष्य शिकारी मानव होता, तेंव्हा शिकार केलेल्या प्राण्यांचे चर्म वा झाडांच्या साली (वल्कले) गुंडाळुन प्रतिकुल हवामानाला तोंड देत होता. हळु हळु तो काही प्राण्यांना माणसाळुन पाळुही लागला. शिकारी मानव पशुपालक मानव बनला हा मानवी जीवनशैलीच्या बदलाचा एक महत्वाचा टप्पा आहे. मनुष्य अद्याप भटकाच होता. चरावु कुरणांच्या शोधात त्याला सतत भटकावेच लागे. सरासरी २० हजार वर्षांपुर्वीच मानवाला सर्वप्रथम लोकर व वनस्पतीजन्य धाग्यांपासुन वस्त्रे बनवण्याची कल्पना सुचली असावी. पक्षांची घरटी, कोळ्यांची जाळी यांच्या सुक्ष्म निरिक्षणातुन आपणही कृत्रीमपणे नैसर्गिक धाग्यांपासुन वस्त्र बनवू शकतो ती ही अभिनव संकल्पना. कल्पना सुचुन ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याला जे सायास पडले असतील...त्यासाठी जी कृत्रीम साधने बनवायला जी प्रतिभा वापरावी लागली असेल तिची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. हजारो प्रयत्न वाया गेल्यानंतरच त्याला वस्त्रनिर्मिती जमली असनार. त्यासाठीचा त्याचा पराकोटीचा संयम आदर वाटावा असाच आहे.
आस्ट्रेलिया, रशिया आणि आस्ट्रिया येथे नवपाषाणयुगातील (इसपु १०,०००) कातलेले धागे व विणलेल्या वस्त्रांचे अवशेष मिळाले आहेत. भारतात सिंधु संस्कृतीत हडप्पा व लोथल येथेही रंगवलेल्या सुती वस्त्रांचे अवशेष मिळालेले आहेत. एवढेच नव्हे तर सुत कातण्याच्या चरख्याचे व चात्यांचेही अवशेष मिळालेले आहेत. तेथेच सापडलेल्या मानवी प्रतिमांनी बेलबुट्टीदार तलम वस्त्रे नेसलेली आपल्याला पहायला मिळतात. म्हणजेच भारतात कापसापासुन वस्त्रे बनवण्याची कला सनपुर्व दहा-बारा हजार वर्षांपुर्वीपासुनच विकसीत होवू लागली होती असे म्हणता येते. ऋग्वेदातही लोकरीच्या वस्त्रांचे विपुलतेने उल्लेख येतात. वैदिक काळातही कपडे विणण्याचे काम स्त्रीयाच करत असत. अशा स्त्रियांना वायित्री, वासोवाय अथवा सिरी म्हणत. किंबहुना जगभर आद्य विणकर या स्त्रीयाच होत्या असे आपल्याला दिसते.
धागे (मग ते लोकरीचे का असेनात.) पिंजणे, कातने ते धाग्यांची शिस्तबद्ध उभी रचना करत मग आडवे धागे अत्यंत कौशल्याने गुंफत नेत वस्त्र बनवणे ही किती किचकट व कष्टदायक प्रक्रिया असेल हे आपण सोबतच्या इजिप्तधील इसपु ३००० मधील सोबतच्या चित्रावरुन पाहु शकतो.



  सुरुवातीला जगभर अशाच प्रकारे वस्त्रे विणली जात असत. पुढे मात्र भारताने हातमागांचा शोध लावत इसपु १५०० ते इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंत जागतीक वस्त्रोद्योगावर स्वामित्व गाजवले. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्था ही वस्त्रांना केंद्रस्थानी ठेवतच भरभराटीला आली. हातमागाचा भारताने लावलेला शोध म्हणजे औद्योगिक क्रांतीचा श्रीगणेशा होता. जगाला भारताने दिलेली आद्य देनगी म्हनजे वस्त्रोद्योग होय. अत्यंत मुलायम, सोपी ते क्लिष्ट संरचना, पोत आणि विण असनारी साधी ते तलम नक्षीदार वस्त्रे निर्माण करण्यात अठराव्या शतकापर्यंत भारताशी स्पर्धा करु शकणारा एकही देश नव्हता. विणकर समाजाने अवघ्या जगात भारताची निर्विवादपने शान वाढवली.
वस्त्रांचा शोध हा मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. नैसर्गिक साधनांना आपण आपले जीवन सुखकर करण्यासाठी वापरु शकतो ही जाणीव आपल्या पुर्वजांना नक्कीच प्रेरीत करुन गेली असणार.

