Thursday, June 13, 2013

अहिल्यादेवींचे अपराधी...!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांने देशभरात अचाट वास्तुनिर्मिती, मंदिरांचे जिर्णोद्धार ते घाट, धर्मशाळा, असंख्य बारवा-तलाव-रस्ते यांची निर्मिती केली. तत्कालीन मुस्लिम सत्ताही त्यांच्या एकाही कार्याला अडवू शकल्या नाहीत एवढे नैतीक सामर्थ्य असणारी ही महिला. काशीला विश्वेश्वराच्या मंदिराच्या जगी उभ्या केल्या गेलेल्या मशिदीला जवळपास खेटुनच त्यांनी नवे मंदिर उभारले. सोमनाथाचे ही त्यांनी जिर्णोद्धारण केले व अहिल्येश्वर शिवाची प्रतिष्ठापना केली. त्यांनी जेवढी विकासकामे केली ती स्वत:च्या राज्यात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर.

अहिल्यादेवींचे मूळ गांव चौंडी (जि. अहमदनगर). ३१ मे १७२५ रोजी त्यांचा येथे जन्म झाला. याच गांवात त्यांनी पुढे चिरेबंदी व शिल्पकलेचा अप्रतीम नमुना असणारे व आजही अखंड उभे असलेले मंदिर शिवमंदिर बांधले. याच मंदिराच्या शेजारी त्यांनी एक वेगळ्या स्थापत्याची मशीदही बांधली. पण गांवात मुळातच मुस्लिमांची संख्या कमी असल्याने (आताही दोनेकच कुटुंबे आहेत) दुर्लक्षामुळे ती भग्न होत गेली. अहिल्यादेवींचा वाडाही उध्वस्त होत तेथे झाडा-झुडपांचे रान माजले. थोडक्यात राष्ट्रमातेचे जन्मस्थान हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर यांनी तेथे १९९७ पासून जयंती उत्सव साजरा करायला सुरुवात करेपर्यंत सर्वांसाठीच दुर्लक्षीत असेच राहिले. सुरुवातीला काहीशे लोक येत...आता लाखोंत येतात हे श्री. महादेव जानकरांच्या अविरत सातत्यपूर्ण चिकाटीचे फळ आहे. एवढेच नव्हे तर अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारनाचेही चंडी हे केंद्रबिंदू बनत आहे.

गेल्या तीन वर्षांपुर्वी राज्य सरकारने अहिल्यादेवी स्मारक समिती नेमून अहिल्यादेवींच्या वाड्याचा जिर्णोधार आणि परिसराचे स्मारकमय सुशोभीकरण करण्याचा उद्योग सुरू केला.

मी यंदा ३१ मे रोजी चौंडी येथे गेलो होतो. या स्मारकाचे मी अत्यंत उत्सुकतेने अत्यंत नैराश्याने निरिक्षण केले. काही सेकंदांसाठी या स्मारक समितीचे अध्यक्ष श्री. अण्णा डांगेही तेथेच भेटले.

माझे निरिक्षण:

१. स्मारक कसे नसावे याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. ते नसते केले तरी चालले असते. या स्मारकाचा वास्तुशास्त्रकार कोण हे समजले नाही पण बहुदा अत्यंत अडानी वास्तुशास्त्रज्ञाकडुन याचे आरेखन केले गेले असावे. या स्मारकात कसलाही भौमितीक आकृतीबंध तर नाहीच पण बाह्य रचना (जी अ-कलात्मक आहे) ती आधी पुर्ण करण्याच्या नादात मुख्य बाबींकडे पुर्ण दुर्लक्ष केले गेले आहे.

२. अहिल्यादेवींचा वाडा खरे तर आधी जिर्णोद्धारीत केला जायला हवा होता. प्रत्यक्षात ते काम अर्धवट पद्धतीने केले गेले असून सिमेंट-कोंक्रीटचा उपयोग बेढब पद्धतीने केला गेला आहे.








खरे तर घडीव दगडांतून ही पुनरुभारणी व्हायला हवी होती. ते केले गेले नाही व उर्वरीत कामात ते होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे वास्तुसौंदर्य पुरते डागाळले गेलेले आहे.

