Tuesday, September 13, 2011

महार कोण होते?

महार कोण होते?

महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असे:

१. महार समाजाला गांवकुसाबाहेरचे वास्तव्य होते.
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणा-या जाणा-यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवुन ठेवणे हे त्यांचे कार्य होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
७. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणुन आधी महारांनाच प्राधान्य दिले होते.
९. महार हे ग्राम/नगर/रज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटेल वा नगराध्यक्षाला ते देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपुर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
१०. महार समाज अस्प्रुष्य गणला गेलेला होता.
११. महारांवर शेतसारा/खजीना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आद्न्या/संदेशादिंचे दळनवळनाचेही काम होते.

असो, हे मुद्दे वाढत जातील. येथे मला सर्वप्रथम महार या शब्दाचा उगम शोधायचा आहे. यासाठी पुर्वी अनेक विद्वान व डा. इरावती कर्वेंसारख्या विदुषिंनी महार या शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. महार राहतात ते राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या महाराष्ट्राच्या नावाशी संबंधित आहे...महार या नावाच्या उगमाशी संबंधित नाही त्यामुळे तिचा येथे विचार करण्यात अर्थ नाही.

"म्रुताहारी" (म्हणजे म्रुत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणुन) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असे इरावती कर्वेंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गत: म्रुत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे म्रुताहारी बुद्ध धर्माच्या द्न्यात इतिहासात अगणित झालेले असतील. त्यांना सर्वांनाच "महार" म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात व आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे, म्हणजे महार शब्दाचे मुळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.

महाआहारी (खुप खाणारे) असणा-या लोकांना महार म्हणु लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्क (रोबेर्टसन) मद्धे दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही.
दुसरे असे कि महार एक जात म्हणुन कोनत्याही स्म्रुती/पुराणांमद्धे उल्लेखिलेली नाही. अस्प्रुष्यांच्या यादीतही ही जात पुराणे व स्म्रुत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्म्रुतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचु, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे आणि त्यांनी गांवाबाहेर रहावे असे म्हटलेले आहे, पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्प्रुष्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार व विष्णुस्म्रुतीनुसार फक्त चांडाल ही जात अस्प्रुष्य आहे. त्यामुळे मुलात जन्मभुत अस्प्रुष्यता भारतात नेमकी कधी आणि का आली असे सांगता येत नाही.
वर्णसंकरातुन अस्प्रुष्य जातींचा विकास झाला हे मनुस्म्रुतीचे मत मानव वंश शास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्म्रुतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल ई. भारतात अस्प्रुश्य मानल्या गेलेल्या जातींचा उल्लेखही नाही.
याचाच अर्थ ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्म्रुतीकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्प्रुष्य बनवले गेलेले दिसते, त्याचेही विश्लेषन येथे आपल्याला करावयाचे आहे.
मग प्रश्न असा उद्भवतो कि "महार" ही मुळात जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक द्रुष्टीक्षेप टाकुयात. महारांमद्धे आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे ई. आडनावे आढळतात.
या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते आणि व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा वेगवेगळ्या जाती एकाच समाजघटकांतुन कालौघात विभक्त झाल्या. जाती जन्माधारित बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले.
त्यामुळे महार समाज हा सर्वस्वी स्वतंत्र वंशातुन विकसीत झाला आहे असे मानता येत नाही. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे...(शिव/विष्णु/विट्ठल/महलक्ष्मी ई.) त्याचवेळीस या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्प्रुष्तेचा काळात अन्य मंदिरांत स्थान व प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहु शकतो. धनगर समाजानेही आपली अस्प्रुष्य नसले तरी स्वतंत्र दैवते निर्माण केलेली आहे.
म्हणजे महार जातीत सर्वच मानवघटकांतील लोक सामाविष्ट आहेत असे म्हणता येते. कोणतीही जात एकाएकी स्वतंत्रपणे उदयाला येत नाही. त्या-त्या व्यवसाय-सेवा क्षेत्रांचा जसजसा विकास होवू लागतो तसतसे त्यात अन्य समाजघटकातील लोक आवडीने वा चरितार्थ प्रवेश करतात व त्यानिष्ठ आधी एक पेशा बनतो. भारतात त्यांना "जात" बनवले गेले.
आता सर्वप्रथम आपण "महार" या शब्दाचा उगम शोधला पाहिजे. भारतातील बव्हंशी जातींची नावे ही व्यवसायाधारित आहेत हे आपणास माहितच आहे. म्हणजेच महार शब्दाचा उगमही व्यवसायाधारीत असला पाहिजे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
त्यासाठी मी सुरुवातीलाच वर्णीत केलेली महारांचा व्यवसाय पुन्हा एकदा तपासुन घेवुयात.

अ. महार हे ग्रामरक्षक होते...चो-या-दरोडे व आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपु शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भुमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच जमीनींच्या तर सीमा ठरतच होत्या पण संरक्षितही रहात होत्या.
ब. इ.स. च्या पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातुन जातांना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी व प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे.

म्हणजेच गावाचे/व्यापा-यांचे "रक्षण" हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.

या दोन मुद्द्यांवरुन मला स्पष्ट दिसते कि "महार" हा शब्द "महारक्षक" (वा प्राक्रुत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे.
आणि हीच सद्न्या महार या शब्दाचा उलगडा करते अन्य कोनतीही नाही हे जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुनच सिद्ध होते. ही कर्तव्ये तत्कालीन राजकिय अस्थिरता, धामधुम आणि कधी पुर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जीवंत राहुच शकत नव्हती.

उदय

महार समाजाचा उदय कधी झाला याचे भौतिक/लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतु समाजेतिहासाचा अंदाज घेतला तर जेंव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेंव्हाच हा समाज आपल्याच समाजातुन लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभुत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रु सैन्यावर तुटुन पडण्याचे काम असते. परंतु ग्रामरक्षकाला मात्र तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रुच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव/शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधु काळापासुनची आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, उशीरा लागेल म्हणुन कधीतरी रक्षकांनी गाव/शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण म्हणजे तत्कालीन अर्थव्यवस्था ही मुख्यत: क्रुषिप्रधान होती व शत्रु नगर/गावांवर आक्रमण करतांना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती हे तर सर्वविदित आहेच. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत असल्याने वेशीबाहेर या बहाद्दर असणा-या रक्षकांची वसती केली गेली असावी असे मला वाटते. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भुषवत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणुन ओळखली जावु लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुती-स्म्रुती-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवुन ठेवले असेल याचे हेच कारण आहे कि परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मुलभुत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी द्न्यात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोनाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमने/पर-आक्रमने यात तर वाटेत येतील त्या गावांत लुटालुट- जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहुन गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जीवाचा धोका पत्करुन उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहीली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागलेले आहे.
२. महार समाज प्राय: गरीबच राहीला आहे. उघड्यावर रहात असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालुन करत तेच गाव त्यांना स्वत: लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते, पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत द्न्यात इतिहासातही दिसत नाही.
३. जमीनीचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत एवढ्या त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाड्यांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
४. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मद्धेच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
५. महार समाजावर अस्प्रुष्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असुनही आपल्या गावाविरुद्ध/व्यवस्थेविरुद्ध शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती क्रुतद्न्य असले पाहिजे हे लक्षात येइल.

अवनती कशी व का झाली?

