Saturday, June 30, 2012

निरर्थक ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद...




फुले-आंबेडकरांच्या काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला काहीतरी एक अर्थ होता. हे दोन्ही महामानव अत्यंत कुशाग्र आणि तर्कनिष्ठ व अभ्यासपुर्ण बुद्धीनिष्ठ्तेच्या बळावर ब्राह्मणी सत्तेला यशस्वी आव्हान देवू शकले. त्यांच्या कार्याची बहुमोल फळे चाखणारे, चळवळीचे नेते ते पाईक समजनारे हे शतमुर्ख मात्र द्न्यानाच्या क्षेत्रात मात्र शिक्षणाच्या सर्व सोयी मिळुनही विद्वत-अडानी राहिले ते राहिलेच. ब्राह्मणांना शिव्या दिल्या म्हनजे आपण चळवळीचे पाईक झालो या भ्रमातुन हे लोक बाहेर कधी येतील ते येवोत.

"वाद" या शब्दाचा अर्थ तरी यांना नीट कधी समजला आहे काय? वाद तुल्यबळ वैचारिक पक्षांमद्धेच होवू शकतो. ज्यांना मुळात "विचार" कशाशी खातात याचेच द्न्यान नाही त्यांनी ब्राह्मण-ब्राह्मनेतर वादात पडुन स्वत:चेच नाक छाटुन घ्यायचा चंग बांधला आहे. अर्धवट द्न्यानावर आधारीत हे पुस्तके लिहितात, स्वत:च्या समाजात विचारवंत म्हणुन मिरवुन घेतात. त्यावर कोणीही टीका केली तर लगेच "भटाळलेला", "आरेसेसने दत्तक घेतलेला" वगैरे शेलकी विशेषणे वापरुन मोकळे होतात. यात या मंडळीला काय विकृत आनंद होत असेल तो असो, पण बहुजन म्हणवना-यांचे वाटोळे मात्र करण्यात आज ब्राह्मण नव्हेत तर असेच उथळ बहुजनीय विचारवंत आघाडीवर आहेत हे दुर्दैव आहे.

द्न्यानसत्ता निर्माण करण्यात एक द्न्यानावरील निष्ठा लागते. ब्राह्मनांचे वर्चस्व झुगारायचे असेल तर त्याच तोडीचे, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक द्न्यान निर्माण करावे लागते याचा विसर सर्वच समाजाला पडला आहे. फुले-बाबासाहेबांना अंतिम मानत कधीही द्न्यानवृद्धी होणार नाही हे यांच्या गांवीही नाही. त्यांचे काय मानावे? तर त्यांची अगाध द्न्याननिष्ठा, तर्ककठोर होत स्वत:ची मते तपासत पुढे जाण्याची प्रवृत्ती. यांना फुले आंबेडकर मुळात समजलेलेच नाहीत असा माझा ठाम विश्वास आहे. अपवाद असतात...पण अपवादांनीच नियम सिद्ध होतो.

जुनी दैवते नष्ट करायचा अथक प्रयत्न करायचा आणि नवी दैवते निर्माण करण्यात मात्र कुचराई करायची नाही आणि वर म्हणे हिंदु धर्म संपवायचा...हे असे करत राहिले तर बापजन्मी त्यांना हिंदु धर्म संपवता येणार नाही. नवीन धर्म स्थापन करायचा...सर्वांना प्रिय वाटेल म्हणुन शिव हे नांवही द्यायचे...मग मुळात जो शैव धर्म पुरातन काळापासुन अस्तित्वात आहे, एवढे अवाढव्य तत्वद्न्यान उपनिषदे, तंत्रशास्त्रे ते आदी शंकराचार्यांनीच निर्माण करुन ठेवले आहे त्यांचाच उद्घोष करायचा तर नवीन धर्म आणि नवी धर्मसंहिता. म्हणजे त्यांना अभिप्रेत "शिव" हा शिव शंकर नसून अन्य कोणीतरी शिव या जातीयवाद्यांना अभिप्रेत असावा असे म्हणने क्रमप्राप्त आहे. मग शिव हा देशाला जोडनारा धागा आहे असे म्हनने गैर आहे. काहीतरी दडवण्याची ही चाल आहे.

गौतम बुद्धाला पुराणकारांनी विष्णुचा दहावा अवतार का ठरवले यावर यांनी खरे तर मुलभुत विचार करायला हवा. "असुरांमद्धे मायामोह" निर्माण करुन त्यांना पथभ्रष्ट करण्याचे कार्य बुद्धाने केले म्हणुन बुद्ध हा दहावा अवतार (काही पुराणांत नववा अवतार) ठरवण्यात आला हे यांच्या गांवीही नसते...कारण अभ्यास कोणी करायचा? पुराणे जाळुन टाका हे म्हनने सोपे असते परंतु त्यांचा तटस्थ अभ्यास करत त्यांतील खोट वा सत्य शोधायचे कोणी?

