Friday, August 9, 2013

संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ...






संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संजय सोनवणी यांचा अर्ज दाखल


पुणे: मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवि व संशोधक संजय सोनवणी यांनी सासवड येथे भरत असलेल्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुणे येथे दाखल केला. उमेदवारी अर्जावर सूचक म्हणुन प्रसिद्ध समिक्षक शंकर सारडा यांनी स्वाक्षरी केली असून अनुमोदक म्हणून प्रसिद्ध विचारवंत व लेखक प्रा. हरी नरके, प्रकाशक अनिल कुलकर्णी, जालिंदर चांदगुडे, अशोक सातपुते आदिंनी स्वाक्ष-या केल्या आहेत.


उमेदवारी जाहीर करण्यामागील आपली भुमिका स्पष्ट करतांना संजय सोनवणी यांनी सांगितले कि, "जागतिकीकरणाची प्रक्रिया गेल्या दोन दशकांत गतिमान झालेली असल्याने सामाजिक व सांस्कृतीक संदर्भही वेगाने बदलत आहेत. एकार्थाने ही सांस्कृतीक पडझडीची अवस्था असून ती थांबवत नवसांस्कृतीक अभिरचना करणे हे मराठीतील आजच्या व भविष्यातील तरुण साहित्यिकांसमोरील आव्हान आहे. त्यासाठी आजच्या सर्वच समाजघटकांतील तरुणांना लिहिते करणे, तदनुषंगिक चिंतनाला नवे आयाम पुरवणे आवश्यक झाले आहे. आजही फार मोठ समाजघटक साहित्यिक प्रेरणांपासून दूर आहे व त्या घटकांचे चित्रण करण्यापासून सध्याचे प्रथितयश साहित्यिक दूर राहण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे मराठी साहित्य-संस्कृतीने आजवर जेवढी समाज-व्यापकता व गतीशीलता दाखवायला हवी होती ती दिसत नाही. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्य-सौहार्दमय वातावरण निर्माण करण्याचे मी प्रयत्न करत आहे व यानिमित्ताने त्या प्रयत्नांना गती देता येईल व सर्वसमावेशकताही वाढवता येईल याचा मला विश्वास आहे.
https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/?ui=2&ik=5b59f8c075&view=att&th=140637008a0fb63e&attid=0.7&disp=inline&realattid=1442900275955236864-7&safe=1&zw&sadnir=1&saduie=AG9B_P-ipY594kCDzIlGRrDPigZq&sadet=1376062546683&sads=5LsGOcahPrdLQcwOCEMfhiCpHrs
"मी सोशल मिडियात गेली अनेक वर्ष सक्रीय आहे. त्यामुळे आजच्या तरुणंच्या, वाचकांच्या साहित्य-संस्कृतीबाबतच्या प्रखर पण विखुरलेल्या भावनांशी, आशा-आकांक्षा व स्वप्नांशी माझा निकटचा परिचय आहे. आज साहित्यव्यवहारात कसलेही स्थान नसलेला पण साहित्य संस्कृतीचा मुलभूत पाया असलेला युवावर्ग साहित्य संमेलनेही बव्हंशी साहित्यबाह्य चर्चांनीच गाजत असल्याने त्यापासून दूर राहण्याचाच अधिक प्रयत्न करतो. त्याच्या साहित्य जाणीवा वाढवाव्यात व त्याला अभिव्यक्त होऊ द्यावे यासाठी प्रयत्न होत नाहीत. प्रकाशक म्हणुन मी असंख्य नवीन लेखकांना संध्या दिल्या, पण त्या पुरेशा नाहीत. त्यासाठी एक नवीन व्यवस्थेला जन्म द्यावा लागेल.  शिक्षण हक्कामुळे शिक्षितांची संख्या वाढत आहे, पण त्यांच्यात साहित्याबाबत आस्था निर्माण  व्हावी यासाठी विपूल प्रमाणात दर्जेदार बाल-किशोर सहित्याची आवश्यकता आहे. त्यासाठी लेखकांची एक फौजच निर्माण व्हायला हवी...बाल-किशोर, रहस्य-थरारादि साहित्य लिहिणा-या साहित्यिकांना त्यासाठी प्रतिष्ठा मिळायला हवी तरच वाचनाकडे लोक अधिक वळतील.

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी साहित्यविश्वाला व एकुणतीलच मराठी भाषकांत नवी चेतना निर्माण करणारी बाब ठरेल. मराठीची पुरातनता, तिचे शब्दवैभव, तिचे लालित्य आणि ज्ञानभाषा असण्याची अलौकिक क्षमता लक्षात घेता अभिजाततेचा दर्जा मिळवण्यासाठी व्यापक जनमतही आवश्यक असल्याने या निवडणुकीत हा एक कळीचा मुद्दा बनवला जाणार आहे.