महार समाजाला नेमके कधी अस्प्रुष्य ठरवले गेले याबाबत इतिहास मुक आहे. या समाजाची आर्थिक व सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतु तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो. तसा अल्प प्रयत्न मी येथे करत आहे.
१. गावाचे रक्षण करणा-यांना, आणि जे आधी सर्वच समाजघटकांतुन आले होते त्यांना आरंभापासुन अस्प्रुष्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
२. ज्या काळात भारतांतर्गतचा व विदेशी व्यापारही भरात होता तेंव्हा त्या व्यापारी तांड्यांचे रक्षण करना-या महाराष्ट्रातील महारांना अस्प्रुष्य मानले जात असण्याची शक्यता नाही. किंबहुना ८व्या शतकापर्यंतच्या स्म्रुतीही महारांचा अस्प्रुष्य म्हणुन निर्देश करत नाहीत.
असे असले तरी महार समाजाची हळुहळु सामाजिक पातळीवर अवनती होत गेली, त्यांना सर्व जबाबदा-या पुर्ववत तर ठेवल्याच, पण त्यांत अमानुष वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल.
यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.

१. अखिल समाजाची आर्थिक अवनती: पुराणांनी लागु केलेली समुद्रबंदी. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार कोसळला. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थाही संकुचित झाली.
यादवकालापर्यंत तरी आपण तुलनेने बरे असलेले स्थैर्य पहातो. परंतु तरीही आंतरराज्यिय व्यापार मात्र उत्तरेकडील धुमधामीने संपत गेला.
अस्थैर्याच्या कालात व्यापाराला फटका बसतो तसेच पर्यायाने तो स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसतो. उत्पादक घटक आपले उत्पादन सीमित करत नेतात. जेवढी मागणी तिही स्थानिक, वा परिसरातील, तेवढेच उत्पादन करु लागतात. सेवा क्षेत्रावर त्याचा पहिला आघात होत असतो. महार समाजा हा सेवाघटक असल्याने त्यांच्यावर सर्वात आधी आघात होणे स्वाभाविक आहे.
इ.स. १२-१३ व्या शतकाच्या काळात कधीतरी बलुतेदारी पद्धत सुरु झालेली दिसते. ती नवीन अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात अपरिहार्य मानली, आणि तिचा फटका सर्वच घतकांना बसला असला तरी सर्वाधिक फटका महारांना बसला हे उघड आहे. कारण वस्तु निर्मात्यांना किमान एक द्रुष्य अस्तित्व असते. ते बहितिक गरजांची पुर्ती करत असतात. म्हणजे शिंपी कपडे शिवत असतो तर सुतार शेतीउपयोगी वस्तुंचे निर्माण/दुरुस्त्या करत असतो. परंतु ग्रामरक्षण ही अद्रुष्य सेवा असते. भरभराटीच्या काळात जेवढी या सेवेची गरज भासते तेवढी एकुणातीलच आर्थिक अवनतीच्या काळात भासणे असंभव होते. हे समाजमानसशास्त्र येथे समजावुन घ्यायला हवे. त्यामुळे शेतीउत्पादनातील (जेही काही असेल ते) सर्वात कमी वाटा महारांना दिला जात असे हे अगदी आपण बिदरच्या बादशहाने विठु महाराशी केलेल्या बावन हक्काच्या सनदेतुनही पाहु शकतो. (खरे तर ही सनद म्हणजे महारांच्या स्वातंत्र्याची नव्हे तर बेड्या घट्ट करणारी सनद होती हे मला नाईलाजाने म्हनावे लागते.)
व्यापार थांबल्याने व्यापरी तांड्यांचे रक्षण आपसुक थांबले. म्हनजे तोही उत्पन्नाचा स्त्रोत संपला.
म्हनजे अल्प बलुते, अन्य उत्पन्नाचा अभाव आणि अनुपजावु इनामी जमीनी यातुन होणारा एकत्रित पर्रिणाम म्हनजे महार समाजाची आर्थिक स्थिती रसातळाला जावुन पोहोचणे. बाकी अलुतेदार/बलुतेदार यांची स्थिती जरा बरी असेल एवढेच पण महारांवर जो आर्थिक आघात झाला त्याचे समाजमानसशास्त्रीय परिणाम येथे विचारात घेणे आवश्यक आहे.

आरंभकाळ
१. चरितार्थासाठी आहे त्या जबाबदा-या पार पाडत मिळेत त्या उत्पन्नात भागत नाही म्हणुन अधिकची कामे मिळवणे हा प्रयत्न आजचा सुसंस्क्रुत माणुसही करतो. गावाच्या एकक उत्पन्न घतकातुन मिळणारा वाटाच कमी झाल्यानंतर अधिकची कामे मिळवणे भाग होते. अशा स्थितीत गाव पातळीवर कोनती कामे मिळनार?
आधीच आपापल्या व्यवसायांत सुस्थिर असलेलल्या जातीघटकांच्या व्यवसायात त्यांना वाटा मिळणे शक्यच नव्हते.
इतर जती घटकही पुरेशा उत्पन्ना अभावी अर्धवेळ शेतमजुर असल्याने तेथेही अप्वाद वगळता व वर्षातला विशिष्ट काळ वगळता रोजगार मिळने शक्य नव्हते.
ग्रामरक्षण हीच मुख्य जबाबदारी असल्याने सैन्यात सर्वच जण सहभाग घेण्यास जावू शकत नव्हते. यात दुसरी अडचण अशी होती कि पगारी सैनिक हा प्रकार शिवकाळाचा अपवाद सोडता अस्तित्वातही नव्हता.

पर्याय
१. गाव सोडुन रोजगाराच्या शोधात अन्य प्रांतांत जाणे. हा पर्याय मध्ययुगात महार व अन्य जातीघटकांनीही अवलंबिला आहे.
२. गावातच मिळेल ती, कमी प्रतीची का असेनात, कामे प्राप्त करणे. हो\य. हा पर्याय बहुसंख्य महारांना निवडावा लागला. ग्रामरक्षनाबरोबरच रस्ते स्वच्छ करणे, म्रुत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावातील मयतांची सरणे रचने वा खड्डॆ खोदने अशी कामे अन्य कोणीही करणे शक्य नव्हते आणि म्हणुनच करायला मिळाली ती क्रमश:: स्वीकारत जाणे. महारांनी जगण्यासाठी ही सुद्धा कामे करायला सुरुवात केली.
३. इस्लामी आक्रमणानंतर ज्या होत्या त्याही उरल्या-सुरल्या ग्रामीण अर्थव्यवस्थांवर गंडांतरे कोसळु लागली होतीच. त्यांची तिव्रता पाच शाह्यांच्या निर्मितीमुळे व सततच्या आपसी संघर्षांमुळे वाढु लागली. त्यात अवर्षनांनीही भर घातली होती हे आपल्याला तुकाराम महाराजांच्या काही अभंगांवरुन कळते. भल्या भल्यांना आपल्या पोरी कुनबिणी/बटक्या म्हणुन विकायची वेळ आली होती. गावेच्या गावे ओस पडण्याच्या स्थित्या तर नित्यश: झाल्या होत्या. अशा स्थितीत जर पोशिंदेच पळाले वा दिवाळखोर झाले तर केवळ सेवा हाच व्यवसाय त्या महारांनी जगण्यासाठी म्रुताहार सुरु केला असेल तर त्यात कसलेही आस्च्चर्य वाटण्याचे कारण नाही. महारांच्या म्रुताहाराचे कारण त्यांच्या संस्क्रुतीत नव्हे तर तत्कालीन अर्थव्यवस्थेत व राज्यव्यवस्थेत आणि मानवाच्या जगण्याच्या अविरत संघर्षात आहे हे येथे लक्षात घ्यायला हवे.