ब्राह्मनांना वेदांची-स्मृतींची चिकित्सा कधीच मान्य नव्हती आम्हालाही बहुजनीय महापुरुष, त्यांनी स्थापलेले धर्म वा त्यांच्या विचारांची चिकित्सा मुळीच मान्य नाही. काय फरक उरला? द्न्यान फक्त चिकित्सेनेच पुढे जावु शकते याचे भान नको कि काय? ब्राह्मण समाज शिव्या घालायला सोपे टार्गेट आहे. त्यांना शिव्या द्यायला फार धाडसाची गरज नसते. त्यांनाही अशा शिव्यांमुळे काहीएक फरक पडत नाही. उलट ते आत्मकेंद्रित होत एक दिवशी अत्यंत थंड डोक्याने बहुजनांचा असा बौद्धिक काटा काढतील कि हे सैरभैर होत भरकटत जातील. उथळ लोक सांस्कृतिक संघर्ष कधीच जिंकु शकत नसतत हा जगाचा इतिहास आहे. ब्राह्मण काही आकाशातुन पडलेले नाहीत...किंवा ते बाहेरुनही आलेले नाहीत. समजा ते आले असले तरी मग त्यांच्याबरोबर कथित क्षत्रीय, वैश्यही आलेच कि! मग तुम्ही क्षत्रीय-वैश्यांना कोणत्या नियमांनी एतद्देशीय ठरवता? तेही तुमच्याइतकेच याच देशाचे, सम्स्कृतीचे भाग आहेत.  होते आणि राहतील.

गतकाळातील द्न्यात-अद्न्यात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली...ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनियांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वातला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचनावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती. वेदबंदीने तसाही काही फरक पडनार नव्हता कारण ते त्यांच्या धर्माचे प्रतीक नव्हतेच! शिकायच्या बाबतीत बहुजन समाज आजही आळशी आहे. शाळांतुन गळत्या होतात त्या यांच्याच. तेथे काही प्रबोधन करायचे नाही आणि सारी खापरे दुस-या जातीवर थोपुन मोकळे व्हायचे हा धंदा कसा चालेल?

मी याला संभ्रमावस्था म्हणतो. संभ्रमी समाजाचा अंतता विनाशच होतो. एखाददुस-याबाबत संभ्रम आपण समजु शकतो पण जे द्न्यान नव्हे तर फक्त संभ्रम निर्मितीचे अवाढव्य कारखाने बनले आहेत ते समाजघातकी आहेत असेच म्हणावे लागते.

स्वत:च्या टिर्या बडवत द्न्यानसाधना होत नसते. द्न्यानाला शुद्ध करायचे कि अर्धवट द्न्यानाने विकृत कृत्या करायच्या? बाबासाहेबांनी जेही लिहिले ते साधार व सप्रमाण लिहिले. कोठेही कधीही अश्लाघ्य भाषा वापरली नाही. फुलेंनी तर्ककठोर युक्तिवाद करत बहुजनवादाचा पाया घातला. आज बहुजनवादाचा गळा घोटण्याचे कार्य  फुले-आंबेडकरांचेच नांव घेत केले जात आहे याचा खेद आहे.

आजचा बहुजनवाद हा सृजनशील नाही. आणि सृजनात्मक विचारधारा जे निर्माण करु शकत नाहीत त्यांचा विनाश हा अटळ असतो. कत्तली, दंगली, तोडफोड अशी भाषा करायला अक्कल लागत नाही...पण मग अशी भाषा करत बाबासाहेबांच्या संविधानात्मक तरतुदींचाच घोर अवमान करत असतो हे कधी समजणार?

आपलीच आराध्ये पायतळी तुडवणा-या अशा महामुर्खांना आपल्या अशा कृत्यांची-विधानांची शरम कधी वाटणार?

इतिहास हा धादांत असत्ये ठोकत नव्याने लिहावा लागत नसतो तर त्याची परखड चिकित्सा करत समोर आणावा लागतो. इतिहास ही गोष्ट भेळ-भजी खाण्याची वा चकाट्या पिटण्याची बाब नसते.

आणि सर्वात महत्वाची बाब असते ती ही कि इतिहास घडवायचा असतो! नव्या पिढ्यांना भावनीक आत्मविश्वास देनारा...दिगंताकडे पुढे जायला प्रेरीत करनारा इतिहास.

पण आज हे बहुजनीय म्हनवणारे विचारवंत जो इतिहास घदवत आहेत त्यांवर पुढील पिढ्याच थुंकतील...
ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हाच एक कायमचा इतिहासात जमा होईल!



