Saturday, July 14, 2012

दु:ख आणि आनंदाबद्दल...१. जीवन दु:खमय नाही कि आनंदमयही नाही.

२. जीवन वास्तव आहे...आनंद आणि दु:ख मात्र फक्त मानसिक संवेदना आहेत.

३. एकाला ज्यामुळे आनंद वाटतो त्याचमुळे दुस-याला आनंद वाटेल असे नाही तसेच ज्यामुळे एकाला दु:ख वाटेल त्यामुळे इतरांना दु:खच वाटेल असेही नाही.

४. एवतेव आनंद आणि दु:ख या फक्त भावना असुन त्यांना चिरकालिक अस्तित्व नाही.

५. म्हणजेच, आज ज्यामुळे दु:ख वाटते त्यामुळेच उद्याही दु:ख वाटेल असे नाही वा आज ज्यामुळे आनंद वाटतो त्यामुळे उद्याही आनंद वाटेलच असेही नाही.

६. कारण आनंद आणि दु:ख या मानवी जीवनावर भावनात्मक माणसाने आरोपित केलेल्या फक्त भावना आहेत. ते वास्तव नाही.

७. जीवन दु:खमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञान जेवढे असत्य तेवढेच जीवन आनंदमय आहे म्हणुन निर्माण केले गेलेले तत्वज्ञानही असत्य. खरे तर जीवन म्हणजे आनंदही नाही कि दु:खही नाही.

८. आनंद आणि दु:ख या क्षणिक भावना आहेत. प्रिय पुत्र वा पत्नी गेली म्हणुन दु:खी झालेला अनंत काळ दु:खात राहत नाही तसेच हे.

९. मुळात भावना क्षणिक असल्यानेच भावनांचे मुल्य क्षणिक आहे म्हणुन ते क्षणिक मुल्यही महत्वाचे आहे...पण ते चिरकालिक महत्तेचे नाही.

१०. आनंदी व्हायचे कि दु:खी हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबुन असते. कृत्रिमतेने या दोन्ही बाबी लाभत नाहीत.

११. जो स्वत:ची निष्ठेने आराधना करतो तोच कोणत्याही स्थितीत नेहमी आनंदी राहू शकतो.

१२. स्वत:वर ज्याचे प्रेम आहे तोच दुस-यांवर प्रेम करु शकतो. तसेच हे.

१३. परंतु आनंद अथवा दु:ख ही मानवी प्रेये नव्हेत. साध्यही नव्हे कि साधनही.

१४. प्रेयासाठी जो साधन शोधतो वा साध्य ठरवतो त्याला प्रेय लाभण्याची शक्यता नाही.

१५. दु:ख आणि आनंद या भावनिक बाबी असल्याने जर कोणी त्यांच्या नाशाबद्दल बोलत असेल तर तो असत्य बोलत आहे. सुख आणि दु:खाला समान माना असे म्हनणे भ्रामक आहे ते यामुळेच.

१६. ज्याला आनंद हवा असतो त्याला दु:खही मिळनारच. ज्याला काहीच नको आहे त्यालाच आनंद लाभण्याची शक्यता अधिक.

१७. भावनिक असणे हे मनुष्यत्वाचे नैसर्गिक लक्षण आहे. योग-तपादिंनी मनुष्य भावरहित तटस्थ होतो असे म्हनणे अनैसर्गिक व म्हणुनच असत्य आहे.

6 comments:

 1. अनुभवाला येणाऱ्याच काय पण सर्व घटना जगरहाटी चालू रहाण्यासाठी आवश्यक आहेत आणि सुख-दु्ःख असे त्याचे वर्गीकरण आपण करतो हे लक्षात घेतल्यास तटस्थपणासाठी योग-तपाचा आधार अनावश्यक आहे असे मला वाटते

  ReplyDelete
 2. १ आणि २. - सोनावानिजी - जीवन दुक्खामय पण आहे आणि आनंदमय पण आहे. फक्त प्रत्येकाच्या दुक्खाच्या आणि आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात. दुक्ख आणि सुख जरी मानवी मनाच्या संवेदना असल्या तरी जगातील सगळी माणसे त्या संवेदानामधून जात असतात त्यामुळे त्या आहेत हे गृहीत धरणे आवश्यक आहे. कारण माणसाचे सगळे आयुष्य हे सुख दुखाच्या फेर्यात अडकले आहे. तुमचे अगदी खरे आहे कि कोणतेही दुख किवा आनंद हा चिरकाल नसतो... तर माणूस नवीन नवीन दुखे शोधण्याचा आयुष्यभर प्रयत्न करत असतो. या जरी मानवी संवेदना असल्या तरी ह्यातून मुक्ती मिळणे किती अवगढ आहे ते तुम्ही जन्ताचाच मग त्याचे अस्तित्व स्वीकारा म्हणजे मुक्ती मिळायला सोपे जाईल. . उदाहरणार्थ - तुम्ही जे तत्वाद्य्णन मांडले आहे ते तुम्हाला तरी लागू पडते का? दुक्ख आणि सुख ह्या फक्त मानवी सावेन्दना आहेत त्यातून तुम्ही मुक्त झाला आहात का? उत्तर नाही असेल तर तुम्हाला हे तत्वज्ञान मांडण्याचा अधिकार नाही.

