Thursday, June 6, 2013

कनिष्ककाळ: धर्म: भाषिक उत्क्रांती





सम्राट अशोकानंतर कुशाणकाळ हा अत्यंत महत्वाचा व अर्थपुर्ण असा काळ आहे. सम्राट कनिष्काने (इ.स. १२७-१५०) अफगाणिस्तान (गांधार) ते बिहार एवढ्या विस्तृत प्रदेशावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले. कनिष्क आपल्याला अधिक माहिती आहे तो त्याच्या काळात त्याने पुढाकार घेऊन भरवलेल्या धम्मसंगितीमुळे. कनिष्काचे मुख्य वैशिष्ट्य असे कि त्याचे पुर्वज भारतात सत्ता स्थापन केल्यानंतर ग्रीक भाषेसोबत प्राकृत भाषेचाही वापर करत असत...पण कनिष्काने ग्रीकऐवजी इराणी (ब्यक्ट्रियन) भाषा ग्रीक लिपीत वापरायला सुरुवात केली हे त्याच्या १९९२ मद्ध्ये राबटक (अफगाणिस्तान) येथे सापडलेल्या शिलालेखावरून लक्षात येते.  या शिलालेखामुळे त्याच्या धर्मश्रद्धा काय होत्या हेही आपल्या लक्षात येते. परंपरेने आपण कनिष्क हा आधी शैव बनला व नंतर बौद्ध धर्मीय बनला असे मानतो, परंतू ते वास्तव नाही हे त्याची नाणी तसेच राबटक शिलालेखावरुनही लक्षात येते.



(Rabtak Inscription)

कनिष्काच्या नाण्यांवर ज्याप्रमाणे नंदीसहितच्या शिवप्रतिमा आहेत तसेच भगवान गौतम बुद्धाच्या उभ्या तसेच "मैत्रेय बुद्ध" स्वरुपाच्या ध्यानस्थ मुद्राही मोठ्या प्रमानावर आहेत,. असे असले तरी इराणी धर्मप्रतीके तसेच ग्रीक व इराणी देवतांच्या प्रतिमांची संख्या एकुणात अधिक आहे. याचा अर्थ त्याने धर्म बदलला नव्हता तर एतद्देशीय मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेल्या धर्मश्रद्धांनाही आपल्या नाण्यांवर व राबटक शिलालेखातही स्थान दिले आहे हे स्पष्ट दिसते. त्याने वैदिक धर्माला मात्र किंचितही जवळ केले नव्हते हेही स्पष्ट होते.

राबटक शिलालेखात त्याने आपल्या राज्यकारभाराचे वर्ष १ असे दिले आहे, म्हणजेच सत्तेवर आल्यानंतर त्याने लगोलग हा शिलालेख कोरवला असे दिसते. या शिलालेखात  कनिष्काने अफगानी युद्धदेवता "नाना" मुळे आपल्याला साम्राज्य मिळाले आहे असे नमूद करत उमा, अहूर माझ्दा, माझ्ज्दुन, कुमार (कार्तिकेय), महासेन, विशाख आणि मिहिर यांचाही आदरपुर्वक उल्लेख केला आहे. (Translation by Mukherjee, B.N., "The Great Kushana Testament", Indian Museum Bulletin, Calcutta, 1995). या लेखाची भाषा त्याने जाणीवपुर्वक इराणी (ब्यक्ट्रियन) निवडली असून पुर्वी प्रचलित असलेल्या ग्रीक (आयोनियन) भाषेचा त्याग करीत असल्याचेही त्याने नमूद केले आहे. (तळटीपेत लेखाचा अनुवाद पहा...)

नाना ही मातृदेवता असून तिचा "नानाय" पंथ इराण-अफगाणिस्तानमद्धे मोठ्या प्रमाणावर पसरलेला होता. कनिष्काने "नाना" देवतेला आपल्या नाण्यांवर स्थान दिल्यानेच चलनमुद्रांना "नाणे" ही संज्ञा लाभली असे मानले जाते. त्याचबरोबर इराणमधील पारशी धर्मातील अहूर माझ्दा, मिथ्र व आगमिक धर्मातील उमा, कार्तिकेय, विशाख यांना व अन्य पंथोपपंथांतील देवतांनाही त्याने स्थान दिले आहे. हा एकार्थाने कनिष्काचा (सर्व कुशाण राजांचा) सर्वधर्मसमभाव होता असे म्हणता येते. या सर्व दैवतांत एकही वैदिक देवता उल्लेखिलेली नाही हेही लक्षणीय आहे.