त्यामुळे महारांनी ग्रामरक्षण आणि सरकारी कामांसोबतच शेतकामे, रस्ते साफ करणे, मढी उचलणे,त्यांची विल्हेवाट लावणे, उकिरडे साफ करणे, अशी हलकी (तरी समाजोपयोगी) कामे त्यांना स्वीकारावी लागली कारण अन्य पर्यायच उपलब्ध नव्हते.
जेंव्हा अन्नाचीच ददात पडली असेल तेंव्हा म्रुत मांस खाणे त्यांना भाग पडले असेल.
कारण अखिल समाजच जेंव्हा दारिद्र्याच्या खाईत लोटला जातो तेंव्हा तो अधिकाधिक क्रुपण होत जातो आणि आपल्या उत्पन्नातला न्याय्य वाटा इतरांना देण्यात कुचराई करु लागतो हे एक वास्तव आहे. दुष्काळ पडला म्हणुन धान्याची कोठारे राजाद्न्या टाळत भुकेल्यांसाठी खुले करणारा दामाजीपंत जेंव्हा एखादाच असतो तेंव्हा तशाच दामाजिपंताला राकक्रिधापासुन त्याच्या सुटकेसाठी दंड भरणारा एखादाच विठु महार असतो.
एरवीची स्थिती ही जीवो जीवस्य जीवनम अशी बनुन जाते.
परंतु या काळातच धर्मसंस्था सर्वच मानवी जीवन व्यापुन उरायला लागली होती. पैठण, काशीच्या ब्राह्मण सभांनी धर्माचे पुरेपुर अपहरण करुन स्वार्थप्रेरित धर्मरचना सुरु केली. ज्या बाबी मुळ धर्मात कोठेही निर्दिष्टच नव्हत्या त्या लादायला सुरुवात केली. एका परीने एक ब्राह्मननिष्ठ नवाच धर्म या काळात नव्याने निर्माण झाला. या काळात पुर्वीच्या राजसत्ता मुस्लिम शासकांच्या चाकर बनलेल्या होत्याच. सरदारक्या, पाटिलक्या, सरंजामे, देशमुख्या ई. ची स्वार्थप्रणित प्राप्ती करण्याची चढाओढ जेंव्हा लागली तेंव्हा ब्राह्मण तरी का म्हणुन मागे राहतील? परकीय चाकरांना आपल्या समाजाशीच घेणे-देणे राहिले नाही. जहागीर मोगलाईत मिळो कि आदिलशाहीत कि निजामशाहीत...त्यांना जहागिर्यांशिच मतलब उरले. त्यांचा पराक्रम हा आपल्याच लोकांना लुटण्यात सहभागी झाला. सर्वच मुस्लिमांना यासाठी दोष देता येत नाही.
अशा स्थितीत, जो समाज एवढा हवालदिल झालेला, आर्थिक द्रुष्ट्या पुर्णपणे नागवला जावुनही त्याच जबाबदा-या झेलणारा...त्याची काय अवस्था झाली असेल?
१३व्या ते १५व्या शतकाच्या दर्मयान त्यांना क्रमश: अस्प्रुष ठरवण्यात आले असावे असे मला उपलब्ध पुराव्यांवरुन अंदाजिता येते. उदा. चोखा मेळा या महान संतास विट्ठल मंदिर प्रवेश नाकारला गेला असला तरी तो केवळ आडमुठ्या ब्राह्मण बडव्यांमुळे. पण संत नामदेव त्याला मात्र अस्प्रुष्य मानत नव्हते आणि अगदी द्न्यानेश्वरही असे अस्पष्ट का होईना संकेत मिळतात. महारांना ५२ हक्कांची सनद १४७५ साली बेदरचा बहामणी बादशहा महंमदशहा (दुसरा) याने दामाजीपंत, पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे वतनदार व १२ बलुतेदारांच्या साक्षीने विठ्या महार यास पातशहाच्या व दामाजीपंतांच्या कामी पडला म्हणुन लिहुन दिली. (पुर्ण सनदेसाठी पहा-"शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास, ले. अनिल कोठारे.) हिंदु धर्मांधांनी एक महार ब्राह्मण दामाजीच्या कामी आला हे नाकारण्यासाठी "झाला महार पंढरीनाथ"चा घोषा लावला पण ते अनैतिहासिक आहे.
या सनदेत महार अस्प्रुष्य आहेत असा उल्लेख नाही हे सर्वात महत्वाचे आहे. पण या सनदेत महारांना जे अधिकचे हक्क मागितले व दिले गेलेले आहेत ते मात्र सर्व महार समाजाची आहे त्या स्थितीतील उपजीविका तरी कायदेशीरपणे टिकुन रहावी यासाठी आहे. या सनदीमुळे ,अहारांचे तात्कालिक स्थितीत हित झाले असेल, पण दुरच्या काळात मात्र हीच सनद त्यांच्या पायातील बेडी बनली हे मी आधीच म्हटलेले आहे.
या सनदेची पार्श्वभुमी मुळात पराकोटीचा दुष्काळ आहे हे आधी लक्षात घ्यायला हवे. आजच्याही राजकीय मागण्या या वर्तमानातील प्रश्नांशी संबंधीत असतात...भविष्यात मंगळावरुन कोणी हल्ला केला तर आताच त्याला प्रतुय्त्तर देण्याची मागणी कोणी करत नाही...केली तरी त्याला वेडगळ म्हटले जाते. उद्या आपल्याला तीन मजली शेती करावी लागेल असे जेंव्हा मी म्हणतो तेंव्हा मला मुर्खातच काढले जाते. असो. पण कोणत्याही मागण्या या त्या कालसापेक्षच असतात हेच काय ते वास्तव आहे.
या सनदेनुसार गावातील म्रुत प्राण्यावरचा पहिला आणि एकमेव हक्क महारांचा. कातडीवरील मांगांचा. (मातंग समाज कातडी कमावुन स्वतंत्र उपजिविका करतच होते. त्यांच्याबद्दलही नंतर लिहायचेच आहे...पण ते नंतर...) बाकी हक्क बलुत्यातील वाट्याबद्दलही आहेत. ते हक्क फारसे पाळले गेलेच नाहीत हे वेगळे. पण म्रुत प्राण्यावरील हक्क महारांचा अधिक्रुत आणि राजाद्न्येप्रमाने झाल्याने एक वेगळी सामाजिक व धार्मिक घटना घदली ती म्हणजे महार समाज अस्प्रुष्य ठरवण्यात आला.
पुन्हा सांगतो, तत्पुर्वी, अगदी बेदरच्या बादशहाने सनद देईपर्यंत महार हा अस्प्रुष्य आहे अशी नोंद नाही. कोणत्याही (अगदी १४व्या शतकात लिहिल्या गेलेल्या) स्थलपुराणांतही महार अस्प्रुष्य आहेत याची नोंद नाही. अंत्यज म्हणजे महार नव्हेत.
परंतु दुर्दैवाने वंशपरंपरागत व्यवसाय पोट भरण्यास अक्षम ठरल्याने आणि अन्य पर्यायांच्या अभावात हीण वाटणा-या सेवा कराव्या लागल्याने ब्राह्मणी धर्मसंस्थांनी महारांना अस्प्रुश्य ठरवले आणि त्यांचा सामाजिक आणि धार्मिक दर्जाच नष्ट करुन टाकला.
तो अमान्य करण्याच्या अवस्थेत तेंव्हा महार होते काय? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच येते. तेच काय अन्य काही अस्प्रुष्य मानल्या गेलेल्या जातीही त्या विद्रोहाच्या अवस्थेत नव्हत्या. कारण त्याला प्रतिरोध करण्यआसाठी जी आर्थिक, मानसिक स्थिती लागते त्या स्थितीत हा समाज होता काय? त्यांच्या लढवैय्या परंपरांचा राजकीय उपयोग करुन घेण्यात या काळातील राजसत्ता निरुपयोगी ठरल्या. शिवाजी महाराजांचा अल्प काळ एवढाच अपवाद करता येतो...आणि तोही अल्प स्थितीत महार समाजाला थोडा आत्मभान देनारा ठरला. परंतु महार समाजाला (आणि अन्य खालच्या मानल्या गेलेल्या जातींना) वेठबिगारी हीही एक नव्य गुलामी ठरली. चोखा मेळ्यचा अंत हा तो वेठीवर वेशीचे काम करत असतांनाच मरण पावला हे सर्वद्न्यात आहेच. शिवाजी महाराज ते राजाराम महाराजांच्या काळातच, आणि तीही स्वराज्याच्या कक्षेत, वेठबिगारी बंद होती. अन्यत्र ती कायम राहीली आणि नंतर कथित स्वराज्यातही कायम झाली.
वेठबिगारी ही राज्यसंस्थांच्या आधी आर्थिक भिकारपणातुन तसेच नंतर उद्दामतेतुनही निर्माण झालेली अत्यंत शोषक पद्धत. ही तर काही ब्राह्मनांनी निर्माण केली नाही. ती केली तत्कालीन शासक समाजांनी. पण वेठीमुळे जो समाज आधीच गांजला गेलेला होता त्याची अजुनच अवनती घडत गेली. हा महाराष्ट्रीय समाजव्यवस्थेचे एक भिषण अध:पतन आहे.
या काही शतकातच बदललेल्या स्थितीमुळे जो समाज फक्त रक्षण आणि रक्षण हा मंत्र जोपासत एकुणातील समाजाचा, गावांचा, शहरांचा आजच्या पोलिसांप्रमाणे कार्यरत होता, त्याला ढासळलेल्या सामाजिक/आर्थिक स्थितीमुळे हीण दर्जाची कामे करायला भाग पडले. धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का मारुन अमानवी धर्माचे एक जागतीक उदाहरण घालुन दिले. एक पराक्रमी, लढवैय्या समाज रसातळाला नेवुन पोहोचवला. याला स्थिती जशी कारण आहे तशीच सामाजिक मानसिकताही. आज तरी जे गाव-खेडे जतन करुन आहेत त्यांने तरी त्यांना मानाचे अभिवादन करावे...
हा मला उमगलेला इतिहास आहे. तो अगदीच पुरावाहीण नाही, प्ण सर्वत्रच पुरावे उपलब्ध नसल्याने मला तर्काचा आधार घ्यावा लागलेला आहे. यात काही चुक असेल तर ती दुरुस्त करत पुढे जाण्यासाठी मला विचारवंत/अभ्यासुंनी मदत करावी वा स्वत: यात नवीन संशोधन करावे हे माझे विनम्र आवाहन आहे.


