Tuesday, October 27, 2015

ऋग्वैदिक स्थित्यंतरे: असुरांकडून देवांकडे!

वैदिक धर्माचा मुख्य स्त्रोत म्हणजे ऋग्वेद. तो आज ज्या क्रमाने आणि ज्या मंडलांत आपल्यासमोर उपलब्ध आहे त्या क्रमाने मुळात तो रचला गेलेला नाही. आजचा ऋग्वेद दहा मंडलांत असून त्यातील तिसरे ते सातवे मंडल प्राचीन असल्याचे मानले जाते. बाकी मंडले मध्यकालीन व उत्तरकालीन मानली जातात. उदाहरणार्थ दहावे मम्डल उत्तरकालीन आहे. प्रत्येक मंडलातही प्राचीन, मध्यकालीन व उत्तरकालीन दाखवता येतील अशी सुक्ते व मंत्र आहेत. थोडक्यात ऋग्वेद कालानुक्रमानुसार आपल्याला उपलब्ध नाही. शिवाय त्यात विस्मरणात गेलेला/नष्ट झालेला भागही भरपुर आहे. वेदव्यासांनी विस्मरणात जाऊ लागलेली वेदराशी प्रयत्नपुर्वक गोळा करून तिची संगतवार  मांडणी चार भागात केली असे वैदिक परंपरा मानते.

ऋग्वेदाचे रचना सुरू होऊन ती संपायला सरासरी तिनशे ते पाचशे वर्ष लागली असावीत असे विद्वान मानतात. हा धर्म एकाएकी, कोणा प्रेषिताने निर्माण केलेला नसून तो क्रमश: दैविक/कर्मकांडीय पद्धतीने विकसीत होत गेलेला धर्म आहे. ऋग्वेदाला किमान दहा ऋषीकुटुंबातील सुमारे साडेतिनशे मंत्रकर्त्यांनी पिढ्यानुपिढ्या हातभार लावलेला आहे. मुख्य दहा कुटुंबातील ऋषीही एकाच जमातीतून आलेले नाहीत. भृगू, काण्व, अगस्त्य सारखे ऋषी स्वतंत्र धर्म परंपरेतून येत वैदिक परंपरेत आपल्याही परंपरांचे मिश्रण करत सामील झालेले दिसतात. याबाबत सविस्तर चर्चा आपण स्वतंत्र लेखात करु.

मुळात वैदिक धर्माची सुरुवात झाली त्याआधी कोणता ना कोणता धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राचा धर्म नवधर्म नसून जुन्या असूर धर्माचे एकेश्वरी प्रकटन होते. हा धर्म देव संप्रदायाच्या विरोधात होता. असूर-मेघा (अहूर-माझ्दा) हाच सर्वश्रेष्ठ पुजनीय तर देव हे वाईट अशी त्या धर्माची झरथुस्ट्राने रचना केली. याचा अर्थ असूर धर्म व देव धर्मही झरथुस्ट्राच्या पुर्वीही विस्कळीत स्वरुपात का असेना विद्यमान होता. दोन्ही धर्मपरंपरांत संघर्षही होता. त्यांची कर्मकांडेही भिन्न होती. याशिवायही इतर अनेक धर्म होते. त्याबद्दलची त्रोटक माहिती अवेस्ता आणि ऋग्वेदातून मिळते. ती माहिती अशी...यज्ञ न करणारे. अन्य व्रत करणारे, इंद्राला देव न मानणारे, लिंगपुजा करणारे अशा लोकांची अस्पष्ट माहिती ऋग्वेद देतो. या लोकांचा द्वेष वैदिक लोक करायचे. अवेस्त्यातही झरथुस्ट्राच्या धर्माचा द्वेष करणारे, अग्नी न पुजणारे, देवांना पुजणारे, तुराण्यांसारखे समाज येतात. तुराणी म्हणजे तूर प्रांतात राहणारे लोक. ऋग्वेदात हेच लोक तुर्वश नांवाने व त्याच अर्थाने येणारे लोक. हे तुराणी झरथुस्ट्राचे प्रकांड शत्रू होते. अनेक युद्धात वैदिक टोळ्यांसोबत हे सामील दिसतात तर दाशराज्ञ युद्धात हे वैदिक टोळ्यांचे शत्रू बनलेलेही दिसतात. झरथुस्ट्राचा अग्नीत जाळ्य़्न खून तुराण्यांनीच केला व त्याचे वर्णन जसे अवेस्त्यात आहे तसेच ऋग्वेदातही आहे.

