Monday, September 17, 2012

डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र...




प्रा. हरी नरके संपादित "डा. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र" हा ब्रुहत्खंड मुळात शासनाचे प्रकाशन वाटत नाही एवढ्या देखण्या स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. अशा अभिजात चित्र-चरित्राच्या संपादनाबद्दल व प्रकाशनाबद्दल शासनाचे आणि संपादक प्रा. हरी नरके व त्यांच्या सहका-यांचे अभिनंदन करणे भाग आहे.  त्याच बरोबर डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचीव प्रा. दत्ता भगत आणि तत्कालीन कार्यासन अधिकारी शुद्धोदन आहेर यांच्या योगदानाबदल त्यांचेही अभिनंदन केलेच पाहिजे एवढे उच्च दर्जाचे कार्य य ग्रंथरुपाने झाले आहे  हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांना दिलेली एक अभिनव विनम्र मानवंदना आहे. उण्यापु-या अत्यंत दुर्मीळ अशा अडिचशे छायाचित्रांतुन व त्यासोबत दिलेल्या बाबासाहेबांच्या बहुमोल वचनांतुन एक विलक्षण असा जीवनपट उलगडणारा हा ग्रंथ म्हनजे सर्वांसाठी एक पर्वणीच आहे. आणि अवघ्या देशातुन इंग्रजी आवृत्तीला तर महाराष्ट्रातुन मराठी आवृत्तीला एवढा प्रतिसाद लाभला आहे, इतका कि प्रथम प्रकाशनानंतर ( १४ एप्रिल २०१०) या चित्रचरित्राच्या मराठी आवृत्तीच्या तीन हजार प्रती व इंग्रजी आवृत्तीच्या दोन हजार प्रती हातोहात संपल्या आहेत. 

डा. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या शोषितांसाठी अविरत संघर्षरत राहणा-या, कालांधाराला आपल्या प्रज्ञासुर्याने दूर हटवत नवे आत्मभान देणा-या महामानवाचे समग्र साहित्य, त्यांची सर्व भाषणे, पत्रव्यवहार पुढच्या पिढ्यांसाठी एक चिरंतन दीपस्तंभ म्हणुन उपलब्ध करुन देणे हे अत्यंत आवश्यक असेच होते. महाराष्ट्र शासनाने त्यासाठी डा. बाबासाहेब आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीची १५ मार्च १९७६ मद्ध्ये स्थापना केली. "डा. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" या शिर्षकाखाली क्रमा-क्रमाने अडचणींना तोंड देत अनेक खंड प्रकाशित होत राहिले. हे सर्व होत असतांना बाबासाहेबांचे चित्रमय चरित्रही प्रकाशित झाले पाहिजे या भावनेने शासनाने १९९५ साली त्यासाठी एक उपसमिती निर्माण केली. २००२ साली या समितीची धुरा महाराष्ट्रातील आघाडीचे विचारवंत प्रा, हरी नरकेंकडे आली. तत्पुर्वी बराचसा काळ हा छायाचित्रे मिळवण्यातच व्यतीत झाला होता. 

यातील अनेक छायाचित्रे ही जुनी असल्याने फिक्कट झालेली, सुरकुत्या पडलेली वा पिवळट पडलेली अशी होती. अनेक छायाचित्रे तर प्रिंटवरुन रीप्रिंट मारलेली असल्याने छापण्यास योग्यच नव्हती. अशा स्थितीत हार न मानता चित्रमय चरित्राला अग्रक्रम देण्याचे ठरवत प्रा. नरके यांनी या अंधुक/खराब झालेल्या अथवा आकार वाढवला तर धुरकट होणा-या फोटोंना जणु अलिकडेच काढलेत असे वाटावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायचे ठरवले. 