48 comments:

  1. सुंदर विवेचन. चित्पावन कोण होते ह्यावर देखील विवेचन करावे. जातीयवाद म्हणून नव्हे तर त्यांच्या उगमाविषयी माहितीपेक्षा तर्कच जास्त आहेत म्हणून.

    ReplyDelete
  2. मी कुठे वाचले ते आठवत नाही,
    पण महार हे शिवरायांच्या काळात गडाच्या अर्ध्या टप्प्यावर रहात असत.
    शत्रूचा पहिला प्रहर हा त्यांच्यावर होत असे.
    म्हणजे गावरक्षणाबरोबरच किल्ले, वाडे ह्यांचे सुद्धा ते रक्षण करत असावेत .

    चांगली माहिती .
    नवीन लेखांची आतुरतेने वाट पाहतोय

    ReplyDelete
  3. मुळात एखादा विशिष्ट समाज लढवय्या व दुसरा अभ्यासात हुशार हे मला पटत नाही. ह्या गोष्टी DNA वर अवलंबून नसून त्या त्या समाजाच्या संस्कृतीवर अवलंबून असतात. असो. जर महारांना लढवय्या म्हटलं तर मग त्यांचं नाव हे "महा अरि" या संस्कृत शब्दांवरून तयार झाले असण्याची दाट शक्यता आहे. कारण त्यांनी आर्य-अनार्य संघर्षात आपलं स्वातंत्र्य गमावण्यापूर्वी जोरदार लढा दिला असावा.
    आणखी एक सांगेन की, महार लोक हे वेगवेगळ्या DNA pool मधून एकत्र आलेत हे आडनावावरून ठरवणं चकव्याचं आहे. कारण ज्याप्रकारे कोकणस्थांचे चेहरे, बारीक डोळे, रंग यावरून ते सर्व एकाच मुशीतून तयार झालेत हे ताबडतोब कळतं त्याचप्रमाणे पूर्वीचे महार व आताचे बहुतांश महाराष्ट्रीय नवबौद्ध हे देखील एकसारखेच दिसतात.
    Dr. G. S. Ghurye यांनी Sanskritisation बद्दल लिहिलंय. ते म्हणतात की, जेव्हा खालच्या स्तरातल्या जातींना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटतो तेव्हा ते उच्चजातीयांचे अनुकरण करू पाहतात. उच्चजातीयांचे आडनाव वापरणे, चालीरीती स्विकारणे इ. त्यामुळे फक्त आडनाव तपासणे योग्य राहणार नाही. जावळीचा मोरे ज्याने शिवाजींचा विरोध केला तोसुद्धा महारच होता असं म्हणतात. त्याने मोरे हे आडनाव OBC कडून घेतलं असणार.
    १ जानेवारी १८१८ च्या युद्धात ज्या महार बटालियन ने शौर्य गाजवले त्यांची नावं -- रामनाक येसनाक, विटनाक धामनाक इ. अर्थात अस्पृश्यांनी आडनावं ठेवण्याची परवानगी त्याकाळात नसावी. नाक हा शब्द नाग पासूनच बनला आहे.
    बाबासाहेब म्हणतात, की तक्षकनाग यास अगस्तिऋषीने यज्ञसत्रातून वाचवले. त्याचेच महार हे वंशज होत.
    "शिशूनाग, दिन्नाग, काळनाग, समुद्र गुप्ताच्या वेळचा गणपतीनाग हे महारांचे पूर्वज होत. कान्हेरी लेण्यातील शिलालेखात नकनाक, अपरनाक, धमनाक, गोलनाक, मीतनाक यांचा उल्लेख आहे. कार्ल्याच्या शिलालेखात महारथी अगीमीतनाक, मित्तदेव नाक उसभनाक यांचा उल्लेख आहे......महाराष्ट्राबाहेरच्या अस्पृश्यांच्या काही जातींचे नाव मेहतर, म्हेर, मेर इ. आहे." संदर्भ शि. भा. गायसमुद्रे - महार एक शूर जात....लेखक म्हणतात की, जर अगीमीतनाक याच्या नावासमोर महारथी हे पद लावलं असेल तर तो किती शूर होता.
    आणखी एक माहिती आठवली, सातवाहन राजंपैकी एकाच्या राणीचं नाव नागनिका असं होतं. नागपूर या शब्दामागेही मोठा इतिहास आहे. Piyush Gade एकूण विदर्भातच द्रवीड वंशीय दलित आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत. आता महारांनी असे नेमके काय केले की, त्यांचा इतिहासच लिहिला गेला नसेल.... मरेपर्यंत युद्ध....आणि याच युद्धात ते हरले व पराजयाची आठवण त्यांना रहावी म्हणून जाणूनबुजून जोहार घालायला लावला असेही काही लोक म्हणतात. आपल्या लेखात जोहार बद्दलही काहीतरी असायला हवे होते.
    एकंदर उत्कृष्ट लेख आहे. तत्कालीन गावगाड्यातील महारांच्या कामाचे स्वरूप तात्काळ लक्षात येते.
    हल्लीच्या आंबेडकरी समाजातल्या तरूणांना ह्या गोष्टी सांगितल्या तर विश्वास बसणार नाही. बलुतं, तराळ-अंतराळ, आठवणींचे पक्षी ही आत्मचरित्रे वाचणं तर लांबची गोष्ट आहे. :-D