44 comments:

  1. sir ata tumchya lekhavar kahi blogs war aagpakhad hoin nirthak shelki visheshan dili jatin

    ReplyDelete
  2. संजयजी , आपण फारच छान मुद्दे मांडले आहेत . पण ज्यांच्यासाठी तुम्ही हे मुद्दे मांडले आहेत त्यांच्या डोक्यात ते शिरतील असे मला तरी वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजीनी मांडलेले विचारात परिवर्तन करण्याची हाक दिसते.

      परंतु सांगलीकर तुमच्याकडुन नकारार्थी विचाराची अपेक्षा नव्हती ...
      मग तुम्ही तर काय करताय चिडवण्याचा प्रयत्न करताय की मनात वेगळेच काहितरी आहे, असे निदर्सनास येत आहे...

      Delete
  3. संजय सर, अगदी खरे बोललात तुम्ही. जातीय द्वेषाचे राजकारण करणारे नेते आणि त्यांच्या मागे गतानुगतिको लोकः या उक्ती प्रमाणे आंधळ्यासारखे अनुकरण करणारा समाज जोपर्यंत या मानसिकतेतून बाहेर येत नाही, तोपर्यंत आजच्या समाजाची अवनती ही होतच राहणार. इतिहासातले आता उगाळून काय उपयोग असे म्हणणार्‍यांनाही ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की इतिहासात झालेल्या चुकांचे चिंतन केले तरच भविष्यातील समतेचा समाज निर्माण होणार आहे.
    ब्राह्मण हे गतकाली जातीय व्यवस्थेत्तेच्या केंद्रस्थानी असल्यामुळे इतिहासाचे संशोधन त्यांच्यावरच होणार हे उघडच आहे. पण सर्वच लोकांनी ब्राह्मण आणि प्रवृत्ती हा फरक लक्षात घेऊन इतिहासाचे मनन केले पाहिजे.
    "निरर्थक ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद... हे तुमचे मत अगदी पटणारे आहे."

    त्यामुळे इतिहासात घडलेल्या जुन्या चुका दाखवून देणार्‍या संजय सर तुमच्यासारख्या विचारी, वस्तुनिष्ठ आणि निरपेक्ष बुद्धीच्या संशोधकाच्या ऋणात भविष्यातील पिढ्या कायमच राहतील.

    संजय सर, डोळे उघडणारे हे समाजप्रबोधन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  4. संजयजी - काय उत्तम लेख लिहिला आहे आपण. अतिशय मुद्देसुद्द आणि प्रवाही (रायटिंगचा फ्लो) आणि अतिशय परिणामकारक.
    एक मुद्दा अगदी आवडला तो म्हणजे "दंगली हत्या ह्यांचा पुरस्कार करून आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा अवमान, पायमल्ली करतो ह्याचा विसर". कितीतरी दिवस मनात हा मुद्दा होता पण तो लिहून उतरवता येत नव्हता. आपण तो अतिशय उत्तम रीतीने मांडला आहे. ब्राम्हणद्वेष करून जर सांपत्तिक, किंवा आर्थिक दृष्ट्या ब्राम्हण समाजाला खाली ओढायचे असेल ते दिवास्वप्न वाटते. आणि खरा उद्देश ब्राम्हणांना खाली खेचण्यापेक्षा इतर समाज वरती कसे येतील ते बघणे हा असला पाहिजे. सगळेच लोक - ब्राम्हण आणि बहुजन, जर भिकेला लागले तर कोणाचे कल्याण होणार आहे? पण खरा उद्देश क्रांतिकारी, जहाल नाही तर त्याला तळागाळात समाजात मिसळून काम करावे लागते तर ब्राम्हण पुरुषांच्या हत्या करण्याच्या फक्त धमकी देऊन त्यापेक्षा कितीतरी जास्त पब्लिसिटी झटकन मिळते. आजसुद्धा कितीतरी जाती गुन्हेगार म्हणून ओळखल्या जातात, कित्येक लोक आज २०१२ साली पालात उघड्यावर संसार चालवतात. ह्या ब्राम्हणविरोधी चळवळीला आणि त्यांच्या उरफाट्या तोंडाळ नेतृत्वाला पालात राहणार्यांच्यात इंटरेस्ट नसून त्यांना हा सत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग किंवा सत्तेतील लोकांच लक्ष कमीत कमी प्रयत्नात स्वतःकडे ओढणे ह्याशिवाय काहीही नाही.
    ब्राम्हण समाजसुद्धा अतिशय स्वकेंद्रित झाला आहे आणि तो ह्या गोष्टींमुळे अजूनच स्वकेंद्रित आणि चलबिचल होऊ लागला आहे. ब्राम्हण समाजाने ते सुद्धा ह्या पालातल्या आणि गुन्हेगारी समाजाच्या पुनर्वसनाचे देणे आपण लागतो ह्याची पोच ठेवणे गरजेचे आहे.
    आपले ह्या विचार करायला लावणाऱ्या लेखाबद्दल परत एकदा अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. आरएसएसच्या ब्राह्मणांनी देशात जेवढ्या दंगली केल्या आहेत, तेवढ्या संपूर्ण जगातील इतिहासात कोणीही केलेल्या नाहीत.