येथे मुद्दा हा कि देव आणि असूर या दोन विरोधी धर्मांचे प्राबल्य ऋग्वेदापुर्वीही अस्तित्वात होते. सोबत दुसरेही धर्म प्रवाह होतेच. ऋग्वेदात देवधर्म आणि असूर धर्म या दोहोंचे मिश्रण दिसत असले तरी सुरुवातीला वैदिक धर्मावर असूर धर्माचा प्रभाव होता. उदा. ऋग्वेदात आधी असूर वरुण ही देवता सर्वश्रेष्ठ मानली जात होती. ऋग्वेदात वरुणाला वारंवार अत्यंत आदराने "असूर वरुण" असे तर संबोधले जात होतेच पण अग्नी, इंद्र व मित्रालाही "असूर" ही आदरार्थी संबोधने लावलेली आहेत. "जो प्राण देतो, म्हणजे असू: देतो तो असूर" हा असुराचा मुळचा अर्थ. असूर वरूण म्हणजेच अहूर माझ्दा असे विद्वान मानतात. त्याबद्दलचा वाद बाजुला ठेवला तरी ऋग्वेदातच वरुणाचे माहात्म्य घटत ती जागा देव इंद्राने  घेतली. ही ऋग्वैदिक धर्मातील मोठे क्रांती म्हटले तरी चालेल. देव हेच असूर (देवानां असूरा:...) ते असूर दुष्ट हा प्रवास ऋग्वेदातच दिसून येतो. याचे कारण तत्कालीन देव मानणारे विरुद्ध असूर मानणारे या दोन संप्रदायांतील संघर्षात पहावा लागतो.

एकच धर्मात दोन विरोधी मुलतत्वे मिसळत जावीत हे फक्त ऋग्वेदात दिसते. असूर वरुणाचे माहात्म्य घटत इंद्राचे माहात्म्य वाढले. इंद्राचे असूर हे संबोधन गळालेले दिसते. असे असले तरी समकालेन जगात असूर संस्कृती वेगवेगळ्या प्रकारे प्रबळ असल्याचे दिसते. उदाहरणार्थ अस्सिरियन संस्कृती. ही संस्कृती असूर तत्व प्रधान असून राजेही स्वत:ला अशूर हे संबोधन लावून घेत असत. हे असूर संस्कृती पालत असले तरी ते मुर्तीपुजक होते. झरथुष्ट्राच्या अहूर (असूर) संप्रदायाप्रमाने अग्नीपुजक व एकेश्वरवादी अमूर्त दैवत मानणारे नव्हते. ऋग्वेदावरील सुरुवातीचा असूर वर्चस्वाचा भाग गृहित धरला तर ऋग्वैदिक लोकही वेदकाळ सुरु होण्यापुर्वी असूर धर्म/संस्कृतीचेच पाईक होते असे म्हणावे लागते.

अवेस्त्याचा धर्म आणि ऋग्वेदाचा धर्म यातील साम्य म्हणजे हे दोन्ही धर्म मुर्ती/प्रतिमा पुजा मानत नाहीत. "न तस्य प्रतिमा अस्ती" हे यजुर्वेद ठासून सांगतो. यज्ञात दिल्या जाणा-या हवीमार्फत अमूर्त देवतांची पूजा करणे हे दोन्ही धर्मातील मुख्य साधर्म्य.