"अ. भा. मराठी साहित्य संमेलन हे एकुणातच साहित्य-संस्कृतीच्या मुलगामी चिंतनाचे, दिशादर्शक आणि जाणीवा प्रगल्भ करणारे आशयघन उद्गार बनावे यासाठी मी या निवडणुकीत उभा आहे."
संजय सोनवणी यांचे आजवर ८० ग्रंथ प्रकाशित झाले असून सामजिक, ऐतिहासिक, थरार, तत्वज्ञान, वैज्ञानिक व समाजशास्त्रीय संशोधने, कविता, किशोरसाहित्य पटकथा व नाटके या विविध साहित्यप्रकारांचा त्यात समावेश आहे. ...आणि पानिपत, सव्यसाची, शून्य महाभारत, कल्की, यशोवर्मन, काळोख, नीतिशास्त्र, अवकाश ताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती, क्लिओपात्रा अशी त्यांची अनेक पुस्तके गाजलेली असून त्यांच्या सर्वच पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रवासी, संतप्त सूर्य व पर्जन्यसूक्त हे त्यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह असून पर्जन्यसूक्त हा कवितासंग्रह इंग्रजीत मान्सून सोनाटा या नांवाने प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांनी आजवर सामाजिक, शिक्षण व अर्थशास्त्रावरही शेकडो लेख लिहिले असून ते महत्वाच्या नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. www.sanjaysonawani.blogspot.com हा त्यांचा मराठीत सर्वाधिक लोकप्रिय असलेला ब्लोग आहे.

14 comments:

  1. All the best sir !
    Marathila parat ekda changale diwas yetil hi apeksha ..

    ReplyDelete
  2. प्रिय संजयजी,
    हार्दिक शुभकामनाएँ,
    एक ऐसे दौर में जब प्रत्येक पालक का सपना सचिन तेंदुलकर या मिडिया में छाये रहने वाले बच्चे हो, पैसा जहाँ एकमेव दीपस्तम्भ की तरह सभी नावों को रास्ता दिखा रहा हो, बाप का खेत बेचकर किसी शिक्षण महर्षि की शिक्षा संस्था में नौकरी पा लेना जहाँ युगधर्म हो और जहाँ केवल पिछड़े घरों के बच्चें सेना में जाकर देश की रक्षा के लिए मरने को खड़े हो, उस दौर में साहित्य के नायक कहाँ से खोजे जायेंगे?
    जहाँ योजना आयोग से लेकर देश के गली मुहल्लो तक पहुंच चुके थाने, सरकारी दफ्तर और न्यायालय केवल पैसे की भाषा ही समझते और समझाते हो, जहाँ प्रत्येक रिश्ता पैसों के तराजू पर तोला जाना तय हो, वहां कौनसी कल्पना नए युग के कालिदास को प्रेरणा देगी? वहाँ कुर्बानी देनेवाले नायक कहाँ खोजे जायेंगे?
    अन्न सुरक्षा कानून के इस दौर में गीत भूख पर लिखे जायेंगे या दलालों की दलाली पर. दोपहर का भोजन विद्यालय में खाकर जवान होने वाला बालक, अपने बचपन के सीधेसादे गुरूजी को याद करेगा या उस भोजन में मिलावट करनेवाले दलालों को.
    लोकतंत्र के इस विराट भ्रष्ट तंत्र में कविता, महाकाव्य या नाटक के विदूषक और नायकों का भेद कौनसी कलम के जादू से तय होगा? और कौन सा कवि चारण-गीत गाने से मिलनेवाले पुरस्कार के मोह से बच पायेगा?
    जहाँ पूजा के लिए बचाए गए फूल भी वारांगनाओं को मिलने जानेवाले अय्याशों के हाथों के गजरे बन जाते हो, वहाँ देवता उपेक्षित और मंदिर खंडहर में बदल जाते है. वहाँ बिकना ही अस्तित्व के लिए जरुरी हो जाता है और ईमानदार मुर्ख समझे जाते है.
    जब प्रत्येक का बच्चा दुर्योधन और दुशासन बनकर सभ्यता की द्रोपदी का चीर हरन करने पर उतारू हो और दूसरे की मेहनत जुए की चौरस पर लूटने की कोशिश में हो वहाँ केवल संजय जैसे वाचक और धृतराष्ट्र जैसे श्रोता ही जन्म ले सकते है जो अपने अपने पुत्रों की जीत की खबर सुनना चाहते है, सत्य की नहीं.
    यह दौर तबाही का है, शिव के तांडव नृत्य का है, रूद्र के प्रलयंकारी तूफानों का है. अभी दौर रचना का नहीं है. फिर भी आप जैसे रचनाकार रचनाधर्म के लिए लड़ने को निकल रहे है, यह बेहद अभिनंदनीय बात है. मेरी हार्दिक शुभकामनाये आपके साथ है.