कनिष्काच्या नाण्यांवरील मजकूर:

कनिष्काचा कालखंड हा इ.स. १२७-१५० असा सर्वसाधारणपणे संमत आहे. या कालखंडात दक्षीणेत सातवाहन राज्य करत होते.विम क्यडिफियसच्या बव्हंशी मुद्रा द्वैभाषिक होत्या मात्र कनिष्ज्काने आपल्या पहिल्याच शासनवर्षी प्रसृत केलेल्या शिलालेखावरील प्रतिज्ञेनुसार त्याने नाण्यांवर प्राकृताला आश्रय दिलेला दिसत नाही. सुरुवतीची अत्यल्प ग्रीक भाषिक नाणी वगळता ब्यक्ट्रियन भाषेतच त्याने देवतांची नांवे कोरलेली असून बुद्धाचा उल्लेख "बोद्दो" (कधी बोडो) तर शिवाचा उल्लेख "ओइश्वो" (कधी ओश्वो) असा केला गेलेला दिसतो. शिव हा कधी चतुर्भुज तर कधी द्विभूज अवस्थेत, डमरू व त्रिशूलधारी, दाखवलेला असला तरी विम क्यडिफियसपासूनचे नाण्यांवरील महत्वाचे शिववैशिष्ट्य म्हणजे तो उत्थितलिंग स्वरुपात आहे.


(शिव : Right side image)



(बुद्ध :Right side image)

कनिष्काने आपल्या नाण्यांवर प्राकृताला स्थान दिलेले नाही हे आपण पाहिले. त्याउलट भारताला तुलनेने तशा अपरिचित अशा ग्रीक भाषेला स्थान दिले.  कुशाणपुर्व काळातील त्या भागातील असंख्य नाण्यांवर सिंधी प्राकृत व गांधारी भाषेत द्वैभाषिक लेख छापलेले असले तरी कनिष्काचे भाषा धोरण विचार करण्यासारखे आहे. संस्कृत भाषा अस्तित्वात असती आणि ती शिष्ट प्रगत भाषा असती तर त्याने तिला काही प्रमाणात का होईना स्थान दिले असते, पण तसे चित्र नाही. तसेच आपल्याला तत्कालीन सांस्कृतीक घटनांचाही येथे विचार करायचा आहे. शिवाय तो ब्यक्ट्रियन लोकांनाच आर्यन म्हणतो हेही उल्लेखनीय आहे.

प्राकृत अशी संस्कृतशाखेत बदलू लागली:

कुशाण काळात भारतात शैव आणि बौद्ध धर्म प्रस्थापित होते हे भौतिक व लिखित पुराव्यांवरुनच स्पष्ट आहे त्यामुळे त्याबाबत अधिक विवेचनाची आवश्यकता नाही. कनिष्काने या दोन्ही धर्मांना उदारपणे आश्रय दिला होता हे खरे असले तरी त्याने धर्म बदलला नाही हेही तत्कालीन भौतिक पुरावे व लिखित साधनांवरुन स्पष्ट आहे. त्याच्या पुर्वसुरींनी नाण्यांवर प्राकृत भाषेचा वापर केला हे आपण गेल्या लेखात पाहिलेच आहे. असे असले तरी या कनिष्ककाळापुर्वीपासुनच उत्तर भारतात प्राकृत भाषा वेगळे वळण घेवू लागली असेही आपल्याला उपलब्ध पुराव्यांवरुन म्हणता येते. यातील महत्वाचा पुरावा म्हणजे बौद्धांने लिहिलेले प्राकृताची पुढील अवस्था दर्शवणारे, व ज्याला विद्वान "मिश्र-संस्कृत" (हायब्रीड) मानतात अशा भाषेत लिहिलेले ग्रंथ. या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे......व्याकरण पालीचेच वापरले गेले असले तरी ध्वनी व शब्दांचे काही प्रमाणात केलेले मृदुकरण. उदा. मूळ प्राकृत "भिक्खुसा" हा शब्द "भिक्षुस्या" असा वापरला असुन पुढे तो संस्कृतात "भिक्षौ:" असा विकसीत झालेला दिसतो. फ्रंकलिन एडगर्टन यांनी सर्वप्रथम या विकसीत होत असना-या मिश्र भाषेकडे लक्ष वेधले. (The Prakrit Underlying Buddhistic Hybrid Sanskrit) ही भाषा संस्कृतापेक्षा वेगळी आहे असा एडगर्टन यांचा अभिप्राय आहे. याला ते कारण असे देतात कि बौद्ध धर्मात संस्कृतचा अभ्यास असणारे ब्राह्मण अत्यल्प असल्याने व जे ब्राह्मण बौद्ध बनले ते संस्कृत पुर्ण शिकण्याआतच बौद्ध बनल्याने त्यांची भाषा अशी मिश्र बनली असावी.

