Friday, September 28, 2012

भाषेचा उदय कसा होतो? (1)




भाषा हा मानवसमाजाच्या अस्तित्वाचा, सांस्क्रुतीक प्रगतीचा प्राण आहे. किंबहुना भाषेच्या अस्तित्वाखेरीज मनुष्य हा पुरा-आदिम अवस्थेतच राहिला असता व कसलीही भौतीक प्रगती त्याला साध्य करता आली नसती. भाषेचा उदय कसा झाला असावा व त्याच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. असे असले तरी मानवी जिद्न्यासा अपार असते. जगात आजमितीला अक्षरशा हजारो भाषा आहेत. काही भाषा म्रुत झाल्या असुन काही म्रुत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत मानसशास्त्राचा पितामह सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.

भाषेच्या उद्गमाबाबत जी चर्चा आजवर झालेली आहे त्याबद्दल आपण प्रथम आढावा घेवूयात.
भाषेचा उगम व विकास हा क्रमशा: होत जात असून भाषेचा उदय एकाएकी झाला असे मानता येत नाही असे क्रमविकासवादी (Continuity theories)चे समर्थक मानत होते. भाषा आज आपण जशा पहातो-वापरतो त्या एवढ्या गुंतागुंतीच्या (Complex) व तरीही त्याहीपेक्षा वाढलेल्या नवीन मानसिक गुंतागुंतीच्या अभिव्यक्तीला अनेकदा पुरेसा न्याय न देना-या आहेत कि त्यांचा उगम एकाएकी झालेला असू शकत नाही असे त्यांचे एकुणातील मत आहे.
स्टिव्हन पिंकर हा या मताचा खंदा पुरस्कर्ता होता. त्याच्या मते जसा मानवी प्राण्याचा क्रमविकास झाला तशीच भाषाही क्रमश: विकसीत होत गेली. या सिद्धांताशी सहमत, पण विभिन्न मते असणा-यांपैकी, एका गटाचे मत होते कि भाषेचा उगम हा इतरांशी संवाद साधण्याच्या गरजेतुन निर्माण झाला नसुन आदिम अभिव्यक्तीच्या नैसर्गिक गरजेतुन निर्माण झाला आहे.
अगदी या क्रमविकाससिद्धांतालाही छेद देणारा पुढचा सिद्धात आला तो म्हणजे "क्रमखंडवादी" (Discontinuty Theories) सिद्धांत. या सिद्धांतवाद्यांच्या मते अन्य कोनत्याही प्राण्यात न आढळणा-या एकमेवद्वितीय अशा भाषानिर्मितीचे गुण मानवातच आढळत असल्याने ती बहुदा एकाएकी मानवी उत्क्रांतीच्या क्रमात कोणत्यातरी टप्प्यावर अचानकपणे अवतरली असावी असे या सिद्धांत्याचे मत आहे.
नोआम चोम्स्की हा क्रमखंडवादी सिद्धांताचा प्रमुख प्रसारक होता. परंतु त्याचा सिद्धांताला फारसे समर्थक लाभले नसले तरी एक लक्ष वर्षांच्या मानवी क्रमविकासात अचानक, बहुदा अपघाताने, भाषिक गुणांचा अचानक विस्फोट होत भाषा अवतरली असावी असे त्याचे मुख्य मत होते. या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवी शरीरातील, विशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे
अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधनी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. हे मत फारसे मान्य केले गेले नाही याचे कारण म्हणजे अंतत: वेगळे काही असे या सिद्धांतामुळे सिद्ध होत नाही.