विणकर समाजाचा उदय

प्रत्येक व्यवसायाची जात बनणे हे भारतीय समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण आहे. भारतातील विणकामाचा इतिहास पुरातन असला तरी तो स्त्रियांकरवी जवळपास घरोघरी चालवला जात होता. सिंधु काळातच भारताचा विदेश व्यापार सुरु झाला. इजिप्तमधील ममींना गुंडाळलेल्या जात असलेल्या वस्त्रांत भारतीय कापसाचीही वस्त्रे मिळाली आहेत. याचाच अर्थ असा कि सनपुर्व ३२०० पासुनच भारतीय सुती वस्त्रे जगभर पसरु लागली होती. मागणी वाढली तसे विविध मानवी समुदायांतील कुशल लोक या व्यवसायात उतरु लागले. हातमागांचा शोध लावला. सुत कातणे हे काम स्त्रीयांकडे राहिले तर वस्त्रे विणने आता पुरुष करु लागले. अशा रितीने देशभर हा व्यवसाय फोफावला.
विणकरांना प्रांतनिहाय व विणण्यातील वेगवेगळी कौशल्ये यानुसार वेगवेगळी नांवे मिळाल्याचे आपल्याला दिसते. जैन कोष्टी व मुस्लिम वीणकर (मोमिन, व अन्सारी) वगळले तर या सर्वच समाजातील समान धागा म्हणजे ते शैव आहेत. चौंडेश्वरी (चामुंडेश्वरी) जिव्हेश्वर, गणपती अशा शैव दैवता त्यांची आराध्ये आहेत. लिंगायत समाजातही कोष्टी आहेत.
महाराष्ट्रात प्रामुख्याने देवांग कोष्टी, हळबी, लाड, क्रोष्टी, गधेवाल, देशकर, साळेवार, स्वकुळ साळी, सुतसाळी व पद्मसाळी अशा जवळपास पंधरा पोटजाती आहेत. वरकरणी या विविध जाती पडलेल्या दिसत असल्या तरी त्या एकाच मुळच्या समाजातुन व्यवसाय कौशल्यातील भिन्नतेमुळे निर्माण झाल्या आहेत एवढेच.
उदाहरणार्थ "कोष्टी" हे जातीनाम कोसा अथवा कोष (रेशीम अथवा कापसाचा) यापासुन वस्त्रे बनवणा-यांना लाभले. साळी (अथवा शाली/शालीय) हा शब्द शाल (साल) वृक्षाच्या सालीपासुन पुरातन काळी वस्त्रे बनवत त्यांना मिळाला. त्यात पुन्हा वस्त्रांचे अनेक प्रकार असल्याने ज्या-ज्या प्रकारची वस्त्रे बनवण्यात निपुणता होती त्यानुसार त्या त्या वर्गाला विशेषनामेही मिळाली. उदा. देव व उच्चभ्रु लोकांसाठी वस्त्रे बनवत त्यांना देवांग (अथवा देवांगन) कोष्टी म्हटले जावू लागले. काही नांवे, उदा. हळबी कोष्टी, ज्या विशिष्ट मानवी समुदायातुन आले त्यावरुन पडली. हळबी स्वत:ला मुळचे झारखंडमधील हळबा आदिवासी मानतात. यांची वसती प्रामुख्याने विदर्भात आहे.
कोष्टी/साळी/कोरी समाज देशभर पसरला असुन या समाजाने आपली मुळे उत्तरकाळात कधी ब्राह्मण तर कधी क्षत्रियांशी भिडवली असली तरी वैदिक वर्णव्यवस्थेने मात्र त्यांना शुद्रच मानले आहे. तेराव्या शतकानंतर निर्माण झालेल्या अन्याय्य बलुतेदारी पद्धतीत बारा बलुतेदारांत त्यांचा समावेश केला गेलेला आहे. महाराष्ट्र शासनाने २००८ पासुन त्यांचा समावेश स्पेशल ब्यकवर्ड क्लासमद्धे केलेला आहे.

पुराणकथा बनवणारा एकमेव समाज!

