Friday, October 16, 2015

पैगंबरांचे विवाह

मोहम्मद पैगंबरांच्या अनेक विवाहांबद्दल अधून कधून चर्चा होत असते. प्रथम हे लक्षात घ्यावे लागते कि अरब हे कबिला जीवनातील होते आणि बव्हंशी कबिले इस्लाम-पुर्व काळात आपापसात लढयांमद्ध्ये गर्क असत. वाळवंटी प्रदेशामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी असल्याने मांसाहारावरच अधिक भर होता. माणसाच्या खाद्यप्रथा, वस्त्र संस्कृती व धर्मसंस्कृतीवर ज्या पद्धतीने जीवनयापन करावे लागते त्याचा मोठा पगडा असतो. या सामाजिक संस्कृतीकडे तेथील भौगोलिक परिस्थितीच्याच चौकटीत पहावे लागते.
पैगंबरांनी आयुष्यात एकुण तेरा विवाह केले. काही सुत्रांच्यानुसार ही संख्या १६ आहे. याखेरीज त्यांच्या दासीही होत्या अशी मान्यता आहे. त्यांची पहिली पत्नी खदिजा ही त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्ष मोठी होती. ती विधवा होती. श्रीमंत होती. विवाहानंतर उभयतांना ६ अपत्ये झाली. त्यामुळे खदिजा ही पैगंबरांपेक्षा जास्त वयस्कर नसावी असे काही विद्वान मानतात. पैगंबरांना सुरुवातीच्या काळात तिने मोठी मदत केली. ती व्यावसायिक व्यवस्थापनात कुशल होती. पैगंबरांना कुराण स्फुरू लागले व त्यांना विरोध सुरु झाला त्या काळात खदिजा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. खदिजाच्या मृत्युपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. या काळात ते मक्केतच होते. हा काळ त्यांच्या दृष्टीने संघर्षपुर्ण होता.
अरब टोळ्यांत निरंतर असनारा अंतर्गत संघर्ष संपवायचा असेल तर त्यांच्यात एकवाक्यता आणने गरजेचे होते. प्रत्येक टोळीची स्वतंत्र पाषाणदैवते होती व ती सर्व मक्का येथे स्थानापन्न होती.
मदिनेला हिजरत केल्यानंतर पैगंबरांनी सावदा या इस्लाम स्विकारलेल्या व त्यामुळे त्रास व कष्ट स्विकाराव्या लागणा-या मुलीशी विवाह केला. ९ वर्षेय अयेशाशी नंतर पाठोपठ विवाह केला. आयेशा ही अबु बक्रची मुलगी होती आणि अबुही इस्लाम सर्वप्रथम स्विकारण-यांपैकी होता. या काळात इस्लाम स्विकारलेले लोक कमी होते. आयेशाचा विवाह आधी एका गैर-इस्लामियाशी ठरलाही होता. पण अबु बक्रच्या विनंतीनुसार त्यांनी तिच्याशी विवाह केला. आयेशा अल्पवयीन होती व तिच्याशी विवाह केल्याबद्दल पैगंबरांवर आरोप केला जातो. पण अरब मुली लवकर वयात येत आणि लग्न ठरल्त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष विवाह झाला.
खदिजाप्रमानेच इस्लामच्या प्रसारात आयेशाचा मोठा वाटा आहे. ती विद्वान तर होतीच पण पैगंबरांच्य देहांतानंतर जवळपास ४४ वर्ष इस्लामच्या प्रसारात घालवली. हदिथमधील बरेच लेखन तिचे मानले जाते.