झरथुस्ट्राचा गाथा (अवेस्त्याचा प्राचीन भाग) आणि ऋग्वेदाच्या प्राचीन रचना या समकालीन आहेत. ऋग्वेद रचना व्हायलाच ३०० ते ५०० वर्ष लागली. हा काळ थोडा नव्हे. या काळात ऋग्वैदिक धर्मातही स्थित्यंतरे घडली. अनेक वेगवेगळ्या टोळ्यांतील लोक या धर्माचे पाठीराखे अथवा शत्रू बनत गेले. दानस्तुती सुक्तांतून याची माहिती आपल्याला मिळते. ज्या टोळ्या पाठीराख्या झाल्या त्यांची दैवतेही ऋग्वेदात सामील होत गेली. त्यांना हवी द्यायचा कि नाही यावरचेही वाद होत ते शेवटी तडजोड करत सामील होत गेले. उदा. अगस्ती हा ऋषी वेदरचनेत नंतर सामील झाला. त्याने जादुटोण्याचे मंत्र निर्माण केले जे ऋग्वेदात काण्वांशिवाय अन्यत्र आढळत नाहीत. अगस्ती हा आर्यच नव्हता असे क्युपर म्हणतो. काण्व हेही मुळचे वैदिक परंपरेतील नाहीत. सुत्र साहित्यात काण्वांना "अ-ब्राह्मण" म्हटले गेलेले आहे, कारण तेही जादूटोण्याचे समर्थक. मरुत आणि रुद्र दैवतांचाही समावेश ऋग्वेदात ही दैवते मानणा-या टोळ्यांमुळे झाला. अगस्ती त्यातील प्रमूख. त्यानेच मरुतांना (वादळाची प्रतीक-दैवते) यांना यज्ञात हवी द्यायचा कि नाही हा वाद मिटवला. (ऋ. 1.165, 1.170 आणि 1.171) भृगुही ऋग्वेदरचनेत सर्वात उशीरा सामील झाले.

याचा अर्थ असा कि ऋग्वेद रचला जात असतांनाच तो अनेक स्थित्यंतरांतून गेला. अनेकविध टोळ्यांनी त्यात सहभाग घेतला.  त्या त्या टोळ्यांची दैवते ऋग्वेदात सामील होत होत ऋग्वैदिक देवतांचे संख्या ६४५ पर्यंत गेली. या काळात रचला गेलेला सर्व ऋग्वेद उपलब्ध आहे असे मात्र नाही. आज उपलब्ध आहे तो संपादित, क्रम बदललेला ऋग्वेद. त्याची भाषाही मुळची उरलेली नाही. पण प्रतिपाद्य विषयाबद्दल खालील मुद्दे स्पष्ट होतात ते असे:

१) ऋग्वेद रचनेआधीही वैदिक लोकांचाही कोणता ना कोणता  धर्म होता. त्याला आपण असूर प्रधान अथवा अन्य दैवते प्रमूख मानणारा  धर्म म्हनू शकतो.
२) हे लोक प्रतिमापुजा करत असावेत जे त्यांनी या धर्माची स्थापना करतांना टाळले व "त्याची प्रतिमा असू शकत नाही" असे म्हटले. याचा अर्थ प्रतिमा पुजकांचाही धर्म होता जो ऋग्वैदिकांनी समूळ अव्हेरला.
३) झरथुष्ट्र असूर धर्माची प्रतिमापुजक विरहित, अग्नीकेंद्रित रचना करत असतांनाच याही धर्माची जवळपास तशीच, पण वेगळ्या पद्धतीने सुरुवात झाली. दोन्ही धर्मातील दुष्ट शक्ती व सृष्ट शक्ती यांची नांवे (विरोधी अर्थाने झाली असली तरी) समान आहेत. ऋग्वैदिक धर्म आधी असूरकेंद्रितच होता, जो नंतर देवकेंद्रित झाला.
४) स्वाभाविकपणेच झरथुस्ट्राचा धर्म व वैदिक धर्म यात संघर्ष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब देवासूर कथांत पडलेले आहे.
५) दोन्ही धर्मांची सुरुवात तत्पुर्वी अस्तित्वात असलेल्या धर्मकल्पनांतुनच झाली. एका अर्थाने दोन्ही धर्म प्राचीन धर्मात सुधारणा घडवनारे होते. सर्वस्वी नवीन नव्हते.
६) हे दोन्ही धर्म अस्तित्वात येत असतांना समकालीन अजुनही अनेक धर्म होते जे स्वतंत्र अस्तित्व प्राचीन इराणमद्ध्ये  (आताचा अफगाणिस्तान धरून) टिकवून होते. त्यांच्यात रक्तपाती संघर्ष वर्चस्वासाठी होत होते. ही युद्धे ऋग्वेदाने व अवेस्त्याने नोंदवलेली आहेत.