मी भाषेचा क्रमविकास हा कालौघात होत जातो या मताशी सहमत आहे. पण क्रमविकास मान्य केल्याने मुळात भाषाच का निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही. याच सिद्धांत्यांचे म्हनने आहे कि एकतर संवाद साधण्यासाठी तरी भाषेची निर्मिती होते अथवा अभिव्यक्त होण्यासाठी. या सिद्धांत्यांनी अर्थातच चार्ल्स डार्विनचा उत्क्रांतीवाद मान्य केला आहे हे स्पष्टच आहे. एपपासुन पुरातन होमो, नियेंडरथल आणि मग आताच्या मानवाचे पुर्वज होमोसेपियन्स अशी या क्रमविकासाची रचना आहे.
मी या मताशी सहमत नाही. याचे कारण म्हणजे पुरादिम एपपासुन जर समजा आजचा मानव निर्माण झाला तर तसाच क्रमविकास अन्य प्राण्यांत दिसत नाही. डार्विनने प्रत्यक्ष निरिक्षणांतुन काही नि:श्कर्ष काढले. त्यात पुरातन आदिम अन्य प्राण्याची जीवाष्मे/अवशेष सापडल्याने व त्यांचे आताच्या काही प्राणी-पक्षी-मत्स्य यांच्याशी क्रमविकासामुळे (उत्क्रांतीमुळे) असलेले साधर्म्य दाखवले असले तरी ते वैद्न्यानिक पायावरच अमान्य होण्यासारखे आहे.

ते आधी कसे हे आपण येथे पाहुयात.

१. मानवाची जशी सरासरी २५ लक्ष वर्षांपासुन उत्क्रांती होत आहे हे मान्य केले तर मग याच कालखंडात अन्य प्राण्यांची उत्क्रांती झाल्याचे दिसुन येत नाही. तत्पुर्वीचे असंख्ये जीव नष्ट झाले ते बव्हंशी जल-वायुमान, तापमान, अचानक धुमसणारे ज्वालामुखी, उल्काप्रपात यामुळे. "सर्व्हावयल ओफ फिट्टेस्ट" हे डार्विन यांचे तत्व येथे मान्य होत नाही. ज्या आदिम जैवरासायनिक क्रियेतुन आद्य जीव निर्माण झाले, ते जशा प्रुथ्वीच्या रसायनी वातावरणात बदल होत गेले तसे नष्ट झाले आणि नवीन रसायनांतुन नवजीव निर्माण होत गेले.
२. प्रुथ्वीचा पुराकाळ हा अत्यंत विक्षोभी (Hostile) होता. परंतु ४०-४५ लाख वर्षांपुर्वी तो क्रमशा: स्थिर होत गेला व याच काळात आताचे दिसनारे सर्वच जीव पुन्हा नव्या दमाने, परंतु बदललेल्या पर्यावरणाशी जुळवणारे, अस्तित्वात आले. कोणतही जीव हा कोनत्याही पुरातन जीवघटकाचा उत्क्रंत नमुना आहे असे म्हणण्यासाठी कसलेही पुरावे उपलब्ध नाहीत. प्रथमदर्शीची साम्ये एवढेच सिद्ध करतात कि ज्या रसायनी क्रियेतुन तत्पुर्वीचे जीव भुतलावर जन्माला आले जवळपास तसलेच जीव त्याच परंतु बदललेल्या रसायनी क्रियेतुन जन्माला आले. त्यामुळे आधीच्या जीवांतील कमीअधिक साम्य, परंतु नवीन तत्सम रचना आणि तत्सम नैसर्गिक अभिव्यक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसुन येते.
३. जगण्याच्या संघर्षातुन नवनवीन नैसर्गिक आयुधे निर्माण होत गेली असाही डर्विन यांचा तर्क आहे. एप मद्धे जी नैसर्गिक आयुधे आहेत त्यापैकी एकही मानवात नहीत. शिवाय एप आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्यात अर्धमानव-अर्ध एप अशी एकही प्राणि प्रजाती आजही अस्तित्वात नाही. खरे तर एप पासुन क्रमविकास होत आजचा मानव बनला असता तर एकही एप या भुतलावर अस्तित्वात नसता. हाच न्याय अन्य प्राणिसमुहालाही लावता येतो.
याचा अर्थ असा नाही कि मी उत्क्रांतीवाद पुर्णतया फेटाळुन लावत आहे. डार्विन यांचे नि:ष्कर्ष अत्यंत धाडसी व घाईचे होते एवढेच मला येथे नमुद करायचे आहे. क्रमविकास हा फक्त मानवी संदर्भात घेता येतो व तोही मानसिक पातळीवर. भौतिक पातळीवरचे बदल हे पुन्हा वातावरणातील बदलांशी संबंधित आहेत, परंतु त्याचे प्रमाण अल्पांशात आहे. जे पुरामानवाचे अवशेष (विशेशता: आफ्रिकेतील) ग्रुहित धरत मानव प्रथम आफ्रिकेत अवतरला व नंतर जगभर पसरला (निएंडरथन मानव) हे मानववंशशास्त्रद्न्यांचे मतही असेच धाडसी आहे. प्रत्यक्षत जगभरच सर्वत्रच मानव प्राण्यापासुन ते अन्य सर्व प्राणी, जलचर,  जरी एकाच वेळीस नसले तरी काही शतकांच्या (लाखो वर्षांच्या नव्हे) अंतराने निर्माण झाले. रसायनी क्रियेतच जे मुळात, ज्याला आपण अक्षम जीव आपसुक निर्माण झाले त्यांचा आपसुक कालौघात नाश झाला.
पण "सर्वायवल ओप्फ़ द फिट्टेस्ट" हा न्याय लावला तर ज्यांच्यात कसलेही तसे फिट नाहीत अशा असंख्य प्रजात्या, "जीवो जीवस्य जीवनम" हा न्याय लावला तरी अस्तित्वात आहेत. त्यांच्यात कसलेही शारीर-भौतिक (उत्क्रांती) बदल झालेले नाहीत. जर काही प्राणि जमाती (उदा. डॊडॊ) नष्ट झाल्या असतील तर त्या मानवी अक्षम्य चुकांमुळे झाल्या आहेत. निसर्गाचा काही संबंध नाही.
  दुसरे असे कि मानवाला सक्षम तोंड देण्यासाठी मग जो नैसर्गिक क्रमविकास अशा प्राण्यांमद्धे व्हायला हवा होता तसाही तो झालेला नाही.