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊ तुमचं बरोबर आहे , मला जसा इतिहास शोध घेत राहिलो तसे मला नागांचे प्राचीन कुळ महारठी अंगिय कुल नाणेघाट मध्ये माहिती आहे ,त्यात त्यांनी शक शासक पराजय केला होता सातवाहन साम्राज्यामध्य

      Delete
  4. प्रिय सुमित, धन्यवाद. महा-अरि अशीही एक व्युत्पत्ती आहेच पण ती स्विकारार्ह होण्यास महत्वाची अडचण म्हणजे आपल्याला आर्यांचे आक्रमण सिद्धांत मान्य करावा लागतो. तो आता उपलब्ध पुराव्यांवर टिकत नाही. डा. बाबासाहेबांनीही आर्य-वंश सिद्धांत फेटाळुन लावला आहे. "महा-अरि" म्हणजे मोठा शत्रु. आणि आर्य ही संकल्पना मान्य केली तर महार सर्व प्रांतात असायला हवेत, पण तसे वास्तव नाही म्हणुन मी त्याचा लेखात सहभाग केलेला नाही. महारास्तआत मात्र "महा" हे विशेषण देवुन पदव्या जोडलेल्या आहेत. उदा. महा रट्ठी, महा भोज ई. याच पद्धतीने नगर/ग्राम्रक्षण करणा-या रक्षक पथकाच्या प्रमुखास "महारक्षक" (हे संस्क्रुतीकरण झाले, प्राक्रुत माहाराष्ट्रीत महारक्ख) म्हणत असने मला संयुक्तिक वाटते. जर आपण सम्स्क्रुत नाटके व प्राक्रुत गाथासप्तसही जरी पाहिली तरी नगर व ग्रामरक्षकांची दले असत असे नोंदवलेले आहेच. खांडववन दाहानंतर व सर्पसत्रानंतर वाचलेले अगणित नागवंशीय दक्षिणेकडे आले असावेत हे मत मला मान्यच आहे. मध्यभारतात "नाग" ही नावे असणारी असंख्य गावे व प्रदेशही आहेत. छोटा नागपुर, नागपुर, नागांवादि असंख्य गावे आहेतच. एवढेच नव्हे तर नगर/नागर/नागरी लिपी, नागरिक या महत्वाच्या संद्न्या नाग संस्क्रुतीतुनच आलेल्या आहेत हे मी अन्यत्र पुर्वी लिहिलेलेच होते. भिम्नाक, रायनाक ई. संद्न्या मात्र नाग संस्क्रुतीशी निगडीत आहेत कि नाईक या शब्दाचा तो अपभ्रंश आहे यावर एक विवाद आहे हे एक. आणि दुसरे म्हनजे नाग वंशीय हे मुळत पराक्रमी असल्याने ते लढाऊ पेशांत शिरले असणे स्वाभाविक आहे. नागवंशीय महाराष्ट्रात अनेक जातीयांतही आहेतच. उदा. मी स्वत: नागवंशीय आहे. माझे कुल अहिर हे आहे, आणि अहि म्हनजे नाग हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. माझा महत्वाचा मुद्दा (आडनावांसहितचा) असा आहे कि एकाच समाजघतकांतुन व्यावसायिक विकेंद्रीकरणातुन जाती निर्माण झालेल्या आहे. श्री. देविदास पेशवे यांनीही त्यांच्या कुलात, ते देशस्थ ब्राह्मण असुनही नागपुजा आहे हे सांगितलेच आहे. आणि खरे तर त्याचे प्रमाण जवळपास अनेक जातींत आहेच आणि नागपंचमी तर सर्वच साजरी करतात. सुमितजी, एक सांगतो, मला आपल्या अभ्यासुपणाचे, सम्यक विचारधारेचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. वरील विवेचनात काही न्युन असेल तर ते अवश्य दुर करा. धन्यवाद.

    सुमित भाऊ, अंत्यज हा शब्द सर्वच स्म्रुतींनी "चांडाळ" या जातीसाठी वापरला आहे. हे लोक पुरातन काळापासुन अंत्यविधी करणे, म्रुत्युदंडाची कामे करने, स्मशाने सांभाळणे ही कामे करत असत. अस्प्रुष्य मानली गेलेली ही पहिली जात आहे. स्म्रुतींनी त्यांच्यावर प्रचंड अन्याय्य बंधने लादली आहेत. पण या नावाची जात सध्या अस्तित्वात आहे कि नाही याबद्दल मला शंका आहे. पुढे अंत्यजचा परिघ वाढत गेला खरा पण त्यात महार हे नांव येत नाही. म्हनजेच अस्प्रुष्यता या समाजाच्या बाबतीत मध्ययुगात कधीतरी लागु झाली असावी. मी त्या कारणांचाही वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात नवीन द्रुष्टीकोनांतुन नक्कीच भर पडु शकते.

    ReplyDelete
    Replies
    1. सर चांडाळ समाज हा विशेष करून बंगाल व बांगलादेशात अधोडतो,माज्या मते डोम हा समाज मृत्यू संबधित काम करतात.

      Delete
    2. अहीर हा शब्द मूल आभीर या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ निडर होतो संस्कृत भाषेतील दूसरा शब्द अहि या शब्दावरून अहीर नहीं तर आभीर या शब्दावरून आला आहे त्याचा अर्थ निडर होतो अहीर किंवा यादव समाज सम्पूर्ण भारतभर पसरला आहे खान्देशात अहिरानी पट्टी गुजरात मध्ये आभीर देश हरियाणा त अहीरवाल तसेच पाकिस्तानात अहिरणवाला ह्या अहीरांच्या प्राचीन वसाहती त्यामुळे उगाच काल्पनिक उपपत्ति मांडू नए
      गोमा विन्ध्याद्रि मध्ये तु यो देशो ऽभीर संज्ञितः
      तस्मिंदेशे समुत्पन्नो योऽभिरो नामसंज्ञितः
      स्कंद्पुराण
      गोदाविन्ध्याद्रि मध्ये तु देश आभीर संज्ञितः
      तस्मिंदेशे समुत्पन्ना आभीर नाम द्विजाः
      स्कंद्पुराण

      अंगवंग कलिंगांदि तत्तदेशेषु ये द्विजाः
      तथा तापी पयस्विन्यो संगमो यत्र वर्तते
      तमारभ्य त्वहिर्देशो मयुर पर्वतावधि
      ब्रम्ह्पुराण
      अहिर्देशोभवा विप्रा प्रसिधः ऽभिरसंज्ञया
      ब्रम्ह्पुराण

      Delete
  5. Lekh chhan aahe. Pratyek Samaj ghatakachi jar pragati hoil, tarach Bharat ek mahasatta mhanun uday pavel.

    Appalyala Shubhechchha!