      Delete
  5. ब्राम्हण समाजसुद्धा अतिशय स्वकेंद्रित झाला आहे आणि तो ह्या गोष्टींमुळे अजूनच स्वकेंद्रित आणि चलबिचल होऊ लागला आहे. ब्राम्हण समाजाने ते सुद्धा ह्या पालातल्या आणि गुन्हेगारी समाजाच्या पुनर्वसनाचे देणे आपण लागतो ह्याची पोच ठेवणे गरजेचे आहे....१००% सहमत!

    ReplyDelete
  6. मस्त एकदम छान लेख लिहिला आहे सर् तुम्ही .........
    धन्यवाद...
    असेच लेख लिहीत जा ....
    शुभेच्छा ........

    ReplyDelete
  7. शूद्रानी वेदाध्ययन करण्यावर बंदी होती ती वेद या साक्षात्कारांच्या समूहाचा अर्थ पुरेशा पूर्वतयारीशिवाय लावला जाऊन त्याला विपरीत स्वरूप येऊ नये म्हणून. वैदिक काळात ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णाना वेदाध्ययनाचा अधिकार होता याचा अर्थ त्यांची तशी पूर्वतयारी करून घेतली जात होती एवढाच आहे.

    ReplyDelete
  8. सोनवणी साहेब,
    छान बुद्धिभेद केलात तुम्ही. मूळ विषयाला बगल देण्याची खुबी तुम्ही छान विकसित करून घेतली आहे. तुमच्या मनात डॉ. आ. ह. साळुंके यांच्या विषयी कमालीची कटुता भरली आहे. तथापि, ती उघडपणे उगाळण्याची qहमत तुमच्यात नाही. ती तुम्ही अशी आडमार्गाने उगाळत आहात. गेल्या काही दिवसांतील लेखांतून डॉ. साळुंके यांच्या विषयीची सुप्त मळमळ दिसते. तुम्ही थेट नाव घेऊन लिहिले असते, तर आनंद वाटला असता. पण तुम्ही बोटचेपी भूमिका घेतली. तुमच्या मनात कुठे तरी अपराधीपणाची भावना असावी, असे दिसते. त्यामुळे तुम्ही थेट नाव घेऊन लिहिण्याचे टाळित असावात.

    असो. तुम्हाला नव्या वैचारिक घरोब्यासाठी शुभेच्छा.

    -समीर पाटील, बोरखेडकर

    ReplyDelete
    Replies
    1. समीर पाटीलसाहेब,
      ब्लॉगचे लेखक तुम्हाला उत्तर देतीलच. पण एक वाचक म्हणून मी खूप ब्लॉग्स वाचले आहेत. आणि वैचारिक टीका आणि व्यक्तीगत टीका हे मला चांगलेच कळते यासाठी हा लेखनप्रपंच. तुम्ही श्री. सोनवणी यांचे सौजन्य लक्षात न घेताच टीका करत आहात. संजय सोनवणी हे व्यक्तीगत टीका शक्यतो कधी करत नाहीत त्यांची टीका असते ती विचारांवर आणि प्रवृत्तींवर असते. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली तर कळेल की नाव घेतले तर व्यक्तीची बदनामी होते प्रवृत्तींची वा विचारांची नाही. उलट तुम्हीच साळुंखे यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम केले आहे. भावनेपेक्षा विचारांकडे लक्ष द्यावे. आणि संभाजी ब्रिगेड असो वा इतर कोणतेही चष्मे असो. ते चष्मे काढून जात-पात सोडून सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यांतून या लेखनाकडे पहावे ही आपल्याला नम्र विनंती. वृथा जातीअभिमान विचारांत भिनला की समता अस्तित्त्वात येऊच शकत नाही हे ही कृपया येथे लक्षात घ्यावे.