याचाच अर्थ असा कि ऋग्वेद-धर्म अचानक निर्माण झाला नाही. त्याची धर्मतत्वे त्याच्या पुर्ण रचनेपर्यंत बदलत राहिली. त्या अर्थाने ऋग्वैदिक धर्माला एकजिनसी म्हणता येत नाही. याला आपण एकाच धर्मातील बहुविधता म्हणू शकतो. या बहुविधतेची कारणे अनेक आहेत व ती दानस्तुतींवरुन स्पष्ट दिसतात. त्यावर आपण नंतर चर्चा करुच. पण वेदांपुर्वी इराणमद्धेही कोणताच धर्म नव्हता व वेदरचनाकारांचाही तत्पुर्वी दुसरा धर्म नव्हता असे मानायचे काही कारण नाही. 

15 comments:

  1. अभ्यासपूर्ण माहिती !

    ReplyDelete
  2. very good inteligentia. we r experiencing gradually with our ancient wisdom. Thanks sanjaysir very good morning.

    ReplyDelete
  3. इतिहासाचार्य राजवाडे यांनी यापूर्वीच याबद्दल बरेच लिहून ठेवले आहे. मध्याशियातील
    ( मेसापोटेमियातील ) नवीन शोध असे काहीसे ते लिखाण आहे. असिरिया देशातील संदर्भ त्यांनी घेतले आहेत. आपण नवीन काहीही मांडत नाही असे दिसते . अश्वमेध यज्ञात घोड्याचे पुढे काय व्हायचे तेही त्यांनी स्पष्ट लिहिले आहे , आपण काहीही थोर विचार मांडत नाहीआहात हे आपण लक्षात ठेवावे.त्यांच्या सारखा हाडाचा इतिहासकार होणार नाही .
    आपला सर्व उद्देश शेवटी ब्राह्मणांवर घसरायचे हा आहे हे स्पष्ट आहे . तेथून भाजप आणि नंतर संघ हा आपला आराखडा आहे हे सत्य आहे .
    कारण आपण इतिहास आपल्या अजेंड्यासाठी वापरत आहात !
    खरे इतिहासकार हे वेगळे असतात , त्यांची मांडणी वेगळी असते, फाटक असोत किंवा फडके , शेजवलकर असोत की बेंद्रे , राजवाडे किंवा यदुनाथ सरकार , त्यांचा पिंडच वेगळा होता , आपला कावाच वेगळा आहे हे समाजाला माहित आहे . मी करते आहे तो कांगावा नाही , आपण आपल्या कंपूत कदाचित कौतुकाचा विषय असाल पण , जाणते नेणते लोक आपणास मुळात इतिहास संशोधक मानतच नाहीत .कसे मानणार ?
    त्यामुळे आपण स्वतःच्या कौतुकापोटी काय लिहायचे ते लिहा , एक गोष्ट आपण ध्यानात घेत नाही , या वैदिक लिखाणाचा लोकाना कंटाळा आला आहे . कोणीही आपली दखल घेत नाही ! माझी सहानुभूती तुमच्या बरोबर आहे . उत्तराची अपेक्षा नाही .हिंदू धर्मात वैदिक ढवळा ढवळ करत आहेत आणि वैदिक धर्म हा वेगळा आहे असेच जर आपणास वाटत असेल तर आपण तशी कायदेशीर मागणी का करत नाही ?

    ReplyDelete
    Replies
    1. Hi Sumati,

      Sorry but I disagree.
      You have mentioned that article does not add anything new. May be... but honestly there are LOT of people who haven't read rajwade/phadke etc. His articles are reaching out to ordinary folks like me and getting them curious :-)

      The exact intention of the author is a debatable point and only he can say what his motives are. Rest folks i.e. you and me can only speculate.

      If you believe Sanjay Sir's is harsh on Brahmins, present your opposite view. What is so special about Brahmin's that their actions can't be critically looked at?