आपल्याला आश्चर्य वाटेल पण बहुदा हा भारतातील एकमेव समाज आहे ज्यांची स्वत:ची ज्ञाति-माहात्म्ये व उदय सांगणारी किमान दोन पुराणे आहेत. यातुन समाजोत्पत्तीची येणारी कथा ही ख-या समाजेतिहासाला धरुनच आहे हे विशेष. अर्थात त्याला अद्भुततेची जोड आहेच. यापैकी पहिले पुराण म्हणजे देवांग पुराण. हे पुराण मुळ्चे संस्कृतातील आहे असे म्हणतात, परंतु आता त्याचे तेलगु, तमिळ आणि कानडी अनुवाद उपलब्ध आहेत. या पुराणानुसार शिवाने ब्रह्मदेवाला विश्वनिर्मितीची आज्ञा दिली. ब्रह्मदेवाने मनुमार्फत विश्व निर्माण केले व त्यानंतर तो शिवस्थानी विलीन झाला. परंतु मानव प्राण्यासाठी वस्त्रे निर्माण करणारे निर्माण केले गेलेच नाहीत. त्यामुळे मानवांना वल्कले व चर्म पांघरुन रहावे लागले. यामुळे त्रस्त झालेल्या लोकांनी शिवाची ब्रह्मदेवामार्फत याचना केली. त्यामुळे शिवाने देवल ऋषीला निर्माण केले. देवल ऋषीने प्रथम विष्णुकडुन धाग्यांची प्राप्ती करुन घेवून देवांसाठी वस्त्रे वीणली. मग त्याने मयासुराकडुन मानवांसाठी वस्त्रे विणायला चरखा व हातमाग मिळवला...अशी ही पुराणकथा पुढे जाते व शिवाचे व देवांग समाजाचे माहात्म्य विषद करते.
   दुसरे पुराण आहे श्री भगवान जिव्हेश्वर विजय (साळी माहात्म्य पुराण). हे पुराण मुळ अत्रि ऋषिंनी व्यासांच्या सांगण्यावरुन रचले व संत भानुदास खडामकर यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला.
या पुराणानुसार ब्रह्मदेव विष्णू व अन्य देवतागणासह भगवान शंकराकडे गेले व विनंती केली कि , `परमेश्वरा, आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली. तिच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झाली. ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून, पंचमहाभूतांना निर्मून, देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला खरा, पण देव, दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत.  त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे. हे महादेवा, वस्त्रानिर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विनंती करण्यास आम्ही आलो आहोत'तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रसन्न होऊन शंकरास म्हटले, `परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.'
मग शिवशंकराने आपल्या जिभेतुन एका दिव्य शिशुची निर्मिती केली...ते बालक म्हणजेच जिव्हेश्वर. साक्षात शिवपुत्र!
जिव्हेश्वर मोठा झाल्यानंतर मग आदीमायेच्या आदेशानूसार ब्रम्हा, विष्णु, महेश, नारद, शेष, नंदी आदी देवतांनी मागाच्या निरनिराळ्या भागांना रूप दिले. कैलासातील एका प्रशस्त जागेत मागाची स्थापना केली. ब्रम्हदेवाने कापसाची निर्मिती केली. कापसापासून सूत काढले गेले. सार्‍या देवांच्या कृपेने निर्मित त्या मागाची मनोभावे पूजा करून एका मंगल अशा सोमवारी शुभ मूहूर्तावर वस्त्र विणले गेले सर्वप्रथम कलात्मक वेलबुट्टीनी युक्त असा श्वेतवर्णाचा पीतांबर विणला गेला. अशा रितीने वीणकर समाजाचा आद्य पुरुष शिवाच्या जिव्हेतुन, म्हणजे खुद्द शिवपुत्रच, निर्माण झाला. या पुराणातील आठवा व नववा अध्याय म्हणजे विणकरांना विणकामातील सर्व प्रक्रिया समजावुन देणारा व विविध प्रकारची वस्त्रे कशी विणावीत याचे प्रशिक्षण देनारे म्यन्युएल आहे असे म्हटले तरी चालेल. एवढेच नव्हे तर तुतीची झाडे लावुन रेशीम कसे निर्माण करावे याचीही सविस्तर माहिती या पुराणात येते. शेतीचा अपवाद वगळता अन्य व्यवसायांबाबत प्राचीन काळी अशी रचना झाल्याचे दिसत नाही.
दोन्ही पुराणे आकाराने जवळपास अन्य पुराणांएवढीच मोठी असुन प्रासादिकही आहेत. आपल्या समाजाची उत्पत्ती एवढ्या विस्तृतपणे सांगणारी, अद्भुतरम्य घटनांनी भरलेली पुराणे फक्त कोष्टी/साळी या वीणकर समाजाची असावीत यावरुनही या समाजांची पुरातनता व त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो.
आणि ते खरेही आहे. इसवीसनपुर्व पंधराशेपासुन ते सन अठराशे पर्यंत या समाजाने अवघ्या जगाला आपल्या कुशल वीणकामाने वेड लावले. वीणकर समाजाचा हा प्रदिर्घ काळ म्हणजे भारताचा सुवर्णकाळच होता असे म्हनायला हरकत नाही. या सुवर्णकाळातील विणकर माहात्म्य आणि नंतर या समाजाचे कालौघात झालेले सामाजिक व आर्थिक अध:पतन, आजची ससेहोलपट याचा आढावा घेवूयात!