    ReplyDelete
  6. Sanjayji article is very good.I appreciate ur logical inference.I run a daily newspaper named Jantecha mahanayak from mumbai.if u permits i can publish this article in my newspaper

    sunil khobragade
    9594057373

    ReplyDelete
  7. लढाऊ Brave heart महार लोकांना या बामन लोकांनी जातीपातीमध्ये अडकवून शुद्र बनवले. अत्यंत विकृतीकानारण झाले सगळ्या भारतवर्षाचे आणि द्राविडी मराठी मुळ लोकांचे. सर्वसामान्य लोकांच्या शेकडो पिढ्यांना अज्ञान, अपमान, तिरस्कार, लाचारी गुलामगिरीचा वारसा ठेवला. त्यांचा सर्वाँगीण अध: घडवून आणले. अशा प्रकारे लाचारीचे जिणे आपल्याच पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ आहे, हाच आपला धर्म आहे, नीती आहे, हे विचार त्या लोकांच्या डोक्यात पेरले. शोषितांच्या डोक्यात शोषकांचा मेंदू काम करु लागला. शोषकांचे हितसंबंध हेच आपले हितसंबंध आहेत, असे शोषितांना वाटू लागले. यालोकांनी मनुस्मृतीच्या आधारे बहुजन समाजाची राबण्याची शक्ती शाबूत ठेवली आणि फुलण्याची शक्ती नष्ट केली. त्याच्या शभंर पिढ्या बिनतक्रार, आनंदाने, समाधानाने आपल्या शभंर पिढ्यांची सेवा करतील, अशी समाजव्यवस्था निर्माण केली. इतक्या वर्षापासून शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज आजच्या पुस्तकी अभ्यासामध्ये सहजासहजी पुढे नाही जाऊशकत. आजही २०११ मध्ये पुण्यात इंगीनीरिंग किवा मेडीकल कॉलेजेस मध्ये ८०% बहिष्कृत समाजाची मुले शिक्षण पूर्ण करू शकत नाही. अजूनही भारतात महत्वाची सरकारी पदे उच्चवर्णीयांच्या हातात आहे. खाजगी मध्ये तर विचारायलाच नको.

    ReplyDelete
  8. प्रश्न आडनावाचा असेलतर साताराला भोसले आणि मोरे हे महार आणि मराठा दोन्ही जातीत येतात आणि कोणीही चोरून नाव बदलेले नाही. ( संधर्भ रानडे यांची हिंदू कादंबरी )please explain this Sanjayji. महारास्त्र हा दगड धोंड्याचा देश आहे साहजिकच शेती कमी असल्यामुळे लोक मांस खात असत त्यामुळे या बामणांनी लोकांना महार संबोधले असेल. ( रामाने मांस खाल्ले तर तो क्षत्रिय आणि मराठी लोकांनी खाल्ले तर महार)( आपला तो सोन्या दुसर्याचा तो बाळ्या ) महारांचे जे विकृतीकरण झाले आहे ते केवळ शिवाजीमहाराजांच्या नंतरच झाले पेशव्यांच्या ब्राह्मणी काळात.

    ReplyDelete
    Replies
    1. he bg tu hindu dharma kaay aahe te ithe sagl wach hindi madhe detoy khas tujhyasathi http://agniveer.com/category/lang/hi/

      Delete
    2. ABHIDADA AAPAN AATA SHAHANE HOVUYA... BAMAN BAMAN SHIVYA GHALNE AATA BAND KARUYA...SHIVAJICHYA KAALAT PAN CASTE SYSTEM HOTICH RE BHAAWWA...ITIHAAS BAMANANNI BIGHADAVLA AANI MARATHYANNI NAASAVLA...! JAY BHIM..!!!

      Delete
    3. तोंड समभाळून बोल भावा मराठ्यांचा काय संबंध.???काहीही बरळू नको.

      Delete
  9. sundar uhaapoh .. manaa paasun awadale.. ani navi maahiti hi milaali ... anik ek.. vasudeo balwant phadkyanchya mate.. mahaar lok he shivaji rajenchya kalaat nusate anga rakshak naahi tar killedar wagaire sarakhyaa mahatwacha huddyawar dekhil aghadiwar hote... pan dusari goshta mhanje shivarayanchya kaalaat mahaar ashprushya ganale jaayache... kadaachit yaawaroon tyanna kadhi ashprushya tharawale gele yacha ek kaal khand miloo shakel.. jyaa kaalaat samudra olandane mhanje paap wagaire ashaa goshti dharmaat alyaa tyach kaalaat asale prakaar hi suru jhale asatil ashi shankaa aahe.. Pudhe..yaach jamaatichyaa madatine wasudev balwant phadakyanni ingrajaan wirrudha sashashtra aandolan kele hote he hi wisaraayalaa nako..

    ReplyDelete
  10. Dear Parag jee, It's true that in and before Shivaji's time Mahar community used to be Killedar, Patil in Maharashtra. I have come to conclusion that the untouchability occurred after 13th century and gradually spread to become custom till 16th century. From some sources I can find there were series of famines and epidemics during this period that destroyed economy as well as social harmonious order of the society. I find the roots of untouchability in the epidmics. I am still researching on this. There used to be temporal untouchability even in Brahmin community...and so the others. But the permanent untouchability, that is not explained anywhere in any smruti, has to be looked into other circumstances.

    ReplyDelete
  11. I'm new to this blog... but all is so informative... trying to read whatever I could get on this blog... Thanks Sanjayji

    ReplyDelete
  12. Mahar is an cluster of different endogenous sub castes which don't intermarry.Prominent sub cast is somvanshi which resides in western side of Maharastra.

    ReplyDelete
  13. Mahar is an cluster of different endogamous sub castes which don't intermarry.Prominent sub cast is somvanshi which resides in western side of Maharastra.

    Mahar became untochable because of eating cow beef even after it cow killing is considered as crime due to agricultural purposes.

    Another live example is that in nepal vedik hindu harrasing buddhist for cow beef eating.

    ReplyDelete
  14. Nice............but now what next ..........? it is big question in front of all..

    ReplyDelete
  15. for mahar cast horse is divine animal and mahar used to use horses and even though maratha cast did not object against it.
    horse is useful mostly for kshatriya only.

    please read this for evidences.
    ---castes of central provinance
    ---Mr.R.VRussell

    ReplyDelete
  16. मी पण एक महार वंशामध्ये जन्मलेला मुलगा आहे.
    तुमच्या लेखामुळए मी स्वताला आणि माझ्या पूर्वजाना व्यवस्थितपणे जाणून घेऊ शकलो.
    धन्यवाद !

    ReplyDelete
  17. सोनवणी आपला अभ्यास आणि लेखन खरोखरीच स्तुत्य आहे. मी जन्माने एक कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण आहे. मला जातीवाद,स्पृश्य आणि अस्पृश्य या गोष्टी संस्कारात कधीही बाळकडू म्हणून प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे कोण उच्च आणि कोण नीच हा प्रकार ठाऊक नव्हता तसेच सध्या भांडणे का सुरु आहेत हा विषय देखील कोड्यात होता. आज शंकांचे निरसन झाले. काही सामाजिक परिस्थिती मुळे काही चुकीच्या रुढींचा पायंडा घातला गेला. आताच्या समाजात तो दिसून येत नाही हे चांगले आहे. आपण आणखी लेखन करून भारतीय समाजात मी ब्राम्हण..मी मराठा...मी नवबौद्ध....मी ख्रिस्ती.....मी मुसलमान इत्यादी भावना नष्ट करून मी भारतीय मी एक माणूस अशी भावना रुजवण्यास मदत करावी.