आयेशानंतर पैगंबरांनी अनेक विवाह केले. ते बव्हंशी मक्केतील युद्धात झालेल्या विधवांशी. या बहुविवाहांमागे अनेक कारणे दिली जातात.
१) विविध टोळ्यांशी रक्तसंबंध जुळवत त्यांचा विरोध सौम्य करणे.
२) विधवांबाबतचे त्यांचे अनुकंपेचे धोरण.
३) इस्लामचा प्रसार.
काहीही असले तरी पैगंबरांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युपर्यंत दुसरा विवाह केला नाही हे एक वास्तव आहे. अरबांत बहुपत्नीकत्व (भारतात होते तसेच) ही सर्वसाधारण बाब होती. अल्पवयीन मुलीशी विवाह (जे भारतातही विपुलतेने होत) नवीन नव्हते. सुरुवातीच्या काळात इस्लामियांची संख्या कमी असल्याने मुली द्यायच्या कोनाला हाही प्रश्न उपस्थित झाला असेल.
इस्लामच्या निर्मितीला आणि त्या धर्मश्रद्धांना तत्कालीन समाजस्थिती आणि जेथे हा धर्म स्थापन झाला त्याचा भुगोल विचारात घ्यावा लागतो. पैगंबरांनी धर्माच्य नांवाखाली आपापसात लढणा-या अरबांत ऐक्य साधले. इस्लाम नंतर झपाट्याने पसरला. पण अरबी भुगोल आणि त्यानुसार असणा-या खाद्य आणि इतर वेषभुषेसहितच्या प्रथाही अन्य भागांतील भुगोलांचा विचार न करता अंधपणे लादल्या गेल्या अथवा धर्माच्या नांवाखाली स्विकारल्या गेल्या. अरबस्तानातील वाळुची वादळे, उष्मा यामुळे पुरुषांना तोंड झाकणारा सफा व पायघोळ वेष आवश्यक होता तसाच स्त्रीयांना बुरखा. अन्यत्र मात्र हा वेष हेच इस्लामचे प्रतीक ठरवले गेले. तत्कालीन गरजा या सर्वत्र व सार्वकालिक व अपरिवर्तनीय बनवल्या गेल्या. अन्य प्रांतांतील धर्मांतरित मुस्लिमांनी यावर फार गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. आंधळा परंपरावाद हा सर्वच धर्मियांना दिर्घकाळात अडाणी, अप्रागतिक आणि कर्मठ बनवत नेतो. पैगंबरांनी त्यांच्या काळापुढे जाऊन आपले त्या परिस्थितीत पुरोगामीत्व दाखवले.
नंतर धर्मात क्रांती घडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. इजिप्तचे अध्यक्ष सिसि यांनी याच वर्षी इस्लाम जाहतिक हिंसेचा प्रमुख स्त्रोत बनत आहे व ते टाळण्यासाठी धर्मग्रंथांचे नव्याने अर्थ लावले गेले पाहिजेत असे म्हटले होते. पण आयसिस दुसरीकडे याच धर्मक्रांतीच्या नांवाखाली मुलतत्ववादाकडे गेली आहे. अन्यत्र इस्लाम हा अजुनही रुढीवादी म्हणुनच ओळखला जातो. धर्म ज्या काळात, जेथे, ज्या परिस्थीतीत निर्माण झाला त्या स्थित्या आज अस्तित्वात नाहीत, त्यामुळे आपापल्या प्रदेशाच्या निकडीनुसार त्यात बदल घडवायला हवा हे इमाम-मुल्लांना व सर्वसामान्य मुस्लिमांनाही समजायला हवे.