देशोदेशी गारुड

भारतीय वस्त्रे सनपुर्व ३२०० पासुनच निर्यात होवू लागली होती हे आपण पाहिले. जातककथा, ब्राह्मणे, जैन साहित्यात विविध प्रकारच्या वस्त्रांच्या व विणकर समाजाबाबतच्या नोंदी मिळतात. ढाक्क्याची मलमल, बनारसी वस्त्रे (भारतात बनारसी साड्यांसाठी अधिक प्रसिद्ध.) पैठणच्या सुप्रसिद्ध पैठण्या व सुती व रेशमी तलम वस्त्रे, याचे जगावर अद्भुत गारुड पसरले होते. इतके कि भारतीय मलमली वस्त्रंसाठी रोमचे नागरिक एवढा पैसा (सोण्याच्या रुपात) मोजत असत कि रोमची तिजोरी रिकामी व्हायला लागली. रोमचा बादशहा अस्वस्थ झाला. हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी (थोरला) या इतिहासकाराने नोंदवून ठेवले आहे.
या निर्माणकर्त्यांनी आपले कौशल्य वापरत असंख्य पोतांची, नक्षांची, संरचनांची वस्त्रे निर्माण केली. देशाची पत जगभर वाढवली. सिंधु संस्कृतीच्या काळानंतर चेऊल, सोपारा, भडोच ई. बंदरांतुन वस्त्रांचे तागे निर्यात होत. भरतकामातही एवढी प्रगती केली कि मार्को पोलो या जगप्रसिद्ध प्रवाशाने तेराव्या शतकात भारताला भेट दिली होती. आपल्या प्रवास वर्णनात त्याने या भरतकामातील अद्भुत प्रगतीबद्दल भारतीय कोष्ट्यांची/साळ्यांची मनसोक्त तारिफ केली आहे. पेरिप्लसनेही पहिल्या शतकात येथील मलमली वस्त्रांची तारीफ केलेली आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदात मानवी दैवाची तुलना विणकराच्या विणण्याशी केली आहे.
"दोन भिन्नरुप धारिणी युवतीस्वरुपी नियती सहा खुंट्याच्या मागावर
पुन्हा पुन्हा वस्त्र विणतात...
त्यापैकी एक धागे काढते आणि दुसरी जोडते..
त्यांचे हे कार्य अविरत आणि अविश्रांत चालु असते. (ऋग्वेद १०.७.४२)

      विदेश व देशांतर्गत व्यापारामुळे विणकर समाजाचीही आर्थिक भरभराट होत होती. हातमागाच्या शोधामुळे हा उद्योग ख-या अर्थाने पहिला इंजिनियरिंग उद्योग बनला. कापुस व हातमाग युरोपमद्धे गेले ते अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीस. थोडक्यात या विणकर साळी/कोष्टी/कोरींनी जगभर अद्भुत गारुड निर्माण केले. भारतात एक नाही-दोन नाही...जवळपास दोनशे प्रकारची वैविध्यपुर्ण वस्त्रे निर्माण होवू लागली होती...यावरुनच विणकर समाजाच्या प्रतिभेची कल्पना करता येवू शकते.

