सध्या वेद हे हिंदू धर्माचे मुख्य अंग आहे असे मानले जाते. पण हिंदू धर्माची व्याख्या मात्र होत नाही, कारण तशी व्याख्या करण्यात वेदच अडचणीचे ठरतात हे धर्माभ्यासकांना माहितच आहे. एक तर वेद पठण, वेदोक्त संस्कार व वैदिक कर्मकांड करण्याचा/करवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रैवर्णिकांना आहे, ज्यांची लोकसंख्या अधिकाधिक १५% आहे. उर्वरितांना तसे अधिकार कधीही नव्हते व नाहीत त्यामुळे वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत आहेत असे मानणारे दांभिक ठरतात हे उघड आहे. परंतू वैदिकही हिंदुच आहेत या जाणीवपुर्वक जोपासल्या गेलेल्या भ्रमापायी अनेकांचा गैरसमज होतो हेही वास्तव आहे. हिंदू शब्दाची व्याख्या का झाली नाही यासाठी आपण आधीचे व्याख्या करण्याचे प्रयत्न पाहुयात.
खालील व्याख्या मी श्री. ज.स.करंदीकर, श्री. दा.न. शिखरे, पं. महादेवशास्त्री दिवेकर व डा. रा. ना. दांडेकर यांच्या विवेचनातुन घेतल्या आहेत.
१. "ज्याचे आईबाप हिंदू असतील तो हिंदु."
या व्याख्येतील त्रुटी अशी कि अहिंदू माता-पित्यांच्या संततीला हिंदु करुन घेतले तर ती त्याला लागु होत नाही.
२. हिंदुस्तानात जन्म झाला तो हिंदू.
या व्याख्येत परदेशात जन्म झालेल्या हिंदुंना बाहेर टाकले जाते तर ज्या मुस्लिम अथव अन्य धर्मियाचा जन्म हिन्दुस्थानात झाला आहे त्यांनाही हिंदू मानावे लागते.
३. जातीभेद मानतो तो हिंदू.
असे मानल्यास लिंगायतादी जातीभेद न मानणारे संप्रदाय अहिंदु ठरतात. एवढेच नव्हे तर ही व्याख्या जातीभेदाला गंभीर रुप देते.
४. जो हिंदु कायदा मानतो तो हिंदु.
काही विद्वान ही व्याख्या मानतात. पण दत्तक, वारसा, विवाह याबाबतीत हिंदु कायदा संदिग्ध आहे. शिवाय हिंदू कोड बिल हे बौद्ध व जैन धर्मियांनाही लागु असल्याने तेही हिंदू ठरतील, पण ते वास्तव नाही.
५. सावरकरांची व्याख्या:
"आसिंधुसिंधुपर्यंता यस्य भारतभुमिका
पित्रुभू: पुण्यभुश्चैव स वै हिंदुरेते स्म्रुत:
अर्थात सिंधु नदीपासुन समुद्रापर्यंत पसरलेली ही भारत्भूमी ज्याला वाडवडीलांची भूमी आणि पुण्यभुमी वाटते तो हिंदू होय.
ही व्याख्या प्रादेशिक आहे आणि भावनिक आहे. राष्ट्रवादासाठी ती योग्य असली तरी ती धर्माचे दिग्दर्शन करत नाही.
६. लो. टिळक यांची व्याख्या अशी आहे:
प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाननेकता
उपास्यानामनियमं एतद्धर्मस्य लक्षणम
अर्थात: वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य नेमके कोण असावे याविषयी निश्चित नियम नसने, हे हिंदु धर्माचे लक्षण होय.
