Sunday, June 4, 2017

चालायचेच!


Image result for faceless procession sea


कसलीही ओळख नाही 
हीच बनली आहे
ओळख
चेहरा हरवलेल्यांच्या गर्दीत!

आकांतांचे समुद्र चौबाजुंनी
उसळतात
सारेच काही आपल्या 
अजस्त्र मिठीत घेत
तळ दाखवायला
नितळ
वेदनांचा!

जगण्याचे प्रश्न हरवले आहेत
या नासमझ उत्तरांच्या धुक्यात
जगण्याचे ओझे मात्र
वाढतच चाललेय
नसत्या प्रश्नांच्या तांडवांत!

जगवणा-यांना मृत्युदंड
उभवणा-यांना 
काळकोठडी
जगणारे मात्र धुंदीत आत्ममग्न
या बेताल
लयीत 
चालु आहे नृशंस गाणे
या विश्वाचे!

चालायचेच!

1 comment:

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...