याचाच अर्थ असा होतो कि डार्विनचा उत्क्रांतीवादी सिद्धांत जसाच्या तसा मान्य करता येत नाही.

उलट क्रमखंडवाद (भाषेच्या विकासाच्या परिप्रेक्षात नव्हे हे क्रुपया ध्यानात घ्यावे.) सहज मान्य होण्यासारखा आहे. प्रुथ्वीचा जन्म सरासरी सहा अब्ज वर्षांपुर्वी झाला याबाबत सर्वच शास्त्रद्न्यांत एकमत आहे. हा कालखंड समजा दोनेक अब्ज वर्ष मागेपुढे होवू शकतो हेही सध्या मान्य करुयात, कारण तसे प्रत्यक्ष पुरावे अद्याप तरी हाती आलेले नाहीत. विश्वनिर्मितीशास्त्र अद्याप गणिती अंदाजांच्या पायावरच रेंगाळत आहे असे समजुन आपण पुढे जावुयात.

(क्रमश:)

9 comments:

  1. भाषा अस्तित्वात येण्यास मानवी मेंदूतील आवाजनिर्मिती करणारे केंद्र व आवाज ऐकणारे केंद्र एकमेकात मिसळलेले असणे हे काऱण असावे. हा अपघात असावा असे गणेशजन्माच्या कथेवरून वाटते.

    ReplyDelete
  2. माणसाच्या उत्क्रांतीबद्दलची डार्विनची सगळी मते नंतरच्या संशोधकांनी सिद्ध करून दाखवली आहेत, तसेच त्याच्या मतामध्ये भरही घातली आहे. मानवाचा एप ते मानव या सगळ्या प्रवासातील सगळे दुवे संशोधकांनी शोधून काढले आहे. या संदर्भातील माहिती, माहितीपट इंटर नेटवर उपलब्ध आहेत.
    डार्विनच्या सिद्धांताला विज्ञान जगतातून विरोध नाही, तर हे लोक धर्मवादी आहेत, कारण डार्विनचे मत त्यांना परवडणारे नाही.
    मोबाईल किंवा कॉम्पुटर कसा तयार झाला, त्याचे काम कसे चालते हे त्या क्षेत्रातल्या तज्ञांनाच चांगले कळते, आपल्याला नव्हे. तेथे आपल्याला काय वाटते याला महत्व नाही. तसेच मानवाची निर्मिती, उत्क्रांती याबद्दलची आपली मते महत्वाची नाहीत तर त्या विषयातील तज्ञांची मते महत्वाची आहेत.