श्री. दा. न. शिखरे टिळकांच्या या व्याख्येवर आक्षेप घेतात ते असे: "वेदप्रामाण्य मान्य नसलेला चार्वाकापासून ते संतांपर्यंत एक अवाढव्य प्रवाह आहे तो या व्याख्येप्रमाणे हिंदू ठरत नाही. एवढेच नव्हे तर स्त्रीया आणि शुद्रांना मुळात वेदांचा अधिकारच नाहे. याखेरीज महत्वाचा प्रश्न असा कि वेदांच्या पुर्वीही हिंदु धर्म आस्तित्वात होताच कि! शिवाय "श्रुती-स्म्रुती-पुराणोक्त अशीही व्याख्या करता येत नाही कारण श्रुती अनेक असून त्यात खुपच मतभिन्नता आहे. पुराणांतील मतभेदांबाबत तर बोलायलाच नको. तसेच कोणते आचार आवश्यक आहेत हेही लोकमान्यांनी स्पष्ट केलेले नाहीत. त्यामुळे अव्याख्येयता हीच हिंदु धर्माची व्याख्या आहे असे म्हटले तर त्याचा व्यवहारात काही उपयोग होत नाही." ("सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म": श्री. दा.न.शिखरे)
आता वेद हे हिंदू धर्माचे मुलस्त्रोत अथवा धर्मग्रंथ होऊ शकत नाहीत त्याचीही तपासणी केली पाहिजे. ती खालीलप्रमाणे-
१) वैदिक धर्मग्रंथांत (हिंदू नव्हे) इंद्र, वरुण, नासत्य, मित्र, इत्यादि जवळपास ६४५ देवता आहेत. यात एकही अन्य हिंदू पुजतात ती देवता नाही. यजुर्वेदात तर "न तस्य प्रतिमा अस्ति" म्हणत मुर्ती/प्रतिमापुजेचा निषेध तर केलाच आहे. (यजु. ३२.३) पण ऋग्वेद ७.२१.५ आणि १०.९९.३ मद्ध्ये शिवाची "शिस्नदेव" म्हणून निर्भत्सना केली असून लिंगपुजकांचा केवढा ्द्वेष वेदरचैते करत असत याचे स्पष्ट दिग्दर्शन होते. विनायक गणपतीला वैदिक लोक तर विघ्नकर्ता मानत असत, विघ्नहर्ता नव्हे हे तर सर्वविदित आहे. म्हणजे ज्या देवता हिंदू भजतात, त्यांचा निर्देशच मुळात वेदांमद्ध्ये अवमानात्मक येतो ते ग्रंथ अर्थातच हिंदुंचे धर्मग्रंथ असू शकत नाहीत.
२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.
३) वेद अथवा वैदिक समाजरचना ही पुरुषसत्ता प्रधान असून वेदांत फक्त अदिती, रात्री, पृथ्वी, सरस्वती व उषस या स्त्रीदेवता आहेत. अदिती (देवतांची माता) सोडली तर बाकी नदी व निसर्गातील घटनांच्या स्त्रैण प्रतिनिधी आहेत. हिंदू शैवप्रधान धर्मात मात्र शिव व शक्ती हे नेहमीच युग्म स्वरुपात समतेने पुजले जातात.
४) शिवपुजा सिंधू पुर्व काळापासून प्रचलित असून वेदरचना ही अत्यंत उत्तरकालीन आहे. त्यात शिवप्रधानता नसल्याने ते हिंदू धर्माचे अंग होऊ शकत नाहीत. वेदरचना भारतात झालेली नाही. एतद्देशियांचा धर्म हा वैदिक धर्मापेक्षा सर्वस्वी वेगळा असल्याचे हेच कारण आहे. त्यामुळे वैदिक साहित्य हे हिम्दू धर्माचा स्त्रोत नाहीत.