डा. बाबासाहेब लेखन आणि भाषणे या ग्रंथमालिकेतील बाविसावा खंड म्हनजे हा "डा. बाबासाहेब आंबेडकर: चित्रमय चरित्र". या चित्रमय चरित्रातील प्रक्रिया करुन अत्यंत आधुनिक छपाई तंत्रज्ञानाने छापलेली बाबासाहेबांची छायाचित्रे पाहिली तर लक्षात येते कि बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील भव्यता, प्रगल्भता आणि तेजस्वीपणा प्रत्येक छायचित्रातुन ओथंबुन वाहतो आहे. बाबासाहेबांच्या माणुसकीचा, करुणेचा आणि समतेचा हा अक्षय्य झरा पानापानातुन ओसंडुन वाहतांना दिसतो...आणि प्रत्येक छायाचित्रासोबत बाबासाहेबांचे महत्वपुर्ण विचारही दिले असल्याने ग्रंथाची उंचीही वाढतांना दिसते. छायाचित्रांवर तांत्रिक संस्कार करणारे श्री. संजु हिंगे आणि चित्रमय चरित्रासाठीचे लेखन करणा-या संगिता पवार यांच्याही कार्याला या निमित्ताने दाद दिलीच पाहिजे. या सर्वांमुळे व प्रा. नरकेंच्या अहोरात्र कष्ट घेत केलेल्या साक्षेपी संपादनामुळे एक जागतीक दर्जाचा चित्रमय ग्रंथ प्रसिद्ध होवू शकला आहे. 

बाबासाहेबांचे समग्र जीवन हा अथक संघर्षाचा एक प्रवास आहे. हा विलक्षण प्रवास छायाचित्रांच्या मदतीने क्रमा-क्रमाने उलगडला जातो. त्यांच्या जीवनातील विविधांगी प्रसंग छायाचित्रांच्या रुपाने उलगडत जातात. फार क्वचित त्यांना फुरसतीचे, हास्य-विनोदाचे क्षण लाभले आहेत. परंतु या ग्रंथात बाबासाहेबांच्या तब्बल १२ हस-या मुद्रा आहेत.हे या ग्रंथाचे अतुलनीय वैशिष्ट्य आहे. एवढी हास्यमुद्रा असणारी छायाचित्रे आजवर बाबासाहेबांवरील प्रसिद्ध झालेल्या कोनत्यही ग्रंथात नाहीत. प्रसन्नतेचा शिडकावा करणारे बाबासाहेबांचे हास्य पाहिले कि पाहणारा नकळत भावूक होवून जातो आणि त्या महामानवासमोर नतमस्तक होतो. 

बाबासाहेब हे आजच्या-पुढच्या पिढ्यांसाठीचे अक्षय्य उर्जास्त्रोत आहेत. या ग्रंथमालेमुळे एक अनमोल ठेवा एकत्रीत संचित झाला आहे. प्रा. नरके यांनी बाबासाहेबांच्या या मालिकेतील अन्यही ग्रंथांचे संपादन केले असून तब्बल ९ ब्रुहत्खंड त्यांच्या कारकिर्दीत प्रकाशित झाले आहेत. राज्यभरातुन प्रा. नरकेंचे कौतुकच झाले आहे. बाबासाहेबांचे समग्र व्यक्तिमत्व पेलने हेच मुळात एक अशक्यप्राय कार्य. हितसंबंधियांचा अनवरत त्रास. शासकीय अडचणी...जागा-निधी इ. ची चणचण. अशाही स्थितीत मार्ग काढत हे जे एक अतुलनीय चित्रमय चरित्र प्रकाशित झाले आहे त्यासाठी प्रा. नरके अभिनंदनास पात्र आहेत.

प्रत्येक भारतीयाच्या संग्रही असायलाच हवे असे हे चित्रमय चरित्र. एवढेच नव्हे तर जगभरात या चित्रमय चरित्राचा प्रसार व्हायला हवा. या ग्रंथाची पुढील आवृत्ती प्रतीक्षीत आहे ती यासाठीच. 

6 comments:

  1. डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
    त्या "समितीने" घटना बनविली आहे.
    फक्त आंबेडकरांनी नाही.
    त्या घटनेत इतक्या दुरुस्त्या का झाल्या ? इतकी तिची बांधणी कच्ची होती का ?अपूर्ण होती का?
    ते कौतुकास्पद ठरते काय ?