    ReplyDelete
    Replies
    1. A good perspective towards caste system. appreciated it

      Delete
  18. संजय साहेब महार या साब्दाचा व्यक्तीश्या अर्थ काढायचा म्हटल्यावर त्यांच्या इतिहास हि पाहणे गरजेचे तुम्ही म्हणालात कि महारांच्या नावावरून महाराष्ट्र हे नाव नाही पडले तर मग कशावरून पडले हे सांगू शकता का
    महारांच्या नावावरून हे महाराष्ट्र नाव आहे महारठ हा शब्द महारांच्या उद्याचा आहे महा म्हणजे खूप रठ म्हणजे लढवय्ये ह्यांना महार म्हणत आणि इतर जाती पहिल्या तर बघा प्रत्येक जातीत महार शब्द आहे मग तो चांभार कुंभार लोहार या मध्ये महार ह शब्द आहे जे मूलनिवासी आहेत महार ह्यांचे वंशज हे नागवंशी आहेत आणि नागवंशी हे महाराष्ट्राचे मुल निवशी आहेत हे सांगायची गरज वाटत नाही

    ReplyDelete
  19. if the origin of mahar caste not found in manusmruti then why Ambedkar burn it? please give more info on this subject..

    ReplyDelete
    Replies
    1. It is misunderstanding that Babasaheb burnt Manusmruti in protest of Mahar community...it was because Manusmruti professed inequality based on birth...i.e. Varna system...

      Delete
    2. sir, arya lokana jya lokani virodh kele , tyatil je palayan karun jangalat vastavyala gele te adivasi hot ani je gulami kele/ sharan yevun chakari swikarle te mahar va etar ashprushya hot
      -Kumar Durge ,Pune vidyapith MLisc. dept

      Delete
  20. Jay bhim,
    "Mahar" hi cast nantar jari janmala aali aasli tari. Shur aani virta hi tar aaplya blood madhe pahilya pasunach hoti. "Samrat aashoka" dekhil "mahar" aslyache mi kuthetari vachle aahe. He barobar aahe ka sanjay ji.

    ReplyDelete
  21. Khupach apratim asa lekh ahe. Amhi adnav yadav lavto mazya ajobani boudha dhamma ghetla hota tevapasun amhi buddhist ahot. Pan amchya caste certificatevar purviche hindu mahar va ata nav boudha asa ullekh ahe. Mag apan yadav mahar yabddal kahi tapshil milel kay aslyas krupaya sangava. Maza gav nadhavade jila-sindhudurga tal-vaibhavvadi
    dhanyavad

    ReplyDelete
  22. सर, खरच उत्कृष्ट लेख. तुम्ही पुराव्या अभावी काढलेला तर्क पटतो. अगदी अपघाताने हल्लीच हा ब्लॉग वाचायला सुरुवात केली आहे.
    बरोबर नेमक्या ठिकाणी आलो.

    सतीश कुडतरकर
    डोंबिवली

    ReplyDelete
  23. सुंदर, अभ्यासपूर्ण व चिंतनशील लेख संजय सोनवणी सर. महार शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी, त्याच्या इतिहासाविषयी एवढी चर्चा घडण्याचे कारण हेच की ही जात, हा समाज व त्याचा इतिहास त्या पात्रतेचा आहे. इतक्या यातना सोसूनही हा समाज विध्वंसाची मानसिकता बाळगीत नाही, यातच या समाजाचे 'महा'पण सामावलेले आहे आणि बाबासाहेबांमुळे या 'महा' पणाला आणि महाचर्चेला आणखी गती मिळाली. पण आता पुढे काय? आम्ही आता या प्रेरणेतून काय साध्य केले पाहिजे? आमच्या मते या जातीतून जे लोक त्यांच्या मूळ शीलसंपन्न बुद्धधम्मात गेले आहेत, जात आहेत व जाणार आहेत त्यांनी त्यांचा हा मूळ धम्म रुजवावा व देशहित साधावे आणि जगालाही या मार्गावर येण्यासाठी आपल्या आचरणाद्वारे प्रेरणा द्यावी. यातच आमच्या जीवनाचे साफल्य आहे. राज्यघटनाप्रणीत स्वातंत्र्य, समता, बंधुत्व व न्याय धम्माशिवाय प्रस्थापित होणे शक्य नाही.

    ReplyDelete
  24. VERY INFORMATIVE Thaks for helping me to know about my ancestors very well proud of them.

    ReplyDelete
  25. काहीही मनाला वाट्टेल ते लिहिले आहे.. मराठा हा शब्द महाराष्ट्र चा अपभ्रंश आहे.. महाराष्ट्र म्हणजे मोठे राज्य, किवा राष्ट्र! तिथे राहणारे लोक महाराष्ट्री- अपभ्रंश महाराठी - मराठी.. बाकी सगळे सारखेच.. पंजाब्यात हि शुद्र आणि उच्च आहेत.. जर आणखी शोध घेऊन लेख लिहावा..

    ReplyDelete
  26. महात्मा फुलेनी अशाच प्रकारची कल्पना मांडली पण त्यानी ती फक्त कल्पना mम्हणुनच ठेवली त्यांच्या मते आर्य ब्राम्हण नस्ते तर समाज कदाचित अश्या प्रकारचा असता या कल्पनेला त्यानी सिद्धांताच स्वरुप दिल नाही आणि बहुदा अशी परीस्थिती सुद्धा नाहीये

    ReplyDelete
  27. २. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हते तर जबाबदारी होती. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. >>>>>>>>>>>>अर्थशास्त्र या ग्रंथात गुलामांची जी सात कामे सांगीतली गेली आहेत त्यात आरक्षक हे काम सुद्धा त्या मधे अंतर्भुत आहे आणि चोरी झालेल्या मालाची नुकसान भरपाइ हि पोलिसानाच द्यावी लागते हे आजच्या किंवा त्याकाळातhहि घडत असेल हे खर वाटत नाही याहे घडण्याच कारण अंत्यज हे सुरुवातीपासुनच गावाच्या अश्रयासाठी आले असावेत हे मत पटते

    ReplyDelete
  28. वेगवेगळ्या नावाचा मुद्दा तर तो अंत्यज मुळातच ब्रोकन मॅन होते त्यामुळे त्यांची निर्मितीच वेगवेगळ्या समाजातुन झालेली आहे आणि दुष्काळ आपत्ती हा मांडलेला तुम्ही मुद्दा तो सुद्धा पटत नाही त्याच कारण संकटाच्या काळी कोणताही समाज व्यवसाय बदलण्यावर भर देतो व इतकी हलाकीची परीस्थिती असताना अस्प्रुश्य समाज व्यवसाय बदलणार नाही हे शक्य वाटत नाही पण हे घडल त्याला कदाचित दुसर कारण असु शकेल एक तर ते मुळात आश्रित असावेत

    ReplyDelete
  29. त्यामुळे मला अस वाटत हे रक्षण करण्याच काम मुळात सर्व अस्प्रुश्याना करावे लागे( pपाळी पाळीने ) आणि ज्याना ज्याना ह्या रक्षन कर्त्यांच मुख्य ( नाईक ) बनवल गेल त्याला महारक्षक म्हटल जाण्याचे चांसेस जास्त आहेत तरी आपल्या सिद्धांताशी नसलो तरी व्युत्पात्तीशी मी काही अंशी सहमत आहे ( या आगोदर मा=लक्ष्मी हार = हरण करणे हि मांडली गेलेली व्युत्पत्ती यदा कदाचित बरोबर असावी असे वाटत होते )

    ReplyDelete
  30. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  31. काय तर्क लावलाय ,काय अंदाज केलाय ,,
    अहो 7/8टक्के लोकावरूण एखाद्या प्रदेशाचे नाव पढते का ओ?
    मोठे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र

    ReplyDelete
    Replies
    1. महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्ति विषयी मांडले गेलेले विचार खालीलप्रमाणे:

      १. 'महाराष्ट्र' या शब्दाची उत्पत्ति महारांचे राष्ट्र ते महारराष्ट्र = महाराष्ट्र (मोल्सवर्थ)

      २. महार व रट्ट या दोन जाती नामांचा संयोग होऊन 'महारट्ट' = महाराष्ट्र (डॉ. केतकर)

      ३. महाराष्ट्राचा त्याग करून जाणाऱ्या 'मातिया हरी' यांच्या तोंडचे 'तुझेया महाराचा महाराष्ट्र होऊनि मीची जातु असे' (लीळाचरित्र)

      ४. 'महानराष्ट्र - मोठे राष्ट्र ते महाराष्ट्र (पा. वा. काणे)

      ५. मल्लराष्ट्र (मल्ल - म्हार - मार) = मल्लांचे राष्ट्र ते महाराष्ट्र (डॉ. ओप्पर्ट).