9 comments:

  1. लेख मस्त जमून आलाय, खरेच पैगंबर महान होते, इस्लामपूर्व काबिल्याचे लोक बहुतेक भटके वैदिक असावेत. पैगंबरांनी त्यांना महान धर्माची शिकवण देऊन माणसात आणले. तो काळ वेगळा होता, स्त्रियांची संख्या मुबलक होती, लोकसंग्रह करण्यासाठी अनेक विवाह करणे आवश्यक होते. मांसाहार सुद्धा अगदी पटतो, त्यात गाई, बोकड, ह्यात फरक करण्यात अर्थ नाही. आत्ताही गोमांस खाणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे हेही आपोआपच लक्षात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळात गुरे पाळण्याच्या जबादारीतून मुक्तता मिळेल. मुल्ले खरच फारच बावळत आहेत. त्यांना पैगंबराची शिकवणच कळली नाही असे म्हणावे लागेल. उद्या विचार करा कि हिंदुस्तानात मुस्लिमांनी किमान २-२ का होईना लग्न गेली, सगळे काफर संपवले तर हिंदू मुस्लिम वादच राहणार नाही. सगळे कसे गुण्या गोविंदाने राहतील. बहुतेक काफर खात्मा ह्या कल्पनेत पैगंबरांना हेच अपेक्षित असावे. काही म्हणा लेख उत्तम आणि परिपूर्ण आहे. विचार करायला पाहिजे सर्वांनी. प्रतिगामी लोक हे हिंदू-हिंदू करून ओरडत असतात त्यांना पुरोगामी (अर्थात १०० वर्षे) पुढचा विचार करणाऱ्या सरांनी आम्हाला सर्व अकलेच्या पामरांना हे ज्ञान खुले करून दिले त्यासाठी आम्ही फार फार आभारी आहोत. काय आप्पा- बाप्पा, आगाशे, मानसी, अस्मिता, गोरे तुम्हालाही हा लेख नक्कीच आवडला असणार,

    ReplyDelete
  2. जाऊद्यात तुम्ही कोणी येत नाहीत तर मीच थोडे लिहितो, हा माझा खास अभ्यासाचा विषय आहे. त्यात लेख सुद्धा असे मुद्दे सूद लिहिलाय कि प्रत्येक ओळींचे किमान १०-१५ अर्थ निघू शकतात. आणि विशेष म्हणजे जे लिहिले आहे त्यात पुराण, भाकड असे काहीच नाही सर्व लिखित पुराव्यांनी सिद्ध झाले आहे. अनेक मुद्दे आहेत,
    १) मूर्ती ठेऊन आपण उगाचच इतिहासाला आवताण देतो. ते कालीबांगण शिवलिंग सापडले ते नुसते चित्रात दिसते. प्रत्यक्ष कुठे ठेवले आहे कोणास ठाऊक. शिवाय सिंधू पशुपती म्हणजे नक्की शंकरच का? शिवाय पुराणतील देवांचे वर्णन ऐकून डोक्याला मुंग्या येतात असले निरर्थक वाद मुर्तीपुजेतून तयार होतात. त्यापेक्षा ना रहेगा बास न बजेगी बासुरी. आवडले आपल्याला. झकास.
    २) म्हणजे कोणी विधवा, आणि विधुर म्हणून जगणे नाही. (आता पैसे नसल्यास विवाह करता येत नसेल तर तो मुद्दा वेगळा) वयाचेही बंधन नाही, ५३-११, ६०-१६ असे कसेही चालू शकते. असे पुरुष समाजात असतील तर लोक मुलींना जन्माला घालतील ना. मागणी जास्त तर मालाचे उत्पादन जास्त. आपल्याकडे स्त्रियांचे प्रमाण कमी असण्यावर सरांनी अप्रत्यक्ष आसूड ओढले आहेत. वा वा फार उत्तम!
    ३) अरेबियात शेती, पशुपालन आणि मांसाहार लोक करीत म्हणजे नक्कीच ते महान होते, आपण मोठमोठ्या नद्या असताना त्यात अंघोळ करत बसतो.
    ४) एक आणखी महत्वाचे तत्व कळले, लग्न करायचे तर श्रीमंत, मोठा परिवार असलेली स्त्री बघून. पुढे त्यातूनच मोठे क्रांतिकारी विचार करायला निवांत वेळ मिळतो.
    ५) सगळ्यात महत्वाचे सूत्र आहे समानतेचे! गरीब असो व श्रीमंत, उपाशी असो कि कसा सगळ्यांनी एक साथ नमस्ते करायचे. त्यातून लोक एकत्र येतात व नंतर झुंड बनवून आपले प्रश्न सोडवतात. माझ्याकडे झुंडला प्रतिशब्द नाहीये, हो आणि नेहमी तेच तेच ऐकून दुसरे शब्द विसरून गेलोय. कृ. क्षमस्व. शिवाय जोजे लाभो प्राणिजात, म्हणजे सर्वांना जेजे अपेक्षित आहे ते मिळू द्या. फारच उत्तम!
    ६) आणि बुरख्याचे म्हणाल तर जे आपले नाही त्याकडे बघायचे कशाला? बायकांना काहीच अडचण नाही असे त्या म्हणतात बुवा. आतून बाहेरचे स्पष्ट दिसते. आतमध्ये हवा थंड राहते. हे अगदीच बरोबर आणि अगदी शास्त्रीय आहे. हवामानाशी निगडीत. देश तसा भेस.
    ७) ते इसीस वगैरे थोडे बहकले आहेत. फार बहकले नाहीत. मूळ दिशेनेच त्यांचा प्रवास चालू झाला आहे. कधी यश मिळेल ते मिळो! फारच उत्तम लेख, सगळे पैलू अगदी धारधार..!!