    रिपब्लिकन पक्षाची वाताहात झाली आहे.
    त्यांची शिबिरे - उत्सव - होतात,संमेलने होतात त्यावेळी सर्वत्र रेल गाड्या भरून येत असतात
    मुंबईला माणसांचा महापूर येतो.
    अत्यंत बेशिस्त , मस्तवाल ,फुकटे आणि तोंडाला देशी दारूचा दर्प असणारे हे सगळे २ दिवस
    मुंबईत धुमाकूळ घालतात.

    हिंदूंमध्ये प्रत्येक राजा जसा स्वतःला विक्रमादित्याचा रेफरन्स देण्याचा प्रयत्न करत असतो , तसेच बुद्ध आणि जैन लोक
    आमचे या आधी अमुक तीर्थंकर होऊन गेले असे सांगण्याचा आटापिटा करत असतात.तात्पर्य आमचा धर्म तुमच्या पेक्षा जुना आहे वगैरे.

    बौद्ध धर्म आणि धर्म सत्ता जर सुदूर चीन , जपान , इंडोनेशियात पसरली होती तर ती इथेच कशी घसरणीला लागली ?
    गौतम बुद्ध कशाने मेला ?सडके मांस भक्षण करण्याचा मोह झाल्यामुळे का ?
    त्याने आपला लाडका शिष्य आनंद याला मृत्यू समयी दूर का पाठवले ?
    कृपया यावर कुणी प्रकाश टाकेल का ?

    ReplyDelete
    Replies
    1. आपको इसका मु तोड जवाब देंगे ...

      Delete
    2. डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
      त्या "समितीने" घटना बनविली आहे.
      फक्त आंबेडकरांनी नाही.
      त्या घटनेत इतक्या दुरुस्त्या का झाल्या ? इतकी तिची बांधणी कच्ची होती का ?अपूर्ण होती का?
      ते कौतुकास्पद ठरते काय ?

      नक्किच कौतुकास्पद आहे घटना बनवतानाच त्यामध्ये बदल करता येतील अशी सोय करण्यात आली होती कारण कोणतीही घटना ही कायम स्वरूपी तशीच राहू शकत नाही त्यात काळा प्रमाणे बदल आवश्यकच आहेत तरच ती टीकूण राहू शकते आपल्या देशाची घटना म्हणजे धर्मग्रंथ नव्हे ज्यात काळाप्रमाणे बदल करता येत नाहीत तसेच आंबेडकरांना घटनाकार म्हणून का बोलले जाते तर घटना समिती मधील बाकी सदस्यांनी अंग काडून घेतल्या मुळे आंबेडकरांवरच घटना बनवन्याची जबाबदारी आली (त्यासाठी तुम्हाला घटना समीतीच्या कामाचा अभ्यास करावा लागेल व त्यावेळीची संसंदेतील भाषने वाचावी लागतील जे तुमच्या सारकया लोकांकडून शक्य नाही) म्हणूनच त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतात व हे नक्कीच कौतुकास्पद आहे तुमच्या सारख्या लोकांसाठी नसेल ज्यांना फक्त नावे ठेवता येतात पन बाकी सर्व लोकांसाठी तर नक्कीच कौतुकास्पद आहे

      मुंबईला माणसांचा महापूर येतो.
      अत्यंत बेशिस्त , मस्तवाल ,फुकटे आणि तोंडाला देशी दारूचा दर्प असणारे हे सगळे २ दिवस
      मुंबईत धुमाकूळ घालतात.