    ReplyDelete
  3. See what Darwin himself says in his book--


    ... Why, if species have descended from other species by insensibly fine gradations, do we not everywhere see innumerable transitional forms? Why is not all nature in confusion instead of the species being, as we see them, well defined?… But, as by this theory innumerable transitional forms must have existed, why do we not find them embedded in countless numbers in the crust of the earth?… Why then is not every geological formation and every stratum full of such intermediate links? Geology assuredly does not reveal any such finely graduated organic chain; and this, perhaps, is the most obvious and gravest objection which can be urged against my theory. (Charles Darwin, The Origin of Species, pp. 172, 280)

    And there have been thousands of scientific objection to his theory.

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी,
    हा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन
    आध्यात्मिक पातळीवर जसे माणूस कोs हं असा प्रश्न विचारत असतो,त्या प्रमाणे आपण अनेक इतर पातळींवर हा प्रश्न स्वतःला विचारात असतो.
    उत्तरे बौद्धिक पातळीवर मिळवत असतो. तसे करताना त्याचे एक शास्त्र बनवत असतो.आजचा मी आणि कालचा मी यात फरक आहे का-तो असला पाहिजे का - ते नैसर्गिक आहे का ,अपरिहार्य आहे का.अशी वैचारिक भ्रमंती होत असते.
    आपण असा विचार करूया कि शब्दांशिवाय विचार शक्य आहे का-आहे ना ?-तर त्याचे उत्तर हो असेच आहे.पण शब्दांशिवाय विचार इतरांसमोर मांडणे फार कठीण आहे.
    बहिरे,मुके,आंधळे यांची सुद्धा एक खास भाषा असतेच नाही का ! ओठांच्या हालचाली , स्पर्श , डोळ्यांची,हातांची हालचाल,हि सुद्धा देहबोली म्हणूनच धरली जाते.तसे पाहिले तर त्याला पण व्याकरण असतेच -कारण व्याकरण म्हणजे मांडणीची शिस्त ,- नृत्यात देह बोलीच्या मदतीने विचारांची , भावनांची मांडणी होते -विचार आणि भावना एकमेकांना पूरक आहेत का ?
    जगातल्या पहिल्या माणसाला भाषेची अडचण भासली असेल का ?तशी कोंडी झालेल्या किती पिढ्या झाल्या असतील ? पहिली गरज काय असेल त्यांची -विचार कि भावना ?
    असे म्हणतात कि आईच्या उदरातून माणूस बाहेर येतो ,आणि पहिला "स्वतंत्र"श्वास घेतो .त्या वेळेस भीती हि पहिली भावना त्याच्या मेंदूवर नोंदली जाते.पहिले रेकार्ड.
    काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे नंतरचे. भीती ही चिरंतन आहे.आईची उब हे त्याचे सुख असते.अज्ञानात सुख असते हा मनुष्य धर्म आहे.
    थोडक्यात तान्ह्याचे रडणे ही त्याची भाषा असते हे नाकारता येणार नाही- या मध्ये भावना काय , तर भीती .आणि विचार काय तर असहायता . .
    माणसाला मेंदू आहे आणि तो विचार करतो . प्राण्यांना आणि पक्षांना पण मेंदू असतो आणि ते पण विचार करतात.
    कुत्री मांजरे घोडे हे पाळीव प्राणी आणि वाघ सिंह आणि तत्सम प्राणी - सगळे विचार करतात.-ते लढाया करतात-प्रेम करतात.-रागावतात -अगदी विनोद सुद्धा करतात.
    तत्वज्ञानात जसे मांडणीत दोष असू शकतो-तो त्या मांडणाऱ्याचा दोष आहे,तत्वाचा पराभव नव्हे , तसेच या विषयाच्या शास्त्राचे आहे. भाषा ही माणसाची गरज होती.
    खाणाखुणा - आवाजांचा चढ उतार आणि ठराविक स्वर व्यंजनांची ठराविक भावनांशी , विचारांशी घातलेली खुणगाठ आणि त्यांचा सामुहिक वापर-वारंवार वापर आणि त्याला त्या समूहाने-टोळीने दिलेली मान्यता यातून भाषा उत्पन्न झाली असेल-त्याला लिपी नसणार,( वेद जसे अपौरुषेय तशीच भाषापण ).फार नंतर लिपीचा उदय झाला असणार.
    माणसाला मन असते का - का फक्त बुद्धीच असते ? विचार करणे-रचना करणे,हे बुद्धीचे काम .ते काम मेंदू करतो.
    प्रत्येक विचारामागे मेंदूच असतो. मग मन म्हणजे काय ? ज्ञानेश्वर म्हणतात " मना करा रे प्रसन्न - सर्व सिद्धींचे कारण सुख समाधान इच्छा ते "
    मन शांत असणे म्हणजे काय ? मन उद्विग्न असणे म्हणजे काय ? विचार करण्याच्या क्रियेतून हि शांती वा अशांती निर्माण होते का ?
    ती दुसऱ्याला सांगावी - वाटून घ्यावी ही भावना- हे मानवाचे वैशिष्ठ्य आहे का ?