    ReplyDelete
  3. कोणी किती आपटली तरी पुरुष स्त्री संख्येचे गुणोत्तर १:१ पासून फार दूर जाऊ शकत नाही, फारतर हजारी ८६० स्त्रिया असे होऊ शकते. समजा वरच्यांनी १६ बायका केल्या प्रत्येक सरदाराने १० पासून २ पर्यंत आपल्या तलवारीच्या जोरावर केल्या म्हणजे सैनिकांच्या हातात समजा काही नसले तर ते विभागून स्त्रिया वापरू शकतात, आपल्याकडे तो राम, आणि त्यापेक्षा अवघड स्थिती असलेले पांडव हे वैदिक भाकड होते. खरे तर महान चंद्रगुप्त, सातवाहन, खंडोबा?? ह्या धनगरांनी अनेक स्त्रिया केल्यात. स्त्रियांना अनेक पर्याय असतात. शिवाय ज्यांना स्त्रिया शिल्लक नाहीत त्यांची गरज वेश्या पूर्ण करू शकतात. पूर्वी बलात्कार होत असत, युद्धे आणि बलात्कार ह्यांचा संबंध जुना आहे, पानिपातातील पराभवानंतर झालेल्या बलात्कारांचे चित्र प्रसिध्द आहेच. पण सध्याच्या काळात होणारे बलत्कार आणि त्या काळात होणार्या बलात्काराचा काडीमात्र संबंध नाही. अहो तो काळच वेगळा होता हे सरांनी सांगितले आहे. वेश्या हा व्यवसाय आता आपल्या पुरोगामी समाजाने मोठ्या मनाने स्वीकारला पहिजे. काही स्त्री-पुरुष असतातच तसे, त्यांना काय करायचे लग्न आणि संसार करून?
    दगडाचे लिंग ह्यापेक्षा आपले खालचे लिंग ह्याला महत्व देणारा पुरुष खरा महान ऐहीकवादी म्हणायला हवा. काही करा पण कमीत कमी ७-८ बायका तरी कराच हा दंडक हा त्या काळी आवश्यक होता, कशाचेही कारण काढा, पण स्वतःचा आत्मा थंड करून घ्या हे महान आत्मज्ञान आहे. पटले बुवा आपल्याला. त्यत सुंता फार महत्वाची आहे. त्यामुळे काय होते याचे शास्त्रीय कारण कुणालाच माहित नाही पण मला माहित आहे. त्यामुळे पुरुषाने कितीही स्त्रियांबरोबर संग केला तरी त्याला जंतू संसर्ग होत नाही. नेटवर शोधा, भरपूर माहिती मिळेल. भगिनी-भयास्तव जास्त लिहित नाही. म्हणजे किती शास्त्रीय विचार होते साहेबांचे १४०० वर्षापूर्वी ह्याचा प्रत्यय येतो.
    नीरज साहेब, पैगंबरांच्या स्त्रिया ह्यावर चर्चा चालू आहे. सुंता हि मध्यपूर्वेत प्रथा आहे पण नियम नाही. १६ बायका, बाकी केलेली युद्धे त्यात घातलेला धुमाकूळ व त्याचा महान इतिहास हाच विषय चालू आहे, उगाच तुम्ही म्हणाल कि विषय सोडून चालले आहे म्हणून आपले तुम्हाला जागे केले!!