५) वैदिक लोकांत जानवे घालण्याची प्रथा नव्हती. फक्त यज्ञप्रसंगी यज्ञोपवित (जानवे) घालण्याची प्रथा होती. परंतू हा धर्म भारतात आल्यानंतर या धर्माच्या लोकांनी अन्य धर्मियांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी जानवे नित्य घालण्यास सुरुवात केली. (The Indian Encyclopaedia, Volume 1, edited by Subodh Kapoor)
६) वैदिक आचार व तत्वज्ञान सर्वस्वी वेगळे असून त्या धर्माबाहेर जे लोक होते त्यांना ते शूद्र म्हणत. त्यांना वेदाधिकार असण्याचे कारण नव्हते व नाही कारण त्यांचा धर्म सर्वस्वी स्वतंत्र होता. त्यांचे स्वत:चे पुरोहित होते व आहेत, जे आज मागे ढकलले गेले आहेत...उदा गुरव. कारण पोटर्थी वैदिकांनी बव्हंशी देवतांचे अपहरण केले अथवा स्वसमाधानासाठी त्यांना वैदिक देवतांशी जुळवायचा अयशस्वी प्रयत्न केला. शक्तीला अदितीशी तर शिवाला रुद्राशी, विठ्ठल-बालाजीला (जे शैव होते) त्यांना वैदिक विष्णुशी जुळवायचे प्रयत्न केवळ पोटार्थी कारणासाठी होते, एकधर्मीय होते म्हणून नाही.
७) वेदांशी हिंदुंचा कधी संबंधच आला नसल्याने वैदिक धर्म म्हणजे हिंदू हे कोनालाही मान्य होण्याचे कारण नाही.
८) वैदिक स्मृत्या या वैदिक धर्मापुरत्या मर्यादित होत्या. अन्यांनी त्या पाळल्याचे एकही उदाहरण नाही. शिशुनाग, नंद, मौर्य, सातवाहन ते हरीहर-बुक्क हे सारे सम्राट शूद्र होते. वैदिक धर्मनियमांनुसार शुद्रांना राजेपण तर सोडाच...संपत्तीसंचय करण्याचाही अधिकार नाही. (पहा - मनुस्मृती)
९) वेदांतील एकही देवता हिंदू व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.
१०) वैदिक मंत्र त्रैवर्णिकांसाठी तर पुराणोक्त शुद्रांसाठी अशी वाटणी पुरातन काळापासुन होतीच. पुराण्काळ नंतरचा नसून "पुराण" या शब्दातच पुरातनता निहित आहे. पौराणिक मंत्र हे सर्वस्वी आजही ज्या देवता हिंदू पुजतात त्यांबाबत असून वैदिक मंत्र हे वैदिक देवतांचे असतात. ही विभाजनी सरळ सरळ दर्शवते कि शुद्रांचा धर्म वेगळा होता व आहे तर वैदिकांचा वेगळा आहे.
वरील अल्प विवेचन पाहता वेद हे हिंदु धर्मियांचे ना मुलस्त्रोत आहेत ना धर्मग्रंथ आहेत. ते वैदिकांचे धर्मग्रंथ असून त्यांच्याशी व ते प्रमाण मानणा-यांशी हिंदुंचा संबंध नाही. वेदांमद्ध्ये हिंदुंना उपयुक्त असे काहीएक नसून उलट हा जन्माधारित विषमतेचे तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत हे पुरुषसुक्तावरुनच स्पष्ट दिसते. विषमतेच्या तत्वज्ञानाच्या प्रभावात हिंदुही ती उच्चनीचता व जातीभेद पाळु लागले हा त्यांचा दोष असून वैदिक आपला प्रभाव निर्माण करण्यात त्यामुळेच यशस्वी झाले असे म्हणने क्रमप्राप्त आहे. हा वर्चस्वतावादी प्रभाव झिडकारुन लावल्याखेरीज हिंदुंचे कल्याण नाही एवढेच!
(हिंदुंचे तत्वज्ञान व त्यांचे धर्मसाहित्य कोणते याबाबत सविस्तर नवीन लेखात देतो.)