      धन्यवाद

      Delete
  9. @ Koham Blogger

    आरएसएसच्या ani Shiv Senechya ब्राह्मणांनी देशात जेवढ्या दंगली केल्या आहेत, तेवढ्या संपूर्ण जगातील इतिहासात कोणीही केलेल्या नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. पाटीलसाहेब,

      इतिहासातील ब्राह्मणांनी जे केले त्यासाठी आजच्या ब्राह्मणांवर सूड उगवला पाहिजे असे तुमचे म्हणणे आहे काय? तुमची दिशा स्पष्ट करा मग मला अधिक सविस्तर लिहिता येईल. काही वैचारिक गोंधळ असेल तो दूर होईल. एक सकारात्मक चर्चा करणार असाल तर मलाही आवडेल चर्चा करायला. कोहम ब्लॉगर हे कित्येक वर्षे लेखन करत आहेत. त्यांचे लेखन प्रगल्भ विचारांतून उतरलेले असते. मला तरी ते पटले. तुमचा विचार स्पष्ट झाला की त्या रोखाने मलाही स्पष्ट लिहिता येईल.

      धन्यवाद

      Delete
  10. पण आज हे बहुजनीय म्हनवणारे विचारवंत जो इतिहास घदवत आहेत त्यांवर पुढील पिढ्याच थुंकतील...


    -- वरील वाक्य खूप आवडले.

    ReplyDelete
    Replies
    1. इतिहासाची पुनर्मांडणी अत्यावश्यक
      http://marathikattaa.blogspot.in/2012/05/blog-post_8892.html

      इतिहास संशोधनानेच बदलतो
      http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post.html

      Delete
  11. संजयजी तुमची तळमळ नेहमीच जाणवते..त्यात नवीन भर प्रत्येक वेळी पडतच असते...
    असो मला काही वेगळी गोष्ट सांगायची आहे. लेख बरहा फॉंट मध्ये लिहित असाल तर ’ज्ञ’ साठी j~j असं टाईप केल्यास ’ज्ञ’ लिहिता येतं
    पहा कसं काय ते...शुभेच्छा...

    ReplyDelete
  12. ' .... ...... गतकाळातील द्न्यात-अद्न्यात अन्यायांबद्दल गळे काढणे सोपे असते. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली...ठीक आहे. मग एवढ्या बहुजनीय संतांनी आपापले अभंग लिहिले कसे? का प्रत्येक संताला एक ब्राह्मण लेखनिक भेटला होता? भेटला असेल तर ब्राह्मणांना बहुजनियांचे अभंग लिहिण्यात कमीपणा वातला नाही हे तरी सिद्ध होते किंवा त्यांना लिहिण्या-वाचनावर बंदी नव्हती एवढेच सिद्ध होते. चोखा मेळा, कर्ममेळा, सोयराबाई, बंका हे जर अस्पृश्य होते तर कोण ब्राह्मण त्यांचे अभंग लिहून घ्यायला जाईल? म्हणजे चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती. ... .. '
    ब्राम्हण वर्गाने अस्पृश्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला होता अशी गेली कित्येक वर्षांची असलेली समजूत श्री. सोनवणी यांच्या उपरोक्त विधानांनी मोडीत निघाल्यात जमा आहे. वास्तविक सोनवणी यांनी आपल्या ' महार कोण होते ? ' या ग्रंथात महार समाजाच्या अस्पृश्यतेच्या इतिहासाविषयी जे काही लेखन केले आहे त्याची अजूनही महार आणि नवबौद्ध वर्गाने म्हणावी तशी दखल घेतली नाही असे खेदाने नमूद करावे लागत आहे. जर सोनवणी यांच्या ग्रंथाचे वाचन करून महार अथवा नवबौद्ध वर्गातील विचारवंतांनी महारांच्या अस्पृश्यतेच्या इतिहासाचा शोध घेतला असता तर कित्येक अशा बाबी उघडकीस येऊन भारतीय किंवा महाराष्ट्रीय समजातील जातीभेदांची तीव्रता कमी होण्यास अथवा जातीच मुळात नष्ट होण्यास बऱ्यापैकी मदत झाली असती. परंतु, विभूतीपूजेच्या दोषापासून नवबौद्ध आणि महार समाजातील विचारवंतांना देखील अलिप्त राहाणे अशक्य झाल्यामुळे तसे घडून येण्याची शक्यता तशी अधुंकच आहे. असो, सोनवणी यांनी आपल्या लेखात जे विधान केले आहे कि, 'चोखादि संतांना लिहिता येत होते. त्यांच्यावर असलीच तर वेदबंदी होती...द्न्यानबंदी नव्हती.' या विधानाला संदर्भ साधनांचा देखील भरभक्कम पुरावा आहे. उदाहरणार्थ श्री. अनिल कठारे यांनी आपल्या ' शिवकालीन व पेशवेकालीन महारांचा इतिहास ' या ग्रंथात याविषयी एक उतारा देखील दिला आहे. त्यानुसार अस्पृश्यांना लिहिता - वाचता येत होते हे सिद्ध होते आणि तो उतारा दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या काळातील आहे हे विशेष ! वस्तुतः ब्राम्हण वर्गाने या विषयी अधिक संशोधन करून स्वजातीवर लागलेला अस्पृश्य पालनाचा किंवा एका वर्गाला बहिष्कृत केल्याचा कलंक पुसण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण ते देखील याबाबतीत उदासीन आहे. अर्थात, सध्याची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्या या उदासीन वृत्तीबद्दल त्यांना देखील फारसा दोष देणे योग्य होणार नाही. असो, एका महत्त्वाच्या विषयाला दादांनी आता तोंड फोडले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे एका महान ऐतिहासिक सत्याचे दर्शन त्यांनी मराठी समाजाला घडवले आहे याविषयी त्यांचे आभार मानावे तितकेच कमी आहेत. आता सोनवणी यांचे हे कार्य / संशोधन पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी किंवा आपल्यातीलच कोणीतरी एकाने पुढे येऊन उचलणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. संजय क्षीरसागर - सुंदर प्रतिसाद... टाळ्या...
      फक्त एक बदल सुचवतो आहे. -