    एड दिनेश शर्मा
    मोबाईल ९३२६८४१९२४

    ReplyDelete
  3. पुण्याच्या स्वार गेट एस टी स्थानका वरील सासवड ला जाणारी बस

    - प्रचंड गर्दी - मुंगीला शिरायला जागा नाही -लोकांच्या हातात फुलांचे हार , कुणाच्या हातात फलक , तर कुणाच्या हातात संजय सरांची पुस्तके

    कुणाच्या हातात झेंडे , कुणी ललकाऱ्या देत आहेत - संजय सर अमर रहे -

    दिवे घाटात ,दाक्षिणात्य नटा ची चेन्नई बंगलोर ला कट आउट लावतात तसे

    संजय सरांचे मोठमोठे कट आउट लावले आहेत

    आणि सगळे त्याकडे कौतुकाने बघत आहेत - बाजूला शिवाजी- अहिल्याबाई आणि शंकराची पिंडी आणि वाघ्या कुत्र्याची पोस्टर आहेत -एका बाजूला शाहू आंबेडकर आणि म . फुले आशीर्वाद देत आहेत अशी चित्रे दिसत आहेत - एका अति उत्साही माणसाने भवानी देवीच्या पायदळी दादोजी कोंडदेव तुडवला जातोय असे पोस्टर लावले आहे !

    एका ठिकाणी वेद हे आलेक्झेन्दार सिकंदरच्या बरोबर इंग्रजांनी (?) भारतात आणले असे लिहिले आहे - तर त्याचा अर्थ समजत नसल्याने लोक गोंधळले आहेत -बरेचजण एका हातात तुळस आणि एका हातात बेल घेऊन उभे आहेत - आज संजय सर कशाचा जयजयकार करतील ते चरणावर वाहुया !

    जागोजागी सोनवणी यांची पुस्तके वाटली जात आहेत - श्री भंडारे श्री सांगलीकर इत्यादी मित्रांनी कंबर कसून प्रचाराचा एकच धडाका लावलेला आज फळाला आलाय !

    सगळीकडे एकच गलका चालू आहे -

    येउन येउन येणार कोण ?- संजय शिवाय आहेच कोण ?

    संजय सरांनी या उभ्या महाराष्ट्राला काय दिले ?

    अहो - काय नाही दिले ते सांगा !- आपल्या सर्वाना शैव धर्म दिला ,(त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम आणि ख्रिस्ती बांधवांची एकच घाई चालली आहे - शैव धर्म स्वीकारण्यासाठी -आणि मूळ महाराष्ट्र धर्म जगवण्यासाठी त्यांची एकमेकात चढा ओढ लागली आहे )

    संजय सरांनी ,या मातीचे खरे राजे धनगर हे रहस्य उलगडून दाखवले ,ब्राह्मणाची पापांची लक्तरे वेशीवर टांगली ,पेशव्यांचे वस्त्र हरण केले - आता आपले सर्व प्रश्न त्यांनी सोडवून महाराष्ट्राला स्वर्ग बनवून सोडले आहे !आता मंत्रालयात कामच नाही कुणाला - सगळे प्रश्न सुटले !प्रश्न मांडणारे पण हेच आणि सोडवणारे पण हेच !चोहीकडे आनंदभुवन निर्माण झाले आहे !

    सासवड गाडीतील एक प्रसंग !

    आप्पा - अहो कंडक्टर साहेब , ही जागा आम्ही धरली आहे

    कंडक्टर - आजोबा , तुम्हाला कुठे जायचं ?

    बाप्पा - अहो हे काय विचारणं झालं का - तुम्हीपण काय राव !

    कंडक्टर - अहो आजोबा -इतके काय हो नाराज होताय आमच्या वर !

    आप्पा - या हो बाप्पा - सरका हो , ही आमची जागा आहे !या बाप्पा आजोबांसाठी धरून ठेवल्ये -या हो बाप्पा -अहो मावशी - इथे नका बसू- ही आमची जागा आहे !