वा फारच उत्तम विवेचन, सर आणखी तुम्ही भरपूर लिहून हिंदू व वैदिक वेगळे हे सिद्ध करणार हे नक्की. आर्य आक्रमणाचा सिद्धांत बाद ठरला आहे हे संजय सरांचे म्हणणे अगदी पटते. जनुकीय दृष्ट्या सुद्धा शास्त्रज्ञांनी आर्य (वैदिक) बाहेरून आलेलेच नाहीत हे सिद्ध करत आहेत. उलट दक्षिण भारतीय आधी भारतात आले. मग उत्तर भारतीय. मग वैदिक अफगाणिस्तानातून प्रचारासाठी आले हे गूढ संजय सरांनाच माहित आहे.
ReplyDeleteहिंदू हा सिंधू संस्कृतीचा धर्म होता. कलीबांगांचे इ स पु २६०० चे शिवलिंग आत्ता कुठे ठेवले आहे त्याचा पत्ता संजय सर आम्हाला नक्की सांगणार, आणि आम्ही शिवभक्त ते जाऊन बघणार. अगदी हात लाऊन. सिंधुत सापडलेल्या लाखो शाळून्खा आणि शिवलिंगे सरांकडे आहेत. बघाच तुम्ही, सिंधुतल्या पशुपतीच्या वर शिब लिहिले आहे हे सरांनी शोधून काढले आहे. त्यावर ते प्रबंध लिहिणार. वैदिक हे पक्के जातीय होते. वर्ण हे प्रत्येक माणसाच्या पत्रिकेत आईवडिलांच्या वर्णाप्रमाणे येत नसले तरी भारतीय वैदिक लोकांना ज्योतिष्य हे एकतर ग्रीकांनी शिकवले किवा ते शैव आगम ग्रंथात होते. वर्णवाद वाढल्यावर वैदिकांनी पुरुषसुक्त नेमके
Please study Satyartha Prakash by the Arya samaj founder maharishi Dayanand Saraswati.
Deleteवेदात घुसडले. मुळात फक्त ३ वर्ण होते, पुरुश्सुक्तात आणि ज्योतीष्यात मात्र ४ वर्ण आहेत. म्हणजे हे सगळे घुसडलेले आहे हेच स्पष्ट होते. वेद्कर्ते बरेच ऋषी म्हणे द्रविड होते. आता हे कसे बुवा? जे द्रविड शुद्र होते त्यांना वेद रचण्याचा अधिकार दिला कोणी? बरे आत्ता जे वेद उपलब्ध आहेत त्याच्या आधी १० पट मोठे वेद उपलब्ध होते ते बहुतेक सरांना सापडलेत, तेच बहुतेक शैव वेद असावेत. आत्ताच्या वैदिकांनी स्वताच्या फायद्याचे वेद पाठ करून ठेवले आणि वेळोवेळी आपल्या फायद्यासाठी त्यात बदल करत आलेत. आता हिंदूंचा खरा धर्मग्रंथ संजय सर शोधून काढणार आणि तो सगळ्या विश्वाचा धर्म शैव करून ठाकणार.
ReplyDeleteवैदिक व वैदिकेतर --- येथे हिंदू वा शैव अर्थाने --- यांच्यात जी सांस्कृतिक दरी आहे --- ज्यामध्ये खानपान, वस्त्रे, उपास्य देवता व पद्धती यांचे वरवर अवलोकन केले तरी उभयतांतील फरक सहज लक्षात येतो.