कौटिल्याच्या काळातील सरकारीकरण

या व्यवसायात जी भरभराट व्हायला लागली त्यामुळे राजसत्तांचे लक्षही या उद्योगाकडे वळाले. जेथे धन दिसते तेथे सरकार वळणार नाही तरच नवल! दुस-या शतकात विणकामाचा उद्योग सरकारी बनला असे अर्थशास्त्रावरुन दिसते. विणकामाचे सरकारी कारखाने निघू लागले. विणकरांना तेथे स्वतंत्र उद्योग सोडुन नोक-या करणे भाग पडु लागले. ही एकार्थाने वेठबिगारीच होती. विणकरांवरील देखरेख करणा-या अधिका-यांना "सूत्राध्यक्ष" असे म्हटले जावू लागले. घायपात, कापुस, लोकर, गवत, झाडांच्या साली व तागापासुन तंतू काढणे, कातणे व त्याची वस्त्रे विणने ही कामे त्याच्या देखरेखीखाली होऊ लागली. सूत कातायचे काम विधवा, दंड देण्यास असमर्थ असणा-या स्त्रिया, जोगिणी व वेश्यांकडुन करवून घेवू जावू लागले. या काळात (इसवी सन २०० ते ५००) विणकरांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे आपल्याला दिसते. त्यानंतर मात्र जशी राजकीय स्थिती बदलली, पुन्हा विणकर स्वतंत्र झाले.
सुरुवातीला या व्यवसायात रस असनारे व विणकामात कुशल असनारे विणकामाच्या व्यवसायात सहजी येवू शकत असे. पुढे मात्र या व्यावसायिइकांच्या प्रदेशनिहाय जाती पडु लागल्या. अहिर, हळबा, वैश्य ते अगदी ब्राह्मणही या व्यवसायात पडले व तेही कोष्टी/साळी/कोरी (कोलिक) म्हणुनच ओळखले जावू लागले. त्यातही पोटजाती पडु लागल्या. पोटजाती या कौशल्याच्या आधारांवर निर्माण होत गेल्या.
अर्थव्यवस्थेत विणकर समाजाचा सर्वात मोठा वाटा असला तरी मात्र दुस-या शतकापासुनच विणकरांचे काम हे हलक्या प्रतीचे मानले जावू लागले हेही एक आश्चर्यच आहे. "विणकाम हे अत्यंत कष्टाचे व हलक्या दर्जाचे आहे." असा उल्लेख भीमसेन जातकात येतो. स्मृतींनी विणकरांना शूद्र घोषित करुन टाकले. नग्नांना ज्यांनी आपल्या अपार कौशल्याने व प्रतिभेने वस्त्रे दिली, नटने-थटने शिकवले, जीवनात एक अनमोल वस्त्रानंद भरला...देशाच्या तिजो-या भरल्या त्यांनाच शूद्र ठरवत सामाजिक दर्जा घसरवणा-या वैदिक स्मृती व त्यांचे पालन करू लागलेल्या तत्कालिन सर्वच समाजाला दोष द्यावा तेवढा थोडाच आहे.
असे असले तरी या समाजाचा आर्थिक दर्जा मात्र उच्च स्वरुपाचाच होता असे आपल्याला दिसते. तेराव्या शतकात एकट्या ठाण्यात पाच हजार विणकर मखमली कापड बनवत असत असा उल्लेख अरबी व्यापा-यांनी करुन ठेवला आहे. बु-हाणपुरही या कालात वस्त्रनिर्मितीचे मोठे केंद्र म्हणुन उदयाला आले होते.
तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रात बलुतेदारी नामक एक अनिष्ट प्रथा सुरु झाली. त्यामुळे नवनवीन शोधण्याचा उत्साह मावळत गेलेला दिसतो. हातमाग ते यंत्रमाग ही पुढची पायरी मागणी असुनही भारत गाठु शकला नाही त्याचे मुळ कारण या अध:पतनाच्या अवस्थेत आहे. त्यात सतत पडत असलेले दुष्काळ आणि राजकिय अस्थिरतेने भरभराटीचे दिवस अस्तंगत होवू लागले. अनेक विणकरांनी धर्मही बदलला. कोणी जैन झाले तर कोणी मुस्लिम. मोमिन व अन्सारी हे आजचे मुस्लिम विणकर मुळचे हिंदुच. त्यांना जुलाहा असे म्हटले जाई. उत्तर भारतात जुलाहा हे हिंदुही धर्मातही आहेत व मुस्लिमही.
या सामाजिक व आर्थिक अध:पतनाच्या काळात विणकर समाजात अनेक संतही जन्माला आले. कबीर हे या सर्वांचे मेरुमणी. थिरुवल्लीवर या विणकर संताने तर दक्षीणेत आपल्या स्वर्गीय काव्याने जनमानसावर मोहिनी घातलेली होतीच. याशिवाय दादु दयाळ, कहार, रज्जब आदी अनेक संत विणकर समाजात जन्माला आले. वैदिकांच्या विषमतेच्या उद्घोषाविरुद्ध बंड पुकारत या सर्वच संतांनी सामाजिक समतेची चळवळ उभारायला मोलाचा हातभार लावला.