      "आता सोनवणी यांचे हे कार्य / संशोधन पुढे नेण्याची जबाबदारी आपण सर्वांनी किंवा आपल्यातीलच कोणीतरी एकाने पुढे येऊन उचलणे गरजेचे आहे."

      एकानेच नाही तर शेकडो विचारवंतांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. :)

      Delete
    2. Kudos to both of you Sagar and Sanjay!!

      Delete
    3. A recent article by Sanjeev Nayyar would be useful to consider in the present context (see "Rethinking Caste-Why We Can't Be So One-Dimensional;" February 2013; esamskriti@suryaconsulting.net)

      Discussing indigenous education in the 18th Century), noted Gandhian Dharampal went through British and Indian archives to reproduce reports of surveys undertaken by the British in Bengal, Punjab and Madras Presidency (1800-1830). According to the collectors’ reports reviewed by Governor Sir Thomas Munro on 10 March 1826, of the 30,211 male school students in Madras Presidency, 20 percent were Brahmins and Chettris, 9 percent were Vaishyas, 50 percent were Shudras, and 6 percent were Muslims. Others constituted 15 percent.

      Madras Presidency then consisted of areas that fall in modern day Tamil Nadu, Andhra, Orissa, Kerala and Karnataka. Another report by J Dent, Secretary, Fort George, dated 12 February 1825, stated that out of 1,88,680 scholars in all collectorates of Madras Presidency, Brahmins were 23 percent, while Shudras constituted 45 percent...

      Delete
  13. बदल मान्य आहे सागर भाई !

    ReplyDelete
  14. माझ्या लाडक्या भावंडांनो, मी या क्षणी मौन आहे. नि:शब्द आहे. तुम्ही या एकाकी स्वराला शब्द देत आहात...एके दिवशी तुम्हीच एक असा विराट स्वर बनाल कि शब्दांनाही आपला अर्थ हुडकावा लागेल. जग विराट आहे. ते आपल्या क्षुद्रत्वापेक्षा महनीय आहे. "या जगाचे आंगण...दिले विधात्याने आंधन" आणि आम्हाला आमच्याच आंगणात बागडता यायला हवे. कोणी आम्हाला कोणत्याही वैचारिक कैदेत टाकु शकत नाही. आमची वैचारिक गुलामीतील मुक्तताच आमचे खरे स्वातंत्र्य आहे.

    हजारो-लाखो स्वर उमटावेत असे कि अन्यायाचे शोषित शब्द मौन होतील. गप्प-गहन कालांधारात...नष्ट होतील.
    फक्त उरतील मानवतेचे सोशिक स्वर.
    मानवतेला शेवटी खुप सहन करावे लागते...नाही का?
    पण आपण सहन करु. कारण ती आजची आपली नियती आहे असे समजुयात.
    सहन करणारेच जिंकतात...
    म्हणुनच आपण सहन करायचे आणि आपल्या स्वरांना मुक्त आभाळ द्यायचे....

    नियतीशी करार नव्हे...
    नियतीशी भांडन नव्हे...
    तर आम्ही आमच्या नियत नियतीशीच एल्गार करत आहोत...
    आम्ही आज नाही तर उद्या जिंकणारच....
    आम्ही नियतीला आमची सखी बनवनारच...
    आम्ही हार मानणा-यांच्या आणि हरुनही "जितं मया" म्हणना-या षंढांपैकी नव्हेत...
    आम्ही आमच्या उत्कट आत्मोद्गारांनी हे जग गुंजवून सोडु.