ReplyDeleteवा वा वा! संजय क्षीरसागर आणि संजय सर असे दोन संजय एकत्र आले कि शत्रूंचा धुव्वा उडणार! महाभारतात संजय ह्यांचे काम अतुलनीय होते. दरी तर आहेच हो! अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा पूर्ण होण्यातच मोठी विषमता आहे. आणि संजय द्वायींनो हि दरी आपल्याला अशीच वाढवायची आहे. तिचे नदीचे खोरे बनवायचे आहे. आणि हो ते एक सांगायचे राहिले. ते सरांकांडे कालीबांगण चे इस पु २६०० चे शिवलिंग आहे त्याची आणि सिंधू-हरप्पा ला सापडलेल्या लाखो-किवा हजारो किवा फारतर शंभर एक, नाही ते जाऊ द्यात फक्त १० शिवलिंगे आणि १० शाळुंका ह्यांची रेडिओ कार्बन-१४ करून घ्यायची. यंत्रावर रीडिंग फक्त १ आले कि झाले ५७०० वर्षे. एक झटका असा द्यायचा ना. सगळे घाबरलेच पाहिजेत. संजय सर आणा-आणा लवकर ते शिवलिंग आणि ते १० शिवलिंगे आणि १० शाळुंका. अपान वर्गणी काढून कार्बन -१४ करून घेऊ.
ReplyDeleteसंजय सर समजा आत्ता लगेच तुम्हाला त्या १० शिवलिंगे आणि १० शाळुंका द्यायच्या नसतील तर एक आयडिया आहे, आपण नर्मदेचे गोटे देऊ शिवलिंग म्हणून, शाळून्कांना १-२ वर्षांची मुदत मागून घेऊ, त्यात दरी वाढवतच राहू, तोवर कोन्ग्रेस येइलच सत्तेवर. मग कोण विचारणार त्या शिवलिंग आणि शाळून्कांना? आणि आपले कामही साधून जाईल. मी आहे बरका तुमच्या बरोबर, म्हणजे आलं ना लक्षात! म्हणजे हे हे हे, लक्ष राहू द्यात साहेब. आपल्याला फार नाही फक्त वार्डातले तिकीट मिळाले तरी चालेल. आणि माझे तासेपण नाही बरका. म्हणजे तुम्हालाच तिकीट मिळणार नसेल म्हणजे तुम्हीच्च घेणार नसाल तरी मला दिले तरी चालेल. मला नाही दिले तरी चालेल. पण ते शिवलिंग आणि शाळून्खा ह्या मात्र दाखवा. तेवढेच बघून पुण्य पदरात पडेल.
ReplyDeletehttp://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
ReplyDeleteसर इथे आपण लिहिले आहे कि, "" शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत""
"" कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.""
सर आता आपण दोघे मिळून ह्या सगळ्या शिवलिंगांची (म्हणजे हरप्पा येथे सापडलेले एक, कालीबंगा येथे सापडलेले १ व असंख्य शिवलिंगे आणि शाळुंका उर्फ योनिदर्शक प्रस्तरखंड) हे कुठे ठेवले आहेत ते जगाला दाखवून देऊ, त्यांची रेदिओ कार्बन -१४ हि त्यांचा काळ ठरवणारी चाचणी करून घेऊ. ते अधिकृत हडप्पा वाले साले काहीच फोटो देत नाहीत ह्या तुमच्या गोष्टींचे. त्यांचे आधी बुचं मारून ठेऊ. आणि मग आपल्या देशातील संघोट्या आणि त्यांच्या उठवळ पिल्लावालीची कशी वाजवायची ते तुम्ही माझ्यावर सोडा.. आणा-आणा लवकर ते सगळे पुरावे इकडे. पण साहेब, ते मर वत्स आणि ढवळीकर ह्यांच्या पुस्तकातील पाने अजिबात नको हो. अशाने हे संघोटे आपल्याच तोंडाला पाने पुसतील. कागदावर किती दिवस काढायचे आता आम्ही सुद्धा मोठे झालोय, आम्हाला नको का आता खरेखुरे! आणा-आणा लवकर. मी आहेच तुमच्याबरोबर. म्हणजे आले ना लक्षात. तुम्ही नका घेऊ मी आहे ना घायला.
Very poor analyse to defame vedik people. As per supreme court of India hindues are those who perform marriage, death and orher imporrant ceremony aa per vedik rituals. No hindu can dare to avoid death ceremony or marriage without vedik mantra.