    ReplyDelete
  5. 1. “It is not the strongest of the species that survives, nor the most intelligent, but the one most responsive to change.”

    2. “Great is the power of steady misrepresentation”

    ― Charles Darwin

    ReplyDelete
  6. उत्क्रांत मानवOctober 1, 2012 at 3:01 AM

    Human Evolution Evidence

    http://humanorigins.si.edu/evidence


    Fossil Evidence
    From skeletons to teeth, early human fossils have been found of more than 6,000 individuals.

    http://humanorigins.si.edu/evidence/human-fossils

    ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा
    काय भुललासी वरलिया रंगा
    - संत चोखामेळा.

    ReplyDelete
    Replies
    1. This doesnt at all prove that human being has been evolved from any single species with others those took different paths. Sceince itself doesnt allows it in any mathematical model.

      Delete
  7. आपले उत्तर वाचून असेच हे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळोत एवढेच म्हणावेसे वाटते.
    आपली भूमिका टवटवीत आहे.आपण ann ryand या लेखिकेची atlas shrugged हि कादंबरी वाचली असावी असा भास झाला.
    आपल्या अखंड संशोधनाच्या भूमिकेचे स्वागत असो.
    शेती चा शोध माणसाला लागण्या पूर्वी माणूस चराऊ कुरणे शोधत हिंडत असेल असे वाटते.नदी पेक्षाही त्याला
    खुरट्या गवताचा प्रदेश त्याच्या गुरांच्या खाद्यांचा विचार करता प्रिय होता.एक प्रकारे तो नद्या आणि जंगले टाळत होता.त्यामुळे
    हिमालयाचा तराई चा प्रदेश त्याला आदर्श वाटत असेल.
    पुढे फिरस्तीपेक्षा एका ठिकाणी वस्ती करण्याचा त्याचा निर्णय हा केव्हढा थोर शोध आहे.!एक मैलाचा दगड!तो निर्णय त्याच्या मेंदूच्या प्रगल्भातेतून आला असेल का अपघाताने ? कसे समजणार.
    पहिल्यांदा गाई गुरे,नंतर अन्नधान्य ,ज्यांच्या उत्पादनासाठी स्थिर व्हावे लागते-मुबलक पाणी, तीच जागा परत दरवर्षी वापरणे यातूनच मालकी हक्काची भावना निर्माण झाली असेल.मग भाषा ओघानेच आली.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...