    बाप्पा - अहो आप्पा - हे काय चाललय - केव्हड्यांदा ओरडताय ! ही आमची जागा आहे - ही आमची जागा आहे लोक हसतात बघा - फिदीफिदी तुम्हाला -

    आप्पा - हसतील त्यांचे दात दिसतील - अहो आज सासवडला आपल्या संजयची मोठ्ठी मिरवणूक आहे - मी तर हत्तीवरून साखर वाटणार आहे - आपल लेकरू " लेखकराव "झालय ! आता साहित्य संमेलनाचा म्हणे तो अध्यक्ष होणार !

    बाप्पा - म्हणजे ते ८ ७ वे मराठी साहित्य संमेलन होणार आहे ते का ?

    आप्पा - मग ? आहात कुठे ? श्री फ मु पण येणार आहेत !

    बाप्पा - वा वा ! छानच !आता सगळे प्रश्न सोडवतील आपले संजय भाऊ !

    आप्पा - मी तर यादीच करून ठेवली आहे !

    बाप्पा - म्हणजे आपण मागे बसलो होतो न त्या वेळ ची का ?

    आप्पा - बरोब्बर - अहो संजय साहेबानी किती अनंत प्रश्न मांडले आहेत आज पर्यंत !

    त्यामुळे आपण कोण इथपासून - आज पर्यंत आपण करत होतो ते सगळे चूक - बिनडोकपणा होता असे वाटण्या पर्यंत अनेक विचार डोक्यात थैमान घालत असायचे !- पण आता - सगळ सोपे आणि सुटसुटीत - आपण जणू व्ही आय पी होणार !

    बाप्पा - आता ते सगळे प्रश्नच संपतील ! कारण अध्यक्ष महाराज सगळे प्रश्न पटला वर मांडतील आणि आवाजी मतदानाने सगळे प्रश्न चुटकी सरशी संपतील आणि आपल्या मराठी संस्कृती ला तारणहार सापडून त्या वैष्णवांची कटकट कायमची संपेल ! सरांनी तर म्हणे नवीन प्रबंध लिहिला आहे की वेद हे धनगरांनी सर्व प्रथम मेंढ्या पाळताना ग्रीस मध्ये लिहिले !


    आप्पा - चला चला , कंडक्टर ला म्हणाव पार थेट संमेलनाच्या दारात सोड !

    बाप्पा - का ?

    आप्पा - अहो छत्री जरा उसवली आहे - नेमका पाउस येईल आणि उलटी झाली वाऱ्या ने तर ?

    बाप्पा - आणि ह्या दोन दोन पिशव्या कशाला ?

    आप्पा - संजय सर आणि ह मो मराठे दोघांनी पुस्तके फुकट वाटली तर ?- असुदे आपली !



    ReplyDelete
  4. संजय सरांना हार्दिक शुभेच्छा !


    आपल्यामागे अनंत अनंत लोकांच्या आणि ब्लोग वाचणाऱ्या विद्यार्थी वर्गाच्या आणि हितचिंतकांच्या हार्दिक शुभेच्छा आहेत !


    आप्पा बाप्पा यांनी आपले वेगळ्या प्रकारे समर्थन केले आहे - त्यांच्या चुरचुरीत शैलीत

    ते वाचून छान वाटले - एकीकडे चिमटे काढत कौतुक करायची त्यांची धाटणी औरच आहे

    पण त्यांच्या वयाचा मान राखून असे सांगावेसे वाटते की त्यांनी चेष्टेचा सूर अशा प्रसंगी जर बाजूला ठेवला पाहिजे - आप्पा बाप्पा हे नेहमीच खुसखुशीत लिहितात -

    लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमस्व !.


    आपल्याकडे अभ्यासू कार्यकर्त्यांची उत्तम फळी आहे

    आपण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या खुर्चीत बसलेले बघणे

    हा एक सुंदर योग असेल !

    ReplyDelete
  5. अभिनंदन सर. तुम्हाला शुभेच्छा. परंतु माझे असे स्पष्ट मत झाले आहे कि ह्या साहित्य संमेलनाचा काहीही उपयोग होत नाही. इंग्रजी मध्ये हे असे नसले तरी उत्तम अभ्यासपूर्ण पुस्तके येतात आणि टी गाजतात. पण आपल्याकडे काहीच होत नाही. आता जसे गणेशोत्सव आणि नवरात्र ह्यांचा मनस्ताप व्हायला लागला आहे तसेच ह्या साहित्य संमेलनाचा होतो आहे. असो तरीही शुभेच्छा आपल्याला. आपण निदान ही गार्हाणी बाकीच्यांना सांगाल नाहीतरी बाकीचे लेखक तसे कोशातच आहेत

    ReplyDelete
  6. अहो ,

    संजय महाराज की जय हो ! - -

    तुमचे भक्त आता तुटून पडतील - आम्ही थोडेसे गडबडीत व्याकरणाचा आग्रह धरला तर इतके कसे आपण दुर्लक्ष करता ?