याला घेता येणारा मुख्य आक्षेप म्हणजे भाषाशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहतांना प्राकृताचे व्याकरण कायम ठेवणारी पण शब्दरुपे बदलनारी भाषा ही मुळ प्राकृताची विकासावस्था आहे हे एडगर्टन यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही. अभिजात संस्कृत आधीपासून अस्तित्वात आहेच या ग्रुहितकातुन त्यांनी (व आजवरच्या सर्वच विद्वानांनी)  "अत्यल्प बौद्ध ब्राह्मण" हे कारण दिलेले स्पष्ट दिसते. परंतू ते वास्तव नाही हे बौद्ध धर्माच्या सर्वच अभ्यासकांना माहित आहे. किंबहूना बौद्ध धर्मात प्रवेश घेणा-यांत सुरुवातीपासून ब्राह्मणच आघाडीवर होते. असे असतांना (आणि संस्कृत तेंव्हा अस्तित्वाच असती तर) केवळ ब्राह्मणच नव्हे तर क्षत्रीय व वैश्य या त्रैवर्णिकांना वेदधिकार असल्याने व वेदांबरोबरच वैदिक व्याकरणादि शिकणे क्रमप्राप्त असल्याने बौद्ध धर्मात संस्कृत शिकलेल्यांची कमतरता असल्याने "मिश्र संस्कृत" वापरली गेली हे विधान टिकण्यासारखे नाही.

याचवेळीस जे शैव तांत्रिक साहित्य निर्माण होवू लागले त्याची भाषाही मिश्र संस्कृत होती असाही भाषातज्ञांचा निर्वाळा आहे. यावर आपण पुढे अधिक विस्ताराने चर्चा करनारच असून भाषाबदलाचे संकेत दक्षीण भारत व पश्चिमी क्षत्रपांच्या नाणी/शिलालेखांवरुनही कसे स्पष्ट होते हेही सखोलतेने पाहणार आहोत.

येथे थोडक्यात सांगायचे म्हणजे:

१. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून प्राकृत भाषांतून एक शाखा ग्रांथिक कारणांसाठीच विकसीत होवू लागली आहे...जी पुढील शतकभराच्या कालखंडात आजच्या ज्ञात संस्कृतात विकसीत झाली. तत्पुर्वी संस्कृत भाषेचे अस्तित्व आढळुन येत नाही.

२. जर संस्कृत अस्तित्वात असती तर ही भाषिक विकासावस्था दिसून आली नसती. प्राकृत ऐवजी संस्कृतचाच उपयोग केला गेला असता. भाषेचा पुनर्शोध लावण्याची कोणालाही आवश्यकता पडली नसती.

३. संस्कृत भाषेचा उदयकाल कनिष्काच्या काळात झाला असे उपलब्ध पुराव्यांवर मानावे लागते. कनिष्क हा अहुर माझ्दाला मानत होता व सर्वच नाण्यांवरही पारशी धर्म प्रतीकांना स्थान देत होता (व भाषाही तिकडील निवडली) हे लक्षात घेता अवेस्ताचा प्रसार भारतात घडने सहज स्वाभाविक होते. त्याच्या अनुकरणाने भारतीय धर्मांच्या भाषाशैलींत बदल होवू लागणे अशक्य नाही.

४. भारतात वेद अस्तित्वात असले तरी ते मूळ वैदिक संस्कृतात नसून मुळच्या अवेस्तन (जुनी पर्शियन) भाषेशी निकटता साधणा-या दारी या भाषेत होते. वैदिक भाषा व अवेस्तन गाथांमधील भाषासाम्य प्रसिद्ध आहे. मुळचे दारी भाषेतील वेद प्राकृताची उसणवारी करत पुढे मिश्र संस्कृतात पुनर्रचित केले गेले.