औद्योगिक क्रांती: विणकर भुईसपाट

अठराव्या शतकापर्यंत आपल्या विशिष्ट कौशल्याने जगभर आदराचे कारण बनुन राहिलेल्या विणकर समाजाला शेवटचा झटका दिला तो औद्योगिक क्रांतीने. युरोपात यांत्रिक मागांचा शोध लागला. गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले. भारतात बस्तान बसवु पहात असणा-या इंग्रजांना येथील बाजारपेठ काबीज करायची होती. जशी त्यांची सत्ता स्थापित झाली तसा त्यांनी आपला पहिला मोर्चा विणकरांकडे वळवला. त्यांच्या कापडाचा दर्जा हीणकस असला तरी ते स्वस्ता:त उपलब्ध होते. (आठवा ते भरड मांजरपाट.) पण तरीही आपण देशीवस्त्र उद्योगाला तोंड देवू शकत नाही हे लक्षात येताच त्यांनी दडपसत्र आरंभले. अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी येथील उद्योग नष्ट करण्याचा चंग बांधला. बंगालमधील मलमली वस्त्रे विणना-यांचे तर अंगठेच तोडले. हातमागावरील विणकाम खालावू लागले.
महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात "स्वदेशी" चा नारा दिला. "चरखा चला चला के...लेंगे स्वराज्य लेंगे" सारा देश एकसुरात गाउ लागला. देशी हातमागांना पुन्हा बरे दिवस येवू लागले. सारा देश स्वदेशीमय झाला तो गांधीजींच्या चरखा क्रांतीने.
पण स्वातंत्र्य आले. स्वतंत्र भारताच्या सरकारनेही औद्योगिकरणाचाच वसा घेतला. असे करत असतांना आपण या उद्योगात जे पुरातन कालापासुन आहेत त्यांना आधुनिकिकरणाच्या प्रवाहात भांडवल पुरवत आणायला हवे याचा मात्र विसर पडला. धडाधड हातमाग बंद पडु लागले. पुर्वेचे म्यंचेस्टर म्हणुन गाजणा-या इचलकरंजीसारख्या हातमागांच्या शहरावरही ही वीज कोसळली. यंत्रमाग आले. कुशल व स्वतंत्र बाण्याचे विणकर यंत्रमागांवर नोकर म्हणुन काम करु लागले. एवढ्या जनसंख्येला यंत्रमाग सामावून घेवू शकत नव्हते. त्यांना आता अन्यत्र रोजगार शोधण्यासाठी भटकावे लागले. काही शिकलेत...अगदी उच्च पदवीधर होत नव्या जगात नव्याने सुरुवात करत जगण्याच्या वाटा शोधताहेत.
या समाजाला आजही राजकीय प्रतिनिधित्व नाही. केंद्र सरकारने विणकरांच्या समस्या सोडवण्यासाठी यंदाच्या बजेटमद्धे फक्त शंभर कोटी रुपयांचा निधी दिलाय. त्याविरुद्ध आवाज उठवण्याचेही सामर्थ्य या समाजाकडे आज उरलेले नाहीय. अवघ्या जगावर गारुड माजवणारा हा कलासक्त समाज आज त्यांच्या परंपरागत व्यवसायात मात्र देशोधडीला लागलाय.