३. वस्तुच्या सभोवतालाची किल्ल्याचा आभस देणारी भिंत व प्रवेशद्वारावरील मेघडंबरी अत्यंत हीनकस पद्धतीने बांधण्यात आली आहे. एखाद्या लो बजेटच्या नाटकातील नेपथ्याची रचनाही यापेक्षा आकर्षक असते याचे भान वास्तुकाराने व समितीने ठेवलेले दिसत नाही.



४. प्रवेशद्वाराच्या आत आपण गेलो कि शिवालयाला लागुन असलेली उध्वस्त व झाडा-झुडुपांनी ग्रसित मशीद तशीच ठेवण्यात आली आहे. स्थानिक लोकांनी सांगितले कि ही मशीद अहिल्यादेवींनीच बांधली होती. पण स्मारक समितीला ते हटवायची होती. गेली शंभरेक वर्ष ही मशिद अशीच पडीक आहे...



गांवात दोनेक मुस्लिम कुटुंबे आहेत. ते नमाज कधीही पढत नाहीत एवढे ते समाजात मिसळलेले आहेत. पण ती मशीद हटवायला त्यांनी व आसपासच्या मुस्लिमबहूल भागांतून आलेल्या मुस्लिमांनी विरोध केल्याने ती हटवता आलेली नाही, त्या मशीदीचाही जिर्णोद्धार करावा अशी स्मारक समितीची इच्छा नाही.

येथे माझे मत असे आहे कि या उध्वस्त मशीदीमुळे एकुण स्मारकाची विकलांग परिस्थिती निर्मण झाली आहे. मशीदीचा जिर्णोद्धार केल्याने व तिचे मूळ वास्तुशास्त्र (जे वेगळे आहे) जपल्याने अहिल्यादेवींच्या स्मृतींचा आदर होणार आहे कि अनादर? उलट त्यामुळे अहिल्यादेवींचे स्मारक परिपुर्ण होणार नाही काय?

५. मी आधीच म्हटल्याप्रमाने वास्तुशास्त्रात जो एक  भौमितीक आकृतीबंध असतो त्याचे भान येथे पुर्ण लोपलेले आहे.


स्मारकाच्या दुस-या परिघात अहिल्यादेवींचे जीवनकार्य सांगनारी म्युरल्स मजकुरासहित लावलेली आहेत. हा मला आधी प्रदक्षीणामार्ग वाटला होता. पण प्रत्यक्षात अर्धा वळसा घालून परत फिरावे लागते.



६. या मार्गावरील किल्ल्याचा आभास देणा-या दगडी भिंती आताच निखळण्याच्या वाटेवर आहेत. त्यांत मोठ्या भेगा पडलेल्या तर आहेतच पण झाडे-झुडुपेही डोकावू लागली आहेत. दोन-तीन वर्षांत ही अवस्था असेल तर पाच-दहा वर्षांत काय अवस्था होईल?



७. याच मार्गावर अहिल्यादेवींचे जीवनकार्य सांगणारी म्युरल्स आहेत. त्यासोबत प्रत्येक प्रसंगाचे वर्णनही आहे. त्या वर्णनांची ऐतिहासिक सत्यता विवादास्पद आहे. त्यावर समितीने अधिक विचार करायला हवा होता. ही म्युरल्स करायची म्हणुन केली गेली आहेत हे स्पष्ट आहे.

८. पहिल्या प्रांगनात अहिल्यादेवींचा स्मृतीस्तंभ उभा आहे. तो पुरेसा भव्यही आहे. पण या स्तंभावर आरोग्य खात्याच्या काही जाहिराती लिहिलेल्या आहेत.


 ही विटंबना स्मारक समिती कशी सहन करु शकते? किमान जयंतीदिनासाठी म्हणुन का होईना त्या मिटवता आल्या नसत्या काय?

९. मला खटकलेली बाब म्हणजे अहिल्यादेवी स्मारकासमोरील सभागृहात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त चाललेला सप्ताह. भजन-किर्तनांचा जोष. धनगर समाजातील किर्तनकार व भजनकारांचा जल्लोश. यात खेड (राजगुरुनगर) येथील एक प्राध्यापकही होते. (असे अनेक सुशिक्षीत वारकरी यात असतील.)