    माझ्या लाडक्या सुहृदांनो, आत्मनांनो,
    आज आपण अर्धजाग्रुतीत आहोत...
    त्याचा अर्थ असा नव्हे कि संपुर्ण जागृती कधी येणारच नाही.
    डसु पाहणा-या सर्पांना आम्ही कधी ओळखुच शकणार नाही....
    असेही नाही कि आम्ही निरंतर छळुन घ्यायलाच जन्माला आलो आहोत...
    पण एक सांगतो कि आम्ही जेंव्हा जागे होवू
    छळाच्या जखमा अभिमानाने छातीवर मिरवत
    आम्ही क्षमाशीलच असू....

    आम्ही परमेश्वराचे असु अथवा नसु...
    परंतु या यच्चयावत विश्वातील
    प्रत्येक धडधडत्या हृदयाचे असू

    यापेक्षा माझ्या मित्रहो...माझ्या आत्मनांनो...
    अजुन काय आपण प्रार्थना करु शकतो?

    मी तुमचा ऋणी आहे.

    ReplyDelete
  15. संजयजी,

    विचार करायला लावणारा लेख आहे.

    पहीले मी महामूर्ख लोकांबरोबर भांडायचो. पण हा मूर्खपणा मी थांबवला आहे. त्यांनी विचार करायचाच नाही असे ठरवल्याने वेळ फुकट जायचा. मी आता तो वेळ स्वत:चे ज्ञान वाढवण्यासाठी वापरतो.

    प्रसंगी हा किंवा काही लेख हे ब्राह्मण समाजाच्या बाजूचे वाटतात त्यामुळे तुमच्यावरती ब्राह्मणद्वेषी मंडळी किती खार खात आहेत ते देखिल दिसते. पण या लेखात ब्राह्मण समाजाची ओढून ताणून भलामण केलेली दिसत नाही. संयत लेख लिहिल्या बद्दल पुन्हा धन्यवाद! आणि शुभेच्छा!

    वंदे मातरम्‌।

    ReplyDelete
    Replies
    1. Good Thinking Saurabh. As they say- Never Argue with a fool. He will drag you down to his level and then beat you with experience.

      Delete
  16. Sanjayji, Great article. We are really lucky that our society has intelligent, brave and unbiased thinker like you among us. You will help us to bridge the gap and start thinking something positive instead of wasting our time on nonsensical things.

    ReplyDelete
  17. Sanjayji, Please join twitter.

    ReplyDelete
  18. संजय सर , नेहेमीप्रमाणेच तुमचा संयत आणि कळकळीचा लेख....!!
    ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर वादाचे इतके पेव फुटलेय कि कोणीही शेम्ब्ड्याने उठावे आणि गरळ ओकायला चालू करावी.स्वतःच्या धुंग्नाखालचा अंधार या बेट्यांना दिसत नाही.मला तर इतके हे नकोनकोशे झालेय.
    पण सर हे शाश्वत नाही कारण हि भंकस वावटळ आहे , त्यात तुमचा दीप मात्र जळू द्या ,आमचा तुम्हाला सर्वस्वी पाठींबा आहे......!!!

    ReplyDelete
  19. मुळात ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद हा छत्रपती शाहू महाराजांमुळे खऱ्या अर्थाने चालू झाला. सत्यशोधक भास्करराव जाधव आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या विचारवंतांच्या सहकार्याने ब्राह्मणेतर वर्गातील ही जागृती खेडोपाडी जाऊन पोहोचली. प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात या गोष्टींचे विवरण केले आहे.महात्मा फुले यांच्या कार्याची मशाल हाती घेऊन त्यातून महाराष्ट्रात जागृती घडवून आणून योग्य वेळी तीच मशाल आंबेडकर यांच्या हाती देण्याचे अत्यंत महत्वाचे कार्य शाहू महाराजांनी केले आहे. असे असूनही आपण फुले आंबेडकरांचे नाव घेताना शाहू महाराजांचे नाव मात्र खुबीने टाळता यातच सारे काही आले.

    ReplyDelete
    Replies
    1. Very true.............I wanted to response this comumn but I avoided.becaus this is written for specific purpose........that every Maratha and Baudh will understand

      Delete
    2. शाहू कोल्हापूरकर हे काही खऱ्या अर्थाने शिवाजीचे रक्ताचे नातलग वारसदार नव्हते.
      त्यामुळे त्यांना तितके महत्व देण्याची गरज नाही.

      Delete
    3. pratekache nav alech pahije ase nahi ...... sare samaj sudharak maharashtrala dnyat ahet. saryanche nav ghyayla he kahi ekadhya pakshachi sabha nahi....... prabodhan karnara lekh ahe... ani shivsenevar jo tumhi arop kela tr tumhala prabodhankar ni bala saheb he doghehi mahiti nahi ani shivsena hi

      Delete
  20. ब्राह्मनांनी शिक्षणबंदी घातली..........हे एक फार लोकांचे आवडते वाक्य आहे.आम्हाला शिकूच दिले नाही.त्याची आपण यथोचित समीक्षा केलीत त्याबद्दल आपले आभार.लेख एकदम मार्मिक..!