ReplyDeleteमित्रा, हिंदूंच्या अत्यसंस्कारात, लग्नसंस्कारात आणि वैदिक याच संस्कारांत/मंत्रात फर्क आहे. नीट माहिती करुन घ्या.
Deleteनमस्कार सर ,
ReplyDeleteमहर्षी दयानंद सरस्वरी व त्यांनी स्थापन केलेला आर्य समाज याबाबत आपले काय मत आहे?
कारण महर्षींनी वेद शिकण्याचा अधिकार संपूर्ण मानव जातीस (कोणत्याही समाजात जन्मलेले सर्व स्त्री व पुरुष )आहे असे निक्षून सांगितले आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वेदांचाच आधार घेतला होता.
आज आर्य समाजाच्या देशभरात स्थापन झालेल्या अनेक गुरुकुलांत गर्भाश्रीमान्तापासून ते जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजातील असंख्य मुले एकत्र वेदांचे शिक्षण घेत आहेत.
कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
धन्यवाद,
- रणजीत चांदवले
वेद पठण, वेदोक्त संस्कार व वैदिक कर्मकांड करण्याचा/करवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्रैवर्णिकांना आहे, ज्यांची लोकसंख्या अधिकाधिक १५% आहे. उर्वरितांना तसे अधिकार कधीही नव्हते>>>>>>>>>> चुकीची माहिती हे अधिकार नंतर च्या काळात जरी काढुन घेण्यात आले तरी सुरुवातीच्या काळात हे अधिकार शुद्रांना होते वेद अध्ययन तर जे वैदिक धर्माचे नव्हते ते जैन बौध्द देखील करत होते
ReplyDeleteशतपथ ब्राह्मण मध्ये शुद्र यज्ञ करत असे संदर्भ आहेत बदरी व संस्कार गणपती या ग्रंथानी शुद्रांना उपनयनाचा अधिकार आहे असे म्हटले आहे
९) वेदांतील एकही देवता हिंदू व्यक्ती पुजत नाही, त्यांची मंदिरेही नाहीत. वेदांतिल त्या देवता वैदिक धर्मियांच्याच होत्या त्यामुळे हिंदुंना त्या पुज्य वाटण्याचे काही कारण नाही.>>>>>>>> अपवाद फक्त विष्णुचा वेदातील विष्णू सोडून इतर देवतांच्या पुजा का बंद झाल्या हे मी पुढे मांडीन पण तुम्ही लोकशाही वादी बनुन माझी प्रतिक्रिया छापणार असाल तर
ReplyDeleteमुळ वैदिक धर्मात मुख्य स्थानक्षत्रिय वर्गाला होत तर दुसर स्थान ब्राह्मण वर्गाला होत कोणताही इंद्र हा क्षत्रिय च होता तर उपेंद्राच स्थान ब्राह्मण वर्गाच असणार्या विष्णू कडे होते. मुळ वैदिक धर्मात वर्णव्यवस्था नव्हती. क्षत्रिय आणि ब्राह्मणांचे अनेक संघर्षा आपणांस शास्त्रात पहायला मिळतात. जो शुद्रांचा गट जे वैदिक धर्म स्विकारुन क्षत्रियंचा भाग झाले होते त्यांच्या वर कठोर बंधन लादली गेली. हळूहळू सर्व च क्षत्रिय नष्ट झाले अस सांगू न उतरलेल्या क्षत्रियांना देखील शुद्र ठरवुन शुदरांच्या बंधनाखाली आणले गेले ( हे करण्यात अवैदिकातुन वैदिक झालेला ब्राह्मण वर्ग हि होता ( अथर्ववेदि ब्राह्मण) ) अर्थात च जी ब्राह्मणी धर्माची