      Cheers,
      Niraj.

      Delete
    2. शेजवलकर ते बेंद्रे , राजवाडे किंवा यदुनाथ सरकार... अगदी महात्मा फुले ते बाबासाहेब आंबेडकर.. इतिहास संशोधन नेहमी काळासोबत पुढे जात असते. नवनव्या उपलब्ध पुराव्यानि इतिहास संशोधनात भर पडत असते. तेच काम आज संजय सोनवणी पुढे नेते आहेत.

      इतिहास संशोधनाला मागे घेऊन जाणारे ते वैदिक इतिहासकार आहेत, जे स्वजातीच्या वर्चस्वाचा खोटा इतिहास पुढे पुढे रेटून समाजामध्ये अज्ञान पसरवून संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत असतात. अशा प्रवृत्तींचा पर्दाफाश करून संशोधनातून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तथ्ये समाजापुढे मांडण्याचे सोनवणींचे कार्य महत्वपूर्ण आणि क्रांतिकारक आहे.

      Delete
  4. उपलब्ध माहितीचाच, पण चांगला सारांश.

    ReplyDelete
  5. आप्पा- नीरज म्हणजे कमळ !
    बाप्पा-सध्या झेंड्यावर जाउन बसले आहे ते ?
    आप्पा - नाही रे हे बहुतेक मुलाचे नाव असावे त्याला मी सांगत होतो - ब्राह्मणाना झोडपणे ही आजकाल समाजाची फ्याशन झाली आहे,त्याची सुरवात पाहुया ! समाजवादी चळवळीत पूर्वापार (कोकणस्थ ) पुणेरी ब्राह्मण जास्त होते , त्यांच्या संस्कारांच्या खाली एक पिढी महाराष्ट्रात वाढली नानासाहेब गोरे, एसेम जोशी ,डांगे ,भाई वैद्य असे अनेक सांगता येतील , त्यांच्या सावलीत बाकी बहुजन संस्कारित होऊन वाढत गेले अण्णाभाऊ साठे , राम नगरकर , अमरशेख आणि असे अनेक , त्यातूनच सेवादल आणि पुढे अनिस बहरले . हा एक प्रवास , त्याहीपूर्वी टिळक आगरकर काळात आणि त्याहीपूर्वी लोकहितवादी पासून ब्राह्मण वर्गाने स्वातंत्र्याचे महत्व ओळखून राष्ट्रीय शिक्षण सुरु करून स्वातंत्र्याबरोबर आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली .ब्राह्मणानीच प्रथम वैदिक शिक्षणावर लाथ मारून आधुनिक शिक्षण अंगिकारले.
    बाप्पा- सांगायचा मुद्दा असा की ब्राह्मण जसा संघ कार्यात होता तसाच समाजवादी विचारात पण पुढे होता . एक गोष्ट आपणास मान्य करावी लागेल की वक्तृत्व आणि विषयाचा अभ्यास हा वंश परंपरेने ब्राह्मण वर्गात उपजत आढळतो - ते सहाजिकच आहे . पण जसजसा समाजात सामाजिक विचार वाढू लागला तेंव्हा या बहुजनांच्या मागासपणाचे (?) खापर ब्राह्मणांवर फोडण्याची युक्ती कोन्ग्रेसने सुरु केली , आणि जेधे प्रभूती मराठा वर्गाने ती बरोबर हेरली ,यशवंत रावांनी त्यास सभ्यपणाचा अंगरखा पांघरून हा ब्राह्मण द्वेष जोपासला आणि गोडसे नंतर तर त्यास अधिकृत दर्जाच मिळाला !एकप्रकारे लायसनच मिळाले. त्यामुळे आता समाजवादी विचार सरणीतूनही ब्राह्मण वर्ग हरवला त्याला हाकलून काढले गेले तो वर्ग गोदासेमुळे बदनाम झाला तो कायामचाच !
    आप्पा-असे ध्रुविकरण झाल्यावर मराठा वर्गाची पुढची खेळी सुरु झाली. शिक्षण संस्था ब्राह्मण वर्गाच्या ताब्यात होत्या , नवले कराड आणि कदम प्रभूतिनी शिक्षणाचे कारखाने काढले आणि पुढचे सर्व आपण जाणतोच !पण ब्राह्मण वर्गाने आरक्षणाशी सामना करत आज जगभर आपला ठसा उमटवला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा बाप्पा,
      ह्या वेळेस मराठीतून प्रयत्न करतो. मी तुमच्या पेक्षा फार लहान आहे.. वयाने आणि बुद्धीने हि. पण तरीही काही मुद्दे पटत नाहीत.
      पहिल्यादा disclaimer .... मी व्यक्तिश ब्राह्मणांचा द्वेष करत नाही आणि दुसर्या कुणीतरी करावा असेही कधी वाटत नाही.
      "एक गोष्ट आपणास मान्य करावी लागेल की वक्तृत्व आणि विषयाचा अभ्यास हा वंश परंपरेने ब्राह्मण वर्गात उपजत आढळतो - ते सहाजिकच आहे ."
      हे मला अजिबात मान्य नाही. माझे बरेच ब्राह्मण मित्र आहेत ज्यांची बुद्धी आणि कौशल्य हे सामान्य किंवा अति सामान्य आहे. हे का?
      somehow ब्राह्मणांना नेहमीच एक अहंगंड असल्या सारखा वाटतो, कि ते बाकीच्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ट आहेत आणि तेही फक्त ते ब्राह्मण असल्यामुळे.
      बाकीचे मुद्दे पटतात... मराठा समाज (संभाजी ब्रिगेड वगैरे) मंडळी हेच उद्योग करतात.