५. वैदिक धर्म कुशाण काळात मुळीच प्रबळ अथवा जनप्रिय नव्हता. असता तर इतर देवतांबरोबर इंद्रादि वैदिक देवतांचेही उल्लेख त्याच्या लेखांत आले असते.१. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून प्राकृत भाषांतून एक शाखा ग्रांथिक कारणांसाठीच विकसीत होवू लागली आहे...जी पुढील शतकभराच्या कालखंडात आजच्या ज्ञात संस्कृतात विकसीत झाली. तत्पुर्वी संस्कृत भाषेचे अस्तित्व आढळुन येत नाही.

वरील मुद्दे सिद्ध करण्यासाठी सुदैवाने आपल्याजवळ अनेक पुरावे अहेत. पुढील प्रकरणात आपण आधी  पश्चिमी क्षत्रप व महाराष्ट्राचे लाडके राजघराणे सातवाहनांच्याही नाणी-शिलालेख व त्यांवरील बदलत गेलेली भाषा यांचाही अभ्यास करणार आहोत.

 (तळटीप: अनुवादित राबटक शिलालेख)

Translation by Mukherjee, B.N., "The Great Kushana Testament", Indian Museum Bulletin, Calcutta, 1995:

1-3
"The year one of Kanishka, the great deliverer, the righteous, the just, the autocrat, the god, worthy of worship, who has obtained the kingship from Nana and from all the gods, who has laid down (i.e. established) the year one as the gods pleased."
3-4
"And it was he who laid out (i.e. discontinued the use of) the Ionian speech and then placed the Arya (or Aryan) speech (i.e. replaced the use of Greek by the Aryan or Bactrian language)."
4-6
"In the year one, it has been proclaimed unto India, unto the whole realm of the governing class including Koonadeano (Kaundinya< Kundina) and the city of Ozeno (Ozene, Ujjain) and the city of Zageda (Saketa) and the city of Kozambo (Kausambi) and the city of Palabotro (Pataliputra) and so long unto (i.e. as far as) the city of Ziri-tambo (Sri-Champa)."
6-7
"Whichever rulers and the great householders there might have been, they submitted to the will of the king and all India submitted to the will of the king."
7-9
"The king Kanishka commanded Shapara (Shaphar), the master of the city, to make the Nana Sanctuary, which is called (i.e. known for having the availability of) external water (or water on the exterior or surface of the ground), in the plain of Kaeypa, for these deities - of whom are Ziri (Sri) Pharo (Farrah) and Omma."
9-9A
"To lead are the Lady Nana and the Lady Omma, Ahura Mazda, Mazdooana, Srosharda, who is called ... and Komaro (Kumara)and called Maaseno (Mahasena) and called Bizago (Visakha), Narasao and Miro (Mihara)."
10-11
"And he gave same (or likewise) order to make images of these deities who have been written above."
11-14
"And he ordered to make images and likenesses of these kings: for king Kujula Kadphises, for the great grandfather, and for this grandfather Saddashkana (Sadashkana), the Soma sacrificer, and for king V'ima Kadphises, for the father, and for himself (?), king Kanishka."
14-15
"Then, as the king of kings, the son of god, had commanded to do, Shaphara, the master of the city, made this sanctuary."
16-17
"Then, the master of the city, Shapara, and Nokonzoka led worship according to the royal command."
17-20
"These gods who are written here, then may ensure for the king of kings, Kanishka, the Kushana, for remaining for eternal time healthy., secure and victorious... and further ensure for the son of god also having authority over the whole of India from the year one to the year thousand and thousand."
20
"Until the sanctuary was founded in the year one, to (i.e. till) then the Great Arya year had been the fashion."
21
"...According to the royal command, Abimo, who is dear to the emperor, gave capital to Pophisho."
22
"...The great king gave (i.e. offered worship) to the deities."
23
"..."


(क्रमश:)

(See also...)
http://sanjaysonawani.blogspot.in/2013/06/blog-post_1971.html

2 comments:

  1. SANJAY SIR- RAMAYAN /MAHABHARATACHA KAL KONATA

    ASAWA?

    SUNIL PHATAK(RATNAGIRI)

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...