    ReplyDelete
  4. खदीजाच्या मृत्युच्या वेळी प्रेषितांचे वय चोपन्न वर्षांचे झाले होते. ह्या विवाहापासून त्यांना झालेल्या अपत्यांतील तीन कन्या वाचल्या होत्या; पण कुणी मुलगा वाचला नाही. खदीजा हयात असतांना त्यांनी दुसरा विवाह केला नाही; पण मदीनेला आल्यावर राजकीय कारणांसाठी त्यांना विवाह करावे लागले. शिवाय ते मुस्लिमांचे प्रमुख होते आणि त्याकाळी अरब टोळ्यांच्या प्रमुखांनी अनेक बायका करण्याचा प्रघातही होता. प्रेषितांच्या प्रमुख अनुयायांना तसेच टोळ्यांच्या पुढाऱ्यांना प्रेषितांशी शरीरसंबंधातून जोडले गेलेले नाते जुळविण्याची तीव्र इच्छा असणे स्वाभाविक होते. कारण त्यायोगे त्यांची प्रतिष्ठा व सत्ता वाढणार होती. मदीनेच्या वास्तव्यात प्रेषितांनी नऊ विवाह केले. प्रेषितांनंतर इस्लामचे प्रमुख झालेले इस्लामचे पहिले खलिफा अबू बकर यांची कन्या आयेशा वगळली, तर त्यांनी हे सर्व विवाह विधवांशी लावले होते. त्या कोणत्यातरी वैवाहिक संबंधातून त्यांना पुत्रलाभ होईल आणि तो त्यांच्यानंतर इस्लामचा प्रमुख होईल अशी सुप्त आशाही ह्या विवाहांमागे असणे संभवनीय आहे.

    ReplyDelete
  5. लिहा वाचा ह्यांनी फारच उदबोधक माहिती दिली आहे, मदिनेत जे ८ विवाह केले ते युद्धात मारल्या गेलेल्यांच्या विधावांशी केले गेले. वा काय उच्च विचार होते प्रेषितांचे!
    म्हणजे धर्मासाठी युद्ध करा, समानता प्रस्थापित करा. पुरुष मेले कि त्यांच्या स्त्रियांशी विवाह करा. त्यांचा उपाभोग घ्या. नंतर त्या स्त्रियांना आपल्या अनुयायांना उपभोग घेण्यासाठी देऊन टाका. विधवांचा इतका मोठा उद्धार इतिहासात कुठेच पाहायला मिळत नाही. महान विचार होते त्यांचे. मुले झाली तर ती परमेश्वर कृपेने मोठी होतातच. पुढे कोणाचे तरी अनुयायी बनून ते विधवांचा उपभोग घेत जगतील. म्हणजे अनुयायांचे कल्याण आणि विधवांचे कल्याण असे दुहेरी हित साधणारा विचार, तोही परमेश्वर कृपेने!! किती निस्वार्थी विचार आहेत.

    ReplyDelete
  6. लिहा वाचा याना सादर नमस्कार ,
    आप्पा-आपण ज्या विचाराने लिहिले आहे तो विचार नंतरही आपल्याला अगदी छत्रपति यांच्या काळात सुद्धा दिसतो . अनेक विवाह करण्याचे कारणहे केवळ राजकीय हितातून असावे हे खरे आहे
    बाप्पा-पु . ना . ओक यांचे एक पुस्तक वाचनात आले होते ते इतिहास सांगणारे असेल असे नव्हे
    आप्पा- ओकांची पुस्तके वाचून संजय सरांची आठवण होते . कारण ओक नेहमी जणूकाही सर्वत्र हिंदू धर्म पसरला होता असे समजून मांडणी करतात तसेच संजय सर्वत्र शिवलिंगांचे राज्य होते असे समजतात . अवेस्ता आणि वैदिक ऋग्वेद याबद्दल त्यांचे विचार जगजाहीर आहेत
    बाप्पा - पु ना ओकांनी असे लिहिले आहे की मक्केत जिथे आत्ता काबा मंदिर आहे तिथे ३६५ देवता होत्या आणि त्या हिंदुंच्या होत्या त्याबद्दल लिहा वाचा सर आम्हाला आपणा कडून किंवा संजय सर यांच्याकडून किंवा अजूनही कोणी जाणकार असतील तर माहिती ऐकायला आवडेल तसेच महम्मद प्रेषिताचे वडील हे मक्केच्या काबा मंदिराचे गुरव होते असे वाचले ते खरे का ?