    आता अजून एक स्त्री मैदानात येत आहे अध्यक्ष पदाच्या !


    तुम्हीतर डांगोरे पिटत असता की या ब्लोग वर विरोधी भूमिका देखील छापली जाते

    मग हे काय आहे ?

    आधीची मेल हवेत विरली वाटते ?

    कोणत्या मापाचे हे सेन्सोर्शीप आहे ?


    अस काय लिहिले होते त्यात ?अडचणीचे का असभ्य ?

    हेच खाली लिहिले आहे तेच ना ?



    छापणार का आता ?

    प्र. रा ग जाधव यांनी आणि इतर अनंत लेखक विद्वानांनी यापूर्वी व्याकरण आणि भाषाशुद्धी याबद्दल आग्रही भूमिका मांडली आहे

    ते तर अनेक वर्षे साहित्य संमेलनाशी संबंधित आहेत - पण त्यांचे तुम्हाला काय ?आपण थेट व्याकरण आणि साहित्य शुचीतेवर घाला घालताय !अगदी साधे आनि पानी चे आणि पाणी करण्याबद्दल सांगितले - आग्रह धरला तर - तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबतात !

    तुम्ही म्हणाल ती मराठी शुद्ध , पुणेरी मराठी असे नामकरण करून त्याला हिणवणे योग्य आहे का ?


    छापा आता - बघू काय करता ते !

    " हा जो कोण ब्लोग लिहिणाररा संजय नावाचा माणूस आहे त्याला अजून मराठी शुद्ध लिहिता येत नाही आणि त्याचे विचार तर दूरच , पण त्याचे लिखाण अशुद्ध आहे त्याला साहित्य संमेलनाच्या

    मंडपात कुठे बसवायचे ?



    सतरंज्या गोळा करा -

    आधी न आणि ण चा फरक लेखणीतून आणि जिभेतुन सिद्ध करा आणि मग अध्यक्ष पदाचे बोला !एकलव्य माहित आहे ना ? तशी सेवा करा मराठी भाषेची -

    आता येतीलच तुमचे समर्थक मित्र - अनोनिमस च्या नावाखाली - काहीही झोडपायला !

    ReplyDelete
    Replies
    1. aadhi svatache vyakaran tapasa mag bola...dusare...I don't care grammar as long it doesn't change meaning...forget so called grammarians...

      Delete
  7. बरे झाले व्याकरणाबद्दल बोललात

    ज्या संस्थेच्या निवडणुकीसाठी इतके अस्वस्थ झाला आहात त्याच साहित्य संस्थेने व्याकरणाबाबत भरीव कार्य केले आहे !

    त्याचे भान आपल्याला आहे का ?

    संध्यासमयीच्या गुज गोष्टी या पुस्तकात श्री रा ग जाधव काय लिहितात ?


    महाराष्ट्र राज्य शासनाने एक गोष्ट फार चांगली केली ती म्हणजे साहित्य संस्था साहित्यिक इत्यादींनी निश्चित केलेली मराठी शुद्धलेखनाची नियमावली झटकन संमत करून तिला अधिमान्यता दिली . भाषा संचालनालयाची स्थापना. या संस्थेतर्फे शासकीय पदनाम कोश , शासकीय भाषा व्यवहार यांची पद्धतशीर निर्मिती केली

    लोकराज्य ऑक्टोबर २ ० १ १ चा हा लेख आहे !

    भाषा मरतात आणि त्या मृत भाषांचा समाज नष्ट होतो ! त्यातील संचित टिकून राहाते .

    आपण व्याकरणावर विश्वासच ठेवत नसाल तर कठीणच आहे -

    जगातील प्रत्येक समृद्ध भाषेला व्याकरण आहे .

    त्यापेक्षा हेच व्यासपीठ वापरून आपण यच्चयावत व्याकरण पुरस्कर्त्यांचा निषेध करा की !

    तुमचे भंकस सिद्धांत गल्ली बोलात ठीक आहेत - ते गावठी टाळ्या मिळवून देतील पण चार सामिक्षकांपुढे तुमचेच हसे होईल !

    तेंव्हा या निमित्ताने जरा बोलते व्हा आणि करा सुरवात तुमच्या आतिषबाजीला -

    सच्चा भाषेला व्याकरणाच्या मर्यादा नसतात - इत्यादी इत्यादी !