 प्राध्यापक महोदयांशी मी संवाद साधला...त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन महाकाव्यात गुंफले असून ते लवकरच प्रसिद्धही होत आहे व नंतर अहिल्यदेवींचेही जीवनचरित्र काव्यरुपात मांडनार आहे असेही सांगितले . मी त्यांचे अभिनंदन केले व एकच प्रश्न विचारला...शिवाजी महाराज, मल्हारराव, यशवंतराव व स्वत: अहिल्यादेवींनी कधी वारी केली होती काय? त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. पंढरीचा विट्ठल धनगरांकडुन कधीच हायज्यक झाला हे मी सांगितले तर ते चमकले. पण "आपला नाईलाज..." असे काहीतरी बोलून सटकले.

माझा प्रश्न असा आहे कि धार्मिक असल्या तरी प्रजाकर्तव्यांना अग्रस्थान देणा-या अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांना अग्रस्थान असावे कि जनजागृतीला?

१०. या दिवशी येणारा जो समाज वर्ग मी (आणि श्री. प्रकाश खाडे) गेटजवळ भर उन्हात थांबुन मुद्दाम पहात होतो. सोळावे शतक आणि एकविसावे शतक यातील अंतराळ एकाच काळात पाहणे म्हणजे काय असते हे मी अनुभवले. दारिद्र्य, कष्ट आणि तणावांनी ओथंबलेले अगणित चेहरे...भाबड्या आशा कि आतातरी काही बदल होईल...या सर्वांचे काळजाला बोचणारे चित्र मी पाहिले....त्याच वेळीस तेथे येणा-या शेकडो कार-जीप वगैरेंचे सधन समाजाचे ताफे...मंत्र्यांच्या हेलीकोप्टरसाठी बनवले गेलेले तात्पुरते हेलीप्यड...समाजसंदर्भच बदलून गेल्यासारखे वाटले.      

असो. समाजकारण जनजागृतीनेच बदलू शकते. राजकारण हा त्यातील एक भाग आहे अर्थात ते सामाजिक हिताच्या ध्येयातून झाले तरच.  श्री. महादेव जानकरांना त्याचे भान असावे. पण त्यांनी अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या कामात लक्ष का घातले नाही हा प्रश्न उरतोच. कि त्यांनी त्यात लक्ष घालणे काही स्वार्थलोलूप राजकारण्यांच्याच अडचणीचे आहे? मला माहित नाही.

परंतू सध्या अहिल्यादेवींचे जे स्मारक गेली तीनेक वर्ष उभे रहात आहे ते सरळ सरळ अहिल्यादेवींच्या वास्तूकर्तुत्वाचाच सरळ सरळ अपमान आहे असे माझे मत आहे. त्यांची बाकीची कर्तुत्वे तर नक्कीच या स्मारककर्त्यांच्या समजेच्या आवाक्याबाहेरील आहेत हे तर उघडच आहे. आता तरी सर्वच समाजांनी यात लक्ष घालावे...कारण अहिल्यादेवी फक्त धनगरांच्या नव्हेत तर त्या सर्व अवैदिक शैवांच्या ख-या पुण्यश्लोक होत्या हे त्यांच्या यावज्जीव कार्यातून ठळकपणे दिसते. चौंडीला सर्वच समाजांनी का यायला हवे या प्रश्नाचे उत्तर नेमके यातच आहे. अन्यथा आपण अहिल्यादेवींचे अपराधी ठरु यात मला तरी शंका वाटत नाही.

-संजय सोनवणी 

 (सर्व फोटोंचे क्रेडिट...महेश कडु  यांचे...)

10 comments:

  1. खरं हाय सर पण मांजराच्या गळ्यात घंटा कोन बांधनार?