    ReplyDelete
  7. अहो बाप्पा, प्रेषितांचे वडील गुरव नव्हते, ते वैदिक ब्राम्हण होते. त्यांनी काबातील मंदिरे हायजाक केली होती. म्हणून तर प्रेषितांनी त्यांना (वैदिक ब्राम्हणांना) हाकलून लावले. आणि नवीन देव धर्माला वैदिक मुक्त केले. आत्ता संजय सर तेच महान काम करताहेत. बरोबर ना हो सर?

    ReplyDelete
  8. http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html
    सर इथे आपण लिहिले आहे कि, "" शैव धर्माचा पुरातन काळ आपण सिंधू संस्कृतीपासून प्रत्यक्ष पुराव्यांनिशी पाहू शकतो. उत्खननांत असंख्य लिंगरुप प्रस्तरखंड आणि योनीनिदर्शक शाळुंखा सापडलेल्या आहेत""
    "" कालिबंगन (राजस्थान) येथे सापडलेले इसपू २६०० मधील हे शिवलिंग. हडप्पा येथेही शिवलिंग मिळालेले आहे. शिव-शक्ती यांची संयुक्त स्वरुपात पुजा सुरु झाल्याचा हा पुरातन पुरावा.""
    सर आता आपण दोघे मिळून ह्या सगळ्या शिवलिंगांची (म्हणजे हरप्पा येथे सापडलेले एक, कालीबंगा येथे सापडलेले १ व असंख्य शिवलिंगे आणि शाळुंका उर्फ योनिदर्शक प्रस्तरखंड) हे कुठे ठेवले आहेत ते जगाला दाखवून देऊ, त्यांची रेदिओ कार्बन -१४ हि त्यांचा काळ ठरवणारी चाचणी करून घेऊ. ते अधिकृत हडप्पा वाले साले काहीच फोटो देत नाहीत ह्या तुमच्या गोष्टींचे. त्यांचे आधी बुचं मारून ठेऊ. आणि मग आपल्या देशातील संघोट्या आणि त्यांच्या उठवळ पिल्लावालीची कशी वाजवायची ते तुम्ही माझ्यावर सोडा.. आणा-आणा लवकर ते सगळे पुरावे इकडे. पण साहेब, ते मर वत्स आणि ढवळीकर ह्यांच्या पुस्तकातील पाने अजिबात नको हो. अशाने हे संघोटे आपल्याच तोंडाला पाने पुसतील. कागदावर किती दिवस काढायचे आता आम्ही सुद्धा मोठे झालोय, आम्हाला नको का आता खरेखुरे! आणा-आणा लवकर. मी आहेच तुमच्याबरोबर. म्हणजे आले ना लक्षात. तुम्ही नका घेऊ मी आहे ना घायला.

    ReplyDelete
  9. Well with tremendous respect to Muhammad I still think Islam is stuck in father in law and son in law...I wonder how come Muhammad ignore or not aware of his people being divided for Ali and Abu Bakar....And how he remain silent while seeing the division...He did a great thing for religion he was preaching...Also what amaze me is how come a man who is not involved in any debate religious or social, no socializing, no big friend circle and completely illiterate (no books or info viable at that time he can read by himself) suddenly became a preacher....and that too with lot of hesitation and fear....One must decode the the very background of it...

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...