    ReplyDelete
    Replies
    1. या लोकांनी पुढे राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराला, महागाईला, वेळेवर पाउस न पडण्याला ब्राम्हनांना जबाबदार धरले तर आश्चर्य वाटायला नको.

      Delete
    2. उदया तुमच्या घरात पाणी घुसल्यास त्यासाठी तुम्ही बहुजनांना जबाबदार धरले तर आश्चर्य वाटायला नको.

      Delete
  21. बहुतेक सगळे लोक कलहप्रिय असतात. घरात भांडणे, भाऊबंदांशी भांडणे, इतर जातीयांशी भांडणे, इतर धर्मियांशी भांडणे, इतर प्रांतीयांशी भांडणे हे त्यांना आवडते. माणसाला जसे मित्र हवे असतात, तसेच शत्रूही हवे असतात. जाती -धर्माचे समूह तर शत्रू असल्याशिवाय जगूच शकत नाहीत असे वाटते.

    ReplyDelete
  22. अशिक्षित बहुजनJuly 2, 2012 at 10:38 AM

    काही तथाकथित विचारवंतांचे पुढील लेखन अशा स्वरूपाचे असेल:
    खरे म्हणजे फुले, आंबेडकरांचा लढा हा ब्राह्मणांच्या विरोधात नव्हताच मुळी! फुले, आंबेडकर हे आयुष्यभर बहुजनांच्या विरोधातच लढले. बहुजनांनी ब्राह्मणांच्या हक्कांवर जे अतिक्रमण केले होते त्याचा या दोघांनी कायमच निषेध केला. दोघांनाही खरी प्रेरणा ब्राह्मण समाजातील लोकांकडूनच मिळाली. फुले आंबेडकरांच्या कार्यात त्यांना अनेक ब्राह्मणांचे सहाय्य झाले. याबद्दल बहुजन समाजाने संपूर्ण ब्राह्मण समाजाचे कायमचे ऋणी राहिले पाहिजे.
    फुले आंबेडकर यांच्या कार्याचे खरे महत्व ब्राह्मणांनाच कळले. ब्राह्मणांनी निष्पक्ष इतिहास लिहिला म्हणूनच फुले आंबेडकर ही नावे लोकांना माहित झाली. नाहीतर शिक्षणात रस नसलेले बहुजन ब्राह्मणांच्याच दयेवर अवलंबून राहिले असते. म्हणून बहुजन समाजात जी जागृती घडून आली तिचे संपूर्ण श्रेय ब्राह्मण समाजाला जाते. खरे अपराधी ब्राह्मण नसून सत्ताधारी (ओळखा पाहू?) आहेत . म्हणून ब्राह्मणांना शिव्या देण्यापेक्षा सत्ताधारी (अजून नाही ओळखलेत?) समाजाला शिव्या देणे आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करणे हेच बहुजन समाजाचे आद्य कर्तव्य आहे.
    - नमस्ते सदा वत्सले मातृभूमे(पितृभूमी नाही बरं का!).

    ReplyDelete
    Replies
    1. Ambedkarwadi hati chalta rahega....Brahminwadi kutte bhokte rahenge...Jay Bhim..Jay Bahujan..Ek din Brahmnoko hamare deshse bhagna padega apne desh...

      Delete
    2. apan Brigadi gatatun ahat vatata!! comments varun tasach vatatay. Disala ki kapala hi bhasha yogya vatat asel ani tashi kruti karaychi icchaa asel tar tar sanvad houch shakat nahi na.. Agression sodun thoda shanta pane vichar karun bagha.

      Delete
  23. हिंदू धर्म हजारो वर्षात क्वचित कोणाला समजला ..
    आत्मा परमात्मा योगावर आधारित हा धर्म जातीय वादात अडकवला ..
    जगात २ गोष्टी आहेत सकारात्मकता आणि नकारात्मकता ..
    जात धर्म भाषा माळी मराठा ब्राह्मण हे सर्व झूट आहे ..
    सकारात्मक व्यक्ती हा योग्य विचार आणि कृती चा बाग फुलवतो
    आणि नकारात्मक माणूस त्याचा नाश करू पाहतो .. खेडेकर सारखा ..
    पण असे लोक जास्त टिकत नाही .. त्यांना अत्यल्प जन समर्थन मिळते .. आणि मिळाले तरी टिकत नाही ..
    असे व्यक्ती आतून स्वतःचाच नाश करत असता ..

    ReplyDelete
  24. Blog not found ase yetay .

    ReplyDelete
  25. समाजातील आजच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याकरिता हे अस्थानी वाद निर्माण करण्यात येत आहेत जग कुणीकडे जात आहे आणि हे कुणीकडे

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...