    ReplyDelete
  2. आणी किर्तन प्रवचन केल्याने हरीनाम सप्ताह ठेवल्याने अहिल्यादेवी प्रसंन्न होनार आहेत मग जादुची कांडी फिरवनार आणी समाजाचा विकास करनार

    ReplyDelete
  3. अतिशय घाणेरड्या पद्धतीने आपण आणि आपले सरकार हे आपल्या इतिहासाची वाट लावत आहे. हे एक उदाहरण आहे, खूप जुन्या हेमाडपंती देवळांना रंग देणे, देवळावर सिमेंटची शिखरे बंधने विहिरी बवड्य यांची काळजी न घेणे अशी महाराष्ट्रात किती तरी उदाहरणे देत येतिल. पण हे पुढे आणले हेही नसे थोडके, पण लक्ष्यात कोण घेतो?

    ReplyDelete
  4. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 'यांने' नव्हे तर 'यांनी'.

    दुसऱ्यांना अपराधी ठरवण्याच्या नादात साध्या शुद्धलेखनाकडे तुम्ही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तुम्हीदेखील अहिल्यादेवींचे अपराधी ठरता.

    ReplyDelete
  5. अहो या सर्व गोष्टीला ब्राम्हनच जबाबदार आहेत हे आपल्याला समाजात नाही का? मराठा समाज तर आपला मोठा भाऊ आहे आपण त्याच्या आज्ञेत रहावे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर. सगळे गड ब्राह्मण लोकांनी पाडले. गेल्या ६५ वर्षात सगळीकडे फक्त ब्राह्मण लोकांचे राज्य होते. सगळ्या चांगल्या संस्था त्यांच्या होत्या आणि आता बाकीच्यांच्या हातात आल्याने प्रचंड प्रगती झाली आहे. सगळीकडे पी. एच.डीचे सुपीक पिक आले आहे. प्रचंड हुशार लोक आता सरकारी कार्यालयात आहेत. त्यांनी जे काही केले ते बरोबरच असणार. त्यामुळे त्यांना कोणी काही बोलू नये. सगळे कसे सुरळीत चालू आहे. उगाचच लोक खोटे नाते मराठ्यांवर आरोप करत सुटले आहेत. आपले श्रीखंड भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी आणि संपूर्ण सर्ज्याचे पाणी मंत्री तर फारच थोर आहेत. त्यांच्या कृपेने सगळे कसे उत्तम चालू आहे. फक्त ब्राह्मण तेवढे वाईट.

      Delete
  6. का हो सोनवणी काका! थिकड केदारनाथला यवढी लोकं म्येली तरी एक बी सबुद फुटला न्हाय तुमच्या लेखनीतून! थितल्या सत्ताधाऱ्यांवर यवढी किर्पा कशापायी? हेच जर म्हाराष्ट्रात घडलं असत तर क्येवडी बोंबाबोंब क्येली आसती?
    आच्छा आच्छा... आता आलं समदं टकुऱ्यात! थितल्या सत्ताधाऱ्यांची जात येगळी, हितल्या सत्ताधाऱ्यांची जात येगळी.. म्हनुनच न्हाय का? तुमी जे लिवता त्ये तर म्हत्वाचं हायेच, पर तुमी जे लिवतच न्हायी त्ये तर लय जास्त म्हत्वाचं हाये!

    ReplyDelete
  7. अहिल्या बाई होळकरांनी स्वता अनेक धार्मिक कार्यात भाग घेतला . अशा गोष्टींना प्रोत्साहन सुध्दा दिले . कीर्तन करण्यास सुध्दा त्या प्रोत्साहन देत असत . त्याकाळात वारी करणे हे अत्यंत कठीण तर होतेच शिवाय त्यांच्या सारख्या व्यस्त व्यक्तींना शक्यही नव्हते . त्यांनी पंढरपूर ला आल्यावर काही दागिने हि अर्पण केले व जे दागिने नव्हते ते परत गेल्यावर पाठवून दिले . एक मंदिर बांधले व स्वतातर्फे वार्षिक पूजा करण्याचा रिवाज सुरु केली . हि पूजा अजूनही होळकर संस्थान तर्फे होत असते.
    अहिल्या बाईंच्या आधीपासून म्हणजे अगदी ज्ञानदेवांच्या पूर्वजान पासून विठ्ठल हा सर्व जातींचा झाला त्यामुळे अहिल्या देवींनी सुध्दा विठ्ठलाची उपासना धनगरांचे दैवत म्हणून नक्कीच केली नव्हती

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...