    ReplyDelete
  8. आप्पा- बाळ स्वप्नाली - उगी उगी !

    बाप्पा - बाळ स्वप्नाली - इतकं काही गंभीर होण्याची गरज नाही

    आप्पा - आमच्या संजय रावांची हीच तर मजा आहे !

    बाप्पा - कुणी निंदा किंवा वंदा ते आपला मार्ग सोडत नाहीत

    आप्पा - बाल स्वप्नाली - अग हे असेच चालणार - जो माणूस आपल्या पुस्तकांच्या विक्रीतून किती पैसे आपल्याला मिळाले ते सांगण्यात धन्य मानतो त्याच्या लेखनाचा दर्जा बद्दल काय बोलावे ?

    बाप्पा - ह्या संजय साहेबांचे लेखनाचे विषय तर अतिशय बाष्कळ असतात !त्यांचा एक कंपू आहे आणि म्होरके आहेत ते नरके !साथीला सांगलीकर , चैतन्य असे फुटकळ शिष्यगण !

    आप्पा - आचार्य अत्रे आठवा , पु ल आठवा - खांडेकर शिरवाडकर आठवा - म फुले आंबेडकर आठवा , सावरकर टिळक आगरकर आठवा-इतिहास संशोधनात सांकलिया गम बा सरदार आठवा - राजवाडे सरदेसाई आणि सेतुमाधव पगडी आठवा -

    बाप्पा - अहो एकाची तरी सर आहे का यांच्या लिखाणाला ?

    आप्पा - इतके आचरत आणि बावळट लिखाण आम्ही आज पर्यंत पाहिले नाही -

    बाप्पा - आणि उद्दामपणा तर बोलूच नका ! दुसऱ्या अभ्यासकांचे सिद्धांत खोडून काढताना विनम्रपणा तर अजिबात नाही - त्यामुळे होते काय - त्यात अभ्यासू वृत्ती चा पूर्ण अभाव दिसतो आणि गोबेल्स तंत्र जास्त दिसते !हि काही अभिमानाची गोष्ट नाही -

    आप्पा - आणि म्हणे हे अध्यक्षपदासाठी उभे राहणार - डोम्बल आपल !

    बाप्पा - अहो यांचा साहित्य या प्रकाराशी कधी दुरान्वयानेही संबंध आल्या सारखे वाटत नाही !यांचे लिखाण म्हणजे शुद्ध पत्रिका रुपातले प्रचारकी लेखन !

    आप्पा - जाऊ द्या हो - यात पण आरक्षण मान्य करून टाका आणि बसावा त्या बिचाऱ्याला त्या औट घटकेच्या सिंहासनावर - !

    बाप्पा - बाळ स्वप्नाली - उगी उगी - हि सरड्याची धाव आहे - आलं का लक्षात !

    बेडकी कितीही फुगली तरी किती फुगून फुगून फुगणार ?

    आप्पा - आगदी लाखात एक बोललात !अहो ही त्यांची दुसऱ्याच निवडणुकीची रंगीत तालीम चालली आहे - २ ० १ ४ - आल का लक्षात ?

    ReplyDelete
  9. तिकडे काका पुतणे खो खो हसत बसले आहेत

    इकडे संभाजी ब्रिगेड खुदकन हसताहेत

    सातारकर तर काय परस्पर पावणे तेरा असं काहीतरी कुजबुजत आहेत -

    सगळ्यांना एकाच प्रश्न !

    आज पर्यंत कोणत्याही लेखकाने स्वतःच्या लेखनाचा इतका डांगोरा पिटला नसेल -

    बिच्चारे संजय राव ! इतके कसे हो तुम्ही हे !

    उगी उगी असं म्हणत आहेत त्या स्वप्नालीला ते खर तर तुम्हाला म्हटलं पाहिजे

    तुमच वाचन कमी - चिंतन फारच कमी - ममान तर अजिबातच नाही -

    नुसती पानेचा पाने छापत सुटलात म्हणजे काय लेखक झाला की काय तुम्ही ?