      एकूण ब्राह्मण समाजाचे कर्तुत्व आणि योगदान कोणीही अमान्य करू शकत नाही. पण म्हणून त्यांच्या कुठल्याही कृत्याचे सगळ्यांनी समर्थनच केले पाहिजे किंवा त्यांच्या वरची टीका म्हणजे "अब्राम्हण्याम", हे मान्य नाही.
      ब्राह्मण्याच्या चुकांचे विश्लेषण सुद्धा व्हायला पाहिजे. तुम्ही जर मराठा समाजावर टीका करणारा लेख लिहिला तर मी आनंदाने वाचेन.

      Niraj.

      Delete
    2. नुकतीच एक गमतीदार बातमी वाचली... हरियाना मध्ये ब्राह्मणांना 1०% आरक्षण आहे !
      आता तुम्ही कसा विरोध करणार आरक्षणांचा ?

      Niraj.

      Delete
    3. आप्पा - याचेच अतिशय वाईट वाटते . ब्राह्मण वर्गाने चुका केल्या त्याचे प्रायश्चित्त त्याना पुरेपूर मिळाले - उदा. गोडसे . यापेक्षा उत्तम उदाहरण असूच शकत नाही , आणि ज्या ब्राह्मणाला काहीच प्रायश्चित्त मिळाले नाही ते म्हणजे जवाहरलाल नेहरू . (काश्मिरी ब्राह्मण ) असो .
      बाप्पा- ब्राह्मणाना आरक्षण मिळाले तरीही आम्ही त्याचा विरोधाच करणार , कारण आरक्षण हे पांगुळगाडा आहे ते माणसाला अजून काहीतरी अधिक मला करायचे आहे या विचारापासून परावृत्त करते ,आम्हीपण कोणत्याही जातीचे नाही - किंवा कोणाचीही बाजू घेत नाही , उरला प्रश्न मराठा समाजाचा . त्यांच्या बद्दल काही बोलण्या सारखे उरलेलेच नाही इतके ते उघडे पडले आहेत , कमरेचे काढून डोईला बांधलेले अर्धवेडे कसे असतात ? तसेच ते झाले आहेत कारण त्यांची सत्ता गेली .
      आप्पा- अजूनही मुसलमान आणि मराठा समाज हे पूर्वापार भोगलेल्या सत्तेच्या धुंदीतून बाहेर येत नाहीत हीच आपली शोकांतिका आहे . भाजप हा पक्षही त्यातलाच आहे हेपण आपण ध्यानात ठेवावे .