      संदर्भ: वस्तुनिष्ठ मराठी, डॉ. प्रा. प्रवीण चंदनशिवे, सुकाणू प्रकाशन, कराड, चौथी आवृत्ती (२७ फेब्रुवारी २०११-मराठी भाषा दिन), पृष्ठ क्र.१४३.

      Delete
  32. सर मी बलराज मेहेत्रे , मला महार जातितिल मेहेत्रे या विषयी माहिती हवि आहे,

    ReplyDelete
  33. महारांनी व धन्गरांनी विशेष जातदेवता 'तयार' केलेत हे सोडून पोस्ट पूर्ण पटलं सर. कोणतेही देवी देवता हे प्राकृतिक तत्वे, पुर्वज (पितृ)/पुर्वजसमान ऐतिहासिक महापुरुष किंवा त्यांचा समन्वय केलेले पात्र असतात.

    ReplyDelete
  34. अहीर हा मूळ शब्द आभीर या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहेयही त्यामुळे अहीर शब्दाची चुकीची उत्पत्ति लाऊन दिशाभूल करने योग्य नहीं आभीर म्हणजे निडर खान्देश भागात ते मराठा म्हणतात उत्तेर भारतात यादव म्हणतात देवगिरीचे यादव हे अहीर होते। भगवान श्रीकृष्ण अहीर होते

    ReplyDelete
  35. श. गो. जोशी (1940)76
    आभीर हे यादववंशी आहेत. यादवांना आठव्या शतकात दक्षिणेत राज्य केले व बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरी (दौलतावाद) इथे त्यांची सत्ता असल्याचे दिसते.... तात्पर्य आभीर नावाचा एक प्रबळ आर्यवंश हिंदूस्थानात होऊन गेला. हे इतिहास पूराणावरून सिध्द होते.

    2) पा. मा. चांदोरकर77
    ‘‘श्रीकृष्णांनी बालपण ज्यांच्यात घालवले ते गोकुळ वंृदावनातील नंदादि गोप हे आभीर होते. हे प्रसिध्दच आहे. यादव हेच गोप उर्फ आभीर होय. यादवांनाच गोप ही सर्वसाधारण संज्ञा होती. ब्रजातील नंदादी गोप हेही मूळचे यादव होते. गोप-आभीर एक स्वतंत्र जात नसून एक धंदा होता आणि यादवांनी तो आपल्या आवडीखातर पत्करलेला होता असे दिसते.
    3) भा. र. कुलकर्णी 78
    ‘‘अहिरांची शस्त्रास्त्रे, तलवार, ढाले परशु आर्यांच्या समान होते. ते पशुपालन करत, ते पितृपूजक होते, अग्निपूजक होते आणि कोणत्याही युध्दात अहिर दृष्टीगोचर होतात. आभीर मूळ युध्दप्रिय प्रवृत्तीचे लोक होते. म्हणून त्यांची गणना श्रेष्ठ योध्दयांमध्ये केली जात होती.
    4) वि. का. राजवाडे 79-
    ‘‘अहिर हे जातिसंस्थ लोक म्हणून इतिहासात प्रथम दृष्टोत्पत्तीस येतात आणि ते आजही तसे परंपरेने जातिसंस्थच आहेत. त्यांचे देवधर्म आर्यांच्या प्रमाणे पूर्वी होते व सध्याही आहेत.’’
    ) डाॅ. रा. श्री. मोरवंचीकर 80
    कृष्णाचे अहिरांचे रक्ताचे नाते आहे ते त्याचे दैवत व लोकप्रिय नेतृत्व आहे. आभीर कृषीप्रधान संस्कृतीचे जनक होते. जलक्रिडा, नृत्य अहिराचे छंद होते. त्यांच्याच नावाने खानदेशात, चित्रकला, शिल्पकला वास्तुकला यांचा विकास झाला. पितळखोरा, घटोत्कच, बाघ इ. लेण्या त्यांच्या उच्चभिरूचीचे दर्शन घडवतात. अशा श्रेष्ठ आभीर संस्कृतीस मी नमन करतो.
    6) डाॅ. दा. गो. बोरसे 81
    ‘‘देवगिरीच्या यादवांना अहिरराजे, गवळीराजे म्हटले जाई जाडेजा व चूडासामा स्वतःला चंद्रवंशीय अहिर मानत होते. अहिरांचे मूळस्थान भारत आहे आणि ते या मातृभूमिचे सुपुत्र आहेत. ते सूर्यपूत्र असून यदूवंशीय आर्य म्हटले जातात. आर्यत्वाचे जे आवश्यक लक्षण आहे ते त्यांना पूर्णरूपाने लागू होते ़

    ReplyDelete
  36. )नंदवंश प्रदिप 34- ‘‘नंद क्षत्रियः गोपालवाद गोप्’’
    २) शक्तिसंगमतंत्र - ‘‘आहूकवंशात समुद्भूताः आभीर इतिप्रकिर्तितः
    ३)जाति विवेकाध्याय:- आहूक जन्मवन्तश्च आभीराः क्षत्रिया भवन
    ४)नंदवंशप्रदिप:- आहुकवंश सम्भूता आभीरा:
    ५) स्कंदपूराण गोदाविंध्याद्रि मध्ये तु देश आभिर संज्ञितः तास्मिन्देशे समुत्पन्ना आभीरा नाम द्विजः
    ६) विष्णुशर्मा-
    पंचतंत्र आभीर देशे किल चंद्रकांतम त्रिभिरवराटैर विपणंति गोपा
    ७)वात्स्यायन -कामसुत्र आभीरं ही कोट्राजं परभवनगतं भ्रातृप्रयुक्तो रजको जघान 5-5-1753

    ReplyDelete
  37. गोमा विन्ध्याद्रि मध्ये तु यो देशो ऽभीर संज्ञितः
    तस्मिंदेशे समुत्पन्नो योऽभिरो नामसंज्ञितः
    स्कंद्पुराण
    गोदाविन्ध्याद्रि मध्ये तु देश आभीर संज्ञितः
    तस्मिंदेशे समुत्पन्ना आभीर नाम द्विजाः
    स्कंद्पुराण

    अंगवंग कलिंगांदि तत्तदेशेषु ये द्विजाः
    तथा तापी पयस्विन्यो संगमो यत्र वर्तते
    तमारभ्य त्वहिर्देशो मयुर पर्वतावधि
    ब्रम्ह्पुराण
    अहिर्देशोभवा विप्रा प्रसिधः ऽभिरसंज्ञया
    ब्रम्ह्पुराण

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...