    जाऊ द्या हो राव - नका आपले हसे करून घेऊ सर्वांसमोर

    ReplyDelete
  10. संजय सर , साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी तुम्ही उमेदवारी दाखल केली त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तसेही आता चतुरस्त्र लेखन करणारे लेखक महराष्ट्रात उरलेच कुठे आहेत ? तुम्ही निवडून आलात तर तो खरोखर त्या पदाचा बहुमान असेन एवढे प्रामाणिकपणे वाटते. इतिहास असो... थरार कादंबर्‍या असो.... तत्त्वज्ञान असो... विज्ञान असो... नाटक असो... सामाजिक असो... फॅन्टसी असो... वा अत्भुतरम्य कादंबरी असो. सर्व प्रकारचे विषय तुम्ही एका वेगळ्या प्रकाराने हाताळता आणि त्यातील वेगळे पैलू कायमच वाचकाला दाखवून देता. तुमच्या उमेदवारीवर प्रश्न निर्माण करनार्‍यांबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की हे वाचकांचे दुर्दैव समजायचे का तुमच्यावर टीका करणार्‍यांचे? हे माहित नाही.पण असा चतुरस्त्र लेखन करणारा लेखक साहित्य संमेलनाला अध्यक्ष म्हणून लाभू शकत नसेल तर मराठी साहित्याचे सुगीचे दिवस दिसणे अवघडच आहे.
    तुमच्या विरोधकांनी तुमचे साहित्य अजिबातच वाचलेले नाहिये हे नक्की म्हणू शकतो. नाहीतर तुमची क्लिओपात्रा, विश्वनाथ, यशोवर्मन, आणि पानिपत, असूरवेद , सव्यसाची, अवेकनिंग, नीतीशास्त्र , अवकाश ताणसिद्धांत ही मोजक्या पुस्तकांची यादीच तुमचे साहित्य क्षेत्रातील योगदान अशा लोकांना सांगण्यासाठी पुरेशी आहे. आजही पुणे मराठी ग्रंथालय आणि नगर वाचन मंदीर यांसारख्या नावाजलेल्या ग्रंथालयांमधून सर्वाधिक मागणी असणार्‍या लेखकांपैकी तुम्ही एक आहात. आणि यापेक्षा दुसरे ते लेखकाला काय हवे असते? ही गोष्ट तुमच्यावर बिनकामाची टीका करणार्‍यांना समजत तर नाहीच पण त्यांच्या विचारशक्तीची कीव करावीशी वाटते. असो... तुम्ही तुमच्या संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर लक्ष पूर्ण केंद्रीत करा ही आग्रहाची विनंती.

    ReplyDelete
  11. अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद

    -महावीर सांगलीकर

    कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अनेक गोष्टींचा समावेश होतो. समाजातील प्रत्येक घटकाची एक संस्कृती असते आणि त्या सगळ्यांची मिळून एक कॉमन संस्कृतीही असते. बहुतेकदा समाजातील अभिजन वर्गाची संस्कृती ही त्या देशाची, त्या राज्याची संस्कृती असे मानले जाते. त्यामुळे अभिजन वर्गाची भाषा, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे गोष्टींना जास्त महत्व असते. ह्या वर्गाची संस्कृती ही दर्जेदार मानली जाते. त्यांच्या संस्कृतीपुढे इतरांची संस्कृती ही दुय्यम ठरते. संस्कृतीमध्ये भाषेला फार महत्व असते, आणि अभिजनांची भाषा ही प्रमाणभाषा मानली जाते. या प्रमाण भाषेचे नियमन अभिजन वर्गच करतो. भाषेच्या सहाय्याने हा वर्ग संपूर्ण समाजावरसांस्कृतिक वर्चस्व गाजवतो.

    आता हा अभिजन वर्ग म्हणजे नेमका कोण? अनेक बहुजनवाद्यांचा असा समज आहे की अभिजन वर्ग म्हणजे ब्राम्हण लोक. पण अभिजन वर्गाशी जातीचा अथवा धर्माचा कांही संबंध नसतो. या वर्गात वेगवेगळ्या जातींचे व धर्माचे दर्जेदार कलाकार, संगीतकार, गायक, अभिनेते, अभिनेत्र्या, चित्रकार, लेखक, विचारवंत, बुद्धीजीवी वगैरेंचा समावेश होतो. ते सगळे आर्थिक दृष्ट्या उच्च वर्गातीलच असतात असे नव्हे, तर ते मध्यमवर्गीय आणि अगदी कनिष्ट मध्यमवर्गीय देखील असतात. तेथे गुलाम अली आणि जगजीत सिंह यांनासारखाच सन्मान मिळतो. तेथे बिस्मिल्ला खान आणि ए. आर. रेहमान यांचेही कौतुक होते. या क्षेत्रात कसलेही आरक्षण नसते, राखीव जागा नसतात. प्रत्येकजन आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जात असतो. हे लोक स्पर्धेला घाबरत नाहीत.