पोटजाती आणि सामाजिक क्रांती

विणकरांत प्रदेशनिहाय व जातीअंतर्गत अनेक पोटजाती आहेत. मुळचे हे सर्व एकाच विराट मानवी समुदायातुन व्यवसाय कौशल्यामुळे विणकर बनलेले हे लोक. पण पोटजातींत विवाह होत नव्हते. प्रत्येक पोटजात ही स्वतंत्र समजत आपापली पाळेमुळे काल्पनिक पुराण इतिहासांत शोधत होती. सर्व विणकर समाजाचे हंपी येथे जगद्गुरु पीठ आहे. सध्या श्री दयानंद पुरी महाराज या पीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी प्रागतिकतेचा वसा घेत बेटीबंदी तोडण्यासाठी अव्याहत प्रयत्न सुरु केले आहेत. सुजाण विणकर समाजही त्यांच्या आवाहनाला सकारात्मक पाठिंबा देत आहे ही एक नव्या समाज क्रांतीची सुरुवात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दुर्दैव हे कि आता पुन्हा ती हातमागावरील विलक्षण पोतांची घट्ट परंतु तलम विणीची वस्त्रे पहायला मिळनार नाहीत...
एका विराट देशी उद्योगाचा हा अंत वेदनादायक आहे हे नक्कीच!

-संजय सोनवणी
९८६०९९१२०५

Saturday, July 14, 2012

दु:ख आणि आनंदाबद्दल...



१. जीवन दु:खमय नाही कि आनंदमयही नाही.

२. जीवन वास्तव आहे...आनंद आणि दु:ख मात्र फक्त मानसिक संवेदना आहेत.

३. एकाला ज्यामुळे आनंद वाटतो त्याचमुळे दुस-याला आनंद वाटेल असे नाही तसेच ज्यामुळे एकाला दु:ख वाटेल त्यामुळे इतरांना दु:खच वाटेल असेही नाही.

४. एवतेव आनंद आणि दु:ख या फक्त भावना असुन त्यांना चिरकालिक अस्तित्व नाही.

५. म्हणजेच, आज ज्यामुळे दु:ख वाटते त्यामुळेच उद्याही दु:ख वाटेल असे नाही वा आज ज्यामुळे आनंद वाटतो त्यामुळे उद्याही आनंद वाटेलच असेही नाही.

६. कारण आनंद आणि दु:ख या मानवी जीवनावर भावनात्मक माणसाने आरोपित केलेल्या फक्त भावना आहेत. ते वास्तव नाही.

७. जीवन दु:खमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञान जेवढे असत्य तेवढेच जीवन आनंदमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञानही असत्य. खरे तर जीवन म्हणजे आनंदही नाही कि दु:खही नाही.

८. आनंद आणि दु:ख या क्षणिक भावना आहेत. प्रिय पुत्र वा पत्नी गेली म्हणुन दु:खी झालेला अनंत काळ दु:खात राहत नाही तसेच हे.

९. मुळात भावना क्षणिक असल्यानेच भावनांचे मुल्य क्षणिक आहे म्हणुन ते क्षणिक मुल्यही महत्वाचे आहे...पण ते चिरकालिक महत्तेचे नाही.

१०. आनंदी व्हायचे कि दु:खी हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबुन असते. कृत्रिमतेने या दोन्ही बाबी लाभत नाहीत.

११. जो स्वत:ची निष्ठेने आराधना करतो तोच कोणत्याही स्थितीत नेहमी आनंदी राहू शकतो.

१२. स्वत:वर ज्याचे प्रेम आहे तोच दुस-यांवर प्रेम करु शकतो. तसेच हे.

१३. परंतु आनंद अथवा दु:ख ही मानवी प्रेये नव्हेत. साध्यही नव्हे कि साधनही.

१४. प्रेयासाठी जो साधन शोधतो वा साध्य ठरवतो त्याला प्रेय लाभण्याची शक्यता नाही.

१५. दु:ख आणि आनंद या भावनिक बाबी असल्याने जर कोणी त्यांच्या नाशाबद्दल बोलत असेल तर तो असत्य बोलत आहे. सुख आणि दु:खाला समान माना असे म्हनणे भ्रामक आहे ते यामुळेच.

१६. ज्याला आनंद हवा असतो त्याला दु:खही मिळनारच. ज्याला काहीच नको आहे त्यालाच आनंद लाभण्याची शक्यता अधिक.

१७. भावनिक असणे हे मनुष्यत्वाचे नैसर्गिक लक्षण आहे. योग-तपादिंनी मनुष्य भावरहित तटस्थ होतो असे म्हनणे अनैसर्गिक व म्हणुनच असत्य आहे.

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...