सुरुवात होती त्याचा शेवट हिंदु धर्मा मध्ये झाला तिथे क्षत्रिय देवतांना काही च स्थान नव्हत म्हणुनच वेदातील एक हिक्षत्रिय देवतांची पुजा चालू न राहता वेदातला ब्राह्मण वर्गा चा विष्णू ची पुजा आजही चालते आणि जे अवैदिक देव होते ते या धर्माचा भाग बनताच त्याच ब्राम्हणीकरण करण्यात आले आणि हे करण्यात वैदिकं प्रमाणे अवैदिक ब्राम्हण देखील आघाडी वर होते
ReplyDeleteबौध्द धर्मात ही सुरुवातीच्या काळात मुर्तीपुजा वर्ज्य होती हिनयानी साधु स्तुपासमोर बसुन साधना करत. महायानी साधु बुध्द मुर्ती समोर बसुन साधना करत त्यामुळे त्याना कोणी बौध्द असे म्हणत नाहित तसेच हिंदु मध्ये वैदिक अवैदिकांच्या बाबतीत. म्हणता येयेईल वैवैदिकांनी शिव रूद्रा चा स्वस्वरुपात स्विकार ला
ReplyDeleteप्रतिवाद अत्यंत तोकडा आहे. पण यांची उत्तरे देणे आवश्यक आहे. ती तुम्हाला सविस्तर लेखांतच वाचायला मिळतील. तोवर अजून अभ्यास करुन ठेवावा म्हणजे चर्चा चांगली होईल. शिव आणि वैदिक रुद्र एकच नाहीत. यावर माझा स्वतंत्र लेख आहे. तो ब्लोगवरच पाहून घ्य!
Delete२) शिवाला यज्ञाचा विध्वंसक मानले जाते. यज्ञांत शिवाला हवि दिला जात नाही. शैव अथवा शैवप्रधान मुर्तीपुजक लिगरुपाने शिव-शक्ती पुजा करतात, यज्ञ हा शैवांचा अर्थात हिंदुंचा कर्मकांडाचा भाग नाही. रुद्र आणि शिव यांचा काडीएवढाही संबंध नाही हे मी अन्यत्र दाखवून दिलेलेच आहे.>>>>>>>>शिवाची पुजा तिनही स्वरुपात होते शिवाची मुर्तीसुद्धा पुजली जाते शिवलिंग हि पुजल जाते एवढच काय पण शिवाला यद्न्यात रुद्र म्हणुन हवी देखील दिला जातो
Delete( तुमचा लेख मी वाचला पण तुम्ही ज्या गोष्टी लपवत आहात त्या सांगु इछितो )
तुमच्या लेखात रुद्र आणि शिव वेगवेगळे आहेत असे मांडलेले आहे
ज्या तेहतीस देवांचा उल्लेख आहे त्यात रुद्र 11 आहेत अवैदिकानी जेव्हा वैदिकांचा धर्म स्विकरला तेव्हा ते आपल्यासोबत त्यांचे देव सुद्धा घेउन आले व वैदिकान्मधे प्रतिक पुजा नसल्यामुळे शिवाला रुद्रा च्या स्वरुपात यद्न्यात पुजेचा मान मिळाला
रुद्र आणि शिव हे एकच आहेत याचा संदर्भ तर भगवद गीतेत सुद्धा आहे श्री कृष्ण स्वताला रुद्रा मधला शिव घोषित करतो
एव्ह्ड्हच नव्हे तर रुद्र आणि शिव एकच आहे याचा पुरावा अश्वलायन गृह्यसुत्रात ही आढळतो त्यात शिवाला प्रसन्न करण्यासाठी वृषभ बळी दिल्याची वर्णने आहेत -
1 आता रुद्राला वृशभ बळी दिला जात आहे
9 या मंत्रानुसार वृद्धी होउ दे शिवाला मान्य असलेली
19 मंत्रा सोबत "तव हर , मृदा , सर्व शिवा , भव , महादेव , उग्र , भमि , पशुपति , रुद्र , शंकर , इषाना , अर्पण करतात
21 किंवा ' तव रुद्र स्वाहा '
..............