  ७. जीवन दुक्खामय आहे हे त्व्ताव्ज्ञान अगदी सत्य आहे. कारण माणूस एकाच दुक्खावर जास्त काळ दुखी राहतो पण एका आनंदावर जास्त काळ आनंदी राहत नाही.......हे तत्वज्ञान अप्लासारख्या सामान्य माणसासाठी सत्य आहे कारण जरी भासमय असले तरी ते आपल्या आयुष्यावर परिणाम करते त्यामुळे आपले जीवन हे दुक्ख्मय आहे अनाद्मय आहे.......फक्त गौतम बुद्धाचे जीवन हे दुख आणि आनंद याह्च्या वर गेले असावे........ते पण जेवा त्यांनी मान्य केले कि जीवन दुक्खामय आहे आणि त्यावर उपाय शोधला.......

  ११. जेवा आनंद हाच जरा खोटा आणि फसवा आहे तर त्यासाठी निष्ठेने आराधना करायची गरज का आहे?
  १६. जेवा हे सगळे मानसिक आहे तेवा आनंद मिळणारच आणि दुख मिळणारच - हा तुमचा किती मोठा विरोधाभास आहे.
  १७. माणूस ह्या सगळ्या भवनाच्या वारी जावू शकत नाही ह्यावर एझे अजून कोणतेही मत तयार झालेले नाही.......बुद्धीसम मध्ये याचे उत्तर सापडावे अशी अपेक्श्या करतो...आणि अभ्यास करून प्रतिक्रिया नोंदवतो....

  ReplyDelete
  Replies
  1. विकासजी, जीवन दु:खमयही नाही कि आनंदमयीही हे सुरुवातीलाच सांगितल्यावर व या भावना केवळ मानसिक आहेत हे स्पष्ट केल्यानंतर जरी आनंद वा दु:ख यांना चिरकालिक असे अस्तित्वच नसल्याने आनंद वा दु:खाला मुळत काही अर्थ रहात नाही हे समजावून घ्यावे लागते. मनुष्याचे आयुष्य हे सुख-दु:खाच्या फे-यात अडकले असू शकत नाही कारण माणुस हा वास्तव भौतिक अस्तित्व आहे तर या भावना या काल्पनिक आहेत. सुख-दु:खाच्या भावना त्यामुळेच कालसापेक्ष व परिस्थितीसापेक्ष बदलत जात असतात.

   जीवन दु:खमय आहे ही मुळात मानवी मनाची वंचना आहे तसेच जीवन आनंदमय आहे हीसुद्धा भावनिक बाजु आहे. दोन्ही बाजु सत्य नाहीत.

   जीवन हे तटस्थ व निर्विकार आहे.

   मनामुळे सुख आणि दु:ख या भावना निर्माण होतात. जीवन चीरस्थायी आहे तर भावना या तात्कालिन असतात. भावनांचे मुल्य हे त्या-त्या स्थल-कालसापेक्षतेत ठरवावे लागते. त्यातल्या त्यात आनंद हा प्रेय असल्याने त्याचे अस्तित्व पुन्हा अभावनिक होण्यानेच अनुभवता येवू शकते....तेच वांछित असेल तर. जेही काही वांछित असते ते आनंद देत नाही.

   असो. कोणता इझम काय म्हणतो हे महत्वाचे नाही. मी आनंदीही नसतो कि दु:खीही. त्यामुळे मी नेमका काय आहे हे ठरवण्याचे सध्याचे ऐहिक मापदंड सध्या तरी मला उपलब्ध नाहीत.

   आणि हो...मी मला जे वाटतेय ते सांगतो आहे...अधिकार नक्कीच नाही...आणि मग तो कोणात होता वा आहे?