      Delete
  6. सरदेसाई सांकलिया शेजवलकर , बेंद्रे , गं बा सरदार राजवाडे हे कसलेले इतिहासकार होते . संजय सोनावणी यांना इतिहासकार कोण म्हणत देव जाणे ? त्यांच्या मागे जाणारे लोक बघा , त्यावरून तर सगळा प्रकारच स्पष्ट होतो.
    मा. राकेश पाटील साहेब यांच्या विचारांची खोली फारच उथळ दिसते , कारण संजय हा पूर्वग्रह दुषित असा माणूस आहे हे सर्व इतिहासकाराना माहित आहे आणि संजयला आव आणायचा असतो की मी किती समतोल आहे ! गोष्ट अशी आहे की मेटे कसे न घरका न घाट्का - तसेच हा संजय आहे . पुण्यात अनेक लोकाना गोळा करून काहीतरी खटपट लटपट करत असतो , गर्दीत हजेरी लावत आपणही कधीतरी मोठ्ठे म्हणून ओळखले जाऊ अशी त्यांची स्वप्ने असतील .असो !
    संजयने आता स्पष्टच सांगावे की वैदिक तत्वे मानणाऱ्या लोकाना या देशात स्थान नाही .(संघवाले जसे येडपट पणे म्हणतात गोमांस भाक्षकाना या देशात जागा नाही - अगदी तसेच ) पण तसे होत नाही , कारण त्यांनाच माहित , म्हणून एकच तुणतुणे वाजवत बसायचे - इतकेच यांचे काम , रोजगार माहित नाही !असेल पोटापुरता ! दुसऱ्याचा द्वेष करून जगण्याचा हा मार्ग ठीक नाही !

    ReplyDelete
  7. मा. स्नेहप्रभा बेडेकर,
    एवढा वैयक्तिक द्वेष का बरे? संजय सोनवणी ह्यांनी कुणा एका व्यक्तीविरोधात लिखाण केलेलं नाहीये. त्यांनी उपलब्ध पुरावे आणि नवनव्या ज्ञानाच्या आधारे भारतीय इतिहासाला अद्ययावत करायचे काम केले आहे. अर्थात त्यात कुणा एका धर्माचा किंवा जातीचा वर्चस्ववाद कोलमडून पडत असेल तर त्यात काय वावगे आहे? उलट कोणत्याही प्रकारच्या अहंगंडाचे हनन करण्यासाठी साऱ्या समाजाने सहकार्य करायला हवे. अशाने एकूण समाज प्रगल्भ आणि सुदृढ होतो. मुठभर लोकांच्या अहंगंडासाठी बहुसंख्य समाजाला न्यूनगंडाखाली जखडून ठेवल्याने समाजाचे, राष्ट्राची कीति अपरिमित आणि न भरून येणारी हानी होते, त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचा आपला देश आहेच!

    ReplyDelete
  8. आप्पा- नीरज , आम्हाला न कळलेली गोष्ट म्हणजे , संजयचा वैदिकांच्या बद्दलचा प्रचंड राग .
    बाप्पा- आम्ही सुद्धा काही वैदिकांचे कैवारी नाही , कारण आजकाल हा मुद्दाच अव्यवहार्य झाला आहे . इन्फोसिस मधला नवशिका किंवा एन डी ए मधला अधिकारी , डॉक्टर उच्च शिक्षित कोणीही यांच्यात जातिभेद फारच कमी होत चालला आहे , तसेच शैव वैष्णव , किंवा वैदिक शैव हा प्रकारही त्याना विनोदी आणि हास्यास्पद वाटतो .
    बाप्पा - संजय स्वतः म्हणतात कि प्रत्येक धर्मात संस्कृतीत बदल आणि सरमिसळ होत असतेच , तसेच वैदिक आणि शैव असे घुसळण होत नवे रसायन बनले असेल असे समजू . कोण गाय खात होते किंवा खाते याला काडीचेही महत्व नाही . उद्या समजा , या देशातालेसार्व्जन एका रात्रीत हिंदू झाले तरी देशाचे सर्व प्रश्न कायमचे सुटणार आहेत का ? आप्पा- सर्व वैदिकांनी आपापली पुस्तके फेकून दिली तर समाज सुखी होईल असे आपल्याला वाटते का ? पिळवणूक म्हणजे काय ? ती कोण करते ? साताधीश करतात , आज कोण सत्ताधीश होते ६०-६५ वर्षे ? आपले पाप लपवण्यासाठी ते असले शैव वैदिक वाद पेटते ठेवत असतात . मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न बरेच काही बोलून जातो !
    नीरज , तुम्ही मनमोकळेपणे बोलावे - लिहावे असे वाटते , कारण सभ्यपणे लेखन करणारे फारच कमी होत चालले आहेत . धन्यवाद . !