Sent from Samsung Mobile
मस्त लेख आहे हिंदु आणि वैदिक हे वेगळे आहेत यात तथ्य असले पाहिजे.आमच्या गावातील हरीपारायन भक्त जे मराठा आहेत ते स्वत:ला वैदिक समजतात त्यांना मी विचारले होते की हिंदु विषयी काय वाटते ? तर माझा प्रश्न पुर्ण होतो तोच ते वेळ न घालवता म्हणाले ह्येह्येह्ये ते हिंदु फ़िंदु सगळं काल्पनिक आहे आम्ही नाही मानत.पण लोकांच्या स्थिरतेसाठी हिंदु शब्द वापरावा लागतो नायतर हिंदु धर्मच नाही म्हंटलं तर लोकं दगडं मारतील.यावरून वेद म्हणा किंवा कोणत्याही धर्मग्रंथात हिंदु शब्द नाही त्यामुळे वेद आणि हिंदु हे वेगळेच पण मग हिंदु धर्माचा इतिहास काय ? कोणी स्थापन केला ? कधी स्थापन झाला ? का स्थापन केला ? धर्म ग्रंथ कोणता ? लिहिलेत तर बरं होईल किंवा तुम्ही याआधी लिहिला असाल तर मग कळवा.
ReplyDeleteअभिजीत पाटील,कोल्हापूर.
त्रैवर्णिकांची लोकसंख्या १५ टक्के आहे हे बऱोबर वाटत नाही.ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य ह्यांची एकत्रित संख्या ६० टक्के असावी.अर्थात त्रैवरणिक कोण ह्याच्या व्य़ाखेवर ते अवलंबून आहे.आरक्षणाच्या माहोलात प्रत्येकजण त्रैवर्णकात येणे कठीण आहे..उत्तरेत ब्राह्मछाची संख्या १० असल्याचे आपल्या लेखनात वाचल्याचे आठवते.महाराष्ट्रात अडीच टक्के असल्याचे बोलले जाते.सत्ताधारी वर्गाशी जवळीक साधण्याचा प्रत्तेकाचा प्रय़त्न असतो.सध्या ब्राह्मण विरोधी वातावरण असल्यामुळे त्याच्यापासून दूर ऱहाणे पसंत करतो.त्यामुळे टक्केवारी कालमानाप्रमाणे बदलत असते.५० वर्षापूर्वी सोनार स्वतःला दैवज्ञ ब्राह्मण व सुतार स्वथःला विश्वामित्र ब्राह्मण म्हणत.आता काळ बदलला आहे.टक्केवारी ही सकल्पना फसवी आहे.मुस्लीम काळात हिंदू समाज शत्रूपक्षात होता तेव्हा अनेकांनी आपण हिंदू नाही ,आमचा धर्म वेगळा आहे असे प्रतिपादन केले आणि आपला बचाव केला..ब्रिटाीशांनीही ही रणनीती वापरली आहे.शुद्ध हिंदू व इतर आक्कमासे म्हणून समाजाची विभागणी करणे घातक आहे.
ReplyDeleteवा खूप सुंदर वर्णन केलत असेच संशोधन बोध्द धर्माच्या धम्म ग्रंथावर करून पहा हाच प्रश्न निर्हन होईल पूर्वीचा ग्रंथ ,चीन मधला. जपान मधला,आणि आजचा ह्यात काय फरक आहे ,,,धर्म एकच
ReplyDeleteपुन्हा एकदा (शुद्र पूर्वी कोण होते }हे पुस्तक वाचा बा .आ .म्हणजे कळेल कि वेद आणि हिंदू यांचा काय संबध आहे ते
ReplyDeletehttp://sanjaysonawani.blogspot.in/2016/11/who-were-shudras-critique.html
DeleteRead above article and let us discuss.