   Delete
 3. सोनावानिजी - मी आनंद आणि दुख ह्या संवेदना किवा मनाच्या कल्पना आहेत हे मान्यच केले आहे. पण मन हा माणसाचा अविभाज्य घटक आहे आणि तो आपल्यावर राज्य करतो - त्यामुळे अल्प्ल्या आयुष्यावर आपले सुख दुखाचे विचार राज्य करतात. जरी सायान्तिफिकॅली आपण म्हणू शकू कि जीवन आनंदमय नाही किवा दुखमय नाही पण हे तो पर्यंत शक्य नाही जो पर्यंत आपण सुख दुखाच्या कल्पनेतून बाहेर पडत नाही. फक्त वेदना , भूक तहान ह्याचा गोष्टी खर्या आहेत हे पण मान्य........मग मला उत्तर द्या किती लोक ह्या दुख आणि अनाद ह्या कल्पनेतून बाहेर पडलेत? जर हे कोणालाच शक्य नाही तर मग हे एका गणिती नियमानुसार होईल. म्हणजे ठेरोतीकॅली आपण भूतकाळात किवा भविष्यकाळात प्रवास करू शकतो पण ते प्रत्याक्ष्यात अजून तर शक्य नाही म्हणून. मी म्हणतो.....गणिती शक्य असेल पण प्रत्याक्ष्यात नसल्यामुळे जीवन हे दुक्खामय आणि आनंदमय आहे.

  इझम महत्वाचा नाहीच - कारण आपण कोणत्या इझम नुसार लिहायला बांधील नाहीत - तुम्ही पण आणि मी पण - तुम्ही लिहिले आहे भावाविरहित तटस्थ होणे अशक्य आहे - इथेच तुम्ही मान्य केले कि जीवन भावाने शिवाय चालू शकत नाही आणि भंव म्हटले कि सुख दुख आलेच कि. तुम्ही १६ नंबर ला उत्तर दिले नाही - तुम्हीच म्हणता सुख मिळणार दुख मिळणार - आणि त्याचे अस्तित्व हि नाकारता?

  १६. जेवा हे सगळे मानसिक आहे तेवा आनंद मिळणारच आणि दुख मिळणारच - हा तुमचा किती मोठा विरोधाभास आहे.
  अधिकाराची गोष्ट - तुम्ही सुख दुखातून मुक्त झालात का? जर तुमचे तत्वज्ञान तुम्ल्हालाच लागू नसेल तर बाकीच्या लोकांनी कसे स्वीकारावे?

  ReplyDelete
  Replies
  1. विकासजी, किती लोक सुख-दु:खाच्या कल्पनेतुन बाहेर पडलेत यापेक्षा मुळात सुख आणि दु:ख या संकल्पनाच किती जनांना कळाल्यात हा खरा प्रश्न आहे. सुख-दु:खादि संकल्पना ढोबळ असोत...त्याच्या अलीकडे कि पलीकडे असोत, ज्याअर्थी या संकल्पना व्यक्तिपरत्वे व प्रसंगपरत्वे बदलत जातात त्याचाच अर्थ जीवन हे सुखमय आहे कि दु:खमय असा तर्क करता येत नाही. सुख-दु:खाच्या पलीकडे जाणे अणि त्या संकल्पना समजावुन घेत दोन्हींकडे पाहणे यात फरक आहे. संकल्पनाच लक्षात आली नाही तर तर दोन्हींत एकाकारपणा दिसु शकणार नाही...एवतेव सुख-दु:खादि भावनांतुन बाहेर पडता येणार नाही.

   भुल दिली कि वेदना जाणवत नाहीत..म्हणजेच त्य वेदनाही शाश्वत नाहीत.

   "१६. जेवा हे सगळे मानसिक आहे तेवा आनंद मिळणारच आणि दुख मिळणारच - हा तुमचा किती मोठा विरोधाभास आहे."

   वरील नीट समजावुन घेतले तर या विधानात कसलाही विरोधाभास जाणवणार नाही. जोवर मानसिक भावोद्दिपनावर सुख-दुख अवलंबुन आहे तोवर त्यांचा अनुभव येणारच...यात कसलाही विरोधाभास नाही.

   "अधिकाराची गोष्ट - तुम्ही सुख दुखातून मुक्त झालात का? जर तुमचे तत्वज्ञान तुम्ल्हालाच लागू नसेल तर बाकीच्या लोकांनी कसे स्वीकारावे?"

   -----पहिली गोष्ट, मी उपदेशक नाही त्यामुळे माझे काही स्वीकारावे कि न स्वीकारावे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. मी सुख-दु:खातुन मुक्त झालोय का? याचे उत्तर तसे मी वरील प्रतिसादात दिलेच आहे. मला या संकल्पना नीट समजल्यात त्यामुळे मला दोन्ही स्थित्यांत कसलाही फरक पडत नाही. I am "Free" in that sense. मुळात मुक्ति ही संकल्पनाही नीट समजावुन घ्यावी लागते. त्यावर मी दोनेक दिवसांत लिहितोच आहे.

   Delete
 4. हा सर्व काथ्याकुट करायची खरच गरज आहे का ???

  ReplyDelete