    ReplyDelete
  9. "आम्ही सुद्धा काही वैदिकांचे कैवारी नाही , कारण आजकाल हा मुद्दाच अव्यवहार्य झाला आहे"
    माफ करा... पण मान्य नाही... जात/धर्म हा मुद्दा इतक्यात काही गौण होणार नाही. जात/धर्म गौण असती तर एका निरपराध माणसाला हकनाक मारावे लागले नसते दादरी मध्ये. मोडी निवडून आल्या नंतर लगेचच हडपसर मध्ये असाच एका निरपराध मुलाला हकनाक मरावे लागले... का तर त्याने शिवाजी विरुद्ध काही लिहिले असा "संशय". पानसरे, दाभोलकर, काल्बुर्जी हे उदाहरणे आहेतच.
    पण मुद्दा हा आहे कि संजय सर जे सांगत आहेत... ते खरे कि खोटे? वैदिक अजूनही स्वत साठी वेगळी आणि बाकीच्यांसाठी वेगळी अश्या प्रथा/पद्धती/रीती मांडतात का? उत्तर जर हो असेल तर त्याला तुमचा विरोध कुठे दिसत नाही... आणि हाच मुद्दा आहे !
    मुळात जो पर्यंत संजय सर हे मुद्दे मांडत नव्हते तो पर्यंत ह्या विषयावर जाहीर कुणी लिखाण केलेले माहित नाही (माझे वाचन फार मर्यादित आहे हे अगोदरच सांगतो) जर मुद्दा बरोबर असेल तर त्याला तुमच्या कडून किंवा बाकीच्या टीकाकारांकडून supportive arguments कधी आले नाहीत.
    खरे सांगायचे झाले तर मला तुमचे मुद्दे बुद्धी भेद करणारे वाटतात. म्हणजे असे म्हणायचे कि मुद्दा बरोबर आहे पण सध्याच्या काळाला/परिस्थितीला तो सुसंगत नाही. काळाला सुसंगत नसेल तर लिहिण्याचे प्रयोजनच चुकले कि.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete
  10. गम्मत म्हणजे वैदिक-अवैदिक वाद हा मराठा राजकारण्यांकडून कधीच ऐकायला मिळत नाही... त्यांनाही त्याची कल्पना आहे कि नाही शंकाच आहे. (थोरल्या पवारांना असेल कदाचित)
    जाती बद्दल माझी स्वताची काही मते आहेत (चुकीची असायची शक्यता फक्त ९९% !)
    जात मुक्त समाज हा एक utopia आहे. तो कधीच अस्तित्वात येवू शकत नाही. समाजात नेहमीच उतरंडी राहतील. सगळ्यांना समान संधी, एकाच न्याय, कुणी मोठा नाही कुणी छोटा नाही हे कधीच होणार नाही.
    कधी त्या भौगोलिक स्थानावर असतील, कधी स्त्री पुरूष म्हणून कधी जातीवरून (सध्याच्या काल पैश्यावरुन) पण जाती ह्या असतीलच. इतकी हजारो वर्षे तर त्या ह्या न त्या स्वरुपात टिकून आहेतच.
    आहे ती उतरंड मोडली तरी नवीन उतरंड तयार होणारच. हा utopia communist लोकांचा खास आवडता. class less society म्हणे !

    समाज म्हणून आपण आहे त्या उतरंडी चा त्रास कसा कमीत कमी कसा करता येईल एवढाच प्रयत्न/विचार/आशा करू शकतो.

    Cheers,
    Niraj.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...