    महाराष्ट्रात अभिजन वर्गात ब्राह्मणांचे प्रमाण थोडे जास्त दिसत असले तरी तिथे इतर समाजातील लोकही भरपूर आहेत. पण बहुजनवादी लोक अभिजन वर्गाला ब्राम्हणवादी मानतात, आणि सगळ्याच अभिजात गोष्टीपासून फटकून वागतात. त्यांचे हे वागणे त्यांनाच नुकसानकारक ठरले आहे.

    अभिजन वर्गात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरभाषिक लग्नांचे प्रमाण मोठे असते, याउलट बहुजनवादात जातीअंताच्या लढाईची भाषा करत जाती कशा संघटीत आणि मजबूत होतील हेच पाहिले जाते.

    अभिजन वर्गाला जातीशी कांही देणे-घेणे नसते. पण बहुजन समाजातील लोक त्यांच्या जातीची एखादी व्यक्ती अभिजन वर्गात प्रसिद्ध असेल तर ते मोठ्या अभिमानाने त्या व्यक्तीचे कौतुक करत बसतात, पण या लोकांना त्या व्यक्तीच्या कलेशी, निर्मितीशी कसलेही देणे-घेणे नसते, कारण त्यांना त्यातले कांही कळत नसते.CONT..............

    ReplyDelete
  12. बहुजनवादी लोक अभिजनांच्या संस्कृतीला ब्राम्हणी संस्कृती ठरवून तिला नावे ठेवत आपल्या संस्कृतीचे कौतुक करत बसतात, या तथाकथित ब्राम्हणी संस्कृतीला संपवण्याच्या बाता करतात, पण संस्कृतीमध्ये भर पडेल अशी कोणतीही निर्मिती करत नाहीत. साधे साहित्याचे उदाहरण घ्या. मराठी साहित्यात शेकडो विषयांवर हजारो दर्जेदार पुस्तके लिहिली जातात. ही पुस्तके मुख्यत्वे अभिजात वर्गातील लेखकांकडून लिहिली जातात. या पुस्तकांत अर्थशास्त्रापासून प्रवासवर्णनापर्यंत, खगोलशास्त्रापासून डार्विनच्या सिद्धांतापर्यंत, साहित्यशास्त्रापासून समीक्षेपर्यंत, गांधीपासून हिटलर पर्यंत अनेक विषयांची पुस्तके असतात. दुसरीकडे बहुजनवादी लोकांकडून कोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती होते हे आपण पहातोच. ते केवळ आपल्या जातीचा इतिहास, आपल्या जातीच्या एखाद्या व्यक्तीचे चरित्र आणि फारतर फुले-शाहू-आंबेडकर या विषयांभोवतीच फिरत असतात. हे लिखाणही फारसा अभ्यास न करता, पुस्तक कसे असू नये याचे मापदंड स्थापन करत लिहिलेले असतात.

    खरे म्हणजे बहुजनवाद्यांकडून अभिजात गोष्टींच्या निर्मितीची अपेक्षा धरणे हेच मुळात चुकीचे आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे काय असते हेच मुळात कळत नाही, मग ते संगीत असो, साहित्य असो कि कला असो. मी अनेक असे बहुजनवादी लोक बघितले आहेत की ज्यांना चांगल्या दर्जाचे साधे विनोदही कळत नाहीत. त्यांना आवडणारे आणि कळणारे विनोद प्रामुख्याने लैंगिक अवयवांशी संबधित असावे लागतात.

    अभिजन वर्गाला समाजातील उपेक्षितांबद्दल कणव असते आणि आपल्या परीने ते उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शक्य ती मदत करतात. याउलट बहुजनवादी लोक बहुजन समाजात अभिजन वर्गाविषयी द्वेष पसरवण्याचे काम करत असतात.

    एक छोटेसे उदाहरण देवून मी हा लेख पूर्ण करतो. ज्यांना गांधीजी आवडत नाहीत असेबहुजनवादी लोक त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जावून, एकेरी उल्लेख करत त्यांची बदनामी करत असतात. याउलट अभिजन वर्गातील ज्या लोकांना गांधी तत्वज्ञान रुचत नाही, ते देखील गांधीजींचा आदरार्थीच उल्लेख करतात. ज्याच्याशी मतभेद असतात त्याला शत्रू मानणे हे अभिजातांच्या संस्कृतीत बसत नाही. याउलट आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणारे बहुजनवादी लोक थोडेसे कुणाशी मतभेद झाले की त्यांना आपले शत्रू घोषित करतात.

    हाच फरक आहे अभिजात संस्कृतीत आणि बहुजनवादात.
    END.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...