      नक्कीच हे भूषावह नाही पण काय करणार हि अशी शिकवण हिंदू धर्माकडूनच ह्या अस्या लोकांनी उचलली आहे ज्या हिंदू धर्मात गणेशोस्तवात गणपतीच्या मंडपाच्या मागे जुगार व दारू काम चालते तसचे मिरवणूकीत दारू पिउन डिजे वर हिडीस असे नृत्य केले जोते. तेच नवरात्री उस्तवात केले जाते गरब्याला तोंडात गुटखा व खिस्यात कंडोम (तुम्हाला महीत असेलच कंडोम चा वापर नवरात्रीत सर्वात जास्त होतो ते) घेउन नाचनारे असतातच तेच पंडरीच्या वारीला रात्री ऐखादया गावात मुक्काम करायचा फुकट चे खायचे व सकाळी अख्खा गाव घाण करून पुढच्या गावाला जायचे हि शिकवण पण हिंदू धर्माचीच (वारी सोबत हजारो वेश्या पण् असतात कारण तेव्हा जास्त धंदा होत म्हणून हे आपणास माहीत असेलच नसेल तर ऐकदर वारी सोबत जावून पहावे व वारीचा अभ्यास करावा)
      असे सर्व हिंदू लोक आजुबाजुला असतील तर ति लोक पण तेच शिकणार ना पण हळू हळू त्यात नक्कीच बदल होइल व त्या लोकांना पण कळेल की आपण आता हिंदू नाही आहोत तर माणवता हाच धर्म माणनार्या धर्मात आहोत ते

      बाकी प्रश्नांची उत्तरे संजय सोनावणे सरांनी दिली आहेतच
      आता ऐवडया वर्षानी उत्तर का दिले असे कोणाला वाटू शकते म्हणून मला संजय सोनावणे सरांच्या ब्लॉग बद्दल माहीती नव्हती त्यांचा ब्लॉग आत्ताच वाचायला घेतला आहे काही ब्लॉग हे ख्ररेच खुप छान आहेत हा ब्लॉग वाचल्यावर व त्यावरील उपहासात्मक प्रतिक्रिया वाचल्यावर त्याला उत्तर दयावेसे वाटले म्हणून उत्तर दिले

      Delete
    3. khupach chaan uttar dilet

      Delete
  2. काय हो ,
    साहेब , विसरला का आपण ?
    डिसेंबर १० ला आपण ठरवले होते की आपण
    एका माणसाने काहीतरी लिहिले होते त्याचे उत्तर देणार होतात.
    तुमच्या भाषेत मुह तोड जबाब देंगे.
    मी मुद्दाम लिहिते आहे कारण त्यांचा खुलासा अतिसुंदर होता.
    त्यांनी मांडलेले मुद्दे खरे आहेत .त्यांनी हिंदू राजा वर सुद्धा टीका केली आहे.

    प्रत्येक फाटका राजा सुद्धा आपला वंशज विक्रमादित्या पर्यंत आणून बसवतो.

    त्यांचे म्हणणे असे की डॉ .आंबेडकरांनी संपूर्ण घटना बिनतोड बनवली असेल तर त्यात इतक्या दुरुस्त्या का कराव्या लागल्या ?
    मुंबईला जे डॉ .आंबेडकर यांच्या आठवणीसाठी मेळावा भरतो त्यावेळी सर्व रेल्वे फुकट प्रवास करत ,
    दंगा करत तोंडाला दारूचा वास येत असलेले प्रवासी हिंडत , घोषणा देत फिरत असतात !मी स्वतः हे पहिले आहे .

    बौद्ध धर्म जर इतका भारी होता तर तो एकदम नष्ट कसा झाला ?
    मलातरी या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत.
    आपण उत्तरे देणार होतात ती शांतपणे हुशारीने द्या.
    वाचकांना त्याचे महत्व वाटले पाहिजे.चर्चा अभ्यासपूर्ण झाली पाहिजे.
    कृत्तिका

    ReplyDelete
    Replies
    1. आगाशे साहेबांनी खालील प्रश्न उपस्थित केले होते. कृत्तिकाताईंच्या आग्रहाखातर त्यांची उत्तरे देत आहे:
      "डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
      त्या "समितीने" घटना बनविली आहे.
      फक्त आंबेडकरांनी नाही.
      त्या घटनेत इतक्या दुरुस्त्या का झाल्या ? इतकी तिची बांधणी कच्ची होती का ?अपूर्ण होती का?
      ते कौतुकास्पद ठरते काय ?"

      -फक्त आंबेडकरांनी घटना बनवली नाही हे वास्तव आहे. मग त्यात जे चांगले आहे त्याचे व त्रुटी आहेत त्याचे श्रेय सर्वच घटनासमितेच्या लोकांना द्यायला पाहिजे. दुसरे म्हणजे घटन ही धर्मग्रंथासारखी अपरिवर्तनीय नसते तर कालसुसंगत व प्रवाही असते. घटनेत दुरुस्त्या झाल्या म्हणण्यापेक्षा घटनेला कालसुसंगत बनवत राहिले गेले व जाईल ही चांगलीच बाब नव्हे काय?

      "रिपब्लिकन पक्षाची वाताहात झाली आहे.
      त्यांची शिबिरे - उत्सव - होतात,संमेलने होतात त्यावेळी सर्वत्र रेल गाड्या भरून येत असतात
      मुंबईला माणसांचा महापूर येतो.
      अत्यंत बेशिस्त , मस्तवाल ,फुकटे आणि तोंडाला देशी दारूचा दर्प असणारे हे सगळे २ दिवस
      मुंबईत धुमाकूळ घालतात."

      -हे सर्वस्वी नसले तरी मोठ्या प्रमाणावर होते व ते निंदनीय आहे याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. पण त्यात सकारात्मक बदल होण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. फक्त उपहास वा निंदा करुन असे प्रश्न सुटत नसतात.

      "हिंदूंमध्ये प्रत्येक राजा जसा स्वतःला विक्रमादित्याचा रेफरन्स देण्याचा प्रयत्न करत असतो , तसेच बुद्ध आणि जैन लोक
      आमचे या आधी अमुक तीर्थंकर होऊन गेले असे सांगण्याचा आटापिटा करत असतात.तात्पर्य आमचा धर्म तुमच्या पेक्षा जुना आहे वगैरे."

      -हिंदू धर्मातील वैदिक धर्मीय भारताची संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती, सिंधू संस्क्रुती आर्यांचीच वगैरे असत्य बाबी पसरवत असतातच. याला अपवाद कोणीही सापडणार नाही. पु. ना. ओकांची पुस्तके पुरेशी आहेत. आपापली पाळेमुळे पुरातन आहेत हे दाखवण्याचा सोस सर्वच मानवजातीला आहे...आपणही त्याला अपवाद नाही एवढेच!

      "बौद्ध धर्म आणि धर्म सत्ता जर सुदूर चीन , जपान , इंडोनेशियात पसरली होती तर ती इथेच कशी घसरणीला लागली ?
      गौतम बुद्ध कशाने मेला ?सडके मांस भक्षण करण्याचा मोह झाल्यामुळे का ?
      त्याने आपला लाडका शिष्य आनंद याला मृत्यू समयी दूर का पाठवले ?
      कृपया यावर कुणी प्रकाश टाकेल का ?"

      -भारताबाहेर गेलेला बौद्ध धर्म मुळचा बौद्ध धर्म आहे असे म्हनण्याचे धाडस करता येत नाही. ब्रह्मदेश अथवा श्रीक्लंकेतील बौद्ध धर्म बराच काळ मुळ स्वरुपाला धरुन राहिला असला तरी त्यातही स्थानिक तत्वे घुसतच गेली. भारतातही बौद्ध धर्मात पुढे वज्रयान पंथ सर्वोपरि बनला. हा वज्रयान पंथ पंचमकार साधना करत असे. त्यातुनच लोकांच्या मनातुन तो धर्म उतरत गेला म्हणुन लयाला गेला. भारतात वैदिक धर्मही मर्यादितच का राहिला व या धर्माला हिंदू लेबलखाली मुर्तिपुजकंच्या आश्रयाला का यावे लागले याची कारणे सर्वस्वी बदलत्या सामाजिक स्थितीत आहेत.

      गौतम बुद्धांच्या मृत्युबद्दलचा प्रश्न तिरस्कारातून आलेला आहे जो न्याय्य नाही. भिक्षेत वाढलेले मांसही भिक्खुने भक्षण करावे हा बौद्ध धर्माचा नियम होता. चंदाने शिळे मांस वाढले. भिक्षान्नच भक्षण करायचे असल्याने बुद्धाने ते खाल्ले व अतिसाराने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत उपहास बाळगणे अयोग्य आहे एवढेच मी येथे म्हणु शकेल.

      Delete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...